Election duty in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | इलेक्शन ड्युटी

Featured Books
Categories
Share

इलेक्शन ड्युटी

इलेक्शन ड्युटी पुस्तकाविषयी इलेक्शन ड्युटी नावाची पुस्तक वाचकांसमोर ठेवतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दोन भगीनींची. त्या दोन भगीनींची देण आहे ही पुस्तक. तसं पाहिल्यास मी बऱ्याच निवडणुकीच्या ड्युट्या केल्या. तशी मी एकशे सतरा पुस्तके लिहिली. परंतु इलेक्शनवर आधारीत पुस्तक लिहिली नव्हती. यावेळेस महानगरपालिकेचं इलेक्शन होतं. त्यात आम्ही चार लोकं इलेक्शन ड्युटीवर लागलेलो होतो. त्यात माझा परीचय प्रेसायडींग साहेबांनी संबंधीत इलेक्शनला लागलेल्या भगीनींना दिला की सर पुस्तके लिहितात. कारण प्रेसायडींग साहेब मला ओळखत होते. तेव्हा त्या म्हणाल्या की सर, आपल्या या ड्युटीवर आधारीत आपण पुस्तक लिहावी. मग काय, मी ठरवलं की त्यावर आधारीत पुस्तक लिहायची. त्यानंतर मी काही काल्पनिक कथानकं गृहित धरुन पुस्तक लिहिण्यास प्रारंभ केला व आज माझी एक नवीन पुस्तक तयार झाली. ज्यात काही वास्तविक व काही काल्पनिक असा संगम आहे. त्या दोन भगीनी होत्या, माधवी व सुवर्णा. दोघ्याही वयानं लहान होत्या. परंतु मानानं मोठ्या होत्या. ज्यातून सुवर्णाला मी मॅडम संबोंधून त्यांना तसा आदर दिला व माधवीला मी बहिण समजून तू मी असं विशेषण वापरलं. ज्यातून लिहितांना दोघींबद्दल जिव्हाळा निर्माण केलाय. चालखोर साहेबांचीही बरीच मदत झालीय. चालखोर, माधवी व सुवर्णा. ही यातील पात्रांची नावे. खरं तर आमची मूळ नावे टाकावीत. असे त्या भगीनी म्हणाल्या होत्या मला. परंतु काही बाबी सत्य तर काही बाबी या काल्पनिक लिहाव्या लागतात पुस्तकात. ज्यातून एखाद्यावेळेस एखाद्या शब्दाचा विपर्यास होतो. मला ते टाळायचं होतं. म्हणूनच मी यात काल्पनिक नावे वापलीत. यावरुन पुस्तकातील महकता कमी होत नाही. या पुस्तकाचं विशेष म्हणजे यात चार लोकांचं चरीत्र आहे. माधवी व अर्जुनचे भयानक प्रसंग. माधवीचे आईवडील लहानपणीच मरण पावलेले तर अर्जुनला आईवडील असूनही त्याच्या जीवनात हालअपेष्टा झालेल्या. ज्यात थोडीशी काल्पनिकता शिरवली आहे, पुस्तकाला अधिक समर्पक बनविण्यासाठी. त्यातच चालखोर साहेब व सुवर्णा मॅडमबद्दलही थोडासा युक्तीवाद आहे. आता माधवीचे कोणते हाल झाले? चालखोरसाहेबांचे कोणते हाल झाले? अर्जुनचे काय हाल झाले? ते समजण्यासाठी आपल्याला ही पुस्तक वाचावीच लागेल. बाकी मसाला भरपूर आहे. तो मनोरंजन म्हणून घेतला आहे. विशेष म्हणजे आपण ही पुस्तक वाचावी व आवडल्यास मला आपला रास्त अभिप्राय कळवावा ही विनंती. आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०******************************************इलेक्शन ड्युटी (कादंबरी) अंकुश शिंगाडे*********************१******************** अर्जुन आज म्हातारा झाला होता. तो नोकरीतून निवृत्तही झाला होता. तसा बराच काळ ओसरला होता. माधवी, चालखोर साहेब व सुवर्णा कुठे होते ते काही अर्जुनला माहीत नव्हते. माधवी आज कुठं होती ते माहीत नव्हतं. परंतु त्या इलेक्शनच्या कुंभमेळ्यातील आठवणी त्याला आठवत होत्या. इलेक्शनचा कुंभमेळा जेव्हा भरला, तेव्हा अर्जुननं सुवर्णा मॅडमला ग्रुप बनवायला लावला होता. परंतु त्यांनी ग्रुप न बनविल्यानं स्वतः पुढाकार घेवून अर्जुननं व्हाट्सअपवर ग्रुप बनवला होता. ज्यात त्या दोघींनी फोटो टाकले. आज ड्युटीचा कालावधी संपला होता आणि सर्वजण घरी जायला लागले. तेव्हा चालखोर साहेब म्हणाले, "सर, ग्रुप काही दिवस असाच ठेवाल. आपल्या आठवणी शेअर करु काही दिवस." त्यानंतर बरेच दिवसपर्यंत अर्जुननं ग्रुप ठेवला. ज्यात बरेच दिवसपर्यंत सर्वच ग्रुपचे सदस्य हजर होते. परंतु कालांतरानं काही दिवसानंतर ग्रुपचा एकेक सदस्य बाहेर पडला व ग्रुप संपला. परंतु आठवणी. त्या काही संपल्या नाहीत. अर्जुनला आठवत होती माधवी व सुवर्णाची सुचना. त्यांनी अर्जुनला म्हटलं होतं, "सर, आपल्या इलेक्शनवर आपण एखादी पुस्तक लिहावी. ज्यात आमची नावं टाकावीत." तशा आजपर्यंत इलेक्शनच्या भरपूर ड्युट्या केल्या होत्या अर्जुननं. परंतु अशी सुचना कोणीच केली नव्हती त्यांना आजपर्यंत. अन् ही सुचना झाली होती. त्यानंतर अर्जुननं पुस्तक लेखनाचा विचार केला व त्यांना आश्वासन दिलं की तो इलेक्शन ड्युटीवर लेखन करणार. आपले अनुभव मांडणार पुस्तकातून. ज्यात त्यांच्याही नावाचा उल्लेख असेल. तो दिवस व तो काळ गेला होता. दिवसामागून दिवस गेले होते. इलेक्शन संपायलाही बरेच दिवस झाले होते. परंतु अर्जुननं इलेक्शन ड्युटीची पुस्तक लिहिली नव्हती. तसं कामाच्या गडबडीनं त्यालाही वेळ मिळाला नव्हता. ज्यातून तरुणपण संपलं होतं व आज नोकरीतून निवृत्त होवून म्हातारपण आलं होतं. अन् आज अचानक आठवला तो काळ. जो काळ अर्जुनच्या सारीपटावरुन एकेक क्षण उलगडत आपले अनुभव विश्व मांडत होता नव्हे तर कथन करीत होता. चालखोर साहेब........ नावाप्रमाणेच चाल ओळखून चालणारे. इलेक्शनच्या कुंभमेळ्यात मिळालेले एक अधिकारी. ते व्यक्तीमत्व शांत आणि संयमी. तसं पाहिल्यास अर्जूननं बरेचवेळेस प्रेसायडींग ऑफिसरचं काम केलं होतं. परंतु यावेळेस त्यानं ते नाकारलं होतं. तसं त्याला बरेचजण आपल्या ड्युटीची जागा बदलवून प्रेसायडींगची जागा मागा असं म्हणत होते. परंतु अर्जूननं ती जागा नाकारली होती. त्यातच त्याला जी ड्युटी आली. ती त्यानं करण्याचं मंजूर केलं होतं. अर्जूनला ती खंत होतीच. तशी अर्जूनला ती खंत शेवटपर्यंत सतावतच होती जेव्हापर्यंत चालखोर साहेबांशी संपर्क झाला नाही. चालखोर साहेब, अर्जूनचे मित्रच होते, मागील एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. त्यांचा त्या कार्यक्रमातील प्रभाव अर्जूननं पाहिला होताच. ते हुशार होते व ते असे व्यक्ती होते की ज्यांना दिवसभर जरी बोलायला लावलं तरी ते बोलू शकतील. ते निवडणूकीचं काम व त्या कामात गट पाडले होते चार चार लोकांचे. ज्यात चालखोर साहाबांचीही ड्युटी लागली होती. ते अर्जूनच्या गटात होते. परंतु अर्जूनला तेच चालखोर आहेत, हे माहीत नव्हतं. चेहरा ओळखीचा होता. त्यातच चालखोरांचं बोलणं. अर्जूनची चालखोरांशी जेव्हा भेट झाली. तेव्हा चालखोर जे बोलून गेले. ती विचार करण्यालायक बाब होती. तो संवाद होता. "कुठं नोकरीला आहात?" "जिल्हापरिषद." "कोणती पोष्ट मिळालीय?" "प्रेसायडींग. आम्हा सर्वच जिल्हापरिषदवाल्यांना प्रेसायडींग दिलंय." "हो काय? असं का केलं असेल त्यांनी?" "अहो, खाजगीतील लोकं तेवढे हुशार नसतातच. जिल्हापरिषदवाले जास्त हुशार असतात. म्हणूनच त्यांना प्रेसायडींग दिलं." ते चालखोरचं बोलणं. तसं चालखोरच अर्जूनच्या गटात आला. त्यानंतर आठवलं अर्जुनला त्यानं केलेला काही वेळापुर्वीचा चालखोर साहेबांशी संवाद. वाटलं चालखोर अतिशहाणे आहेत. आपल्यालाच मुर्ख समजतात. भाव देत नाही. तसं आपण जास्त बोलूच नये. परंतु थोडं अनुभवाबाबत बोलावं. अर्जूनचा तो विचार. तोच जेव्हा चालखोर गटात येवून बसले. तेव्हा अर्जूननं त्यांना विचारलं, "आपण यापुर्वी प्रेसायडींग होते काय?" "नाही." "काही अनुभव आहे काय?" "होय. बराच अनुभव आहे." "कशाप्रकारचा?" "मी यापुर्वी बऱ्याच वेळेस प्रेसायडींग नसलो तरी प्रेसायडींगची कामे केलेली आहेत." "परंतु हे जमेल का आपणास?" "होय. जमेल मला. ते काही कठीण नसतंच." "ठीक आहे." चालखोरशी त्याचं बोलणं. त्या बोलण्यावर अर्जूनला थोडा रागच आला चालखोरचा. त्याचं कारण होतं, आधीचा संवाद. आधी झालेला संवाद. तो अर्जुनचा आत्मसन्मान दुखावणारा होता. वाटत होतं की मी प्रेसायडींग. तो अहंकारच बोलत होता अर्जूनचा. अर्जूननं प्रेसायडींगचं काम केल्यानं थोड्या प्रमाणात अहंकार निर्माण झाला होता अर्जुनमध्ये. अर्जुनला वाटत होतं की आपणही प्रेसायडींग व्हावं. परंतु प्रेसायडींगचं काम अतिशय अडचणीचं होतं. उखळात मुंडकं कोण टाकणार असं अर्जूनला वाटत होतं. हं, चारशे रुपये अधिकचे मिळतात. परंतु त्यामागं किती काम असतात प्रेसायडींगला. शिवाय हे महानगरपालिकेचं इलेक्शन. स्थानिक स्तरावरील. यात तर वस्तीतील लोकं भांडायला येतात. नको ही जबाबदारी. आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, तीच घ्यायची. फुकटची आपली शेकवून घ्यायची नाही. अर्जून चूप बसला. तोच चालखोर म्हणाले, "आपल्याला काही अनुभव आहे का याचा?" "नाही. मी कधीच हे काम केलं नाही." अर्जुन थोडं खोटंच बोलला. तसं त्याला खोटं बोलणं आवडत नव्हतंच. परंतु चालखोरच्याही बुद्धीची आपण परिक्षा घ्यावी. असं त्याला वाटलं. तसं त्यानं शेवटपर्यंत सांगीतलंच नाही चालखोरांना. तसं सांगूच नये असं त्याला वाटलं. परंतु न राहवून त्यानं चालखोरांना अगदी शेवटच्या दिवशी म्हटलं, "सर, मी दोन वेळेस प्रेसायडींग होतो. परंतु आता मला ते काही आठवत नाही. मी पुर्णच विसरलोय." अर्जुननं आपलं गोड गुपीत चालखोरांसमोर उघड केलं आणि तो चूप बसला. *********************२******************* तो इलेक्शनचा कुंभमेळा व त्या कुंभमेळ्यातील अराजुनच्या गटात सहभागी झालेली माधवी. ती माधवी दिसली होती अर्जुनच्या वार्धक्यात. तो कार्यक्रम होता व तिनं त्यात सहभाग घेतला होता. ज्या कार्यक्रमात तो उपस्थित होता. ती तशी त्याला ओळखूही आली नव्हती. कारण आज तिला आखूड केसं नव्हते तर ते केसं लांब झाले होते. त्यातच ती इतरांपेक्षा अधिकच देखणी दिसत होती. आज तिच्याही चेहर्‍यावर सुरकृत्या पडल्या होत्या आणि आता ती तेवढी देखणी दिसत नव्हती. तसं पाहिल्यास सौंदर्य हे शाश्वत नसतं. हे तिच्या चेहर्‍यावरुन दिसून येत होतं. तिचं नाव माधवी होतं व त्याचं नाव अर्जुन. इलेक्शनच्या कुंभमेळ्यात त्या दोघांची भेट झाली होती. त्यातच त्यांचा एकमेकांशी परीचय झाला होता. जिव्हाळा वाटला होता. म्हणूनच ते चांगले मित्र बनले होते आणि ते मित्रत्वाचे संबंध ते दोघेही जण जोपासत होते. परंतु जसजसा काळ ओसरला. माधवीनं फोन उचलणं बंद केलं व निर्माण झालेले मित्रत्वाचे संबंध कायमस्वरुपी संपुष्टात आले. माधवीला ज्यावेळेस त्यानं पाहिलं होतं वा ती संपर्कात आली होती. त्यावेळेस ती तरुण होती व तिचे केसं कापलेले होते. त्यावेळेस त्यानं तिला केसं कमी ठेवण्याचं कारण विचारलं होतं. तेव्हा तिनं सांगीतलं होतं की ती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेली होती. तिथंच तिनं केसं कापले व डोक्याचं टक्कल केलं. तिचे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जावून केसं कापणे. हा अंधश्रद्धेचा प्रकार वाटत होता त्याला. कारण स्रियांनी डोक्याची टक्कल करणं हा प्रकार पुरातन काळात स्रियांना विद्रुप करण्याचा प्रकार होता. तोच प्रकार तिनं केला होता. परंतु हे केसं कापणं तिची श्रद्धा होती. ती अंधश्रद्धा नव्हती. कदाचित तिनं काही नवश वैगेरे बोलला असेल व तो नवश पुर्ण झाला असेल, म्हणून तिनं केसं कापले होते. त्यातच ज्यावेळेस ती तरुणपणात त्याला भेटली होती, त्यावेळेस ते थोडेसे वाढले होते. परंतु आता ती वयस्क झालेली असली तरी तिचे केस लांबसडक व दाट झाले होते. तो कार्यक्रम व अर्जुन प्रेक्षकांमध्ये बसला होता तर माधवी स्टेजवर. ती पाहुणी होती त्या कार्यक्रमाची. त्यातच एक विरंगुळाच म्हणून अर्जुन त्या कार्यक्रमाला गेला होता. अशातच भाषणं सुरु झाली. भाषणादरम्यान तिचा परीचय करुन दिला. माधवी सुरेश साने. माधवी सुरेश साने. नाव ऐकल्यासारखं वाटत होतं. तसा तो विचार करीत होता. कुठं ऐकलं असेल नाव बरं. तसं त्याला क्षणातच आठवला. आठवला तो इलेक्शनचा कुंभमेळा. ज्या कुंभमेळ्यात तिच्यासह चारही जण भेटले होते. पुसटशी ओळख पटली होती. परंतु पुर्ण ओळख झाली नव्हती. पुर्ण ओळख होण्यासाठी पुष्टी होणं गरजेचं होतं. तशी पुष्टी होण्यासाठी कार्यक्रम संपणं गरजेचं होतं. अशातच कार्यक्रम संपला व तिला भेटून तिला तीच आहे की नाही हे विचारण्यासाठी हिंमत करुन अर्जुन तिच्याजवळ गेला. तसं तिला तिची जुनी आठवण विचारायची हिंमत होतच नव्हती. परंतु हिंमतीनं व धैर्यानं त्यानं तिला विचारलंच. "मॅडम, एक्सुज मी. जरा आपणाशी थोडं काम आहे. एका महत्वपुर्ण मुद्द्यावर बोलायचं आहे. बोलता काय?" ते त्याचं बोलणं. तशी ती इतरांशी बोलत होती. बोलता बोलता तिनं अर्जुनकडे पाहिलं. पाहिलं की एक म्हातारा व्यक्ती तिच्याशी संवाद साधत आहे. तशी ती त्याचेकडे वळली व बोलती झाली. त्यातच तो म्हणाला, "आपण माधवी सुरेश साने ना की ज्या इलेक्शनच्या कुंभमेळ्यात मला भेटल्या होत्या." ते त्याचं बोलणं. ते तिनं ऐकलं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत ती विचार करु लागली. अन् आठवू लागली तो काळ. तसं तिला काही आठवत नव्हतं. तोच त्यानं त्याच्या प्रेसायडींगचं नाव काढलं आणि जसं नाव काढलं. तसं तिला आठवले ते पुर्वकाळातील अनुभव. जे इलेक्शनच्या कुंभमेळ्यात आले होते. माधवी...... इलेक्शनच्या महाकुंभमेळ्यात सापडलेली एक तरुण मुलगी. जी कर्मचारी बनून अर्जुनसोबत काम करीत होती. तिचीही परिस्थिती ही नाजूकच होती. तिचे आईवडील हे लहानपणीच मरण पावले होते. त्यातच ती नातेवाईकांकडे लहानाची मोठी झाली. ते नातेवाईक, जे तिला त्रास देत असत. परंतु जिद्द होती मनात की आपण काहीतरी करुन दाखवावं. त्यातच ती मोठी झाली व मोठी होत असतांना ती स्पर्धा परिक्षेचा फॉम भरु लागली. ज्यात ती पास झाली व आज ती एका महाविद्यालयात सरकारी नोकरीवर लागली होती. तो इलेक्शनचा कुंभमेळा व त्या कुंभमेळ्यात तिचा पहिल्यांदाच नंबर लागला होता. परंतु तिला जरी अनुभव नसला तरी प्रेसायडींग साहेब आणि अर्जुनच्या मदतीनं ती अनुभवसंपन्न बनली होती. माधवी ज्याप्रमाणे बनली. त्याचप्रमाणे तिनं आपल्या बहिणीलाही बनवलं होतं. माधवीचा विवाह हा तिच्या सरकारी नोकरीनंतर झाला होता. तिला आधाराला तिचे आईवडील नसल्यानं तिला ज्या मुलानं मागणी घातली. त्याला नाईलाजास्तव पसंत केलं होतं. अन् सुरुवातीलाच जरी तो मुलगा तिला आवडला नसला तरी ती खुश वाटत होती. तिनं त्याचेशी विवाह केला. जो सरकारी नोकरीवर नव्हता. त्याचा उद्योगधंदा होता. त्यातच तिला ज्या शहरात नोकरी होती. त्या शहरात तिच्या पतीचा उद्योग नव्हताच. अर्जुननं तिला विचारलं. विचारलं की तुम्हीच माधवी सुरेश साने आहात काय? तर तिनं त्यावर विचार करुन ती आठवण काढली. त्यानंतर तिचं मन गतकाळात गेलं. जो गतकाळ आनंदानं भरुन गेला होता. माधवी ये जा करायची आपल्या संसारासाठी. कारण तिचं माहेर जरी तिच्या नोकरीच्या गावात असलं तरी सासर नोकरीच्या गावाच्या पलिकडे होतं. तशी शनिवारला तिला सुट्टी राहायची. त्यातच तिची धावपळ व्हायची. परंतु ते सगळं सहन करीत माधवी आपले काम करीत होती. करीत राहिली व आज ती बरीच मोठी झाली होती. एवढी मोठी झाली होती की ती आज मोठमोठ्या कार्यक्रमाचे विचारपीठ गाजवत होती.************************३****************** माधवी....... माधवीचे आईवडील हे तिच्या लहानपणीच मरण पावले होते. आई आधी गेली होती. तेव्हा ती सहा वर्षाची होती व तिची लहान बहिण ही अडीच वर्षाची होती. वडील गेले, त्यावेळेस ती जेमतेम दहा वर्षाची होती व तिची लहान बहिण साडे सहा वर्षाची होती. तिची आई आजारानं मरण पावली होती. परंतु वडील? ते तिच्या आईच्याच चिंतेनं मरण पावले होते. माधवीची आई सुंदर होती. त्यातच माधवीच्या वडीलांचं तिच्या आईवर निरतिशय प्रेम होतं. माधवी व तिची लहान बहिण शितल. अशा दोन बहिणी. तिच्या वडिलांच्या जागेवर दुसरा कोणी जर असता तर त्यानं स्वतः एखाद्या स्रीशी विवाह केला असता. परंतु त्यांनी असं काही केलं नाही. परंतु ते चिंता करीत राहिले आपल्या पत्नीच्या जाण्याची. तसं पाहिल्यास त्यांना सतत त्यांची पत्नीच आठवायची. त्याच आठवणीत तेही आजारी पडले व एके दिवशी तेही निघून गेले या धरणीतून. आपल्या इवल्या इवल्या दोन लहान लहान पाखरांना घरट्यात ठेवून. ज्या पाखरांचे अद्याप डोळेही उघडले नव्हते. आई गेली. दूर निघून गेली. तेव्हा आई म्हणजे नेमकं काय होतं? हे तिलाही समजत नव्हतंच. अशातच वडील गेले. तेव्हाही वडील म्हणजे काय? हेही बरोबर कळत नव्हतं. बाळबोध मन होतं. लोकं रडत होते आणि त्या दोघ्याही बहिणींना लोकं का रडतात? याचं आश्चर्य वाटत होतं. मरण म्हणजे नेमकं काय असतं? याचीही कल्पना नव्हतीच. अगदी बाळबोध वयातच ते पोरके झाले होते. माधवीला आईही नव्हती आणि वडीलही नव्हते. आता त्या दोघ्याही बहिणी अगदी बाल्यावस्थेतच अनाथ झाल्या होत्या. त्यातच त्यांचा सांभाळ कोणी करायचा. विचार होता. तोच तिच्या मोठ्या आईनं प्रेम दाखवत त्या दोघींनाही आपल्या घरी नेलं. प्रेमानं वागवलं. त्यांचा सांभाळ केला. त्यातच माधवी व शितल लहानाच्या मोठ्या होवू लागल्या होत्या. माधवी लहानाची मोठी होत होती. कशीबशी शिकत होती. ती आता थोडी मोठी झाली होती. तिला आता आई व वडील कळायला लागले होते. त्यातच कळायला लागलं होतं की ते या जगात नाहीत. जर ते असते तर..... तर किती बरं झालं असतं. तसं आईचं प्रेम हे अफाटच असते. त्या प्रेमाला इतरांच्या प्रेमाची सर नसते. ते तिच्याही बाबतीत लागू होत होतं. माधवी व शितलला मोठी आई होती. ती त्यांचा सांभाळ करीत होती. त्यातच त्या लहानाच्या मोठ्याही होत होत्या. शिक्षणही शिकत होत्या. ती लहानाची मोठी करणारी तिची मोठी आई देखील तिच्यावर प्रेम करीत होती. परंतु जसजशी माधवी व शितल मोठ्या होवू लागल्या. तसं आईचं पोरकेपण त्यांना जाणवू लागलं होतं. जाणवू लागलं की कितीही मोठी आई त्यांच्यावर प्रेम करीत असेल. तरी आपण पोरकेच आहोत. त्यातच आपण एखाद्या वस्तूसाठी जसा वडिलांकडे हट्ट केला असता. त्यातच तो हट्ट क्षणातच पुर्ण झाला असता. तोही हट्ट आपण आपल्या मोठ्या आईकडे करु शकत नाही. ती मोठी आई. त्यातच तिला जाणवणारं पोरकेपण. आई असूनही आई न वाटणारी मोठी आई. त्यातच ती मोठी आई प्रेम करीत असूनही केवळ आईवडील नसल्याच्या खंतेपोटी आपल्या इच्छा माराव्या लागल्या माधवीला. अशातच ती शिकली होती व तिला नोकरी लागली होती. एक सरकारी नोकरी. जी जास्त करुन कोणाला लागत नाही. परंतु ती पाहिजे त्या प्रमाणात खुश नव्हती. अशातच तिचं विवाहाचं वय झालं व लवकरच तिचा विवाह तिच्या मोठ्या आईनं करण्याचं ठरवलं. मग काय वर शोधणं सुरु झालं. माधवी वयात आली होती व तिला एक मुलगा पाहायला येणार होता. तसा कोणीतरी प्रश्न केला. माधवी तुझी अपेक्षा काय? अर्थात तुला पतीदेव कसा हवाय? नवरदेव...... माधवी विचार करु लागली. विचार होता, 'आपल्याला आईवडील नाहीत. मग पतीबद्दल काय अपेक्षा ठेवावी. जर आपल्याला आईवडील असते तर आपण आपल्या पतीबद्दलही भरपूर विचार केला असता. विचार केला असता की आपण चांगला पती मिळवला असता. नोकरी करणारा एखादा मुलगा पाहिला असता विवाहासाठी. परंतु आता काय करु? आता मी तशी अपेक्षाही करु शकत नाही आणि स्वतःसाठी चांगल्या पतीचीही अपेक्षा करु शकत नाही. आता जसा मिळेल मला पती. तसाही बरा. मी त्याला गोड मानून घेईल.' तो तिचा विचार. तोच तिनं त्यावर प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर दिलं. "मला पती जसाही मिळेल. तसा पती चालेल. माझी काही अपेक्षा नाही." तो तिचा विचार. तसे दोनचार दिवस गेले व दोनचार दिवसात एक मुलगा तिला पाहायला आला. मुलगा देखणा होता. तसे त्यानं तिला दोनचार प्रश्न विचारले. विचारलं की तिची अपेक्षा काय? त्याचाही तोच प्रश्न. तिची अपेक्षा काय? काय उत्तर देणार. तिला प्रश्न पडला. डोकं व डोळे खालीच होते. परंतु प्रश्न पुढे होता. उत्तर तर द्यावच लागणार होतं. तोच तिला तिची आई व वडील आठवले. आठवलं आपल्याला आईवडील नाहीत. मग मी अपेक्षा तरी कोणती करु. गर अपेक्षा बोलून दाखवली आणि आपला विवाह तुटला तर...... त्याचे बोल आपल्यालाच पडतील. शेवटी विचार करुन तिनं त्याचबरोबर उत्तर दिलं. "माझी काहीही अपेक्षा नाही." तिनं उत्तर दिलं. तोच त्याला तिच्या नातेवाईकानं तिच्या समक्ष विचारलं, "पाव्हणं, कोणतं काम करताय?" "धंदा आहे जी. होलसेल धंदा आहे." "मिळकत." "मिळकत नको विचारा. कधी जास्त तर कधी कमी. नरम गरम चालतच असते आमच्या जीवनात. अन् ते चालणारच." "पण नेमके किती पडतात महिन्याचे?" "पंचवीस तीसहजार रुपये पडतात." थोडा वेळ शुकशुकाट होता. तोच पाव्हण्यानं प्रश्न केला. "काय झालं?" "काही नाही. आम्ही सांगतो आठ दहा दिवसानं." "आम्हीही तसा विचार करुच." पाहुणे आले तसे निघून गेले होते. त्यानंतर मोठ्या आई वडीलांनं तिला विचारलं, "का गं, मुलगा पसंत आला की नाही? कमवता आहे. चांगला धंदा आहे म्हणतोय." माधवीनं ते ऐकलं. तशी ती अंतर्मनात विचार करु लागली. 'हा काय मुलगा आणि हे काय कमवणं. जर माझे आईवडील असते ना जीवंत तर मी याचा स्विकार तरी केला असता काय? नाही. मी अट टाकली असती की मला नोकरी करणाराच मुलगा पती म्हणून हवा. तशा आजच्या नोकरी करणाऱ्या मुली आपल्याच अटीवर अडून राहतात. म्हणतात की मला नोकरी करणाराच मुलगा पती म्हणून हवा आणि आईवडील असले की मिळतोच. कदाचीत मी नकारही दिला असता. परंतु कशी देवू? माझे मोठे आईवडील कदाचीत माझ्यावर रागवतील. म्हणतील की काय यांचं दुखणं. नाही, नाही. म्हणावं की आपण जसं कराल, तसं. आपल्याला जर मुलगा आवडला असेल तर मलाही तो प्रिय आहे.' माधवी विचार करु लागली. तोच तिच्या मोठ्या आईनं प्रश्न केला. विचारलं, "माधवी, तू बोलली नाहीस. का? तुला मुलगा आवडला नाही काय?" ती विचार करु लागली. तसा तिच्या अधिकच्या विचाराला प्राधान्य नाही. हे तिलाही माहीत होतं. त्यातच तिनं होकार दिला व म्हटलं, "आई, आपण माझ्यासाठी जो मुलगा निवडाल, तो मी पसंत करेल." ती बोलली. तसे तिच्यावर तिच्या मोठ्या आईवडीलांचे उपकारच होते व ती त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबली गेली होती. माधवीनं कोणतीही अपेक्षा न ठेवता विवाहासाठी होकार दिला. मृग महिना लागला होता व त्या महिन्यात माधवीचा विवाहसोहळा साजरा झाला. तसं पाहिल्यास तिची नोकरी ज्या जिल्ह्यात होती. त्या जिल्ह्यात तिचा विवाह झाला नव्हता. तो विवाह दुसऱ्याच जिल्ह्यातील एका तरुणाशी झाला होता. तो तरुण मेहनती होता व तो तिच्यावर प्रेम करीत होता. त्यातच जी खंत तिला तिचे आईवडील मरण पावल्यानंतर बोचत होती. ती खंत तिची दूर झाली होती. परंतु एक समस्या निर्माण झाली होती. तिचा पती जो व्यवसाय करायचा. तो व्यवसाय बंद करुन त्याला तिच्या ड्युटीच्या गावी येता येत नव्हते आणि तिनं जर जाणं येणं करतो म्हटलं तर तिला जाता येत नव्हतं. अशातच सात आठ वर्ष निघून गेले होते. कधी ती जायची तर कधी तो यायचा. परंतु तो जास्त वेळ थांबू शकत नव्हता. कारण त्याला व्यवसायीक फटका बसू शकत होता. शेवटी तिनंच स्वतःला जुळवून घेतलं व तीच आता तिकडे जाऊ लागली होती. माधवी खुश होती. त्यातच तिची आज इलेक्शन ड्युटी लागली होती. ज्या इलेक्शन ड्युटीतून तिला काही पैसे मेहताना पावती म्हणून मिळाले होते. तेव्हा नकळत तिच्या तोंडून शब्द फुटले. 'ही माझ्या मेहनतीची पहिली कमाई.' तेव्हा ती अर्जुनच्या अगदी जवळच उभी होती. त्यातच त्याला प्रश्न पडला. प्रश्न होता तिच्या कमाईचा. कदाचीत तिला वेतन तर नसावं? म्हणूनच ती इलेक्शन मध्ये मिळालेल्या पैशाला पहिली कमाई म्हणत असावी. अर्जुनला असलेली शंका. तीच शंका मनात बरेच दिवस सलत होती. तीच शंका मनात असल्यानं जेव्हा त्याच्या निवृत्तीनंतर तिची भेट झाली अर्जुनसोबत. तेव्हा त्यानं तोच प्रश्न तिला आवर्जुन विचारला. तेव्हा तिनं उत्तर दिलं होतं की तिला तिच्या ड्युटीवरुन मिळणारं वेतन हे कितीतरी जास्त असलं तरी ते तिच्या हातात मिळत नाही. ते बँकेत गोळा होतं. हातात मिळत नाही. त्यामुळं ती कमाई हातात मिळणं म्हणजेच माझी पहिली कमाई नाही का? अर्जुनला तिचं मिळालेलं उत्तर. त्यावर त्याचं समाधान झालं होतं. आता ना शंका होती त्याच्या मनात, ना काही गोंधळ. बरीच वर्ष झाली होती. माधवीचीही मुलं मोठी झाली होती. परंतु आजही तिला तिची आई आणि तिचे वडील आठवत होते. आठवत होता तो अनाथपणा. ज्या अनाथपणाचं आयुष्य तिनं काढलं होतं. ते अनाथपण तिला आजही छळत होतं.*********************४******************** तो कुंभमेळा भरला होता. इलेक्शनचा कुंभमेळा. तसा कुंभमेळा नेहमीच भरायचा. ज्यात अनेक लोकांच्या ड्युट्या लागत होता. ज्यात कितीतरी रात्र जागत जागत निवडणुकीचा सण साजरा करीत असत. ज्यातून देशाच्या उज्जवल भवितव्यासाठी नेता निवडून येत असे. ज्यातून निवडून आलेला नेता हा देशाचा विकास करीत असे. मात्र त्याला निवडून देण्याची जबाबदारी ही सामान्य जनतेची जरी असली तरी त्याची एक प्रक्रिया असे. जिला निवडणूक प्रक्रिया म्हणत व या प्रक्रियेसाठी अनेक लोकांच्या ड्युट्या लागत असत. ज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा आवर्जून समावेश केल्या जायचा. अर्जुन...... अर्जुन एक शिक्षक होता. त्याची नित्यनेमानं दरवेळेस इलेक्शन ड्युटी लागत असे. त्यातच दोनवेळेस त्यानं प्रेसायडींगची ड्युटीही केली होती. यावेळेस मात्र त्याला मतदान अधिकारी म्हणून ड्युटी आली होती. दर्जा घसरला होता. परंतु इभ्रत कायम होती. सकाळ झाली होती. सुर्य आकाशात आला होता. पाखरं ओरडत होती. औसा अर्जुन सकाळीच उठला. कारण सकाळीच निघायचं होतं आठ वाजता. तसा अर्जुन सकाळीच उठला व त्यानं तयारी केली. त्यातच तो निघणार होता. अशातच माधवीचा फोन आला. "हॅलो, मी माधवी बोलतेय." "बोला." "माझा आदेश दिसत नाही. जरा आपल्याकडील आदेश माझ्या नंबरवर टाकता काय?" "होय. टाकतोय." अर्जुन म्हणाला. तसा फोन कट झाला. त्यातच फोन कट झाल्यावर अर्जुन विचार करु लागला. ही माधवी. हिला कशासाठी हवाय आर्डर. आदेश नसला तर काय होईल? काहीच होणार नाही. परंतु तिला सांगेल कोण? अशातच पुन्हा माधवीचा फोन आला व ती आदेश टाकण्याविषयी बोलली. तो आदेश व त्यातच अर्जुननं माधवीच्या वैयक्तिक क्रमांकावर आदेश न टाकता तो आदेश ग्रुपवर टाकला. तोच तिनं त्याला विचारलं, "किती वाजता निघणार?" "मी निघणार आठ वाजता. तुम्ही निघा." "होय." ती म्हणाली. त्यातच ती निघाली. तसा तोही निघाला. ती लवकर पोहोचली होती इलेक्शनच्या कुंभमेळ्यात. तिथं भरपूर गर्दी होती. त्यातच त्या कुंभमेळ्यात असलेली ती गर्दी. त्या गर्दीत हरवलेली ती माणसं. माधवी शोधत होती त्या माणसांना, जी माणसं तिला सोबत करणार होती. ती माणसं दिसत नसल्यानं तिनं पुन्हा अर्जुनला फोन केला. तसा तिचा पुन्हा फोन येताच आपली गाडी बंद करुन फोन तपासून पाहिला. त्यानंतर त्यानं सांगीतलं. 'मी रस्त्यातच आहे. पोहोचतोच आहे.' तो रस्ता. तो रस्ता गर्दीचाच होता. तसा त्या गर्दीत हरवलेला अर्जुन लवकरच केंद्रावर पोहोचला. त्यानं तिला फोन लावला. तसं तिनं ती उभी असल्याचं सांगीतलं व हेही सांगीतलंय की ती त्याची वाट पाहात आहे. तिकडे या. ते ऐकताच अर्जुन तिथंच पोहोचला. जिथं ती उभी होती. त्यानंतर ती म्हणाली, "बघा, सरांना काळजीच नाही. सर नाही आले अजुन. अन् फोनही लावला नाही." तिचा निर्देश चालखोर साहेबांबाबत होता. चालखोर साहेब अजून पोहोचायचे होते. तशी सुवर्णा मॅडमही पोहोचायची होती. थोड्याच वेळाचा अवकाश. थोड्याच वेळात चालखोर साहेब व सुवर्णा मॅडम तिथं पोहोचल्या. तसं सर्वांनी मतदान साहित्य घेतलं होतं व ते आपापलं साहित्य तपासत होते. तसं अर्जुननंही त्यांना म्हटलं, "सामान घेवू या काय." ते अर्जुनचं म्हणणं. परंतु चालखोर साहेब ऐकायला तयारच नव्हते. त्यांना वाटत होतं की साहित्य घेतल्यावर आपण गुंतलो. आपण त्यानंतर कुठंच फिरु शकत नाही. साहित्य घेवून कुठं कुठं फिरणार? अन् साहित्य घेतल्यावर ते तपासायला वेळच लागणार नाही. आपलं साहित्य भराभर तपासून होईल. अन् अगदी तसंच झालं. शेवटी इकडे तिकडे फिरुन झाल्यावर जेव्हा साहित्य घेतलं. तेव्हा ते साहित्य भराभर तपासून झालं होतं. ते मतदानाचं स्थळ. अलिकडील काळात फोटो काढण्याला किंमत आली होती. तसे भरपूर निवडणुकीतील कामाचे फोटो अर्जुन व त्याच्या चमूनं काढले होते. ते व्हायरलही करणार होते. परंतु अर्जुननं आपल्या चमुला सावधानतेचा इशारा दिला. म्हटलं की त्यांनी फोटो काढावे. परंतु ते मिडीयावर टाकू नये. कारण आपण मिडियावर साध्यापणानं फोटो टाकतो. परंतु कधीकधी त्याचा बाऊ होतो व आपल्या जीवनात विघ्न निर्माण होतं. अर्जुनची फोटो काढण्याबाबतीतील सुचना. त्यातच फोटोच्या योग्य वापराबाबतीतील सुचना, सुवर्णा मॅडमच्या जिव्हारी लागली होती. त्यातच असं काहीच होवू शकणार नाही. असंही त्या म्हणाल्या होत्या. परंतु तद्नंतर सुवर्णा मॅडमनं अर्जुनच्या सुचनेवर अंमल केल्यासारखा वाटला व त्यांनी फोटोसेशनला मिडीयापासून दूर केलं. मतदान तसं चांगल्या रितीनं पार पडलं होतं. तसा दुसरा दिवस उजळला. आज अर्जुनची शाळा होती. आज अर्जुनची शाळा होती. अर्जुन शाळेत गेला होता. तसा काही वेळ गेला. विद्यार्थ्यांनाही माहीत होते की सर निवडणूक ड्युटीलाच गेले. तसं विद्यार्थ्यांनी विचारलं, "सर, आपण काही फोटो काढले असेल ना निवडणुकीचे." ते विद्यार्थ्यांचे प्रश्न. त्यावर उत्तर देत अर्जुननं होकार दिला. तसं विद्यार्थ्यांनी फोटो पाहण्याचा आग्रह केला व अर्जुननं मतदानाच्या कुंभमेळ्यातील फोटो दाखवले. अर्जुननं दाखविलेले फोटो एकेक करीत विद्यार्थी पाहात होते. तोच एक फोटो विद्यार्थ्यांनी पाहिला. ज्यात अर्जुनच्या बुथवरच्या चारही शिक्षकांचे फोटो दिसले. ज्यात अर्जुनच्याच सोबत ड्युटीवर लागलेल्या माधवीचाही फोटो होता. तो पहिल्याच क्रमांकावर फोटो होता. तसा तो फोटो पाहताच विद्यार्थी म्हणाले, "सर, ही कोण?" "ही माझ्या ड्युटीवर सोबत असलेली व लागलेली अधिकारी. परंतु हे का बरं विचारलं?" तो अर्जुनचा प्रश्न. त्यावर उत्तर सांगत एक विद्यार्थीनी म्हणाली, "सर, ही तुमच्याच चेहर्‍यावर मिळतीजुळती दिसतेय. म्हणूनच विचारलं." "मग ओळखा ती कोण असेल. अन् सांगा चेहर्‍यावर मिळतंजुळतं कोण असतं?" "बहिण भाऊ." विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं. "मग ही कोण असेल बरं?" "तुमची बहिण आहे का सर ही?" "होय, बहिणच. लहान बहिण." "हो काय?" "होय." अर्जुननं आपल्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. तसे काही वेळानं विद्यार्थी निघून गेले आणि अर्जुन विचार करीत राहिला. विचार होता बहिणीचा. कारण त्यानंही फोटो पाहिला होता. ज्यात अर्जुनला बराच फरक दिसून येत होता. माधवीचा चेहरा त्याच्या चेहऱ्यात मिळत नव्हता. परंतु तो चेहरा विद्यार्थ्यांनी मिळवला व विद्यार्थ्यांनीच माधवीचं आणि अर्जुनचं नातं अर्जुनच्या मनात बहिणभावाचं निर्माण केलं होतं. माधवी........ माधवी सालस होती. तिला जास्त अनुभव नव्हता. ती तरुण होती. तिही इलेक्शनच्या कुंभमेळ्यात गवसली होती अर्जुनला. परंतु केव्हा भेटली? कोणत्या स्थळी भेटली? हे दोन्ही प्रश्न त्याच्यासमोर उभे होते. माधवी मिळाली होती इलेक्शनच्या कुंभमेळ्यात. ज्या दिवशी इलेक्शनचं दुसरं प्रशिक्षण होतं. ते प्रशस्त सभागृह व त्या सभागृहात एका खुर्चीवर बसलेली माधवी. अचानक अर्जुन जाता जाता त्याला त्याच्या बुथचा क्रमांक एका खुर्चीवर चिकटविलेला दिसला व तिथेच त्याच क्रमांकाच्या दुसऱ्याच खुर्चीवर माधवी बसलेली दिसली. तिनं केसाला लांबलचक रुमाल बांधला होता. त्या रुमालाच्या आत तिचा चेहरा लपून दुसऱ्याचं निरीक्षण करीत होता. येणारे जाणारे न्याहाळत होता तो चेहरा. परंतु स्वतःची ओळख देत नव्हता तोच चेहरा. तसं अर्जुननं त्या न दिसणाऱ्या चेहऱ्यात लपलेल्या त्या महिलेला विचारलं. "आपला अमूक अमूक क्रमांक आहे काय?" "होय." तो चेहरा नकाबातच म्हणाला. "मी अर्जुन. माझाही क्रमांक हाच आहे." ".............." अर्जुननं आपली ओळख दिली. परंतु त्यावर माधवी काहीच बोलली नाही. अर्जुन थोडावेळ चूप होता. तसा अर्जुन खुर्चीवर बसला. तसं त्याला चूप राहणं जास्त वेळ जमलं नाही. त्यातच तो तिला म्हणाला, "आपण कोण अर्थात काय नाव आपलं?" "मी माधवी तुमच्याच गटातली. परंतु मी इथे ड्युटी करणार नाही." "का बरं?" "मला दुसऱ्या झोनमधूनही आर्डर आहे. मी तिथेच ड्युटी करणार आहे." "हो का." "होय." "ठीक आहे. जशी तुमची इच्छा." अर्जुन म्हणाला. माधवी बोलून गेली. तिनं जशी इच्छा व्यक्त केली. तशी ती वागली नाही व तिही अर्जुनच्याच बुथवर ड्युटी करायला आली होती इलेक्शनच्या कुंभमेळ्यात. ज्यातून तिची कायमस्वरुपी ओळख अर्जुनच्या मनात निर्माण होवू शकली होती.**********************५******************** तो इलेक्शनचा कुंभमेळा व त्या कुंभमेळ्यात सुवर्णा नावाची असलेली ती एक महिला. त्यांचं सुवर्णा नाव होतं. त्याही जिल्हापरिषद शाळेतीलच होत्या. त्यांनाही इलेक्शनचा अनुभव होताच. त्या हुशार होत्या व सुंदरही. परंतु त्यांनीही प्रेसायडींगचं काम केलं नव्हतं. याही गटात त्या प्रेसायडींग नव्हत्याच. परंतु अर्जुनच्या पुढील क्रमांकाच्या अधिकारी होत्या. तशी अर्जुनला स्त्रियांमधील सुंदरता तेवढ्या प्रमाणात आवडत नव्हतीच. त्यातच चेहरा मेकअप करणंही आवडत नव्हतंच. नव्या फॅशनेबल काळात जगत नव्हताच अर्जुन. अर्जुनला स्रिया या साध्या अवतारात आवडत होत्या. त्यातच मेकअप लावलेल्या स्रीसोबत काम करणंही आवडत नव्हतंच. अर्जुन हा शिक्षक होता. परंतु तो शिक्षकासारखा वागत नव्हता. त्याचं राहाणं साधं होतं. साधे विचार होते. तसे गुण भरपूर होते. परंतु ते दाखवावे असं त्याला वाटत नव्हतं. तो साधाच राहायचा व त्याच्या एकंदर पोशाखावरुन तो शिक्षक वाटायचा नाही. तो एक साधा चपराशी वाटायचा. त्यातच कोणी त्याला चपराशी जरी म्हटलं तरी राग येत नव्हता त्याला. त्याला फक्त राग यायचा, त्याच्या आत्मसन्मानाचा. तोही थोडासा. तो राग त्याचा निवळून जायचा. सुवर्णा मॅडम जेव्हा इलेक्शनच्या कुंभमेळ्यात अर्जुनला सापडल्या. तेव्हा त्यांचं सौंदर्य हे अमाप होतं. ते त्यांच्या अधराला लिपस्टिक लावणं. ते डोळ्यांच्या भुवयांना काळजीपूर्वक तलवारीसारखं करणं. चेहर्‍यावर क्रीम लावणं. पावडर चोपडणं. केससज्जा करणं. त्यातच चांगला पोशाख करणं. या सर्व गोष्टी सुवर्णानं केल्या होत्या. तशी माधवी करीत नव्हती. माधवीला साधं राहाणं आवडत होतं. त्याचं कारण होतं तिची परिस्थिती. माधवीनं विपरीत परिस्थिती काढली होती. म्हणूनच तिनं आपल्या वागण्यात बदल केला नव्हता. तिला आईवडील नसल्यानंच तिला विपरीत परिस्थिती काढावी लागली. तसं सुवर्णा मॅडम सोबत घडलं नाही. सुवर्णा मॅडमचे आईवडील त्यांना अगदी ड्युटीवर लागेपर्यंत जीवंत होते. अर्जूनला सुवर्णा मॅडम आवडत होत्या. परंतु त्यांचा मेकअप तेवढा आवडत नव्हता व न राहवून अर्जुननं त्यांना प्रश्न केला. "आपण असा मेकअप का करता?" अर्जुनचा तो प्रश्न. त्यावर त्यांना महाभयंकर अर्जुनचा रागच आला असेल. वाटलं असेल की किती विचित्र माणूस आहे हा. मला असाही प्रश्न विचारतोय. यांच्या का बापाचं जातं, मी चेहरा मेकअप करते ते. तरीही मनात राग न दाखवत त्यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, "सर, पॉझिटिव्ह थिंकिंग. चांगलं राहिल्यानं परिणाम होतो इतरांवर. त्यांनाही काम करण्यात उत्साह वाटतो. लोकं सौंदर्यवान स्रियांची कामं भराभर करतात. तसंच आपण शिक्षक आहोत. आपण जर चांगलो राहिलो, तर आपले विद्यार्थीही चांगले राहतात. तेही मेकअप लावून बघतात. तसेच त्यांचे आईवडील देखील सुंदर राहतात. शिवाय स्रियांना सौंदर्य प्रदान केलं आहे, विधात्यानं. ते याचसाठी की सृष्टीतील कामं लवकर लवकर व्हावीत." ते सुवर्णा मॅडमचं बोलणं. तेही बरोबरच होतं. कारण आजचा काळच तसा आला होता, सौंदर्याला जपणारा. एखादी सौंदर्यवान स्री मिळाली रे मिळाली की तिच्यासमोर रांगा लावणारा. त्यांचं कोणतंही काम करणारा. त्यातच त्यांनी जो पॉझिटिव्ह थिंकिंग हा शब्द वापरला होता. तो बरोबरच होता. कारण सुंदर दिसण्यानं लोकांत तोच बदल होत होता. जो सकारात्मक असायचा. तसं पाहिल्यास ज्या स्रिया सुंदर दिसत नसतात. लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. त्यातच त्यांची कामे कोणी करायलाही पाहात नाहीत. हेच सुवर्णा मॅडमनं दर्शवलं होतं आपल्या बोलण्यातून. सुवर्णा मॅडम सुंदर होत्या नावाप्रमाणेच. त्यातच त्यांचं व्यक्तिमत्त्व तेव्हा उसळून दिसलं, जेव्हा त्यांनी फलकावर आपले हस्ताक्षर काढले. ती अक्षरं मोत्यासारखीच होती. ते मोत्यांसारखे हस्ताक्षर त्या किती पोहचलेल्या सौंदर्यवती आहेत. हे सिद्ध करीत होते. त्यानंतर अर्जुननं थोडी त्यांची अधिक माहिती काढली. तेव्हा कळलं की त्या एका शाळेच्या मुख्याध्यापक आहेत. अन् हेही कळलं होतं की त्या जिल्हा गाजवतात. कारण त्यांना वक्तृत्वही उत्तम जमतं. तो इलेक्शनचा कुंभमेळा. त्यात कुणी प्रेसायडींग म्हणून लागलं होतं तर कुणी मतदान अधिकारी म्हणून. सर्वांचा एक विशिष्ट गट होता व सारेच त्या गटात मातब्बर होते. ती शाळा व त्या शाळेत आठ बुथ होते. आठही बुथावर बरेच धुरंधर होते. त्यातच सर्वात धुरंधर होते, पाचव्या बुथातील लोकं. ज्यात अर्जुनचा समावेश होता. अर्जुननं बरेच इलेक्शन केल्यानं त्याला प्रत्येक बुथातील अनुभव होता. त्यातच जसा तो शाळेत पोहोचला. तसं त्यानं पहिलं आपलं झोपायचं साधन शोधलं. रात्रीच्या वेळेस चांगली शांत झोप व्हायला हवी. नाहीतर उद्याची कामं आपल्याला करता येणार नाहीत. असं अर्जुनचं मत. तसा तो शाळेत पोहोचताच त्यानं सर्व वर्ग तपासले. तशा त्याला एका कमऱ्यात गाद्या ठेवलेल्या आढळून आल्या. मग काय, अर्जुनची चांदीच चांदी झाली. त्यानं लागलीच चार गाद्या घेतल्या. तेव्हा कुणीतरी टोकलं. एवढ्या गाद्या लागतात काय? त्यावर उत्तर देत अर्जून म्हणाला, "होय, चार जण आहेत." "महिला असतील ना." "होय, म्हणून काय झालं." "त्या घरी जातात रात्रीला आराम करायला." "नाही जाणार आहेत. त्यांची घरं दूर आहेत व त्या इथंच मुक्काम करणार आहेत." अर्जूनचं ते बोलणं. आता मुजोरसमोर कोण मुजोरी करणार? शेवटी टोकणारा व्यक्ती चूप बसला व अर्जुननं लागलीच चार गाद्यांवर आपला ताबा कायम केला. त्यातच त्यानं सहा सात बेडशिटा व चार ब्लँकेटही आणले. ज्याची इतरांना शरम येत होती. परंतु अर्जुनला त्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. कारण अर्जुनला झोप प्रिय वाटत होती व तो झोपेलाच जास्त प्राधान्य द्यायचा. अर्जूनच्या मतानुसार पुरेशी झोप जर झाली तर दिवस चांगला जातो. आजारपण, थकवाही कोणत्याच स्वरुपाचा जाणवत नाही. अन् ते बरोबरही होतंच. अर्जुननं जसा गाद्याचा मुद्दा सोडवला. तसा दुसरा मुद्दा होता, तो खुर्चीचा. सकाळी बसायला खुर्च्या हव्या होत्या व दिवसभर बारा तास बसणे होते. ज्यानं शरीर अकडून जाणार होतं. खुर्ची...... खुर्ची ही अतिशय महत्वाची गोष्ट. तसं पाहिल्यास खुर्चीसाठी देशातील राजकारण सुरु असतं आणि खुर्चीसाठीच देशातील निवडणूकही असते. अन् त्याच खुर्चीला योग्य तो उमेदवार निवडून देण्यासाठी इलेक्शन ड्युटी. इलेक्शनच्या कुंभमेळ्यात अर्जुनला मिळालेल्या ड्युटीनुसार जी शाळा मिळाली होती. त्या शाळेत आठ बुथ होते. त्यातच एका क्रमांकाचा बुथ अर्जुनला होता. त्यातच जेव्हा अर्जुन बुथवर पोहोचला. तेव्हा त्यानं गाद्यांचा प्रश्न सोडवला. परंतु खुर्चीचा प्रश्न. तो सोडवायचा होता. अर्जुन जेव्हा आपल्या कमऱ्यात पोहोचला. तेव्हा त्यानं पाहिलं की त्याच्या वर्गात अनेक खुर्च्या आहेत. त्यातच अर्जुननं आपल्याला बसायला खुर्ची मिळावी म्हणून आधीच बारा खुर्च्या काढून ठेवल्या होत्या. त्या एकात एक फसवल्या होत्या. त्याचा उद्देश होता, बारा तास आरामदायक काम होणं. बाकी खुर्च्या नेल्या होत्या सर्वांनी. बारा खुर्च्या मोजून ठेवल्या होत्या नव्हे तर त्या खुर्च्या अर्जुननं ठेवायला लावल्या होत्या. तो वर्ग व त्या खुर्च्या. सर्वजण त्या खुर्च्यांवरच लक्ष ठेवून होतं. त्यातच जो कोणी यायचा. तो खुर्च्याचाच विषय काढायचा. म्हणायचा की आम्हाला खुर्ची हवीय. परंतु त्यांची हिंमत होत नव्हती. शेवटी झोनल अधिकारी आले. तेव्हाही तोच विषय निघाला. तो विषय व त्या विषयावर बोलत असतांना शेजारचा व्यक्ती म्हणाला, "सर, आम्हाला फक्त बेंच आहेत बसायला. बारा तास बसायचं आहे. शिवाय मला कंबरेचा त्रास आहे. मी कसा बसणार बारा तास? आम्हाला खुर्ची हवीय आणि या खुर्च्या इथे आहेत. या खुर्च्या या लोकांनी दाबून ठेवलेल्या आहेत." ते शेजारच्या लोकांचं बोलणं. त्यावर झोनल अधिकारी म्हणाले, "हे खुर्च्या न देण्याची बाब तुम्हाला शोभत नाही. त्या खुर्च्या देवून द्या." ते झोनल अधिकाऱ्याचं बोलणं. त्यावर झोनल अधिकाऱ्यांनी त्याच शाळेतील एका शिपायाला पाठवलं व तो शिपाई खुर्च्या घेवून गेला. तसं पाहिल्यास ते खुर्ची प्रकरण इलेक्शनाची ड्युटी संपतपर्यंत गाजत राहिलं होतं. रात्र झाली होती. खुर्च्या नेल्या होताया शेजारच्या कमऱ्यात. खुर्ची प्रकरण मिटलं होतं. तसा अर्जुनला आठवली दुपारची वेळ. थोड्याच वेळापुर्वी म्हणजे दुपारी सुवर्णा मॅडम व माधवी अर्जुनला बोलून गेल्या होत्या की सर, काहीही झालं तरी खुर्ची द्यायचीच नाही. परंतु आता तर खुर्च्या गेल्या होत्या. काय उत्तर द्यायचं त्यांना. अर्जुनच्याही मनात प्रश्न होता. तोच अर्जुननं सुवर्णा मॅडमला फोन केला. "हॅलो, मी अर्जुन बोलतोय." "बोला सर." पलीकडून आवाज आला. "आपल्या खुर्च्या गेल्या." "अरे कशा गेल्या? तुम्ही काही म्हटलं नाही का?" "कसे म्हणणार. झोनल साहेबांनी नेल्या." "मग आपण कसे बसणार एवढा वेळ एकाच खुर्चीवर?" "पाहू आता. कसं बसायचं ते." अर्जुननं फोन कट केला व तो चूप बसला. सारं खुर्चीसाठीच राजकारण असतं, याचा विचार करीत. खुर्ची प्रकरण बंद झालं असलं तरी खुर्च्यांनी अर्जुन आणि त्याच्या चमूला अडचणीत आणलं होतं. खुर्ची प्रकरण फारच गाजलं. कारण खुर्चीनं राजकारण केलंच होतं. असं राजकारण की ज्यातून एक एक खुर्ची गेली असली तरी दोन दोन खुर्च्या सर्वांना मिळाल्या, एक अर्जुन सोडून. ज्या अर्जुननं इतरांसाठी खुर्च्यांचं राजकारण केलं होतं. त्यालाच शेवटी एकाच खुर्चीवर बसावे लागले होते. एकाच खुर्चीवर बसून समाधान मानावे लागले होते.**********************६******************* 'आपण मुर्ख आहात सर.' शेजारच्या प्रेसायडींगचं अर्जुनला म्हणणं. तसं म्हणताच अर्जुनला थोडंसं वाईट वाटलं होतं. तसं पाहिल्यास कोणालाही त्याचा राग येईलच. तसंच अर्जुनचं झालं. त्याला वाटलं की आपण त्या प्रतिक्रियेबद्दल त्याला उत्तर द्यावं. परंतु तरीही अर्जुन चूप बसला होता. त्याचं कारण होतं संयम. अर्जुन संयमी होता व असे कितीतरी प्रसंग अर्जुनवर आजपर्यंत आले होते. जे प्रसंग आणि त्यातील मानअपमान अर्जुननं आतापर्यंत सहन केले होतेच. प्रसंग होता खुर्ची प्रकरणाचा. अर्जुननं त्यांना खुर्च्या दिल्याच नव्हत्या शेवटपर्यंत. त्याचा राग शेजारच्या प्रेसायडींगच्या मनात धुमसत होता. त्याचाच आधार घेवून शेजारच्या प्रेसायडींगनं अर्जुनचा अपमान केला होता. आपण मुर्ख आहात. त्यावर अर्जुननं त्याचं कारण विचारलं. तेव्हा तो म्हणाला, "बघा, आपल्याला असं वाटलं नाही की शेजारची मंडळी बाकावर बसतील, त्यांची पाठ अकडेल. तसा विचार सोडून आपण खुर्च्या अगदी दाबून ठेवल्या होत्या आतापर्यंत." खुर्च्या दाबून ठेवणं वा बळकावणं. यात अर्जुनची चूक नव्हतीच. अर्जुननं परिस्थितीवश तसं केलं होतं. तीन तीन खुर्च्या दाबून ठेवण्यात अर्जुनला सारस्य वाटत नव्हतं. तरीही त्यानं ठेवल्या. त्याचं कारण होतं, लिहिण्यात येणार असलेली अडचण. ज्या डेक्सवर लिहायचं होतं. ते डेक्स फार उंच होते आणि खुर्चीवर बसून लिहिताच येत नव्हतं. म्हणूनच उंचवटा म्हणून अर्जुननं आधीच त्याचं निरीक्षण करुन खुर्च्या ठेवल्या होत्या. शिवाय अर्जुनच्या कमऱ्यात बसायला पुरेशी बाकही नव्हतीच. तोही बारा तास बसून थकणारच होता. शिवाय लिहिण्याचं जास्त काम अर्जुनकडेच होतं. तसंच विशेष म्हणजे खुर्ची कुणाला देवू नका असं सुवर्णा आणि माधवीचं आव्हान होतं. शेवटी भ्रमनिराश झाला व झोनल ऑफिसरच्या म्हणण्यानुसार लगतच्या कमऱ्यात खुर्च्या द्याव्याच लागल्या. तरीही समाधान न पावलेली लगतची चमू त्याला तसंच म्हणत राहिली, 'मुर्ख आहात सर.' खुर्ची प्रकरणाचा फटका अर्जुनला दुसऱ्याही दिवशी पडला. जेव्हा सकाळी उठून अर्जुन त्यांच्या कमऱ्यात गेला. तेव्हा त्यानं त्यांना काहीही म्हटलं नव्हतं. फक्त एक विचारलं होतं, सर, इथे अंघोळ करायला गरम पाण्याची व्यवस्था आहे काय? त्यावर ते म्हणाले होते की आमच्याकडे हिटर आहे. आम्ही आणलेला आहे. परंतु आम्ही तुम्हाला देणार नाही. कारण आपण काल आम्हाला खुर्च्या दिल्या नाहीत. त्यातच त्यावर उत्तर म्हणून अर्जुन म्हणाला, "मला नकोय तुमचं हिटर. मी तुम्हाला हिटर मागायला आलो नाही. मी फक्त एवढंच विचारायला आलोय की या केंद्रावर गरम पाण्याची व्यवस्था आहे काय म्हणून. अहो, आपण मला हिटर देतो म्हणालही. तरी मी घेणार नाही. मी थंडच पाण्यानं अंघोळ करणार. मला सवय आहे तशी." अर्जुनला तसं म्हटलेलं अजिबात आवडलं नाही व तो लागलीच लगेच तेथून बाहेर पडला. त्यानंतर त्यानं थंडच पाण्यानं अंघोळ केली होती. अंघोळ झाल्यानंतर पुन्हा अर्जुन त्याच प्रेसायडींगच्या कमऱ्यात गेला, त्यांना सुनवायला. तेव्हा अर्जुननं म्हटलं, "आपण नाही दिलं हिटर म्हणून माझी अंघोळ राहिली नाही. मी पहा अंघोळ केली. आपण नाही करणार का अंघोळ." "कशी करावी? बादलीच नाही इथे पाणी गरम करायला." "मग असेच राहाल काय?" "होय, पर्याय नाही." त्यांचं उत्तर. "हे बघा, मी गरम पाण्याविषयी यासाठी विचारलं होतं की मी मागे दोनवेळेस प्रेसायडींगचं काम केलं. दोन्हीवेळेस मला गरम पाण्याची व्यवस्था मिळाली केंद्रावर. ती व्यवस्था असते. परंतु कधीकधी आपल्याला माहीत नसतं. म्हणून मी विचारणा केली आपल्याला. परंतु आपलं उत्तर तेच. जे मी ऐकायला नको होतं. कदाचित खुर्चीचाच राग दिसतोय. तो राग अजूनही गेलेला दिसत नाही." "कसा जाणार. आपण केलंच तसं होतं आणि हं, आपण प्रेसायडींग का घेतलं नाही, त्यावर बोला." "अहो, उखळात मुंडकं कोण घालणार." "म्हणजे?" "अहो, प्रेसायडींग काम थोडं कठीणच असतं." "होय, परंतु सर, मागील वेळेस खाजदार, आमदारकीमध्ये व्हि व्हि पॅड होतं. त्यावेळेस भरपूर आणि कठीण काम होतं. ते काम आपण पार पाडलं. हे तर त्या कामासमोर काहीच कठीण नाही. मलाही आलं होतं मतदान अधिकारी म्हणून काम. मी नाकारलं. मी प्रेसायडींगचं काम मागून घेतलं. माहीत आहे सर, ही सहावी वेळ आहे माझी. मी यापुर्वी पाचवेळेस प्रेसायडींग काम केलेलं आहे. आता मला मतदान अधिकारी म्हणून काम करावंसंच वाटत नाही. अहो, काही काही लोकं असेही आहेत की ज्यांना प्रेसायडींगचं काम समजत नाही. तरीही प्रेसायडींग पद घेतात." "हो, मला माहीत आहे ते. परंतु कशाला उगाचच कटकट अंगाला लावून घ्यायची. अन् हो, मी प्रेसायडींग नसलो तरी मी आताही दोन जणांना फोनवरुन काम समजावून सांगत आहे. त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा करुन देत आहे." "सर, जर आपण असं कुणाला सांगून मदत करत असाल तर आम्हालाही सांगाल काही चुकेल तर....." ते लगतच्या प्रेसायडींगचं म्हणणं. ते मदत करण्याचे बोल. तसं ऐकताच अर्जुन सुखावला. अर्जुन तसा मदत करणारा व्यक्ती होताच. अगदी शत्रुलाही तो मदत करायचा. परंतु त्याच्या मदतीचा गैरफायदा काही लोकं घेत असत. ते अर्जुनचं त्याला सडेतोड बोलणं. प्रेसायडींग असल्याचा प्रभाव पडला होता लगतच्या प्रेसायडींगवर. त्यानं मदत मागितली नाही शेवटपर्यंत. परंतु अर्जुननं त्याला प्रेसायडींग असल्याचं सांगताच त्याचा विनम्र झालेला स्वभाव आता अर्जुनला आवडला होता. तसं प्रेसायडींग असल्याचं सांगताच त्यानं खुर्ची प्रकरण पुन्हा दिवसभर काढलं नाही व खुर्ची प्रकरण तिथंच कायमचं बंद झालं होतं. तरी शेवटी घरी जाता जाता खुर्ची प्रकरण रडवूनच गेलं होयं अर्जुनला. अगदी कांदा कापल्यागत, डोळ्याला धारा लागतात तसं. लगतचा व्यक्ती पाचवेळेस प्रेसायडींग होता व ही त्याची सहावी वेळ होती. परंतु ते त्याच्या कामावरुन दिसत नव्हतं आणि शेवटी हे जाणवलंच. जेव्हा सर्व रेकॉर्ड सबमीट करायची वेळ आली. सहा वेळ प्रेसायडींग पद सांभाळणं काही साधी गोष्ट नव्हती. ते काम तर अगदी तोंडपाठ असायला हवं होतं. त्यांना वेळ लागला होता. त्याचं कारण अर्जुननं त्यांना विचारताच ते खुर्चीलाच दोष देत होते. म्हणत होते की आपण खुर्ची आम्हाला दिली नाही. म्हणूनच वेळ लागलाय. ज्यात वेळेचा व खुर्चीचा काहीही संबंध नव्हता. अर्जुन सर्वच बुथवर फिरत होता आधीच्या दिवसापासून. आपल्या अनुभवानं कुणाला सहज समजावूनही सांगत होता. त्यातच त्यानं व चालखोर सरांच्या मदतीनं आपल्याही बुथवरची कामं पुर्ण केली होती. तसे चालखोर साहेबही पुर्वी प्रेसायडींग नसले तरी बुद्धीमानच होते. त्यांनी केंद्रावरच दोन तीन कामं हलकी करुन टाकली होती. त्यांनी मतदार चिठ्ठ्या आधीच फाडून व त्याचे शंभर, शंभरच्या आकड्यात बंच बनवून ठेवले होते. तेवढं काम सोपं झालं होतं. बुथवर जाताच चालखोर साहेबांनी ताबडतोब बेंच लावण्याची व्यवस्था केली. सर्व सदस्यांकडून त्यांनी भराभर कागदपत्रे मतदान केंद्राबाहेर चिपकवून घेतली. त्यानंतर अर्जुननं सुचना केली. आताच पॉकीटांना सील लावून घ्या. फक्त कागद टाकायची बाजू चिपकवू नका. तसं पाहिल्यास सर्वच टिमचे सदस्य पारंगतच होते. त्यांना पुर्वीचा अनुभव होता. खासकरुन सुवर्णा मॅडम. त्या नावाप्रमाणे जशा दिसायला सुवर्णा होत्या. तशाच त्या नावाप्रमाणेच कामातही सुवर्णाच होत्या. त्यांची अक्षरंही सुवर्णासारखीच होती. त्यातच माधवीलाही अनुभव होताच कामाचा. त्या दोघींनीही भराभर कागदी लिफाफ्याला सील मारुन घेतलं. अशातच सर्वच प्रकारची कामं चार साडेचारला पुर्ण झालीत. ती साडेचारची पाचची वेळ. तसा मेसेज आला मोबाईलवर. झोनल ऑफिसर बुथवर आल्याशिवाय महिलांना सोडायचं नाही. ती विचार करण्यालायक बाब होती. ते चालखोर साहेबांना लगतच्या प्रेसायडींगनं सांगीतलं. तेच बोल अर्जुननं ऐकले. त्यावर चालखोर साहेबांना अर्जुन म्हणाला, "सर, जावू द्या आपल्या भगीनींना घरी. आपली कामं झालीत ना. अन् आपल्याकडील स्रियांची घरं काही जवळ नाहीत. ती एका कोपर्‍यात आहेत व आपलं केंद्र एका कोपर्‍यात." ते अर्जुनचं बोलणं. त्यावर चालखोर साहेब म्हणाले, "मग झोनल साहेबांचं काय?" "झोनल साहेबांनी तसा आदेश काढणं बरोबरच आहे. कारण बऱ्याच बुथवरच्या स्रिया, काम पुर्ण झालंही नसलं तरी घरी जायचा तकादा लावतात. म्हणूनच हे प्रयोजन असावं झोनल साहेबांचं. आपण त्यांना स्पष्ट उत्तरे देवू. म्हणू की आमच्या बुथवरचं काम झालं होतं. म्हणूनच आम्ही त्यांना घरी पाठवलं. ते काही म्हणणार नाहीत." अर्जुन बोलून गेला. तसं पाहिल्यास चालखोर साहेबही दिशादर्शकच होते. ते कोणत्याही अर्जुनच्याच नाही तर कुणाच्याही गोष्टीवर नकार देत नव्हते. चालखोर साहेबांचा थोडा राग होताच अर्जुनला. जेव्हा ते प्रशिक्षणादरम्यान गोष्टीगोष्टीत खाजगीतील लोकांना काही येत नाही म्हणाले होते. परंतु जेव्हा त्यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिलं की माधवी आणि अर्जुन हे खाजगीतील असतांनाही कामं करण्यात पटाईत आहेत. तेव्हा ते माधवी व अर्जुनला तोच सन्मान देवू लागले. ज्यातून पुरस्कारस्वरुप त्या दोघांनीही उत्स्फुर्तपणे कामे केलीत. तो सन्मान, तो मान आणि ती कामं करुन घेण्याची हातोटी चालखोर साहेबांकडे होती. शिवाय ते स्वतःही कामं करीत असत. त्यामुळंच बुथवरची सर्वच कामं अगदी भराभर झाली होती. त्याची प्रचीती आधीच्या दिवशी आली. साहित्य मिळाल्यानंतर सर्वांना केंद्रावरच चालखोर साहेबांनी मतदार चिठ्ठ्या फाडून त्यांचे शंभरच्या आकड्यात बंच बांधायचे काम दिले. अशातच काम सुरु असतांना कुणीतरी सांगीतलं, 'चहा आला.' तेव्हा चहा न घेतलेले तिघंही जण चालखोर साहेबांनाच तिथं एकटेच सोडून चहा घ्यायला निघून गेले. त्याच दरम्यान पुर्णच मतदार चिठ्ठ्या ठसे मारुन शंभरच्या बंचमध्ये लावून ते तिघंही येईपर्यंत चालखोर साहेब मोकळे झाले होते. ते कामं करायला मागेपुढे पाहात नसत. त्यातच त्यांनी सर्वच सदस्यांना दिलेल्या मानसन्मानं सर्वच सदस्यांनी आपआपली कामं भराभर पार पाडली होती. आता अर्जुनला आलेला त्यांच्याबद्दलचा रागही निवळला होता. त्याचं श्रेय चालखोर साहेबांच्या स्वभावाला जात होतं.**********************७********************* माधवी व सुवर्णा घरी गेल्या होत्या. तसं पाहिल्यास चालखोर साहेब व सुवर्णा मॅडम या जिल्हापरिषदच्या असल्यानं त्यांचं चांगलं पटत होतं. कारण त्यांचं कामानिमित्त सतत भेटणं होतं. दोघंही मुख्याध्यापकच होते आपआपल्या शाळेत आणि तेवढाच दर्जा टिकवून होते, आपल्या आपल्या शाळेचा. हे बरोबर होतं. त्यातच माधवी व अर्जुनचं एकमेकांशी पटत होतं. कारण ते दोघंही जण खाजगीतील होते. परंतु आता त्या चार जणांचा समूह बनल्यानं चारही जणांचं पटवून घेणं भागच होतं. कारण आपापसातील विचारांचे हेवेदावे असले तरी चारही जणांची एक वज्रमूठ होणं आवश्यक होतं. त्याशिवाय कामं करणं शक्य नव्हतं. तो चालखोर साहेबांचा बुथ व त्या बुथवर असलेल्या सुवर्णा व माधवी बऱ्याच वेळेपुर्वी घरी गेल्या होत्या. अर्जुन व चालखोर साहेबांसह सर्वांनी जेवणाचे डबे आणले होते. अर्जुननं सायंकाळी जेवन करु म्हणून जेवणाचा डबा आणला होता. परंतु तो डबा सायंकाळी न खाता दुपारीच खाल्ला होता. आता सायंकाळी जेवन करणं भाग होतं. त्यामूळंच पुरेशी झोपही येणार होती. परंतु जेवन अन् जेवन बोलवायचं कुणाच्या हातून? बुथची जबाबदारी होती व बुथ सोडता येणं शक्य नव्हतं. अशातच दुसऱ्या दिवशी तरी आपल्या जेवनाची व्यवस्था व्हावी म्हणून अर्जुननं माधवीला फोन लावला. जिच्यावर अगाढ विश्वास होता त्याचा. परंतु भ्रमनिराश पदरी पडला. माधवीनं फोन उचललाच नाही. शेवटी नाईलाजास्तव सुवर्णा मॅडमला फोन लावाला लागला व तिनं दुसऱ्या दिवशी त्यांना उपवास असतांनाही पराटे आणण्याचे कबूल केले. आता ते बोल ऐकून चालखोर साहेब व अर्जुन समाधान पावले होते. परंतु माधवी काय आणणार यावर एक प्रकारचा संशय निर्माण झाला होता. फोन बंद केला होता. तसे चालखोर साहेब म्हणाले, "बघा सर, इलेक्शन कमीशनला किती चिंता आहे आपली. आपल्या बुथवर महिला टाकतात. कारण त्यांना माहीत असतं की महिला फार कामाच्या असतात. त्या पुरुषांच्या जेवनाचीही सोय करतात." त्यांचं ते बरोबरच होतं. कारण सकाळीच आलेल्या माधवीनं नाश्त्यासाठी उपमा आणला होता. सकाळी सकाळी घाई होत असल्यानं उपमा कमी पडला होता. शेवटी त्यांनाच कमी पडला. त्यांचं पोट भरलं नाही. ते पाहून त्यांनी पिज्जाचा आर्डर केला. परंतु पिज्जा कोणीही खात नसल्यानं तो त्यांना एकटीलाच खावा लागला. मधात नाश्त्याचेही आर्डर दिले गेले. एकंदरीत सांगायचं झाल्यास काल जी रात्र उपवासात काढावी लागली होती. आज तशी वेळ आली नव्हती. आज माधवी आणि सुवर्णाच्या कृपेनं भरपूर खायला मिळालं होतं अर्जुनला. तसं पोटात अन्न गेल्यानं त्यांचा दिवस आनंदमयी गेला होता. त्यातच अर्जुनच्या मिस्कीलपणे गप्पा गोष्टी ऐकतांना विरंगुळाच वाटत होता. अशातच त्या विरंगुळ्यावर एक विरजण पडलं. माधवीला अर्जुननं तिच्या पतीबद्दल विचारलं की तिचा पती काय करतोय? त्यातच तिनं आपल्या पतीच्या उद्योगाबाबत सांगताच अर्जुननं तिला रबडी चारण्याची गोष्ट केली. ती तिच्या जिव्हारी लागली व ती त्याच रबडी प्रकरणातून शेवटपर्यंत चूप बसली होती. आता ना ती आधीच्या दिवसासारखी बोलत होती, ना तिच्या चेहर्‍यावर हास्य होतं, प्रशिक्षणाच्या दिवसासारखं. ती व्यथीत दिसत होती. काय कारण होतं, तेही माहीत होत नव्हतं. ती निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. मात्र त्या निवडणुकीची कामं करतांना मागील निवडणुकीतील एक किस्सा अर्जुनला आठवला. गतकाळात एक स्याही प्रकरण उद्भवलं होतं. जे साईप्रकरण त्यांच्या नोकरीलाही भोवू शकत होतं. स्याही प्रकरण....... गतकाळातील एका निवडणुकीत अर्जुनकडे बोटाला स्याही लावण्याचं काम होतं. परंतु त्याला कामं जास्त असल्यानं त्यानं दुसऱ्याच एका मतदान अधिकाऱ्याला स्याही लावण्याचं काम दिलं होतं व तो अधिकारी काळजीपूर्वक बोटाला स्याही लावत होता. तसं पाहिल्यास स्याहीचा दर्जा हा चांगला नव्हता व ती स्याही बोटावर उमटतच नव्हती. ती बोटाची स्याही. बोटाला लागलेली स्याही लोकांच्या बोटावरुन निघून जात होती. त्यातच त्याचा दुरुपयोग करण्याची युक्ती एका व्यक्तीला सुचली. तो कक्षात आला. त्याचा मोबाईल सुरु होता व तो म्हणत होता की मला आपण स्याही लावलेली नाही. आपण बोगस मतदान करीत आहात. आमचा उमेदवार हारेल. मी तुमची नोकरी खावू शकतो. बोगस मतदान....... बोगस मतदान करण्याची काय गरज होती संबंधीत अधिकारी वर्गाला. जो उमेदवार निवडून येणार होता. तो काय, आपल्या हिस्स्यातील काही पैसा अधिकारी वर्गाला देणार होता काय? त्याचं कारण नाही असंच होतं. तो व्यक्ती त्रागा करीत होता. त्याचं कारण होतं, अधिकारी वर्गाकडून पैसा कमविणं. तो त्याचाच परिणाम होता. कदाचित त्याला वाटत होतं की जर आपण या अधिकारी वर्गाला दबावात आणलं तर आपल्याला पैसा कमविता येवू शकेल. स्याही लावण्याची भुमिका ही अर्जुनकडे होती. तसा अर्जुनही थोडा घाबरलाच होता. परंतु त्याला दबावात न येण्याची युक्ती येत होती. मात्र स्याही लावणारा दुसरा अधिकारी घाबरला. ते स्याही प्रकरण व त्या कक्षामध्ये स्याही लावण्याबाबत निर्माण झालेला वाद. कदाचित एखाद्यावेळेस एखादा अधिकारी स्याही लावण्याचं विसरलाच तर मतदार म्हणून आपली स्वतःची भुमिका स्वतःला स्याही लावून घेण्याची असते. परंतु काही लोकं त्याचा बाऊ करीत असतात. त्याचा गैरफायदा घेण्याचा विचार करीत असतात. अर्जुनच्याही त्या कक्षातील ती गतकाळातील गोष्ट अशीच घडली होती. ही दुसरी वेळ होती की ज्यावेळेस अर्जुनकडेच स्याही लावण्याचं काम होतं व ते स्याही लावण्याचं काम याहीवेळेस त्यानं दुसऱ्यालाच दिलं होतं व गतकाळातील स्याही प्रकरणाची आठवण देत व किस्सा सांगत तो काळजीपूर्वक स्याही लावायला सांगत होता व आवर्जून स्याही लावण्यावर लक्ष देत होता. यावेळेस तो अतिशय काळजीपूर्वक स्याहीवर लक्ष देत होता. अर्जुन यावेळेस जिथं ड्युटीवर लागला. तिथं गतकाळातील किस्से आठवू लागला होता. अशातच त्याला गतकाळातील आणखी एक किस्सा आठवला. गतकाळात अर्जुननं चांगलं काम केल्यानं जो व्हाट्सअपवर ग्रुप बनवला होता. त्या सर्वांनी खुश होवून तो ग्रुप नष्ट करु नये असं सांगीतलं होतं. आजही तो ग्रुप कायम होता. त्या गटातील लोकं एवढे खुश झाले होते अर्जुनच्या कामावर की सायंकाळी त्या गटातील चारही लोकांनी जेवनाची आर्डर दिली होती. जी गोष्ट अर्जुनला माहीतच नव्हती. परंतु जेव्हा इलेक्शन संपलं. तेव्हा ती गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली होती अर्जुनच्या. अर्जुननं तो ग्रुप आजही जीवंतच ठेवला होता. कारण बाकी सर्व सदस्य चांगले होते व ते काळजी घेत असत एकमेकांची. त्यातच त्यांची चर्चा ही समोस्यावर रंगत असे. कारण त्याच ग्रुपमधील एक सदस्य समोस्याची पार्टी करु म्हणत होती. आज तो ग्रुप होता व त्यातील सर्व सदस्य टिकून राहिले होते. वर्षामागून वर्ष गेली होती व आज पुन्हा इलेक्शन लागलं होतं. अशातच फेरबदल झाला. मागील इलेक्शन मधील मतदान अधिकारी यावेळेस प्रेसायडींग बनले होते व मागील वेळेसचा प्रेसायडींग असलेला अर्जुन हा मतदान अधिकारी बनला होता. अर्जुन पदावरुन पायउतार झाला होता आणि गतकाळातील मतदान अधिकारी असलेला व्यक्ती आज प्रेसायडींग बनला होता. प्रेसायडींग म्हटलं तर फार मोठं कार्य. त्यातच एक फार मोठी जबाबदारी असायची. जी घ्यायला वा स्विकारायला कोणी धजत नसत. अशातच मागील काळातील ग्रुप सदस्याला प्रेसायडींगचा आदेश आला. तो त्यानं स्विकारलाही. मग ठरलं, प्रेसायडींग पद भुषवायचं व प्रेसायडींगचं काम करायचं. परंतु प्रेसायडींग काम करायचं असेल तर त्याची माहिती असायलाच हवी. म्हणून त्या ग्रुपमधील प्रेसायडींग बनलेल्या व्यक्तीनं अर्जुनला प्रेसायडींग पदाच्या कामाची माहिती विचारली व मदतीच्या भावनेतून अर्जुननं प्रेसायडींगची माहितीही त्याला सांगीतली. अशातच त्यानं अभ्यास केला व पुर्ण अभ्यास झाल्याचं त्यानं इलेक्शन ड्युटीवर जाण्यापुर्वी सांगीतलं. परंतु नेमकं इलेक्शन ड्युटी संपल्यावर त्याला अर्जुननं फोन लावला असता तो फोन उचलत नव्हता व बोलतही नव्हता अर्जुनशी. तेव्हा असं वाटत होतं की त्याला विनाकारणच प्रेसायडींग पदाच्या कामाची माहिती दिली व त्यात त्याला सरलता आणून दिली. समाजात असेही काही लोकं असतात की जे काम असेल तर गोडगोड बोलत असतात आणि काम निघालं तर साधं बोलणंही महाग होतं. त्यातीलच तो एक प्रकार घडला होता. तो व्यक्ती साधे बोलही अर्जुनसोबत बोलत नव्हता. अर्जुनला त्याचं वाईट वाटत होतं. परंतु समाजात असेच घटक मिळत असतात. हेही त्याला माहीत होतंच. त्यामुळंच त्या गोष्टीचं त्याला तेवढं वाईट वाटलं नाही व ती गोष्ट सोडून तो पुर्वस्थितीवर आला होता, या नवीन बुथवरील लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवणूयासाठी. जे या इलेक्शनच्या कुंभमेळ्यात लागले होते. **********************८********************* अर्जुनचं बालपण हे अतिशय वेदनेत गेलं होतं. तो शिक्षक बनेल असं वाटलं नव्हतं. परंतु तो शिक्षक बनला होता. त्यासाठी त्याला परीश्रमही जास्तच करावे लागले होते. अर्जुन गावात राहणारा व्यक्ती. ते गाव व त्या गावातून दूरचे अंतर सायकलने पार करता करता नाकीनव यायचं अर्जुनला. परंतु नोकरीची आस असल्यानं त्यानं सगळं सहन केलं. वयाची आठ वर्ष त्यानं विनावेतनानंच काम केलं होतं. त्यातच तो स्पर्धा परीक्षाही पास झाला होता शिक्षकाची. परंतु संस्थाचालकानं त्याला जिल्हापरीषद शाळेत जायला मनाई केली होती. ज्यातून तो जिल्हापरिषद शाळेत ग्रामीण भागात नोकरी करायला गेला नाही. कारण जिल्हापरिषद शाळेत नोकरी करायला जात असतांना रस्ता बरोबर नसतो. चिखलात जावं लागतं. पायपीट करावी लागते. तसंच वेतनही कमी असतं. इत्यादी गोष्टी त्याला संस्थाचालकानं सांगीतल्या होत्या. आज अर्जुनला शहरातील खाजगी शाळेत नोकरी लागली होती. ती सरकारी नोकरी होती. मात्र सरकारी नोकरी लागण्यापुर्वी अर्जुनला जास्त अडचण गेली. अर्जुन गरीब होता व त्याचे वडील शेतकरी होते. अर्जुनला तीन बहिणी होत्या. त्या मोठ्या होत्या व तिघींचेही विवाह झाले होते. त्यातच अर्जुन शिकावा म्हणून त्याला शहरात त्याच्या वडिलांनी पाठवलं होतं. ज्यात तो एका नातेवाईकाच्या घरी राहात होता. अर्जुनचे वडील गरीब असून शेतकरी होते. तसा अर्जुन घरातील शेवटचा आणि तोही आईवडिलांना म्हातारपणातच झालेला. अशा वयात शेतात काम करणं जमत नव्हतं. त्यातच शेतीही पीकत नव्हतीच. कधी ओला दुष्काळ पडायचा शेतात तर कधी सुका दुष्काळ. मात्र अर्जुन शहरात शिकत असतांना व नातेवाईकांकडे राहात असतांना त्याच्या नातेवाईकांना वर्षाचा खानावळीचा खर्च म्हणून दोन पोते गव्हाचे द्यावे लागायचे. तसा शेतात गहू पिकायचा. कारण गव्हाला जास्त पाणी लागायचं नाही. सुरुवातीचा काळ थोडा बरा गेला अर्जुनच्या शिक्षणाचा. कारण सुरुवातीला अर्जुनच्या आईवडिलांना ते तरुण असल्यानं शेतात मेहनत करणं तेवढं कठीण जात नव्हतं. परंतु जसजसा काळ ओसरला. तसतसं अर्जुनच्या आईवडिलांना काम करणं जमत नव्हतं. त्यांना वखरण, नांगरण करतांना दम लागायचा. त्यातच अर्जुनचे वडील शेतात पडणाऱ्या दुष्काळानंही त्रस्त होते. तशीच शेतात मेहनत घडत नसल्यानं तणच जास्त जोर करीत होतं. त्या तणाच्या जागेत पुरेसं पीक उत्पादन यायचं नाही आणि ते तण काढायला पुरेसा पैसा नसल्यानं शेतात जास्त धान्य व्हायचं नाही. अर्जुनला असलेल्या तीन बहिणी. तीनही बहिणीचे विवाह झाले होते. त्यातच विवाह करतांना शेत जरी पीकत नसलं आणि जवळ पैसा नसला तरी पैसा लागलाच होता. त्यामुळंच साहजीकच कर्जही चढलं होतं अंगावर. अशातच अर्जुनचं शिक्षणही पुर्ण करणं होतं आणि त्याच्या शिक्षणासाठीही पैसा लावणं होताच. त्यातच अर्जुनला लागणारा खानावळीचा पैसाही देणे क्रमप्राप्त होतेच. अशातच अर्जुनच्या आईवडिलांना आपल्या दोघांची पोटंही पालवणं भाग होतं. तो खानावळीचा पैसा. ते म्हातारपण. त्या म्हातारपणामुळं शेतात काम करणं जमत नसल्यानं खानावळीचा पैसा देणं जमत नव्हतं. अशातच त्यावर्षी शेतात मेहनत न केली गेल्यानं एकच पोतं पीक पिकलं होतं. अशातच ते पोतं कसं द्यायचं, हाही विचार अर्जुनच्या वडिलांना होताच. परंतु ते द्यावच लागणार होतं. कारण होतं अर्जुनचं पोट. शेवटी घरी उपास भोगू. हा उद्देश गृहीत धरुन अर्जुनच्या वडिलांनी ते पोतं अर्जुनची खानावळ म्हणून त्याच्या नातेवाईकांना दिलं. परंतु ते पुरेसं ठरलं नाही व अर्जुनच्या नातेवाईकांनी त्याला घरुन हाकलून लावलं. शेवटी हताश झालेला अर्जुन आपल्या पोटाला पुरेसं अन्न मिळावं म्हणून एका खानावळीत लागला. ती खानावळ व त्या खानावळीच्या मालकानं अर्जुनला आश्वासन दिलं. त्यानं खानावळीत पुर्ण वेळ काम करायचं. त्याला पुरेसे पैसे देवू व पोटाला जेवढं लागेल तेवढं अन्न देवू. मात्र राहण्याची सोय त्यानं कुठेही करावी. प्रारब्धच ते. तो खानावळीत काम करु लागला. अन् खानावळीत राहण्याची सोय नसल्यानं रस्त्यावरील फुटपाथवर राहू लागला. तिथेच तो रस्त्यावरील लाईटच्या प्रकाशात अभ्यास करु लागला. तेथूनच तो महाविद्यालयातही जावू लागला आणि तेथूनच तो खानावळीत जेवनासाठी नोकरीवर जावू लागला. अशाप्रकारे तो आपलं जीवन काढू लागला. मात्र ही गोष्ट त्यानं आपल्या आईवडिलांना सांगीतली नाही. ती गुपीतच ठेवली. अशातच अर्जुनला दोन महिने झाले होते. अर्जुनला दोन महिने झाले होते. त्यानं मालकाला पैसे मागितले. तेव्हा मालकानं म्हटलं की त्याला मिळणारे पैसे त्यानं जेवनातच कापले. कारण त्याचं जेवन भरपूर आहे. ते जेवन परवडणारं नाही. आश्वासन....... खानावळीत लागण्यापुर्वी पुरेसे पैसे देण्याचं आश्वासन आणि पोटभर जेवढं लागेल, तेवढं जेवन देण्याचं आश्वासन. ते आश्वासन फोल ठरलं होतं. त्यातच मालक त्याला जेवनातच पैसे कापले म्हणत होता. शिवाय ड्युटी कराल तर करा, नाहीतर सोडा असंही म्हणत होता. शेवटी पोटाचाही प्रश्न उभाच होता अर्जुनसमोर. त्यामुळंच पर्याय नसल्यानं त्यानं जेवनाला प्राधान्य दिलं व तो महाविद्यालयीन शिक्षण सांभाळून खानावळीत केवळ जेवन मिळविण्यासाठी ड्युटी करु लागला. अशातच त्यानं तिथं शिक्षकी पेशाचंही शिक्षण पुर्ण केलं होतं. आपला अभ्यास, महाविद्यालय आणि ड्युटीचं काम. त्यातच राहण्याचा अधिवास अर्थात फुटपाथ. या सर्व गोष्टी सांभाळून अर्जुन शिकला. लहानाचा मोठा झाला. त्यानं शिक्षकी पेशाचं शिक्षण पुर्ण केलं व तो एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला. त्यानंतर त्याला वेतनही मिळायला लागलं व तो त्याच शाळेअंतर्गत इलेक्शनच्या नोकऱ्याही करु लागला होता. अर्जुनला इलेक्शनच्या पहिल्या नियुक्त्या आठवत होत्या. त्यावेळेस त्याला मतदान अधिकारी म्हणून पत्र आलं होतं. तशी त्याची नियुक्ती ही पहिल्या वेळेस मतदान अधिकारी म्हणून झाली होती. ज्यात तो भरगच्च गर्दीच्या प्रदेशात लागला होता. तिथं मुस्लिम मतदार जास्त होते व ते मतदार मतदान करतांना बुरखा काढायलाच पाहात नव्हते. अर्जुनला इलेक्शनच्या पहिल्या नियुक्त्या आठवत होत्या. त्यावेळेस त्याला मतदान अधिकारी म्हणून पत्र आलं होतं. तशी त्याची नियुक्ती ही पहिल्या वेळेस मतदान अधिकारी म्हणून झाली होती. ज्यात तो भरगच्च गर्दीच्या प्रदेशात लागला होता. ज्यात त्याला मतदारांची ओळख पटविण्याचं कार्य होतं. तो भाग व तिथं मुस्लिम मतदार जास्त होते व ते मतदार मतदान करतांना बुरखा काढायलाच पाहात नव्हते. अशातच ओळख कशी पटवायची ही समस्या अर्जुनसमोर उभी होती. ते मुस्लिम महिला मतदार. त्यातच त्या बुरख्यातील तरुण मुली. ज्या आपल्या सासवांसोबत ला बुजुर्गासोबत येत होत्या. त्या आपल्या बुजुर्गासोबत मतदान टाकायला येत असतांना आपला बुरखा काढून दाखवायला नकार देत असत. म्हणत असत की आम्ही फक्त बुरखा आमच्या शौहरसमोरच काढतो. इतर परपुरुषांसमोर काढत नाही. मग ते मतदान का असेना. मतदान...... मतदान ही अशी प्रक्रिया होती की ज्यात कोणत्याही मतदाराला मतदानापासून वंचीत करता येत नव्हते. त्यातच अर्जुनला आलेलं ते कार्य. ते कार्य त्याला कसे पार पाडायचे. हा विचार होता. अशातच त्यानं विचार केला. आपण या जागेवर आपल्या सोबतच असलेल्या एका महिला अधिकारी असलेल्या मॅडमला बसवायचं आणि आपण तिच्या जागी बसायचं. म्हणजे ही समस्याच सुटेल. त्यानं तसंच केलं. त्या पद्धतीची सुचना त्यानं सोबत बसलेल्या मॅडमला सांगीतली. ती तयार झाली. परंतु प्रश्न होता, प्रेसायडींगचा. प्रेसायडींग नकार देत होते. म्हणत होते की असं केलं आणि कोणी चौकशीला आलं आणि त्यांनी याचं कारण विचारलं तर....... तर काय उत्तर देणार. त्यांचंही बरोबर होतंच आणि अर्जुनही त्यांना जास्त जोर देवून बोलू शकत नव्हता. अन् प्रेसायडींगही ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी सोबत असलेल्या मॅडमला अर्जुनची दया आली व त्यांनी अर्जुनच्या जागेवर काम करायचं मंजूर केलं. कारण त्या मॅडमला अनुभव होता. शेवटी अनुभवाच्या जोरावर ती मॅडम म्हणाली, "सर, असं जर झालंच तर मी जबाबदारी स्विकारते. मी त्याचं कारण सांगणार. आपण घाबरु नका." ते मतदानाचं कार्य. ती मॅडम थोडीशी हुशारच होती. तिनं अख्खे बुरख्यात येणारे मतदार सांभाळले होते. आता मुस्लिम स्रिया येत. तिला बुरखा उघडून दाखवत. त्यानंतर ओळख पटल्यावर त्यांना ती अर्जुनकडे पाठवीत असे. फक्त एकदोनच मतदार असे ठरले होते की जे बुरखा काढायला तयार नव्हते. त्यांनी बुरखा काढला नव्हता. ज्यातून ओळख न पटल्यानं त्यांना परत जावं लागलं होतं. दिवसभर चाललेली मतदान प्रक्रिया. ती प्रक्रिया पार पाडता पाडता साडे पाच वाजले. त्यातच साडेपाच वाजता मतदान संपलं. तशी रात्र झाली. प्रेसायडींग पंचावन वर्षाचा होता. त्याच्या डोळ्याला समस्या होती. त्याचीही मतदान प्रक्रियेत पहिलीच वेळ होती. तसंच त्याला रात्री कमी दिसत होतं. त्यातच अर्जुन हा अनुभवसंपन्न नव्हता. त्याचीही पहिलीच वेळ होती. त्यानं दिवसभर कोणतंच काम केलं नव्हतं. कोणतं व काय काम करावं लागतं. हे त्याला माहीतच नव्हतं. साडेपाच वाजले होते व साडेपाच वाजता ज्या महिलेनं अर्जुनचं काम केलं होतं. ती जरा हुशारच होती. मतदानाची कामं व्हायचीच होती. ती कामं जरा जास्तच होती. त्यातच ती कामं करतांना तरीही ती प्रेसायडींगला म्हणाली, "सर, आम्हाला सुट्टी हवीय. आम्ही महिला आहोत." "सुट्टी कशी द्यायची? काम व्हायचंच आहे." प्रेसायडींग म्हणाले. "हो, परंतु आम्हाला तुमच्या कामाचं काय करायचं आहे. आम्ही महिला आहोत व आम्हाला जर कमीजास्त झालंच तर आपण जबाबदार राहाल." ते त्या महिलेचं बोलणं. प्रेसायडींग दबावात आले व त्यांनी ज्या दोन महिला होत्या. त्यांना सुट्ट्या दिल्या. आता उरले होते ते दोन माणसं. एक म्हणजे अर्जुन आणि दुसरा प्रेसायडींग. ज्यांच्या डोळ्यांना बरोबर दिसत नव्हतं. मग काय, मतदानाची कामं कशी करायची? अर्जुनसमोर प्रश्न पडला. त्यातच प्रेसायडींग गयावया करीत होते. शेवटी अर्जुनला त्याची दया आली व शिकतं व्हायचं, असा विचार करुन अर्जुन त्या प्रेसायडींगची दया घेवून त्याचं संपुर्ण काम करुन दिलं. अशातच काम पुर्ण होताच प्रेसायडींगनं त्याला पन्नास रुपये जास्त दिले. परंतु प्रेसायडींगनं दिलेले पैसे अर्जुननं घेतले नाहीत. विचार केला की जर पुढे चालून आपल्याही आयुष्यात असं घडलं तर...... अर्जुनचा तो विचार रास्त होता. त्यातच ते काम करुन अर्जुन संपुर्ण कामाची प्रक्रिया शिकला होता. त्याला आता ते काम करणं कठीण वाटत नव्हतं. दोनतीन वर्ष होवून गेली होती. अशातच पुन्हा एकदा अर्जुनला मतदान अधिकारी म्हणून पत्र आलं व त्याचवेळेस अर्जुन आपल्याला आलेल्या पत्रानुसार इलेक्शन ड्युटीवर गेला. यावेळेस आपण संपुर्ण काम करुन घेवू असं त्याला वाटलं होतं. त्यातच कोणतीच समस्या उद्भवणार नाही. असंही त्याला वाटत होतं. शेवटी विचार केलाच होता तसा. यावेळेस महानगरपालिकेचं इलेक्शन होतं. चार बटना दाबायच्या होत्या. अशातच एक व्यक्ती आला. ज्यानं दोन बटन दाबल्या व दोन दाबल्याच नव्हत्या. त्यामुळंच बॅलेट कंट्रोल युनीटमधील बजरचा आवाज आला नव्हता. तसं पाहिल्यास मतदान कक्षात कुणालाही जायची परवानगी नव्हतीच. त्यामुळं त्या व्यक्तीनं कोणती बटनं दाबली व कोणती बटन दाबली नाही. हे पाहायला जायची कोणाला परवानगी नव्हती. त्यामुळं नेमकं काय झालं? बॅलेट युनीटमधून बजरचा आवाज का आला नाही? याचं अंदाज घेणं कठीण झालं होतं. काय करावं सुचत नव्हतं आणि तो म्हातारा मतदार म्हणत होता की आपण बोगस मतदान करीत आहात. तब्बल एक तास झाला होता. बाहेर लोकं गोळा झाले होते. ते आरडाओरड करीत होते. एक तास मतदान खोळंबलं होतं. 'आपण बोगस मतदान करता आहात.' असं त्या वयोवृद्ध मतदाराचं म्हणणं होतं. त्यातच प्रेसायडींगही दबावात आला होता. शेवटी त्यानं झोनल अधिकाऱ्यांना फोन लावला. झोनल अधिकारीही तिथं उपस्थित झाले. परंतु तेही मतदान कक्षात जावू शकत नव्हते. त्यामुळंच घोळ कायम होता. शेवटी मतदानाचा हा घोळ पाहून झोनल अधिकारी साहेबांसोबत आलेला व्यक्ती मतदान कक्षात गेला. म्हणाला, "बाबा, कोणती बटन दाबली?" ते त्यांचं म्हणणं. तोच त्या वयोवृद्ध व्यक्तीनं दाबलेल्या बटनांना निर्देशित केलं. त्यानंतर लक्षात आलं की त्या व्यक्तीनं दोन बटना दाबल्या व दोन बटना दाबल्याच नाही. त्यामुळंच मतदान खोळंबलं. शेवटी त्या वयोवृद्ध व्यक्तीच्या चूक लक्षात आणून दिली आणि त्याला धमकीही दिली की आपण मतदान खोळंबविल्याबद्दल आपल्याला कैद होवू शकते. ती चूकच. ती चूक त्या वयोवृद्ध व्यक्तीच्या लक्षात आली होती. चूक त्याचीच होती. परंतु तो आतापर्यंत आपल्या स्वतःची चूक नाही असंच दर्शवीत होता. त्यातच जेव्हा तसं लक्षात आलं. तेव्हा त्याच धाकानं तो तेथून लवकर निघून जाण्याच्या तयारीत होता. तोच झोनल ऑफिसर म्हणाले, "थांबा बाबाजी, आपलं बयाण लिहून घ्यायचं आहे. एक तास इलेक्शन खोळंबलं आहे. कितीतरी मतदार मतदानापासून वंचीत झाले आहेत. लोकं म्हणतील की एक तास मतदान खोळंबलं. आम्हाला एक तास वाढवून द्या. आम्ही कसं देणार वेळ वाढवून. चूक आपली आहे ना." झोनल ऑफिसरनं तसं म्हणताच तो वयोवृद्ध व्यक्ती घाबरला. ही कैदेचीच बाजू आहे. हे त्याच्या लक्षात आलं. तसे लोकं म्हणाले, "साहेब, जावू द्या. म्हातारा व्यक्ती आहे. चूक झाली असेलच. अन् चूक होवूही शकते." झोनल ऑफिसरनं ते ऐकलं. तसे ते म्हणाले, "एका अटीवर. एका अटीवर सोडतोय यांना." "कोणती साहेब?" "मतदानासाठी एक तास जास्त वाढवून मिळणार नाही." लोकांनी ठीक आहे म्हणत ती अट मान्य केली व पुन्हा पुर्ववत मतदान सुरु झालं. तो प्रसंग चांगलाच आठवत होता अर्जुनला. तसे त्यावेळचे प्रेसायडींग हुशारच होते. मतदान अगदी वेळेवर संपलं होतं. तसं अर्जुनला वाटत होतं की मागील वेळच्या प्रेसायडींगसारखी याही प्रेसायडींगला मदत करावीच लागेल. कारण आधीच्या दिवशी त्या प्रेसायडींगनं मला काहीच येत नाही. असं म्हटलं होतं. परंतु तसं घडलं नाही. सायंकाळी साडेपाच वाजता जेव्हा मतदान बंद झालं. तेव्हा त्याची सर्वच कागदपत्र भरुन पुर्ण झाली होती. त्यातच सर्वांनी लिफाफ्याचे पॉकीट सिलींग केले व ते केंद्राकडे रवाना झाले. त्यातच यावेळेस रस्त्यातच कोणीतरी माथेफिरुनं मतदान ड्युटीवर असलेल्या एका बसच्या काचा फोडल्यानं जो राडा झालेला होता. ते पाहून लवकरच त्या बुथचा रेकॉर्ड झोनल ऑफिसरनं घेतला. कोणतीही कागदपत्र तपासली नाही व सर्वांना त्या केंद्रावर लवकरच सुट्टी झाली होती. आज आठवत होता तो दिवस अर्जुनला. त्या वयोवृद्ध म्हाताऱ्या व्यक्तीचं ते प्रकरण. ज्यातून मतदान खोळंबलं होतं. कदाचित इतर बटना दबल्या नसत्या तर तेच प्रकरण अंगावर शेकलं असतं अर्जुनच्या आणि सोबतच इतरही इलेक्शन ड्युटीवर लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या. ********************९*********************** ती इलेक्शन ड्युटी. ती इलेक्शन ड्युटी लागणं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या नोकरीत व्यत्यय येण्यासारखी बाब आहे. दररोज आपल्या कार्यालयात ड्युटी करणं परवडतं. परंतु इलेक्शन ड्युटीवर लागणं परवडत नाही. कारण इलेक्शन ड्युटीवर आनंद कमी व वेदनाच जास्त असतात. तसं पाहिल्यास कोणी कोणी इलेक्शन ड्युटीवर जात असतांना या गोष्टीकडे एक सहल म्हणून पाहतात. जसे आपण एखाद्या स्थळी फिरायला गेलो. याचा आनंद दिसतो त्यांना. परंतु तसं काहीही नसतं. तसं पाहिल्यास जबाबदारीनं कामं केली तर इलेक्शन ड्युटी चांगली असते. नाहीतर तीच ड्युटी कर्मचाऱ्यांचा जीव घेणारीही ठरते. तशा चुका होतातच आणि चुका जर झाल्याच तर त्याला माफी नसतेच. जसं एकदाचं इलेक्शन. त्या इलेक्शनात बॅलेट युनीटच्या एका उमेदवाराची बटन झाकली गेली होती व त्याला मतदानच झालं नाही. शेवटी तेथे ड्युटीवर लागलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना निलंबित केलं गेलं. म्हटलं गेलं की त्या बटना तपासणं ही काळाची गरज होती. ती सर्वच कर्मचाऱ्यांनी तपासणं गरजेचं होतं. ते बरोबरच होतं. परंतु ती चूक अनवधानानं घडली होती. इलेक्शन ड्युटीवर लागलेल्या बहुतेक कर्मचारी वर्गाला इलेक्शनच्या बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत. म्हणूनच अशाप्रकारची चूक होवू शकते. तसंच काही कर्मचारी असेही असतात की जे इलेक्शनची होणारी प्रशिक्षण काळजीपूर्वक घेत नाहीत. ते दिडशहाणे असल्यागत त्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत असतात. तसंच दुर्लक्ष प्रशिक्षणाकडेही करीत असतात. जर सर्वांनी इलेक्शन संदर्भात दिलं जाणारं प्रशिक्षण बरोबर घेतलंच तर अशी चहोत नाही व निलंबनाचा धोकाही होत नाही. इलेक्शन ड्युटीवर असतांना होणारं निलंबन हे कर्मचारी वर्गांना जीवनातून उठवतं. असं निलंबन झालंच तर सर्वीसला अडथडा निर्माण होतो आणि असा अडथडा निर्माण झालाच तर सर्वीस जाते. मग त्या खटल्याचा जेव्हापर्यंत निकाल लागत नाही. तेव्हापर्यंत कर्मचारी वर्गाला न्याय मिळत नाही व नोकरीही मिळत नाही. मात्र निवडून येणारा उमेदवार हा इतर बुथवरील मतदानाच्या आधारावर निवडून येतो. त्याला लाभ होतो व सरकारी इलेक्शन ड्युटीवर असलेल्या कर्मचारी वर्गाचं निलंबनामुळं नुकसान. एक लहानशी चूक ही कर्मचारी वर्गाच्या अंगलट येत असते. मतदान केंद्र हे सजग असायला हवेत. तिथं सर्व सोईसुविधा असायला हव्यात. परंतु काही काही मतदान केंद्रावर कोणत्याच सोईसुविधा नसतात. धड शौचालयात जायला पाणी नसतं. धड शौचालयही नसतात. तशाच पुरेशा बादल्याही नसतात. त्यातच काही केंद्रात सतत दुर्गंधी येत असते. एक ठिकाण असंही दिसलं की जिथं बकऱ्या बांधलेल्या होत्या. ज्यात बकऱ्यांच्या विष्ठेचा सतत वास येत होता. एवढंच नाही तर एक केंद्र असंही होतं की त्या केंद्राच्या लगतच बकरे कापत असावेत. असं वाटत होतं. कारण त्याचीच दुर्गंधी येत होती. तसंच एक केंद्र असंही दिसलं की शेजारी शौचालय होतं आणि त्या शौचालयातील पाणी मतदान कक्षात येत होतं व त्याचा घाणेरडा दुर्गंध कक्षात येत होता. बऱ्याच मतदान केंद्रात सोई नसतातच. काही केंद्रात वरचं छत बरोबर नसतं. टिना असतात. ज्या टिना पावसाळ्यात गळत असतात. त्यातच भर उन्हाळ्यात जर मतदान असलं तर एवढं उकडतं की सांगता सोय नाही. परंतु मतदान कर्मचाऱ्यांना ते सगळं सहन करीत मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागते. अशी बरीचशी केंद्रे असतात. काही केंद्रावर झोपायची पुरेशी व्यवस्था नसते. ना गाद्या असतात. ना ब्लँकेट असतात. त्यातच डासांचा एवढा उपद्रव असतो की रात्रभर झोपच येत नाही. काही ठिकाणी लगतचे कर्मचारी हे घोरणारे असतात. त्यानंही इतर कर्मचारी वर्गांना झोप येत नाही. काही ठिकाणी अंघोळीलाही पाणी मिळत नाही. त्यातच बरेचसे असे कर्मचारी असतात की ते अंघोळच करीत नाहीत. काही कर्मचारी असेही दिसतात की जे दातवन देखील करीत नाहीत. ते घरी तरी दातवण करीत असतील काय? ही विचार करायला लावणारी बाब आहे. काही ठिकाणी मतदान परीसरात एकही खानावळीची दुकानं दिसत नाहीत. तसं पाहिल्यास मतदानकेंद्र कोणत्याच कर्मचाऱ्यास सोडता येत नाही. परंतु जेवनाच्या वस्तू आणण्यासाठी एखादा कर्मचारी गेल्यास त्याला परीसरातील एक - दोन किमी अंतरापर्यंत नाश्त्याची वा खानावळीची दुकानं दिसत नाहीत. शिवाय सुरक्षेचा विचार केल्यास बऱ्याच केंद्रावर सापासारख्या विषारी प्राण्यांचीही भीती असते. आताचे ग्रामीण भागातील इलेक्शन म्हणजे तारेवरची कसरतच असते. बऱ्याच मतदान केंद्रावर आता बिबट्या वाघाची दहशत असते. कारण अलिकडील काळात बिबट्या व वाघासारखे हिंस्र प्राणी रस्त्यावर व मानवी वस्तीत येवू लागलेले आहेत. त्यातच ते मानवाच्या जगण्याला धोका निर्माण करु लागले आहेत. आज बिबट्या वाघाची भीती मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना बरोबर काम करु देत नाही. पुर्वीही असंच होतं. काही काही मतदान केंद्र एवढी संवेदनशील होती की तेथे मानवी हस्तक्षेपाचे धोके उद्भवत होते. बरीचशी मतदान केंद्र एखाद्या गुन्हेगारी टोळीमार्फत हॅक केली जात होती. कर्मचारी वर्गांना धमक्या दिल्या जात होत्या की जर त्यांनी दुय्यम प्रतीचं मतदान करु दिलं नाही तर त्यांचा जीव घेण्यात येईल. आता हा मानवी हस्तक्षेपाचा खेळ कंट्रोल युनीट आल्यानं कमी झालेला असून आता कंट्रोलवर मतदान होतं व ते कंट्रोल युनीट हॅक करता येत नाही. तरीही बरेचसे मतदाते कंट्रोल युनीटवरही शंका घेतात. बऱ्याचशा केंद्रावर असलेल्या या गैरसुविधेनं त्रासच होतो मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना. तरीही ते सगळं सहन करीत मतदान अधिकारी काम करीत असतात. कारण पोट महत्वाचं असतं व आपली इवल्याशा पोटाची खळगी भरण्यासाठी ते कर्मचारी सर्व प्रकारचा त्रास सहन करुन काम करीत असतात. याऊलट काही केंद्र असेही असतात की तिथं पुरेपूर व्यवस्था असते. शौचालये चांगल्या प्रतीची असतात. मतदान कक्षही चांगलेच असतात. एक केंद्र तर असं आढळलं की तिथं कर्मचारी वर्गाला अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय होती. काही काही केंद्र अशीही मिळतात की त्या केंद्रावर भरगच्च प्रमाणात खायलाही मिळत असते तर काही केंद्र अशीही असतात की तिथं काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांना चक्कं उपाशी झोपावं लागतं. तसं पाहिल्यास आजच्या काळात महिला वर्ग सोबतीला असल्यानं शहरात महिला कर्मचारी घरी जातात व दुसऱ्या दिवशी भरपूर खायचं प्यायचं आणतात की ज्यातून आताच्या काळात कोणत्याच कर्मचारी वर्गाला उपाशी राहण्याची पाळी येत नाही. अर्जुनच्या मतदान केंद्रावर त्यांची गैरसोय झाली नव्हती. सुवर्णा मॅडमनं आणलेले पराटे व माधवीनं आणलेला उपमा आजही अर्जुनला आठवत होता. ती पराट्याची चव व ती उपम्याची चव आजही अर्जुनच्या तोंडाला पाणी सोडत होती. तो बुथ व त्या बुथवर लागलेले ते चारही जण. त्यांची परिस्थिती आज चांगलीच होती. चारही झण आज मजेत होते. परंतु त्यांचा पुर्वकाळ हलाखीचा होता. चालखोर साहेबांचंही तसंच होतं. त्यांचे वडील हे शहरातच नोकरीला होते. ते सरकारी नोकरीवर होते. परंतु त्यांना मिळणारं वेतन पुरत नव्हतं. कारण खाणारी तोंड भरपूर होती. चालखोर साहेब पकडून चार भावंडं. त्यातच आजी आजोबा सोबतच होते. याचाच अर्थ असा की कमविणारे हात दोन होते व खाणारी तोंड आठ होती. त्यातच मुलांचं शिक्षण. शिक्षणालाही पैसा लागतच होता. अशावेळेस मुलांना कसं शिकवावं? हा प्रश्न चालखोर साहेबांच्या वडिलांना सतावणाराच होता. अशाही परिस्थितीवर मात करुन चालखोर साहेब शिकले. ते लहानाचे मोठे झाले. त्यांनी जिद्द सोडली नाही व आज त्यांना एका सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लागली होती. काटकसर....... काटकसर करता करता शिकणारे चालखोर. ते जसे परिस्थितीवर मात करुन शिकले. तशीच त्या परिस्थितीवर मात करुन शिकता शिकता त्यांच्या केवळ बुद्धीचाच विकास झाला असं नाही तर त्यांच्या स्वभावाचाही विकास झाला होता. त्यांच्यात दयाळूभाव कुटकूट भरला होता. त्यातच त्यांच्यात कुणाला समजून घेण्याची प्रवृत्ती आली होती. चालखोर साहेब हे बालपणापासून अभ्यास करायचे. त्यातच बारावीला असतांना त्याच अभ्यासाच्या जोरावर ते महाविद्यालयातून प्रथम आले. त्यानंतर त्यांनी अध्यापकाचा फॉम भरला व त्याच गुणांकनाच्या भरवशावर ते पहिल्याच यादीत महाविद्यालयात लागले व त्यांनी अध्यापकाचा डिप्लोमा घेतला. अध्यापकीय डिप्लोमा मिळाला होता. परंतु नोकरी...... नोकरीत असलेली स्पर्धा परीक्षा बंद झाली होती. कसं नोकरीला लागावं हा प्रश्न होता. अशातच जागा निघाल्या व गुणांकणानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात आली. चालखोर साहेबांचा त्यात नंबर लागला व ते एका जिल्हापरीषदेतील शाळेत नियुक्त झाले. ती सुरुवात व शहरात शिकलेले चालखोर साहेब. त्यातच तो सुरुवातीचा काळ. त्या काळात अतिशय दुर्गम अशा ग्रामीण भागातील शाळेत चालखोर साहेबांचा नंबर लागला होता. असा ग्रामीण भाग चालखोर साहेबांनी पाहिला होता. परंतु तिथं शिकविण्याचे चारपाच तास वास्तव्य. ते मात्र बिकट होतं. जाणं येणं परवडत नव्हतं. शेवटी जाण्यायेण्याची परेशानी होवू नये म्हणून चालखोर साहेब काही काळ ग्रामीण भागातच वास्तव्यास राहू लागले. तो ग्रामीण भाग व ती शेंबडी मुलं. सुरुवातीस त्रास झाला चालखोर साहेबांना. मुलं शिकविणं आवडायची नाहीत. ती मुलं त्यांच्या सभोवताल उभी राहायची. ती ऐकायची नाहीत. त्यांना दाटलं तरी ते चूप बसायचे नाहीत. चालखोर साहेबांना विचार यायचा की आपले विद्यार्थी चूप बसत नाहीत. त्यांना दाटलं तरी ते माझ्याचजवळ उभे राहतात. समजा एखादा अधिकारी शाळा भेटीला आले तर........ एकदा तसंच झालं. त्यावेळेस त्यांना एका जेष्ठ शिक्षणाधिकारी साहेबांचा सामना करावा लागला. ते जेव्हा शाळाभेटीला आले. तेव्हाही विद्यार्थी त्यांच्या सभोवताल उभीच होती. त्यातच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी त्याबद्दल बोलले. तेव्हा त्यावर उत्तर देतांना चालखोर साहेब म्हणाले, "सर, मुलंच ती. ती लहान लहान आहेत. त्यांना तेवढ्या प्रमाणात शिक्षक आणि शिक्षण कळत नाही. तेच द्यायला मी इथे आलोय. हेच शिकवतोय सर मी. जेव्हा ती मोठी होतील ना. तेव्हा हीच मुलं माझ्या शिकविण्यानं आपल्या अंगात शिस्त निर्माण करतील." ते त्यांचं बरोबरच होतं. कारण आज त्यांचे विद्यार्थी उच्च पदावर गेले होते. काळ हळूहळू सरकत होता. तसे चालखोर साहेबही आपल्या वर्तनबदलानं आघाडीवर जात होते. त्यांची ख्याती परिसरात पोहोचतच होती. त्यातच ते आता परीसरात प्रसिद्ध होत होते. तसं पाहिल्यास त्यांचं शाळेतील कार्य हे वाखाणण्याजोगंच होतं. त्याच भरवशावर ते आज मुख्याध्यापक बनले होते व ते आज मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत होते. चालखोर साहेब अर्जुनपेक्षा वयानं लहान होते. परंतु त्यांचा अनुभव दांडगा होता. त्यातच कोणाला कसं आपलंसं करावं. याची हातोटी त्यांच्याजवळ होती. त्यांनी बरेचवेळेस आपल्यापेक्षाही मोठ्या असलेल्या लोकांना ज्ञानाचं बाळकडू पाजलं होतं. चालखोर साहेबांनाही आठवत होता तो काळ. ज्या काळात ते शिक्षक म्हणून ग्रामीण भागात रुजू झाले होते. ते गाव म्हटल्यास संपुर्ण ग्रामीण होतं आणि त्या गावातील लोकांना शिक्षक म्हणजे आपल्या घरचे सदस्यच वाटायचे. सुरुवातीला लोकं शाळेत येतांना फाटक्याच कपड्यात यायचे. अंगावर पुरेशीच कापडं असायची. ज्यातून महिलावर्गासमोर समस्या निर्माण व्हायच्या. त्यातच काही लोकं राजकारणीही असायचे. ते राजकारण करायचे. जो शिक्षक जास्त हुशार त्याला कसा त्रास देता येईल याचा ते विचार करायचे. परंतु ते सारं चालखोर साहेबांनी बदलवलं होतं. काही दिवस गेले. तसं वय वाढत गेलं व त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह करण्याचं ठरवलं. चालखोर साहेबांसाठी मुलगी बघण्याचं काम त्यांच्या वडिलांनी केलं. नोकरी असल्यामुळं त्यांना सुंदर देखणी मुलगी मिळाली. शेवटी अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला. आता ग्रामीण भागात राहणं बरोबर नव्हतं. कारण पत्नी येणार होती. तिला सांभाळणं होतं. त्यातच होणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न होता. त्यांना वाढविणं व लहानाचं मोठं करणं होतं. शेवटी तसाच विचार करुन चालखोर साहेब शहरात राहायला आले. ते आता शहरातून पायपीट करुन आपल्या नोकरीला जावू लागले. यात त्यांना बराच त्रास होवू लागला. यात त्यांना पुरेसा वेळही मिळत नव्हता. त्यातच ते पत्नीलाही वेळ देवू शकत नव्हते. कधी त्यांची पत्नी ते तिला वेळ देवू शकत नसल्यानं नाराज व्हायची. परंतु तिचे रुसवे फुगवे दूर करीत संसाराचा गाडा चालखोर साहेबांनी रेटला. त्यातच त्यांच्या पत्नीनंही त्या गोष्टीला मोलाची साथ दिली व संसार फुलला होता. चालखोर साहेब हे चाणाक्ष बुद्धीमत्तेचे धनी होते. त्यांना सखोल असं ज्ञान लाभलं होतं. त्यातच त्याच सखोल ज्ञानाच्या भरवशावर ते जेव्हा एखाद्या विचारपीठावर बोलायला उभे होत. तेव्हा ते दिवसाचे पाचसहा तासही बोलू शकत असत आणि असे करतांना पुढील श्रोत्यांना ते खिळवून ठेवत. त्यांच्यात कंचाळवाणेपण निर्माण होवू देत नसत. आज ते उत्कृष्ट वक्ते बनले होते. चालखोर साहेबांची परिस्थिती त्यांच्या बालपणात जरी हलाखीची असली तरी त्यांनी आपल्या विपरित परिस्थितीवर मात केली होती व आपल्या यशस्वी जीवनाचा श्रीगणेशा केला होता. पैसा...... पैसा आजची महत्वपुर्ण गरज. तो असेल तर सारेच आनंदात. तो नसेल तर दुःख. तो असेल तर सारेच पाप पुण्यात बदलतात आणि तो नसेल तर पुण्यही पाप बनतं. कारण पैसा बोलतो. पैसाच माणूसकी दाखवतो आणि पैसाच चारचौघात बसवतो. तो जर नसेल तर त्या माणसाची कुणी इज्जत करीत नाही. परंतु तो असून जो माणूसकी विसरतो. त्याच्यासाठी पैसा हा कर्दनकाळच बनतो व त्याला चारचौघांतूनच नाही तर जगातून उठवत असतो. हे तेवढंच खरं आहे. अलिकडील काळात पैशाला अतिशय मोठं महत्व आलेलं आहे. पैशाशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नाहीत. कोणती एखादी वस्तू घेतो म्हटल्यास ती घेता येत नाही. आपल्या पत्नीला व मुलाबाळांना सुखाचं आयुष्य देता येत नाही. पैसा...... हा पैसा अतिशय महत्वाची आजच्या काळातील गरज. पैसा नसेल तर काहीच साध्य होत नाही. कोणाचा अपघात झालाच तर त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी रुग्णालयाचा खर्च करतांना पैशाचाच वापर करता येतो. पैसा असेल तर बरेच दिवस एखाद्या व्यक्तीला जगवता येतं. बरेच लोकं म्हणतात नव्हे तर समज आहे की पैसा हा बोलतो. अन् ते खरंही आहे. ज्यांच्याजवळ पैसा असतो. त्याला गर्व असतो. असं वाटतं की तोच अतिशय गर्भ श्रीमंत आहे. बाकी त्याच्याएवढं कोणीच श्रीमंत नाही. असाच एक माझ्या पाहण्यात आलेला व्यक्ती आहे की त्याच्याजवळ पैसा आला की तो कोणालाच मोजत नाही. वस्तीत सतत इतर सर्वांशी भांडत असतो. त्याचं कारण आहे पैसा. त्याच्याजवळ असलेला पैसा हा त्याला भांडायची ताकद देत असतो. याचाच अर्थ असा की त्याच्याजवळील पैसा हा बोलत असतो. पैसा हा बोलतोच. राजकारणातही पैसा बोलतोच. पैसा जर असेल तर ओळखीचा नसलेला व कामे न करणाराही उमेदवार निवडून येतो. जर प्रत्येक मतदारांच्या खिशात हिरव्या हिरव्या नोटा टाकल्या तर....... पैशामुळं माणसाची इज्जत होते. पैसा मृत्युवेळेसही कामात येतो. समजा एखादा व्यक्ती मरण पावलाच तर त्याला दहनघाटापर्यंत नेतांना पैसाच कामात येत असतो. चार खांदे जरी मिळवायचे असतील तर पैसाच कामात येतो. कारण गरीबांच्या तिरडीलाही कुणी हात लावायला तयार नसतात. त्यातच दहनघाटावर नेल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रेताचा अंतिम संस्कार पार पाडतांना लागणाऱ्या लाकडासाठी पैसाच मोजावा लागतो आणि त्यांच्या मृत्युचं प्रमाणपत्र बनवायलाही पैसाच लागतो. शिवाय तिरडी बनवणे. तिरडी सजविणे इत्यादीसारख्या किरकोळ गोष्टींसाठी पैसाच खर्च करावा लागतो. पैसा हा जन्म घेण्यासाठीही लागतोच. कारण निःशुल्क बाळंतपण होत नाही आजच्या काळात. अगदी गरोदर असण्यापासून पैसा लागतो. कारण एकदा का भ्रूण गर्भात शिरला की त्याच्या वाढीसाठी अन् ते भ्रूण कसं आहे? व्यवस्थित आहे की नाही. इत्यादी चाचण्या करण्यासाठी पैसाच लागत असतो. त्यानंतर त्या भ्रृणाची व्यवस्थित वाढ व्हावी यासाठीही पैसा खर्च होतो. शिवाय ज्यावेळेस बाळतंपण येतं. तेव्हा आपल्याला आणि गर्भाला अजिबात त्रास होवू नये. यासाठीही चांगलं रुग्णालय पाहिलं जातं. असं चांगलं रुग्णालय शोधत असतांना पैशाचाच वापर होत असतो. पुढं बाळाचा जन्म झाला की नाव ठेवणे आले. त्यानंतर त्याचे वाढदिवस सुरु होतात दरवर्षी. या सर्व प्रक्रियेसाठी पैसाच लागतो. त्यातच असं भ्रृण पुढं तीन वर्षाचं झालं की त्याला शिक्षणासाठी चांगल्या शाळेत टाकणं आलं. त्यानंतर चांगल्या मातब्बर शाळेचं शुल्कही तेवढंच जास्त असतं. पुढं तेच भ्रूण शिकलं. लहानाचं मोठं झालं की त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न केले जातात. या नोकरीसाठीही पै पै पैसा मोजावा लागतोच. चांगल्या सुखाच्या शहरातील नोकरीसाठी कितीतरी लाखो रुपये द्यावे लागतात. त्यानंतर विवाहाचा खर्च. जेवढा व्यक्ती श्रीमंत. तेवढा विवाह थाटात केला जातो. त्यासाठी कितीतरी प्रमाणात पैशाची नासाडी होते. कारण तसा पैसा खर्च करुन धुमधडाक्यात विवाह करणे. याला आपल्या इज्जतीचं लक्षण समजलं जातं. एकंदरीत सांगायचं झाल्यास पैसा हा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे माणसाच्या जीवनातील. पैसा माणसाच्या अतिशय कामाची असलेली वस्तू. पैशाशिवाय जग चालूच शकत नाही. त्यातच पैसा हा कुणाचा जीव नक्कीच वाचवू शकतो. कारण पैसा बोलतो. जसा एखादा व्यक्ती आपल्या अतिशय जवळचा असेल आणि त्याचा अपघात झाला तर माणूस म्हणतो की जेवढे पैसे लागेल, तेवढे मी लावायला तयार आहे. परंतु जीव वाचलाच पाहिजे. हे आपण बोलत असतांना आपल्या तोंडून असे बोल का निघतात? त्याचं कारण आहे, आपल्याजवळ असलेला पैसा. परंतु हे जरी खरं असलं तरी पैसा हा सारस्वत नाही. हं, ठीक आहे की पैशाशिवाय जीवन जगणं असह्य आहे. पैसा हा कुणाचा जीव वाचवू शकतो. परंतु वेळप्रसंगी हाच पैसा आपल्या कामात पडत नाही. एखाद्या व्यक्तीजवळ कितीही पैसा असेल तरी त्या व्यक्तीजवळचा तो अतिरिक्त पैसा त्याच्या जवळच्या नातेवाईकांचा जीव वाचवू शकत नाही. हं, हे ठीक आहे की पैसा असेल तर न्यायाधीश एखाद्या व्यक्तीला फाशी देतांना न्यायालय मध्यरात्रीही उघडतं. परंतु याचा अर्थ असा नाही की पैसे जरी असतील आणि न्यायालय जरी रात्री उघडत असेल तरी त्या कैद्याची फाशी थांबवता येईल? त्याला फाशीच होत असते. हे आपणही पाहिले. तसेच कितीही पैसा असेल तरी एखाद्या अपराधी व्यक्तीला होणारी अटक तो पैसा थांबवू शकत नाही. अन् कितीही पैसा असेल तरी वेळेवर मारलेला अटॅक हा मृत्यूचे कारण बनतो. महत्वपुर्ण बाब ही की पैसा बोलतोच. राजकारणात बोलतो. राजकारणात निवडणुकीत उभे राहतांना जो उमेदवार जास्त पैसा पार्टीफंड म्हणून देईल. त्याला उमेदवारी मिळते. जो व्यक्ती उमेदवारी मिळताच जास्त पैसा खर्च करेल, तो जिंकून येतोच. न्यायालयातही पैशाच्या माध्यमातून खोटे पुरावे बनवले जातात. न्यायाधीशांना विकत घेवून न्याय बदलवला जातो. याचाच अर्थ असा की पैसा बोलतोच. तसाच वस्तीत एखाद्या व्यक्तीजवळ पैसा असेल तर त्याचा धाक असतोच वस्तीत. लोकं त्याच्या वाट्याला जात नाहीत. याचाच अर्थ असा की पैसा बोलतोच. परंतु पैसा बोलतो याचा अर्थ असा नाही की एखाद्यानं त्याचा गैरवापर करुन त्याच्या वापरातून गैरकृत्य करावं. आजची काही मंडळी पैशाच्या माध्यमातून गैरकृत्यही करतात. बिचाऱ्या गरीबांच्या गरीबीचा फायदा घेण्यासाठी माणूसकी सोडून वागतात ते. लाचार असलेल्या गरीब घरच्या सुंदर मुलींना पैशाची जेव्हा गरज भासते. तेव्हा याच मुलींना, श्रीमंत घरची मुलं पैशाच्या भरवशावर नाशवतात. त्यांना प्रलोभणे व खोटी आश्वासने देवून त्यांच्याशी गैरकृत्य करतात. त्यातच कधी कधी याच पैशाच्या भरवशावर पाशवी बलात्कारही. ते नराधम तेवढ्यावरच थांबत नाहीत तर पैशाच्या भरवशावर कधीकधी त्यांची हत्या करतात. एवढंच नाही तर तशा स्वरुपाच्या हत्या करुनही असे नराधम पैशाच्या भरवशावर पोलीस ठाणेही बांधून टाकतात आणि जर कधी पोलीस ठाणे बांधली गेली नाही तर चक्कं न्यायालयाचीच बांधणी करुन टाकतात. मातब्बर महागड्या वकिलांना केस देतात. ज्यातून गैरकृत्य करुनही त्यांना बा इज्जत बरी होता येतं. पैसा बोलतो, याचा अर्थ पैसा हा गरीबांची तोंड चूप करतो. गरीबांना श्रीमंतांकडून दिली जाणारी अल्पशी रक्कम ही उपकार ठरते नव्हे तर ठरवली जाते. त्या उपकारात माणूसकी नसतेच. परंतु माणूसकीचा कांगावा केला जातो. अन् माणुसकीही पैशाच्या भरवशावर विकत घेतली जाते. पैसा ही गरज आहे. तो जर असेल तर अख्खं आयुष्य हे ऐषआरामात जात असतं आणि पैसा जर असेल तर साऱ्या इच्छा पुर्ण होत असतात. त्यातच पैसा नसेल तर आपल्या मनातील सर्व इच्छेवर पाणी फेरावं लागतं. काही काही इच्छा बालपणापासूनच दाबल्या जातात. लहानपणी खेळणीसाठी तकादा लावणाऱ्या मुलांना पैसे नसल्यानं बाप खेळणी घेवून देवू शकत नाही. अशावेळेस त्याला त्याचे वडील ते मूल चूप राहावं म्हणून थापड मारतात. परंतु त्याचे लाड पुरवीत नाहीत. अर्जुन बाबतीत असंच घडलं होतं. त्याला आपल्या स्वतःच्या इच्छा मारुन जीवन जगावं लागलं होतं बालपणात. तर माधवीचे आईवडील नसल्यानं तिच्या मोठ्या आईकडे पैसे असूनही तिला अंधकारमय आयुष्य जगावं लागलं होतं. विशेष म्हणजे पैसा हा अतिशय महत्वाचा असून पैसा हेच जीवन आहे. पैसा जर नसेल तर माणसाचं जीवन जगणं अर्थशुन्य होवून जातं. कधी पैशाअभावी माणसं रस्त्यावर येत असतात. त्यांना फुटपाथवर आयुष्य काढावं लागतं. अन् पैसा नसेल तर जीवनाची मजाच संपून जाते. महत्वपुर्ण बाब ही की पैसा हे जीवन आहे. पैसाच सर्वोत्तम आहे माणसांच्या जीवनाला आकार देत असतांना, जीवनाला आकार देण्यासाठी. परंतु हे जरी खरं असलं तरी पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही. पैसा नसला तर माणूस जगूच शकत नाही, असे नाही. हे साध्या प्राणीमात्रावरुन तपासून पाहता येईल. त्यांच्याजवळ पैसा नसतोच. तरी ते जगतातच. चांगलं अर्थपुर्ण जीवन जगतात. तेव्हा जरी पैसा नसेल तरी जगता येत असतं. त्यामूळं पैसा जरी नसेल तरी वाईट वाटून घेवू नये. अन् ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी माजून जावू नये. कारण नदीचं पाणी पूरत नाही तर हा पैसा आहे. तोही कालांतरानं नष्ट होतोच. माज जर मनात आला तर........ रावणाजवळ त्यानं कुबेराकडून हिरावलेली लंका होती. परंतु ती जास्त काळ रावणाजवळ टिकली नाही. ती लवकरच विभीषणाला मिळाली. त्याच्या सोन्याच्या लंकेचा त्याला जास्त दिवस उपयोग झाला नाही वा त्याला सोन्याच्या लंकेचा जास्त दिवस उपभोग घेता आला नाही. पैसा हा नष्ट होतो, जर आपल्यात अहंकार आला तर....... तेव्हा पैसा बोलता है म्हणत कुणावर त्याच्या उपलब्धतेनं अत्याचार करु नये. गैरकृत्य करु नये. बलात्कार करुन कुणाचं जीवन उध्वस्त करु नये. अन् कुणाला विनाकारण त्रास देवू नये. त्यातच माणूसकी सोडूनही वागू नये. कारण पैसाच आपल्याला चारचौघात बसवतो आणि पैसाच आपल्याला चारचौघातून उठवत असतो. पैसा...... पैसा आजची महत्वपुर्ण गरज. तो असेल तर सारेच आनंदात. तो नसेल तर दुःख. तो असेल तर सारेच पाप पुण्यात बदलतात आणि तो नसेल तर पुण्यही पाप बनतं. कारण पैसा बोलतो. पैसाच माणूसकी दाखवतो आणि पैसाच चारचौघात बसवतो. तो जर नसेल तर त्या माणसाची कुणी इज्जत करीत नाही. परंतु तो असून जो माणूसकी विसरतो. त्याच्यासाठी पैसा हा कर्दनकाळच बनतो व त्याला चारचौघांतूनच नाही तर जगातून उठवत असतो. हे तेवढंच खरं आहे. चालखोर साहेबांसाठी आजची गरज होती पैसा. तसं पाहिल्यास ते लहान असतांना त्यांच्या घरी पैसा जरी असला तरी तो पुरेसा नव्हता. त्यातच पैसा हा महत्वपुर्ण असतो. हे त्यांना माहीत झालं होतं. तसेच पैसाच माणसात बसवतो व पैसाच माणसातून उठवतो हेही ते शिकले होतेच.**********************१०******************* आज आपण सेवा करीत नाही. कुणालाही त्रास देत असतो. कुणालाही तुच्छ लेखत असतो. तुच्छ बोलत असतो. अगदी प्राणीमात्रांनाही त्यांचा दोष नसतांना मारत असतो. विनाकारण झाडं तोडत असतो. फुलपाखरांना मारत असतो. हे अगदी लहानपणापासूनच करतो. परंतु या गोष्टीनं आपलेच कर्म वाईट होत असतात. ज्या कर्माचा लेखाजोखा या जन्मात नाही तर पुनर्जन्मात मिळत असते व व्याजासह तो लेखाजोखा वसूल केल्या जातो. त्यानंतर विचार येतो की आपल्यासोबत असं का घडतंय. मी तर चांगलाच वागतोय. परंतु हे आपल्यासोबत चांगलं, वाईट घडणं, आपल्या पुर्वजन्माच्या चांगल्या वाईट कर्मावर आधारलेलं असतं, यात शंका नाही. मुक्या प्राण्यांना कोणीही मारु नये. कारण तेही आपला बदला घेतात. या जन्मात नाही तर पुढील जन्मात तरी बदला घेतातच. पुर्वजन्म...... पुर्वजन्म कोणी मानत नाहीत. काही लोकं आपल्या कर्मावरही विश्वास ठेवत नाहीत. म्हणतात की मुर्तीपुजा हे सोंग असतं. देव हा नाहीच आणि भूतही नाहीच. त्या अंधश्रद्धा आहेत. देव हा आहे किंवा नाही. हे काही मला माहीत नाही आणि मी त्याबद्दल उहापोह देखील करीत नाही. एरवी देव दगडातच असतो हेही मी सांगत नाही. परंतु हे नक्कीच मला मांडता येवू शकते आणि ते मी मांडण्याचा प्रयत्नही करतो की माणसाचा पुनर्जन्म होत असेलच आणि आपण ज्यांना त्रास दिला, तेच सृष्टीचे घटक आपल्याला त्रास देत असतीलच. तसाच देवही असेलच आणि तो देव प्रत्यक्ष दगडात नसेल तर तो माणसाच्या ह्रदयात असेलच. एरवी आजच्या काळात कोणाची सेवा केली तर त्यासोबत दुःख मिळण्याऐवजी आनंद प्राप्त होत असतोच. हे प्रत्यक्ष मी अनुभवलंही आहे. देव हा दगडात नाही तर तो प्रत्येक माणसाच्या ह्रदयात आहे. मग लोकं दगडाची मुर्ती पुजायला लांबवरुन का जातात? प्रत्यक्ष जिथं देवांच्या मुर्त्या वसलेल्या असतात. तिथं गर्दी का लागते? तो दगडाचा देव पावत असेल, या कारणाने की नाही. सामान्य लोकांसमोर हाच प्रश्न उभा राहतो. त्याचं उत्तर आहे की दगडात देव नाही. देव आहे सेवेत. ज्या ठिकाणी पाषाणीय मुर्तीत देव वसलेला असतो. त्या पाषाणीय मुर्ती रुपाने का असेना, त्या परिसरात सर्वच लोकांची सेवा घडत असते. कोणी आंधळा, अपंग, म्हातारा, लाचार व्यक्ती तिथं उपाशी राहात नाही. ती जी सेवा घडते. ती सेवा म्हणजे ईश्वर. ज्याची सेवा करतो आपण. त्याची आत्मा व जो सेवा करतो, त्याची आत्मा. या दोन पवित्र आत्म्याचं मिलन होतं व त्या ठिकाणी प्रत्यक्ष रुपात नसेल, परंतु अंतर्गत जो सुक्ष्म संवाद घडतो. तोच ईश्वर असतो. आपल्याला माहीत आहे की दरवर्षी पंढरपूर यात्रेला लोकं जातात. दरवर्षी तुळजापूर भवानीला लोकं जातात आणि दरवर्षी लोकं शेगाव आणि शिर्डीलाही जातात. जिथं जत्रा भरते, तिथं जातात. कारण देव त्या ठिकाणी पाषाणीय मुर्तीत वसतो असे मानले जाते. तसंच असंही मानलं जातं की देव हा हिरण्यकक्षपूला त्यांच्याच महालातील खांबात दिसला. असं का घडलं? यात उत्तर आहे की देव हिरण्यकक्षपूला त्यांच्याच महालातील खांबात दिसणे. ही एक दंतकथा आहे. आता तो दिसला की नाही खांबात हे कुणीही पाहिले नाही. त्यातच आजच्या काळात कुणालाही देव हा प्रत्यक्ष पाषाणीय मुर्तीत कधीच दिसला नाही. हं, एक मात्र खरं की आजच्या काळात लोकांवर संकटही भरपूर येतात व अशा संकटात पाषाणीय मुर्ती नाही, परंतु प्रत्यक्ष कुणी ना कुणी ओळखीचा अनोळखीचा व्यक्ती धावून येतो. उदाहरण एखाद्या अपघाताचं देता येईल. कधी एखाद्यावेळेस अपघात घडलाच तर ओळखीची माणसं नाही तर अनोळखीची माणसं धावून येतात. जी प्रत्यक्ष देव असतात वा देवानंच पाठविलेली दूत असतात. याचा प्रत्यय प्रत्येकांना येतो. अगदी मरण जवळ असतांना व आपण मरणार आहोत हे आपल्याला माहीत असतांना अशी घटना घडते. त्यात जो व्यक्ती वास्तव रुपात धावून येतो. तो व्यक्ती कधी एखादा प्राणीही असू शकते. जसा एखाद्यावेळेस बिबट्यानं हल्ला केल्यास मांजर आडवी येणे. कधी एखाद्यावेळेस सापाचा घरात वावर असल्यास कोंबड्याचे ओरडणे. तसेच गुजरात विमान अपघातात विमान क्रॅश झाल्यावर सर्व यात्री मरण पावले. परंतु एक व्यक्ती वाचला. माळीण भुस्खलनात सर्व जमीनीत गाडले गेलेले लोकं मरण पावले. परंतु मलबा उपसतांना तीन दिवसानंतर एक तीन वर्षाची बालिका सापडली. तिही जीवंतच. हा चमत्कारच. कोणं केला हा चमत्कार. साहजिकच देवाचंच नाव येईल की नाही. या ठिकाणी देवाची प्रत्यक्ष मुर्ती येते का धावून? नाही. परंतु असे चमत्कार घडतात. म्हणतात की देशात जेव्हा त्सुनामी आली. त्या त्सुनामीच्या वेळेस एक हिरोईन वाचली. तिनं मृत्यू अनुभवला. असं बरंच वेळेस होतं. हे असं का घडतं. त्याचं कारण असतं आपले कर्म. चांगले वाईट कर्म आपण आपल्या जीवनभर करीत असतो. हे जर बरोबर आहे तर माळीण दुर्घटनेत अगदी लहान तीन वर्षाची बालिका वाचलीच कशी? तिनं असं कोणतं चांगलं कर्म केलं त्या तीन वर्षात. त्याचं कारण आहे, तिचा पुर्वजन्म. कदाचीत तिनं पुर्वजन्मात जे चांगले कर्म केले असेल. त्यामुळं ती वाचली किंवा असंही होवू शकते की कदाचीत तिनं पुर्वजन्मात केलेले पापपुण्य तिचे अनुभवायचे बाकी राहिले असेल. जसे की तिनं मागील जन्मात कोणाला त्रास दिला असेल, ज्यातून तिचा त्रास भोगायचा बाकी राहिला असेल किंवा तिची कोणी सेवा केली असेल. ती सेवा करायची बाकी राहिली असेल. म्हणूनच ती वाचली. याबाबत एक कथा आहे. असं घडतं, हे त्या कथेवरुन लक्षात येईल. ती गोष्ट. जी गोष्ट मी बालपणातच वाचली होती. ती गोष्ट होती दोन श्वानाची. त्या कथेत दोन श्वान आपापसात चर्चा करीत असताना आपल्यावर किती अत्याचार होत आहे हे गुणगुणत होते. अशातच त्यांनी एका गावात जायचं ठरवलं. ते गावात गेले. त्यावेळेस त्यांना अतिशय भूक लागली होती. त्याचवेळेस एक श्वान दुसऱ्याला म्हणाला, "आपण एकाच दिशेनं न जाता वेगवेगळ्या दिशेनं जावू. एकाच दिशेनं गेल्यावर आपल्याला जेवनाची भूक मिटवता येणार नाही." ते त्यांचं बोलणं. ते एकाच दिशेनं न जाता वेगवेगळ्या दिशेनं गेले. ज्यात पहिला श्वान एका सोनाराच्या घरी गेला. तो पुजापाठ करीत होता. अशातच त्यांनी घरी पुजेसाठी खीर बनवली होती. श्वानाला भूक फार लागली होती. त्यातच त्यानं सोनारासाठी बनविलेल्या ताटात आपलं तोंड टाकलं. तेव्हा सोनार आपल्या पत्नीला ती खीर श्वानाला आवडली असून त्याला पुर्ण ताट देण्याबद्दल म्हटलं. तसं ऐकताच सोनाराच्या पत्नीनं त्या श्वानाला ते ताट दिलं. एवढंच नाही तर भरपेट जेवनही दिलं. त्यानंतर भेटण्याच्या ठरलेल्या जागेवर तो श्वान जावून बसला. त्यातच दुसरा श्वान दुसऱ्या दिशेनं गेला असता तो एका व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्यालाही फार भूक लागली होती. तसा तो व्यापारीही पुजापाठच करीत होता. त्यातच भूक फार लागली असल्यानं श्वानानं ताटात तोंड टाकलंच. ते पाहून व्यापाऱ्यानं त्याला बदबद मारलं व कंबरडं मोडून हाकलून दिलं. पुरेसं जेवनही दिलं नाही. ज्यातून तो तडफडत, विव्हळत तिथंच बसून राहिला. थोड्याच वेळाचा अवकाश. थोड्याच वेळात पहिला श्वान, जो झाडाखाली बसला होता. त्याला झोप लागली. काही वेळानं तो जेव्हा उठला. तेव्हा अजुनपर्यंत त्याचा मित्र घरी पोहोचला नव्हता. त्यातच त्याला चिंता पडली. चिंता तो श्वान का परतला नाही, याची पडली. तोच तो त्याच्या शोधार्थ निघाला. त्यातच त्याला तो श्वान दिसला. तो विव्हळत व तडफडत होता. मग त्यांची चर्चा झाली. ज्यात दुसऱ्या श्वानानं आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगीतली. ती दुसऱ्या श्वानानं सांगीतलेली कैफियत. ती कैफियत ऐकताच पहिल्या श्वानालाही वाईट वाटलं. ज्यातून रोजरोजची ही कटकट. माणसं अशीच करतात आपल्यासोबत. आपण कितीही त्यांची सेवा केली तरीही. हाच विचार करुन ते तिर्थयात्रेला निघाले. तशी वाटेत एक नदी लागली. तसा तो विचार होताच मनात. त्याच विचारानं त्यांनी नदीत आत्महत्या करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी नदीत उडी टाकली व त्यांनी प्राण सोडला. नदीत उडी मारुन श्वानांनी प्राण सोडताच त्यांनी नवीन जन्म धारण केला. पहिला श्वान त्याच सोनाराच्या घरी त्याचा मुलगा म्हणून जन्माला आला तर दुसरा श्वान त्याच व्यापाऱ्यांच्या घरी त्याचा मुलगा म्हणून जन्माला आला. पहिल्या श्वानानं आपल्या मालकाला त्याचा पुत्र बनून धनधान्य व स्वभावानं श्रीमंत बनवलं तर दुसऱ्या श्वानानं आपल्या मालकाला त्याचा मुलगा बनवून व्यापारात डुबवलं. एवढंच नाही तर पहिला श्वान आपल्या मालकाच्या म्हातारपणात त्याची सेवा करु लागला आणि दुसरा श्वान आपल्या मालकाच्या म्हातारपणात त्याचे कंबरडे मोडू लागला. त्यांना बदबद मारु लागला. मुक्या प्राण्यांना मारु नये. मुके प्राणी तसं पाहिल्यास आपले रक्षणकर्तेच असतात. साधा एखाद्यावेळेस आपल्यावर कोणी हल्ला केल्यास मुके प्राणी अन्नाला जागतात. आपल्यापुर्वी तेच पुढे होवून होणारा वार आपल्या अंगावर झेलतात. प्रसंगी मरण पावतात. परंतु आपल्या मालकांना क्षती पोहोचू देत नाहीत. ते अन्नाला जागतात. अन् आपण आपल्या स्वार्थीपणानं त्यांची सेवा करायची सोडून त्यांना प्रसंगी त्रासच देत असतो. त्यांची एवढीशीही चूक आपण माफ करीत नाहीत. देव कधी प्राणी रुपात येतो धावून तर कधी पक्षी रुपात. कधी मानवरुपात येतो तर कधी चमत्कार रुपात. कोणताही प्राणी, पक्षी, मानव जेव्हा धावून येत नाही. तेव्हा प्रत्यक्ष देवच येतो. माळीण दुर्घटनेत एक बालिका जशी वाचवली तसा. म्हणूनच आपण देव अनुभवतो व देव आपण पाहिलेला नसल्यानं त्याचंच प्रतिकात्मक रुप म्हणून आपण त्याची मुर्त अमुर्त कल्पना करुन त्याला पाषाणात पुजतो. कुणी त्याला थडगा रुपानं पुजतात तर कोणी कशाही प्रकारचं माध्यम बनवून. ज्यातून देव आहे हे लोकांना सिद्ध करता येतं. डॉक्टरही रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करतात. अन् त्यांना कळून चुकतं की आता या रुग्णाची केस आपल्या हातात राहिलेली नाही. तेव्हा म्हणतात की मी माझे प्रयत्न केले. आता माझ्या हातात नाही. ते देवांवरच सोडा. तेव्हा नास्तिक असलेला व्यक्तीही वेळेवर देवाचा धावा करतो. तोही माध्यम म्हणून त्यांच्या धर्मात पुजत असलेल्या माध्यमांजवळ जातो. ज्यातून थोडासा चमत्कार होईल याची वाट पाहात असतो आणि चमत्कार होतोही. महत्वपुर्ण बाब ही की प्राणी पक्षी का असेना, कुणाला त्रास देवू नये. म्हाताऱ्या, लाचार, आंधळ्या अपंगांना त्रास देवू नये. शत्रूंनाही मदत करण्याची भावना असावी माणसांच्या मनात. असं जेव्हा आपण करु. तेव्हाच आपल्यासोबत चमत्कार होईल, माळीण दुर्घटनेत वाचलेल्या तीन वर्षाच्या बालिकेसारखा. कदाचीत तेव्हाच आपल्याला खांबातही हिरण्यकक्षपूसारखा देव दिसेल. कदाचीत देव मुर्तीत जरी नसला तरी मुर्तीतही देव दिसेल चांगले कर्म केले तर....... अन् कर्मच वाईट केले तर कितीही तिर्थयात्रा केल्या तरी देवाचं दर्शन दुर्लभ असेल. देव हा आपल्या कर्मावर अवलंबून आहे. देव पाहण्यासाठी तिर्थयात्रा कराव्या लागत नाहीत. तो भक्त पुंडलिकांना जसा घरातच विटेवर सापडला. तसा आपल्यालाही घरातच दिसेल. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. देव सेवेतच आहे. त्यामुळे कोणाचीही चांगली सेवा करा. मग ते मुके प्राणीमात्रा का असेना. चालखोर साहेबही दयाळू होते. ते आबालवृद्धांची सेवा करीत असावेत. हे त्यांच्या कृतीवरुन दिसून येत होतं. त्यांनाही प्राण्यांबद्दल प्रेम असेलच असं वाटत होतं. त्याचं कारण होतं, त्यांची नोकरी. त्यांची नोकरी ही ग्रामीण भागात होती की ज्या ठिकाणी त्यांचा संबंध जनावरांशीच येत असे. ते पैशावर प्रेम करीत होते. त्याचबरोबर प्राण्यांवरही प्रेम करीत असतील असं वाटत होतं. कारण ज्यादिवशी बुथवर जेवन केलं. त्यावेळेस एक श्वान आपली शेपूट हलवीत बुथवर आला. त्यावेळेस त्याला चालखोर साहेबांनी आवर्जून पोळीचा एक तुकडा टाकला होता. अर्जुनला मुक्या प्राण्यांचा अनुभव होता. तोही शाळेत जेव्हा जायचा. तेव्हा त्याचीही शाळा ज्याठिकाणी होती. तिथं जनावरं बसत असत. त्यांचा अर्जुनला सुरुवातीस राग यायचा. तो प्राण्यांवर प्रेम करीत नव्हता. जसे चालखोर साहेब प्राण्यांवर प्रेम करीत असत आणि ते प्रेम त्यांची जेव्हा गावातील शाळेत नियुक्ती झाली होती. तेव्हा चालखोर साहेबांचं प्राण्यांवरचं प्रेम दिसून येत होतं. आजपर्यंत त्यांनी अनेक शाळा पाहिल्या होत्या व अनेक शाळेत त्यांनी नोकरी केली होती. एक अशीच शाळा त्यांनी पाहिली होती. जिथं गोठं होतं. ती शाळा एका सरपंचाच्या घरी गोठ्यात भरत होती. गावात शाळा नव्हती व गावातील मुलं शिकावी म्हणून त्या गावच्या सरपंचाने प्रयत्न करुन गावात शाळा आणली होती. मात्र ती कुठे भरवावी? हा प्रश्न होता. कोणीही आपल्याजवळील जागा द्यायला तयार नव्हते. त्यातच त्या गावच्या सरपंचाने आपल्याकडील जागा दिली. सरपंचाने शाळेला जागा दिली होती. परंतु त्यांचेकडेही जागेचा अभावच होता. तेव्हा रात्रीला सरपंच जनावरं त्या शाळेला गोठा बनवून तिथं बांधत होते आणि दिवसाला तिथं शाळा भरत असे. त्यातच त्या शाळेतील शिक्षक सकाळी सरपंच उठत नसल्यानं ती गोठ्यातील जनावरं बाहेर बांधत असत आणि शेण पोयटाही करीत असत. त्यातच त्यांच्या जनावरांनाही चारा टाकत असत. तो प्रसंग व ती कथा चालखोर साहेबांनी अर्जुनला सांगताच अर्जुनचंही प्राण्यांबद्दल मत मतपरीवर्तन झालं व त्यानं प्राण्यांवर प्रेम करणं सुरु केलं होतं. आज त्यानं अशीच एक मांजर पोषली होती. परिस्थिती...... ज्याप्रमाणे अर्जुनची परिस्थिती होती, त्याप्रमाणे सुवर्णाचीही परिस्थिती होती. मात्र सुवर्णा मॅडमची थोडी परिस्थिती बरी होती. त्याही अध्यापिकाच होत्या. त्यांनी अध्यापिकेचं प्रशिक्षण पुर्ण केलं व त्या एका शाळेत नोकरीत नियुक्त झाल्या. परंतु ती शाळा त्यांच्या लायक नव्हती. ती शाळा त्यांच्या विकासाला चालना देत नव्हती. त्यातच त्यांच्या विचारांचा आदर करणारी नव्हती. ती शाळा लुट लुट लुटणारी होती. अतिरिक्त पैशासाठी तकादा लावणारी होती. त्यातच असा अतिरिक्त पैसा कमविण्यासाठी ती शाळा सुवर्णा मॅडमला त्रास देत होती. ती शाळा व त्या शाळेत सुवर्णा मॅडमला देण्यात येत असलेला त्रास. त्यातच त्यांना त्या शाळेत असलेला त्रास. स्वतःच्या अनुभवांना व विचारांना नसलेली चालना. शेवटी काही दिवस नोकरी केल्यानंतर कंटाळलेल्या सुवर्णा मॅडमनं नोकरी सोडून देण्याचा विचार केला. तशा जिल्हापरिषद शाळेच्या जागा निघाल्या व सुवर्णा मॅडम पहिल्याच श्रेणीत जिल्हापरिषदेला लागल्या. आज सुवर्णा मॅडम जिल्हापरिषद मध्ये होत्या. त्यातच आपल्या विचारांच्या प्रगल्भतेच्या भरवशावर त्या जिल्हापरिषद शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम सांभाळत होत्या. त्यातच त्या तालुक्यात असलेल्या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करायच्या. ज्यातून अशा स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांचे क्रमांक यायचे. एवढंच नाही तर वक्तृत्व कलेतही त्या माहिर होत्या व चांगले चांगले विचारपीठ त्यांनी गाजवले होते. अर्जुनचं याउलट झालं होतं. त्याला फार आवड होती जिल्हापरिषद शाळेमध्ये नोकरी करायची. तसा त्यांनी जिल्हापरिषदेच्या नोकरीचा फॉम भरला होताच व ते जिल्हापरिषदेतील अध्यापकाला लायक बनविणारी लेखी परिक्षाही पास झाले होते. परंतु दुर्दैव असं की ते इंटरव्ह्यूला गेलेच नाही. त्याचं कारण होतं, त्या खाजगी शाळेतील संस्थाचालकाचं म्हणणं. तसं पाहिल्यास अर्जुन जेव्हा सुरुवातीस खाजगी शाळेत नोकरीला लागला. तेव्हा त्याला आपण खाजगी शाळेत नोकरी करु असे वाटत होते. त्यांना खाजगी शाळेत नोकरीच करायची नव्हती. परंतु जिल्हापरिषद नोकरीसाठी कॉल येण्यापुर्वी वा अशा शाळेत नोकरीस लागण्यापुर्वी ते एका खाजगी शाळेत नोकरीला लागले व त्या शाळेतील संस्थाचालक म्हणत होते की आपण ही शाळा सोडून जिल्हापरिषद शाळेत जावू नका. कारण तिथं भरपूर त्रास असतो. काही काही शाळा या डोंगरावर असतात तर काही शाळा जंगलात. काही काही शाळा या झोपड्यातही असतात. जिथं छत गळतं. काही शाळेत जाण्यासाठी पुरेशी सोयही नसतेच. रस्ते बरोबर नसतात. कधी गुडघाभर पाण्यातून जावं लागतं शाळेत. त्यातच काही ठिकाणी चिखल सुद्धा असतं. असा चिखल पार करुन जावं लागतं शिक्षकांना. जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांना दररोजच मृत्यूशी झुंज द्यावी लागते. कधी पुरातून जावं लागतं शिक्षकांना पोहून. आपला जीव संकटात टाकून. वाघ, सिंहासारख्या हिंस्र प्राण्यांची भीती ही वेगळीच. कधी तुटक्या पुलावरुन गावं लागतं. ज्यात पुराच्या पाण्यात पडून मरण्याची भीती असते. कधी रस्त्यानं जातांना रोजच गाड्यांचा सामना करावा लागतो. काही गाड्या जाणूनबुजून अंगावर येतात. जर शाळा चांगली मिळाली नाही तर....... अन् सर्वांनाच चांगली शाळा मिळेल असं नाही. कारण सर्वांचंच नशीब चांगलं नसतंच. अर्जुनचे संस्थाचालक बोलले. तसं पाहिल्यास अर्जुनची शाळा तेवढी नावाजलेली नव्हतीच. त्यातच तो काळ असा होता की त्या काळात सरकारी नोकरीत जास्त स्पर्धा नव्हत्या. सरकारी नोकरी सहज लागत होती व त्याचेसाठी असलेली दुय्यम सेवा मंडळाची परिक्षाही तेवढ्या प्रमाणात कठीण नव्हती. थोडासा अभ्यास केला तर ती परिक्षा पास होता येत असे. अर्जुनला जेव्हा संस्थाचालक बोलून गेले. तेव्हाची परिस्थिती ही सरकारी शाळेत नोकरी सहज उपलब्ध होत असल्यानं त्या संस्थाचालकांच्या खाजगी शाळेत जास्त लोकं नोकरी करीत नव्हते. दोन चार वर्ष नोकरी करताच लोकं ती नोकरी सोडून जिल्हापरिषद शाळेत जायचे. त्याचं कारण होतं, खाजगी शाळेत शिक्षकांना असलेला त्रास. वेतन अत्यल्प असायचं व संस्थाचालक शिक्षकांना सरकारकडून मिळणाऱ्या रकमेवर डोळा ठेवायचे. पासबुक आपल्याचजवळ ठेवायचे व बँकेतील कर्मचारी वर्गाला पटवून संबंधित शिक्षकांचे वेतन स्वतः उचलायचे. त्यातच थोडीशी रक्कम शिक्षकांना देवून बाकी रक्कम हडप करायचे. अशाप्रकारे त्या काळातील संस्थाचालक मालदार बनले होते. त्यांना त्यांच्याच इशाऱ्यावर चालणारे कळसुत्री स्वरुपाचे बाहुले असलेले शिक्षक हवे असायचे. सुवर्णा मॅडमनं याच प्रकारानं सरकारी जिल्हापरिषदेतील नोकरी पसंत केली होती. परंतु तिनं खाजगी शाळेत नोकरी केली नाही. मात्र संस्थाचालकानं अर्जुनला म्हटलेली गोष्ट पटली. कारण बऱ्याचशा जिल्हापरीषद शाळा अशाच होत्या की ज्या शाळेत जायलाही रस्ते नव्हते आणि राहायलाही गाव सुरक्षीत नसायचंच. शेवटी त्यानं इंटरव्ह्यू दिला नाही व तो खाजगी शाळेतच संस्थाचालकाच्या म्हटल्याप्रमाणे राहिला. सुरुवातीचा काळ अर्जुनचा बरा गेला. त्याचं कारण होतं संस्थाचालकाचं त्याचेशी पटणं. ते गोड गोड बोलत होते अर्जुनशी. त्यातच मोठमोठी आश्वासनंही देत होते अर्जुनला. म्हणूनच ते सुरुवातीस चांगले वाटायचे व त्यांचं त्यांचेशी चांगलंच पटायचं देखील. अर्जुनचं संस्थाचालकाशी चांगलं पटणं हे काही दिवसच चाललं. ते गोड गोड बोलायचे. परंतु प्रत्यक्षात कृती वेगळीच दिसत होती. ती खाजगी शाळा व त्या शाळेत असलेली त्याची नोकरी. अशातच बरेच दिवस झाले होते अर्जुनला. अर्जुन केवळ श्रमच करीत होता. परंतु त्या शाळेतील संस्थाचालकानं त्याच्या अध्यापक रुपातील मान्यता घेतली नव्हती. अर्जुनच्या बाबीतील ती सरकारी मान्यता ते का घेत नव्हते हे कळायला मार्ग नव्हताच. त्यातच आता अर्जुनला संस्थाचालकाचा राग येत असे व रागाच्या भरात तो बोलत असे संस्थाचालकांना. म्हणत असे की त्याला आतापर्यंत सरकारी नोकरी लागली असती. परंतु त्यांनीच जावू दिलं नाही. अन् असं म्हणत असतांना संस्थाचालक त्याला निघून जा म्हणायचे. आता काळ बदलला होता. अध्यापकाला लायक ठरविणाऱ्या दुय्यम सेवा निवड मंडळाच्या परिक्षा घेणं आता बंद झालं होतं. त्यातच जिल्हापरिषदेतील सरकारी शिक्षकांच्या नियुक्त्याही काही दिवस खोळंबल्या होत्या. मात्र जागा जेव्हा निघत. तेव्हा अशा जागा अर्जुनलाही माहीत होत नव्हत्या. अर्जुनला नोकरी होती. तो त्याच संस्थाचालकाच्या शाळेत नोकरी करीत होता. परंतु त्याला वेतन अजिबात मिळत नव्हतं. अशातच पुर्वीची असलेली खस्ता हालत. त्यात आणखी भर पडली होती. तो आता आपली नोकरी सांभाळून दुसरीही नोकरी करु शकत नव्हता. त्यामुळंच त्याला कधीकधी उपासाचे फाकेही पडायला लागले होते. अशातच त्याचे वडील मरण पावले व एक आधार गेला. अर्जुनचे वडील मरण पावले होते. एक आधार गेला होता. आता आणखी एक जबाबदारी अंगावर आली होती. ती त्याच्या आईची जबाबदारी होती. तसं पाहिल्यास पहिलंच आपलं पोट भरणं कठीण होतं. त्यातच आता आईचीही जबाबदारी. काय करावं सूचत नव्हतं आणि संस्थाचालक आता अर्जुनच्या सरकारी नोकरीची मान्यता काढत नव्हता. तसा तो जेव्हा आपल्या नोकरीबद्दल आपल्या संस्थाचालकाजवळ तकादा लावायचा. तेव्हा त्याची परिस्थिती पाहून संस्थाचालकही त्याला उलटसुलट बोलायचे. कारण त्याचं प्रारब्धच तसं होतं. त्याच्या प्रारब्धानं त्याचा छळ मांडला होता. अशातच आशेचा तो एक किरण उजळला. त्याच शाळेत पटसंख्या चांगली असल्यानं संस्थाचालकाचा एक पुतन्या त्या शाळेत बाहेरच्या शाळेतून आला. तो दयाळू होता. त्याला अर्जुनची परिस्थिती माहीत झाली. मग व्यवहार झाला. अर्जुननं त्याची शाळेतील सर्व कामं करावीत. त्यातच टाचन लिहिण्यापासून सर्व कामं अर्जुननं केली व त्याच्या पुतन्यानं आपल्याच काकाच्या मागं लागून अर्जुनला सरकारी मान्यता मिळवून दिली होती.*******************११********************* अर्जुनची नोकरी सरकारी झाली होती. त्याला अध्यापक म्हणून सरकारी मान्यता मिळाली होती. त्याला वेतनही मिळत होतं. आता तो त्याला मिळणाऱ्या वेतनातून आपली आई व आपलं पोट भरु शकत होता. परंतु ते वेतन तुटपुंजं होतं. कारण त्याला जे वेतन सरकारकडून मिळायचं. त्यातील बराचसा भाग संस्थाचालकच घ्यायचा. त्याला जास्त पैसे देत नव्हता. अर्जुनला मिळणारं सरकारकडून वेतन. ते जास्त होतं. त्यातच त्याला मिळणारं संस्थाचालकाकडून वेतन. ते अत्यल्प होतं. तो सरकारी पैसा. तो अर्जुनच्या जरी हक्काचा असला तरी त्याला मिळत नव्हता. शेवटी राग अनावर होत होता. विचार यायचा की आपण असा पैसा संस्थाचालकाला देवूच नये. हा आपल्या हक्काचा पैसा आहे. अशातच अर्जुनचा विवाह झाला. कारण वय होत आलं होतं. विवाहाबाबतीतही विचार होताच की वेतनाच्या चक्करमध्ये फसून आपण आज होणारा विवाह टाळला तर उद्या वय वाढल्यावर आपल्याला सालस मुली मिळणार नाही व आपली गोची होईल नव्हे तर होत जाईल. असाच विचार करुन त्यानं आपला विवाह केला. अर्जुनचा विवाह झाला होता. परंतु अर्जुनचा झालेला विवाह टिकला नाही. कारण संसाराला कंजूषपणा चालत नव्हता. त्यातच अर्जुन थोडा कंजूषपणाच करीत होता. त्याचंही एक महत्वपुर्ण कारण होतं. ते म्हणजे पैसा. शेवटी असा पैसा त्याच्या पत्नीला अर्जुन उपलब्ध करु देवू शकत नसल्यानं त्यातच त्याच्या पत्नीच्या इच्छा आकांक्षा त्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनातून पुर्ण होत नसल्यानं त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली. ज्यातून त्याचं भयंकर नुकसान झालं. अर्जुन आता एकाकी झाला होता. आईही म्हातारीच झाली होती. त्यातच जेवनाखावण्याची पुरेशी सोय होत नव्हती. घरीच जेवन बनविण्याची अर्जुनच्या हाताची सवय पत्नी आल्यानं तुटली होती. तसं आता पत्नी गेल्यानं व सवय तुटल्यानं घरीच जेवन तयार करणं, अवघड जात होतं त्याला. शेवटी तो हताश झाला व त्यानं वेतनाचे त्याला मिळणारे पुर्ण पैसे कसे उचलता येईल याचा विचार केला. मग काय, राग होताच अर्जुनच्या मनात संस्थाचालकाच्या बाबतीतील. त्यानं संस्थाचालकाजवळ ती गोष्ट बोलून दाखवली नाही. तो बँकेत गेला. त्यानं बँकेत पासबुक हरविल्याचा अर्ज दिला. संबंधित अर्जाला पोलीस स्टेशनचा अर्ज जोडला व पासबुक उचललं. ज्यातून त्याला पुर्ण वेतन मिळत होतं व तो आता तो सुखी झाला होता. अर्जुनला आता पुर्ण वेतन मिळत होतं. तो सुखीही झाला होता. परंतु हे सुख त्याला जास्त काळ उपभोगता आलं नाही. कारण त्यानं जेव्हा पुर्ण वेतन उचलण्यासाठी टावले उचललीत व पुर्ण वेतन मिळवलं. त्याचा राग संस्थाचालकाला आला. त्याच्या मनात बदल्याची भावना वृद्धिंगत होत चालली होती. वाटलं होतं त्यांना की जीवनभर आपण अर्जुनला लुटू. परंतु ते त्यानं उचललेल्या पासबुकनं शक्य झालं नव्हतं. आता त्याला जरी पुर्ण वेतन मिळत असलं आणि तो जरी सुखी झाला असला, तरी संस्थाचालकानं अर्जुनच्या नोकरीमध्ये काटे पेरुन ठेवले होते. जे काटे उपटून टाकत असतांना व त्या काट्याचा सामना करीत असतांना अर्जुनला नाकीनव येत होतं. तरीही तो जगत होता. धीरानं, साहसानं आणि तेवढ्याच ताकदीनं. संस्थाचालकाच्या कौरवरुपी बाणाचा सामना करीत होता तो अर्जुन. ज्या संस्थाचालकाच्या शाळेत भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, शकुनी, अश्वत्थामा, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन असे अनेक प्रकारचे वीर होते. ते वीर कुरघोडीचं व निंदेचं राजकारण करीत असत, आपली पोळी शेकण्यासाठी. त्यांना वाटत होतं की आपण जर अर्जुनच्या कुरघोडी वा निंदा संस्थाचालकाला सांगीतल्या तर संस्थाचालक आपल्याला चांगला म्हणेल. आपली कामं करेल. आपल्याशी गोडगोड बोलेल व आपल्याला अजिबात त्रास देणार नाही. अर्जुननं पासबुक उचललं होतं. त्याला आता पुर्ण वेतन मिळायला लागलं होतं. त्यातच त्याचं जीवन सुखी झालं होतं. आता त्यानं दुसरी पत्नी केली होती. सारं काही बरोबर होतं. ते सुख पाहणं विधात्याला मंजूर नव्हतं. संस्थाचालक संधी शोधत होते. ते बदला काढण्याची वाट पाहात होते. अशातच ती वेळ आली व संस्थाचालकाजवळ एकदा नामी संधी चालून आली. ती नामी संधी होती वरीष्ठ वेतन श्रेणी न लावणे. आज बारा वर्ष होवून बराच काळ लोटला होता अर्जुनच्या नोकरीला. अजुनपर्यंत त्याला वरीष्ठ श्रेणी लागली नव्हती. आतापर्यंत संस्थाचालकांनी त्याला बराच त्रास दिला होता. त्यातच कधी इंन्क्रीमेंटवरुन वाद व्हायचा तर कधी वेतनावरुन. कारण त्या शाळेत नियुक्त करण्यात आलेले मुख्याध्यापक हे संस्थाचालकाचे जवळचे नातेवाईक होते. ज्यातून तात्कालिक कारण घडलं. वरीष्ठ श्रेणी लावण्यावरुन त्या दोघात वाद झाला. ज्याची परियंती अर्जुनचं वेतन बंद करण्यात झाली व पुन्हा एकदा अर्जुनच्या समोर उपासतापास भोगण्याची पाळी आली होती. तो वाद व वेतन बंदचा काळ आठवत होता आज अर्जुनला. त्या शाळेतील महाभारताच्या लढाईत संस्थाचालक रुपी कौरव जिंकतील की अर्जुन जिंकेल. अशी ती हातघाईची लढाई होती. त्यातच वेतन तर बंदच करण्यात आलं होतं अर्जुनचं. व्यतिरिक्त त्याला चिडविणं सुद्धा सुरु होतं. मुख्याध्यापक सतत धमकी देत होते. म्हणायचे की अर्जुननं आपल्या पत्नीचं कुंकू पुसून टाकावं. माझ्याजवळ सात पिढ्या पुरेल एवढं धन आहे. मी केव्हाही अर्जुनला समाप्त करु शकतो. त्या धमक्या, त्यातच त्या धमक्यानुसार संयमानं वागणारा अर्जुन, त्या धमक्यांचा बळी ठरला नाही. तो शांतपणे वागत राहिला. त्यानं लागलीच वेतनबंदचा खटला दाखल केला व तो खटला जिंकला. तो वेतनबंदचा खटला. अर्जुन तो खटला जिंकताच संस्थाचालकाच्या मनाचा भडका उडाला. त्यातच तो पुन्हा चवताळून उठला. ज्यातून त्याचे कारनामे मुख्याध्यापकामार्फत सुरु होते. अर्जुनच्या शाळेतील मुख्याध्यापक द्रोणाचार्यासारखा अर्जुनवर आपल्याकडील शस्राचा मारा करायचा. त्यातच त्याला लाभलेला संस्थाचालकरुपी शकुनीही अर्जुनला जगू द्यायचा नाही. काळ ओसरत होता. तसतसे समीकरण बदलत गेले. ज्यातून अर्जुन महाभारताचं युद्ध जिंकत गेला. त्यानं एकेक योद्धे संपवले आपल्या वागण्यातून. कारण नियती क्रिष्ण बनून त्याचेच सोबत होती त्याचं भाग्य बनून. नियतीच्यानुसार अर्जुन खटला जिंकताच संस्थाचालकानं त्याला घरी न बसवता काही दिवसानं त्याचं वेतन सुरु केलं होतं. तसे दोन वर्ष गेले. दोन वर्षानंतर आणखी एक क्लृप्ती काढली संस्थाचालकानं. त्यानं पुन्हा मुख्याध्यापकामार्फत अर्जुनला त्रास देणे सुरु केले होते. ज्यात आता वेतन सुरु होतं अर्जुनचं. परंतु त्याची ज्या गोष्टीसाठी नियुक्ती केली होती. ती सेवा बंद होती. जसा वर्गच दिला नसल्यानं वर्ग शिकवणं बंद होतं. तब्बल हे कृत्य त्यानं दोन वर्ष केलं. यावेळेस अर्जुन शाळेत जात राहिला. परंतु तो बसून ते वेतन घेत होता. वर्ग न शिकवता असं ते वेतन घेणं अर्जुनला जड जात होतं. परंतु त्याचेजवळ कोणताच उपाय नव्हता. त्यातच दोन वर्ष तसंच ठेवून अर्जुनला वर्ग दिला मुख्याध्यापकानं. परंतु त्यानंतर तो वर्गाची परिक्षाच घेवू द्यायचा नाही. त्याचे पेपर इतर चापलूस शिक्षकांना घ्यायला लावत होता. त्यातच त्यांनाच ते पेपर तपासायला लावत होता. शिवाय बसून घेतले गेलेले वेतन परत द्या. असेही तो म्हणत होता. संस्थाचालकानं अर्जुनला मुख्याध्यापकामार्फत भयंकर त्रास दिला. देत राहिला. परंतु आज तो जिंकला होता त्रासातून. कारण असाही तो दिवस आला की ज्या दिवशी अर्जुन त्रासातून मुक्त झाला होता. आजचा तो दिवस. सकाळचे आठ वाजले होते. मुख्याध्यापक गाडी चालवत होता. तो विचार करीत व बोलत बोलत गाडी चालवत होता व त्याच्या गाडीवर एक व्यक्ती पाठीमागे बसला बसला होता. दोघांच्या गोष्टी चालल्या होत्या जोरात. तसे ते मुख्य रस्त्यावर आले. त्यातच चौक आला. सिग्नल बंद होता. लाल लाईट सुरु होता. परंतु अहंकारानं फुगलेल्या मुख्याध्यापकानं तो लाईट पाहिला नाही व त्यानं सिग्नल तोडत आपली गाडी नेली. अशातच ज्यांचा सिग्नल सुरु होता. तिकडून गाड्या येणं सुरु झाल्या होत्या. अशातच येणाऱ्या एका गाडीनं मुख्याध्यापकाच्या गाडीला धडक दिली. तो मुख्य रस्ता व त्या रस्त्यावरुन बोलत बोलत जात असतांना अचानक त्याचं लक्ष समोर गेलं. समोरुन अनेक गाड्यांचा ताफा येत होता. समोरुन येणारा तो गाड्यांचा ताफा. तो अचानक समोर आला. त्या गाड्यांवर गोष्टीत असलेल्या मुख्याध्यापकाचं अचानक लक्ष गेलं व ते लक्ष अचानकच गेल्यानं मुख्याध्यापकाचं गाडीवरचं लक्ष विचलीत झालं. तसं नियंत्रण बिघडलं. त्यातच त्याचा अपघात झाला व तो जागीच मरण पावला होता. मुख्याध्यापक जागीच मरण पावला होता. त्यांच्यामार्फत अर्जुनला होणारा त्रास संपला होता. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आजही अर्जुनचा त्रास संपला नव्हता. आता स्वतः संस्थाचालक समोर येवून अर्जुनला त्रास देत होता. मुख्याध्यापक मरण पावला होता व त्यानंतर अर्जुन मुख्याध्यापक बनला होता. तो कायमस्वरुपी मुख्याध्यापक नव्हता तर कार्यालयानं त्याला तात्पुरते मुख्याध्यापक पदाचे अधिकार दिले होते. ज्यातून तो दावेदार बनला होता शाळेचा. तोच शाळा चालवत होता. त्यामुळंच त्या शाळेचा ट्रस्टी असलेला संस्थाचालक आणखी चिडून गेला होता. कारण अर्जुन मुख्याध्यापक बनल्यानं आता संस्थाचालकाचं काहीही चालेनासं झालं होतं. जो त्याचा आधीपासूनच विरोधक होता. मुख्याध्यापक मरण पावल्यानं संस्थाचालकाला मुख्याध्यापक बनवायचे असलेले अधिकार डावलून व नियम डावलून शिक्षणाधिकारी महोदयांनी अर्जुनला मुख्याध्यापक पदाचे अधिकार दिले होते. ज्यातून संघर्ष होताच अर्जुनच्या जीवनात. तसं संस्थाचालकाला माहीत होताच संस्थाचालकानं शाळेतील संपुर्ण रेकॉर्ड आपल्या घरी नेला होता. ज्यातून मुख्याध्यापक म्हणून कार्यालयानं नियुक्त केलेल्या अर्जुनला मुख्याध्यापक म्हणून कार्य करता येवू नये. तसा रेकॉर्ड अर्जुन मुख्याध्यापक असला तरी त्याचेजवळ नसल्यानं त्याला पुन्हा त्रासच होत गेला. ज्यातून रेकॉर्ड मिळविण्यासाठी त्याला प्रसंगी न्यायालयीन लढाईदेखील लढावी लागली. शाळेत पटसंख्या वाढवायची असेल तर...... शाळेत चांगले शिकवले जावे व शाळेत कोणत्याही स्वरुपाचे वाद होवू नयेत. संस्थाचालक आणि अर्जुन, अशी ती लढाई. लढाई करीत करीत अर्जुन डबघाईस आला. परंतु त्यानं हार मानली नाही. तो लढत राहिला. त्यानं शाळेतील महाभारताचं युद्ध जिंकलं होतं. तसंच त्यानं त्या लढाईतून शाळेचा बराचसा रेकॉर्डही मिळवला होता. परंतु ही लढाई करीत असतांना त्याचं बरंच नुकसान झालं होतं. अन् नुकसान होणारच होतं. लढाईत कोणीही जिंकला तरी नुकसान दोन्ही पक्षाचं होतं. कारण ती लढाई असते. ज्याप्रमाणे महाभारताची लढाई अर्जुन स्वतःच्या भरवशावर जिंकला असला तरी त्यानं राज्य युधीष्ठीराला दिलं होतं. कालांतरानं किटकिट होवून याही अर्जुननं पद सोडलं आणि पुढं जावून त्यानं स्वतः मुख्याध्यापक पद न घेता एका शिक्षिकेला ते पद दिलं. त्यानंतर ती निवृत्त होताच त्यानं पुन्हा दुसऱ्याच शिक्षिकेला ते पद दिलं. तसं पाहिल्यास अर्जुन लोभी नसल्यानं त्यानं सर्वकाही केलं. त्यातच त्यानं संस्थाचालकाकडून रेकॉर्डही मिळवला होता. कधी शाळेत वाद होतच होते. त्यातच अर्जुन आता सामोपचारानं वागत होता. अर्जुन महान होता. ज्यानं महाभारताचं अख्खं युद्ध आपल्या युद्धकौशल्यानं जिंकलं. त्याला मदत केली त्याच्या पाच भावांनी. त्यातच एक भाऊ कौरवांच्याच बाजूनं लढला. अर्जुनला विजय मिळाला. कारण त्यानं धर्मनीतीनं युद्ध केलं. त्याची बाजू सत्याची होती. सत्यनिष्ठाही होती त्याच्या वागण्यात. तसंच घडलं याही अर्जुनच्या बाबतीत. त्याला मदत करणारा एक शिक्षक शेवटी कर्णासारखा दल बदलवून मुख्याध्यापकाच्या बाजूनं गेला. ज्यातून अर्जुनला आपली लढाई जिंकण्यात व्यत्यय निर्माण झाला होता. *********************१२******************** आज अर्जुन म्हातारा झाला होता. तसा निवृत्तही झाला होता. परंतु ते क्षण. ती नोकरी आणि त्या नोकरीत भोगलेला त्रास आताही त्याला आठवत होता. तसाच त्याला तो इलेक्शनचा कुंभमेळा आठवत होता. ज्यात माधवी, सुवर्णा मॅडम व चालखोर साहेब मिळाले होते. अर्जुनला ज्याप्रमाणे इलेक्शनच्या आठवणी आठवत होत्या. त्याचप्रमाणे आठवत होतं ते इलेक्शन. ज्या इलेक्शनात त्याचीच एक दहावीतील मैत्रीण रात्री अकरा वाजता त्याला भेटायला आली होती. तिनं रात्री अकरा वाजता त्याला जेवनाचा डबा आणून दिला होता. तो तिनं आणलेला जेवनाचा डबा. त्यातच तिनं तिच्या पतीजवळ केलेली जिद्द त्याला आज आठवत होती. ती भेट अर्थात दहावा वर्ग सोडून आज तीस वर्षानं झाली होती. आज अर्जुन जसा बुथवर पोहोचला होता, त्या केंद्राच्या. तेव्हा त्यानं आपल्या गतकाळात असलेल्या दहाव्या वर्गातील मुलीला फोन लावला होता. जी त्याच बुथाच्या जवळपास राहात होती. त्यावेळेस त्यानं तिला तो जिथे होता. त्या ठिकाणाबाबत सांगीतलं होतं व सांगीतलं होतं की त्याची तिथंच ड्युटी लागलेली आहे. तेव्हा तिनंही जेवनाची सोय आहे की नाही, याबाबत विचारलं होतं. तसं नकळतच त्याच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं. 'नाही' ते इलेक्शन बुथ. त्या बुथावर जेवनाची सोय नव्हती. परंतु जेवनाची सोय जरी नसली तरी त्या बुथवरील लोकं रात्रीला जेवन करायला आळीपाळीनं रेस्टॉरेंटला जात असत व जेवून येत असत. तसा अर्जुनही जेवन करुन येणारच होता. तसं अर्जुननं तिला जेवनाची सोय नाही असं उत्तर देताच ती म्हणाली, "मी जेवनाचा डबा आणते. तू जेवायला कुठे जाशील नको." तिनं म्हटलेले ते शब्द. तसा विश्वास होताच त्याचा तिच्यावर. तशी रात्र झाली. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. तसा त्यानं परत फोन केला आपल्या मैत्रीणीला. म्हटलं, "जेवनाचा डबा आणू नकोस. मी जेवन करायला चाललोय." ते अर्जुनचं बोलणं. त्यावर ती म्हणाली, "मी जेवन बनविलेलं आहे. परंतु जावई यायचे आहेत ड्युटीवरुन. ते आले की येतेच लगेच." तिनं म्हटलं. "अगं नको येवूस. मी जातोय जेवन करायला रेस्टॉरेंटला." ते त्याचं बोलणं. त्यावर ते बोलणं ऐकताच ती म्हणाली, "मग मी तुझ्यासाठी बनवलेलं जेवन फेकून देवू का?" "उद्या खाशील." "आम्ही शिळं खात नाही. तू नकार देत असशील तर हे अन्न मी फेकून देणार व उद्यापासून तुझ्याशी अजिबात बोलणार देखील नाही." ते तिचं म्हणणं. त्यावर तो हारला. त्यानं तिच्या जिद्दीला सलाम ठोकला व 'ये' असं म्हणत तो ती येईपर्यंत तिची वाट पाहू लागला. अकरा वाजले होते. तशी ती आली. ती जवळ आली. त्यातच तिनं फोन लावला व ती आल्याचं तिनं सांगीतलं. तसा दुरुन पाहात असलेल्या अर्जुनला ती दिसली. त्यातच तिच्या फोनवरुन तीच असल्याची पुष्टी झाली. तो दहावा वर्ग. तो दहावा वर्ग सोडून आज तीस वर्ष झाले होते. चेहरे थोडेफार बदलले होते. परंतु तरीही त्या दोघांनी एकमेकांना ओळखलं व जुनं प्रेम आठवलं. ते शाळेतील प्रेम. दोघंही एकमेकांवर प्रेम करायचे. परंतु त्यांचा ब्रेकअप झाला होता. कोण्या शाळेतील मुलानंच त्यांच्यात आग लावून ते प्रेम तोडलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. परंतु आज तीस वर्षानंतर त्याच्याच जुन्या मित्रानं जो व्हाट्सअपवर ग्रुप बनवला होता. ज्यात ती होती व त्यानं आपला हेका सोडून तिच्याशी जेव्हा बोलणं सुरु केलं होतं. तेव्हा नातं बदललं होतं. आज तिचा विवाह झाला होता व ती त्याला दादा म्हणत होती. तिनं त्याला ओळखलं व तशी त्याच्या ओळखीची पुष्टी झाली. आज तब्बल तीस वर्षानंतर दोघंही परत भेटणार होते. भेटीचं आकर्षण होतं. ज्यातून ती आज त्याला भेटायला आली होती. ते भेटले होते. त्यातच पुष्टी झाली होती की तो तोच आहे, तिच्या शाळेतील दहावीचा मित्र. तद्नंतर तिनं त्याला ओळखताच तिनं त्याच्या हातात जेवनाचा डबा दिला. त्यानंतर काही वेळ त्यांच्या गोष्टी सुरु झाल्या. गोष्टीगोष्टीत तिचा पती म्हणाला, "बघा, आपणाला भेटायची ओढ हिच्यात किती होती. मी दहा वाजता जेव्हा घरी पोहोचलो. तेव्हा मी बराच थकलो होतो व इकडे येण्याच्याही तयारीत नव्हतो. परंतु जिद्दच हिची. हिच्या जिद्दीपुढे मी नतमस्तक झालो. त्यातच तुम्हाला भेटण्याच्या तुमच्या ओढीनं हिनं आणलं मला. बघा, ही विलक्षण ओढ आहे. म्हणत होती की तीस वर्ष झालेय, मला त्याला पाहायचंच आहे. भेटायचंच आहे. आपण चलाच. अन् चलावंच लागेल. आता पत्नीचीच ती ओढ. मी आलोय लगेच घेवून." ती दहावीची मैत्रीण, ती मैत्रीण रात्री अकरा वाजता जेवन घेवून आली. त्यानंतर अर्जुनचं जेवन होईपर्यंत ती थांबली. इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टीही झाल्या. त्यातच काही सुके पदार्थ दुसऱ्या दिवशीसाठी देवून ती रवाना झाली व रवाना होता होता म्हणाली, "मला माहीत आहे आपल्या ड्युटीबद्दल. आपली ड्युटी कशी असते ते. कधीकधी आपल्याला जेवनही नशीब नसतं. माझ्या पतीचीही अशीच ड्युटी लागायची. ज्यात त्यांनाही जेवन मिळायचं नाही. उपाशीच राहावं लागायचं." ती गेली होती. परंतु ती अर्जुनला जीवनभर लक्षात राहिली. तिची ती रात्रीची भेट. ती अकराची वेळ. आजही त्याला आठवत होतीच. तो इलेक्शनचा कुंभमेळा. तसा आणखी एक प्रसंग अर्जुनला आठवत होता. गतकाळात अशीच अर्जुनची ड्युटी एका केंद्रावर लागली होती. ज्यात त्याच्या सोबतीला एक पुरुषच होता. कारण स्रिया घरी गेल्या गेल्या. त्यांना त्या स्रिया असल्यानं जावूच द्यायचं होतं. त्यातच रात्रीला त्यांच्याही जेवनाची सोय नव्हतीच. यावेळेस अर्जुन प्रेसायडींग होता. ज्यावेळेस अर्जुनवर ती रात्र उपासात काढण्याची वेळ आली. तेव्हा अर्जुनच्या जेवनाची सोय लगतच्याच पुरुष मित्रानं केली होती. त्याचं कारण होतं त्याचं घर. त्याचं घर जवळपासच होतं व त्यानं दोघांसाठीही घरुन जेवनाचे डबे बोलावले होते. अर्जुनला इलेक्शन ड्युटी बाबतीतील बरेच अनुभव आले होते व आज तेच अनुभव निवृत्त झाल्यानंतर आठवत होते. अर्जुनच्या वार्धक्यात त्याची भेट झालेली माधवी. जास्त वेळ ती अर्जुनजवळ उभी राहिली नाही. कार्यक्रम संपताच ती निघून गेली. तसा अर्जुनही परत आपल्या घरी निघून आला. परंतु ती आठवण त्याला सतत येत होती. ती माधवी आठवत होती. त्यातच आठवत होती सुवर्णा आणि ते चालखोर साहेबही. ते चौघेही जण अर्जुनला अगदी मरणापर्यंत आठवत होते. एखाद्या ध्रृवताऱ्यांप्रमाणे. जो ध्रृवतारा आपलं अस्तित्व जोपासत होता. इलेक्शन....... इलेक्शनात हौसे, नवशे गवसे सारेच उभे राहात असतात. त्यातच असे हौसे नवशे गवसे, ज्याचं कोणत्याच स्वरुपाचं कार्य नसतं. ते आपल्या आपल्या पद्धतीनं निवडणूक लढवीत असतात. त्यातच अशी निवडणूक जिंकण्यासाठी डावपेच रचत असतात. कारण निवडणूक ही एक प्रकारची लढाईच असते. निवडणूक ही साम, दाम, दंड व भेद. या सर्वच प्रकारांनी लढवावी लागते. ज्यात कधी एखादं कांड केलं जातं. कधी नोटा वाटल्या जातात आणि कधीकधी दारुही पाजली जाते. ज्यातून अज्ञानी मतदार भुलतो व तो अज्ञानी मतदार अज्ञानी माणसालाच मतदान करुन मोकळा होतो. निवडणूक असली आणि निवडणुकीत मतदानात सर्वच मतदारांना मतदान करण्याची संधी असली तर...... हे झालं देशाचं मतदान. परंतु काही काही संस्था अशाही असतात की सर्वच मतदारांना मतपत्रिका पाठवल्या जात नाहीत. मतदान होतं व संस्थेच्या घटनेनुसार दर तीन किंवा पाच वर्षांनी मतदान घेतलं जातं. परंतु ज्यात मतपत्रिका पोष्टानं पाठवल्या जातात. ज्यात आतापर्यंत संस्थेवाले मतपत्रिका ह्या कंपूतील लोकांनाच पाठवत असतात. जे त्यांनाच मतदान करु शकतात. सर्वच मतदारांना मतपत्रिका पाठवल्या जात नाहीत. कारण कोणाकोणाला मतपत्रिका पाठवल्या गेल्या. हे काही दिसत नाही आणि कोणताच मतदार त्यावरील पुरावे हक्कानं मागू शकत नाही आणि ते पुरावे एखाद्यानं मागितलेही. तरी देत नाहीत. कारण कायदे किचकट असतात. आता मात्र तसं नाही. आता कायद्यात अशी माहिती मागण्यात एक प्रकारची सरलता आली आहे. आता लोकं माहिती अधिकाराचा वापर करुन त्यांना हवी असलेली माहिती मागतात व ती संस्था जरी असली तरी तिलाही माहिती ही द्यावीच लागते. चालढकलपणा करता येत नाही. निवडणुका या पारदर्शक व्हाव्यात. याच पाश्र्वभूमीवर आजच्या निवडणूका आधारलेल्या आहेत व त्याच अनुषंगानं माहिती अधिकाराचा कायदा याही क्षेत्रात काम करतो. त्यातच निवडणूक राबविणाऱ्या यंत्रणाही त्याच पद्धतीनं कार्य करतात. कारण एखाद्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केल्यास तोच पेचात येवू शकतो. म्हणूनच निवडणूका पारदर्शक होतात नव्हे तर त्यात पारदर्शकता आणावीच लागते. हे महानगरपालिकेचं इलेक्शन होतं. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणूका पार पडल्या होत्या. ज्या निवडणूका पारदर्शकतेनं पार पडल्या होत्या. तरीही काही लोकांचं म्हणणं होतं की या निवडणुकीत पैसे वाटले गेले. दारुही वाटप झाली. परंतु या दोन्ही गोष्टींचे मोजमाप कायद्याच्या चौकटीतून करता येत नव्हतं. कायदा असं म्हणत नव्हता की त्यांचं मोजमाप करा आणि माहिती अधिकार कायदाही त्या ठिकाणी लागू होत नव्हता. कारण अशा अनैतिक मार्गाच्या पैशाचं वाटप वा दारुचं वाटप हे प्रत्यक्ष उमेदवार करतो. त्यातच जो पैसा खर्च करतो. तो आपल्या ठोस खर्चात दाखवतच नाही. ऐकिवात आलं होतं की एका उमेदवारानं या निवडणुकीत एक कोटी रुपये खर्च केले. त्यानं जाहीर केलं व लेखाजोखा दाखवला होता. म्हणूनच खर्च दिसला. बाकीच्यांनीही तेवढाच पैसा खर्च केला. परंतु त्यांनी दाखवला नाही तो खर्च. निवडणूका पारदर्शक व्हाव्यात. यासाठी पुर्वीपासूनच सरकार कटिबद्ध आहे व त्यासाठीच त्यांनी आता इव्हिएम मशीन आणली. तिच्यात घोळ करता येत नाही असा विचार करुन. कारण मतपत्रिका ज्यावेळेस होत्या. त्यावेळेस गुंड प्रवृत्तीची माणसं बुथावर गुंडागर्दी करुन तेथील अधिकाऱ्यांना धमक्या देवून बुथावरील मतपत्रिकेवर आपल्याच हातानं शिक्के मारत असत. ज्यातून गठ्ठा मतदानानं ज्या उमेदवाराला निवडून द्यायचं नसेल. तेही निवडून येत असत. आता तसं नाही. इ व्हि एम मशीनमध्ये मताची नोंद व्हायला वेळ लागतो. त्यामुळंच गठ्ठा मतदान करताच येत नाही. तरीही काही लोकं इ व्हि एम मशीनवर शंका घेतच असतात. म्हणतात की इ व्हि एम मशीन सेट केली जाते. म्हणूनच मित्रपक्ष निवडून येतो. ती महानगरपालिकेची निवडणूक होती. ती संपली होती. त्याला बरेच वर्ष झाले होते. परंतु ती आठवण आजही त्या चौघांच्याही ह्रृदयात घर करुन होती. कदाचित ते सर्व विसरले असतील त्या काळात आलेल्या कडूगोड आठवणी. परंतु अर्जुनला आजही ते वर्ष, ते काम व त्यांची सोबत आठवत होतीच. *******************१३********************* सौंदर्य...... सौंदर्य हे शाश्वत नसतंच. सुवर्णा मॅडम सौंदर्याला जास्त महत्व देत असल्याचं जाणवत होतं. जेव्हा ती इलेक्शनच्या कुंभमेळ्यात भेटली होती. काळ निघून गेला होता व अर्जुनही निवृत्त झाला होता. सुवर्णा मॅडमचंही वय झालं होतं. परंतु त्या निवृत्त झाल्या नव्हत्या. अशातच एकदा त्यांची भेट जिल्हापरिषदेतील शाळेत झाली. जेव्हा अर्जुन आपल्या एका नातेवाईकाच्या मुलासोबत त्या शाळेत गेला. अर्जुनच्या नातेवाईकाला टिसी हवी होती. त्यातच सोबत असावी म्हणून अर्जुनला शाळेचा अनुभव असल्यानं त्याला घेऊन तो नातेवाईक त्या शाळेत गेला. अर्जुननं मारलेली शाळेतील इन्ट्री. त्यातच त्याला तिथं सुवर्णा मॅडम दिसली. त्यांचा चेहरा थोडा काळवंडलेला होता. चेहर्‍यावर तसं पाहिल्यास कोणताच मेकअप नसल्याचं दिसत होतं. चेहरा थोडा बदलला होता. परंतु तो फारसा बदलला नव्हता. त्यातच अर्जुननं त्यानंतर त्यांना सहजच ओळखलं. विचारणा केली, "आपण सुवर्णा मॅडम का?" सुवर्णा मॅडमनं ते ऐकलं. तशा त्या म्हणाल्या, "होय. का बरं?" "सुवर्णा पाटील नाव आहे ना आपलं?" "होय. का बरं? मी सुवर्णा पाटीलच." अर्जुननं विचारलेल्या प्रश्नावर पुष्टी झाली होती. तसा तो म्हणाला, "आपण मला ओळखलं काय?" अर्जुननं त्यांना विचारलं. तोच त्या अर्जुनकडे पाहातच राहिल्या. तशा त्या चेहर्‍यावरचे भाव बदलवत राहिल्या. विचार करु लागल्या की समोरील आपलं नाव जाणणारं व्यक्तिमत्त्व कोण असावं. परंतु ते लक्षात न आल्यानं त्यांनी म्हटलं, "ओळखल्यासारखं वाटतंय. परंतु नीट ओळखलं नाही. आपण ओळख सांगाल तर नक्की आठवेल मला." असे म्हणत त्या आपल्या हातातील काम करु लागल्या. तोच अर्जुन म्हणाला, "मी अर्जुन. इलेक्शनच्या कुंभमेळ्यात काम केलेला. आपणही होत्या त्यात माझ्यासोबत कार्य करायला. आता आठवते का?" "नाही आठवत." "अहो मॅडम, आठवा. आपल्याला अमूक अमूक शाळा मिळालेली होती. तिथंच काम केलं होतं आपण." तो म्हणाला. त्यावर उत्तर देत ती भ्हणाली, "नाही आठवत." अर्जुनला त्या स्पष्टपणे नाही आठवत असं सांगत होत्या. आता त्या असं का बोलतात, याचा विचार अर्जुनला आला होता. त्यातच त्यानं परत एकदा प्रयत्न करावा म्हणून म्हटलं, "चालखोर साहेब. चालखोर साहेब आठवतात का? ते आपले प्रेसायडींग होते." चालखोर साहेब. त्यांचं नाव काढताच पटकन आठवलं सुवर्णा मॅडमला. तशा त्या म्हणाल्या, "होय चालखोर साहेब आठवतात. त्यांचं प्रेसायडींग म्हणून केलेलं कामंही आठवतं." "मग मी नाही आठवत काय?" "आठवलं, अर्जुन. एक साहित्यीक अर्जुन." "होय, तोच मी साहित्यीक अर्जुन. आपल्यासोबत काम केलेलं." "आता कसे आहात? काय चाललं आहे आणि काय सुरु आहे?" "मॅडम, आता मी निवृत्त झालेलो असून सुखात आपलं आयुष्य काढत आहे." त्यानं उत्तर दिलं. तोच थोडा वेळ शुकशुकाट होता. तोच तो शांतता मोडत म्हणाला, "किती वर्ष बाकी आहेत आपल्याला?" "एक वर्ष. हे शेवटचंच वर्ष आहे. मग मीही आपल्यासारखीच निवृत्त होणार. मग मजेत राहिल सगळं." ती म्हणाली. त्यानंतर बऱ्याच इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्या व अर्जुन तेथून निघून घेला. परंतु जातांना तो त्यांच्याबाबत विचार करु लागला की ह्या सुवर्णा मॅडम, ह्या सौंदर्याला जास्त महत्व देत होत्या. म्हणत होत्या की आपण चांगले दिसलो तर त्याचा परिणाम हा पालकांवर व विद्यार्थ्यांवर होतो. तेही तसेच वागतात आणि वागायला पाहिजे. परंतु आता ते सौंदर्य कुठं गेलं? चेहर्‍यावर सुरकृत्या आल्याय. चेहरा काळवंडलाय. त्यातच काल सौंदर्याला महत्व देणाऱ्या सुवर्णा मॅडम आज मेकअप करीत नाहीत. कदाचीत त्याचं कारण तरुणपण. तरुणपणातच वाटतं की आपण उठून दिसावं. परंतु जसं जसं वय वाढतं. तसंतसं सौंदर्याचं महत्व वाटत नाही. तेच घडलं असेल सुवर्णा मॅडम सोबत. म्हणूनच त्या आज मेकअप करतांना दिसत नसाव्यात. आजच्या सुवर्णा मॅडम त्या काळात जशा मेकअप करायच्या व मेकअपला जास्त महत्व द्यायच्या. तशा आज देतांना दिसत नाहीत. का? आज त्यांना विद्यार्थ्यांची गरज नाही काय? सुवर्णा मॅडम या आज त्या शाळेत मुख्याध्यापिका होत्या. ती शाळा व त्या शाळेत आजच्या घडीला पटसंख्या नव्हतीच. कारण बरीचशी पालक मंडळी ही आपल्या मुलांना जिल्हापरिषद शाळेत न टाकता कॉन्व्हेंटच्या शाळेत टाकत असत. ज्यातून पटसंख्या कमी झालेली होती. त्यातच सुवर्णा मॅडमला वाटलं होतं की जर आपण मेकअप केला व मेकअपनं शाळेत वागलो तर पटसंख्या वाढेल. कारण कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक हे शाळेत शिकवायला येतांना पुर्ण मेकअपनेच यायचे. ज्याचा परिणाम पालकांवर झाला होता. तसं पाहिल्यास आजची परिस्थिती ही मेकअपचीच होती. तो मेकअप. कितीही जिल्हापरिषदच्या शिक्षिकांनी मेकअप केला आणि तसे शाळेत गेले तरी जिल्हापरिषद शाळेतील पटसंख्या आज वाढू शकत नव्हती. त्याला कारणं वेगवेगळीच होती. शाळेत पटसंख्या वाढवायची असेल तर...... अर्जुनच्या मनात सहज विचार आला व तो त्यावर विचार करु लागला. 'आज मराठी शाळा ओस पडत आहेत व इंग्रजी शाळा वाढत चाललेल्या आहेत. याचं कारण काय असावं? यातील कारणांचा शोध घेतांना लोकं पालकांना दोष देतात. म्हणतात की पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे जास्त आहे. त्यांना मराठी शाळा अजिबात आवडत नाहीत. त्यातच लोकं तशी प्रतिक्रिया देवून मोकळे होतात. परंतु यात पालकांचा दोष नाहीच. दोष आहे शिक्षकांच्या शिकविण्याचा. त्यातच त्यांच्या भांडणाचा. मराठी शाळेतील जिल्हापरीषद शाळेतील शिक्षक मंडळी ही बहुतांश भागात बहुतांश प्रमाणात आपल्या शाळेतच राहात नाहीत. बऱ्याच शाळेत ते आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत दिसतात. हीच वास्तविकता आहे आजची. त्यातच काही शाळेत शिक्षक दिसतात तर ते पुर्ण वेळ अगदी चांगल्या पद्धतीनं आज शिकवितांना दिसत नाहीत. असं बऱ्याच ठिकाणी घडतं. मग चर्चा होते व ती चर्चा एवढ्या दूर पसरते की लोकं आपली मुलं जिल्हापरीषद शाळेत टाकायला तयार होत नाहीत. ते पैसे लागले तरी चालतात. असा विचार करुन कॉन्व्हेंटच्या शाळेत पुर्ण वेळ वर्गातच बसून राहणाऱ्या शिक्षकांच्या सानिध्यात टाकतात. त्यातच आज जरी अशा कॉन्व्हेंटच्या शाळेत मुलांना शिकवीत नसले तरी ती पालकांना गरज वाटते. ज्याप्रमाणे जिल्हापरीषदच्या ग्रामीण भागात शिक्षकांचं शिकविणं पालकांना निराश करतं. त्याचप्रमाणे शहरी भागात जिल्हापरीषद अंतर्गत चालणाऱ्या खाजगी शाळाही असतात. त्या शाळेत गटबाजी चालते. ज्या गटबाजीत संस्थाचालक एक ट्रष्टी असून तो स्वतःला मालकच समजतो. त्यानंतर तो शिक्षकांकडून त्यांना मिळणाऱ्या वेतनातून पैसा कमवतो. ज्यातून असा पैसे देणारा शिक्षक शाळेत शिकवीत नाही. त्यातच काही असा पैसा न देणारेही बरेच शिक्षक असतात. ज्यांचा वाद सुरु होतो संस्थाचालकाशी. मग असा वाद सुरु झाला की आरोप प्रत्यारोप होतात शिक्षकांवर. त्यातच चांगले शिकविण्याचे काम जरी शिक्षक करीत असला तरी त्याची मानसिकता खराब होते. ज्यातून त्याच्या हातून चांगलं शिक्षण मुलांत उतरत नाही. त्यानंतर हेच वाद वा शिक्षकांचं न शिकविणं पालकांना माहीत होतं व शाळा तुटते. जर शाळा वाढवायची असेल तर अशा प्रकारचा वाद होवूच नये. कोणतेही वाद हे सामोपचाराने सोडवावेत. विद्यार्थ्यांना चांगलं शिकवावं. ती गरज आहे. ज्यातून शाळा वाढू शकते व विद्यार्थीही वाढू शकतात. ड्युटी ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट. तिथे आपण आपल्या जीवनातील बराच काळ काढत असतो नव्हे तर काढावाच लागतो. जर आपण तसा वेळ काढत नाही, असं म्हटल्यास आतिशयोक्ती होईल. कारण ड्युटीमुळं आपल्या घरादाराची शोभा वाढते. कारण ड्युटी आपलंच पोट नाही तर आपल्या कुटुंबाचं पोट भागवते. आपल्या गरजाही पुर्ण करते. शाळा....... शाळा ही आपलं कुटुंब आहे. शाळेत आपण आपल्या जीवनातील बराच काळ काढतो. शाळा आपलं जीवन घडवते. शाळा जर नसेल तर शिक्षकांचे पोट भागत नाही आणि शाळा जर नसेल तर मुलांना अभ्यास शिकता येत नाही. त्यातच शाळा जर नसेल तर विद्यार्थ्यांना आपले आयुष्य घडवता येत नाही. शाळा हे ज्ञान देण्याचे केंद्र आहे. अशा शाळेत आपण ज्ञान घेत असतो आणि ज्ञान देतही असतो. त्यामूळं तो आपला परीवार बनतो. संयुक्त परिवार. त्यातच अशा परिवारात माणूसकीचं आणि आपुलकीचं नातं निर्माण होतं. परंतु हे जरी खरं असलं तरी आज त्या परिवारातील संबंध बिघडले आहेत नव्हे तर बिघडवले गेले आहेत. हे संबंध अलिकडील काळात खाजगीकरणानं बिघडवले आहेत. शाळा या अलिकडील काळात खाजगी बनल्या. ज्यातून मालक नावाची पद्धत आली. या पद्धतील मालक असलेला व्यक्ती हा अज्ञानी असतो व नोकर असलेला व्यक्ती हा सुशिक्षित असतो. मालक असलेला व्यक्ती हा अज्ञानी असल्यानं त्याला मुल्य, क्षमता, ध्येय या गोष्टी समजतच नाहीत. समजतं फक्त पैसा कमविणं. जो पैसा एक बाजारु स्री कमवत असते. अलिकडील काळात शाळेत आलेल्या मालक नोकर या पद्धतीत शिक्षक नावाचा कर्मचारी कितीही शिकला तरी त्याची इज्जत ही होत नाही. कारण त्याच्याकडे मालक एक कर्मचारी म्हणून न पाहता, फक्त एक कामगार म्हणून पाहतो. त्यातच अशा शिक्षकांना कामगार समजून तो त्याला मिळणाऱ्या वेतनातून पैशाची वसूली करतो. त्याच्याकडून श्रम जास्त घेतो आणि त्याला श्रमाचा मोबदला हा कमी देतो. असं प्रत्येक ठिकाणी घडतं. अशाच पैशाच्या व्यवहारानं शाळेत असलेलं आपुलकीचं नातं नष्ट होतं व स्वार्थ शिरतो. ज्यातून वाद, प्रतिवाद, भांडणं, एकमेकांना पिटणं सुरु होतं. आज शाळेतील कोणत्याच सदस्यांत आपुलकीची भावना दिसून येत नाही. विद्यार्थ्यांबद्दलही आपुलकीची भावना शिक्षकात दिसून येत नाही. त्यातच काही आजचे शिक्षक त्यांच्या हातात शिकणाऱ्या मुलींवर डोळे टाकत असतात व वात्रटसारखे बोलत असतात. त्यातच काही तांदळातील खड्यांसारखे असलेले शिक्षकही आपल्याच शाळेतील मुलींना भाळवतात. ज्यातून असे शिक्षक अशा मुलींना ब्लॅकमेल करुन बलात्कारासारखे पाशवी अत्याचार करतात. तरीही अशा शिक्षकांवर कारवाई शुन्य असते. कारण ते शिक्षक मालकांचे नातेवाईक असतात. आजच्या शाळा या कारखान्यासारख्याच बनल्या आहेत. फरक फक्त एवढाच दिसतो की कारखान्यात कच्च्या मालाचं उत्पादन पक्क्या मालात होतं तर शाळेत कच्च्या विद्यार्थ्यांचं रुपांतर एका आदर्श नागरीकात होतं. तेही अलिकडील काळात बरोबर होत नाही. त्याचं कारण आहे, शाळेत आलेले पैशाला महत्व. मालक नावाचा सधन व्यक्ती आणखी सधन बनण्यासाठी त्याच्या शाळेत असलेल्या इतर शिक्षकांना लुटतो. त्यातच काही शिक्षक आपल्या मालकाला पैसे देतात. बदल्यात ते त्याच्या हाताखालच्या विद्यार्थ्यांना बरोबर शिकवीत नाहीत. मग शिक्षण पाहा नाही तर पैसा पाहा अशी अवस्था होते शाळेची. तसेच काही शिक्षक विद्यार्थी हित पाहतात आणि ते पाहात असतांना केवळ शिक्षण पाहा नाही तर पैसा. यातूनच वाद निर्माण होतात. ते वाद एवढे शिगेला पोहोचतात की अशा शाळेत विद्यार्थ्यांना नीट शिक्षण मिळत नाही. अशावेळेस शाळा हे कुटुंब राहात नाही. ते कुटुंब नष्ट होतं. एकमेकांच्या कुरापती काढल्या जातात. शाळेला छावणीचं रुप प्राप्त होतं व एकमेकांचे हेवेदावे करीत शाळेतच रामायण, महाभारत सुरु होतं. शिकविण्याची मुल्ये बाजूला पडतात. याचा परिणाम हा होतो की हेच वाद पालकांना दिसतात व ते पालक कालांतरानं आपली मुलं शाळेत टाकत नाहीत. ते आपली मुलं शाळेतून काढून घेतात व दुसरीकडे नेवून टाकतात. ज्या शाळेत वाद होत नाहीत. अशाच शाळेत. त्यातच अशाच शाळेची पटसंख्याही सातत्यानं वाढत असते. विशेष म्हणजे शाळा हे आपले कुटुंब असून त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीवरुन वाद होवू नयेत. पैशावरुन तर अजिबात वाद होवू नयेत. त्यातून केवळ पैसा कमविण्याचा उद्देश नसावा. समजा वाद झालेच तर ते वाद सामोपचाराच्या माध्यमातून सोडवले जावेत. कर्मचाऱ्यांनाही सन्मान द्यावा. त्यांना कामगार समजू नये तर आपल्या कुटुंबातील एक भाग समजावे. जेणेकरुन शाळा वाढेल. शाळेची किर्ती दूरदूर जाईल. त्यातच मराठी शाळाही टिकतीलच. वाढतील व पटसंख्याही वाढेल. हे तेवढंच खरं.' अर्जुनचा विचार बरोबर होता. परंतु तसं घडू शकत नव्हतं. कारण कॉन्व्हेंटच्या आगमनानं पुर्णच स्वरुपात लोकांची मानसिकता बदलून गेली होती. त्यातच कितीही शिक्षिकांनी मेकअप केला तरी सौंदर्यासमोर वय लपत नव्हतं. चेहर्‍यावरचे वलय हे स्पष्ट उमटून दिसत होते. केसांचा रंग बदलून गेला होता. शरीराचं आकारमानही वाढलं होतं. त्यात लठ्ठपणा अधिकच आला होता. एकंदरीत सांगायचं झाल्यास सुवर्णा मॅडमच्या आयुष्यातही म्हातारपणानं प्रवेश केला होता. वयोमानानुसार आता ना त्यांना मेकअप आवडत होता, ना त्यांना आता आपलं सौंदर्य आवडत होतं. आता फक्त वास्तवात जगणं आवडत होतं आणि ते पुरेसं होतं. सर्व मतदान दुसऱ्यालाच करायचं असतं आणि निवडणुकीत निवडून येणारे उमेदवार आपल्याला विचारत सुद्धा नाहीत. असंच आजपर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत घडत आलेलं आहे. निवडणूक आजपर्यंत शिक्षकांच्या भरवशावरच झालेली आहे. कारण शिक्षक हे कामचुकार नाहीत व इमानदार आहेत. तसेच ते रागवत नाहीत कुणावरच. कुणी त्यांना वाईटही म्हटलं तरी. एका प्रसंगात एक व्यक्ती अर्जुनला म्हणाला होता, "सर, आपण आपल्या मुलांना रागवत नाही का? कधी थोपकाळात देत नाही का?" ते त्या व्यक्तीचं बोलणं होतं. त्यावर काय उत्तर द्यावं हे अर्जुनला समजत नव्हतंच. तसा तो विचार करु लागला. 'ते आपले विद्यार्थी आहे, आपली नोकरी आहे, कायदा आहे याचा विचार करूनच शिक्षकांना आपले प्रामाणिकपणे भुमिका बजावावी लागेल. विद्यार्थी घडेल, बिघडेल? त्याला कोण जबाबदार? परंतु प्रत्येक शिक्षकांनी प्रेमानं विद्यार्थ्यांसोबत वागलं तर आवश्यक बदल घडू शकतो. असंच शासनाला वाटतं. ते वेतन देतं व शिक्षक घेतात. त्यामुळंच आपल्याला त्यांनी जे जे सांगीतले. ते आदेश इच्छा नसूनही पाळावेच लागतीलच.' अर्जुनचा तोच विचार. तसं पाहिल्यास प्रत्येक निवडणुकीत व इलेक्शनच्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधील चार ते सहा जणं एक संघ बनवून एकत्र येतात आपले काम करण्यासाठी. ते दोन दिवस एकत्र राहतात. दोन दिवसाचा काळ म्हणजे काही जास्त दिवसाचा काळ नसतो. तो फक्त अठ्ठेचाळीस तासाचा काळ असतो. परंतु तो काळ म्हणजे अतिशय मोठा वेदनादायक काळ वाटत असतो. असे असे प्रसंग घडतात व त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. असे सामोरे जातांना भरपूर अनुभव येत असतात. त्यातून त्या संघातील चार ते सहा जणांचे असे ऋणानुबंध निर्माण होतात की ज्यातून असं वाटायला लागतं की आपण कितीतरी दिवसापासून एकत्र कार्य करत होतो वा ते चार, सहा जण आपल्या कुटुंबातील सदस्य वाटायला लागतात. निवडणूक संपते आणि निवडणुक संपली की ते सदस्य एकमेकांपासून असे दूर जातात की परत त्यांची कधीच भेट होत नाही. जरी त्यांची त्या निवडणुकीनिमित्य एकत्र येण्याचा योग आला असला तरी. तरी तो योगायोग येत नाही. अर्जुन आणि अर्जुनच्या संघालाही तसंच वाटत होतं अगदी. त्या कालावधीत जी अर्जुनची त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा होती. ती देखील पुर्ण झाली होती. त्या दोघी अर्थात माधवी व सुवर्णा त्याला भेटल्या होत्या. परंतु चालखोर साहेब अजुनही त्याला भेटले नव्हते. आठवण येवूनही चालखोर साहेब दिसले नव्हते. काळाच्या ओघात चालखोर साहेब कुठे गायब झाले होते. ते अर्जुनलाही कळत नव्हतं. तो आपला हताश, निराश होत, इलेक्शन कुंभमेळ्यातील आठवण काढत काढत आपल्या निवृत्तीनंतरचं आयुष्य जगत होता. ज्याला आता ना माऋवी दिसत होती, ना सुवर्णा देखील दिसत होती. त्या दोघीही आपल्या निवृत्तीनंतर विचारपीठं गाजवत होत्या. *************************************************************************समाप्त***********परीचय**अंकुश रा.शिंगाडे**जन्मतारीख: ०३/०३/१९७७*शिक्षण: एम ए, डी एड*मो नं : ९३७३३५९४५०*प्रकाशित साहित्य: *कवितासंग्रह* १)स्वातंत्र्याची गाणी २)आजादी के गीत(हिन्दी) ३)अश्रूंची गाणी ४)राजवाडा ५)मातीतल्या कविता *कादंबरी*१)वेदना २)कंस ३)संघर्ष ४)चर्मयोगी ५)अत्त दीप भवं ६)कामगार ७)माळीण ते गोसेखुर्द ८)भ्रृणहत्या ९)घटस्फोट १०)श्रेष्ठ कोण ११)विभाजन १२)लेखक १३)बोलती समाधी १४)शिक्षण १५)चंदूबाबा १६)भुताटकी १७)कोरोना १८)गोविंदा गोपाळ गायकवाड १९)राजा दाहिर २०)कोरोना रिटर्न २१)संयोगीता २२)मार्ग २३) बाप्पा रावल २४)व्यवस्थेचा बळी २५) उर्मीला २६) शांता २७) तारीख २८) प्रकाश २९) ते मुख्याध्यापक पाऊल ३०) सुजाता ३१) वासना ३२) प्रेमविवाह/परिणाम ३३) अशीही एक शाळा ३४) यात्रा ३५) एक होती अनिता ३६) मृत्यूदंड ३७) भुताटकी गाव ३८) भानुमती एक यल्गार ३९) जखम ४०) भुताटकी गाव ४१) तरुणपणातील चूक ४२) वारांगणा ४३) तृतीयपंथी ४४) आय ए एस अधिकारी ४५) पुरस्कार ४६) संत रविदास ४७) संस्कार ४८) संजय ४९) शापीत नदी सरस्वती ५०) गादिचा वारस ५१) तिची व्यथा ५२) तिरुपतीचा प्रवास ५३) चांद्रयान ५४) मालमत्ता ५५) शाळा बंद ५६) परीवर्तनाची शिल्पकार ५७) वल्डकप फायनल ५८) संशोधक ५९) बालवीर ६०) धर्मांतरण ६१) आरक्षण ६२) आयुष्य ६३) आधार ६४) नागपूरचे ते पवित्र आत्म्ये ६५) निवडणूक ६६) अवकाशयात्रा ६७) स्मशानी किल्ला ६८) बंदिवास ६९) धर्मयोगी ७०) पश्चाताप ७१) बलात्कार ७२) आम्रपाली ७३) स्वातंत्र्य ७४) राजकारण ७५) जात ७६) खाजगीकरण ७७) दंगा ७८) ऑपरेशन सिंदूर ७९) विवाह ८०) बोलका वृद्धाश्रम ८१) आयुष्यातील सांज ८२) मंदोदरी ८३) देवी ८४) पतीव्रता ८५) इलेक्शन ड्युटी *कथासंग्रह*१)मजेदार कथा २)चित्तथरारक ३)फोनच्या करामती ४)हरवलेलं बालपण ५)स्मशानाची राख ६)निकाल ७)अजून किती ८)निराशा ९)भटकंती १०) माहेरचा गोडवा ११)आत्महत्या १२) छोट्या कथा *लेखसंग्रह*१)माझे शिकविण्याचे प्रयोग २)गतकाळातील शास्रज्ञ आणि शोध ३)अस्तित्व ४)अस्तित्वाची पाऊलवाट शोधतांना ५) भूक ६) ते आगळेवेगळे व्यक्तीमत्व ७) शिवशाहीचे आधारस्तंभ ८ देश सुधारायचा असेल तर.... *चारोळीसंग्रह*१)आक्रमण *प्रवासवर्णन*१)प्रवास २)प्रवासातील गमतीजमती *महाराष्ट्रात वेगवेगळ्या वृत्तपत्रातून साहित्य लेखन* *पुरस्कार*१) स्व कमलताई एडकी वैचारीक लेखन पुरस्कार २) स्व कमलताई एडकी निबंध लेखन पुरस्कार ३) दै वार्तादीपतर्फे राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार बार्शी शाखा मुंबई ४) उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नेर ५) बसव सन्मान ६) शिक्षकांची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा चतुर्थ पुरस्कार २०१४ व प्रोत्साहन पुरस्कार २०१६ ७) स्व. राजीव दिक्षीत स्वदेशी दिन निबंध स्पर्धा तृतीय पुरस्कार आसगाव बारामती ८) राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार २००५. ९) महाराष्ट्र भूषण वल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे २०२४ कोल्हापूर इथे. १०) ग्लोबल लिटरेचर एक्सलंट अवार्ड २०२५ नागपूर इथे सदस्य १) साहित्य कला सेवा मंडळ सचीव, सहसचिव, माजी संघटन सचिव व माजी दोनवेळा सक्रीय सदस्य २) रसिकराज ब. सस्था आजीव सदस्य ३) विदर्भ साहित्य संस्था आजीव सदस्य ४) भारतीय जनता पार्टी माजी प्रभाग अध्यक्ष (अ. जा.) ५)ग्रामीण कामधेनू शेळी मेंढी पालन या संस्थेचा माजी सदस्य ६) निर्मल हेल्थ असोसीएशन माजी सदस्य ७) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूरचा माजी कार्यालयीन प्रमुख ८) महाराष्ट्र शिक्षक परीषद नागपूर आजीव सदस्य ९) लोकहित ब. संस्थेचा सचिव १०) जयविजय उच्च प्रा. शाळेचा माजी प्र मुख्याध्यापक *महाराष्ट्रातील ब-याच वृत्तपत्रात लेखन* एस सी इ आर टी पुणे तर्फे स्नेहसंमेलनातील नाटूकल्या नावाची पुस्तक प्रकाशित. *सन्मानपत्र* जवळपास शंभरच्यावर *सहभाग* ब-याच कार्यक्रमात *सन्मानचिन्ह* जवळपास पंचवीस