भाग १
" सानू ... ऐ सानू ... अगं उठ ... किती उशीर झाला . आज रिझल्ट आहे ना . जरा बघ उठून काय लागला रिझल्ट . तसा छानच लागला असणार पण तरी ....बघ ना... उठ . " आई ने सानिका ला उठवत म्हटलं .
" अरे यार ...!! झोपू दे ना आई . मी थोड्या वेळाने उठते , मग बघते रिझल्ट . आणि काळजी करू नकोस. आता मला जरा वेळ झोपू दे . " सानिका आई ला बोलली .
( ही सानिका ... कथे ची नायिका...वय वर्ष 20 . सानिका ही भानुदास आणि मनिषा जोशी यांनी सगळ्यात लहान मुलगी .जी सध्या BBA च्या शेवटल्या वर्षात आहे दिसायला सुंदर , आणि समजुतदार . )
" अगं झोपू दे गं आई . परिक्षे चं जिने कधी टेंशन घेतलं नाही ती रिझल्ट च कसलं टेन्शन घेणार. आणि तसंही BBA सोबतच तिने CAT ची तयारी सुध्दा सुरू केली . रात्रभर अभ्यास करते . झोपू दे की तिला थोडं अजून." तुलिका बोलली
( ही आहे तुलिका ...वय वर्ष 26 . भानुदास आणि मनिषा जोशी यांची जेष्ठ कन्या . शिक्षण.. अर्थशास्त्र घेउन MA केलं मग BAd केलं आणि एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका आहे. हिच्या साठी वर संशोधन सुरू आहे . )
" अगं हो !! पण आता अजून किती वेळ झोपणार . किती वाजले बघ " आई तुलिका ला बोलली.
" आई !!! दीदी ला नको सांगू सानू बद्दल काही . तिला कधीच सानू ची चूक दिसत नाही . लाडोबा आहे ना . " मंगेश आत खोलीत येऊन बोलला .
( हा आहे मंगेश... भानुदास आणि मनिषा जोशी यांचा एकुलता एक मुलगा . वय वर्ष 23 . तुलिका आणि सानिका च्या मधला . ह्याच इंजिनियरिंग पूर्ण झालं आहे आणि टाटा मोटर्स मधे जाॅब सुद्धा लागला आहे )
" काय रे मंगेश !! तू सारखा काय त्यांच्या मागे लागलेला असतोस . ऐक ना ती झोपली आहे तर तूच तिचा रिझल्ट बघ ना रे . " आई ने मंगेश ला लाडिगोडी लावत म्हटलं .
( ह्या मनीषा भानुदास जोशी ... तुलिका , मंगेश आणि सानिका ची आई .. वय वर्ष 50 . ह्या गृहिणी आहेत. एक समजुतदार बायको आणि साधी सरळ प्रेमळ आई . जी आपल्या मुलांची चांगली मैत्रीण पण आहे . )
" ऐ !! नाही हां... माझा रिझल्ट कोणीही बघायचा नाही . तो मी स्वतः बघणार . " आई चं बोलणं ऐकून सानिका अंथरुणावर ताडकन उठून बसते . तिच्या अश्या उठल्यावर सगळे हसायला लागतात .
रविवार असल्याने घरात सगळं निवांत सुरु असतं . एरवी गोंधळ , गडबडीत सुरू झालेला दिवस आज अगदी शांत होता . जोशी साहेब नुकतेच मंडईतून भाजी घेऊन आले होते त्यांनी भाज्यांच्या पिशव्या डायनिंग टेबलावर ठेवल्या आणि बायको ला हाक मारली .
" मनिषा ... ऐ मनिषा.. भाज्या आणल्यात गं . बघून घे एकदा . नाही तर ह्या अश्या च आणल्या ...त्या का आणल्या... सुरू होईल तुझं "
( हे आहेत भानुदास रामचंद्र जोशी .. शासकिय सेवक आहेत . मनमिळावू , आनंदी आणि समाधानी व्यक्ती . वय वर्ष 55 . मुलांचे लाडके बाबा आणि बायको चा प्रेमळ नवरा )
तर हे आहे जोशी कुटुंब . नवरा बायको आणि तीन मुलं . सगळे एकमेकांवर प्रेम करणारे . यांच्या घरातील वातावरण एकदम मोकळं आणि प्रसन्न आहे . वर सांगितल्याप्रमाणे सानिका मॅडम चा आज रिझल्ट लागणार आहे . सानिका हुशार आणि समजुतदार मुलगी आहे. आज पर्यंत आई वडिलांना मान खाली घालावी लागेल असं तिने काही केलं नाही आणि वागलीही नाही . घरात सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी आहे . हे जोशांच शेंडेफळ आहे .
सानिका उठून तिचं सगळं आवरायला गेली . आपलं सगळं आवरून तिने laptop उघडला आणि University website वर रिझल्ट बघायला सुरुवात केली . थोड्या वेळाने site open झाली . सानिका त्या laptop मधे अगदी गुंग झाली होती . तिला नाही म्हटलं तरी थोडं टेंशन आलं होतं . थोड्या च वेळात बाईसाहेब मोठ्या ने ओरडतात ....
" ऐ....अरे भाई लोग ......हेssss... धतरsss धरतsss , ततरsss ततरsss , . हेsss हेsss.... धतरsss धतरssss...धतरssss.... धतरssss..... "
सानिका ने चक्क गणपती डान्स च म्युझिक लावलं होतं आणि खोली भर डान्स करत फिरत होती . तिचा आवाज ऐकून घरातले सगळे आपापल्या हातातलं काम सोडून सानिका च्या खोली कडे धावत सुटले .
" सानू !!! अगं ऐ सानू.... काय झालं , हा धिंगाणा कशाला घालतेय . "
तुलिका ने सानिका ला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हटलं . तर सानिका ने तिचे हात धरून तिला च नाचवायला सुरुवात केली. तुलिका पण तिला थांबवता थांबवता तिच्या सोबत नाचायला लागली . त्या दोघींना नाचताना बघून जोशी साहेब आणि मंगेश तोंडावर हात ठेवून हसू लागले . त्यांना हसताना बघून मनीषा ताई ओरडल्या ...
" अहो !! तुम्ही हसताय काय त्यांना थांबवा ना . विचारा तरी काय झालं . बातमी कळली तर सगळेच नाचू ना . "
" काय बोलतेय आई . या दोघी तर वेड्या झाल्यात . आपणही व्हायचं का . " मंगेश बोलला . त्या गाण्याचा आवाज इतका मोठा होता की मंगेश ला जरा ओरडूनच बोलाव लागलं .
" अरे पण ..त्यात काय हरकत आहे ... पण आधी बातमी तर कळू दे ..." मनीषा ताई बोलल्या.
जोशी साहेब हळूच आत गेले आणि त्यांनी ते म्युझिक बंद केलं . म्युझिक बंद होताच त्या दोघी बहिणी ज्या नाचून नाचून घामाघूम झाल्या होत्या , त्या नाचायच्या थांबल्या आणि एकमेकिंना बघू लागल्या. त्यांना थांबलेलं बघून जोशी साहेब बोलले ..
" सानू ... हा काय प्रकार आहे ...जरा सांगशील का बाळा . नाही .... त्याचं काय आहे ... तुझ्या आईला जाणून घ्यायचं आहे ....म्हणजे ...ती सुद्धा सोबत नाचायचं म्हणत होती . " जोशी साहेब सानिका ला जवळ घेत बोलतात .
" अरे बाबा ... आई च काय .... तुम्ही आणि दादा पण या नाचायला . बाबा....ते सुरू करा ना म्युझिक . " सानिका म्युझिक सिस्टम जवळ जात बोलली .
" ऐ .... थांब .... आधी काय बातमी आहे ते सांग मग लावायचं ते ... बोल पटकन . " मंगेश तिला अडवत बोलला .
" अरे भावा .... युनिव्हर्सिटी फोडली ना राव ...." सानिका मनानेच नाचत बोलली .
" कायsssss " चौघे एका सुरात ओरडले .
" अरे यार ...भेटा ....तुमच्या लाडक्या लेकीला जी आहे .... BBA stream University topper miss sanika Joshi..... "
" अरे वाह ... काय मस्त बातमी आहे ....." परत सगळे एका स्वरात ओरडले आणि मंगेश ने गणपती म्युझिक सुरू केलं आणि त्यावर सगळे नाचायला लागले .
सानिका युनिव्हर्सिटी मधे पहिली आली होती . ती BBA झाली होती . आता ती पूर्णपणे तिच्या MBA च्या तयारी साठी वेळ देणार होती .
क्रमशः
(*❛‿❛)→(*❛‿❛)→(*❛‿❛)→(*❛‿❛)→(*❛‿❛)→(*❛‿❛)→