Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 42 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 42

Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 42

# सत्यनूभव ..
# नेरळ स्टेशन ..
       
       
        नमस्कार आजचा अनूभव आहे नेरळ शहरातील रेल्वे स्टेशनच्या एका अज्ञात, न ऐकलेल्या  भुताटकीचा.. !

        जो की  आभिनव गुप्ता ह्यांनी आपल्याला मैलमार्फत पाठवला असून  -   सदर अनुभव   त्यांच्या  होम गार्ड  मित्रासमवेत  घडला आहे , तो कसा ?   व त्या रात्री काय आपबीती , काय प्रसंग आभिनव ह्यांच्या मित्रावर ओढावलं  होत? ते ऐकण्यासाठी  तुम्हाला हा अनुभव पाहाव लागणार आहे, मग वेळ का दडवायचं? चला सुरुवात करुयात ? या !

    स्थळ  : नेरळ रेल्वे स्टेशन !

      
मित्रहो  तुम्ही हमखासच कित्येकतरी रेल्वे स्टेशनवर पादचारी पुल  पहायला असेल ?  नाही का ? परंतू  त्या पुलाचा स्टेशनवर असून काय फायदा बर , कारण लोक तर त्याचा वापर करतच नाहीत - उलट थोडासा वेळ वाचावा म्हंणून , रेल्वेच्या पटरीवरुन  , रेल्वे नियम धाब्यावर टाकून लोक पटरी क्रॉस करुन जातात.-  

      परंतू ह्या शॉर्टकटच्या नांदात कित्येक  लोक एका दिवसाला रेल्वे पट-या क्रोस करतांना  आपला जिव गमावत असतात , अलीकडेच रेल्वेने केलेल्या संशोधनात एक आकडाही नजरेस पडला आहे ,  की रेल्वे अपघातांपेक्षा पटरी क्रोस करतांना जास्त लोकांचा हकनाक बळी जातो , मग त्यांचे ते अपघातात गेलेले भयंकर , डोळ्यांना  न पाहवणार मृत्युच हिडिस द्रुष्य काळजात कळ ऊठवून जात , शरीराची अव्स्था पार बाहुल्याचे तोडलेले हात , पाय अशी होऊन जाते.. - त्या बॉडी , मय्यत - प्रेताच वर्णन केलं तर अनुभव ऐकण  ईथेच सोडून द्याल म्हंणून नकोच ते.!

   म्हंणतात अपघातात  क्षणीक आलेल्या मरणाने मानवाची आत्मा मुक्त होत नाही- जिथे तो मेला , शरीर दगावल - निर्जीव झालं , त्या घटना स्थळावरुन फक्त देह, कलेवर -म्हढ हळवल जात - कारण  आत्मा? आत्मा तिथेच भटकते , अडकून पडते. 

        क्षणिक आलेल्या मरणाची आत्म्याला चुणूकही नसते , उद्याच दिवस कोणासाठीतरी चांगला असतो , काहीतरी कार्यक्रम, फिरायला जायचं बेत असत - किंवा अजुन ब-याच काही चांगल्या गोष्टी ..- मग  क्षणीक आलेल्या ह्या मरणाने काही ईच्छा, आवडी-निवडी, स्वप्न ,अजुन जगण्याची ईच्छा आस मनाला लागून राहिलेली असते ,जी अपूर्ण राहते मग ह्याच अतृप्त  इच्छांपोटी आत्मा दुखी होऊन जातो, आत्म्याला पुढची गती मिळत नाही,  तो आत्मा घुमसत तसाच पिशाच्छ योनीत अडकून पडतो.-   

        ही पिशाच्छ योनी म्हंणजे फार भयंकर त्रासयुक्त योनी मानली जाते , ज्या ज्या ठराविक वेळेला , त्या आत्म्याचा मृत्यु ओढावळेला असतो , त्याच मृत्युची रिहर्सल - योग वेळ जुळून आली की पुन्हा पुन्हा घडत , आत्म्याला वेदना देत असते , त्यालाच थोडक्यात काय तर फेरा म्हंणतात  -

       मोठी मांणस हमखास सांगतात - वेताळाची पाळखी, आण मृत्युचा फेरा कधीच पाहू नये -  कारण जर तो पाहिला तर भुताटकी अंगावर ओढावते किंवा भीतीचा नखशिखांत हादरा तरी बसतो..-
        आणि तो कसा ? तेच आता आपण  पाहणार आहोत - 

         विजय गुरुनाथ सावंत वय वर्ष 27  हा मुळचा बदलापूरचा  रहिवासी असून , होमगार्ड पदावर कार्यरत  होता - गेल्या दोन वर्षा अगोदरच त्याला ह्या पदावर काम मिळाल होत - होमगार्ड असल्याने दिवसाला आठ ते दहा तास काम कराव लागत असे  , व ड्युटी कधीही कोठेही लागत असायची, कधी नाईटपाळी- तर कधी दिवसपाळी असायची  - ..

      तर  झालं अस , एकेदिवशी  रात्रीच्या वेळी विजयची ड्युटी नेरळ स्टेशनला लागली होती -
तो दिवस नकळत अमावास्याचा अशुभ दिवस होता , चारही दिशेना  काल्याकुट्ट खविसा सारख्या कालोखाच साम्राज्य पसरल होत , अंधारातून लपून बसलेले रातकीटके किरकीरत आपल्या आस्तित्वाची जाण करुन देत होते..

     रात्री साडे दहा- अकरा वाजेपर्यंत ट्रेनमधून
  थोडीफार का असेना मांणसे उतरत जात  होती ...

        म्हंणायला अकरा वाजेपर्यंत लोकांची थोडीफार का असेना वर्दळ होती , स्टेशनवर मानवी हालचाली दिसत होत्या -

        परंतू जसा -जसा वेळ  पुढे सरकू लागला , ट्रेन तर येत होत्या - परंतू दोन्ही बाजूचे प्लाटफॉर्म रिकामे झाले होते - 

        पुर्णत स्टेशन शुकशुकाटमय  झाला होता..-  प्लेटफॉर्मवर फक्त  पेटलेल्या ट्यूबलाईटचा प्रकाश तेवढा पडला होता - त्या प्रकाशात स्टेशनवर दिसणारे रिकामे बाकडे कब्रस्तानातल्या कबरीसारखे भासत होते..

       
वातावरणात हलकासा थंडावा जाणवत होता..     रात्रीची सव्वा  बाराची वेळ झाली होती..-

विजय आणि त्याचा अजुन एक होमगार्ड मित्र , दशरथ वाकडे वय वर्ष 26 असे दोघे मिळून आपल्या खाकी गणवेशात स्टेशनवर एक फेरफटका मारत होते -

         कुठे काही धोकादायक ,संशयास्पद हालचाल ,  स्टेशनच्या अवतीभवतीची सुरक्षा ही सर्व  काम पाहण  होमगार्डच्या हाती असत- तेच काम  हे दोघे करत होते.

           " विजय , तू प्लाटफॉर्म नंबर दोनवर थांब , मी  प्लाटफॉर्म नंबर एकवर थांबतो...!"
दशरथ म्हंटला.. 

         " हा ठिक आहे !"  विजयने लागलीच होकार कळवला.

        प्लाटफॉर्मनंबर एकवर पादचारी पुल होता.- जो प्लाटफॉर्म नंबर दोनवर घेऊन जायचा , त्याच पादचारी पुलाच्या दिशेने विजय जायला निघाला -

         चालता - चालताच त्याने जरा मागे वळून पाहिलं - प्लाटफॉर्म नंबर दोन पुर्णत रिकमा होता , काहीवेळा अगोदरच उभा दशरथ अचानक कोठेतरी निघुन गेला होता.. !
नक्कीच लघवीला गेला असावा ?

       
        " हा कुठे गेला ?" विजयने स्वत:शीच नाही नाही अशी मान हळवत  दोन्ही खांदे उडवले -  गेला असेल कुठेतरी अस म्हंणतच तो पुन्हा पादचारी पुलाच्या दिशेने जाऊ लागला..

     परंतू भीतीदायक गोष्ट अशी ,की पुलावरच्या पाय-या  गडद अंधारात बुडाल्या होत्या - वरची ट्यूबलाईट खराब झाली होती , ज्याने त्या पाय-यांची रचनाच काहीशी भीतीदायक वाटत होती..- 

       त्यासहितच पुलाच्या दोन्ही  बाजुला जाळ्या आणि  पत्रे बसवले होते - ज्याने  आजुबाजूला पेटलेल्या प्रकाशाचा हळकासा झोतही पुलावर पडत नव्हता -

        जस की एका मोठ्या  हवेलीत आड वळणाच्या खोलीत  एक गुप्त चौकट असावी,  त्या चौकटीतून पुढे मरणाचा अंधार असावा -  त्याच कालोख्या चौकटीतून  खाली खाली  पाय-या गेलेल्या असाव्या ,  व सर्वात शेवटच्या पायरीनंतर पुढे एक तळघर लागाव , आणि त्या अंधा -या तळघरात न जाणे काय आपली वाट पाहत बसल असाव ?

      विजयच्या मनात तर एकवेळ विचारही आला , की ह्या  पुलावर कोणी असलं तर ?

        विजयला तो अंधार पाहताच प्रथम जराशी भीती वाटली, कारण ही तसंच होत - जिन्यावरचा अंधार नैसर्गिक अंधारापेक्षा फारच गडद जाणवत होता , ईतका की डोळे दिपावेत- त्या अंधाराला पाहता मन सांगू पाहत होत , हा अंधार साधा नाही, ह्यात काहीतरी दबा धरुन बसल आहे, सावध हो!

        विजयने हळु हळू पावळे वाढवली- स्टेशनवरच्या एका चंदेरी ट्यूबचा प्रकाश पुलावरच्या चार पाच प्रथम पाय-या उजळून गेला होता ,  बाकीच्या वर वर जाणा-या पुढच्या पाय-या मात्र अंधारसुराने आपल्या गर्भात गिळंकृत केल्या होत्या ,

        विजयने त्या ऊजळलेल्या पाय-या मागे सोडल्या - आणि काळोख्या पाय-या चढु लागला , मित्रहो विजयकडे  फोन होता , ज्याने कालोखात प्रकाशाची तलवार काढुन , त्याने अंधाराला छाटल असत -

        परंतू विजय आपला फोन चुकून आपल्या बैगमध्येच  विसरला होता -  आणि बैग  प्लेटफॉर्म नंबर दोनच्या  एका रुमध्ये होती - जिथे होमगार्ड आपल्या बैग्ज ठेवत,सुट्टीच्या वेळेस डब्बा  वैगेरे
खात असत.


          आता तिथे पोहचायला हा अंधारसुराचा पुल विजयला पार करण भाग होत -

        हळू हळू विजय पुलावरच्या  पाय-या चढत होता - पुलावरच्या पाय-यांवर त्याच्या पायातल्या काळ्या बुटांचा टोक टोक असा गुंजता मनात धड़कीभरवणारा आवाज होत होता.. 
( विजय सांगतात की   स्वत:च्याच बुटांच्या आवाजाची त्या दिवशी मला भीती वाटली होती.)

        जसा जसा विजय त्या पुलाच्या पाय-या
चढत होता - तसा तसा अंगाला वातावरणात होणारा बदल जाणवत होता, हलकीशी थंडी कडाक्याची होत चालली होती , त्वचेतून, मग मांसात - थेट हाडांत घुसून वळ मारु पाहत होती.. 

        विजयने पुलावरच्या पाय -या मागे सोडल्या व तो पुलावरच्या वरच्या भागावर आला , वर येताच त्याच्या नाकांत एक घाणेरडा
वास घुसला , मुत्रविसर्ज , मानवी विष्टेचा , अंमळी कुजकट घाणेरडा वास -

        पण तो वास अचानक कोठून येत होता ? कळायला काहीचंच - मार्ग नव्हत!

         विजयला त्या वासाने मळमळ व्हायला लागली व त्याने खिशातून रुमाल काढला नाकावर दाबून ठेवलं  ,आणी तो आजुबाजुला वास कोठुन येत आहे , हे पाहू लागला...

        तेवढ्यात अचानक , विजयच्या पाठीमागून एक खर्जातला आवाज आला..


           "एय बच्चे.. !"  अचानक आलेल्या त्या आवाजाने , विजयच्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला ,  फुललेल्या श्वासांसहित विस्फारलेल्या नजरेने ,  घामेजलेल्या चेह-याने त्याने गर्रकन मागे वळून पाहिल...

       

        त्याच्या   मागेच चार पावळांवर एक पन्नाशीच्या आसपासचा माणुस उभा होता.

        रंगाने काळा, अंगयष्टी देहाने काठीसारखा, अंगात एक मळलेला सफेद शर्ट होता , जो मळुन पिवळसर झाला होता , खाली  काळ्या रंगाची पेंट होती - पायांत पेरागोनच्या झिजलेल्या चपला होत्या - 
चेहरा अगदी निस्तेज, त्यावर कसलेच भाव नव्हते..-डोळे अगदी शुन्यात गोठले होते.. तीच शुन्यातली नजर विजयवरच खिळली होती.

        " हं काय?" विजयने धीर ठेवत विचारलं .
   त्यावर तो अनोळखी ईसम त्या घोग-या पातळसर आवाजात म्हंटला.
     
  " टॉयलेट किधर है , हमकू पेशाब  करना है..!"  तो ईसम त्याच खर्जातल्या आवाजात म्हंणाला.

        खर तर विजयला त्या मांणसाचा फार राग आला होता , ईतक्या रात्री अंधारात तुला  मुतताना कोण पाहणार आहे ! भडव्या जाऊन कुठेही मुतना , विजय खरतर असंच म्हंणणार होता..

        परंतू काय माहीती मन तसं बोलायला धजावत नव्हत.

        एका ठराविक क्षणी नकळत चेतना  धोका ओळखून , सुरक्षा हालचाली करते , काय माहीती तीच ही वेळ असावी? 

        " जी मेरे पीछे आईए , में पताता हूं!"
प्लाटफॉर्मनंबर दोनवर गेटपासून पूढे पुरुषांकरीता टॉयलेट होत -

         विजयच्या वाक्यावर त्या मांणसाच्या मुखातून प्रतिउत्तर यायला हव होत ना ? परंतू नाहीच , तो काळ्याकुट्ट चेह-याचा माणुस एकटक शांत निर्विकार , नजरेने विजयलाच पाहत होता..-

     तो मुत्र विसर्जन, व मानवी विष्ठेचा  घाण  वास जेव्हापासून तो माणूस विजयच्या जवळ आला होता ,  तेव्हापासून  जरा जास्तच वेगान तीव्रतेने येत होता , अंगाला जाणवणा-या थंडीचा जोर ही वाढला होता.

        विजय पुढे चालू लागला  तर मागून तो माणूस  चालत होता..- विजय आता चालत
दुस-या पुलाच्या पाय-यांच्या दिशेने आला -      
आता पाय-या खाली- खाली जात होत्या -
ईथेही पाय-यांवर अंधार होता , आणि सर्वात शेवटच्या पायरी पुढे उजेड होत..! 

        परंतू तिथपर्यंत पोहचायला पुन्हा एकदा ह्या  अंधारकोठडीतल्या पाय-या उतराव्या  लागणा-या होत्या - 

       मागे उभ्या त्या अनोळखी मांणसाच्या
   साथीने भीतीचा पगडा जरासा कमी झाला होता - 

        " चलीये!" विजय म्हंणाला.
परंतू मागून होकारार्थी  अस काहीच आवाज आला नाही..

        विजय एक एक पाय पायरीवर टाकत 
  पायरी उतरु लागला , प्रत्येक पायरीवर त्याच्या पायातल्या बुटांचा त्या विळक्षण  गर्द शांततेत , टोक टोक असा आवाज होत घुमत गुंजत घुमारे घेत फिरत होता , आणि त्यासहितच मागून स्लीपरचा चट, चट असा आवाज कानांवर ऐकू येत होता..
   ह्याचा अर्थ हा , की तो माणूस विजयच्या मागूनच येत होता.-

        अचानक विजयला असा भास झाला की मागून चालणारा तो माणूस - अगदी आपल्या पाठीला टेकूनच चालत आहे , एन थंडीत विजयच्या  अंगाला दरदरुन घाम फुटला होता , पाठ घामान ओळीचिंब झाली होती,  ज्याने खाकी  वर्दी पाठीला चिटकली होती , त्याच ओल्या पाठीवर, थंडगार हिम वाफासारखे श्वास आदळत होते , ह्या घडणा-या क्रियेने विजयने गर्रकन वळुन मागे पाहिलं -

      तेव्हा विजयला आपल्या नजरेला तीन पाय-या सोडून जरा वर अंधारात त्या मांणसाची काळीशार कालोखाहून गडद -

   (जणु  अंधाराने काळीशार आकृती जन्माला घालुन तिथे उभी केली होती - अशी त्या मांणसाची आकृती दिसत होती.)

      विजयने जस मागे वळून पाहिल - त्या आक्रुतीच्या चेह-याजागी दोन चंदेरी रंगाच्या डोळ्यांच्या जोड्या सेकंदाकरीता चमकून पुन्हा
निवळून गेल्या - 

      हा माणुस एवढा वर असतांना   आपल्या पाठीवर ते थंडगार श्वास कोणाचे आदळले ? व तो आस्तित्व ? नक्की तो भास होता का ? नजरेला दिसत तेच सत्य मानून विजयने समोर वळुन पाहिल- 

        व पुन्हा पाय-या उतरु लागला , मोजून पंधरा पाय-या उतरायच्या होत्या , परंतू त्या पाय -या पंधरा नाही , पंधराच्या जागी पंधराश्या भासत होत्या , अंतर काही केल्या संपता संपत नव्हत -

        आणि मनाला तो भास सतावत होता तो वेगळा  , क्षणो-क्षणी मनाला जाणिव होत होती , पाठीमागून अगदी अंगाला टेकून कोणी तरी चालत आहे , खांद्याजवळून वाकून कोणितरी पुढे पाहत आहे , परंतू मागे वळून पाहिल्यावर त्या मांणसाची तीन पाय-या सोडून वर उभी स्तब्ध आकृती नजरेला दिसायची,  विजयने मागे वळून पाहिलं की तो आकारही जागेवर थांबत असे , एका शब्दानेही त्या मांणसाने विजयला विचारल नाही की तुम्ही मागे वळून का पाहत आहात..

    विजयच्या कानांना मागून त्या मांणसाच्या   
पायांतल्या पैरागोन चपलांच्या वाजण्याचा आवाज ऐकू येत होता ...

        ह्याचा अर्थ तो मागेच होता.

        शेवटी कसतरी विजयने शेवटची पायरी ओलांडली, व प्रकाशात आला , व तीन पावळ पुढे चालत जात , जागीच थांबला व त्या मांणसाला

        "  टॉयलेट यहां  से  आगे है ,!" अस म्हंणतच - गर्रकन मागे वळून पाहिलं ..

     जसे मागे वळून पाहिलं - एक विळक्षण मती बधीर करणार द्रुष्य नजरेला दिसलं - समोरचा अंधारात बुडालेला पुल - पार रिकामा होता ,

        त्या पुलाच्या पाय-यांवर कोणत्याही मानवी आस्तित्वाची खुण नव्हती  - काहीवेळा अगोदर , नाही फक्त काहीसेकंदाअगोदर ज्या मांणसाच्या पावळांचा आवाज कानांना ऐकू येत - त्याच आस्तित्व जाणवत होत , तोच माणुस पुढच्या एका सेकंदाला मागे वळून पाहता गायब झाला होता  ? 

        समजा जर तो वर गेला असेल - तर आवाज तर यायला हव होत ? किंवा वर पोहचे पर्यंत तो पाठमोरा तरी दिसायला हवा होता ? पण नाहीच , ईथे काहीच दिसल नव्हत.. !  

     अचानक तो कोठे ? कसा ? गायब झाला होता कळायला काहीचं मार्ग नव्हत!

        " हा माणूस कुठे गेला ?" विजय स्वत:शीच म्हंटला - पाच दहा सेकंद विजय जागेवरच उभ राहून तो अंधारात बुडालेला जिनाच पाहत होता.. 

        कितीतरी वेळ तो तसाच एकटक त्या जिन्यालाच पाहत होता .

        विजयच्या मागे वीस पावळांवर
स्टेशनमधून बाहेर पडायचा मार्ग होता -
     

          तोच मागून बाहेर पड़णा-या दरवाज्यातून एक परिवार स्टेशनवर आल , त्या परिवारात  तीन - चार लहान मुलही होती - जी दंगा मस्ती करत होती..

        त्यांच्या आवाजाने विजयची तंद्री भंग पावली - व काहीवेळा करीता का असेना विजय तो प्रसंग विसरुन गेला..

      आताला  रात्रीचा पावणे तीन वाजला होता - तो  स्टेशनवर आलेला परिवार अर्धा- पाऊण तास थांबून अडीज वाजेच्या सुमारासच्या एका ट्रेनमध्ये बसून निघुन गेला होता. 

        तशी पुन्हा एकदा स्टेशनवर शांतता पसरली होती - विजय प्लाटफॉर्मनंबर दोनच्या एका बाकावर बसला होता , तर प्लाटफॉर्मनंबर  एकवर दशरथ डोळे बंद करुन बसला होता..
   तसंही   रात्रीच्या वेळेस कोण अस पाहणार होत ?हो म्हंणायला  दर पंधरा वीस मिनिटांनी उठून एक चक्कर टाकायची बैस.!

        विजयने आपल्या बैगमधून फोन काढुन आणल होत - टाईमपास म्हंणून तो फोनवर  candy crush गेम खेलत बसला होता.-

      मोठे पोलिस साहेब सुद्धा आपा-आपल्या ऑफिसमध्ये बसले होते - हो म्हंणायला तासाभराने त्यांची एक फेरी होत असे . - आणि तसंही जर कोणत्या साहेबांनी त्याला अस फोनवर गेम खेळतांना पाहायला असत तरी काही म्हंटल नसत , तेवढी तरी त्याची साहेबांशी ओळख होतीच.

    काहीवेळा अगोदर घडलेला तो विचीत्र
प्रसंग , त्याचे पड़साद विजय केव्हाचेच विसरुन गेला होता...- 

   नेरळ  स्टेशनवर चारही दिशेना मध्यरात्रीची सुन्न  अशी  शांतता पसरली होती - त्याच शांततेत गेममधून निघणारा  पाश्वर्य संगीत  अभद्रपणे वाजत होता.- 

        विजय बाकडावर बसून एकटक गेम खेळण्यात मग्न होता - म्हंणायला थोड्या थोड्या उशीराने तो फोनमधून लक्ष काढुन घेत आजुबाजूला कोठे काही हालचाल दिसते का ते पाहत होता.. 

      त्याने पुन्हा नेहमीसारख  फोनमधून लक्ष काढुन घेतल - व एक कटाक्ष अवतीभवती टाकला , तसे त्याच्या नजरेला दिसून आलं - की दोन्ही स्टेशनच्या मधोमध  असलेल्या प्लाटफॉर्म नंबर दोनच्या पटरीवर , तीस पावळांवर  एक म्हातारी पाठमोरी  कसलीही हालचाल न करता उभी  आहे , 

        त्या म्हातारीच्या अंगावर एक भगव्या रंगाचा लुगडा होता , छातीवर हिरव्या रंगाचा पोळका होता , अंगयष्टीने ती म्हातारी जरा जाडी होती , डोक्यावरचे केस फिकट पिवळसर -पांढरे मिश्रित होते..-  

        त्या म्हातारीची कसलीही हालचाल होत नव्हती - शांत , निर्जीव - मृतकासारखी ती एकटक पाठमोरी उभी होती ,दोन्हिहात शरीराला एकसम होऊन चिटकले होते.

        विजयने त्या म्हातारीला पाहिलं - तेवढ्या
क्षणाला त्याच्या चेतनेने एक धोक्याचा ईशारा दिला , की पुढे काहीतरी घडणार आहे ?


      " ही म्हातारी जिव देते का काय ? " विजय स्वत:शीच अस म्हंणतच , विजयने फोन खिशात ठेवला..- बाकड्यावरुन ऊठत - तो प्लाटफॉर्मनंबर एक वरुन वीस पावळ चालत पुढे आला ,  आता थोड दूर  प्लाटफॉर्मनंबर एकच्या पटरीवर ती म्हातारी उभी होती..

        " ए दशरथ , ए दशरथ..!" विजयने अस म्ह्ंणतच - प्लाटफॉर्मनंबर एकवर, एका बाकड्यावर डोळे मिटून पहुडलेल्या दशरथला हाक दिली- परंतू पडल्या पडल्याच त्याला झोप लागली असावी? कारण आवाज देऊनही तो ऊठला नव्हता.. 

        शेवटी दशरथला हाक द्यायचा - विचार
विजयने सोडून दिला - व त्या म्हातारीला हाकारु लागला..

       
        " ओ आज्जी, ओ आज्जी!" विजय हाका देत होता - परंतू ती म्हातारी सुद्धा काहिवेळा अगोदर भेटलेल्या  त्या  ईसमाप्रमाणेच शांतपणे जागेवर उभ राहून एकटक समोरच पाहत होती.. 

         " ओ आज्जी, काय करताय -? बाहेर या ? ट्रेन येईल.!"  विजय म्हंटला..

        शेवटी ती म्हातारी ऐकत नाही हे पाहून विजयने एक कटाक्ष  जागेवर उभ राहूनच पटरीवर दोन्ही बाजुंना टाकला , कोठूनही ट्रेन येण्याची चिन्ह नाहीत हे पाहता - त्याने प्लाटफॉर्म नंबर दोनवरुन  - खाली पटरीवर उडी घेतली- व धावतच त्या म्हातारीपाशी पोहचला..

     दहा -पंधरा पावळांनीच  विजयने त्या म्हातारीला गाठल- व लागलीच  त्या म्हातारीच्या एका हाताच मनगट पकडून तिला आपल्या दिशेने फिरवल..-  

        त्या  म्हातारीच्या हाताचा स्पर्श जस विजयच्या हाताला झाला सर्व शरीर थंडगार पाण्याने भिजल्यासारख शहारलं , अस वाटलं  जणु जिवंत मांणसाच हात नाही , तर मेलेल्या मांणसाच हात पकड़लं आहे -

        परंतू खरा शहारा फुटला  तो  त्या म्हातारीच रुप पाहून - व तो शहारा होता..भीतीचा , होय भीतीचा -

    त्या म्हातारीचा चेहरा लाल ताज्या रक्ताच्या रंगरंगोटीने माखला होता - रेल्वे इंजिनची धडक बसल्यासारखा चेहरा चेंबून आत गेला होता , नाकाच हाड तूटल होत - डोळ्यांतल्या खोंबण्यांतून बुभळ बाहेर येऊन- नसांमध्ये लटकत होती, चेह-यावरच मांस फाटल होत - किंवा तुकडाच पडला होता , आतली बत्तीसच्या बत्तीस दातांची रक्ताने माखलेली बत्तीशी दिसत होती ,जिभ तुटून अर्ध तुकडा न जाणे कोठे पडला होता..-  एका बाजूच कान अर्धवट तुटून लोंबत होत ,डोक्यावरचे पांढरे- पिवळसर  केस जे चेह-यावर पसरले होते , त्यांना लाल गड़दसर रक्त लागून ते पिवळसर केस लाल रंगान रंगले होते..

         विजयने हे असल्या अभद्र, हिडिस, भयंकर ह्दय पीळवटुन टाकणा-या दृष्याच कल्पनेतही विचार केलं नव्हत -मग ते तर नजरेला दिसल होत - थेट प्रक्षेपणार्थ  दिसत होत..

     समोरच भयउत्पन्नक- मती गुंग करवून टाकणार  द्रुष्य पाहुन विजयचे छातीचे ठोके वाढले, कानसूळ गरम- झाली , डोक जड झालं , श्वासांची गती वाढली जात - त्याला भीतीचा पैनिक एटेक आला - 

        कल्पनेने तर  केव्हाचंच ईशारा दिला होता - नजरेला दिसणार द्रुष्य सामान्य नाहीच - नुस्त द्रुष्यच नाही तर समोर उभा तो माणुसच जिवंत नाहीये , हे काहीतरी काळाच्या पडद्याआडून , त्याची वेळ झाली आहे हे पाहता बाहेर आल आहे -  ज्यालाच माणूस भुत- प्रेताचा फेरा म्हंणतो..! त्याच फे-यात विजय नकळत अडथला बनून आला होता.

       कल्पनेने समोर उभ्या अज्ञाताची  ओळख
करुन दिली होती, विजयच्या नजरेसमोर ते भयचेष्टेच, अभद्र, हैवानी - क्रिपी रुप गोल गोल फिरु लागल व ते दृष्य ती भीती सहन न झाल्याने तो लागलीच तिथे पटरीवरव जागेवरच कोसळला , बेशूद्ध झाला.

         जरा अर्ध्या , एका तासाने - विजयला जाग आली- तो एका खोलीत होता -त्याच्याबाजुलाच दशरथ उभा होता ,  अजुन बरेचसे ओळखीचे चेहरे होते - सर्वाँच्या चेह-यावर चिंता, प्रश्ण , भय असे भाव उमटले होते..

          विजयला  कोणितरी पाणी प्यायला दिलं , पाणि पिल्यावर त्याला जरा तरतरी आली .. - जरा बर वाटू लागलं , परंतू भीतीची
उच्चांकता अद्याप कमी झाली नव्हती ,

       कोणितरी विजयला तू असा बेशुद्ध का झालास असं विचारलं - त्यावर विजयने काहीवेळा अगोदर घडलेले ते दोन्ही प्रकार तो काळा माणुस- व ती भयंकर - अभद्र - रक्ताळ थोबाडाची चेटकी म्हातारी बाई बद्दल सर्वाँना सांगितलं ..

    परंतू तिथे उपस्थित कोणालाही  तसा काही  भुताटकीचा भयावह अनुभव आला नसल्याने -
  कोणिही विजयच्या बोलण्यावर विश्वास ठेवलं नाही, उलट अपू-या झोपेमुळे तुला असा भास झाला असेल अस म्हंणत समजूत  काढली ..

        व विजयला मोठ्या साहेबांनी ड्युटीवरुन सुट्टी घ्यायला सांगून सव्वा सहाच्या ट्रेनने घरी पाठवून दिलं..- 

    आभिनव सांगतात की     दुस-यादिवशीपासून आठवडाभर विजय कामावर गेला नव्हता - तापाने फणफणत अंथरुणात पडला होता , जरा डोळे मिटले की डोळ्यांसमोर त्या म्हातारीचा भयंकर - चेंदा , मेंदा झालेला - कूरुप, अभद्र - हिडिस  चेहरा यायचा, त्यासहितच तो काळा कुट्ट हाडकूळा माणुस विजयला त्याच्या समोर , पेंट काढुन मुत्रविसर्जन करतांना दिसायचा ,परंतू  त्याच्या लिंगातून मुत्र बाहेर पडत नसे - तर लाल रंगाच गड़द अस रक्त बाहेर पडायच - व तो काळाकुट्ट हैवान , तोंडातले पिवळसर दात दाखवत- डोळे वटारुन खदाखदा खांदे हळवत हसायचा , व म्हंणायचा..

        " ए बच्चे  मुझे पेशाब को जाना है, टॉयलेट कहा है !"  रोज रात्री आठवडाभर तरी विजयला ते भयंकर स्वप्न पडायचे -  ज्याने रात्री झोपेतून दचकून तो जागा होत असे , अपू-या झोपेने डोळ्यांच रंग रक्त उतरल्यासारखा गडद लालसर , झाला होता , डोळ्यांखाली काळी वर्तुले उमटली होती..
अंगात अशक्तपणा आला होता..
    

        विजयच्या   घरी  फक्त त्याची आईच होती , वडील गुरुनाथराव लहानपणीच मृत पावले होते, एकुलता एक असल्याने त्याच्या आईचा म्हंणजे आवरा उर्फ आवराबाई  गुरुनाथ सावंत  ह्यांच मुलावर फार जिव होत - मुलाची अवस्था पाहवत नसल्याने त्यांनी बदलापूर मध्ये त्यांच्या एका ओळखीच्या  भगताला विजयला दाखवल , विजयला पाहून भगत्याने सांगितलं की ह्याने मृत आत्म्याच्या फे-यात अडथळा निर्माण केला आहे , ज्याने आत्म्याचा काही अंश ह्याच्या देहात उतरला असून हा बाधित झाला आहे -


        भगत्याने विजयला एक मंतरलेल तावीज  गळ्यात घालावयास दिल-  व कधीच ते काढु नको अशी ताकीद दिली..-

        ते  मंतरलेल तावीज , त्या तावीजमध्ये दैवी अंश असावा  का ? की त्या दैवी शक्तिच्या उर्जेने , ती काळी दृष्ट दाहक उर्जा , जीचा अंश जो विजयच्या देहात उतरला होता , तो कणाकणाने कमी झाला असावा- कारण पुढील दिवसापासून ताविज  घातल्यावर  विजयचा - ताप उतरला ,   ते भयावह स्वप्न यायचे बंद झाले ..

        विजय हळू हळू पुर्णपने बरा झाला - व आठवड्याभरानंतर पुन्हा त्याने ड्युटी चालू केली- 

        महिन्याभरानंतर विजयला एक धक्कादायक माहिती कळाली  की तो पुलावर दिसलेला माणूस गेल्यावर्षी जास्त दारु पिऊन पुलावर झोपला होता - व झोपेतच एटेक येऊन मेला होता , मरतांना त्याची पेंट पुर्णत मुत्रविसर्जनाने ओळी , व मानवी विष्ठेने घाण  झाली होती..

        व प्लाटफॉर्म नंबरच्या एकच्या पटरीवर दिसलेली ती म्हातारी एक कचरावेचणारी म्हातारी होती - जिला ट्रेनने दोन महिन्याअगोदर रात्री उडवल होत.. !

        आणी त्या दोनही आत्म्यांचा फेरा विजयने पाहिला होता - ही सर्व माहिती जेव्हा विजयला कळाली तेव्हा त्याला फार भीती वाटली होती..

        सर्व शरीर पायाच्या नखापासून ते मेंदूपर्यंत नखशिखांत भयकंपहिंत होत हादरल होत..

       म्हंणूनच  मित्रहो आजही त्या भगत्याने दिलेला ताविज ,  विजय नाईट ड्युटीवर जातांना हमखास गळ्यात  घालायचं विसरत नाही,

        कारण काय माहीती - रात्री -अपरात्री दिसणारा - भेटलेला माणुस, माणूस नसून एक फे-यात अडकलेली आत्मा असेल..?

       
तर मित्रजो आजचा अनुभव ईथेच समप्त होत आहे भेटूयात पुढील फे-यात अं हा ? माफ करा मित्रहो,   भेटूयात पुढील अनुभवात.. 

         ..
 
        समाप्त :