Reshmi Nate - 1 in Marathi Love Stories by Mrunmai Puranik books and stories PDF | रेशमी नाते : His Arranged Bride - 1

Featured Books
Categories
Share

रेशमी नाते : His Arranged Bride - 1

भाग १

( Blue Diamond Resort 💎 )

आज BLUE DIAMOND RESORT खूप सुंदर सजावण्यात आला होता. आज सकाळपासून तिथे तयारी सुरु होती. सगळीकडे खूप सुंदर असं DECORATION करण्यात आलं होतं. सगळीकडे फुलांच्या माळा आणि फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर अशी सजावट केली होती. खूप सुंदर असं LIGHTING करण्यात आलं होतं. समोर LAWN च्या मधोमध सुंदर असा लग्नाचा मंडप सजावण्यात आला होता ✨ आणि समोर GUESTS ला बसण्यासाठी काउच ARRANGE करण्यात आले होते. सगळं काही एकदम परफेक्ट होतं. आणि असणारच. शेवटी देशमुख फॅमिलीचा EVENT होता हा. सगळं काही अगदी ELEGANT आणि PERFECT असणारच. 

मुहूर्ताची वेळ जवळ येऊ लागली तसं हळू हळू सगळे GUESTS तिथे जमा व्हायला लागले. सगळे जण येऊन समोर असलेल्या काउचवर बसू लागले. सगळं काही एकदम परफेक्ट होतं. 

.
.
.
.
.
.
.
.

( RESORT च्या एका रूम मध्ये ) 

पिहू Bridal Room मध्ये असलेल्या भल्या मोठ्या आरश्या समोर बसली होती. तिची बहीण पिया तिचा मेकअप करून देत होती. पिहूच्या डोळ्यात मात्र भीती स्पष्ट दिसत होती. तीचं हृदय नकळत जोरात धडधडत होतं. तिच्या मनात एकाच वेळी बरेच विचार येत होते. तिने नकळत तिच्या साडीच्या पदराला घट्ट धरून ठेवलं होतं. 

" दी खूप सुंदर दिसत आहेस तू आज 😊 " पिया म्हणाली तसं पिहू एकदम भानावर आली आणि तिने एकवार स्वतःकडे आरशात बघीतलं. खरंच खूप सुंदर दिसत होती ती आज. 

पिहूने आज लाल रंगाची सोनेरी काठ असलेली सिल्कची साडी नेसली होती. तिच्या गोर्या वर्णाला तो रंग अजूनच खुलून दिसत होता. त्या साडीला MATCHING असा BLOUSE तिने घातला होता. तिच्या लांब केसांची समोरून HAIRSTYLE करत मागे तिने अंबाडा बांधला होता. चेहऱ्यावर थोडासा मेकअप होता आणि ओठांवर लिपस्टिक. कपाळावर नाजूक अशी चंद्रकोर टिकली तिने लावली होती. गळ्यात आणि कानात नाजूक अशी सोन्याची ज्वेलरी तिने घातली होती आणि हातात हिरव्या बांगड्या. तिच्या हातावर असलेल्या मेहेंदीच्या रंगावर त्या बांगड्या अजुनच उठून दिसत होत्या. त्या नवरीच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती पिहू 💖 


एकदम एखाद्या परी सारखी 🩷 
पिहूने एकवार स्वतःकडे आरशात बघितलं आणि स्माईल केलं. तिने स्माईल केलं तसं ती अजूनच गोड दिसू लागली. एक वेगळीच जादू होती तिच्या स्माईल मध्ये. तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती पण मनात मात्र भीती होती. तिला अजूनही खरं वाटत नव्हतं की आज तीचं लग्न आहे. तेही राजवीर देशमुख सोबत. 
Rajveer Deshmukh. The Young And Successful Ceo Of Deshmukh Industries. ज्याच्या बद्दल पिहूने आत्तापर्यंत फक्त Newspaper मध्ये ऐकलं होतं आणि त्याला टीव्ही मध्ये बघितलं होतं. त्याला प्रत्यक्ष ती कधीच भेटली नव्हती. आणि आज. आज तीचं त्याच्यासोबत लग्न होणार होतं. 

अनेक विचार येत होते पिहूच्या मनात. तिला भीती वाटत होती आणि एक वेगळीच उत्सुकता पण होती. पिहू स्वतःशी विचार करत बसली होती तसं तिच्या Room चा Door ओपन झाला. 

" पिहू बाळा 😊 " वृषाली ( राजवीरच्या आई ) आत मध्ये येत म्हणाल्या. 

" काकू.... I Mean आई.... याना " पिहू उठत म्हणाली. 

" खूप सुंदर दिसत आहेस बाळा " वृषाली तिच्या जवळ येत स्माईल करत म्हणाल्या. त्या म्हणाल्या तसं पिहूच्या चेहऱ्यावर पण आपसूकच एक स्माईल आली. वृषालीच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा होता. आज त्या पण खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्या मरुन कलरच्या साडी मध्ये त्या एकदम Royal वाटत होत्या. 

वृषाली पिहू जवळ आल्या. त्यांनी एकवार तिच्याकडे बघितलं. खूप सुंदर दिसत होती आज पिहू. एकदम पूनम सारखी ( पिहूच्या आई ) वृषालीने पिहूकडे बघितलं आणि त्यांना एकदम पूनमची आठवण झाली. पूनम आणि वृषाली लहानपणापासू मैत्रिणी होत्या. अगदी जिवलग मैत्रिणी. पिहूला आज असं बघून नकळत वृषालीच्या डोळ्यात पाणी आलं. 

" आज पूनम असती तर खूप खूष झाली असती " वृषाली Emotional होत म्हणाल्या. वृषाली म्हणाल्या तसं पिहू आणि पिया दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. 

" आज आई खूप खूष झाली असती 🥺 " पिहू पण Emotional होत म्हणाली. तिला असं बघून वृषालीने लगेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 

" अगं आज रडू नकोस, पूनमचे आशीर्वाद आहेस की तुझ्यासोबत " वृषाली म्हणाल्या तसं पिहूने स्माईल केलं. 

" आई पण मला भीती वाटते, मी तुमच्या लाईफ मध्ये फिट होऊ शकेन का " पिहू जरा घाबरतच म्हणाली. 

" तसा विचार करू नकोस अजिबात, उलट राजवीर खूप Lucky आहे की त्याच्या लाईफ मध्ये तुझ्यासारखी मलगी येणार आहे " वृषाली तिच्याकडे बघत म्हणाल्या तसं पिहूने पण स्माईल केलं. 

.
.
.
.
.
.
.
.

( Resort च्या वरच्या Room मध्ये ) 

मुहूर्ताची वेळ जवळ येऊ लागली तसं राजवीर रेडी होऊन आरशा समोर उभा राहिला. THE RAJVEER DESHMUKH. THE RUTHLESS AND MOST ARROGANT BUSINESS MAN OF THE CITY. THE MAN WITH A COLD HEART 🖤🖤🖤
राजवीरने आज क्रिम कलरची शेरवानी घातली होती आणि त्याखाली मरुन कलरचं धोतर त्याने नेसलं होतं. केस त्याने नीट सेट केले होते. गळ्यात त्याने सुंदर आणि ROYAL अशी मोत्याची माळ घातली होती. आणि डोक्यावर मरून फेटा. त्या LOOK मध्ये तो खूपच HANDSOME आणि ROYAL दिसत होता. त्यात त्याचे गहिरे डोळे आणि धारदार नजर.


पण राजवीरच्या डोळ्यात मात्र कसलेच Expression नव्हते. त्याच्या डोळ्यात मात्र त्याचा डार्क आणि DOMINATING LOOK होता. एक वेगळाच राग त्याच्या डोळ्यात दिसत होता. त्याने एकवार त्याच्या हातात असलेल्या मोबाईल मध्ये आलेल्या मेसेजकडे बघितलं. 

' FORGET ABOUT ME RAJVEER, ITS OVER ' त्या मेसेजवर जे लिहिलं होतं ते वाचून राजवीरच्या डोळ्यात नकळत राग जमा झाला. त्याने रागातच त्याचा फोन बाजूला फेकून दिला. 

' Why Did You Do This To Me 🤬 ' राजवीर रागातच स्वतःशी म्हणाला. राजवीर स्वतःशी विचार करत आरशासमोर उभा होता तसं विराज आत मध्ये आला ( राजवीरचा जवळचा मित्र ) 

" Are You Ready Rajveer....??? " विराज म्हणाला तसं राजवीर भानावर आला. 

" Yeah I Am Ready " राजवीर त्याच्या Dominating आणि कोल्ड आवाजात म्हणाला. राजवीर म्हणाला तसं विराज त्याच्या जवळ आला. 

" Are You Sure About This Rajveer....??? तू तर त्या मुलीला कधी बघितलं पण नाहीये " विराज म्हणाला तसं राजवीरच्या डोळ्यात राग जमा झाला. 

" I Dont Care About It Damm It, मी हे सगळं फक्त आणि फक्त आई साठी करत आहे " राजवीर रागातच म्हणाला. 

" पण त्या मुलीचं काय राजवीर.....??? " विराज. 

" I Said I Dont Care 🖤 " राजवीर एकवार विराजवर नजर रोखत त्याच्या Dominating आवाजात म्हणाला. एक वेगळाच रुबाब आणि Aura होता त्याच्या आवाजात. राजवीर म्हणाला तसं विराजला पुढे काही बोलता आलं नाही. दोघेही मंडपात जायला निघाले. 

.
.
.
.
.
.
.
.

( मंडपात ) 

मुहूर्ताची वेळ झाली तसं राजवीर मंडपात आला. त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर मात्र कसलेच Expression नव्हते. तो हे सगळं फक्त FORMALITY म्हणून करत होता. राजवीर तिथे उभा होता तसं थोड्याच वेळात पिहूला पण तिचे काका काकू मंडपात घेऊन आले. राजवीरचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. 

" दादा वहिनीला हात देना 😊 " आरोही ( राजवीरची बहीण ) त्याला स्माईल करत म्हणाली तसं राजवीरने कपाळावर बोट रब केलं आणि एकवार समोर हात केला. त्याने त्याचा हात समोर धरला तसं एक नाजूक स्पर्श त्याच्या हाताला जाणवला. त्याच्या हाताला तो स्पर्श होताच नकळत त्याने नजर वर करून बघितलं.

समोर पिहू उभी होती 🩷 राजवीरने एकवार तिच्याकडे बघितलं आणि तो बघतच राहिला. तो आज तिला पहिल्यांदा बघत होता. खूप सुंदर दिसत होती आज पिहू. ती लाल सिल्कची साडी तिला खूपच सुंदर दिसत होती. त्यात तिचा तो पूर्ण Look. राजवीर तर तिला बघतच राहिला. राजवीर पिहूकडे बघत होता तसं पिहूने एकवार त्याच्याकडे बघितलं. तिने त्याच्याकडे बघितलं तसं तीही काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. त्या शेरवानी मध्ये राजवीर खूपच Handsome दिसत होता. एकदम एखाद्या हिरो सारखा 🖤 

पिहूने राजवीरकडे बघत हलकेच स्माईल केलं तसं राजवीर जणू तिच्या स्माईल मध्ये हरवून गेला. ती हसताना खूप गोड आणि Innocent दिसत होती. एकदम एखाद्या परी सारखी 💖 राजवीर कितीतरी वेळ तिला निहाळत होता.

" दादा आली ती वर " आरोही म्हणाली तसं राजवीर एकदम भानावर आला. त्याच्या डोळ्यात त्याचा डार्क आणि Dominating Look परत जमा झाला. त्याने एकवार रागातच पिहूकडे बघितलं आणि त्याचा हात काढून घेतला. दोघेही मंडपात आले आणि दोघांमध्ये अंतरपाट धरण्यात आले. 

गुरुजींनी मंत्र म्हणले तसं सगळ्यांनी त्यांयावर अक्षदा टाकल्या. सगळे जण आज खूप आनंदी होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज एक समाधान दिसत होतं. राजवीर आणि पिहू दोन बाजूला दोघांनीही हातात वरमाळा घट्ट धरून ठेवल्या होत्या. पिहूचं हृदय जोरात धडधडत होतं तर राजवीरच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच EXPRESSION नव्हते. 

|| कुर्या सदा मंगलम शुछ मंगल सावधान ||

गुरुजी म्हणाले तसं दोघांमध्ये असलेलं अंतरपाट दूर झालं. दोघांनीही एकवार एकमेकांकडे बघितलं. पिहूने राजवीरकडे बघत स्माईल केलं आणि त्याला वरमाळा घातली. राजवीर मात्र सगळं अगदी कोल्डली करत होता. त्याला ह्या सगळ्या विधि मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. 

" दोघेही पुढच्या विधि साठी पाटावर बसा " गुरुजी म्हणाले तसं दोघेही पाटावर बसले. 

गुरुजी सांगत होते तसं दोघेही सगळ्या विधि नीट पार पडत होते. पिहू सगळं उत्सुकतेने करत होती. एक वेगळीच स्माईल होती तिच्या डोळ्यात. पण राजवीर. त्याच्या डोळ्यात मात्र राग होता. त्याच्या बाजूला आत्ता जी मुलगी असायला हवी होती त्याच्या ऐवजी ही तर कोणीतरी दुसरीच मुलगी होती. गुरुजींनी वधूच्या भांगेत कुंकू भरायला सांगितलं तसं दोघांनी एकवार एकमेकांकडे बघितलं. दोघांचीही नजरा नजर झाली आणि त्याने एकवार तिच्याकडे बघत तिच्या भांगेत कुंकू भरले. त्याने मंगळसूत्र हातात घेतले आणि परत एकदा तिच्याकडे बघितलं. त्याला तिच्या चेहऱ्यावर असलेली हलकीशी भीती लगेच जाणवली. तिला असं बघून त्याने नकळत डोळे फिरवले आणि एकदम कोल्डली तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं.

दोघेही नंतर सप्तपदी साठी उभे राहिले. त्याच्या आईने त्यांची सप्तपदी साठी 💖रेशीमगाठ💖 बांधली. दोघेही अग्निभोवती सप्तपदी पूर्ण करू लागले. गुरुजी त्यांना 7 वचन सांगत होते. 5 फेरे पूर्ण झाले तसं गुरुजींनी वधूला पुढे यायला सांगितलं. पिहू आता पुढे आली आणि दोघेही बाकीचे 2 फेरे पूर्ण करू लागले. दोघांनीही सप्तपदी पूर्ण केल्या.

" लग्न संपन्न झाले ✨ " गुरुजी म्हणाले तसं सगळे टाळ्या वाजवू लागले. 

*******************************************************************************

Hello everyone 😊
आजचा हा पहिला भाग कसा वाटला कंमेंट करून नक्की कळवा 😊😊
💕रेशमी - नाते : HIS ARRANGED BRIDE💕 ही नवीन कथा सुरु करत आहे सो हा पहिला भाग कसा वाटत आहे ते नक्की कळवा 😊😊