Night Start (Horror Series) in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | रात्ररंभ (भयमालिका)

Featured Books
  • રેડહેટ-સ્ટોરી એક હેકરની - 24

            રેડ હેટ:સ્ટોરી એક હેકરની        પ્રકરણ: 24      એક આ...

  • એકાંત - 25

    છ મહિના રેખાબેન અને નિસર્ગ સિવિલમાં રહીને બહાર નીકળ્યાં ત્યા...

  • મેઘાર્યન - 9

    મેઘાની વાત પૂરી થઈ ત્યાં જ અમારી આસપાસનું દ્રશ્ય બદલાઈ ગયું....

  • The Glory of Life - 4

    પ્રકરણ 4 :મનુષ્ય નું જીવન પૃથ્વી પરના  દરેક જીવો પૈકી નું એક...

  • નિલક્રિષ્ના - ભાગ 26

    અવનિલ : "તારી આવી બધી વાતોથી એક વાત યાદ આવી રહી છે. જો તું ખ...

Categories
Share

रात्ररंभ (भयमालिका)

सदर अनुभव हा भुताटकीचा सत्य अनुभव आहे . हा सत्य अनुभव सांगणारे खुद्द माझ्या वडीलांचे वडील म्हंणजेच माझे सक्खे आजोबा रामचंद्रराव आहेत.  त्यांच्या  सत्य हकीकतीनुसार हा सत्यअनुभवमी ईथे माझ्या भयबुद्धीसहित सादर करत आहे..      तर अनुभवाच नाव आहे ..     चोरीची कोळंबी :             आजोबांच्या सागण्यानुसार सदर घटना त्यांसहित त्यांच्या तीन मित्रांसोबत  घडली  होती..   घटना घडली तो काळ फारच जूना सन, 1982 आहे.    तर ह्या भीतीचा नंगानाच माजवणा-या सत्य अनुभवानुसार घडलं अस .   धाऊ कूश्या वाघ  वय वर्ष  ( 45) हे पेशाने   बिगारी कामगार होते. ! धाऊ यांच्या परिवारात  पत्नी एका दुर्धर आजाराने नऊ वर्षा अगोदरच वारल्या होत्या.धाऊ यांना कोणी आपल म्हंणून घेणार असेल तर   फक्त मुलगी रेखा कूश्या  वाघ वय वर्ष ( 20 ) त्यांची पोटची लेक होती.        तर आजोबांच्या सांगण्यानुसार झालं अस  -   एकेदिवशी   धाऊ व माझे  आजोबा रामचंद्र दुंकूर शेंडे  वय वर्ष (48) , व त्यांचे अजुन दोन मित्र , काशिनाथ उर्फ काश्या, आणी गजानन उर्फ गज्या .!    असे हे चार ओळखीचे मित्र रात्रीच जेवण झाल्यानंतर  एकत्र येऊन निळसर चंद्राच्या उजेडामध्ये अंगणात गप्पा मारत बसले होते .      पहिल्याचा जमाना असल्याने लोक लवकरच जेवून, घर दाराच्या खिडक्या घट्ट लावून  झोपी जात असायचे.   त्यामुळे ह्या चौघा मित्रांची चाललेली ही गहाण चर्चा कोणी ऐकेल तर नवळच ! नाही का?      चल या पाहूयात ,काय चर्चा सुरु आहे !        " काय रे तुम्हाला माहिती आहे का ?आपल्या नदी पलिकडे बॉम्बेच्या एका  शेठचा फार्म हाऊस आहे .! "काशीनाथ उर्फ काश्या आपल्या मित्रांना म्हंणाले.        " हं माहीती आहे रे काश्या, पण त्याचा काय ?" गज्याने विचारल.        " अरे , त्या शेठने ना त्याच्या फार्महाऊसवर पाच - सहा टाक्यांच्यात   जाम मोठ मोठ्या कोळंब्या सोडल्यात .    एक एक ही अशी आंब्यासारखी फुगलेली आहे , बाजारात जाम भाव आहे तिला !"  काश्या म्हंटला.        " हा  तर मग काय ? " ह्यावेळेस धाऊ म्हंणाले.        " अरे मंग काय ? मी बाजारात एका मच्छीवाल्या बोललो , की तुला कोळंबी पाहिजेत का ? तर  तो बोलला का  आण- दोनशे रुपये देतो .!"    दोनशे रुपये नाव ऐकून सर्वाँनी कान टवकारले.  कारण खरंच  त्यावेळेस दोनशे  रुपये खुपच जास्त होते.  हजार - बाराशे रुपयांमध्ये तर जमिनी सुद्धा विकत घेतल्या जायच्या.           "  दोनशे रुपयांच्या कोळंब्या? " धाऊ ह्यांनी जरा  आश्चर्यचकित नजरेने काश्याकडे पाहिल..        माझे आजोबा , व गज्या हे दोघेसुद्धा काश्या काय बोलत आहे ते कान देऊन ऐकत होते .       " होय धाऊ - दोनशे रुपये ,आणी त्या दोनशे रुपयांमधले आपण  चौघे पन्नास पन्नास  रुपय वाटून घेऊ!   पण त्यासाठी  तुम्हाला माझ्यासोबत कोळंबी चोरायला याव लागेल.. - " काश्या एक एक करत माझे आजोबा,धाऊ,गज्या तिघांकडे  उत्तराहिंत अपेक्षेने पाहत होता..      आजोबा म्हंणतात की बात पन्नास रुपयांची होती - त्यातच एका रात्रीत पन्नास रुपये मिळण म्हंणजे  खुपच मोठी गोष्ट होती.-          महिन्याभरांच राशन घेता येणार होत , पोरांना न        नवे कपडे- गोड धोड खायला घेता येणार होत.      धाउंना तर आपल्या लेकीच रेखाच लग्न सूद्धा करायचं होत.   तिच्या  लग्नासाठी तस त्यांनी पैसे साठवण सूद्धा  सुरु केलं होत, पन जर ह्या पैश्यांची भर घातलीच तर तिच लग्न करता येणार होत.         पैश्याची जरुरत सर्वाँनाच होती - म्हंणूनच त्या चौघांनिही होकार दर्शवला.        " आर पण त्या शेठने फार्महाऊसर  ,राखणदार ठेवला असल ना ? मंग कसा जायचा आत..?" ह्यावेळेस माझे आजोबा रामचंद्र बोल्ले.               त्यांच्या त्या वाक्यावर काश्या म्हंटला.           " सांगतो सांगतो ऐका .मी थोडीशी माहीती काढली आहे, माहीतीनुसार तो फार्महाऊसचा  शेठ फार्महाऊसवर जास्त राहत नाही - तिथ फक्त एक वॉचमन असतो , जो फक्त गेटवर बसलेला असतो..! तर आपण काय करायचं, उद्या जेवन खावन झालं की रात्री बारा वाजता  सगळी झोपलेली असतांना घरुन निघायचं मग नदीच्या  पाण्यातून चालत जायचा - आणी फार्म हाऊसला ,चारही बाजुंनी  तारांचा कंपाउंड आहे - तर आपण  मागच्या बाजुने आत घुसू आणी कोळंबी - पाच फुट टाक्यांच्यात सोडल्या आहेत , त्या कोळंब्या जाळ टाकुन बाहेर काढु  प्लास्टीकच्या पोत्यांच्यात भरु आणी  वापस यू घरी !"  काशीनाथ उर्फ काश्या यांच  प्लान  त्यांच्या तिन्ही मित्रांना पसंतीस पडल होत.आणी उद्या हे चौघे कोळंबी  चोरण्यासाठी  फार्महाऊसवर जाणार होते. क्रमश :चोरीची कोलंबी भाग २ उद्या जेवन खावन झालं की रात्री बारा वाजता  सगळी झोपलेली असतांना घरुन निघायचं मग नदीच्या  पाण्यातून चालत जायचा - आणी फार्म हाऊसला ,चारही बाजुंनी  तारांचा कंपाउंड आहे - तर आपण  मागच्या बाजुने आत घुसू आणी कोळंबी - पाच फुट टाक्यांच्यात सोडल्या आहेत , त्या कोळंब्या जाळ टाकुन बाहेर काढु  प्लास्टीकच्या पोत्यांच्यात भरु आणी  वापस यू घरी !"  काशीनाथ उर्फ काश्या यांच  प्लान  त्यांच्या तिन्ही मित्रांना पसंतीस पडल होत.आणी उद्या हे चौघे कोळंबी  चोरण्यासाठी  फार्महाऊसवर जाणार होते.     परंतू ते म्हंणतात ना विचार करण्यात आणी ती युक्ति सत्यात उतरवण्यात  जामिन आसमानाचा फरक असतो , काशीनाथ ह्यांनी प्लान तर तैयार केला होत .. पण तो प्लान नक्की सफळ होणार होता का ?     प्रत्येकाला 50 रुपये मिळणार होते का ?    चला पाहूयात पुढे ?       काळ्याभोर आकाशाच्या पडद्याला चिरत सुर्याची अणू रेणू शक्तिमिश्रित किरणे बाहेर पडली - रात्र जाऊन सकाळचा स्वच्छ दुधाळ प्रकाश चौहू दिशेना पसरला होता.     माझे आजोबा सांगतात की त्या दिवशी आम्ही रात्र व्हायची खुपच आतुरतेने  वाट पाहत होते . कारण काम होताच उद्याच्या दिवशी आम्हा चौघांना पन्नास रुपये मिळणार होते.       परंतू आजचा दिवस फारच संथगतीने सरत होता , अस वाटत होत की घड्याळातले सर्व काटेच तास काट्याची जागा घेऊन बसले होते.        जणू नियतीला आमच्या चारही जणांच्या नशीबात  पुढे जे काही अघोरीकांड घडणार होते , त्याची पाहिल्या पासूनच जाणिव असावी ? खरंच जर आम्हाला त्या गोष्टीची कल्पना आधीच आली असती, तर रात्री आमच्या चारही जणांसोबती ती  भयंकर अशी  रक्तगोठावणारी घटना घडलीच नसती ! परंतू सारी विधात्याचीच करणी , त्या एका घटनेने आमच्या मनातल चोरीच पाप अस काही साफ झालं की आयुष्यात कधी पुढे आम्ही चोरी हा शब्द सुद्धा तोंडातून उच्चारला नाही.          ठरल्याप्रमाणे  सहा - साडे सहा दरम्यान दुर एका डोंगरमाथ्या आड  सुर्य कळला  तशी ती श्रापित चेटकी मंतरलेली रात्र उगवली ..        सुर्याने  परतीच्या वाटेला जात असताना आपल्यासोबत आपला  प्रकाश ही खेचून घेतला , आणी तो महामहिम सैतानाचा पुजारी  अंधार काजळी चढल्यासारखा हळु हळू  चारही दिशेना पसरला..    सहा वाजताच  सर्वाँच जेवण झाल होत , आता अजुन सहा तासांनी ठिक बारा वाजता , ही चारही जण कोळंबी रॉबरी करण्यासाठी निघणार होते.    शेवटी एकदाचे बारा वाजले , - आणी ही चारही  जण आप-आपल्या घरी ससे पकडायला चाललो आहोत असं खोट सांगून घरातून बाहेर पडले.         चारही जणांनी आपल्यासोबत  एक घोंगडी- व प्लास्टीकचा पोता , कोळंबी पकडायला जाळ आणी एक काठी  घेतली होती .क्रमशः चोरीची कोळंबी भाग ३ चारही जणांनी आपल्यासोबत  एक घोंगडी- व प्लास्टीकचा पोता , कोळंबी पकडायला जाळ आणी एक काठी  घेतली होती .        पहिल्याच्या जुन्या जमान्यात , आतासारखी  सिमेंट कोंन्क्रेटची घर नसायची - कूडाच्या भिंती ,त्यावर छप्पर म्हंणुन पेंढ़ा टाकला जायचा -         लाईट होती, पण गावांच्यात अद्याप पोहचली नव्हती.     ज्याकारणाने पुर्णत गाव अंधारात होत.    गावात रात्री बारा वाजेच्या समई     अगदी शुकशुकाट पसरला होता ,        आजोबा सांगतात की त्याकाळी रात्री बारा वाजल्यानंतर चोरी करणारे चोर , दरोडा टाकणारे दरोडेखोर, आणी माथेफिरु डाकु  गावांतून घोंगडी घेऊन फिरायचे -  माणुस दिसला की ते ड़ायरेक्ट त्याचे कू-हाडीने दोन तुकडे करत असत - म्हंणूनच    त्यांच्या भीतिने कोणी घराबाहेर पडत सुद्धा नव्हते..!        म्ह्ंणूनच आम्ही चारही जणांनी सोबत घोंगडी घेतली होती - तीच अंगावर लपेटुन आम्ही गावातून जात होतो.          म्हंणजे आम्हाला कोणी ओळखू शकणार नव्हत - समजा कोणी पाहिलंच तर त्याला वाटेल चोर किंवा दरोडेखोर असेल.     आकाशात पौर्णिमेचा गोळसर  चंद्र उगवला होता..आकाशगंगेत टीम- टीमणा-या चांदण्या   ह्या चारही जणांच्या आकृत्यांना पुढे पुढे जातांना पाहत होत्या..   अवतीभवतीहून रातकीड्यांची किरकिर संथगतीने कानांना ऐकू येत होती.      दहा - मिनिटात चारही जणांनी गावची सीमा ओलांडली , आता अजुन पंधरा मिनिटे चालल्यावर नदी लागणार होती .         पहिल्याचे रस्ते मातीचे होते , सिमेंट कोंन्क्रेटचे रस्ते फक्त शहरात पाहायला मिळायचे- हो म्हंणजे काही गावांच्यात आले असतील , पण आजोबांच्या गावी मात्र नव्हते.          आजोबा सांगतात की    पंधरा मिनिटे मातीचा रस्ता तुडवल्यावर  काहीवेळाने आम्हाला पाण्याचा खळ खळ  असा वाहत्या पाण्याचा आवाज कानांना ऐकू लागला ..    ह्याचा अर्थ आम्ही चौघे  नदीजवळ पोहचले होतो.     नदीच्या अवतीभवती लालमातीचा साठा जास्त असल्याने काही मोठ्या शेठ लोकांनी तिथे आपल्या वीट भटट्या तैयार केल्या होत्या.   वीट भटट्यांमध्ये काम करणारी मांणस आदीवासी होती ,पेंढ्याच्या झोपड्या बांधुन ती वीटभट्टी बाजुला राहत असायची.         रात्रीच्या अंधारात एकावर एक रचलेल्या वीटभट्टींना  श्रापीत कबरींसारख रुप आल होत..   चंद्राच्या  निळ्याशार प्रकाशामध्ये  त्या वीटभट्टींमधूनहळकस मंद गतीने एक शेवटची घटका मोजत बसलेली चित्ता जशी धुर सोडते - तसा वीटभट्टीतून हळकस धुर बाहेर पडत होत.        तो पांढरट धुर वातावरणात चारही दिशेना असाकाही पसरलेला     की  आजूबाजूच सर्व परिसर हळक्याश्या धुक्याने  नटल गेला होता.          त्या धुक्यात पाहता असं वाटत होतं की कित्येकरी चुना पोतलेल्या चेह-याचे हिडिस - अभद्र आकाराचे मृत आत्मे रात्रीचा फेरा मारत आहेत..     चंद्राच्या गोळसर कायेजवळून दोन पिशाच्छ (ड्रेक्यूला) ..जमातीतले वटवाघळू पंखफडफडत उडत जाताना दिसत होते..        ह्या चारही जणांच्या पुढे  पन्नास पावळांवर काळशार पाषाण होत , आणी पूढे  चंद्राच्या उजेडात हळकस चमकणार काळशार चंदेरी मिश्रित रंगाच्या नदीच पाणी होत           नदीच्या पाण्यामधुन सरळ पाच- सहा मिनिटे  चालत गेल्यावर नदी संपत होती , मग पुढे मातीची जामिन होती - आजुबाजूला  मोठ , मोठी जंगल असल्यासारखी   झाडे होती - आणी त्याच झाडांमध्ये बॉम्बे शेठच फार्महाऊस होत..  जिथे ह्या सर्वाँच ध्याय  म्हंणजेच कोळंबी होती.          माझे आजोबा रामचंद्र,धाऊ,काश्या,गज्या हे तिघेही पाषाणी दगडावर उभे होते -         आणी त्या सर्वाँच्या पुढ्यात नदीच काळशार पाणी होत ,  पोर्णीमेच्या चंद्राची प्रतिकृती - पाण्यात स्पष्टपणे उमटलेली दिसत होती.        "पाणि वाहत आहे , म्हंणजे नदी जास्त वंड नाही ! आपल्याला चालत जाव लागल ! " काश्या म्हंणाला.   त्यावर उर्वरित तिघांनी फक्त होकारार्थी  मान हळवली.  काश्याने ईतकवेळ घोंगडीत लपवलेली विजेरी बाहेर काढ़ली,  आणी  बटण दाबत ती पेटवली.            तसा विजेरीचा पिवळसर गोलाकारातला प्रकाश वाहत्या पाण्याच्या प्रुष्टभागावर पडला .-    व  तोच प्रकाश पाण्यावरुन प्रतिव्रत होत - ह्या चौघांचे चेहरे उजळवून गेला होता.        " चला , जास्त टाईम नको घालवायला." काश्या म्हंणाला -त्याच्याकडे टॉर्च असल्याने प्रथम तोच पाण्यातून पुढे मार्ग दाखवत चालू लागला..  व त्यांच्या मागून  गज्या, दूसरे माझे आजोबा रामचंद्र, आणी शेवटला धाऊ असे चालत निघाले होते.  पाण्यात पडणा-या  त्यांच्या प्रत्येक पावळासरशी तो झप झप असा विशिष्ट प्रकारचा भीतीदायक आवाज होत होता.      मध्येच नदीपलीकडे असलेल्या, कोणत्यातरी   झाडावर एक घुबड बसुन  घुत्कारत होती.- तीचा तो आवाज मंद लयीत कानांवर ऐकू येत होता .. कोठेतरी अपशकूणाची चाहुल लावून देणारी टीटवी टीवटीवत ओरडत होती..    खळ खळ असा पाण्याचा वाहता आवाज  सुरुच होता.    म्हंणतात सर्वात शेवटी चालणा-याला हमखास भास होतात. किंवा ते भास नसून खर असत ?        सर्वात शेवटी धाऊ चालत होते.अवतीभवती फक्त पाणीच पाणी होत , पाण्याचा खळखळ मनात भीती निर्माण करणारा आवाज होता.  अजुन बरच अंतर पार करायचं होत .   धाऊ आपल्या मित्रांसोबत रांगेतच सर्वात शेवटी  , पाण्यातून हळु हळु चालत निघाले होते.     आजोबा सांगतात की धाऊने त्यांना सांगितल होत , की मला मागून कोणीतरी दबक्या पावळाने चालत येत आहे अशी चाहुल लागत होती-         तसंही आपण पाण्यातून चालतावेळेस पाण्यातून वर पाय काढतांना कसा झप झप असा आवाज होतो तसाच  हळकासा आवाज मला मागून ही येत होता.  क्रमशः चोरीची कोळंबी भाग शेवट ४      कोणीतरी आपला  पिच्छा  करत आहे अस  वाटत होत , तसे ते जागेवरच थांबले - आणि एकदमच सोक्ष मोक्ष लावाव ह्या हेतूने त्यांनी मागे वळून पाहिल , परंतू त्यांची घोर निराशा झाली -कारण मागे त्या अथांग दूर दूर पर्यंत पसरलेल्या पाण्याशिवाय - आणी वीटभट्टींमधुन निघणा-या धुराशिवाय मागे कोणीही नव्हत..  तसे ते पुन्हा चालू लागले... व पाच पाऊळे चालून होताच ती अनपेक्षित -.अविचारी क्रिया घडली.             पटकन त्यांच्या मागून डाविकडून , उजवीकडे पाण्यावरुन पाय आपटत  काळसर रंगाच - मानवी आकाराच ध्यान वेगान पळत गेल ..     अचानक घडलेल्या ह्या क्रीयेने     धाऊंनी झटकन वळून मागे पाहिल त्यांची छाती त्याक्षणाला रेल्वे इंजिन सारखी धडधड करत वाजत होती ,   श्वास नाकातून वेगाने आत - बाहेर होत होता.         नक्की- नक्की दोन सेकंदा अगोदर काय घडलं होत ? आपल्या मागे सर्वात शेवटी कोणीही नसतांना  आपल्याला हा भास की आभास झाला होता?  नक्की नक्की आता काय घडलं होत ?          " ए तुम्हाला  आवाज आला का ? कोणितरी धावत गेल माझ्या मागून!" धाऊ मागे आजूबाजुला पाहत म्हंटले ..     काश्या,गज्या , माझे आजोबा तिघांनिही वळून मागे पाहिल -  काश्याने तर मागे अवतीभवती  टॉर्चचा पिवळाधम्मक प्रकाशही फिरवला..         पण तो प्रकाश फक्त त्या पाण्यावरच पडला होता , त्या चौंघांशिवाय तिथे कोणिही नव्हत.        " कोणी नाहीये धाऊ , कान वाजल असतील -आता थांबून चालणार नाही चला लवकर !"   काश्या म्हंणाला. आणी सर्वजन पुन्हा वाटेला लागले..        पण मागे चालणा-यांधाऊंना मात्र आपल्या मागेकोणितरी चालत येत आहे , ही चाहूल क्षणा-क्षणाला जाणवतच होती.     शेवटी अजुन दोन मिनिटे चालून त्या चौघांनिही नदी ओलांडली-        आता पायाखालची वाट मातीची होती , आजुबाजूला खुपसारी मोठ मोठी  झाडे होती ..त्या मोठाल्या झाडांनी चंद्राचा प्रकाश अडवून धरला होता ,  ज्याने खाली अंधार दबा धरुन बसलेला ..       बरंच झालं की त्यांनी विजेरी आणली होती!           विजेरीचा पिवळाधम्मक प्रकाश मार्ग दाखवत होता   ..  त्या झाडांच्या मधुन चालतांना अंगाला हळकासा गारवा जाणवत होता..        " पाच मिनिटात आपण फार्म हाऊस वर पोहचू चला लवकर !" काश्या म्हंटला व त्याने आता हळुहळु  धावायला सुरुवात केली..          हे तिघेही मागून हळुहळू  त्याच्या मागून धावू लागले..  पाच मिनिटांनी हे चौघे फार्महाऊसच्या मागे पोहचले..    काश्याने सांगितल्याप्रमाने  फार्महाऊसला चारही बाजुनी तारेच कूंपण होत -  ही  फार्महाऊसची मागची बाजु असल्याने मागे खुपसारी झाडे होती , नक्कीच ही बाग असावी ,    त्या झाडांच्या खाली , चार फुट उंचीच्या सिमेंट-कोंन्क्रेटच्या  सहा - सात  टाक्या होत्या.  त्या टाक्यांमध्ये लाल रंगाच्या  कोळंबी सोडल्या होत्या.      कोणालाही आपली चाहूल लागायला नको म्हंणुन   काश्याने  बैटरी बंद केली ..  व एक एक करत हे चौघे तारांच्या कंपाऊंडमधून अलगद  आत घुसले.       फार्महाऊसची लाईट बंद होती, फक्त गेटवर तेवढ़ा एक पिवळा बल्ब पेटला होता.     बॉम्बेच्या शेठने फार्महाऊसवर जनरेटर बसवला होता ना !         काश्याने आपल्या जवळ असलेला  जाळा  पहिल्या टाकित टाकला व त्यातून कोळंबी बाहेर काढली  व एक एक करत हे तिघे पोत्यात भरु लागले.    दोन- तीनदा वॉचमनने बागेत , टाक्यांभोवताली      जागेवरुनच बैटरी मारुन सर्वकाही ठिक आहे ना हे पाहिल होत -    त्याक्षणाला हे तिघे  वॉचमनला आपण दिसणार नाही  म्हंणुन टाकीखाली लपून बसायचे ..  शेवटी एक दिड तासात ,  तीन पिशव्या भरुन झाल्या.. आणी ही शेवटची भरण सुरु होती. तेव्हा  असंच कोळंबी पिशवीत टाकतांना नकळत  धाऊंच लक्ष एका झाडाकडे गेल.!        ज्या झाडाखाली एक सहा फुट उंच काळशार जाड़जुड आकृती उभी होती - त्या आकाराला पाहता अस वाटत होत की तो आकार मानवी नाहीच , मांणसाची काळी सावली कशी असते , तसंच तो आकार होता कालाकुट्ट ..                 जागेवर अगदी स्तब्ध उभ राहून तो काळसर आकार ह्या तिघांना पाहत होता. मनाला एक तीव्र सुचित सावध संकेत मिळत होत की तो काळसर आकार मानवी नक्कीच नाहीये!         ते जे काही असाव , ते त्या मितीतल होत , त्या जागेतच ,त्या बागेतच - फार्महाऊसवर त्याच अंत झाल होत .. -     म्हंणूनच ती आत्मा अतृप्तपणे आसुरी खेळाच्या लालसेने तिथे भटकत होती.- आणी त्याची वेळ झाल्याने ते बाहेर पडल होत व  आज त्याला ही चार झाड भेटली होती.           " ए तिथे कोणतरी उभा आहे , तो बघा काला काला आकार  दिसतोय .! आपल्याकडच बघतोच तो..  " धाऊ हळुच दबक्या स्वरात म्हंटले.      काश्या , गज्या, रामचंद्र तिघांच्याही नजरा त्या दिशेने वळल्या - तस त्यांना तो कालसर पिशाच्छी आकार झाडाखाली उभा दिसला..              " आता काय करायचं? कोण असल ह्यो? ह्याला मारायचं का?" गज्या हातातली काठी गच्च पकडत पुढे जात  म्हंणाला.         तोच माझ्या आजोबांनी त्याला थांबवल व म्हंणाले.        " नाय नाय गज्या  थांब , ह्यो मला काय माणुस वाटत नाही- हे काय तरी भलतंच वाटत्ंय , काश्या आधी त्या मांणसावर बैटरी मार  मला काय तरी गडबड दिसतय ही .  !"     काश्याने कमरेला खोचलेली  विजेरी हातात घेतली व  एक आवंढ़ा गिळला..-        विजेरीच्या बटणावर जोर देत ती पेटवली , आणी जो विजेरीचा पिवळाप्रकाश अंधाराच्या काळ्या पडद्याला चिरत त्या आकृतीवर पडला ..       आणी जे दृष्य ह्या चौघांना दिसल, ते पाहून ह्या चौघांच्या पायाखालची जामिन थरथरली..         दोनक्षण मेंदू बधीर झाला , शरीरातली शक्ति अंत पावली, पाय रबराचे -झाले , त्यातले प्राणच निघुन गेले..       आजोबा सांगतात की आमच्या   समोर एक पाण्यात बुडून मेलेल प्रेत उभ होत..  त्याचा चेहरा काळा निळा, सुजल्यासारखा होता - डोळ्यांची बुभळे दुधाळ त्यात मीरीचा ठिपका होता.     तोंडावरच मांस ठिक- ठिकाणी माश्यानी खाल्ल असाव, कारण आतली अर्धवट दातांची बत्तीशी दिसत होती, अंगात,पाणी जाऊन शरीर फुग्यासारख फुगल होत..   पोटाचा भाग गर्भवती स्त्रीसारखा पुढे आला होता.     त्यात नक्कीच साचल पाणी होत.       " काश्या बैटरी बंद कर,बैटरी बंद कर..!"    माझ्या आजोबांनी भीतीने गारठलेल्या काश्याकडून बैटरी  हिसकाऊन घेतली , व ती बंदही केली..      " ह्यो मूडदा हाई, रात्री जागा झालाय, ह्याच्या हाती गावलो तर आपल पण म्हड पड़ल.! उचला पिशव्या , आण पळा ईथून लवकर चला..! चेष्टा होतीये आपल्यासोबत..!"   आजोबा हळूच म्हंटले.. भीतीची एक रसरसती ठिंणगी प्रत्येकाच्या मनात भीतीचा वणवा पेटून गेली होती. !    पण मुत्युच्या भयाने सर्वाँनी हालचाल केली ,  एक एक करत सर्वाँनी कोळंबीची पिशवी उचल्ली..     " चला लवकर चला , माग बघू नका कुणी, माग बघू नका.."  माझे आजोबा सर्वात पुढे धावत होते..आणी त्यांच्या मागे काश्या , तिसरे  धाऊ आणी सर्वात शेवटी  गज्या धावत होता.         ह्या चौघांनिही कसतरी तारेच कंपाउंड ओलांडल कालोखातच धाऊ लागले..       आपल्या  मागून ह्या चौघांना पावळांचा धप धप असा आवाज येत होता.         कोणीतरी पिच्छा करत असल्यासारखा.        " ए थांबा , ए थांबा  ए , मला कोळंबी  द्या - मला कोळंबी द्या - म्या मेलो चिटकून , म्या मेलो चिटकून..! ए थंबा ए थंबा ..हिहिहिहिहिहीहीहीहीहीह!"    ह्या सर्वाँच्या मागून तो खर्जातला ,घोगरा ,भसाडा मृत्यूच आमंत्रण देणारा आवाज आला..        जो ऐकून ह्या चौघांच्या पाठीवरुन भीतिची धारधार सुरु फिरवली गेली, मणक्यातून थंडगार घामाच्या लाटा ओघळू लागल्या..       धाऊने न राहून मागे वळून पाहिलंच तेव्हा त्यांना दिसल , की अंधारातून तीच ती काळीशार आकृती लंगडत लंगडत धावत ह्या चौघांच्या मागे मागेच येत आहे -    तीचे दोन डोळे अंधारात विस्तवासारखे चमकत होते..         " कोणीही थांबू नका - लवकर चला मौत आली मागून..!" काश्या ओरड़ला..        शेवटी प्राणभयाने धावून धावून शेवटी  हे चौघे नदीपाशी आले..          " ए थंबा..ए....थंबा..हिहिहिहिह, आता कुठ जाल..- पाण्यात एक एकाच मईत झोपवतो आता मी हिहिहिहिहिहीही!" मागून पुन्हा तोच खर्जातला आवाज  आला...         जो ऐकून  माझे आजोबा जागीच थांबले ..- त्यांच्यासोबतच धाऊ , काश्या ,गज्या हे चौघेही थांबले.        " थांबा , कोणिही माग बघू नका !" माझ्या आजोबांनी त्यांच्या हातातली पिशवी धाऊ कडे दिली ,  व त्यापिशवीतून मुठभर कोळंब्या बाहेर काढल्या..           व त्याच मागे  न बघता , हातातून मागे फ़ेकल्यामग  लागलीच खालची मुठ भर माती  उचल्ली..       " ए चेडोबा - तुझ्या भक्ताला संकटात तुझी नितांत गरज आहे , आम्हाला माहिती आहे , आम्ही चुकीच काम केलंय , पन तुझी शप्पथ घेतो ह्या पूढ आमच्या चारही जणांमधला एकही जण चोरी हा शब्दपण तोंडून काढणार नाही, फक्त आज  तुझ्या लेकराच्या  मदतीला धावून ये बा.. जय चेडोबा..!"          रामचंद्र यांनी अस म्हंणतच ती हातातली माती , वेगान मागे फेकली- देव तो देवच- स्वत:च्या लेकाची मदत करणारच,मग तो चुकीच वागल ,की नाही वागलं - मनातून हाक दिली की त्याच्या पर्यंत ती  पोहचणारच              त्या मातीत आता  कणा-कणाने दैवी शक्तिचा अंश निर्माण झाला होता -  जमिनीवर ती पडताच सोनेरी रंगाने उजळली तिची त्या पिशाच्छा मधोमध एक लक्ष्मण रेखा तैयार झाली.. जिला रावण ओलांडू शकला नाही तर तो  पिशाच्छाला ओलांडू शकणार होता? आजोबांच्या ह्या कृतीवर मागून त्या सैतानाचा कमालीच संताप उफाळून वर आला  , त्याची ती गुरगुर- जमिनीवर रागात पाय आपटण ह्या चौघांच्या कानांवर पडत होत..        त्यासहितच तो घुंगराच्या काठीचा आवाज घुमत होता..         " चला.. बा आला  चला-  चला लवकर..माग बघु नका चला लवकर..!" तो  घुंगरांच्या काठीचा आवाज ऐकताच त्या चौघांच्या चेह-यावर हसू पसरल व ते तिघेही नदीच्या वाटेने सुखरुप पलीकडे पोहचले ..व  मागे न बघताच धावतच गावात  आले.                      दुस-या दिवशी काश्याने ती कोळंबी त्या मच्छीवाल्याला विकली -आणी ह्या चौघांना त्यांच्या मोबदल्याचे पन्नास पन्नास रुपये मिळाले..    सर्वात शेवटी  हा अनुभव सांगून झाल्यावर आजोबांनी मला सांगितल ..        की महिन्याभरानंतर आम्हाला एक गोष्ट समजली, की आमच्या अगोदर त्या फार्महाऊवर वीटभट्टीवर कामकरणारा एक आदीवासी   माणुस कोळंबी चोरायला गेला होता..       त्यावेळेस त्याने  आतिप्रमाणात दारु पिली होती ,     ज्या दारुच्या नशेतच तो टाकीत पडला, आणी मृत्यू पावळा ..         दुस -या दिवशी त्याच पाण्याने फुगलेल प्रेत पाण्यावर त्याच अव्स्थेत तरंगत होत...ज्या अवस्थेत आम्ही त्याच भुत पाहिलेल..         तर मित्रांनो अश्याप्रकारे हा आजोबांचा अनुभव होता - आणी त्यांनी चेडोबाला दिलेल्या शब्दांनुसार पुन्हा कधीच चोरीचा मार्ग निवडला नाही,         कारण चोरी करण तर पाप आहे ना !                 समाप्त.:         भेटु पुढील सत्य भागात.!