GAME OF DEATH in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | GAME OF DEATH

Featured Books
Categories
Share

GAME OF DEATH

तुम्हाला सांगायचे तर तुमच्या समिक्षेवर मला प्रतिक्रिया देता येत नाही , प्रतिक्रियेचे बटन बाजूला पळून जाते . मात्र मी समिक्षा वाचतो म्हणून कथेविषयी आपले मत जरूर कळवा....

धन्यवाद 🙏 👍 💐 💐 💐 💐 

कथेत काही विचलित करणाऱ्या दृश्यांचा ,घटकांचा , गोष्टींचा उल्लेख,वापर केलेला आहे , कृपया कथा आपल्या जोखिमेवर वाचावी.

हळूहळू मंदावत  फिरणारी काळी चाके  खाली पडलेल्या पालापाचोळा व काट्यांचा चुराडा करत हळूच थांबली . दरवाजा धाड आवाज करत उघडला . त्यातून एका तरूणाने बाहेर पाऊल टाकले , त्याच्या पायातील पांढरे सुज  खालील मऊसार मातीत रुतले .तेथील  मातीचा गंध त्याच्या नाकात शिरला आणि आपली बॅग खांद्यावर टाकत तो बाहेर पडला . त्याचे डोके खाली होताच त्याचे केस सरकून त्याच्या डोळ्यावर आले . डिकी उघडून त्याने सुटकेस बाहेर ओढून काढली आणि तो कारसमोर येऊन उभा राहिला .

" सर दरवाजा बंद करा .", गाडीतून ड्रायव्हरचा आवाज आला . तसे त्या तरूणाने दरवाजा आपटला . पायत जिन्स , अंगावर पांढरा टी शर्ट व एक लोकरी कोट ज्याची टोपी पाठीवर लटकत होती . केस हवे बरोबर भिरभिरत होते व त्याने हातानेच आपल्या डोळ्यावरील चश्मा सरकवला .तोपर्यंत कार शांत वातावरणाला कंपित करत सुरू झाली व आली तसे ती आपल्या वाटेने निघून गेली .

पाठिवरील बॅगच्या काळ्या पट्याला पकडून सुरज अवतीभोवती नजर फिरवू लागला . आजुबाजुला उंचच उंच गेलेले विरळ वृक्ष होते , पण काही अंतरावरून घनदाट जंगल सुरू होत होते .समोर एक वाळलेल्या पानांनी भरलेला मोकळा आवारात पाने उडत होती व तेथेच एक जुन्या इमारतीच्या  पायथाला जाऊन चिकटत होती . ती इमारत तिन मजली होती  , तिला कोणताही आकार नव्हता , फक्त आयाताआकृती  होती , ती !नुकताच भिंतींना पांढऱ्या रंगाचा लेप चढवला होता , तरी तिचे जुनाट पण काही लपत नव्हते . त्या इमारतीला सळसळत्या झाडांनी वेढलेले होते .

सुरजने आपली पाऊले त्या इमारतीच्या दिशेने उचलली . कोणत्याही शहरापासून , गावापासून खुप दुर , जंगलात अशी ती जुनी इमारत तटस्थ उभी होती . तिला घर म्हणावे की बंगला , की इतर काही समजत नव्हते...काही झाले तर आसपास मदतीसाठी काळे कुत्रेही नाव्हते , कारण ती जागा सुनसान होती .

त्या जुनाट इमारतीला पाहूनच सुरजच्या मनात एक अनामिक भिती वाढत चालली होती . आजुबाजुच्या सळसळत्या झाडांना बघून त्याच्या मनात दडपण येत होते . तेथला वाराही विचीत्र वाटत होता . तो दरवाजापर्यंत पोहचला , एक लाकडी काळपट फळीचा तो दरवाजा जुना पडलेला होता . तेथील नेमप्लेटही उपटून काढलेली वाटत होती . खिशातून चावी काढत सुरजने दरवाज्याच्या लॉकमध्ये घातली , खट् आवाज करत लॉक  ओपण झाले .

सुरजने दोन्ही हातांनी जाम झालेला दरवाजा ढकलला .कर्रर्रर्र.... जबरदस्त कर्कश आवाजाने त्याच्या पोटात गोळा उठला . थोडी धुळ हवेत उडाली . त्याने आतमध्ये नजर फिरवली . खाली काही खोल्या होत्या , खुर्च्या , डायनिंग टेबल , सोफे , किचन रुम , तसेच वरती एक झुमर लटकत होता . काहीच पावलांच्या अंतरावर एक जिना होता , पण लाकडी !त्या विस्तीर्ण हॉल मध्ये एकही खिडकी नव्हती. ते थोडे सुरजला विचीत्रच वाटले .  दरवाजाच्या आतल्या बाजूस दोन खांब बांधण्यात आलेले होते , ज्यांच्या मधोमध एक पोकळी होती . ते ही फार विचित्र होते .

खालील एकाही खोलीत डोकावून न बघता सुरजने जिन्याकडे पाऊले उचलली , आजुबाजुच्या भिंती रंगहीन व प्लास्टर उडालेल्या होत्या . कोणीतरी वेळ काढून तिथे साफसफाई केली होती , काही ठिकाणी भिंतीवर रंगाचे धब्बे होते . जिना चढून सुरज वरती गेला . तिथेच एक जेमतेम चांगली खोली होती . त्याने आतमध्ये प्रवेश केला व सर्व सामान तसेच आपटत तो हवा खाण्यासाठी खिडकीजवळ गेला .खिडकीचे पडदे त्याने बाजूला केले . खिडकीला लोखंडी , गंजलेली मजबूत जाळी होती ‌. जमिनीपासून ती खिडकी बरीच उंच होती . खिडकीतून बाहेरील दृश्य भकास दिसत होते . फक्त वाळलेल्या गवताने भरलेले दुर पर्यंत जानारे मैदान . अवतीभोवती झाडी . ते गवतही वाऱ्याबरोबर झोके खात होते , अगदी वेडे वाकडे .

सुरजचे मन खिन्न झाले . कुठे येऊन फसलो आपण असे त्याला वाटू लागले . अस्यात त्याला रिफ्रेश होण्याची आवश्यकता भासू लागली . बाथरूम खोलीलाच जोडून होते . सुरजने आतमध्ये प्रवेश केला . किती जुना आरसा , टाईल्स पिवळसर , थोडी अश्वच्छता होती तिथे ." पाठवायचेच होते तर थोड्या व्यवस्थित जागेवर पाठवायचे होते .  भकास, निर्जन , निर्मनुष्य, भयानक ! जागेवर कोण पाढवते .", म्हणत सुरजने नळ सुरू केला , तसे फीशशश... आवाज करत नळ हवाच सोडू लागला व काहीच वेळात त्याच्या तोंडातून पाण्याची धार बाहेर पडली .गार पाणी अंगावर घेत सुरज सावरखाली गुपचूप उभा होता , तिथे पाण्याचा सर्रर्र .... आवाज तेवढा घुमला होता .कट्.... एका क्षणी पाण्याच्या आवाजाव्यतिरीक्त आणखी वेगळा आवाज सुरजच्या कानी पडला . सुरज थोडा दचकला. तो आवाज असा होता जणू कोणीतरी अचानक दरवाजा ढकलला असावा . त्या विचारानेच सुरजच्या छातीत गरम झाले ." पण ह्या निर्मनुष्य जागेत फक्त एकजण आहे , तो म्हणजे मी ! बाकी कोणी नाही .", ह्या विचाराने त्याने स्वतःलाच दिलासा दिला . तेवढ्या पुरता त्याला दिलासा मिळाला.

अंघोळ उरकून सुरज बाहेर आला . जो दरवाजा अंघोळीला जाण्याआधी सुरजने बंद केला होता , तो खोलीचा दरवाजा सताड उघडा होता. " मी तर हा दरवाजा बंद केला होता , म्हणजे कोणी खोलीत तर शिरले नसेल ना ?", सुरज विचार करता करता चांगला सावरला , त्याच्या छातीतील इवल्यासा काळजात धस्स झाले.

नाही कदाचीत मी दरवाजा उघडाच ठेवला असेल . स्वतःला समजावत सुरजने दरवाजा बंद केला व तो आपल्या पलंगाकडे गेला . जिथे त्याने आपली सुटकेस ठेवली होती .पलंगावरील सुटकेस उघडून त्याने आपले आवाडते कपडे शोधण्यास सुरुवात केली .तेवढ्यात कर्रर्रर्र.... आवाजाने त्याच्या कपाळावर घाम जमा झाला . धडधडत्या काळजाने त्याने मागे वळून पाहिले. दरवाजा किंचित लोटला गेला होता आणि क्षणात त्या फटीतून येणाऱ्या प्रकाशात बदल झाला .जणू त्याच क्षणाला तिथे काहीतरी हालचाल झाली असे त्याला वाटले." कोण आहे ?", त्याने धडधडत्या हृदयाने शब्द फेकले व  पाऊले पुढे उचलली . त्याचे काळीज थोडे वेगात धावत होते व डोळे दरवाजाच्या फटीत खिळले होते. कान सावधगिरी बाळगत होते . त्याने हळूच दरवाजा उघडला व फक्त मान बाहेर काढून बाहेर पाहिले . उजवीकडे मग डावीकडे , पण फक्त भयानक शांतता व मंद प्रकाश , तोच जुनाट भकास घराचा भाग .धाड ! काहीतरी जोरात आपटले आणि सुरज जागचा उडालाच . त्याला तो प्रसंग अनपेक्षित होता . आवाज कसला म्हणून धकधक करणारे हृदय घेऊन तो मागे फिरला . हवा जोरात घोंगावत खोलीत शिरत होती आणि त्यामुळे खिडकीचे काचेचे पाले आवपटले होते .

....

कपडे घालून सुरज खाली आला व किचनमध्ये शिरला . तिथे सर्व साहित्य होते वरून महिन्याभराचे एका खोलीत स्टोअर करून ठेवलेले होते . सुरज खाऊनच आला होता म्हणून त्याला फक्त आता कॉफी घ्यायची होती . एक कप कॉफीने भरून पुन्हा तो वरती चढून आला .इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका चौरस खोलीत तो लगबगीने शिरला . समोर एक ऑफिस चिअर होती आणि  टेबलावर तिन संगणक व सुरजचे निजी लॅपटॉप होते . वरती पंखा गरागरा फिरत होता .आधी सुरजने वाई फाई राउटर व्यवस्थित चालू आहे का ते  पाहिले व लगेच  त्याने आपला मोबाईल व संगणक वायफायला कनेक्ट केले . मोबाईल  कनेक्ट करताच , नकोत्या मेसेजेसची भरमार झाली . सोबत बॉसचे व मित्रांचे मिसकॉल होतेच .

सुरज कॉफीचा घोट घेत फोनकडे पाहतच होता , तोच फोन घनानला , बॉसच होता तो ...

" हॅलो बॉस!"

" कसा आहेस सुरज ? पोहचलास काय ?", बॉसचे विचाराने आले .

" बॉस मी बरा आहे , पण जास्ती दिवस नाही . ही जागा सुनसान आहे , काळे कुत्रे शोधूनही सापडणार नाही.वरून ही जागा भयानक जंगलाने वेढलेली आहे . घर म्हणावे की खंडहर अशी ह्या घराची अवस्था आहे .प्लिज बॉस मी येथे जास्ती दिवस राहू शकणार नाही .", सुरज म्हणाला.

" सुरज कुल !तुझ्या कल्पनांना पॉलीस करण्यासाठीच ती जागा निवडलेली आहे आणि फक्त तुझ्याचसाठी सैटेलाइट इंटरनेटची सोय करून दिली आहे .तिथे तुला लागेल ते सर्व आहे , पण जोपर्यंत तू  काही नविन उत्कृष्ट निर्माण करत नाहीस तोपर्यंत तेथून तुझी सुटका नाही .चल बाय , ऑल दी बेस्ट!", बॉस म्हणाला." पण बॉस एकूण तर घ्या...", सुरज म्हणाला , पण तोपर्यंत बॉसने फोन कट केला होता .

........

फक्त काही दिवसा अगोदरची गोष्ट होती . सुरजला बॉसने केबिनमध्ये बोलावले ..." सुरज तुला ठाऊक आहे , ह्या कंपनीची अर्धी अधिक जबाबदारी तुझी आहे . आजपर्यंत तुझ्या कल्पनेने आणि मेहनतीने आपण हे यशाचे शिखर गाठले, पण सध्या मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी खुप वाढलेले आहेत आणि आपले गेम्स अचानक डाऊन झालेले आहेत .", बॉस आपल्या मनातील सर्व बोलला खरे , पण त्याच्या हातापायाची चुळबुळ व तोंडावरील भाव सांगत होते की , अजूनही त्याने ब्रह्मास्त्र सोडलेला नाही .

" होय बॉस मी सर्व जाणतो व काहीतरी नवीन जबरदस्त सुचवण्याचा प्रयत्न करतो , पण हे कामाचे तान, ही गर्दी गोंधळ डोके बंद पाडते.", सुरज म्हणाला .

" ठिक आहे , मी तुला ह्या गर्दी गोळा पासून दुर पाठवतो , पण मला काहीतरी जबरदस्त कल्पना हवीय. असे काही जे आपली मार्केटमधील व्हॅल्यू परत वाढवेल.", बॉस म्हणाला .

" ओके बास!", आणि हिच खुप मोठी चुक झाली होती .

काहीतरी डब... असा आवाज आला .टेबलावर डोके ठेवून विचारात शिरलेला सुरज दचकून जागा झाला .समोरील संगणकाच्या पडद्यावर मुंग्या चढलेल्या होत्या  व तो थोडा कर्कश आवाज काढत होता .त्याकडे दुर्लक्ष करत सुरजने कपला हात घातला .

" एकदाचे एखादी कल्पना सुचवतो व  ह्या जागेतून बाहेर पडतो .", म्हणत त्याने कप तोंडाजवळ आणला , तोच काहीतरी बुचकळून ब्लॅक कॉफी तून बाहेर आले .एक पाल होती ती , शरीरात झिणझिण्या पसरून एकदमच सुरजने कप बाजूला फेकला व तो फुटून त्यातील कॉफी इतस्ततः सांडली . पालीचे मृत शरीरही एकदम बाजूला जाऊन खाली चिकटले .

सुरजचे शरीर त्या धक्क्याने कंप पावत होते , तोच मुंग्या आलेल्या संगणकाच्या स्क्रीनवरील हालचाल वाढली व खर्रर्र... खर्रर्र.... करणारा कर्कश आवाज वाढला .क्षणभर स्क्रीनवर एखादे दृश्य उमटले ,तोच त्या कर्कश आवाजातून एखाद्या मानवी आवाज आल्यासारखा सुरजला वाटला . " नी....जा..ई...."असे काहीतरी तुटक शब्द त्याच्या कानी पडले आणि त्याचे काळीज थोडे थरारले पटकन उठून त्याने स्विच ऑफ केले . तरीही संगणक बंद झाला नव्हता. आता सुरजच्या काळजाची धडधड वाढली . संगणकातील आवाजही तितकाच तीव्र होऊ लागला .अगदी असाह्य व काहीतरी आर्त हाका बाहेर पडत आहेत असे त्याला वाटले .पटकन त्याने वायरिंग ओढून काढली आणि दोन तिन वेळा स्क्रीन चालू बंद होऊन संगणक बंद पडला .

" हे सर्व काय ? आधीच ही जागा काय कमी भयानक आहे जे असले धक्कादायक प्रकार घडतात .", म्हणत सुरजने आपल्या  तोंडावर जमा होऊन राहिलेला घाम पुसत तेथून पाऊले उचलली .तो दरवाजापर्यंत आला व पुन्हा तसाच कर्कश आवाज त्याच्या कानी पडला आणि ह्यावेळी त्यांच्या काळजात चीर गेली . चर्र ....चर्र.... भितीची वीज त्याच्या शरीरात घुमली आणि एका क्षणाचीही वेळ ईकडे तिकडे न करता तो मागे फिरला .संगणक पुन्हा चालू झाला होता . एखादे चित्र स्किनवर राहून राहून येवू पाहत होते .सुरजचे अंग आधीच चांगले शहारून थरथरत होते व त्याला पुन्हा घाम फुटला , श्वासाची व हृदयाच्या धडधडण्याची गती मोठ्या प्रमाणात वाढली .

मोठी हिम्मत करून त्याने दोन पाऊले उचलली आणि तोच संगणकातून जबरदस्त किंकाळण्याचा आवाज बाहेर पडला आणि ठिणग्या उडून त्याने क्षणात पेट घेतला .

सुरज एकवेळ घाबरून दारावर जाऊन आदळला होता . छातीला हात घट्ट पकडून तो विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर पाहतच होता . आग हळूहळू वाढू पाहत होती . समोर आणखी दोन संगणक , लॅपटॉप व स्विच बोर्ड होता . काहीतरी मोठे घडणार होते , पण सुरज अचानक भानावर आला आणि लागलीच पुढे धावला . समोरील लाकडी रॉड घेऊन त्याने पेटणारा संगणक खाली हाणून पाडला .

एखादा कापूर क्षणात जळावा व पेट घेऊन खाक व्हावा . तसे धुर ओकत तो संगणक पुर्ण जळून तिथेच काळा पडला . त्याच्यातून अद्यापही धुर बाहेर पडत होता . सुरजचे शरीर चांगले थंडी वाजावी तसे भितीने थरथरत होते , त्याची छाती धडधडत्या काळजाने भरलेली होती , त्याने आपला हात तोंडावर घेऊन गळणारा घाम  थरथरत्या हाताने पुसण्याचा प्रयत्न केला .

.......

समोरील बंद खिडकीचे पाले आता थरथरत होते . काळोख कोपऱ्यात ठान मांडून बसला होता . खोलीतील उजेडही एकदम कमी होता . अंगावर पांघरून घेऊन सुरज त्या शांततेला अनुभवत पडला होता . मध्येच कुठेतरी खट्...आवाज येत होता . बाहेर जंगलात अनेक जनावरांचे ओरडण्याचे आवाज सुरजच्या काळजाचा ठोका चुकवत होते.आज पहिलीच रात्र आणि इतकी भयानक !" काय गरज होती बॉसला सांगायची .... मला शांत ठिकाण हवेय , कामाचा ताण येतो ... आता भुगत म्हणा !", सुरज स्वतःवर‌ चिडला .असेच विचारात खेळता खेळता त्याचे डोळे लागले.

रात्र पुष्कळ झाली होती . अचानक सुरजचे डोळे उघडले. तो कुठेतरी उभा होता , पण आपल्या खोलीत नव्हे ...

" मला झोपेत चालण्याची सवय आहे! आजच कळाले .", सुरज बडबडला .तोच त्याच्या कानांनी कसलासा किंचीत आवाज टिपला आणि त्याचे काळीज जड पडले . आधीच त्याला समजत नव्हते की तो नेमका कुठे येऊन ठेपला आहे आणि वरून हे सर्व आवाज त्याच्या अंगावर काटा उभा करत होते.

सुरज ज्या खोलीतून आवाज येत होता तिकडे सरकला . दरवाजा जुनाट डागाळलेला होता . किंचीत उघडा होता . आतमध्ये पिवळा प्रकाश चमकत होता आणि तोच दयनीय , असाह्य , वेदनेने व्हिवळण्याचा आवाज.सुरजला बैचेन करत होता.

त्याने दरवाजा ढकलला आणि त्याच क्षणी अनपेक्षितपणे दिवा बंद झाला व खोलीत पुर्ण काळोख पसरला . त्याबरोबर सुरजच्या काळजाने छातीवर आपले हात आपटायला सुरवात केली  .थरथरत्या हाताने त्याने खिसे चाचपडले पण मोबाइल नव्हता . आवाज वाढत होता व नाकात कुबट सडलेला वास जोराने शिरत होता .सुरजने आपली पाऊले पुढे उचलली आणि  पायाखाली काहीतरी चिपचिप जाणवले . ती आडवी येणारी भिंत संपलेली होती आणि सुरजने अंधारात पाहिले , पण फक्त काळोख होता . आवाज मात्र स्पष्ट येत होता .जाणवत होते की कोणीतरी समोर काही अंतरावर उभे असावे आणि तेथून असाह्य वेदनेने व्हिवळण्याचे व कण्हण्याचे आवाज येत होते .

" निघून जा इथून थांबू न...नकोस ...", तिकडून आवाज आला .त्या आवाजाने सुरजचे शरीर शहारले तोंडावरील हात काढत तो धडधडत्या काळजाने बोलला ," कोण आहेस तू ? जे माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेस ."

" मी कोण आहे , ते सर्व महत्वाचे नाही . तुझा जीव महत्त्वाचा आहे . निघ इथून नाहीतर मरसील .", तो स्त्री आवाज पुन्हा सुरजसी बोलला.

" मला तुला पाहायचेय ...", सुरज बोलला .

तोच चर्रर्र... करत त्या खोलीतील बल्ब पेटला आणि रक्तातून चकाकत उजेड सर्वत्र पसरला .  मांस टांगण्याच्या काट्यावर काही फाडलेली धडे लोंबकळत होती . त्याच्यावर चांगला असल्यातरी हत्याराने वार करून त्यांना फाडून टाकण्यात आले होते . त्यांच्या पोटातून आतडी यकृत गळून अगदी निखळून रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते . ती खोली म्हणजे संपूर्ण रक्ताने भरलेली एखादा रक्ताचा तलावच भासत होती .सुरजचे काळीज चित्कारत ओरडत , जोडलेल्या नाड्यांना ओढत मोठ्याने छातीत आदळ अपाट करत होते . त्याचे शरीर शहारून उठले होते . थरथरत तो मागे सरकला होता .ते काट्याला टांगलेले पांढरे फटफटीत रक्ताने माखलेले फाटलेल्या स्त्रीचे निर्जीव धड किंचीत हलले आणि मोठ्याने किंकाळले ." निघ इथून नाहीतर मरसील ...."सुरजला जबरदस्त धक्का बसला आणि तो एकदम मागे सरकला आणि भिंतीवर आपटून खिळला , तोच खोलीचा दरवाजा खाडकन् उघडला.

सुरजचे काळीज छाती फाडण्याच्या बेतातच होते आणि रक्तात पाऊले आपटण्याचा पावलांचा दमदार आवाज त्याच्या कानांवर आदळू लागला , त्याबरोबर दरदरून घाम फुटलेल्या सुरजचा श्वास घसात अडकू लागला , त्याचे डोळे भिंतीकडे खिळले आणि तोच एक रक्ताळलेली भलीमोठी कुऱ्हाड समोर आली ....

" नाही....", अगदी ओरडत सुरज दचकून उठला. घाम त्याच्या डोक्यातून निघुन संपूर्ण शरीरावर पाण्यासारखा गळत होता . छाती वर खाली होत होती व काळीज धाब धाब छातीत वाजत होते , जसे कोणीतरी  ढोल बदडत असावे . सुरजच्या घसाला एकदम कोरड पडलेली होती  ,शरीर तर एखाद्या हवेत अडकलेल्या पानासारखे थरथरत होते .

" पाणी...पाणी...", म्हणत त्याने नाइट स्टैंडवर हात आपटला . समोरील बाटली थरथरत्या हाताने करारून पकड त्याने तोंडाला लावली व कोरडा ठणठणीत पडलेल्या घसात एकदम पाणी ओतले .अद्यापही त्याच्या कानात ती किंकाळी कंपित होत होती .तो कुबट कुजका वास त्याच्या नाकात घुमत होता .

" हे कसले भयानक स्वप्न , मेलोच होतो ते सर्व पाहून ....", म्हणत त्याने संपूर्ण बाटली कोरड्या पडलेल्या घसात रिकामी केली .

.......

कालच्या स्वप्नामुळे सुरजचे मन फार अस्वस्थ व विचलीत झाले होते . त्या अंधाऱ्या कोपऱ्यांनी भरलेल्या घरात त्याचा दम घुटत होता . आजुबाजुला काही ना काही हालचाल त्याला सतत जाणवत होती आणि त्यामुळे काहीएक कारण नसतांना त्याचे हृदय धडधडत होते .

ह्या घरातून कुठेतरी बाहेर फिरून यावे असा एक विचार सुरजच्या मनात आला . तसेही आलो त्या क्षणापासून ह्याच घरात एखाद्या कैदासारखे कैद होऊन आहोत ...

विचार करत तो जिन्यावरून उतरून हॉलमध्ये आला .  कुठे जावे असा विचार तो करतच होता , तोच घराच्या मागच्या बाजूला हून थोडा विचीत्र आवाज त्याच्या कानांवर पडला. जसे लाकूड हलते , ठोकते किंवा आपटते...त्या आवाजाच्या दिशेने सुरजने आपली पाऊले उचलली . स्वयंपाक घराच्या एका छोट्या बोळातून एक मार्ग जात होता . जो दोन्ही भिंतीत दोन हातभर पसरला होता .त्यातून प्रकाश आतमध्ये डोकावत होता .

सुरज त्यातून पुढे सरकला, तसा त्याला एक लाकडी दरवाजा वाऱ्याने हलत असलेला दिसला .  हवा त्या बोळातून तीव्र गतीने वाहत येत होती व बाहेर काहीतरी वाजत असल्याप्रमाणे भासत होते , अगदी मंद आवाजात.

सुरजने दरवाजाला हात घातला आणि दरवाजा लोटला . अडकून पडलेली दमट कुबट हवा त्याच्या अंगावर धावून आली .प्रसन्न मनाने त्या मार्गातून‌ बाहेर पडलेल्या सुरजचा चेहरा क्षणात उतरला ." आलोच कसाला ईथे मी असे त्याला आता वाटले ." त्याचे काळीज जे थोडेफार शांत अवस्थेत गेले होते ते पुन्हा फडफडू लागले .तिथे पोर्चमध्ये हाडे दोरींना बांधून टांगलेली होती व ती हवेमुळे एकमेकांवर‌ आपटून वाजत होती . हाडे कोणा प्राण्याची नव्हती .हाताचे पंजे , मांडीचे हाड , मानवी कवटी ....ते सर्व पाहून सुरज शहारला , त्याची हिम्मत आता मेनाप्रमाणे वितळू लागली . त्याने मोठ्या कष्टाने नजर समोर उचलली . असंख्य मानवी हाडे समोरील आवारात इतस्ततः विखुरलेले होती .एखादे तर नुकतेच फेकलेले होते . ज्याला काळे पडलेले कुजलेले मांस अद्याप चिकटलेले होते आणि त्याच्यावर माश्या , अळ्या व किड्यांसोबत सापही वळवळत फिरत होते .

सुरज एकदम शहारून मागे सरकला , त्याला ओकारी येने बाकी होती . दरवाजा आपटत तो एकदम स्वयंपाघराकडे धावला .

" बास्स! आता मी येथे नाही राहणार .", म्हणत तावातावाने सुरज समोरील खोलीत शिरला .जिथे  संगणक होते व त्याचा लॅपटॉप आणि चार्जिंगला ठेवलेला फोन .सुरजने लागलीच फोन उचलून हातात धरला व सरळ बॉसला फोन लावला , पण फोन लागत नव्हता . दचकून सुरजने मोबाईलमध्ये पाहिले ,वाईफाई किंवा रेंजची काडीही नव्हती .त्याने राउटर तपासले , ते एकदम व्यवस्थित होते . तोच धाडकन त्याच्या मागून खोलीत काहीतरी आपटले आणि पुर्ण दचकून सुरजने धडधडत्या काळजाने मागे पाहिले .

त्याचे डोळे विस्फारले व घाम त्याच्या चेहऱ्यावर चमकू लागला . काळीज गरम इंजिन प्रमाणे झाले होते रक्त भितीने नसात अती वेगाने उफाळत होते .सैटेलाइट कनेक्टरची छत्री कोणीतरी तोडून तिथे फेकली होती ." नाही ...", संपूर्ण खोलीत थरथरत सुरजने नजर फिरवली . त्याला आता तिथे सर्वच विचीत्र वाटू लागले . फक्त वेडे होण्याची पाळी आली होती त्याला .

" कोणीतरी आहे  , जे आपल्यावर नजर ठेवून आहे आणि जसे मांजर उंदराला मारण्यापुर्वी जसी त्याच्यासी खेळते , तसेच हे ही आपल्याला मारण्यापुर्वी आपल्यासी खेळत आहे ...‌ नाही मी मरणार नाही.... मला मरायचे नाही .... ", म्हणत सुरजने खोलीतून धाव घेतली , कोणीतरी आपल्यामागे धारदार शस्त्र घेऊन पाठी लागले आहे व ते वेगात आपल्या जवळ पोहचत आहे . असे त्याला वाटले आधीच घामाने दरदरून भिजलेल्या सुरजच्या शरीरावरील घाम निथळत होता ." मला ते पकडेल मारेल , त्याने माझ्यावर हत्यार फिरवले ... वाचवा..." आणि पुढच्याच क्षणी आपल्या खोलीत शिरून सुरजने धाडकन दरवाजा लोटून बंद केला . तसाच तो  दरवाजाला पाठ घासून फुललेल्या श्वासाने दिर्घ श्वास आत ओढू लागला .थोडे डोळे बंद करून , त्याने विशावा घेतला , पण न बघितलेला मृत्यूचा चेहरा वेगवेगळ्या आकारात त्याच्या बंद डोळ्यासमोर खेळत होता . लागेच त्याने डोळे उघडले आणि आपली बॅग उचलून तो लागलीच तेथून बाहेर पडला.

धाडधाड पाऊले आपटत तो वेगात हॉलमध्ये आला आणि त्याची पाऊले जागची थबकली. दरवाजा शेजारी कोणीतरी लोखंडी गेट ओढून ती जागा पुर्ण बंद केली होती .विस्फारलेल्या डोळ्यांनी सुरज मागे धावला . त्याला तो अंधारलेला भिंतीतील मार्ग दिसला . सुरज वेगात धावला , पण जोरात कस्यावर तरी तो आदळला . त्याचे कपाळ घणानले  आणि धाडकन सुरज खाली आपटला .हळूहळू त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येवू लागली.

त्याच्या डोक्यात झिणझिण्या फिरत होत्या . आपल्या डोक्याला हात पकडून सुरज उठला . कपाळावर लालभडक सुजन निर्माण झाली होती .तो त्याच जागेवर पडला होता . वेळ किती गेली काहीच समजत नव्हते , पण घरात फारच कमी उजेड पसरला होता .सुरजने आपली पाऊले त्या दोन अंधाऱ्या भिंतीत शिरवली , काहीतरी लागले . त्याने आपल्या हाताचा पंजा त्या टणक गेटवरून फिरवला .घरात दारा शेजारी असी काही व्यवस्था केली होती , की एक अदृश्य लोखंडी गेट हवा तेव्हा बसवता येत होता . जवळ जवळ ते तिन मजली घर मृत्यूचा एक सापळाच होता . त्याच्यातून सुटने अशक्य होते .

सुरजवळ आता दोन मार्ग उरले होते ; मारो किंवा मरो !पण तो मारणार तरी कोणाला ?अजूनपर्यंत त्याने त्याचे तोंडही पाहिले नव्हते .

मार्ग नाही ,मी आता काय करू ?सुरज विचारात होता . तोच जिन्यावर काही पाऊले वाजली . लागलीच सुरज डायनिंग टेबलाखाली शिरला .

हलक्या पसरलेल्या अंधाराला चिरत दोन कातडी बुट घातलेले पाय हॉलमध्ये अवतरले . त्या बुटांवर लालभडक रक्त जे वाळून काळे पडले होते, ते चिकटले होते .सुरज फक्त पाय पाहू शकत होता . त्याचे शरीर तोंड त्याला टेबलाखालून दिसत नव्हते.

खण्.... अगदी डायनिंग टेबलासमोर सुरजच्या तोंडाशी त्याने कुऱ्हाड खाली आपटली . सुरजचे काळीज लटकन् उडाले आणि त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडणार , तोच त्याने तोंडावर आपले दोन्ही हात घट्ट दाबले .त्याचा श्वास आतल्या आत अडकून पडला होता.त्याचे अंग थरथरत होते व डोळे विस्फारून तो त्या व्यक्तीकडे पाहत होता .लागलीच ती भलीमोठी कुऱ्हाड उचलत . ती व्यक्ती जिन्याच्या दिशेने निघून गेली . तिचा जिन्यावर चढतांनाचा  पावलांचा आवाज सुरजच्या कानी पडला .

"आपल्याला लपायला हवे , नाहीतरी हा आपलाही कोथळा बाहेर काढेल .", म्हणत सुरज तिथल्याच एका खोलीत शिरला. आतमध्ये रक्तालेल्या पावलांचे ठसे उमटून सुकून गेले होते . अंथरूणावरही रक्त माखलेले होते . खोलीत कुबट दर्प दरवळत होता . आजुबाजुला काही सामान पडलेले होते आणि एका खोक्यात पेपर्स , काही फोटो फ्रेम ठेवलेले होते . सुरज पुढे सरकला . त्याने  एक फोटो हातात घेऊन निहाळले . कोणातरी सुंदर स्त्री पुरूषाचा व त्यांच्या हातातील एका लहान मुलाच फोटो होता .त्याने समोरील न्युज पेपर उचलले ज्यांना रक्त माखलेले होते . काहीतरी खुन्याची माहिती होती .

" इथेच काहीतरी सापडेल आपल्याला?", असा विचार करत सुरजने आजूबाजूला पाहिले. खुप काही वस्तू होत्या तेथे. वेगवेगळी बाहूले , जुन्या वस्तू व काही चित्रमय गोष्टींची पुस्तके .सुरजने ते सर्व हातात घेतले . इंग्रजीत मोठ्या ठळक अक्षरात व रंगीत चित्रातील ती जॅक अँन्ड दी बीनस्टॉक , अस्या बऱ्याच जादूच्या गोष्टींची पुस्तके होती .ती सर्व चाळत असतांनाच सुरजचे लक्ष एका डायरीवर गेले .

" मी अक्षदा आणि ही माझी. सातवी डायरी ....आम्हाला एक मुलगा झाला आणि आम्ही त्याचे नाव निलेश ठेवले , कारण त्याचे डोळे निळेशार होते .

असेच वाचत वाचत सुरज पुढे सरकला...

एखाद्या मळकट कपड्यात आज दाराशेजारी मला एक मुलगा दिसला . त्याचे केस खुप वाढलेले , डोळे काळेभोर , थोडा काळा सावळा आणि काहीतरी मानसीक रुग्ण ...मी त्याचा सांभाळ केला आणि त्याचा उपाचर केला .पण तो बोलू शकत नाही .

आज आमच्यासाठी खुप आनंदाचा दिवस आहे निलेश आणि वसंतचा वाढदिवस आहे . इथे कोणीच नाही आणि मी आता लिहून जात आहे , परतायला वेळ लागेल . आम्ही आज दोन्ही मुलांसोबत खुप मस्ती करू...."

"हे काय पुढील पाने कोरी करकरीत कशी काय ? ", सुरज बावचळला व पटापट डायरीची पाने चाळू लागला . काहीतरी पुढे सापडेल ह्या आशेने .पण सर्व पाने कोरी होती आणि अचानक एक कात्रण गळून खाली पडले .सुरजने डायरी बाजूला ठेवली आणि कात्रण उचलले .व्यापारिच्या घरावर काळ ...ह्या हेडलाईनने एक बातमी होती . फोटोतील व्यक्तींचे चेहरे हुबेहूब खोक्यातील फोटो फ्रेम मधल्या व्यक्तींसारखे होते .सुरजने पुढे वाचले ....बहुचर्चित कापड व्यापारीच्या फार्म हाऊसवर रात्री दोनच्या सुमारास चोरांनी हल्ला कला . ह्यात व्यापारिच्या संपूर्ण कुटुंबाची निघृणपणे हत्या करण्यात आली .

संपूर्ण बातमी वाचून काढताच सुरजला धक्का बसला.त्या बातमित फक्त तिन नावे होती , निलेश , अक्षदा आणि विराट, त्यात वसंत नावाच्या मुलाचे नाव मिसिंग होते .

.........

तेवढ्यात पावलांचा आवाज बाहेर वाजला आणि दरवावर थाप पडली . सुरज जागचा गार झाला . त्याच्या हातातील कात्रण गळून पडले .तेवढ्यात दरवाजा धाडकन लोटला गेला . बेडखाली लपलेल्या सुरजला पुन्हा तिच पाऊले दिसली . तो हातातील कुऱ्हाड कर्कशपणे ओढत आत आला .

सुरजचा श्वास घस्यात अडकला व त्याचे काळीज जमिनीवर धडका मारू लागले. तोंडातून चुकूनही आवाज नको निघावा म्हणून त्याने तोंडावर हात आवळले .

अं.....हूं.... हूं.... हूं....एखाद्या लहान मुलाच्या रडण्यासारखा आवाज सुरजच्या कानांनी टिपला . सुरज थरथत किंचीत पलंगाखालून सरकला . त्याने वरती पाहिले . एक पाठमोरी आकृती . छातीशी काहीतरी कवटाळून लहान मुलासारखी रडत होती . ती आकृती धिप्पाड होती , अंगावर कातडी कोट होता . त्याचे काळेभोर केस हवेत तरंगत होते .पुढच्याच क्षणी तो मागे फिरला , तसे सुरजच्या काळजात धस्स झाले .त्याचे लालभडक डोळे सुरजच्या तोंडावर खिळले होते. तोंड कुजल्या प्रमाणे दिसत होते, जे खुप जाड लोखंडा  प्रमाणे टणक भासत होते . त्याचे शरीरही तसेच सोललेल्या कातडी सारखे होते आणि अंगावर बाधलेले एप्रन पुर्णपणे रक्ताने भिजून लालभडक झाले  होते .

आ.... ओरडत त्याने आपल्या हातातील मोठी कुऱ्हाड सुरजवर फिरवली .धाड... कुऱ्हाडीचे जाड पाते , गोधडी , पलंग भेदत आतमध्ये शिरले व त्याची किंचीत धार दुसऱ्या बाजूला निघाली .सुरजही किंचाळला आणि घाबरून अती वेगाने पलंगाखालून सरकत बाहेर पडला . पुढच्याच क्षणी त्या माणसाने कुऱ्हाडीसकट संपूर्ण पलंग उचलून मागे भिंतीकडे भिरकावून दिला .सुरज कसातरी खोलीतून बाहेर पडला व लागलीच हडबडीत त्याने समोरील खोलीचा दरवाजा उघडला आणि लगेच लावून घेत त्याने वेगात  पाऊले उचलली .खच... त्याचा पाय मुरगळला  आणि समोर अंधारात न दिसलेल्या पायऱ्यांवरून तो गडबडून खाली चेंडूसारखा घरंगळत आला . त्यांच्या अंगातील हाडांना , डोक्याला चांगले दणके बसत होते .

आई गं...‌ कण्हत सुरज जागचा लोळू लागला. त्याचा पांढरा टी शर्ट रक्ताने चांगला माखलेला होता .त्याने इन केलेला टी शर्ट उपसून काढला ... खळ...फोटो फ्रेम,ज्याची काच फुटून सुरजच्या पाठीला लागली होती . ती रक्ताने माखलेली फ्रेम खाली पडली .

कसातरी भिंतीचा आधार घेत सुरज उठला , वेदना कुठून ठणकत होत्या त्यांचे त्यालासुद्धा समजत नव्हते . त्याची नजर समोर गेली आणि त्याचे डोळे विस्फारले समोर तिच स्वप्नात पाहिलेली खोली होती . जिचे दार किंचीत उघडे होते आणि त्यातून सडका कुजका दाटून राहिलेला वारा हळूहळू बाहेर पडत होता .धडधडत्या छातीने सुरजने पुढे पाऊले उचलली .

धाड दरवाजा उघडला . त्याने आपले जळजळीत लाल डोळे समोर टाकले आणि आपल्या हातातील कुऱ्हाड सहज सावरत तो हवेत तरंगत हळूहळू पुढे सरकू लागला .

खोलीतील रक्त पुर्ण सुकून फरर्चीवर वाळून गेले होते. कोपरे  रक्त साठून काळेकुळकुळीत पडलेले होते आणि समोरील भिंत रक्ताने रंग दिल्याप्रमाणे लालभडक दिसत होती .दुखरा पाय हळूहळू उचलत सुरजने संथ वेगात  पाऊले पुढे टाकली . ती भिंत तिथेच संपली आणि सुरज पुढे वळला .

लोखंडी काटे हलकासा कर्कश आवाज करत हलतांना दिसले . खाली अद्यापही न सुकलेले रक्त होते आणि बेसीनमध्ये ठेवलेल्या कुजक्या मुडींवर माश्या भिनभिनत होत्या ." खी....ही...ही...", कसलासा विचीत्र हसण्याचा आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने म्हणजेच छताच्या दिशेने दचकून सुरजने पाहिले .धाप..‌ तो पुढच्याच क्षणी कोलमडून जमिनीवर आपटला . त्याची छाती धाड धाड उडू लागली . त्याच्या छातीत जळजळीत गरम अग्नी निर्माण होऊन वाफ तोंडातून बाहेर पडू लागली .थरथरत तो कसातरी मागे सरकू पाहत होता .

" खी...खी...खी....ही...", पुन्हा हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याने मागे छताच्या दिशेने डोके फिरवले एक संपूर्ण फाटलेले रक्ताने भिजलेले कुरूप चेहऱ्याचे आणि पांढरे फटफटीत दुधाळ डोळ्याचे प्रेत भिंतीवर सरकत त्याच्याकडे पाहून हसले .तिथे हे एकच नव्हते , जवळजवळ संपूर्ण छतच त्या प्रेतांनी भरून गेलेले होते .त्यांच्या पोटातील आतडी , यकृत खालपर्यंत लटकत होते , पण पडत नव्हते . रक्त गरम तेला प्रमाणे उकळत होते , पण वाहत नव्हते .ते एक एक चेहरे बीभत्स ,असाह्य , टवाळणीच्या नजरेने सुरजकडे टकामका पाहत होते .

धाड.... छताला लटकून राहिलेल्या एका स्त्री प्रेताने दानकन सुरजच्या अगदी जवळ उडी मारली .धक...धक....धाड...धप.... काळीच छातीला चांगला दणका देत फडफडत होते , सुरज घामाने तर चिंब न्हाऊन निघाला होता , पण त्याचे शरीर थरथरत गरम पडलेले होते . त्याच्या कानातून गरम वाफा उफाळून बाहेर पडत होत्या .सुरज थरथरत्या होठांची चुळबुळ करत हळूहळू मागे सरकू लागला आणि ते प्रेत आपली तीव्र नजर त्याच्यावर रोखून कोळ्या प्रमाणे हळूहळू पुढे सरकू लागले. त्याच्या फाटलेल्या पोटातील आतडी यकृत जमिनीवर लोंबकळून पडली होती व तिच्या बरोबरच सरकत पुढे हलत होती .

" निघून जा इथून .... निघून जा... तुला कितीतरी वेळा सुचना दिली होती , पण.... तुलाही आमच्या सारखेच मरायचे होते... खी...खी...खी...", किन्नरी आवाजात , घोगऱ्या गळ्याने ते बोलून हसू लागले .

" तो ... तो... कोण आहे.... मला का मारणार?", कापऱ्या आवाजात सुरजने कोरड्या पडलेल्या घसातून शब्द बाहेर फेकले.

" ...खी....खी...ही....", ती परत कंपित आवाजात हसली ."  तो एक सिरीयल किलर आहे.... मनोरुग्ण.... वेड्यांच्या इस्पितळातून पळालेला .... पोलिसांनी त्याला गोळ्या झाडल्या होत्या आणि जंगलात जाऊन तो अज्ञात ठिकाणी मरून पडला , पण तो जिवंत होता त्यापेक्षा मेल्यानंतर त्याचा आत्मा अधिकच उग्र झाला...खी...खी..खी.... ", घोगऱ्या, राक्षसी , कंपित आवाजात ती म्हणाली .

" तू... तू.... तुला हे सर्व कसे काय ठाऊक ? तू ह्या सिरीयल किलरला कसे काय ओळखतेस ?", हांतावर जोर देत मागे मागे सरकत कंपित आवाजात सुरजने तिला विचारले .

" ही...ही...ही... मी एक जर्नलिस्ट होते .... चुकून इथे आले .... तू ही तसाच मरायला आलास .... तो वसंतचा आत्मा आहे . सुडाने पेटलेला ...ही...ही... मरणार तू.... मरणार....ही..ही....ही...", तिचा किन्नरी , घोगरा कंपित आवाज घुसला .

तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला गेल्याचा आवाज आला आणि सुरजने दचकून तिकडे पाहिले आणि परत आपली नजर समोर फेकली , तर ते प्रेत गायब होते.गडबडून त्याने आपले डोके छतावर फिरवले , पण ते  काळे छत एकदम मोकळे होते.

मृत्यूची पाऊले वाजत होती आणि पुढच्याच क्षणी लक्ताळलेली कुऱ्हाड भिंती आडून पुढे सरकली .त्याने आपली जाड पाऊले झपाझप समोर टाकली .

थरथरत भिंतीला लटपटत पकडून घामाने डबडबलेल्या चेहऱ्याने सुरज त्याच्याकडे पाहत होता .

तो हळूहळू सुरजच्या दिशेने सरकू लागला . त्याचे डोळे आग ओकत होते व कुजलेल्या अंगातून धुर बाहेर पडत होता . सडलेल्या भयानक चेहऱ्यावर क्रुर भाव गडदपणे उमटत होते .

" मला जाऊ द्या कृपया मला मारू नका...", सुरज भरलेल्या स्वरात म्हणाला .

आ.... किंकाळत तो यमराज रुपी आसुरी , भयानक पिशाच्च सुरजवर धावला .सुरज जागचा कोलमडून पडला . अती प्रमाणात धडधडत्या काळजाने त्याची किंकाळीही आतल्या आत दाबली .त्याच्या कानावर हवेत सपकन् फिरणाऱ्या कुऱ्हाडीचा आवाज आला आणि....

सुरजची छाती वाजत होती . मृत्यूच्या भितीने त्याचे डोळे बंद झाले होते व त्यांच्यातून पाणी गळत होते , त्याला दम लागल्या प्रमाणे तो जोरजोरात श्वासोच्छ्वास करत होता . त्याचे गरम पडलेले शरीर थरथरत होते आणि कानातून हवा व नाकातून पाणी बाहेर पडत होते .

काहीतरी थांबले आहे , सर्वच स्तब्ध झाले आहे . ती कुऱ्हाड अद्याप मला नरकयातना देण्यासाठी मजवर पडलेली नाहीये , तिने माझे मांस हाडे भेदून माझे रक्त हवेत उडवलेले नाहीये .

सुरजने निलेश , अक्षदा व विराटचा फोटो समोर धरला होता आणि त्यात एका बाजूला वसंतही खाली मान घालून नजर उचलून कॅमेऱ्याकडे पाहतांना दिसत होता .तो एक फॅमिली फोटो होता.

तो फोटो पाहताच त्याच्या हातातील कुऱ्हाड खाणकन् निखळून खाली पडली .

हळूहळू त्या पिशाच्चच्या डोळ्यातील अग्नी अश्रूंबरोबर गळून पडला . त्याचे डोळे हळूहळू मानवी होऊ लागले . ज्यांच्यात क्रोध , सुड , कोप नसून फक्त अश्रू आणि भावना होत्या .त्याने तो सुरजच्या हातातील फोटो आपल्या हातात घेतला व छातीशी कवटाळून मोठ्याने ओरडून रडू लागला. त्याच्या डोळ्यासमोर ती रात्र आली....

तो भाबडा बिचारा , लपंडाव खेळतांना कपाटात लपून बसला होता व त्या लाकडी कपाटाला केलेल्या जाळीतून बाहेर पाहत होता . तोच त्यांनी दाणकन् अक्षदाला खाली आपटले . ती गयावया करत असतांनाच त्यांनी तिच्या छातीत कुऱ्हाड खुसली व रक्ताची चिळकांडी हवेत उडाली.धाबकन... विराटचे बिनमुंडीचे धड अक्षदाच्याच समोर आपटले . ते तुटलेले डोके घरंगळत कपाटाशेजारी आले . त्या डोक्यावरील डोळे उघडेच होते आणि ते एकटक जणू कपाटात लपलेल्या वसंतकडेच पाहत होते. त्याच्या तुटलेल्या मानेतून रक्त निघून फर्चीवर पसरले.

धब.... आणखी एका आवाजाने दचकून वसंतने तिकडे पाहिले , त्यांनी लहानग्या निलेशला खाली आपटले होते .तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचे सायरन वाजले आणि ते चोर की खुनी दचकले.वसंत थरथरत ते सर्व पाहत होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता पण डोळ्यातून पाणी गळाले आणि तो बेशुद्ध पडला .

" आई....", त्याच्या तोंडातून आर्त हाक बाहेर पडली , ज्यात दुःख ,वेदना , कळवळा सामावलेला होता .

" कृपया मला जाऊ द्या मारू नका , माझी आई माझे बाबा भाऊ बहिण गावात माझी वाट पाहत असतील ....", काकुळतीच्या स्वरात सुरज म्हणाला .

हळूहळू वसंतची ती आकृती हवेत विरू लागली व  त्याने छातीशी कवटाळलेला तो फोटो फडफडत सुरजच्या पायाशी येवून ठेपला .

...‌.....

टाळ्यांच्या कडकडाटात सुरज आपल्या जागेवरून उठून स्टेजकडे जाऊ लागला . त्याने बनवलेला व्हिडीओ दीगेम ऑफ डेथ टॉपला जाऊन पोहचला होता .एक बंद घर आणि त्यात अडकलेला एक मुलगा , जो एका भयानक सिरीयल किलरच्या आत्म्याच्या तावडीत सापडला आहे आणि तो कसा सुटेल....

" आपल्या सर्वांच्या आवडत्या सुरजसाठी परत एकदा टाळ्या....", बॉस जल्लोष करत ओरडला .सुरज किंचीत स्माईल देत शांत उभा होता . त्याने वसंतचे पात्र हुबेहूब गेममध्ये टाकले होते व गेमला असे काही जबरदस्त बनवले होते की खेळणाऱ्याच्या तोंडून एकच शब्द निघे व्हा !" बोल सुरज तुला काय हवेय ते ? मी आज खुप खुश आहे.", बॉस म्हणाला ." मला काही दिवसांची सुट्टी हवीय... मला माझ्या गावी माझ्या आईवडीलांकडे माझ्या कुटूंबाकडे जायचे आहे .", सुरज म्हणाला." एक काम कर ना तू त्यांना ईथे पुण्यालाच तुझ्या घरी घेऊन ये !", बॉस म्हणाला ." पण माझे घर नाहीये ,मी हॉटेलमध्ये एका छोट्याशा खोलीत राहतो .", सुरज म्हणाला .

पण बॉस त्याच्याकडे पाहत  हसला .....

......

असो पुढे काय होईल इतके विचार करत बसू नका . लाईफ तर मेल्यानंतरही थांबत नाही ...बाकी कथा कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या अमुल्य रेटिंग्ज , प्रतिक्रिया द्यायला विसरू नका....

धन्यवाद 🙏 🙏 👍 👍 💐 💐 💐 💐 💐 💐