आज ऑफिस मध्ये एक महत्वाची मिटिंग होती.त्याकारता तिची सकाळ पासून घाई सुरु होती. अगोदरच सकाळी उठायला झालेल उशीर त्यात ऑफिस ला जायला झालेलं लेट.. सकाळी सकाळी वैतागली ती.
"आई.. Ssssss... आई.. Sssss नाष्टा रेडी केलंय मी त्याला करायला सांग तुही करून घे. मी निघतेय." ती पायात चप्पल घालत म्हणाली.
"अग तु तरी नाष्टा करून घे." आई तिच्या पाठी दरवाजा जवळ येत म्हणाली
"आई नको अगोदरच लेट झालंय. मी ऑफिस मध्ये करेन नाष्टा." ती म्हणाली आणि धावत निघाली.
" ही पोरगी ना... " आई घरात येत म्हणाल्या.
अर्ध्या तासाने ती तिच्या ऑफिस मध्ये पोहचली. लगेंच आपली बॅग आपल्या डेस्क वर ठेवली आणि आपली डायरी घेऊन बॉस च्या केबिन मध्ये आली.
" सॉरी बॉस लेट झाले... ती आत येत मान खाली करून म्हणाली. "
" ठीक आहे आज पहिल्यांदा लेट आहेस म्हणून सोडतोय. पुन्हा ही चूक नकोय. " तिचे बॉस म्हणाले.
" बॉस काय झाले तुम्ही टेन्शन मध्ये दिसत आहात. " तीने विचारले.
" काय सांगू बाळा तुला माहित आहे ना कपंनी लॉस मध्ये सुरु आहे ते. मी खूप ठिकाणी आपले प्रॉडक्ट्स चे संपेल्स पाठवलेत पण कुठून ही काहीच रिप्लाय आला नाही आहे. " तिचे बॉस डोक्यला हात लावून म्हणाले.
" सर तुम्ही नका काळजी करू आपण नक्की काही तरी करू... " ती आत्म विश्वास ने म्हणाली.
" तुझ्या डोळ्यातील हाच आत्मविश्वास बघून एक नवीन ऊर्जा मिलते बाळा.. "तिचे बॉस तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले आणि केबिन बाहेर निघून गेले.
ती आपली डायरी घेऊन परत आपल्या डेस्क जवळ आली.. आणि आपला लॅपटॉप सुरु करून त्यावर काम करू लागली.
पूर्ण दिवस तीने स्वतःला कामात झोकून दिल होत. जेवण ही विसरली होती ती.संध्याकाळी जेव्ह तिच्या बरोबर काम करणारी तिची क्लीग तिच्या जवळ आली तेव्हा कुठे जाऊन ती कामातून बाहेर आली.
" काय ग मीरा किती काम करशील आज जेवण ही नाही केलंस. " तिची क्लीग तिला ओरडत म्हणाली.
" सॉरी शामल.... मीरा तिला म्हणाली.
तर ही आहे आपली मीरा..... मीरा जोशी. एक सरळ साधी, समजूतदार, शांत मनमिळाऊ अशी गोड मुलगी. वय 24 वर्ष. कामाच्या बाबतीत एकनिष्ठ.
मीरा एक छोट्या श्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मध्ये सेल्स एजेंट च काम करत होती. सध्या कंपनी खूप लॉस मध्ये चालत होती. असंच जर चालत राहील तर दुसरी कडे जॉब शोधावा लागणार होता.
संध्याकाळी मीरा तिच्या वेळेत घरी आली. आल्या बरोबर अंघोळ करून तीने देव पूजा केली नंतर तीने किचन चा ताबा घेतला. आपल्या आई सोबत बोलत तीने सर्व जेवण बनवून घेतलं.
जेवण बनवून झालं तसं तीने तिच्या भावाचा अभ्यास घेयला सुरवात केली.20 वर्षाचा होता तो आता लास्ट इअर सुरु होत त्याच... तिघे बोलत होतेच तेव्हड्यात एक मुलगी जी मीरा एव्हडीच होती ती ती घरात आली.. धडपडत होती तिला नीट उभ ही राहायला जमत नव्हतं..दारू ची नशा जी चढली होती तिला..
मीरा च्या आईचे डोळे पाण्याने भरले. समोर आपल्या मुलीला असं बघून. मीरा ने समजून आपल्या बहिणी ला सांभाळून रूम मध्ये नेऊन झोपवलं.
मीरा ने तिच्या आईला आणि भावला जेवण वाढलं सर्वांनी मिळून जेवण केल नंतर तिघे ही झोपायला निघून गेले.
मीरा तिच्या आईच्या बाजूला झोपली होती. काय माहित का आज तिला झोप येत नव्हती. तीने खूप प्रयत्न केला पण झोप काय आलीच शेवटी तिला खूप लेट झोप लागली.
आज रविवार होता मीरा रोज प्रमाणे उठली आपली काम आवरली आणि हॉल मध्ये बसली. ती आणि तिचा भाऊ टीव्ही बघत होतें. मीरा च लक्ष टीव्ही बघण्यात नव्हतच.
खूप विचित्र अश्या फीलिंग्स तिला येत होत्या.तिचा भाऊ तिला बघत होता. तिच्या सोबत बोलत होता पण तिचा लक्ष नाही बघून त्याने तिच्या हाताला हात लावून हलवलं तेव्हा कुठे जाऊन ती भानावर आली.
" ताई कुठे लक्ष आहे तुझ... किती वेळ मी तुला आवाज देत आहे. " श्लोक ने विचारलं.
" कुठे नाही रें बाळा.. असंच... " तीने विषय बदलत सांगितले.
" ठीक मी काय म्हणतो ताई संध्याकाळी आपण मार्केट मध्ये जाऊयात का.. मला एक्साम साठी लागणारे साहित्य घायचे आहेत " श्लोक म्हणाला.
" ठीक आहे जाऊयात.. आता जा आत अभ्यास ला बस..." मीरा म्हणाली तसं तो निघून गेला.
पुढे........