रीता खाली आली. आहील्या बाई डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होत्या. त्यांना बघून तिला थोड धडकीच भरली पण तिला ही भूक लागलेली. मग खाली तर यावाच लागणार होत ती खाली आली. अहिल्या बाईंनी एक कटाक्ष तिच्या कडे टाकला. तशी रीता थोडी घाबरली. पण मग लगेच त्यांचा फोन वाजला तास त्या फोन घेऊन बाहेर निघून गेल्या. रीता ला थोड हायस वाटलं. ती पटकन येऊन किचन मध्ये गेली.
रामू काका किचन मध्ये जेवणाची तयारी करत होते. तिला बघून त्यानी विचारलं बाई साहेब काही पाहिजे का तुम्हाला? मी देतो मला सांगा... रीता म्हणाली हो रामू काका भूक तर लागली आहे. सकाळी नाष्टा पण नाही करता आला. आता करायचं म्हंटल तर नंतर जेवायचा टाईम होईल. म्हणून फक्त चहा द्या... मग रामू काका नी तिला चहा दिला. आणि ते जेवणाच्या तयारीला लागले.
रीता चहा झाला. मग तिने रामू काका ना विचारल. काही करायचं असेल तर मला सांगा. मी देते करून तास रामू काका थोडे हसले आणि म्हणाले बाई साहेब अहो काय तुम्ही गरीबाची मज्जा घेता. तुम्हाला काम सांगितला तर साहेब मला च काढून टाकतील कामा वरून. तास रीता म्हणाली. नाही पण त्यानं समजेल तेव्हा ना? रामू काका त्यांना सांगणार कोण? ती एक डोळा मिचकावत म्हणाली.
रामू काका कांदा कापत होते. ती त्यांचा जवळ गेली आणि म्हणाली काका तुम्ही साईड ला व्हा आजा च स्वयंपाक मी करते. तिला बघून रामू काका म्हणाले. अहो बाई साहेब ते बघा १२:३० झालेत १:३० पर्यंत साहेबाना डब्बा नाही पोचला तर साहेब जाम भडक्तिल ओ.. तुम्ही जा बाहेर बसा मी करतो पटापट. पण रीता ऐकतच नव्हती. ती ने कांदा कापायला घेतला. रामू काका तिला बाकी मदत करत होते. १ तासात रीता च जेवण बनवून झालं. तास मग रामू काकांनी रमण च्या ड्रायव्हर सोबत टिफीन पाठवून दिला.
.
.
.
.
.
.
.
इकडे ड्रायव्हर डब्बा घेऊन ऑफिस मध्ये आला. रमण ची मीटिंग झाली तशी त्याने टिफीन घेतला. त्याने पाहिलं. नेहमीपेक्षा थोड वेगळं वाटत होतं. कारण एकतर जेवण गरम गरम गरम च होता. आणि त्याने ओपन करून पाहिलं. त्यात डाळ राईस सोबत च भाजी चपाती आणि चवीला. ला रायात सोबत च डेझर्ट म्हणून ही खायला खीर होती. रमण थोडा शॉक च झाला. तो विचार करत होता की आज अचानक रामू काकांनी कस काय एवढा अगदी पांच्पकवान च जेवण दिलं. पण मग जास्त विचार न करता. त्याने खायला सुरुवात केली. त्याला जेवण ची चव ही अगदी वेगळी वाटत होती. रामू काका रमण च्या आवडी नुसार च जेवणात मीठ मसाला टाकत त्याला जास्त तिखट आवडत नसे जेवणात म्हणून ते थोड फिक फीक जेवण करायचे. पण आज च जेवण तिखट नव्हत आणि फिकट ही... अगदी छान टेस्ट होती. पण पहिल्यांदा अस जेवण जेवल्याने त्याला थोड तिखटच लागत होत. पण नंतर रायत आणि खीर खाऊन त्याला आराम मिळाला.
मग जेवण झालं तास तो पुन्हा आपल्या ऑफिस च्या कामाला लागाल.
संध्याकाळी रमण घरी आला. फ्रेश वैगरे होऊन मग तो खाली डायनिंग टेबल जवळ आला. अहिल्या बाई ही खुर्ची वर बसलेल्या रामू काकांनी त्याला जेवण वाढले. आणि अहिल्या बाई ना ही वाढले. त्यानी पहिलं. जेवण नेहमी पेक्षा वेगळं. होत म्हणून त्या जोरात च ओरडल्या. की रामू काका हे काय जेवण कोणी बनवलं आहे आज. तुम्हाला माहितेय ना रमण ला जेवण कस लागतं ते ? त्याचा आवाज ऐकून रीता किचन मधुन बाहेर आली. रामू काका च चेहरा रडवेला झाला होता. रीता त्यांच्या तोंडाकडे बघून म्हणाली त... ते मी बनवलं आहे.. रामू काका नाहीच बोलत होते. पण तरी मीच ते... तिच्या बोलण्याने अहिल्या बाई अजूनच रागाने लाल झाल्या. त्यांनी तडक उठून तिच्या जवळ गेल्या... आणि म्हणल्या तुला कोणी सांगितलं नसतं उपद्व्याप करायला. आणि तू ला येऊन अजून एक दिवस नाही झाला आणि स्वतः ला मालकीण समजतेस का? हे बघ तू असशील रमण ची बायको पण माझ्या शी आणि घराशी तुझा काही एक संबंध नाही. रमण तुला मानत असेल तुझी बायको पण तू ह्या घरची मालकीण तर सोड पण सून होण्याच्या पण लायकीची नाही आहेस समजल. त्या मुळे जे आहे ना ते तसच ठेव त्यात तुला काहीही बदल करायचा काही एक अधिकार नाही..
.
.
.
.
.
त्यांचं बोलणं ऐकून तर रीता ला मेल्याहून मेल्यसारखे झालं होत. नकलत डोळे पाणावले होते. रमण सगळ बघत होता. तिने पहिलं तो शांत होता. तास तर तिला त्याच्या कडून अपेक्षा नव्हती. तो काही बोलेल अस. पण ते बघून तो उठला आणि ओरडला. मिसेस अहिल्या यू अल्सो डोन्ट हवं राइट्स तो स्पीकस लाईक दॅट विथ माय वाइफ... आणि माझ्या बायकोचा झालेला अपमान मी अजिबात सहन नाही करणार..... त्याच्या बोलण्याने रीता ही शॉक झाली. ती मनात विचार करत होती. अस काय आहे हा?...