khidkitlya bhootya in Marathi Horror Stories by लेखक सुमित हजारे books and stories PDF | खिडकीतल्या भुत्या

Featured Books
Categories
Share

खिडकीतल्या भुत्या

काही दिवसांअगोदर संजय बंद असलेल्या बंगल्यात राहिला येतो तो बंगल्यात राहिल्या आल्या पासून त्याच्याबाबतीत काहींना काही विपरीत घडतच असते.तो त्या बंगल्यात भितीच्या वातावरणात राहत असतो.एक तर बंगला बदलायचं म्हंटले तर ते शक्य नव्हतं संजय बिचारा आपला कसंबसं भिती मध्ये जगत होता.असे नेमकं संजय बरोबर झालं तरी काय की संजय  नेहमी घाबरलेला अवस्थेत असायचा एक तर गाव तस म्हंटल तर संजय साठी नवीनच होत.काही दिवसांपूर्वीच संजयचे या गावात एका नामांकित कंपनी तर्फे गावातील नावाजलेले उद्योगपती भाऊसाहेब पाटील यांची जागा बघण्यासाठी येतो.कारण भाऊसाहेबांना त्यांची ती जागा विकायची असते.आणि कंपनीला या गावात कारखाना चालू करायचा असतो.कारण या गावात जर कारखाना चालू केला तर त्यानां त्यातून अमाप पैसा मिळणार होता.त्यासाठीच कंपनी या गावात जागा मिळवण्यासाठी धडपड करत असतात त्यांची ही धडपड मागील एक महिन्यांपासून चालू असते पण हवे तस त्यानां यश मिळत नाही जागा मिळवताना कंपनीला काहींना काही अडचण येत असते म्हणून प्रयत्न करून करून थकल्यानंतर शेवटी कंपनी खूप विचार करून आणि सावधगिरीने पाऊल उचलत संजयला काही न कळता तातडीने त्या गावात पाठवायचा निर्णय घेतात आणि तशी त्याला पाठवण्याची तयारी पण करतात.इकडे संजय विचारात पडतो की मला साहेब वीरपूर गावात का पाठवत असतील तो ऑफिस मध्येच बसलेला असतो तासनतास विचार करत असतो अचानकच त्याला ऑफीस मधला शिपाई आवाज देतो पण संजय इतका विचारात मग्न असतो की त्याला आजूबाजूला काय चाललंय त्याच भान सुध्दा नसत शिपाई बघतो बघतो आणि संजयच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यांवर हात ठेवून संजयला आवाज देतो.संजय साहेब ओ संजय साहेब ऐकलं का जसा शिपाई संजयला आवाज देतो तस संजय भानावर येतो आणि भानावर आल्यावर घाबरलेल्या अवस्थेत शिपाईला विचारतो काय रे नागेश काय झालं रे ओरडायला काही नाही झालं साहेब ते जाऊ द्या मी काय म्हणतो आधी ऐका संजय साहेब! तुम्हाला विचारे साहेब शोधतायत तुम्ही ऑफिस मध्ये दिसला नाहीत म्हणुन मला तुम्हाला बोलवायला पाठवलं पण मी तुम्हाला बोलवायला आलो तर तुमच काही लक्ष नव्हतं तुम्ही कसल्या तरी विचारात होते वाटत! आणि हा मी तुमच्या जवळ येऊन आवाज दिला तरी लक्ष नव्हतं तुमच आणि जेव्हां तुमच माझ्याकडे लक्ष गेल आणि तुम्ही जेव्हा मला विचारलात काय रे नागेश काय झालं तेव्हा तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत होता नेमकं काय झालं तुम्ही असे घाबरलेले का होता?आणि इतका कसला विचार करत होतात?नागेशच्या प्रश्नावर संजय उत्तर देत म्हणतो तुला काय करायचं नागेश तू जा बरं इकडून आणि नागेश बरं साहेब म्हणत तिकडून निघून जातो आणि संजय आपला खुर्ची वरून उठून विचारे साहेबांच्या केबीन जवळ जातो केबीनचा दरवाजा नॉक करतो आणि साहेबांच्या केबीन मध्ये जातो आत गेल्यावर साहेब संजयला ओरडतात आणि संजयला विचारतात इतका वेळ कुठे होतास संजय? मी कधीपासून तुझी वाट बघतोय पण तुझा काय ठाव ठिकाणा नाही आहे.सांग बरं कुठे होतास तू?संजय मान खाली घालून साहेबांच्या प्रश्नावर उत्तर देतो अहो साहेब मी ऑफीस मध्येच होतो.खोटं बोलू नकोस संजय साहेब संजयवर रागावून बोलतात.मी ज्या वेळी आलो होतो त्या वेळी तू तुझ्या जागेवर नव्हता मग तू ऑफिस सोडून कुठे गेला होतास? विचारे साहेब मी!...तितक्यात विचारे साहेब संजयच बोलणं अर्ध्यावरच कापतात आणि संजयला बोलतात तू आता काही बोलू नकोस आधीच बराच वेळ तू खाल्यास माझा! आता मी काय सांगतो आहे ते तू लक्षपूर्वक ऐक तुला तर माहीत आहेच ना की मी तुला कशाला बोलावलय संजय! हो साहेब!..म्हणत शांतच उभा राहतो.आणि विचारे साहेब त्याला