Tujhyavina - 1 in Marathi Love Stories by swara kadam books and stories PDF | तुझ्याविना... - भाग 1

Featured Books
Categories
Share

तुझ्याविना... - भाग 1

आर्या अगं किती वेळ, कधीपासून वाट पाहतेय मी. उशिर होणार असेल तर तुला घरी कळवायला काय होत ग. तुझ्या काळजीने इथे माझा जीव टांगणीला लागलेला असतो, आणि तुला मात्र  त्याच काहीही नसतं. मैत्रिणी सोबत नुसत हुंदडत बसायचं. बाबांचा दोन वेळा कॉल येऊन गेला. त्यांचा फोन उचलायला काय प्रोब्लेम आहे तुला, आता ते घरी आले की त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेव. सविता आर्याला दरात बघून अगदी बुलेट ट्रेन सारख्या सुरू झाल्या होत्या..

अगं आई हो ग, काय तू पण आल्या आल्या सुरू होतेस. जरा श्वास तर घेऊ दे. आणि मी कॉल उचलले नाही किंवा तुला उशीर होईल त्या बद्दल काही कळवले नाही तर त्या मागे तसंच काही कारण असेल ना...

मग सांग ना काय कारणं आहेत तुला एवढा उशीर होण्याची. आर्यचं अस बोलणं ऐकून सविता ताई अजूनच चिडल्या.

तू बोलू देशील तर सांगेन ना. आल्या पासून तुझी आपली  बडबड चालूच आहे. आईच्या अशा बोलण्याने आता आर्या सुद्धा चिडली होती.

जास्त आगाऊपणा करू नको आर्या मुकाट्याने सांग का उशीर झाला ते. सविता ताई

आर्या - अगं आम्ही मॉल मधून निघालो तेव्हा मेघाला तिच्या बहिणीचा कॉल आलेला, तिची आई अचानक चक्कर येऊन पडली. तिला काही कळत न्हवत म्हणून तिने मेघाला कॉल करून घरी लवकर यायला सांगितलं.

सविता - मग?

आर्या - बहिणी सोबत बोलल्यावर मेघा खूपच घाबरली. तिला काहीच सुचत न्हवत ती एकदम रडायलाच लागली. तिला अशा अवस्थेत एकटीला घरी पाठवण मला योग्य वाटलं नाही. म्हणून मग मी तिच्या सोबत तिच्या घरी गेले.

सविता - अगं बाई! बरं केलस तू तिच्या सोबत तिच्या घरी गेलीस ते, बिचारी मेघा आधीच ती खूप हळवी आहे त्यात आई बद्दल अस कळल्यावर तर एकदम कोलमडली असेल. पण बाळा एवढ सगळ झालं तर मला एक कॉल करून कळवायचं ना.. मी इथे तुझी काळजी करत बसले नसते. तुला यायला उशीर झाला त्यात तू कॉल केला नाहीस आणि आम्ही करत होतो तर उचलत पण न्हवतीस. म्हणून माझी चिडचिड झाली..

आर्या - आई अगं काकूंना घेऊन हॉस्पिटल मधे जाव लागलं, त्याचा बीपी शूट झाला होता. मेघा तर आईला बघून पुरती घाबरून गेली होती आणि तिची बहीण तर किती लहान आहे. त्या दोघींना काय करावं तेच कळत न्हवत, तिच्या बाबांचा फोन सुद्धा लागत न्हवता. मग मीच तिला म्हटलं की आपण काकूंना हॉस्पिटल मधे घेऊन जाऊया. त्या सगळ्या गडबडीत माझा मोबाईल मेघाच्या घरीच राहिला..त्यामुळे मला तुम्हाला कळवायला मिळालं नाही...

सविता - अरे बापरे ! आता कशी आहे त्यांची तब्बेत.  काय म्हणाले डॉक्टर?
आर्या - आता बरी आहे. डॉक्टरांनी औषध दिलं आहे, वेळेवर औषध घेतले आणि आराम केला तर लवकर बर  वाटेल बोलले...
सविता - अच्छा.
आर्या - काकूंना शुद्ध आली होती आणि काका पण हॉस्पिटल मध्ये आले होते मग मी मेघाला  सांगून निघाले. तिच्या बहिणीला तिच्या घरी सोडलं आणि मग घरी आले.

सविता ताई आर्या जवळ जाऊन तिला मिठी मारतात आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. माझं बाळ एवढ मोठ आणि समजदार कधी झालं मला कळलच नाही. आई मी आधी पासूनच समजदार आहे ग पण तुला ते कळतच नाही त्याला काय करणार ना आर्या तिच्या आईचे गाल ओढून बोलते.

सविता - बर बर जा आता रूम मधे जाऊन आराम कर, खूप दगदग झाली असेल तुझी.जेवण झाल की मी बोलावते.
आर्या ओके बोलून रूम मधे निघून जाते.

आर्या तिच्या बेडरूम मधे आली  तिची बॅग टेबल वर ठेवून तशीच बाथरूम मधे गेली. गरम पाणी अंगावर पडल्यावर तिला बर वाटू लागलं. अंघोळ झाल्यावर तिने तिचं आवरलं ट्रॅक पँट आणि टीशर्ट घालून बाहेर रूम मधे आली, आणि तशीच बेड वर पडली.थकव्यामुळे तिला लगेच झोप लागली.

थोड्या वेळाने श्रीधर राव घरी आले. (श्रीधर देसाई म्हणजे आपल्या नाईकेच बाबा)
आईने त्यांना पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी सविता ताई कडे पाहिल आणि म्हणाले आर्या कुठे आहे?

सविता - ती तिच्या रूम मधे आहे. 
श्रीधर - मी बोलून येतो तिच्याशी.
सविता - अहो ती झोपली असेल, बरीच थकल्या सारखी दिसत होती. तिला आराम करू दे. जेवणासाठी बोलावते तिला तेव्हा बोला तिच्याशी तोवर तुम्हीही फ्रेश होऊन घ्या.

आर्याच्या बाबांचा चेहरा थोडा गंभीर होता.  सविता ताईने काळजीने विचारलं अहो काही झालं आहे का? तुमचा चेहरा का असा दिसतोय? सगळ ठीक आहे ना?
श्रीधर - हम्म... मला तुम्हा दोघींना काहीतरी सांगायचं आहे. आर्याला येऊ दे मग बोलूया.

आर्या तिच्या खोलीत झोलपी होती. आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली बाळा उठतेस का? थोड खाऊन घे मग झोप. 
आर्या - हम्म! तू पुढे हो मी फ्रेश होऊन आले.

जेवणाच्या टेबल वर सगळे शांत पणे जेवत होते. जेवण झाल्यावर बाबांनी आर्याला त्यांच्या जवळ बोलवलं. तिने मानेनेच होकार दिला आणि उठून त्यांच्या शेजारी जाऊन  बसली. बाबांनी प्रेमाने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाले तू आज जे काही वागलीस त्याचा मला खुप अभिमान वाटतो बाळा. तू नेहमी अशीच रहा. निस्वार्थी पणे दुसऱ्यांना मदत करणं हा तुझा स्वभाव खूप चांगला आहे, तो कायम तसाच ठेव.
पण पुढच्या वेळी अस काही असेल तर न विसरता आई किंवा मला कळवायचं काय? आज तुझ्या काळजीने ना माझं कामात लक्ष होत ना आईच घरात. तू ठीक आहेस कळल तेव्हा कुठे माझ्या जीवाचा घोर कमी झाला. नेक्स्ट टाईम लक्षात ठेव काहीही झालं तरी आईला सांगायचं. कॉल नाही करता आलं तरी एक मेसेज करून ठेव.
त्यावर आर्या ने हो मध्ये मान डोलावली आणि म्हणाली बाबा मी ह्या पुढे काळजी घेईन. पुन्हा अस होणार नाही

बरं मला तुम्हा दोघींना काहीतरी सांगायचं आहे. आर्या आणि आई काय या आविर्भावात त्यांच्या कडे पाहत होत्या. 

श्रीधर - माझं ट्रान्सफर झालं आहे मुंबईला. पुढच्या आठवड्यात जॉइन करायचं आहे मुंबई ब्रांच ला.

काय??? आई आणि आर्या दोघेही एकदमच म्हणाल्या. बाबांचं बोलणं ऐकून दोघी ही शॉक होत्या जास्त करून आर्या कारण आर्या कॉलेजच्या लास्ट इयर ला होती, आणि आता ह्या वेळी दुसर कॉलेज म्हणजे ॲडमिशन मिळणं कठीण आणि मिळालाच तरी तिचे सगळे मित्र मैत्रिणी तर इथे होते. आणि मेघा तिची बेस्ट फ्रेंड होती तिच्या शिवाय आर्याच पान सुद्धा चालायचं नाही. आर्याला काहीच सुधारत न्हवत तरीही ती धाडस करून बाबांना बोलली 

बाबा माझं लास्ट इयर आहे असं मला अचानक दुसऱ्या कॉलेज मध्ये ॲडमिशन नाही मिळणार, शिवाय तिथे सगळे अनोळखी असतील मी कशी काय ऍडजस्ट होईन तिथे?

श्रीधर - बाळा मला सुद्धा कळतंय पण आता पर्याय नाही मी ट्रान्स्फर रोखण्यासाठी पर्यंत केले पण वरून ऑर्डर आहेत त्यामुळे जाव तर लागेलच.

बाबांचं बोलणं ऐकून आर्यचं तोंड पडलं. ती फक्त ठीक आहे बाबा एवढ बोलून तिच्या रूम मधे गेली. 

आर्या गेल्यावर सविता श्रीधर राव सोबत बोलत होत्या...
सविता - मी काय म्हणते तीच शेवटच वर्ष आहे. तिचे सगळे फ्रेंड इथे आहेत तिला खरच करमणार नाही, आणि आपल्याला माहित आहे ना मेघा शिवाय तिला जमत नाही ते? ती तिथे एकटी कंटाळून जाईल. 
श्रीधर - मग काय म्हणणं आहे तुमचं?
सविता - मला अस वाटत की आपण आर्याला इथेच ठेऊया दादाकडे. तीच हे वर्ष संपे पर्यंत. तिची परीक्षा झाली की ती येईल
मुंबईला.
श्रीधर - ते शक्य नाही सविता. आर्याला अस दुसऱ्याकडे ठेवून जाणे मला पटत नाही. आणि तुलाही माहित आहे आर्या शिवाय मला करमत नाही ते. तिला पाहिल्या शिवाय माझा दिवस सुरू होत नाही. ते काही नाही आर्या आपल्या सोबतच येणार. मी विनायक दादाची बोलतो त्याच्या बऱ्याच ओळखी आहेत मुंबई मध्ये. बघू होईल तीच ॲडमिशन. तू काळजी करू नको.
सविता - अहो दुसऱ्यानं कडे कुठे तिच्या मामाचं घर आहे ते. फक्त ऐका वर्षाच तर प्रश्न आहे. 
श्रीधर - मी माझ्या मुलीला एक दिवस सुद्धा दूर ठेऊ शकत नाही तर एक वर्ष लांबच राहील.
सविता - अहो हे अती होतय. तुम्ही काय तिला कायम घरीच ठेवणार आहात का?
श्रीधर - हो.
सविता - अहो मुलीची जात आहे ती. एक दिवस परक्याच्या घरी जाणार तेव्हा काय कराल? 
श्रीधर - तेव्हाच तेव्हा बघू. पण जेवढ शक्य आहे तेवढ मी तिला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही.

त्यावर सविता ताई ने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या हे आणि ह्याचं लेक प्रेम. काय होणार आहे पुढे काय माहित?


ही आहे आपल्या कथेची नायिका आर्या देसाई.  अभ्यासात हुशार, स्वभावाने गोड थोडी खोडकर मैत्री जपणारी. दिसायला अगदी नक्षत्रा सारखी. घरात ती तिचे बाबा श्रीधर देसाई goverment officer आणि आई सविता देसाई हाऊस वाइफ. अस त्याचं छोटस आनंदी कुटुंब
..........................,.................................................

To be continued....