Julun yetil Reshimgathi - 10 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | जुळून येतील रेशीमगाठी - 10

Featured Books
  • Cristal Miraaj - 1

     क्रिस्टल मिराज — अध्याय एक: एरीना की दुनियासूरज की पहली हल्...

  • क्या हे प्यार

    हाय गाईस आज मी कुछ बताणे नाही आता हू बल्की आज कुछ समजणे और स...

  • तोते की गवाही

    ---शीर्षक: “तोते की गवाही”️ लेखक – विजय शर्मा एरी---भाग 1 –...

  • Intaqam-e-Aalam

    रुहानी ने आवेश में कहा, “तुम कहाँ जा रही हो? ऐसे कदम मत उठाओ...

  • बारिश वाली ब्रेकअप स्टोरी

    बारिश हमेशा रोमांटिक नहीं होती।कभी-कभी, वो सिर्फ़ याद दिलाती...

Categories
Share

जुळून येतील रेशीमगाठी - 10

भाग - १०


(बँकेतील प्रसंग - सगळे काम करत बसले होते,)

.

.

.

शिवम-  काय ग सावी आज अर्जुन सर आले नाहीत? 



सावी - माहिती नाही मला सुद्धा,



शिवम - तुला माहिती नाही म्हणजे आश्चर्य आहे.. 😂



सावी- म्हणजे? काय म्हणायचंय तुला शिवम 🤨

(तिरप्या नजरेने पाहताना..)



शिवम - अग सगळ्या ऑफिस ला माहिती आहे, म्हणजे असं म्हणतात हो बाकीचे लोक कि तुझं आणि अर्जुन सरांचं....... (बोलताना मधेच थांबला)




अंजली - ओय काय बोलतोयस शिवम? कान फोडेन तुझा आता....सगळा ऑफिस काहीही बोलूदे आपल्याला सावी वर विश्वास आहेच ना... 😡

(त्याच्यावर आवाज चढवताना म्हणाली..)




सावी -  अंजली ताई, शांत हो...शिवम लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐक..डोळ्यांनी पाहिलंस का तू? 




अंजली -  नाहीतर काय मूर्खपणा करतोय...चल निघ इकडून.... 😡



शिवम -  स्स्स सॉरी सावी मला तस नव्हतं म्हणायचं..अग पण लोकांचं तोंड आपण बंद करू शकतो का...



अंजली - ए निघ आता 😡कि मार खाऊन जाशील 



सावी - काय ताई 😂घाबरला असेल तो..



अंजली - अग मग काहीही म्हणायचं उगाच...अफ़वा पसरवण लोकांना फार आवडत..




सावी - पसरवू दे आपण कसे आहोत आपल्याला माहिती आहे ना मग लोकांना दरवेळेला का स्पष्टीकरण द्यायचं..




अंजली - खरं आहे!  



(तोपर्यंत सावीचा फोन वाजला..फोन साचीचा होता....📲)




सावी - हॅलो, 📲




साची - ताई, आज तू हाल्फ डे घेऊन येऊ शकतेस का?📲




सावी - का ग काय झालं पिंकी...काही झालंय का? तब्बेत ठीक आहे ना? 📲




साची - हो ताई झालंय काय तरी पण तू ये ना मग सांगते....प्लिज ताई लवकर ये.. तुला पत्ता मेसेज करते📲

(कॉल कट करतांना म्हणाली...)




सावी - हिला काय झालं अचानक?🤨

.

.

.

.

अर्जुन - हॅलो..बोल अप्पू.. पटपट बोल मी झोपलोय...📲



अपूर्व - दादा कुठे आहेस? 📲



अर्जुन - घरी आहे आज, बँकेत नाही गेलो...तब्बेतच खराब झाले माझी...नुसता ताप सर्दी...का रे? 📲




अपूर्व - दादा मला तुझ्याशी. काय तरी बोलायचं आहे, मी पत्ता पाठवतो ये ना तिकडे लवकर..लवकर ओके....📲

(कॉल कट करत म्हणाला...)




अर्जुन - अरे पण झालं काय? हॅलो हॅलो..... 📲

याला काय झालं? मला जायला हवं...

.

.

.

.

सावी आणि अर्जुन दिलेल्या पत्त्यावर पोहोचतात...अपूर्व आणि साचीला एकत्र बघून त्या दोघांना काहीच कळेनासे होते...



अर्जुन - सावी तुम्ही इकडे? हे काय चाललं आहे




सावी - हो ना.. आणि तुम्ही तर ट्रीपला गेलेलात ना?




अपूर्व - नाही.. तुम्हाला काहीतरी सत्य सांगायचंय...




साची - मोठी गोष्ट आहे ताई 😔




अर्जुन - काय झालं आहे?




अपूर्व - दादा साची प्रेग्नेंट आहे...म म माझ्यामुळे....




अर्जुन - अरे एवढंच ना ☺️😂

(नीट न ऐकता...)



सावी - हं?



अर्जुन / सावी - काय???? 😨😨😨

(दोघेही एकत्र म्हणतात..)




साची आणि अपूर्व त्यांना सर्वकाही सत्य सांगतात......हे ऐकून सावी अर्जुनला धक्का बसतो.....दोघेही काहीकाळ शांत बसतात...



अर्जुन - अरेssss मूर्ख मला काका व्हायचं होत पण हे असं नाही....काय मूर्खपणा केलात तुम्ही कळतंय का?

(शांतता भंग करत म्हणाला...)



सावी - काय केलंस तू हे साची अग असं करण्याआधी आमची का नाही आठवण आली 🥺

(रडताना म्हणाली...)



साची - ताई मी मुद्दाम नाही केले ग, 🥺 चुकून झालं..



अपूर्व - दादा ताई मी तुम्हाला वचन देतो मी सगळं करेन...लास्ट इयर आता पूर्ण झालं कि जॉब करेन चांगला....नक्कीच मी आमच्या बाळाचा चांगला वडील होईन.... आम्हाला ह्या बाळाला जन्म द्यायचं आहे...



साची - प्लिज आमची मदत करा 🥺😭



अर्जुन - रडू नका दोघेही, आहोत आम्ही सोबत...सावी तुम्ही सुद्धा रडू नका.




सावी - मी साथ नाही देऊ शकत.. बाबांना कळलं आता तर खूप त्रास होईल त्यांना.....पिंकी विश्वास तोडलास ग आमचा.. 🥺 तुला मी आई बनून वाढवलं......बाबा आपले मित्र झाले आई झाले.....तू हे फळ दिलस आम्हाला? हे कधीच नाही विसरणार मी..

(तिकडून निघून जाताना...)




साची - ताई🥺 थांब ना...अग ऐक माझं..

(तिच्या मागे पळताना म्हणाली...)




सावी - काय ऐकू? आणि का? अग असं वाईट काम करताना कशी लाज नाही वाटली....यासाठी तुला कॉलेजला पाठवलं....मोठं केल... आणि तुझ्यावर बंधन नाही लाधली आम्ही.. 😭🥺




साची - ताई अग जी चूक झाली आता ती मी कस सावरू....झाली आहे आता फक्त तुमच्या साथीची गरज आहे... 🥺प्लिज ताई...ताईsssss 😭

(सावीच्या मागे पळताना...)




अपूर्व- साची अग पळू नकोस....




अर्जुन - शुई तू शांत हो साची..पळू नकोस..मी समजवतो...

अअअअ सावी.....सावी थांबा..थांबा ना...माझं तरी ऐका?

(तिच्या मागे पळत जाताना...)




सावी - काय आहे आता? 🥺 माझ्या मनाची अवस्था तुम्हाला नाही कळणार....




अर्जुन -  हो खरं आहे...कारण तुम्ही साचीच्या आई झालात ना....आणि मी अप्पूचा वडील....असं म्हणतात वडिलांपेक्षा आईसोबत मुलांचा जास्त लळा असतो....जास्त घट्ट नातं असत....जास्त प्रेम असत....आणि आई जे काही त्याग करते त्यापुढे वडिलांनाचा काही मोठा वाटा नसेलच.... पण आम्हा वडिलांना ही मन असत...

सावी तुम्ही एकदा साचीच्या बाजूने विचार करा......मान्य आहे चुकलेत पोरं आपली...पण आपण त्यांना मदत नाही करणार तर कोण करणार? आजवर त्यांनी आपण बोलो तेच केल..आज पहिल्यांदा त्यांच्या मर्जीने त्यांनी काहीतरी केल आणि चूक झाली त्यांच्याकडून......मग आपण असं वाऱ्यावर सोडायचं? आज त्यांना आपली खरी गरज आहे आपण साथ देण्याऐवजी साथ सोडतोय. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचल मग.....दिला जीव मग त्यांच्या जाण्यावर रडत बसायचं का? जर आता आपण साथ दिली तर तुम्ही सुखाचा संसार बघू शकाल साचीचा...



सावी -  नाही नाही..... पण मग सर काय करायच आपण? घरी सांगणार तरी कस...🥺पण या दोघांनी असं पाऊल उचलावंच का? अक्कल नाही का साधी? 




अर्जुन - बरोबर आहे तुमचं, पण का झालं.. का केल.. कस केले.... हे शोधण्यापेक्षा आपण सावरण्यासाठी मार्ग शोधूयात का ? 




सावी - खरच तुम्हाला असं वाटतं....




अर्जुन - हो वाटतं मला... असा हट्टीपणा आपण सोडून थोडं पोरांचा विचार करायला हवा...




सावी - पण घरचे? आणि पोरं कस निभावतील कॉलेज, परीक्षा मग नोकरीं..? 




अर्जुन - सावी होईल ओ...मी कशासाठी आहे इकडे...अपूर्वच्या नोकरीची जबाबदारी माझी आहे.... आणि माझा अप्पू एक उत्तम नवरा बनवून दाखवेल आणि बाप सुद्धा....नका काळजी करू... आपण दोघे एकत्र समजावू घरच्यांना...




सावी - ठीके सर...मला ही पटतंय तुमचं...कारण आता जी चूक झाले त्यावर मार्ग काढायला हवाच...




अर्जुन - हं नका टेन्शन घेऊ...हसा बघू? 🥰अअअअअ अअअअअ 😂🤣




सावी - ह्म्म्म ☺️



**************************



दुसऱ्या दिवशी दोन्ही घरातील मंडळींना समोरासमोर बसवून सावी अर्जुन हे सगळ सत्य सांगतात.....सगळे हे ऐकून शांत बसतात.....कुणाला कळत नाही काय म्हणावं?


सावीचे बाबा फक्त रडत असतात.....अपूर्वची आई सुद्धा अश्रू गाळत होती......शांतता भंग करत अर्जुन बोलायला लागला....



अर्जुन -  मी काय म्हणतोय ऐका ना सगळे आई, काका रडणं बंद करा आधी तर.....मला मान्य आहे ही घटना तुमच्यासाठी धक्कादायक आहे, पण यावर आता मार्ग काढायला हवा ना हा आज्जी, आजोबा आई काका बोला ना काहीतरी...



भाऊसाहेब-  अर्जुन बोलतोय ते खरं बोलतोय...संगीता अश्रू गाळत नको बसू आता...हिंम्मत घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे अग...आणि सतीश अरे आता मुलांकडून चूक झाली आहे तर त्यांना आपण जीवाणीशी मारायचं का..




भागीरथी- नाही अहो काय बोलताय हे...सतीश बेटा तुला एक बोलू का यावर आता मार्ग काढावंच लागेल...चूक कशी झाली हे बोलण्यात अर्थ नाही...




सतीश -  पण आज्जी यावर काय? 




अर्जुन - लग्न....अपूर्व आणि साचीच...




भाऊसाहेब-   हा...करून टाकूया लग्न जवळचा मुहूर्त पाहून...काय ग संगीता, भागीरथी चालेल ना साची सून म्हणून...




संगीता - हो बाबा आता आपण सगळं विसरून नवीन आयुष्य चालू करायच ठरवल आहे तर लग्न हाच पर्याय आहे...... आणि मला तर साची चालेल सून म्हणूंन ☺️




भागीरथी - हो मलाही साची नाटसून म्हणून आवडले...तस ही वाईट काय आहे हिच्यात...गोड आहे मुलगी... जवळचा मुहूर्त पाहून लवकर लग्न लावुयात...




सतीश - ठीके....माझी देखील हरकत नाही....पण लोकांचं काय? आणि अर्जुन - सावी हे घरातील मोठी मुलं आहेत यांचं ण करता लहान भावांडणाचं लग्न कस??




अर्जुन - सतीश काका लोकांचा विचार नका करू...ते आपल्या मुलांना सावरायला नाही येणार....लोकांचा विचार करून असं किती काळ आपण गप्प बसणार...अहो आपल्या मुलांनी काही बर वाईट केल तर ते येऊन फक्त एक दिवसापूरता आपले अश्रू पुसणार नंतर काय आपणच एकटे राहणार....कुणीही नाही येत....म्हणून त्यांचं सोडून द्या...




सावी - राहील आमचं... तर बाबा आम्ही करू कि नंतर लग्न...आमची कशाला घाई...अपूर्व आणि साची च करूया....




भागीरथी - कशाला...तुम्हाला ही आपण स्थळ बघायला चालू करूया....दोन्ही लग्न एकाच सोबत होतील...




भाऊसाहेब- उत्तम पर्याय...बग आता कामाला लागा सगळ्यांनी...एका महिन्यात स्थळ बघून आपण लग्नाची तयारी करायची आहे....जास्त वेळ वाया नको घालवायला....




संगीता - हो कारण आधीच एका महिन्यानंतर ही गोष्ट समजली आहे..आता अजून फार वेळ घालवला तर नंतर पोट ही दिसायला लागेल आणि सचीला सुद्धा त्रास होईल..




सतीश - हो उद्या पासून कामाला लागूया....




भाऊसाहेब- चला आता सगळं घडलेलं विसरून जा...आणि आनंदी व्हा...




साची - थँक्यू सर्वांना..आम्हाला समजून घेतलं म्हणून..आम्हाला नव्हतं वाटलं कि. इतक्या सहजरीत्या तुम्ही तयार व्हाल....🥺




सतीश - अग बाळा तुम्ही चूक केले मान्य आहे, पण याचा कांगावा करण्यापेक्षा शांतपणे उपाय काढणं आम्हाला योग्य वाटतं...




भागीरथी-  हो मग काय...आपण समजूतदार आहोत आपल्याला कळायला हवं....छोटे चुकले तर त्यांना पदरा आड घेणं आई वडिलांचा काम आहे....जर तुम्ही निवड करायला चुकला असतात तर नक्कीच आम्ही नकार दिला असता पण साची सारखी मुलगी आणि उत्तम घरदार असताना आम्ही का खोडा घालू...




अपूर्व -  मी सर्वांना वचन देतो मी साची आणि बाळ दोघांची काळजी घेईन आणि जबाबदारी ने काम करेन...साचीला काही कमी पडणार नाही 🥺




भाऊसाहेब- अरे वाह वाह! 

(टाळ्या वाजवताना...)




सगळे आनंदाने टाळ्या वाजवतात.....आणि साची अपूर्वला पेढा भरवतात...पण एका बाजूला सावी आणि अर्जुन लग्नाचं ऐकून विचारात पडले होते...

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

(काही दिवसानंतर..)




सावी -  आत येऊ का??

दार नॉक करताना म्हणाली...




संगीता - अग ये ये सावी...बस पाणी घेऊन आले तुझ्यासाठी....




भागीरथी- आज इकडे कशी बाळा..?




सावी - संगीता काकूंनी बोलावलं होत...




भाऊसाहेब- घरी सगळं बर चाललं आहे ना...सतीश कसा आहे...आणि साची...




सावी - मस्त...आता तयारी करायला लागलेत ते बीजी असतात आता ☺️ आणि पिंकी पण बरी आहे...खाऊन पिऊन मजेत 😂




संगीता - घे बाळा पाणी...




सावी - थँक्यू...अअअअ काय झालं काकू आज बोलावलं मला...




संगीता - हो..अग ही साडी द्यायची होती साची साठी घेतलेली आणी ही तुझ्यासाठी...




सावी -  कशाला काकू?




संगीता - अग असुदे...आणि हो सांगायचं होत कि उद्या घरी या....अनिता ताई येणार आहेत...अर्जुन अप्पू ची आत्या...




सावी - अच्छा ओके पण यांच्या बद्दल कधी ऐकलं नाही...




भागीरथी- अग माझी मोठी मुलगी...गावी असते ती....तिला ज्योती भविष्यातला बरच कळत...गावी खूप मान आहे तिला.....आम्ही खूप आधीपासूनच मुहूर्त, पूजा, सगळं असतील आम्ही तिलाच विचारत आलोय....आता लग्न आणि हे सर्व यासाठी ती इकडे येणार आहे....




संगीता - म्हणून म्हंटल या उद्या...




सावी - चालेल काकू येऊ आम्ही... निघू आता? 




संगीता - हो बाळा...थांब अर्जुन घरी आहे तुला सोडून येईल समंध्याकाळची का एकटी जातेस....




सावी - काकू असुदे...मी जाईन...




संगीता - अग असुदे सुट्टी आहे आज...झोपून राहील दिवसभर.... त्यापेक्षा तुला सोडून येईल 😂




सावी - ठीके..




संगीता - अर्जुन.....ए अर्जुनsss खाली ये... सावी आले...




अर्जुन - हं...अरे सावी इकडे कशा?

पायरी वरून खाली येताना म्हणाला...




संगीता - अरे मीच बोलवलं होत काम होत... आता झालं आहे काम...जरा हिला सोडून ये घरी... जा...




अर्जुन -  आ ठीके... आलोच किल्ली घेऊन...



अर्जुन खोलीत जातो....स्वतः ला आरशात पाहतो....जराशी केस नीट सावरतो.....पर्फ्यूम मारतो आणि आनंदातच खाली जातो....सावी सगळ्यांचा निरोप घेते, आणि निघते..



मंद अशी हवा चालू होती....सावी कार च्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहत होती.....तिचे लांब सडक केसं हळुवार तिच्या चेहऱ्यावर येत होते...

सावी आनंदी होती म्हणून तिचा चेहरा अजून तेजस्वी दिसत होता....अर्जुनची नजर तिच्यावरून हटतच नव्हती... रेडिओ वर गाणी चालू होते....आणि अर्जुन मात्र तिच्यात हरवून बसला होता...



💕 💕 💕 💕 💕 

अरे तू क्या जाने तेरी ख़ातिर,

कितना है बेताब यह दिल...

तू क्या जाने देख रहा है,

कैसे कैसे ख़्वाब यह दिल...💖


दिल कहता है तू है यहाँ तो,

जाता लम्हा थम जाए....

वक़्त का दरिया बहते बहते,

इस मंज़र में जम जाए..

तूने दीवाने दिल को बनाया,

इस दिल पर इलज़ाम है क्या...

💕 💕 💕 💕 💕 



अर्जुन हरवून जातो....अचानक कार बाजूला थांबवतो...सावी त्याच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहते... अर्जुन मात्र पूर्णपणे स्वतः वर ताबा हरवून बसला होता...


नकळतच तो सावीच्या जवळ आला....सावीच्या डोळ्यात बघतच ओठांजवळ आला......सावी काही क्षण घाबरली.....तिला कळलंच नाही कि काय घडतं आहे.....सावी आणि अर्जुन खूप जवळ होते.... 🫠


त्यांचे श्वास एकमेकांना ऐकू येत होते......सावीच्या ओठांची थरथर अर्जुनला कळत होती, अर्जुन हळूच तिच्या ओठांजवळ गेला.....सावीच्या ओठांवर त्याचे ओठ त्याने अलगद ठेवले....

सावी भानावर आली आणि तिने पटकन अर्जुनला दूर लोटले.... 🙌




सावी -  अर्जुन सरssss काय करताय हे?😦

ती रागात पण प्रश्नर्थी नजरेने म्हणाली...



अर्जुन - अअअअ सस सावी....ओह I am....I am... Really sorry सावी मी मी हे हे काय...?

अर्जुन भानावर येत, चाचरत म्हणाला...




सावी - काय?  नक्की काय म्हणायचंय तुम्हाला आता यावर? लाज नाही वाटतं तुम्हाला असं करताना....तुम्ही असं कस करू शकता.... 🥺😡

सावी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली....! 




अर्जुन ला तिचा रागावलेला चेहरा, डोळ्यातील भीती आणि अश्रू पाहून काळीज तुटल्या सारखं झालं....अर्जुनलाच कळतं नव्हतं काय म्हणावं? तो एकटक तिला पाहत होता.....ती मात्र रागात त्याला बोलत होती.....अर्जुन निशब्द होता....!!



सावी - मला कधीच नव्हतं वाटलं तुम्ही असं कराल शिईईई 🥺



अर्जुन - सावी.... ऐका ना...मला स्वतः ला नाही कळलं मी. हे कस...




सावी - गप्प बसा...हाच तुमचा खरा चेहरा आहे ना? आधी स्वतः किती चांगला आहे असा दाखवायचं आणि मग असं वागायचं.....मी काय तुम्हाला तुमची विकत घेतलेली प्रॉपर्टी वाटले का... 🥺 बस्स आता.... पुन्हा माझाशी बोलायला देखील येऊ नका....खूप झालं....




अर्जुन - सावी ऐका ना.. 🥺




सावी  -  गप्प बसा....अपूर्व आणि साचीच लग्न झालं ना एकदा कि मी नोकरीं सुद्धा सोडेन रिजाईन टाकेन....आता जास्त वेळ तुमच्यासोबत काम नाही करणार मी....मुलींची इज्जतच करता नाही येत तुम्हाला तर....चांगला समजतं होते तुम्हाला पण तसे नाहीच तुम्ही.....🥺😏




अर्जुन - सावी असं नका करू.... प्लिज ऐका.... मी. मुद्दाम नाही केले...माझी काय तरी बाजू आसू शकते ना....मी चूक केले मान्य आहे पण तरी ऐका ना एकदा..मला माफ करा प्लिज...सॉरी 🥺




सावी - मला घरी सोडा प्लिज.... 😭 नाही तर मला जाऊदे.....मला भीती वाटते तुमची...... 🥺

सावी जोरजोरात रडताना म्हणाली...




अर्जुन - ओके ओके.... शुईई शांत व्हा मी. मी सोडतो... लगेच.... घाबरू नका मी सोडतो....




अर्जुन लगेचच सविला घरी सोडतो, घर येताच सावी पटकन कार मधून उतरते आणि पळतच घरात जाते...हे पाहून अर्जुनला खूप वाईट वाटतं...

तिच्या मनातील अर्जुनची भीती त्याला टोचत होती...

सावी घरात जाताच अर्जुन तिकडून निघून जातो..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

(बँकेत🏦)


[ कॅन्टीन चा प्रसंग - ; सावी, अंजली कॉफ़ी पीत होत्या...] 




सावी - अंजली ताई, एक विचारू का तुला?




अंजली - हो बोल ना सावी..




सावी - समज हा, रात्रीचा प्रसंग आहे तू आणि तुझा रँडम एखादा मित्र कार मधून चालला आहात, अचानक त्याने कार थांबवली आणि तुला किस करायला आला जवळ तर तू काय समाजशील? म्हणजे कस वाटेल तुला काय करशील तू?




अंजली -  आआ माझं जर लग्न नसेल झालं तर मी आधी त्याच्यावर चिडेन रागवेन, त्याला विचारेन असं का केल? कारण जर Genuine असेल तर मी त्याला माफ करायचा विचार करेन...




सावी - माफ करशील? का असा? 




अंजली - कारण प्रत्येकाची बाजू आहे ना काहीतरी....बग चूक प्रत्येकाकडून होते.....आणि ही खूप मोठी चूक आहे.... पण त्याला आधी मी. कारण विचारेन ना.... जर खरच कारण वेगळं असेल तर विचार करेन.... जास्त ताणत नाही बसणार.....रिजन व्हॅलिड नसेल तर अर्थात त्याला मारेन मी खूप.. 😡 




सावी -  अच्छा मग मी मी पण माफ करायला हवंय का त्यांना? नाही नाही... ही मोठी चूक आहे... मी का माफ करू त्यांना.....असं डायरेक किस करायला कस येऊ शकतात ते मला...? शिईईई चांगला समजत होते मी पण गलिच्छ निघाला हा तर.... लांबच राहिलेलं बर याच्यापासून..... 😡

मनात विचार करत म्हणाली.....




अंजली -   का ग काय झालं का? 




सावी - नाही ताई...चल निघूया... 

.

.

.

.

.

.

.

.

[घरातील प्रसंग - संगीता, भाऊसाहेब, भागीरथी गप्पा मारत बसले होते...] 





संगीता - बाबा मी काय म्हणते मुलांना एकदा येउदे मग बोलू...





भागीरथी - हो ना त्यांचं ही मत जाणून घेऊयात..




अर्जुन - आमचं काय मत जाणून घ्यायचं आहे तुला आज्जी?

दरवाजातून आत येताना म्हणाला...




अपूर्व - हो हो आम्हाला पण सांगा... 😂




भागीरथी- उद्या तुमची अर्चना आत्या येतेय...




अपूर्व - काय? का पण? 😶😮




भाऊसाहेब- तुझ्या आणि साची च्या लग्ना विषयी सगळ्या गोष्टी नीट करायला...




अपूर्व - हम्म म्हणजे झालं माझं लग्न... 🥺😔आयुष्य असच काढावं लागेल आम्हाला...




संगीता - कार्ट्या काहीही बोलतोस 😂 असं काय नाही होणार आत्याला सगळ्या गोष्टी समजवल्यात, त्या फक्त लग्नाची तारीख सगळं ठरवायला येतायत...




अर्जुन - हो ना, काय झालं रे जर अर्चू आत्या आली तर.?




अपूर्व - अरे दादा आत्या माहिते ना उगाच नक्षत्र नाही हे असं ते तस करत बसते.....आपण लहानपणा पासून पाहतोय, I know तिला भविष्यातलं सगळं कळत ती कुंडली पाहते सगळा अभ्यास आहे तिचा...... आपण तिला विचारूनच शुभ कार्य करतो.... आणि ती माझी सख्खी आत्या आहे..... आता आहे सगळं ऐकवू नका..... 🤨




भाऊसाहेब- अरे अप्पू काळजी नको करू यावेळी असं नाही होणार ठीके 🤣




अपूर्व - आजोबा, का आपण बोलवत आहात त्या स्त्रीला...माझ्या आयुष्याची घडी का विस्कळीत करताय आजोबा श्री....आज्जी श्री, मातोश्री, दादा श्री कृपा करून असं करू नका.... 🙏माझा विवाह सुखरूप पार पडू द्या..अर्चना आत्या आल्यास माझ्या विवाहत ती अडचणे आणत बसेल.....आणि साची ची डिलिव्हरी सुद्धा होईल पण आत्या चा मुहूर्त निघणार नाही... 😔

नाटकी स्वरात म्हणाला...





अर्जुन - ओय नौटंकी, आवर घाला स्वतः वर आत्या असं काही करणार नाही.... ती नेहमी जे खरं आहे तेच बोलते...आपण आजवर अनुभव नाही का घेतला? 😂




संगीता - अप्पू आता तू बाप होणार आहेस अरे असा बालिशपणा करणं बंद कर 😂आणि अर्चना ताई असं नाही करणार त्या फक्त मुहूर्त काढून तुझा विवाह नीट पार पडतील समजलं.... 😂




भाऊसाहेब- हो तर काय, नाटकी आहेस हं तू जाम, 😂




भागीरथी - हो पण आपलाच पोरं आहे ना, गप्प कसा बसेल तो... 🤣 




संगीता - पुरे आता मस्ती, अप्पू ऐक.... तुझं लग्न लावण्यासाठीच आत्या येतेय...आणि हो साचीला सांग आताच उद्या संध्याकाळी सगळ्यांनी घरी या म्हणावं मुहूर्त काढायला आणि जेवूनच जा म्हण...




अपूर्व - हं ठीके आई, सांगतो मी, आणि तुम्हाला वाटतय तर होउदे तसेच..




भाऊसाहेब - जा आवरून घ्या, फ्रेश व्हा जेवूयात मग सोबत..




अर्जुन - अअअअ मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या..




संगीता - का रे? अरे बाळा असं रात्री उपाशी राहू नये, त्रास होतो मग तुला दूध आणू का मग जरासं? 




अर्जुन - नाही आई...भूक नाही आहे खरच, खाऊन आलोय... आलोच मी...

खोलीत वरती जाताना..





भागीरथी - अरे हा असा काय.. याला काय झालं आता?🤨




अपूर्व - कुणास ठाऊक, रस्त्यात पण शांतच होता..




भाऊसाहेब - अरे असेल काही तरी टेन्शन कामाचं, बँकेत एवढा मॅनेजर आहे तो..असत बाबा टेन्शन...




संगीता - हम्म असावं तसेच..बघू नंतर विचारेन काय झालंय ते.. चला आपण जेवूयात..




भागीरथी - हो चल आपण ताट वाढायला घेऊ..


*

*

*

*

*

*

*

*


सावी - काय करावं,? माफ करावं का त्यांना.. मुद्दाम नसेल केल का.. हा आता चूक आहेच म्हणा ही 😏 पण कारण काय असेल हे जाणून घ्यायला हवंय ना?....नको नको..पुन्हा त्यांच्याशी बोलण नकोच... कुणास ठाऊक मुद्दामच केल असावं, मनात एक आणि ओठांवर एक असा माणूस आहे हा... नकोच... यांना माफ करण्याचा विचारच नको.. 😏

मनातच बोलत असताना...




साची - ताई बीजी आहेस का? 

दार नॉक करत म्हणाली...





सावी - अग नाही ग ये ना...बस... बोला काय झालं...




साची - काही नाही सहजच आले तुझ्याशी गप्पा मारायला..किती महिने झाले आपण असं बोललोच नाहीत🫠




सावी - खरय, बर पिंकी मला सांग तुझी आणि अपूर्वची भेट कॉलेज मधील हे तर समजलं पण तुमचं जमलं कस? 😂





साची - काही खास स्टोरी नाही आहे ग, कस आहे कॉलेज मध्ये ना डान्स कॉम्पिटिशन असायचा आणि मला भारी नाद आहे, मी दरवर्षी भाग घेत राहिले आणि जिंकले सुद्धा...अपूर्वला मी खूप आधीपासून आवडयची पण तो कधी बोललाच नाही...अग बारावी पासून तो माझ्या प्रेमात आहे पण माझ्याशी साधी ओळख करायला नाही आला कधी....माझ्या डान्स चे व्हिडीओ काढून फोन मध्ये ठेवायचा....माझी एक झलक पाहायला लवकर येऊन गेटवर थांबायचं....नंतर अप्पूच्या मित्राने आमच्या ग्रुप सोबत ओळख करून दिली.....मग अप्पू आमच्या ग्रुप मध्ये आला.मग माझी आणि त्याची ओळख झाली....मग सगळं पुढे.... 🤣




सावी - अग बाई, 😂 किती गोड आहे अपूर्व 🫠





साची - आहे खरं, खूप मस्तीखोर आहे...पण मला उलट लगेच बोलत नाही... ना माझ्यावर रागावतो लगेच..उलट मीच त्याला ओरडत असते 😂 आणि बिचारा मला मनवायला मागे मागे करतो.... 😏





सावी - का ग त्याला त्रास देतेस गोड मुलाला 😂असं आता करू नकोस...आई होणार आहेस..लहान नाहीस आता तू🤨




साची - ताई वय कितीही वाढूदे माणूस मनाने लहानच राहिला पाहिजे तरच आयुष्य जगता येत..नाहीतर स्ट्रेस घेण्यातच संपेल आयुष्य.. ☺️✨





सावी - ते तर आहेच...





साची - Go with the Flow ताई... 🥰 जे घडून गेलं जर तेच कुरवाळत राहिलीस तर आयुष्य आणि वय वेगाने पुढे निघून जाईल...वेळ राहणार नाही मग....त्यापेक्षा घडलेलं हळूहळू विसरून जे नवीन घडणार आहे त्याचा विचार कर,किंवा काहीतरी चांगल घडव तू....भूतकाळात नको जगूस, वर्तमानात जग तरच भविष्य चांगल होईल.. 💕🤭





सावी - बापरे, आमच्या लाडूबाई खरच मोठ्या झाल्या तर🤭आमची समजूत काढली जातेय आता... 😂





साची - आहेच बाई मी हुशार!!😉





सावी - खरं कि काय... 😂 बर ऐक पिंकी..उद्या आपण चालोय अपूर्वच्या घरी...त्याची आत्या येणार आहे..ओके.सो be prepared....




साची - हो ग चिऊताई नको टेन्शन घेऊस..सगळं नीट होईल.




सावी - मला त्याच्या आत्याची काळजी आहे तुझी नाही 🤣




साची - एवढी वाईट नाही आहे मी ताई 🤣




सावी - ह्म्म्म 




साची - काय झालं ताई? अश्रू का डोळ्यांत 😔





सावी - काही नाही माझ लहान बाळ आज मोठं झालंय हे पाहून वाईट वाटतय, जस आईला रडायला येत ना तसेच मलाही वाईट वाटतय... तुझ्या लग्नाची वेळ जशी जवळ येते तस मला रडायला येतंय विचार करून...ज्या लेकराला आपण एवढी वर्ष सांभाळतो त्याला परक्याच्या हातात सोपावून द्यायचं 🥺





साची - ताई तूच आता असं बोलणार का? मला रडायला येईल मग 🥺

सावी ला मिठी मारताना....





सावी - गप वेडाबाई!!🥺❤️

.

.

.

.

.

क्रमश :


अपूर्व साचीच सत्य घरच्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं, पण सावी अर्जुनाच्या लग्नाची तयारी सूरी होईल का?





©®Pratiksha Wagoskar