Malika Aayushyalya anubhvanchi - 13 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 13

The Author
Featured Books
Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 13

      ( मला माहितीये, आज मी तुमच्याशी खूप दिवसांनी बोलतीये म्हणजे आपण 23 ऑगस्ट 2024 ला बोललो होतो. कारण माझ्या गोष्टीचा 12 वा भाग त्या दिवशी तुमच्या भेटीला

आला होता. आणि त्यानंतर Direct आजच हा खूप मोठा gap झाला. पण, या दिवसात खूप काही गोष्टी काही गोष्टी माझ्या life मध्ये झाल्या. तुम्ही जवळचे आहात. त्यामुळे, जशी

गोष्ट पुढे जाईल तस, सगळ तुमच्या सोबत share करेनच. पण, मी एवढ्या दिवस बोलले नाही. म्हणून प्लीज रागावू नका, मला माहितीये, तुम्ही पुढच्या गोष्टीची वाट पाहिली असेल.

मलाही तुम्हां सगळ्या वाचकांची खूप आठवण येत होती. पण, बोलायला जमल नाही, पण आता अस होणार नाही. आपण माझ्या गोष्टीमधून पुन्हा नव्याने भेटूया आणि या नवीन

वर्षासोबत पुन्हा नवीन सुरुवात करूया. तुमची सोबत आधीही होती आणि आताही असणार आहे, हे माहितीये मला, पण, तरीही पुन्हा एकदा मनापासून Sorry सगळ्यांना. कारण मधे

खूप दिवस गेल्यामुळे गोष्ट अर्धी राहिली. पण, काळजी करू नका. आपली गोष्ट पुन्हा चालू झाली आहे. या नवीन वर्षात खूप साऱ्या गोष्टी बोलूया. खूप बोलायच आहे, सांगायच

आहे. मला तुम्हांला.त्यामुळे भेटूया लवकरच. आता आपण सगळे कायम भेटणार आहोत, माझ्या नव्या गोष्टीतून पुन्हा नव्याने बोलणार आहोत. माझ्या कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या

खूप शुभेच्छा! तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होवू दे, तर तयार आहात ना ? एक नवी गोष्ट पुन्हा ऐकायला.) 

     आम्ही आठवीत असताना. एकदा आमच्या Hostel मध्ये खूप मोठी चोरी झालेली. म्हणजे दररोज कोणत्यातरी Room मध्ये चोरी व्हायची. अगदी पेन, Hairclips सुद्धा चोरीला

जायच्या. एके दिवशी अचानक त्या मुलीची चोरी पकडली गेली. ७ वीत होती ती वैष्णवी. जेव्हा तिच सगळे सामान chek केलं तेव्हा. एक कपाट भरून सगळ्यांच सगळं साहित्य

सापडल. Recter तर खूप चिडल्या होत्या. नंतर तिच्या Parents ला बोलावलं त्यांनी पण office मध्ये Khup मारलं तिला. आणि नंतर तर काढून टाकलं Hostel

आणि शाळेतूनच.

     जशी Hostel ला मोठी चोरी झाली होती.तशीच सगळ्या Hostel च्या मुलींनी मोठी रंगपंचमी सुद्धा केली होती. म्हणजे मी आधी पण रंगपंचमी चा किस्सा सांगितला पण हा वेगळा

आहे. काय झाल ? सगळ्या Hostel च्या मुलीनी एकदा एकत्र रंगपंचमी खेळायच ठरवलं होतं. आमच्या रेक्टर बाईंची परवानगी नसताना सुद्धा. म्हणजे खूप रंग खेळल्या सगळ्या मुली.

पाणी, रंग सगळा पसारा सगळीकडे . रूममध्ये, बाहेर, पॅसेजमध्ये म्हणजे रंगाचं पाणी अक्षरशः दुसऱ्या मजल्यावरून जिन्यातून खाली चाललं होतं. सगळे कपडे खराब झालेले रंगाने.

आम्ही पण सगळे रंगपंचमी खेळलो होतो. म्हणजे मी फक्त पाण्यानेच. कारण मला नाही आवडत रंगपंचमी ते colour लावायला. म्हणजे मी स्वतः कोणाला रंग लावत नाही. आणि मला

कोणी रंग लावलेला आवडत नाही. म्हणजे मला लहान असल्या पासूनच मला नाही आवडत. तर झाल अस सगळ पाणी जिन्यावरून खाली आल्यामुळे आमच्या बाईना समजल की,

वरती मुलींनी रंगपंचमी खेळली आहे. एवढ्या चिडल्या होत्या बाई बापरे! वरती आल्या Direct आणि एवढे काय काय बोलल्या आम्हांला. खूप जास्त चिडल्या होत्या. जाताना बोलल्या

सगळ होस्टेल तुम्ही स्वच्छ करायच आणि याची अजून एक दुसरी शिक्षा नंतर कळेलच तुम्हाला. सगळ्या मुलींना टेन्शन आल होत म्हणजे Hostel Clean करायच ते ठीक आहे. पण

अजून दुसरी शिक्षा काय असेल आता? मग नंतर सगळ्या मुलींनी सगळ्या रूम्स, जिना वगैरे स्वच्छ केला. सगळ करण्यातच दुपार झाली होती. आणि आवरून खूप काम केल्यामुळे

सगळ्यांना खूप झाली भूक लागली होती. म्हणजे तेव्हा शाळेला रंगपंचमीची सुट्टी होती त्यामुळे जेवणाची बेल थोडी उशीर होते हे माहित होत सगळ्यांना. म्हणजे १२ / १२.30 च्या

दरम्यान दुपारी जेवणाची बेल होते. पण, १२ वाजले - १२.30 वाजले तरी बेल झाली नाही. आम्हांला वाटल रंगपंचमी मुळे जेवणात काही Special Menu असेल म्हणून उशीरा बेल

होईल. पण, १ वाजले, १.३० झाले तरी पण बेल झाली नाही. आम्ही खाली आलो मेसमध्ये. तर मेसला दोन्ही बाजूने lock होत. कळालच नाही आधी. कुलूप कस काय ? पण, नंतर

लक्षात आल म्हणजे बाईनी सांगितलेली दुसरी शिक्षा आहे ही. म्हणजे आज आपल्याला दुपारी जेवण नाहीये. बापरे, आईशप्पथ ! आता काय करायच ? आधीच काम करून खूप भूक

लागली होती. आणि त्यात मेस बंद. मग आम्ही सगळ्या मुली रेक्टर बाईना sorry बोलायला त्यांच्या office मध्ये गेलो. आम्ही सगळ काही बोललो. Sorry ना Bai खरच, प्लीज बाई

इथून पुढे अस नाही होणार. खूप भूक लागलीये. पण बाई काहीच बोलल्या नाहीत, एक शब्द सुद्धा नाही. नंतर आमच्या मावशी बोलल्या तुम्ही वरती जावा Room मध्ये. बाई सांगतील

तेव्हाच जेवण मिळेल. आम्ही सगळे रूम मध्ये गेलो. एवढी भूक लागली होती सगळ्यांना. काय सांगू ? आणि खाऊ सुद्धा संपला होता. काय करायच कळत नव्हत. रडायला सुद्धा येत

होत. माहितीये, एवढी भूक लागली होती. माझ्या मैत्रिणीने तर यावर कविता सुध्दा केली होती. आम्ही त्या दिवशी सगळ्या मुली फक्त पाणी पित होतो. खरच एवढ वाईट वाटत होत.

पण, नंतर 2.30 ला अचानक बेल झाली जेवणाची. आणि खरच एवढा आनंद झाला आम्हांला. जस काय आयुष्यात सगळ मिळाल आहे. आम्ही सगळ्या मुली जिन्याने एवढ्या लवकर

खाली आलो मेसजवळ काहीजण,  तर आधीच जिन्यात बसले होते. आम्ही खाली गेलो. अजून मेसला lock च होत. पण, मुंबईच्या लोकलला अशी गर्दी असते तशी गर्दी मेसच्या बाहेर

झाली होती २५० मुलींची. जस कुलूप उघडलं. बापरे! सगळे आत गेले. आधीच गरमगरम जेवण ताटात तयार होत. आणि त्यात भूक लागलेली. आईशप्पत! काय जेवले होते सगळे.जस

काय माहिनाभर उपाशी आहे. पण, या सगळ्या प्रसंगात त्या दिवशी जेवणाची मात्र, किंमत कळाली. आणि रंगपंचमीचा दिवस कायमचा लक्षात साहिला तो अगदी आयुष्यभरासाठी.

मनावर कोरला गेला. आजही रंगपंचमीला रंग नाही. तर, त्या दिवशी आपल्याला जेवण मिळालं नव्हतं हेच आठवतं. पण, तिथून पुढे  Hostel मध्ये तरी कोणी, कधीच रंगपंचमी खेळली

नाही. म्हणजे आमची शाळा सुटेपर्यंत तरी. आता नव्या वर्षात अजून खूप नव्या गोष्टी सोबत भेटूया. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ! 

 

 

 पुढच पान लवकरच...