गणेश आगमन २०२४
शनिवारी सकाळी उठलो आवरलं आणि गेलो गणपती आणाय .. आमचे भाऊ आणि मंडळाचे अध्यक्ष अमर यांचे सोबत, गणपती आणल्यावर घरी सर्व आवरल्यावर मग पुन्हा मंडळात किरकोळ राहिलेले काम अध्यक्ष आणि आमचं इंजिनेर अमर माने माने यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण केल ... या वर्षीची श्रींची मूर्ती उदय केकरे यान कडून आहे ..
काम आवरल्यावर उदय चा मेसेज ६ ला मंडळात या गणपती आणाय जायचं हाय पुन्हा सर्वजण गेलो घरी थोडी घराची पण तयारी ..नायतर आमचाच गणपती बाप्पा रुसायचा ..... काम करता करता कधी ६ वाजले कळलंच नाही .. सगळी पोर मंडळ बाहेर .. गाडा आणि बैल जोडीची वाट बगत ..आता येईल मग येईल .. पण तासभर काही पत्ता नाही . आधी काम करून कटाळा यायचा आता वाट बघून आणि फकस्त बसून कटाळा आला ..काही जण मोबाईलमध्ये गेम खेळत बसले होते तर काही जण जमेल त्याला फोन लावून समाचार घेत होते ..प्रत्येकाला कधी एकदाचा जातुया आस झालं होत .. तीनच्या तोंडावर लय भारी हसू हुतं आज .. .अश्या वातावरणात आज बिल्डर विशाल उदय ला फोन करून करून दमला, एरवी पन्नास पन्नास डंबेल्स जोर मारणारा बिल्डर आज फोन करून करून दमला होता. .. त्याची तळमळ खूप मनाला चटका लावत हुती ..
आणि शेवटी मग ज्याची वाट पाहत हुतो त्याचा निरोप आला ..
" पोरांना घेऊन अंबाबाई मंदिर जवळ या ..जवळच आलो आहे " ..
निरोप मिळताच आस वाटलं बास आता काय नाय झालंय सगळं . ओढ पण तेव्हढीच व्हती .. का नसणार , अहो आमच्या पोरांनी गण्या , पम्या, रव्या आणि रन्ज्या यांनी एक वेगळीच गणेश आगमनाची थीम जी केली व्हती . जी मंडळात दमछाक झाली व्हती ..ती आणि तिथं झाली बर का .. आता येईल मग येईल बाबानो तिथं पण असाच वेळ गेला . एक एक क्षण आता खूप महत्वाचा वाटत होता .. समोर सर्वांचे बाप्पा आप आपल्या मंडळात जात होते आणि आम्ही हुतु वाट बगत बैल गाड्याची ...पण काहीतरी अडचण असणार म्हणूनच उशीर होत असणार आम्ही वळखलं हुत , चुकवायचा नाय म्हणून बिचारी आराध्या पण तिचा गडबडीत वाढदिवस करून आली व्हती ... छोट्यां पासून मोठ्याना सर्वांनाच त्या वेळी वेगळाच उत्साह होता ... यावेळी बाप्पा आमची जणू परीक्षा घेत व्हता ...आणि मग बरीच वाट बघितल्यावर बैल गाडा आला पुन्हा आम्ही सर्वजण निघालो कुंभार वाड्याला .. माघ राहिलेल्या कार्यकर्त्यांना रस्ता कळवा म्हणून सरदार आणि दादांची बैल स्वतःच्या जीपीएस चालू ठेऊन सिग्नल देत व्हते .. रस्त्यात आधी मधी शी टाकत. ..
...गाड्यात लहान मूळ व्हती ..काही अघटित घडू नये आणि झालेच तर काय करावे याची काळजी श्री अमेय पाटील घेत होते .. आस हल्लू हल्लू आम्ही आलो माउली चौकात .. बैल गाडा आणि मागे जनरेटर असा सेटअप जरा लांबच हुत .. शंका व्हती तेच झालं माउली चौकात टर्न बसना . पुन्हा लय परयतण करून चार पायाचे बैल काढून दोन पायाची बैल लावायची वेळ आली .. ..चौकात बराच वेळ गेल्याने उदय केकरे डिझेल आणण्यास निघून गेले ... आम्ही सर्वानी मग गाडा ओढत ढकलत बाप्पांच्या घरी नेला या मध्ये प्रथमेश केकरे राहुल भोसले तसंच अजून काही कार्यकर्ते रस्त्यात जागो जागी विशेष मार्दर्शन करत व्हते ..
मंडळींनो या वर्षीचा आपला गणेश आगमन सोहळा लई गॉड़ होता . मी बगत होतु ..लई मानस आणि बायका पोर आणि पुरी पण .. आपली गणपतीची वरात खूप उत्साहानं बगत हुती ... काय तर नवीन बगाय हाय म्हणून एक मेकांना सांगत हुती ... सर्वांचा आनंद पाहून आम्हाला पण लय गॉड वाटत हुत ..यामुळे अंगात पोरांच्या उत्साह संचारत हुता ..😍 प्रत्येक जनाला बैला समोर उभं राहून फुटू काढावं म्हणून उत्साह होता श्री अतुल लोखंडे , श्री प्रवीण लोखंडे आणि श्री सचिन झुरे यांची गडबड खरंच बघण्यासारखी व्हती...📸 जेष्ठ मंडळी उशिर होत असल्याने गडबड करत व्हते पण पोरांचा उत्साह दांडगा .. हौसेला मोल आणि वेळ नाही .. अश्या त्या गॉड आठवणी कॅमेरात टिपाय प्रत्येकाची लकभग सुरु होती ..फटाक्याच्या आवाजानं बैलं उधळत हुती पण आमचा ते गण्या लय भारी त्यांना सांभाळत हुतं .. गण्याची साथ सुरवाती पासून शेवटा पर्यंत बैला सोबत हुती पाहून आस वाटायचं कि गण्या आणि बैल यांची जन्मा जन्मची जोडी हाय ...त्यांचं ते ट्युनिंग लय भारी जमलं हुत .. तशी हि लय भारी आयडिया पण गण्या आणि रवी ची हुती बरं का .....
.
.....पण नुसती आयडिया असून पण काय उपयोग त्याला गाडाआणि बैलं लागणार म्हणून त्याची पण जोरात तयारी चालू हुती ..आमचं इंजिनेर पम्या, आंबऱ्या आणि रणज्या गाड्याच्या मग तुटून पडली हुती . कवा एकदा हुतुय आस झालं हुत ... मेहनती रवी आणि उदय सारखं विचारात हुती आणि नोंद घेत हुती . बऱ्याच पोरांच्या मेहतीने शेवटी गाडा झालाच आणि तो दिवस आला २५ अंगुष्ट वार आइतवार ... मंडळाच्या जागी गाडा आला आणि सर्व महिलांच्या हस्ते पूजन आणि जेष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन झाले ... मंडळाने दिलेल्या सन्मानाने सर्व जण हरकून टूम. 🥰 झाले होते ... आता गाडा झाला राहील बैल यांसाठी पुन्हा आमचं तेच गण्या पम्या आणि रव्या बैल हुडकण्यास सुरु झाली .. यामध्ये श्री सरदार केंकरे आणि श्री दादा वाळके यांची बैल जोडी तयार केली या दोन्ही दादांचे (सरदार आणि दादा ) मनापासून आभार 🙏🏻 तसेच त्या बैलाचे पण येथे आभार ज्यांनी डांबवल्या लाइटी सारखा घोटाळा केला नाही ... 🫣 गाडा झाला बैल झाली आता राहिला हुता पर्श्न फकस्त लाईटचा .. मग काय पुन्हा आमचे छोटे सर्व कार्यकर्ते पडले मागे त्योच तो छोटा होंडाचा छोटू जनरेटर चालू करायला .. पण बिचारा चालू काय झाला नाही .. यामध्ये सचिन झुरे .. अमर लोखंडे ..वायरमन अमर माने .. शुभम.. समाधान .राज ... रोहन . मालक विघ्नेश ..मी पण आणि बरीच जण यांची खूप साथ मिळाली . ..💯 मग काय आभी मामा आले आमच्या मदतीला .. मामांनी तेंचा जनरेटर दिला .. यामध्ये अध्यक्ष्यानी विशेष लक्ष दिले ... ...
......ज्यांचे नाव आवर्जून घ्यायला हवे .अश्या आमच्या सर्व महिला कार्यकर्त्या शूर रणराघिणी यांची पण खूप साथ मिळाली .😊.घरी गणपती ची तयारी असतानाही त्यांनी सर्व मिळून साफ सपाई , रांगोळी केली त्याबद्दल मंडळ त्यांचे मनापासून आभार .. 🙏🏻 त्यांची परवानगी हुती म्हणूनच आमची पोर उशीर पर्यंत मंडळाचे काम करत हुती .. सर्व वहिनी ताई काकू यांचे आणि एकदा मनापासून आभार ... 🙏🏻
.....एक आठवलं काम करताना कंटाळा नको म्हणून ती तीन चार टाळकी पम्या , गण्या आणि आंबऱ्या बरेच विनोद करत हुती त्यांना कमी म्हणून आमचा सर्वांचा भाऊ उमेश ट्रीपने आधी मधी जोक्स करत हुता .. तर रवी आणि रन्ज्या यांनी आतले सजावट करण्यास स्वतःला पूर्ण झोकून दिले होते .. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व जण त्यांना मदत कर हुतोअ .... बाहेर उदय पम्या गणेश अमर आणि इंजिनेर वायरमन अमर यांनी लायतची जबाबदारी घेतली हुती ... छोटे कार्यकर्ते मनापासून त्यांना मदत करीत व्हती.. ..तारा लावण्यात आणि माळा बांधण्यात पोरांचा जीव पार टांगणीला लागला हुता ...गण्या आणि आंबऱ्या माकडासारकीं सरकन सीडीच्या टोकावर जात व्हती आणि माळा लावत व्हती पण शिडी धरून धरून रवी उदय आणि उमेश भाऊंचे हात कामातन गेले होते .. 😟...मग काय तेच बोलकं गण्या आणि पम्या यांनी काडली एक आयडिया .. टिर्याक्टर हुडावर बसून काम करायचं म्हणून .. पोरांनी घेतला टिर्याक्टर बोलावून . तो पण टिर्याक्टर वाला घाई घाईने आला हरकून .. बघतुय तर नानाची टांग .. त्या टिर्याक्टरला हुडाच नाय . ..😶.... डायवर म्हणतय काढून ठेवलाय क्षणभर सर्व जण आम्ही शांत आणि वाटलं त्या गण्या आणि पम्या ला बदडाव ....👊..पण जाऊंदे त्यांच्या विना काम नाय .. आणि पुन्हा पॉट धरून सर्व हसलो ....😂..आस करत करत रात्री ३ वाजलं .. अर्ध लायटिंग झालं .. पोर दमली .. दुसऱ्या दिवशी गणपती येणार हुता .. मग काम थांबवलं . 🤚
जस मी आधी बोललो या वर्षीचा आपला गणेश आगमन सोहळा लई गॉड़ होता आणि ..लई मानस आणि बायका पोर आणि पुरी पण आमच्या बाप्पांकडे पाहत होते यामुळं एरवी डाल्बी च्या ठोक्या वर हलणारे आमच्या भावांचे हात पाय आपोआपच हलगीच्या तालावर डुलायला लागले हुते .. कुणाची नागीण 🐍झालती तर कुणाचा मोर 🐔..तर कुनाचा हत्ती 🐘..आणि कुणाचं काय झालात समजलं नाही 👺..नाचायला पोर तयार झालती तवर मंडळ पण जवळ आलात .. आणि त्यात उशीर पण लय झालता ..तसेच त्यो हलगीवाला पण लै उशीर म्हणून झाला म्हणून बोंब मारत होता .. जागो जागी हलगी गरम करून करून तोच आता गरम झाला होता ...🎃 ... त्याला थंड..🧊... करण्यात ते आमचं बोलकं पम्या पुढं हुत हलगीवाल पैस वाढवून मागत हुत पण पम्या काय ऐकत न्हवत .. खूपच उशिर झालेला म्हणून मग डान्स थांबला .. मंडळ आलं तस बाप्पाना मंडळात घेऊन पुजारी बुरांडे काका कडून पुढील सर्व विधी पार पडले श्री वसंत केकरे आणि श्री अमर लोखंडे यांच्या हस्ते आरती झाली ... मंडळातले सर्व जेष्ठ कार्यकर्ते एकत्रित बसून गप्पा मारत प्रसाद घेतला .यामध्ये श्री विठ्ठल लोखंडे श्री शामराव विभुते श्री वसंत केंकरे श्री शिवाजी लोखंडे श्री चंद्रकांत झुरे श्री नामदेव पाटील श्री पांडुरंग लोंढे श्री मधुकर लोखंडे श्री जांबू माने श्री शशिकांत पाटील श्री शामराव केंकरे श्री भीमराव केंकरे श्री जयवंत केंकरे श्री सुधाकर भोसले श्री पंडित किबिले यांची ती पंगत आणि चालू असलेल्या गप्पा खरंच पाहण्यासारख्या हुत्या .. बघून भारी वाटलं भावांनो ..🥳 काही तर निमित्ताने सर्व जण ते एकाच व्यासपीठावर आले होते .. त्यांचा पण त्यो उत्साह त्यांच्या डोळ्यात दिसत होता .. सर्व जण जेवन कराय आपलं आपल्या घरी गेली ... कमी तिथं आम्ही श्री अतुल लोखंडे याचे जेवण आगमनाला हि असते तर असे क्षणभर मला वाटून गेले ...🤩
जे आराध लायटिंग राहील हुत ते आम्ही आज रविवारी पूर्ण केल बर का पहाटे २ वाजले ..यामध्ये वायरमन अमर , अमेय , अमर , उदय , रवी , रंजीत , उमेश भाऊ , शामराव दादा , प्रमोद , प्रथमेश , रोहन, समाधान , प्रतीक , एमके भाऊ , वरद , सक्षम आदेश आंतर्व , गणेश आणि आण्णा यांची साथ मिळाली .. गणेश च्या टिरॅक्टर ने काम सोपे केलं.... 😍
आतमध्ये पोरांनी मंडळात सजीव झाडे ठेवून त्याच्या सौदर्यात आणखी भर टाकली .. एमके भाऊंनी पण गणपतीची आतमध्ये छान सजावट केली आहे .. 👌🏻
सदर आगमन सोहळा निट पार होता .. प्रत्येक जण एकमेकांचे आभार मानत होते .. अश्याच चर्च नंतर पोरांनी एक मनाशी निश्यय केला कि .. " काय नाय बऱ्याच वर्षी रखडलेला विषय म्हणजे .. २१ फुटी महा गणपती पुढील वर्षी आणायचाच .. " कार्यकर्त्यांनी निश्यय केलेला .. आम्हाला पण समजलं निश्चय झाला म्हणजे आता ठरलं .. २१ फुटी महागणपती आता सण २०२५ रोजी येणार म्हणजे येणारच ...
एकंदरीत जय शिवराय च्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाची चीज होत आहे ..लय भारी वाटलं ....🙂
तसेच ...
एवढ्या दिवसात मंडळाचे छोटे कार्यकर्ते ज्यांनी उत्साहाने आम्हाला साथ दिली सांगेल ती सर्व कामे नीट पार पडली त्या सर्व जसे कि वरद सक्षम आदेश आयुष्य स्वरूप रुद्र रोहन आंतर्व प्रतीक राज तुषार संग्राम स्वराज सत्यजित विश्वजीत रंजीत अभय आणा शिवा विघ्नेश सिद्धी आराध्य प्रणाली रेहा शताक्षी आंबोली आर्या या सर्वांचे मंडळ मनापासून आभार ... 🙏🏻
एक वेगळी थीम ची आयडिया दिल्या बद्दल गणेश विभुते , आणि रवी भोसले यांचे आभार 🙏🏻
गाडा बनवण्यात विशेष लक्ष दिल्या बद्दल अमर लोखंडे, रंजीत मोहिते गणेश विभुते यांचे आभार 🙏🏻
सर्व इंजिनेर काम संभाळल्याबद्दल अमर माने यांचे आभार 🙏🏻
सर्वाना मार्दर्शन केल्याबद्दल उदय भाऊ , महेश भाऊ , उमेश भाऊ अतुल भाऊं प्रवीण भाऊचे आभार 🙏🏻
कमी तीत आम्ही म्हणून अतुल भाऊंनी आम्हा सर्वांचा जोश वाढवला .. त्या बद्दल त्यांचे आभार . 🙏🏻
प्रत्येक ठिकाणी सुरक्षा कशी घेता येईल याची काळजी घेणारे अमेय पाटील यांचे आभार ...🙏🏻
जीत जीत आम्हाला आडचान येईल तेथे आयडिया वापरून स्वतः पुढाकार घेऊन काम करणारे संतोष माने भाऊंचे आभार...🙏🏻
राहिलेले सर्व लहान मोठे मंडळाला साथ देत आहेत त्या बद्दल त्यांचे पण आभार ... 🙏🏻
बाप्पा , आमचा हा उत्साह असाच पुढे राहुंदे ..😊