Sardar Vallabhbhai Patel in Marathi Human Science by Ankush Shingade books and stories PDF | सरदार वल्लभभाई पटेल

Featured Books
  • એકાંત - 56

    કુલદીપ અને ગીતા એમનાં ઘરેથી ભાગી ગયાં હતાં. ગીતાનાં પપ્પાએ એ...

  • MH 370- 23

    23. દરિયાઈ વંટોળમાંફરીથી કોઈ સીટી વાગી અને હવે તો કેટલાંયે સ...

  • સ્વપ્નની સાંકળ - 1

    અધ્યાય ૧: સ્વપ્નની સાંકળ​રતનગઢ.​સામાન્ય રીતે શાંત ગણાતા આ શહ...

  • ચાની રામાયણ

    ચાની રામાયણ •••••________જીવનમાં અમુક ક્ષણો એવી આવે કે જેને...

  • ઘર નુ ભોજન

    ઘરનું ભોજન એક ભારતીય સંસ્કૃતિ, સંબંધો નો સેતુ અને આધુનિક સમય...

Categories
Share

सरदार वल्लभभाई पटेल

सरदार वल्लभभाई पटेल ; खरंच लोहपुरुष? 

           सरदार वल्लभ भाई पटेल. यांना आज लोहपुरुष म्हणतात. तसं पाहिल्यास त्यांना मरणोपरांत भारतरत्न मिळाला. तो पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावच्या कार्यकाळात म्हणजे १९९१ ला मिळाला.
          सरदार वल्लभभाई झावरभाई पटेल. एक गुजराती व्यक्तीमत्व. ते भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान व तत्कालीन गृहमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ होता, सन १९४७ ते १९५०. या काळात त्यांनी अतिशय अक्कलहुशारी वापरुन स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिररस्त्यावर आणलं. एवढंच नाही तर. स्वतंत्र भारतात निर्माण झालेला संस्थानिकांचा वाद मिटवला. मग हैदराबादचा वाद असो वा जुनागढ संस्थानाचा वाद असो, काश्मिरचा वाद असो वा भारतातील इतर ठिकाणाचा वाद असो. त्यांनी जी भुमिका घेतली. त्याच भुमिकेमुळे त्यांना लोहपुरुष मानलं जातं.
           सरदार पटेलचा जन्म नाडियाड शहरात झाला. अलिकडील काळात त्याला खेडा जिल्हा म्हटलं जातं. ते पेशाने वकील होते. ते पुर्वीपासूनच कॉंग्रेस पक्षाचे असून त्यांच्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव होता. त्यांनी महात्मा गांधींसोबतच खेडा, बारडोलीचा सत्याग्रह केला होता. ज्यात त्यांनी बारडोलीच्या शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व उठलं व ते प्रसिद्ध झाले. त्यातच ते गुजरातमधील खास व्यक्तिमत्त्व ठरले. 
         ते राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे एकोणपन्नासवे अध्यक्ष होते. ज्यात त्यांनी कॉंग्रेसी संघटन अधिक मजबूत केलं होतं. ज्यात त्यांनी १९३६ च्या निवडणुकीत बऱ्याच मतांनी आपले उमेदवार निवडून आणले. एवढंच नाही तर १९४२ च्या संविनय कायदेभंग या चळवळीसाठी जे खरमरीत भाषण केलं होतं, तेही प्रभावशाली होतं.
          सरदार पटेलांनी केलेलं अनमोल कार्य विचारात घेवून जेव्हा भारत स्वतंत्र झाला. तेव्हा महात्मा गांधींनी भारतीय राजकारणात त्यांची शिफारस केली. एवढंच नाही तर त्यांना लोहपुरुष अशीही पदवी दिली. ज्यातून त्यांनी भारतात शांती प्रस्थापित करण्यासाठी बराच प्रयत्न केला. त्यांनी त्यावेळेस अंदाजे पाचशे पंचेचाळीस विखरलेल्या लहान मोठ्या राज्यांचा प्रश्न सोडवला व त्यांनी त्या लहानमोठ्या राजकीय वसाहतींना भारतीय संघराज्यात जोडलं. 
           वल्लभभाई पटेल हे झावेरभाई व लाडबाच्या सहा मुलांपैकी एक. त्यांच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे नाडियाड, पेटलाड व बोरसद इथं झालं. त्यानंतर ते बॅरिस्टर बनले. त्यांनी लवकरच आपला विवाह साजरा केला. ज्यात त्यांनी १९०३ ला मणिबेन व १९०५ ला दह्याभाई नावाच्या मुलांना जन्मास घातलं.
            एक भारत श्रेष्ठ भारत आणि कर मत दो हे नारे लावणारे सरदार वल्लभभाई पटेल. खरं तर त्यांनी असहकार आंदोलन व संविनय कायदेभंग आंदोलनातही भाग घेतला होता. मात्र असं करत असतांना त्यांना प्रसंगी तुरुंगवासही सोसावा लागला. 
         सरदार वल्लभभाई पटेलांच्याबाबत सांगायचं झाल्यास त्यांनी जे कार्य केले, ते वाखाणण्याजोगं आहे. कदाचीत ते जर नसते तर स्वतंत्र भारतात निर्माण झालेला संस्थानिकांचाही प्रश्न सोडवता आला नसता. 
          सरदार वल्लभभाई पटेलांच्या मृत्यूबाबत सांगायचं झाल्यास त्यांचा मृत्यू हा ह्रृदयविकारानं झाला आणि प्रत्यक्ष विधात्य्नं त्यांना भारत स्वतंत्र झाल्यावर जास्त दिवस जगू दिलं नाही. जर कदाचीत ते जास्त दिवस जगले असते तर त्यांनी आतापर्यंत चिघळत असलेला काश्मीर वाद तेव्हाच मिटवून टाकला असता. त्यातच असा विकास केला असता की आज जो भारत देशात पहिल्या क्रमांकावर नाही, त्याचा जागतिक स्तरावर पहिला क्रमांक राहिला असता.अर्थातच आजच भारत जागतिक स्तरावर महाशक्तीच असता. या भारताला २०४७ पर्यंत जागतिक महासत्ता बनण्याची वाट पाहण्यासाठी झुंजत राहावं लागलं नसतं.
          सरदार वल्लभभाई पटेलात ती ताकद होती. म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना सन्मानानं लोहपुरुष ही पदवी दिली. तसंच देशानंही त्यांच्या अलौकिक कार्याची जाण ठेवून त्यांना मरणोपरांत का असेना, भारतरत्न पदवी बहाल केली की जी देशातील सन्मानाची पहिली पदवी होय. 
          विशेष सांगायचं झाल्यास आपला भारत देश महान आहे की या देशानं सरदार वल्लभभाई पटेलांसारखे व्यक्तिमत्त्व जन्मास घातले. ज्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे भारत स्वतंत्र तर झालाच. परंतु भारतात अंतर्गत बाबीत निर्माण झालेले संस्थानिकांचे वाद चुटकीसरशी मिटवता आले. कदाचीत पंडीत नेहरुंच्या उपस्थितीमुळं ते पंतप्रधान होवू शकले नाहीत. कदाचीत काही काळ का असेना, ते जर पंतप्रधान बनले असते तर काहीसे स्वतंत्र भारताचे चित्र वेगळे असते. ज्यांनी चुटकीत संस्थानिकांच्या वादाचा प्रश्न सोडवला. त्याच लोहपुरुषानं पाकिस्तानवर नव्हे तर चीनवरही दबदबा निर्माण करुन दिला असता. ज्यानं आज जो सीमारेषेवर पाकिस्तान फडफडतो ना. तो फडफडू शकला नसता.

             अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०