सावलीला त्या स्त्रीचे बोलने आणि तीचा प्रश्न हा जेनुएन वाटला म्हणन तीने उत्तर दिले, "मी साई नगरात जात आहे. तुम्हाला कुठे जायचे आहे." मग त्या स्त्रीने उत्तर दिले, "मला विठ्ठल वाडीला जायचे होते." मग सावलीने म्हटले, " विठ्ठलवाडी तर माझ्या घराकडे जाणायों जाणाऱ्या मार्गाचा वीपरीत दिशेने आहे." तेव्हा त्या स्त्रीने म्हृटले, "हो ना इथेच तर गड़बड़ झाली." आता सावलीने आश्वर्यजनक रीतीने म्हटले, "सॉरी, मला तुमचा म्हणण्याचे तात्पर्य कळले नाही." मग त्या स्त्रीने म्हटले, "तुम्ही अशा गोंधळून जाऊ नका, माझ्या म्हणण्याचे तात्पर्य असे होते की तुम्ही सुद्धा जर माझ्या घराकडे जाणाऱ्या मार्गाचा दिशेने जाणाऱ्या असत्या तर मला आताच तुमचाकडून लिफ्ट भेटली असती. परंतु आता मला आणखी काही वेळ येथेच अंधारात उभी राहून कुणाचा येथून जाण्याची वाट बघावी लागेल " आता मात्र सावलीला वाईट वाटू लागले होते म्हणून तीने म्हटले, "हो ना मला सुद्धा या गोष्टीचे फार वाईट वाटून राहिले आहे." तेव्हा त्या स्त्रीने म्हटले, "तुम्ही काही कसले ही वाईट वाटून घेऊ नका, संयोगाने आापल्याला थोडया वेळेकरीता भेटवले जरुर परंतु पुढचा गोष्टी करीता मी आणि तुम्ही पण काहीच करू शकत नाही."
मग सावलीचा आतील परोपकाराची भावना तीला वारंवार या गोष्टीची जाणीव करवून देऊ लागली होती की ती सुद्वा तीचा प्रमाणेच एक सुंदर आणि तरुण युवती आहे. ती आता या अंधारात कुणाचा तरी मदतीसाठी थांबली आहे. कुणाचा एवजी तीने त्या तरुणीची मदत केली पाहिजे. मग सावली ने म्हृटले, "अच्छा एक काम करू ज्या चौकातून आपला मार्ग हा वेगवेगळया ठिकाणी जाण्यासाठी वळतो मी तुम्हाला त्या चौकापर्यत घेउन चलते. मग पुढे तुम्हाला कुठले न कुठले साधन हे मिळून जाईल तुमचा घराकडे जाण्यासाठी. इथे अंधारात एकट्याने उभे राहिल्याने कसल्या ही प्रकारचे संकट तुमचावर उद्भवू शकते." आता मात्र त्या तरुणीने म्हटले, "तुमचा वीचार तर फारच उत्तम आहे आणि मला सुद्धा अशाच प्रकारची भीती वाटून राहीली आहे. तर तुम्ही म्हणता तसे आपण करू चला." असे म्हणत ती तरुणी सावलीचा गाड़ीवर बसली आणि त्या दोघीही जाण्यासाठी नीघाल्या. आता सावली ने म्हृटले, "अच्छा मला सांगा तुम्हीं त्या ठिकाणी कशाला गेलेल्या होत्या " त्या तरुणीने म्हटले, "भी मार्केट मध्ये आलेले होते आणि तुम्ही" सावली ने म्हृटले, "सेम, परंतु तुमचा मार्केटची पीशवी किंवा बॅग ती कुठे आहे. " मग त्या तरुणीने म्हटले, "माझे मार्केटचे काम झालेले होते म्हणून मी पार्लर मध्ये गेलेले होते आणि ते सर्व सामान मी माझ्या बॉयफ्रेंडला देऊन मोकड़े झालेले होते. तो मला घेण्यासाठी येणार होता परंतु त्याची गाड़ी ही खराब झाली आणि माझ्यावर ही अशी वेळ येउन गेली. थँक्यू मला तुम्ही अशी मदत केल्याबद्दल, " आता सावलीचा मेलमीलाप या भावनेने तीला त्या तरुणीशी आपुलकी वाटू लागली होती मग क्षणात सावली ने म्हृटले, "आपण भेटलो तेव्हा पासून एकमेकाना आपण एखाद्या म्हाताऱ्या सारख्या आम्ही तुम्ही करत आहोत जेव्हा की आपण दोघीही जवळजवळ एकाच वयाचे आहोत आय थिंक." तेव्हा त्या तरुणीने म्हटले, "हो ना नक्कीच मग काय मी तुम्हाला तू म्हणून संबोधन करू शकते." तेव्हा सावली ने म्हटले, "पुन्हा तोच गोंधळ होणार तू तू म्हणताना आपण पुन्हा तसेच अनोळखी व्यक्त प्रमाणे बोलणार आहोत. याचाऐ वजी तू माझे नाव घे आणि मी तुझे नाव घेते." मग त्या तरुणीने म्हटले, "फारच छान आयडीया आहे, परन्तु यात सुद्धा एक घोळ आहे." आता सावली कंटाळली आणि म्हणाली, "आता कसला घोळ आलेला आहे."
तेव्हा त्या तरुणीने म्हटले, "अग आपण दोघींना ही एकमेकांचे नाव तर माहीत नाही आहेत." मग त्या दोघीही जोरात हसू लागल्या होत्या. मग सावलीने म्हटले, "अय्या हो खरच माझ्या डोक्यात तर ही बाब आलेलीच नव्हती. अच्छामा झे नाव सावली आणि तुझे नाव काय आहे." मग त्या तरुणीने म्हटले, "माझे नाव शीना आहे." तेव्हा सावलीने म्हटले, "वाव काय हॉट नाव आहे तुझे अंगोअंगाला उब देणारे." मग शीना ने म्हटले, "आणि तुझे नाव दुपारचा धगधगत्या उन्हात तन आणि मन दोघाना शीतलता देणारे." मग सावली ने म्हटले, "आपल्या दोघांची ही नावे ही एकदुसऱ्याचा विपरीत आहेत परंतु आपले विचार हे जवळजवळ एक आहेत आय थिंक." शीना ने म्हटले, "हे एवढ्या लवकर माहिती पडणारा नाही परंतु एक गोष्ट मात्र मला आपल्या पहिल्याच भेटीत कळली की तू फारच चांगल्या आचार आणि विचारांची मुलगी आहेस. मी तुझ्या व्यक्तिमत्वाने प्रभावीत झाले आहे." मग सावली ने उदास होत म्हटले, " तरीही पण समोरचाला याचीक दर नाही असते." मग शीना ने म्हटले, "सावली काय झाले ग तू अशी का बर बोललीस. " तेव्हा सावलीने विषय बदलत म्हृटले, "हे बघ आपण गप्पा मारत मारत आपल्या गंतव्याचा जवळ कधी पोहोचलो हे आपल्याला कळलेच नाही. " असे म्हणत सावली ने गाड़ी थांबवली. मग तीने घड़ीत बघितले तर रात्रीचे जवळजवळ बारा वाजत आलेले होते. आता शीना गाडीवरून खाली उतरली आणि तीने इकडे तिकडे बघीतले तर कुणी काळ कुत्र सुद्धान व्हत त्या मार्गावर. सावली ने सुद्धा बघितले तर तीला सुद्धा त्या बाबीची गंभीरता जाणवली. मग शीना ने सावलीकड़े बघितले आणि ती म्हणाली,त र ठीक आहे सावली तू जा आता घरी रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत. मी थांबते येथे कुठली न कुठली गाड़ी येईल तर मी घरी नीघून जाईल." शीना सावलीला तोंडाने ते सगळ म्हणत तर होती परंतु तीचे डोळे काही वेगळ तीचा मनातील बोलू पाहत होती. सावलीने तीचा मनातील आणि डोळ्यांतील म्हणने समजले आणि तीने म्हटले, "वाह शीना फारच हुशार आहेस तू, तुला असे मी एकटी येथे रात्रीचा बारा वाजता सोडून जाऊ आणि तु येथे कुणा असमयी संकटाला बळी पड़ावी. मला सांग तुझ्या घरचा तुझ्या आई बाबाना फोन लावून बघ कुणी येत असेल तर मी तेवढा वेळ येथे तुझ्या सोबत उभी राहील.
तेव्हां शीना ने म्हृटले, "अग सावली माझ इथे कुणीच नाही आहे. मी इथे एकटीच आहे. "म्हणजे," सावलीने आश्चर्यचकित होऊन विचारले. शीना ने म्हटले, "'सावली मी येथे शिकण्यासाठी आलेले होते. शिक्षण झाल्यानंतर मला घरी जाण्यात रूची ही राहिलेली नव्हती. " मग सावली ने मध्येच म्हटले, "वाह रे हुशार मुलगी, हिला घरी जाण्याची रुची नाही राहिली आणि बॉयफ्रेंड बनवून मौज मज्जा करण्याची रुची मात्र राहिली आहे." तेव्हां शीना ने म्हटले, 'सावली तू जसे समजत आहेस तसे नाही आहे. मी तर " मग सावलीने मध्येच म्हटले, "मी तुला बरोबर समजत आहे. आजकालचा तरुण तरुणीना काय झाले आहे तर माहीत नाही. थोड़ेसे जरा तरुण वयात आले की नाही त्याना सगळ कळायला लागतं, त्याना लवकरच प्रेम होतो आणि प्रेमाचा उन्मादात ते वासनेचे खेळ मनसोक्त खेळतात. सगळ बर असलं तर ठीक आहे नाही तर मुलगा असलात र त्याला काय आपल्या प्रेमाचा नावावर वासनारूपी बीज तो त्या मुलीचा गर्भात टाकुन कधी कधी तीला स्वीकार करतो आणि मग त्यांचा प्रेमाचे रूपांतर संसारात होते ते ही अपरिपक्व अशा. याचा दुसऱ्या बाजुला ती मुलगी आपले तन आणि मन एका मुलाचा स्वाधीन करते ते सुद्धा प्रेम आहे म्हणून, परंतु त्या नालायक मुलाला तीचा मनाचे काय लोणचे घालायचे असते. त्याला तर हवे असते त्या मुलीचे लुसलुसीत तन आणि त्याला त्या तनाची भूख असते. तो जेव्हा ही त्या मुलीशी भेटायला येतो किंवा तीला भेटायला बोलावतो तेव्हा एखाद्या पर प्रांतीय पक्षा सारखा तीचा सुंदर शरीराव आपली चोचर मारून तीचा गर्भात आपला दाना टाकुन उड़ून जातो. मग त्या दाण्याचे वेलीत किंवा रोपटयात रूपांतर होत असताना तो तीला सोडून पडून जातो. मग ती मुलगी जन्मभर रडत बसते अन्यथा आत्महत्या करते." सावली हे सगळ बोलत होती तेव्हा ती फारच तापलेली होती. मग शीना ने म्हटले, "सावली जरा शांत होऊन माझी गोष्ट ऐकशील." मग सावली ने तापट होत म्हटले, "अच्छा बोल तुला काय बोलायचेआ हे." मग शीना ने म्हटले, "सावली, मी जेथून आलेली आहे तो प्रांत एकदम दुर्गम असा आहे. आमचा प्रांतात शिक्षण तर सोड धड खाण्यासाठी अन्न आणि धारण करण्यासाठी कपड़े सुद्धा नीट नसतात. माझ्या आई बाबांनी पुष्कळ धाडस करून मला शाळेत शिकायला पाठवले. माझ्यासाठी माझ्या पालकांनी फार कष्ट घेतले. मग मी दहावी नंतर पुढ़े शिकण्यास जिद्द केली म्हणून त्यानी मला येथे येण्यास परवानगी दिली. परन्त् हा माझा निर्णयस र्रास चुकीचा ठरला.
शेष पुढील भागात .......