♡ माझी ई.एम.आई वाली बायको ♡
सुरुवात...
लोक ई:एम:आई वर गाड्या,ईलेक्ट्रिक वस्तू, न जाणे काय काय विकत घेतात , पण ह्या देशातला , नाही नाही देशातला नाही- ह्या संपुर्णत जगातला मी असा पहिला माणुस असेल- ज्याने चक्क ई:एम:आई वर बायको विकत घेतली ! नाही मी समजू शकतो तुम्हाला आश्चर्य वाटत असेल , पण खरे आहे -
एकवेळ चालता फिरता मशीन रोबोट घेतलं असत तर पटण्यासारख आहे , पण हाडा मांसाने बनलेला माणुस भले कोण विकत घेईल का ? पण मी घेतलं ! मी तिला विकत घेतली!
तीचा बाप म्हंणजे अगदी कडक शिस्तीतला हिटलर , त्याचीच मुलगी होती ती -
स्वभावाने चांगली, पापभरु, गुड हेबीटस
कपाळावरची कुंकू भरायची रेष सरळ असणा-या मुली चांगल्या असतात म्हंणे- सरळ स्वभावाच्या असतात , माझ्याच कंपनीत कामाला होती-
खरं तर त्या ओल्ड मार्केट, सत्य प्रवचन देणा-या मिस:ह:भ:प ला मी माझ्या कंपनी सेक्रेटरी पोस्टवर ठेवून घेणारच नव्हतो, पण आज्जीची आवड , आज्जीला त्या मिस:ह.भ.प चे विचार संतांसारखे आवडले आणि त्या मिस:ह.भ.प माझ्या डोक्यावर हडळीसारख्या ठाण मांडून बसल्या..
ती मराठी संस्कृती जपणारी - चेह-यावर हळकासा मैकअप - परंतू त्या गो-यापान तिच्या चेह-यावर मैकअपची काहीचंच गरज नव्हती. अंगावर नेहमीचंच ड्रेस, आणी पायजमा - खांद्यावर ओढणी असे -
स्वभाव हूशार, कामात पक्की, वेळेत दिलेल काम चोख करे , खरंच इंप्रेसिव.!
पण मी असा माणुस आहे ज्याला ह्या संस्कृति जपणा-या , नाही संस्कृतीच नाही- तर मला मुलीच कधी आवडल्या नाहीत !
माझ्या मते मुली म्हंणजे फक्त पैसा पाहतात , मग तो मुलगा काळ्या कोळश्यासारखा अंधारात दिसत नसला तरी चालेल , नाहीतर मग तो छोटा भीम मधला जाडा कालिया असला तरी चालेल , पण त्याच्याकडे पैसा हवा , ह्या मुली फक्त पैश्यावर मरतात नाही का ? बाकी मुलांच्या ईमोशन्सच त्यांना काय घेण देण?
म्हंणूनच आई हेट गर्ल्स !
आणि हो काही वेगळे विचार आणु नका , मी काही गे नाही!
20 वर्षाचा असतांना एका मुलीला प्रपोज केलं, तेव्हा जो तीने कॉलेजमधल्या तमाम
मुला -मुलींसमोर माझ्या प्रपोजलचा भाजी-पाला करत ईज्जतीचा फालुदा केला , तेव्हापासून आज पर्यंत मी सिंगल आहे , औरत जात मेरे लिये हैं ही नहीं - अशी समजूत होती.- आता तुम्ही म्हंणाल होती ?
हो होती !
कारण आता ती समजूत दूर झालीये , कशी, तर ती समजेलच!
म्हंणतात आपण जर कोणावर प्रेम करत असू , आणी जर तिला आपण आवडत नसू , ती किंवा तो आपल्याला ह्या आयुष्यात मिळणारच नसेल, तर रडून काय अर्थ ? कारण देवाने आपल्यासाठी तिच्या -किंवा त्याच्या पेक्षा
चांगला जोडीदार शोधून ठेवलेला असतो!
कारण माझ्यासोबतही असंच काहीस घडलं ना ?
माझ्या मनात ह्याक्षणी तो song वाजतोय,
✨हमने तो सोचा ना था ऐसा हो जायेगा , ऐसा हो जो गया sssss ✨
खरंच यार मी तिच्या प्रेमात पडलो आहे , माझ्या ई.एम.आई वाल्या बायकोच्या, मी प्रेमात पडलो आहे.
. -
सारं काही उलट- सुलट घडलं आहे, जी मला काल परवा पर्यंत बोरिंग - वायफळ बडबड करणारी वाटत होती, ती आज मला हवी,हवीशी का वाटतीये ? तीची बडबड आज चौवीस तास ऐकत रहाव असं मला का वाटत आहे ?
पण? पण ? कस बोलू मी , माझे डोळे पाणावलेत ' , स्वर जड झालाय , तिचा तो गोड़ आवाज, ते शब्द ती बडबड ऐकायला माझे कान आसूसले आहेत -
पण?पण? ह्याक्षणाला ती हॉस्पिटलच्या आय.सी.यू रुममध्ये शेवटचे श्वास घेत आहे - तिच्यावर ओढावळेल्या ह्या जिवन-मरणाच्या वाईट प्रसंगातून जाणा-या खडतर रस्त्याला मीच जिम्मेदार आहे - कारण मीच तिच्या पोटात चाकू खुपसलाय.!
डॉक्टर म्हंणालेत कि दैवी चमत्कारच आता तिला वाचवू शकतो, म्हंणूनच - म्हंणूनच
कधीही देवाच्या देऊळाची पायरी न चढलेला नास्तिक मी ह्या हत्तीसारख्या दिसणा-या देवासमोर , एका भिका-यासारखा हत पसरुन उभा आहे , तिने ह्या हत्तीसारख्या दिसणा-या ह्या गॉड , देवाच नाव - मला बाप्पा म्हंणून सांगितलं आहे , कारण तिचा तो बेस्टफ्रेंड आहे , तीने मला सांगितलं होत आयुष्यात माझं कोणीच जवळच नाही, म्हंणून लहानपणापासूनच मी ह्या मंदिरात येते -
माझे सर्व प्रोब्लेम मी माझ्या बेस्टफ्रेंड बाप्पाला सांगते आणी तो मदत ही करतो..
म्हंणून मी त्याच्या समोर हात जोडून उभा आहे -
ती सांगत होती , सर्वकाही वेळेवर सोडून चालत नाही, कोठेतरी श्रद्धा नावाची मनाला हिंम्मत देणारी भक्तिची, विश्वासाची उर्जा असायला हवी -
आजपर्यंत कोणासमोरही न झुकलेलो मी ह्या साधारणश्या दगडासमोर वाकलोय, त्या बाप्पा समोर वाकलोय, जर माझ्या झुकण्याने वाकण्याने तिच जिवन परत मिळु शकत - तर मी माझं जिवही द्यायला तैयार आहे ...- तिच्यासाठी मी हव ते करायला तैयार आहे..
माझी हजारो करोंडोंची प्रॉपर्टी मी ह्या देवावर करायला तैयार पण
बाप्पा प्लीज तिला वाचव....!
कोण आहे हा ? आणि कोण आहे ती ?
जर तो तिच्यावर प्रेम करतोय, मग त्याने तिला मारलं का ? आणि आता देवासमोर तिलाच वाचवायची भिक मागत आहे ?
नक्की काय घडलं होत ? कस घडलं होत ? तुमच्या डोक्यात असणा-या प्रश्णांची उत्तरे मिळतील - त्याकरीता वाचत रहा..
माझी ई.एम.आई वाली बायको..
loading...