reborn... in Marathi Spiritual Stories by devgan books and stories PDF | पुनर्जन्म....

The Author
Featured Books
Categories
Share

पुनर्जन्म....

एके रात्री निकदेम नावाचा एक यहुदी अधिकारी प्रभूकडे गेला त्यालाच प्रभूने हे वचन सांगितले की , पुनर्जन्म घेतल्यावाचून तुमचा स्वर्गाच्या राज्य पाहणारच नाही . म्हणजे एक प्रकारे तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही...
निकदेमने विचारले, " हे कसे शक्य आहे? कुणी म्हातारा व्यक्ती पुन्हा उदरात जाऊन कसा जन्म घेऊ शकतो."

दुसऱ्यांदा प्रभू म्हणाले," स्वर्गाचे राज्य हे लहान मुलांन सारखे आहे . जोपर्यंत तुम्ही बदलून लहान मुलांन सारखे होत नाही . तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही."
( तरी हे वचन त्याने निकदेमला नव्हे आपल्या शिष्यांना सांगितले होते. ज्याला कान आहेत तो ऐको.)

ह्याचा अर्थ कसा आहे ना?
लहान मुले ज्यांनी नुकताच जन्म घेतला आहे असे.‌ एकदम नविन, म्हणजे एकदम नविन....
खरेतर त्यांच्यात कपट लोभ नसतो. प्रत्येक गोष्ट ते विश्वासाने आणि आनंदाने स्विकार करतात.

तुम्ही जेव्हा ख्रिस्तात येता तेव्हा तुमचा जुना मनुष्य . ख्रिस्ताच्या क्रुशावर खिळवून मारला जातो आणि तुम्ही त्याच्या पुनरुत्थानाद्वारे नव्या मनुष्यात उठवले जाता.

जुना जो संसारीक होता . पापी होता कारण , त्याने तेव्हा पर्यंत पुष्कळ पाप केले होते. तो प्रत्येक प्रकारच्या वाइटाने व अनितीने भरलेला होता व खासकरून देवापासून दूर होता. तो देवाला न ओळखणारा मुक्या मुर्तींमागे चालणारा असा होता .
जोपर्यंत तो पुनर्जन्म घेत नाही तोपर्यंत खरोखरच हा असा होता.
ही पहिली व्यक्ती आहे जी असी होती. पापी आणि सर्व अनितीने भरलेली....

म्हणून प्रभू म्हणतो तुमचा पुनर्जन्म झाल्यावाचून तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही....
आता तुम्हीच सांगा ना विना तिकट तुम्ही सिनेमाघरात जाऊ शकता काय? किंवा बसने अथवा प्लेनने प्रवास करू शकता काय?
तसेच तुम्ही तुमच्या सर्व पापाने आणि वाईटाने स्वर्गात प्रवेश करूच शकत नाही . तुम्हाला तुमची जुनी व्यक्ती मारावी लागते आणि ख्रिस्तात पुनर्जन्म घ्यावा लागतो , म्हणजे तुमचे स्वर्गाचे टिकिट कंफर्म होईल.

आता पुनर्जन्म घेणे म्हणजे काय?
तर आपले सर्व वाईट मार्ग सोडून ख्रिस्तात एक नविन व्यक्ती म्हणून उदयास येणे . 
आपले सर्व प्रकारचे पाप , मुर्ती पुजा , लोभ इर्षा, वासना, जे जे वाईट ते सर्व सोडून टाकून ख्रिस्तात देवाला स्विकार्य फळ म्हणून सादर करणे होय.
ह्याच्याविषयी मी एक सांगू शकतो की , आपण ह्या मार्गावर आधी चालत असता फक्त मार्ग बदलून दुसऱ्या मार्गावर चालणे होय...

लक्षात ठेवा इथे दोन मार्ग आहेत एक रुंद, प्रशस्त आणि आरामदायी आहे. जो प्रत्येक प्रकारच्या वासणांनी व वाईटाने भरलेला आहे. ही त्याची एक बाजू झाली व काहिंसाठी तो‌ एक त्यांच्या मनाने व नजरेने योग्य वाटणारा मार्ग व त्यावर चालणारे पुष्कळ असे आहेत पण,  शेवटी हा मार्ग नाशाकडे जातो असे पवित्र शास्त्र सांगते.

दुसरा मार्ग हा अरूंद आणि कष्टाने भरलेला आहे. ह्या मार्गावर चालण्याने तुम्हास ख्रिस्ताच्या नावात दुःख सहन करण्याची पाळी येते. इथे जागो जागी काटे आहेत. तुमच्या शरीराच्या आणि आत्म्याच्या वासना दूर कराव्या लागतात म्हणून त्यागही आहे पण , जे वाईट आहे ते जवळ बाळगणे म्हणजे मुद्दामहून आपल्या हातात पेटते इंगळ , निखारे धरण्यासारखे आहे.
आता यहुदा इस्कार्योतचेच बघा ना तो चोरी करायचा. आपल्याजवळील डबीत जे काही हाती येईल ते टाकून घ्यायचा तर , त्याच्या ह्या एकाच पापाला लक्ष करून सैतानाने त्याचा वापर प्रभू येशूंना धरून देण्यासाठी केला.
एक पापही तुमच्यावर भारी संकट घेऊन येऊ शकतो म्हणून , आपल्या सर्व मार्गांविषयी सावध असा.

तर पुनर्जन्म घेणे म्हणजे ह्याच अरूंद मार्गाकडे वळने असे आहे.

हा ! तुमच्यातील कित्येक म्हणतील हा मार्ग तर खुप कष्टदायक आणि पिडांनी, वेदनेने, अपमानांनी भरलेला आहे .
नक्कीच म्हणून तो मला नकोय....
खरोखरच मी सांगतो इथे फक्त दोन मार्ग आहेत रुंद आणि अरूंद...
तुम्ही हा मार्ग नाकारला तर , साहजिकच तुम्ही दुसऱ्या मार्गावर आहात आणि तो मार्ग नाशाकडे , नरकाकडे आणि अनंत शिक्षेकडे जातो.
जर देवाने स्वतःच्या पुत्राला राखून ठेवले नाही आणि क्रुशावरती मरायला म्हणून सोपवून दिले ( तरी प्रभू तिसऱ्या दिवशी पुन्हा उठले.) तर तुम्ही आम्ही कोण आहोत ?
( खरे तर जो कोणी प्रभू येशू वरती विश्वास ठेवतो त्याला त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे . इथपर्यंत देवाने आपल्याला मोठे केलेले आहे.)
बघा थोड्यासा दुःख सहानंतर तुमच्यासाठी अनंत आनंद, अनंत जिवन ही आहेत.
पुनर्जन्म घेणे इतके सोपे नाही, खरे तर हे सोपे वाटते किंवा आहे तरी , देवाच्या आत्म्यावाचून आणि खऱ्या पच्छतापावाचून ही पायरी गाठणे अवघड आहे.

आणि मी तर हेच जाणिले आहे की , प्रभूत एकही पाय स्वतःहून टाकणे खुप अवघड आहे. त्याच्या वाचून काहिच शक्य नाही....
तरी निर्णय तुमच्यावर येऊन पडतो. निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. आधी एक पाऊल तरी उचला तर तुम्हाला पाण्याची खरी खोली आणि ते किती गार , गरम आहे ते समजेल.
मला जेव्हा प्रभूने जवळ आणले तेव्हा मी खुप कमजोर होतो , मनाने कमकुवत, विश्वासाने धडपडणारा तरी , त्याने आतापर्यंत मला पुष्कळ बदलून टाकले आहे. 
इथपर्यंत की , त्याच्या इच्छेने मी तुम्हास सुवार्ता सांगण्याचे धाडस करतो आणि हे कधिच माझ्याकडून नव्हते आणि नाही पण , हे देवाकडून आहे....

मी तुम्हाला कोणत्या तोंडाने सत्याकडे येण्याचे आव्हान करू, कोणत्या तोंडाने पुनर्जन्म घेण्याचे आव्हान करू ?
प्रभू येशू म्हणतो, "मार्ग, सत्य आणि जिवन मिच आहे म्हणून."
जिवनाचा मार्ग तो आहे. प्रभू पुढल्या शब्दात हेही म्हणतो," माझ्या वाचून कोणी पित्याकडे येवू शकत नाही."
पिता हाच तो देव . ज्याला प्रत्येक जिव शोधण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा प्रभूला जाणतही नव्हतो. तेव्हाच माझे मन ह्या एकमेव देवाविषयी विचार करायचे.
खरोखरच असा कोणीतरी आहे , ज्याला प्रत्येक व्यक्ती देव देव म्हणते पण , मग तो आहे तरी कोण?
आणि मग लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना उद्यास यायच्या.
प्रत्येक दगड , मुर्तीला ते देव संबोधायचे....
मला वाटले हेच देव असतील पण , हे पुष्कळ आहेत तर सर्वच किती असतील? उत्तर भेटले तेहेतीस कोटी...
बापरे! कोणाला ह्या सर्वांची नावे तरी ठाऊक असतील काय?
आणि मी माझ्या कष्टात दुःखात ह्यांच्यातील एक एकाकाकडे गेलो पण , एकही मदतीला पुढे आला नाही. खऱ्या मनाने आणि हृदयाने ही प्रयत्न केले , सर्व प्रकारे जे जे करता येईल ते प्रयत्न चालवले पण , खरे सांगतो सर्वच व्यर्थ गेले...
तरी आयुष्य चालत होते आणि एक जबरदस्त शक्ती मी त्याकाळी अनुभवली जी मला प्रत्येक संकटात मदत करते, मी काहितरी बोललो असता कोणीतरी असे आहे जे मला एकते असे वाटायचे.....
मी म्हटले कोण आहेस तू? माझ्या समोर ये ?
खरोखरच एखाद वेळेस असे माझ्या मनाला वाटले असावे आणि एका रात्री मी पिडलेला गरीब बिचारा समाजाने तुच्छ लेखलेला , नकारलेला आणि अतोनात दुःख सोसलेला.
मला दुसरा मार्गच नव्हता म्हणून मी अंधारात चर्चच्या पोर्चमध्ये लपलेला होता . आणि मी अक्षरशः रडत होतो आणि मी ती प्रार्थना केली ," प्रभू तू सर्व जाणतोस ....

मी खरे सांगतो की ,मी त्या देवाला गौरव दिला आणि माझे प्रत्येक दुखः वेदना मी त्याला ओळखत नसतांनाही रडत रडत सांगितल्या. 
मी काय प्रार्थना केली होती ते शब्द मला आजही आठवत नहीत ... जणू ते मी नव्हतो बोलत माझ्यासाठी माझ्या मुखातून शरीरातून कोणीतरी वेगळेच बोलत आहे असे वाटले आणि त्यानंतर माझे आयुष्य हळूहळू बदलले.
कधितरी मी माझी पुर्ण ग्वाही देईन कारण , सध्या मी अजून प्रभूत तयार होत आहे....
माझी दुःख भरी गोष्ट ही असी होती. वेदना, दुःख, कष्ट, कमजोरी होती पण , कोणाला सांगावे असे कोणीच नव्हते .
तुमचे तेहेतीस कोटी देव कुठे आहेत माझ्या विस वर्षाच्या आयुष्या पर्यंत .....
मी त्यांना खुश करण्यासाठी म्हणून काय कमी ठेवली होती?
अहा माझा आत्मा ते जिवन आठवून आताही वेदनेने कण्हतो पण , माझ्या खऱ्या देवाने निर्मात्याने मला आता जवळ केले आहे आणि मला आता कसलीच कमतरता नाही मी खुशाल गाऊ शकतो," प्रभू यहोवा चरवाहा है मेरा और मुझे कोई घटी नही है."
हे पृथ्वीवरील प्रत्येक आत्मा मी तुला विनंती करतो...
सत्य निवड , जिवनाचा मार्ग निवड, अहा जिवन निवड मृत्यू आणि विनाश व नर्क नको निवडू....

मी आज खरोखरच माझ्या आत्म्यात हे भावा बहिणींनो व्याकूळ, कासावीस आणि रडवल्या प्रमाणे तुमच्यासाठी झालेलो आहे.....
मी हे सर्व का करतो कारण तुम्हा सर्वां विषयी मला खूप प्रिती वाटते आणि सर्वजण वाचावेत म्हणून मी तसी प्रभू जवळ कितीतरी वेळा प्रार्थना करतो....

आज मी विषय भटकवला म्हणून थोडी माफी मागतो पण , मी कधिही असे देवाविषयी लेख लिहितांना मी संपूर्ण देवाकडे स्वतःला सोपवतो व तुच माझ्याने कर , लिही असे सांगतो....

भावा बहिणींनो पुन्हा एकदा सांगतो जिवन निवडा , तुमच्या देवाला निवडा उशीर होण्याआधी हे करा कारण , उद्या काय घेऊन येईल हे कोणासच ठाऊक नाही....

Praise to the lord 🙏 🙏 
Hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah 

All glory to the all mighty God 🙏 🙏