किरणच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते. रिना, प्राची आणि ती अनोळखी मुलगी—जिचं त्याच्या स्वप्नांमध्ये येणं थांबत नव्हतं—या तिघींच्या आयुष्याचं गुंतागुंतीचं जाळं त्याला वेढून टाकत होतं.
त्या दिवशी किरन, रिना आणि प्राचीला तिच्या घरी सोडतो. मनात विचारांचं वादळ घेऊन तो पुन्हा त्या हॉस्पिटलच्या दिशेने निघतो—जिथं ती कोमात असलेली मुलगी अॅडमिट आहे.
हॉस्पिटलच्या बाहेर एकटाच बसलेला किरन, डोळे मिटून आठवणींमध्ये हरवलेला असतो. तो तेवढ्यात उठून आत जाण्याचा विचार करतो, इतक्यात त्याला रिनाचा फोन येतो.
"किरण, लवकर ये… काही तरी विचित्र झालंय. प्राची खूप अस्वस्थ झालीये... मला काहीच समजत नाही..."
किरण घाबरतो. तो धावतच रिनाच्या घरी पोहोचतो. आणि बघतो तर काय—प्राचीने स्वतःला गळफास लावलेला असतो.
रिना रडत त्याच्याजवळ येते आणि म्हणते,
"माझं लक्ष काही वेळासाठी दुसरीकडे गेलं… ती आत गेली आणि जेव्हा मी चहा घेऊन गेले, तेव्हा ती… फॅनला लटकलेली होती..."
किरण तिला शांत करतो, रिनाला आपल्या घरी पाठवतो आणि प्राचीला अँब्युलन्सने त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो.
त्या हॉस्पिटलमध्ये...
तीच कोमात असलेली मुलगी आता शुद्धीवर आली होती. किरन प्राचीसोबत आत जातो, आणि तो धक्का खातो – ती मुलगी मोठ्याने ओरडते,
"बाळा! बाळा!"
ती उठून धावत प्राचीकडे जाते आणि तिच्या मृत शरीराजवळ बसते. ती जोरजोरात रडते आणि देवाला प्रश्न विचारते:
"हिला का? मलाच का नाही नेलं... का माझ्या बाळावर असा अन्याय केलास?"
किरण तिच्याकडे बघतो, आणि ती त्याच्याकडे. ती धावत येते आणि किरनला मिठी मारते.
"किरण... नाही... रितेश! काय झालं आपल्या प्राचीला...!"
किरण हादरतो.
"रितेश...? तू कोण? आणि मला रितेश का म्हणतेस?"
ती म्हणते,
"ही माझी बहीण आहे... आणि तुझं आणि माझं लग्न ठरलं होतं. मी प्रिया!"
प्रिया म्हणते,
"तूच माझा रितेश आहेस... मी तुझी होणारी बायको. आणि ती प्राची माझी बहीण होती. आपण दोघं एका शाळेत शिक्षक होतो, एकमेकांवर प्रेम करत होतो... आणि लग्न ठरलं होतं. पण नंतर... राजवल शेट आपल्य आयुष्यात मधे.
किरण—हे ऐकून स्तब्ध होतो.
तो थेट त्या डॉक्टरकडे जातो ज्यांनी त्याला "प्रिया मेली आहे" असं सांगितलं होतं.
तो त्याच्या कॉलरला धरतो:
"खरं खरं सांग! मी कोण? तू का खोटं बोललास?"
डॉक्टर घाबरतो आणि म्हणतो:
"तुझं नाव किरन नाही... तुझं खरं नाव रितेश आहे. जी मुलगी स्वप्नात यायची, तीच तुझी होणारी पत्नी होती. तुझा भूतकाळ लपवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली गेली... आणि मला पैसे देऊन तसं सांगायला लावलं."
किरण संतप्त होतो.
"कोण आहेत माझे खरे आईवडील? रिना कोण?"
डॉक्टर:
"रिना ही तुझ्या आजच्या ‘आईवडिलांची’ खऱ्या आयुष्यातली मुलगी आहे. त्यांनीच मला १० कोटी रुपये देऊन तुझा भूतकाळ मिटवायला सांगितलं. मला माफ कर!"
किरण धावत तिथून निघतो आणि परत हॉस्पिटलमध्ये येतो, जिथं प्रिया प्राचीजवळ शांत बसलेली असते.
"प्रिया... मला काहीच कळत नाही. कोण आहेस तू? मी कोण? हे सगळं काय सुरू आहे...?"
प्रिया त्याला शांत करते.
त्या दिवशी प्राचीचं अंतिम संस्कार होतो. प्रिया, रिना जिथं राहत होती तिथं किरनला घेऊन जाते.
"हे घर तर रिनाचं आहे ना?" — किरन विचारतो.
प्रिया .
"नाही, हे माझं घर आहे. मी इथे पूर्वी राहत होते...
किरण डोळे विस्फारून बसतो.
"राजवल शेट...? ते तर माझे 'आईवडील' आहेत ना...?"
प्रिया त्या दिवसांच्या आठवणीत जाते...
"आपण दोघं शिक्षक होतो, प्रेमात पडलो होतो... शाळेला ५० वर्षं पूर्ण झाल्यावर शाळा व्यवस्थापनानं एक समारंभ आयोजित केला होता. तिथंच पहिल्यांदा रिनानं तुला पाहिलं होतं आणि... तिला तू आवडला होतास. पण तुला काही लक्षच नव्हतं..."
प्रिया सांगत राहते आणि मग अचानक आवाज येतो—
"Hello!"
ते मागे पाहतात—तो राजवल शेट उभा असतो.
"तू इकडे...?" तो विचारतो.
किरण त्याच्याकडे बघतो...
त्यानंतर अनेक गोष्टी उलगडत जातात. प्रिया त्याला सांगते की एक रात्री mala गुंडांनी त्रास दिला होता, पण कोणीतरी अनोळखी तिला वाचवलं होतं. नंतर तिला शुद्ध आली ती आजच.
किरण—रितेश—हाडापर्यंत हादरतो.
प्रत्येक गोष्ट... त्याच्या स्वप्नात आली होती.
तो खिडकीजवळ जाऊन थांबतो. आणि तेवढ्यात घरात गुंड येतात.
एकाला किरन पकडतो आणि विचारतो—
"कोण पाठवतंय तुम्हाला?"
तो उत्तर देतो:
"शेट ने...!"
इतक्यात दुसरा एक गुंड पिस्तुलातून गोळी झाडतो.
किरण प्रियाला सांगतो:
"इथे राहणं तुला धोकादायक आहे. मी तुला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो."
प्रियाला तो दुसरीकडे पाठवतो आणि स्वतः शेटच्या घरी जातो.
शेट त्याला पाहून चकित होतो.
"किरण...?"
किरण फक्त एवढंच म्हणतो—
"नाही... आता मी रितेश आहे. आणि माझा भूतकाळ परत आलोय."
Continue....