Share Market Basics - Part 1 in Marathi Short Stories by Mahadeva Academy books and stories PDF | शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1

Featured Books
  • خواہش

    محبت کی چادر جوان کلیاں محبت کی چادر میں لپٹی ہوئی نکلی ہیں۔...

  • Akhir Kun

                  Hello dear readers please follow me on Instagr...

  • وقت

    وقت برف کا گھنا بادل جلد ہی منتشر ہو جائے گا۔ سورج یہاں نہیں...

  • افسوس باب 1

    افسوسپیش لفظ:زندگی کے سفر میں بعض لمحے ایسے آتے ہیں جو ایک پ...

  • کیا آپ جھانک رہے ہیں؟

    مجھے نہیں معلوم کیوں   پتہ نہیں ان دنوں حکومت کیوں پریش...

Categories
Share

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1

Securities (रोखे)

 

१) Equity Shares (समभाग): सामान्यपणे याला आपण 'शेअर्स' असे म्हणतो. एखाद्या कंपनीचा एक शेअर हा त्या कंपनीतील मालकीचा एक वाटा/हिस्सा असतो. समजा, अबक नावाची एक कंपनी आहे, तिची अंदाजीत किंमत १००० करोड रुपये आहे, मग १ रुपया प्रती शेअर प्रमाणे कंपनीने ५० टक्के मालकी हक्क विकायला काढला, म्हणजे एकूण ५०० कोटी शेअर्स विकायला काढले, राम नावाचा एक गुंतवणूकदार त्या कंपनीचे १०० कोटी शेअर्स विकत घेऊन गुंतवणूक करतो व अशाप्रकारे रामला त्या कंपनीमध्ये १० टक्के मालकी हक्क प्राप्त होतो.

२) Debt Securities (कर्ज रोखे): एखादी कंपनी किंवा संस्था रोखे (Securities) मार्केटमध्ये आणून त्याद्वारे गुंतवणूकदारांकडून काही काळासाठी पैसे कर्ज म्हणून घेते तेव्हा अशा प्रकारचे रोखे 'कर्ज रोखे' म्हणून ओळखले जातात. कर्ज रोखे घेऊन त्या कंपनीत पैसे गुंतवणाऱ्यास ती कंपनी एका ठरलेल्या व्याजदाराने दरवर्षी व्याज देते. कर्ज रोखे काही वर्षांच्या कालावधीसाठी असतात, तो कालावधी पूर्ण झाला की ती कंपनी त्या गुंतवणूकदारास त्याचे संपूर्ण पैसे परत करते. अशा प्रकारचे कर्ज रोखे राज्य सरकार, केंद्र सरकार, सरकारी संस्था यांच्याकडूनही मार्केटमध्ये आणले जातात. ज्या कर्ज रोख्याला तारणाचा आधार असतो त्याला 'सेक्युर्ड' तर ज्याला तारणाचा आधार नसतो त्याला 'अनसेक्युर्ड' कर्ज रोखे असे म्हणतात. सेक्युर्ड रोख्यामध्ये कंपनीने स्वतःची संपत्ती तारण म्हणून ठेवलेली असते, म्हणजे वेळ पडल्यास ती संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करता येतील.   

३) Derivatives (आर्थिक करार): असे आर्थिक करार ज्याची किंमत दुसऱ्या एका मालमत्तेच्या किंमतीवर अवलंबून असते, ती मालमत्ता शेअर्स, कर्जरोखे असू शकतात. आर्थिक करारांचे फ्युचरर्स (futures) आणि ऑप्शनस् (options) असे दोन मुख्य प्रकार आहेत जे स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड केले जातात.

४) Mutual Funds (म्यूचुअल फंड्ज): ही अशी आर्थिक साधने आहेत जी अनेक गुंतवणूकदारांचा पैसा गोळा करून बनलेली असतात. हा गोळा केलेला पैसा शेअर्स, कर्जरोखे, बॉन्ड यांमध्ये गुंतवला जातो.

 

Securities Market (रोखे बाजार)

 

रोखे बाजार हे असे स्थान आहे जिथे कंपन्या त्यांच्या व्यवसायासाठी निधी उभारतात, हा निधी विविध रोख्याच्या बदल्यात उभारला जातो, जसे की शेअर्स, कर्जरोखे वगैरे. रोखे बाजारात केवळ शेअर्सचे रोखे खरेदी-विक्री केले जात नाहीत, त्यासोबत कर्ज रोखे, बॉन्ड, टी बिल असे इतर रोखेही खरेदी-विक्री केले जातात म्हणून या बाजारास केवळ शेअर बाजार असे न म्हणता 'रोखे बाजार' म्हटले गेले आहे. एकदा एका कंपनीने रोखे वितरित केले की ती कंपनी स्टॉक एक्स्चेंज मध्ये लिस्ट केली जाते. अशा प्रकारे रोखे बाजार हा भांडवली बाजाराचा एक भाग आहे.

ज्याच्याकडे बचत केलेला अतिरिक्त पैसा आहे त्यांना तो पैसा अशा कंपनीला / संस्थांना देता येतो ज्यांना त्या पैशाची गरज आहे, आणि यासाठी सुविधा उपलब्ध करणे हे रोखे बाजाराचे प्रमुख कार्य आहे. म्हणजेच गुंतवणूकदार व कंपनी यांच्यातील व्यवहारासाठी सुविधा / माध्यम म्हणून रोखे बाजार कार्य करत असतो.

रोखे बाजाराचे दोन मुख्य विभाग आहेत

१) Primary Market (प्राथमिक मार्केट): निधी उभा करणे हा प्राथमिक मार्केटचा मुख्य उद्देश असतो, आयपीओ म्हणजे 'इनिश्यल पब्लिक ऑफर' यालाच आपण 'प्रारंभीक सार्वजनिक ऑफर' म्हणतो, या आयपीओ द्वारे नवीन रोखे (securities) मार्केटमध्ये आणल्या जातात. अशाप्रकारे नवीन रोखे मार्केटमध्ये आणणे हे प्राथमिक मार्केटमध्ये मोडते.

२) Secondary Market (दुय्यम मार्केट): प्राथमिक मार्केटमध्ये खरेदी केलेल्या शेअर्स / रोखे यांचा भाव वाढला जावा हा दुय्यम बाजाराचा उद्देश असतो. प्राथमिक मार्केटमध्ये खरेदी केलेले रोखे / शेअर्स येथे विकले जाऊ शकतात. नवीन गुंतवणूकदार प्राथमिक मार्केटमधील गुंतवणूकदारांकडून शेअर्स खरेदी-विक्री करू शकतात. 

प्राथमिक मार्केटमधील ऑफरचे प्रकार:

अ) Public Issue (सार्वजनिक ऑफर) : कंपनीचे रोखे पहिल्यांदाच मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतात. हे रोखे सर्वांसाठी उपलब्ध होतात ज्यामुळे कोणीही गुंतवणूकदार त्याची खरेदी करू शकतो. ही सार्वजनिक ऑफरही विविध प्रकारे मार्केटमध्ये आणली जाते. 

अ१) Initial Public Offer (प्रारंभीक सार्वजनिक ऑफर): याद्वारे कंपनीचे रोखे / शेअर्स पहिल्यांदाच सर्वांसाठी मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतात. ही ऑफरही दोन प्रकारे आणली जाऊ शकते ते दोन प्रकार म्हणजे 'फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स' आणि 'ऑफर फॉर सेल'.

फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स: याद्वारे नवीन शेअर्स खरेदीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध होतात. इथे गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा थेट कंपनीकडे जातो व त्या पैशाचा वापर कंपनी तिच्या व्यवसाय वाढीसाठी करते. 

ऑफर फॉर सेल: याद्वारे कंपनीचे प्रमोटर्स (जे लोक कंपनीचे मालक म्हणून कंपनी चालवतात व ज्यांनी सर्वाधिक पैसा गुंतवला आहे), कंपनीत गुंतवणूक असलेल्या मोठ्या संस्था, मोठे गुंतवणूकदार त्यांच्याकडे असलेले शेअर्स विकायला काढतात. अशा प्रकारच्या ऑफरमध्ये जेव्हा सामान्य लोक गुंतवणूक करतात तेव्हा ती रक्कम कंपनीकडे न जाता त्या शेअर विकणाऱ्याकडे जाते.

अ२) फॉलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ): जेव्हा एखाद्या कंपनीने आयपीओद्वारे आधीच आपले काही शेअर्स विकलेले असतील आणि त्यानंतर काही काळाने ती कंपनी पुन्हा काही शेअर्स विकायला काढते व ते शेअर्स सर्वांसाठी खरेदीस उपलब्ध असतात तेव्हा अशा प्रकारच्या ऑफर ला फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतात.

ब) प्रिफरेन्शियल इश्यू (प्राधान्य ऑफर): अशा ऑफर मधून कंपनी तिचे शेअर्स ओळखीच्या व्यक्तींना, संस्थांना विकते, जसे की कंपनीचे प्रमोटर्स, मोठे गुंतवणूकदार, त्याच कंपनीचे नोकरदार वगैरे. 

क) Rights Issue (आधिकार ऑफर): जे गुंतवणूकदार कंपनीचे शेअर होल्ड करत आहेत केवळ त्यांनाच कंपनी जेव्हा तिचे नव्याने उपलब्ध होणारे आणखी शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार देते, तेव्हा अशा प्रकारच्या ऑफरला 'राइट्स इश्यू' म्हटले जाते. म्हणजे ज्यांना अधिकार दिला आहे केवळ त्यांनाच नव्याने उपलब्ध होणारे शेअर्स खरेदी करता येतात.

ड) बोनस इश्यू : जे गुंतवणूकदार कंपनीचे शेअर होल्ड करत आहेत केवळ त्यांनाच कंपनी जेव्हा तिचे नव्याने उपलब्ध होणारे आणखी शेअर्स त्यांच्या होल्डिंगच्या प्रमाणात विना मोबदला बोनस म्हणून देते तेव्हा अशा प्रकारच्या ऑफरला 'बोनस इश्यू' म्हणतात.