His self-respect in Marathi Moral Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | त्याचा स्वाभिमान

Featured Books
Categories
Share

त्याचा स्वाभिमान

शाळा सुरु झाल्याची घंटा झाली आणि एक, एक करुन मुले वर्गात शिरू लागली गुरुजी वर्गाच्या दारात उभे राहून सर्वाना आत पाठवु लागले .श्रीपती आत शिरला तेव्हा सरांनी पाहिले की तो “अनवाणी” आला आहे .बाहेर अक्षरशःउन्हाळा “मी” म्हणत होता .अशा वेळेस बिनचपलाचे शाळेत येणे म्हणजे खरेच कठीण होते !! त्यात श्रीपतीच्या बाबाची झोपडी गावा बाहेर होती आणि रस्ता पण दगड धोंड्यांनी भरलेला .गुरुजींनी हटकलं श्रीपतीला, “अरे काय रे चप्पल कुठाय तुझे ?”“गुरुजी काल तुटले माझे चप्पल ..खुप जुने झाल्याने दुरुस्त पण होईना मग दिले टाकुन ““मग आता काय असा अनवाणीच येणार शाळेत ?”गुरुजींनी विचारले त्यावर काहीच उत्तर न देता श्रीपती बाकावर जाऊन बसला .श्रीपती एक गरीब घरचा पण  हुशार मुलगा होता .गुरुजीना या गोष्टीची कल्पना होती .त्यामुळे ते पण जास्त काही बोलले नाहीत आणि वर्ग सुरु झाला .     आठ दहा दिवस असेच गेले ..रोज श्रीपती आपला बिनाचपलेचा शाळेत येत होता .“काय रे अजून नाही का घेतले चप्पल “?गुरुजीनी विचारले “पुढल्या सोमवारी मजुरी भेटली की घेतो म्हणलाय माझा बा “श्रीपती उत्तरला .    आणखी आठ दहा दिवस गेले आणि एके दिवशी श्रीपतीचा बाबा त्याला सोडायला शाळेत आला .श्रीपतीच्या पायात चांगले नवीन चप्पल होते .गुरुजी समोर दिसले म्हणल्यावर श्रीपतीच्या बाबाने विचारले “काय आमच पोरग कस हाय अभ्यासात ““आहे हुशार पण उनाडक्या कमी करायला हव्यात “गुरुजी बोलले “म्या बी त्येच सांगत अस्तु त्याला ..काय रे श्रीपती ?”“बाबा जा आता तु शाळा सुरु झाली “..श्रीपती बोलला “बर जातो आणि चप्पल इसरू नकोस शाळेत ..”असे सांगुन श्रीपतीचा बाबा म्हणला आणि निघुन गेला.गुरुजीच्या लक्षात आले श्रीपतीच्या पायात नवीन कोरे चप्पल होते पण त्याचा बाबा मात्र अनवाणीच आला होता .     पुढल्या आठवड्यात डेप्युटी साहेब येणार होते शाळेला भेट द्यायलात्याची बरीच तयारी करायची होती गुरुजीना .एक आठवडा खुप गडबडीत गेला .सर्व तयारी पुर्ण झाली आणि “डेप्युटी” चे येणे उद्यावर येऊन ठेपले .ते रेस्टहाउस वर उतरणार होते त्यामुळे जेवणखाण सर्व तिथेच होणार होते .संध्याकाळी निरोप आला डेप्युटी साहेब आलेले आहेत आणि भेटायला बोलावले आहे .गुरुजी लगबगीने रेस्ट हाउस कडे पोचले .नमस्कार चमत्कार झाले साहेबांच्या जेवणा खाण्याची ,इतर गप्पा आणि चहा पाणी करून गुरुजी घरी निघाले .तेवढ्यात डेप्युटी म्हणाले “गुरुजी माझे घरी वापरायचे स्लीपर विसरले आहेत .त्यामुळे मला बाजारातुन नवीन आणुन द्या तेवढे ““ हो साहेब लगेच आणून देतो असे म्हणुन गुरुजी बाहेर पडले .त्यांची इतकी सगळी व्यवस्था करून सुद्धा आता हे चप्पलचे काम आणि गळ्यात पडले म्हणुन गुरुजी मनातल्या मनात चरफडले ..पण नाईलाज होता ..ते ताबडतोब बाजारात गेले आणि त्यांनी स्लीपर जोड खरेदी केला .त्या स्लीपर कडे बघताना अचानक त्याना श्रीपतीच्या बाबाची आठवण झाली आणि त्याचे “अनवाणी” पाय त्यांच्या डोळ्यासमोर आले .“मला आणखी एक जरा मोठ्या मापाचे चप्पल द्या बांधुन “ असे गुरुजी त्या दुकानदाराला म्हणाले .मग एक जरा भक्कम चप्पल बांधुन दिले दुकानदाराने .स्लीपर शिपाया बरोबर गेस्ट हाउसला पाठवुन देवून गुरुजी चप्पल घेवुन घरी आले .ते खोके पाहताच बायकोने विचारले “हे कोणासाठी “?तेव्हा गुरुजीने श्रीपतीच्या बाबाविषयी सांगुन त्याच्यासाठी आणले असे सांगितले.गुरुजींच्या बायकोला त्यांचा परोपकारी स्वभाव माहित होता ..ती फक्त हसली .      इन्स्पेक्शन चांगली पार पडली .शाळेला चांगला शेरा मिळाला .मुख्याध्यापकांनी पण गुरुजींचे “कौतुक” केले.गुरुजीना समाधान वाटले ..काही दिवस गेले आणि अचानक एक दिवस गुरुजीना आठवले अरेच्या आपण श्रीपतीच्या बाबा साठी आणलेले चप्पल त्याला द्यायचे राहून गेले आहे .आपण कसे काय विसरलो असे वाटून ते थोडे ओशाळे झाले .दुसर्याच दिवशी त्यांनी श्रीपतीला निरोप दिला आणि त्याच्या बाबाला शाळेत बोलावुन घेतले .तीन चार दिवस तरी श्रीपतीचा बाबा नाही आला .एके दिवशी मात्र तो शाळेत श्रीपती बरोबरच आला ..त्याला वाटले गुरुजींनी  श्रीपती विषयी काही सांगायला बोलावले आहे “गुरुजी आता काय खोडी केली आमच्या शिरप्याने ?”श्रीपतीच्या बाबाने विचारले ..“ श्रीपतीने काही नाही केले मीच तुम्हाला बोलावले होते “गुरुजी म्हणाले कशापायी बोलावले होत ?श्रीपतीचे बाबाने विचारले .लगेच गुरुजींनी  टेबलाच्या खाली ठेवलेले चप्पल खोक्यातून काढुन त्यांच्या पुढे केले .चप्पल पाहून श्रीपतीच्या बाबाने प्रश्नार्थक चेहरा केला ..त्यांच्या अनवाणी पावलाकडे बोट दाखवुन गुरुजी म्हणाले ,”तुमच्यासाठी आणले आहे हे .घ्या आणि घाला ..”श्रीपतीच्या बाबाचा चेहरा पडला...“नग नग मला मास्तर ह्ये “तो बोलला “ का बरे आवडले नाही का हे चप्पल ?”गुरुजींनी विचारले “मला न्हाय घेता येणार ह्ये गुरुजी “श्रीपतीचा बाबा निग्रहाने बोलला “ पण का असे “?गुरुजींनी थोडेसे नाराजीने विचारले “गुरुजी म्या गरीब हाय ठाव हाय मला .तुमी बी माज्यासाठी काळजीन ह्ये चप्पल आनल ह्ये बी मला समजतंया .पन तुमी माज्या मुलाच गुरुजी हाय ,त्येला शिकवून शान कर्ताया आनी तुमच्याकडुन एखादी गोष्ट असी घेण माझ्या मनाला नाय पटनार अजाबात ..तवा मला मापी द्या यवडी ..”असे बोलुन ताबडतोब श्रीपतीचा बाबा वर्गाबाहेर निघुन गेला .आता चकित व्हायची पाळी मास्तरांची होती .त्यांच्या लक्षात आले श्रीपतीच्या बाबाचा “स्वाभिमान” त्यांनी दुखावला होता ..आणि ते आता मात्र खरोखर “ओशाळे” झाले