वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 in Marathi Love Stories by Priyaa books and stories PDF | वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1

The Author
Featured Books
  • ​ഡാർക്ക് നൈറ്റ് - 3

    ​അധ്യായം 3: അദൃശ്യമായ ചക്രവ്യൂഹം​ഇൻസ്പെക്ടർ ഡെറിക്കിന്റെ ലോഡ...

  • ​ഡാർക്ക് നൈറ്റ് - 2

    അധ്യായം 2: മരണപ്പാച്ചിൽ​മൊബൈൽ സ്ക്രീനിൽ ചോരച്ചുവപ്പോടെ തെളിഞ...

  • ​ഡാർക്ക് നൈറ്റ് - ​1

    ​അധ്യായം 1: അർദ്ധരാത്രിയിലെ ഒപ്പുചാർത്തൽ​കൊച്ചി നഗരത്തെ ഒന്ന...

  • HITLER: The Death Note

    (ഈ കഥ തികച്ചും സാങ്കല്പികവും, വായനകാരൻ്റെ വിനോദത്തിനും മാത്ര...

  • ഗൗരി

    നിലാ വെളിച്ചം കെട്ടികിടക്കുന്ന താമര പൂക്കൾ നിറഞ്ഞ ഒരു കുളത്ത...

Categories
Share

वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1

भाग 1 





"वृंदा... बसं झालं सोड हा वेडेपणा! " तुला कळतय ना मी काय बोलतेय. वृंदा... रुही रागाने तिच्यावर जोरात ओरडली. इतकं होऊन ही तिचं लक्ष नव्हत . रुहीने रागात वृंदा च्या हातून मोबाईल हिसकावून घेतला. 


"रूही .. काय झालं? काही बोललीस का? वृंदा ने अतिशय शांतपणे तिला विचारल. 


तिच्या या शांततेवर रूही निशब्द झाली. इतकं सारं घडून सुध्दा ही अजुन तिथेच आहे." का रे देवा का इतका त्रास ह्या निष्पाप जीवाला !" भूतकाळातील घटनां आठवून रुहीचे डोळे भरून आले. स्वतःला सावरत "काही नाही ग उशीर होतोय निघूया ना?" ती बसं इतकंच बोलली. 

आम् हा चल वृंदा ने घाईतच तिची पर्स उचलली अन् रूही ला मागे सोडून ती एकटीच पुढे चालत गेली. वृंदा म्हणजे एक बिन आत्म्याच्या शरीराला आशेवर जिवंत ठेवणे म्हणजे काय याच जीवंत उदाहरण होत. ती फक्त दिसायला जिवंत होती. तिच्या मनाच्या तळाशी असलेल्या वादळाला कोणी पाहूच शकत नव्हते. एक रूही याला अपवाद होती. तिने वृंदाचे खळखळून हसणं अन् भावनिक होऊन रडणे ही पहिलं होत. तिने पाहिली होती ती वृंदा जी भरभरून जगायची सतत हसणारी लाघवी आणि प्रेमळ हुशार अशी वृंदा... 


पण ही जी आता तिच्या समोर होती. ती एक अनोळखी मुलगी होती, जी फक्तं एका आशेवर शरीरात श्वास घेत होती आणि एका मनाविरुद्ध बांधलेल्या वचनात जिवंत होती. "पण खरच जिवंत आहे का?" याचं उत्तर फक्त रूही कडे होते. आणि रूही गप्प होती.


आपल्यासाठी असणारी एक शुल्लक गोष्ट दुसऱ्या कोणाचे तरी अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करते याचं जिवंत उदाहरण म्हणजे वृंदा.... 


तर ही आपली नायिका वृंदा केशव देशमुख . एक छोटस सुखी समृध्द गाव 'नांदगाव' च्या सरपंच  केशव देशमुख यांची कन्या. चार भावांच्या पाठीवर जन्मलेले हे एकमेव कन्यारत्न . घरात लक्ष्मी पाणी भरत होती. वडील गावचे सरपंच होते. मुळातच ते हुशार होते.पण अतिशय कडक अन् शिस्तप्रिय होते. घरात श्रीमंती असल्याने त्याचा स्वभाव हळूहळू गर्विष्ठ अन् लालची होऊ लागला होता. स्वतःच्या मानसन्मान आणि रुतब्यापुढे त्यांना कोणीच दिसत नव्हते. आणि तिची आई गृहिणी होती . तिच्या आईचा स्वभाव मुळातच मायाळू होता. उदार मनाची तिची आई साऱ्यांना मदत करत असे. तिच्या आईने बरीच मायेची माणसे जोडून ठेवली होती. वृंदा च्या घरात तिचे आजी आजोबा ही होते. आजोबांचा शब्द आजही घरात शेवटचा शब्द होता. त्यांच्या निर्णयाविरुद्ध कोणीही जात नसे. 






आजोबा  जुनाट विचारांचे आणि रागीट होते. तिची आजी याउलट होती. सतत संसारात गुंतलेली आणि देवधर्म करणारी प्रेमळ शांत अशी तिची आजी . वृंदाचा मोठा भाऊ गणेश दादा गावाकडे शेती पाहत होता. गणेश  चा स्वभाव अगदी त्याच्या वडीलांसारखा होता. तापट आणि काहीसा घमेंडी. तिचा दोन नंबरचा भाऊ म्हणजे विनय तो शहरात नोकरीला होता. सुधारित विचारांचा आणि डोक्याने विचार करून निर्णय घेणारा होता . तसे ती सगळ्यांची लाडकी होती.पण विनय साठी वृंदा त्याची बहीण च नाही तर त्याची लेक होती. त्याचा वृंदावर खूप जीव होता. तिन नंबर चा ज्ञानेश नावाप्रमाणे अगदी गुणी होता. लहानपणापासून आजीच्या सावलीत वाढलेला ज्ञानेश .... हा साऱ्या भावंडात वेगळा होता. त्याला कोणाचे मन दुखवणे जमायचेच नाही. साधी  मुंगी मारायच्या आधी शंभरदा विचार करायचा. तो देवाधर्माच्या साधनेत लिन होता. तो धार्मिक होता . शाळेपेक्षा जास्त तो मंदिरात असायचा. सर्वात लहान होता पृथ्वी तो निर्भिड अन्  हुबेहूब आजोबा ची सावली होता. या सगळ्यात लहान आणि लाडकी होती ती वृंदा...... तिच्या आई अन् आजीचे रूप. पण हा तिच्या वडिलांचा हुशारीचा गुण मात्र तिच्यात जास्त होता.






गावातील एकदम हुशार , शाळेत सतत पहिल्या नंबर मधे येणारी अन् शहरात शिकायला जाणारी वृंदा गावातील पहिलीच मुलगी होती. त्यामुळे तिला सारं गाव नावजायचे. याचा तिच्या बाबा आणि आजोबांना खूपच अभिमान होता. गावातील सगळया मुली वृंदाच्या नशिबाचा हेवा करायच्या. वृंदा दिसायला सुंदर होती. शाळेसोबत ती घरकामात ही तरबेज होती. कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची सवय असणारी असणारी ही मुलगी आज स्वतःच स्वतःला हरवून बसली होती. 





रुही वृंदाची शहरातील पाहिली मैत्रीण . त्यादोघी थोडया काळातच एकमेकींच्या अगदीं घट्ट अश्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्या दोघींना एकमेकींच्या मनातलं सगळं काही न सांगताच कळायचं. आज वृंदाच्या ह्या अश्या अवस्थेत तिच्या इतकीच रूही दुःखी होती. एक तिचं तिच्यामागे ठाम पने उभी होती.





" वृंदा .... ए वृंदा... कुठं हरवलीस हे घे चहा !" एकटक मावळणाऱ्या सूर्याला बघण्यात गुंग झालेल्या वृंदाला रुहीच्या आवाजाने भानावर आणल. 


त्या दोघी तिथेच बाल्कनीत शांत बसून चहा प्यायला लागल्या. वृंदाच लक्ष अजूनही त्या सूर्याकडे होत आणि रूहीच वृंदाच्या विचारमग्न चेहऱ्याकडे.तिच्या निर्विकार चेहऱ्यात रूही ला काहितरी वेगळ जाणवत होते पण काय? 


काही वेळानंतर वृंदा बोलली , " रूही उगवणाऱ्या सूर्याला मावळावे लागतेच ना ग!"  तिच्या या प्रश्नावर रूही चकित झाली. ती अजूनही वृंदाकडे संशयाने पाहत होती. 

तिची नजर ओळखून आज पहिल्यांदा वृंदा किंचित गालात हसली. "नाही म्हणजे बघ ना तो मावळला नाही तर दिवसभर भरकटलेली पाखरं घरट्यात परतणार कशी त्याला जावेच लागेल ना?" ती गूढ विचारत हरवत बोलली. 


"नक्की काय विचार आहे तुझा वृंदा असं का बोलतेस तू ?" रूहीने घाबरत विचारल . 

सहजच.... वृंदा फक्त इतकंच बोलुन आत निघाली. 

"रात्री मावळणाऱ्या सूर्याला पहाटे पुन्हा यावचं लागत एक नवी आशा घेऊन !" खरं तर तो जातोच येण्यासाठी...... त्याच्यावर कित्तेक जनाची आशा टिकून असते त्याला यावंच लागत ... आभाळाला सोडुन सूर्य कधीच जात नाही. हे लक्षात ठेव वृंदा. रूही भरल्या आवाजात बोलली. 


त्याचबरोबर आत जाणारी वृंदा ची पावले थबकली 🥺 


वृंदा धावत येऊन रूहीच्या मिठीत शिरली. त्यादोघि रडत होत्या. अगदीं मूकपणे ...... आताची दोघींची कारणे भलेही वेगळी होती पण त्या दोघींचे दुःख मात्र एकच होते. एकीला आधार मिळाला होता तर दुसरीला तिचा आधार ......



"रूही .....मी अजूनही खूप प्रेम करते ग त्याच्यावर !" हुंदक्याच्या गर्दीत मनाच्या तळाशी लपलेला गुपितांचा खजिना ...... मोकळा होत होता. 


माझा काय दोष आहे ग यात मला कोणी बोलूच दिलं नाही मला त्याला थांबवायचं होत. पण विनू दा त्यांच्या जीवासाठी मी खोटं बोलले. रूहि मी खूप वाईट आहे ग...मी सगळ काही बिघडलं मी मी काहिच सावरू शकले नाही . मी एक बहिण म्हणुन हरले ग ......मी स्वताच्या नजरेला नजर देऊ शकत नाही.  मनात साठलेल्या अपराधी भावना वृंदा ला अनावर झाल्या. गळ्यात अडकलेल्या भावना अन् रोकलेला हुंदका  ... तिला श्वास अपुरा पडू लागला. 




वृंदा तीथेच गुडघ्यावर खाली कोसळली. तिची अवस्था पाहून रूही ला खूप वाईट वाटत होते. पण वृंदा ला रडणे गरजेचे होते. तिचे  मन मोकळे होणे खूप महत्वाचे होते. न जाणे केव्हा पासुन तिने हे दुःख मनात दाबून ठेवले होते. रुहि तिला रडू देत होती. 



"वृंदा ए वृंदा..... बोल ग माझ्याशी काय झालं होतं गावी मला सांगणार नाहीस का बोल ग अशी गप्प राहू नकोस !" रुही तीला बोलते करण्याचा प्रयत्न करीत होती. 



वृंदाचे मन भूतकाळात घडलेल्या घटनांत हरवले....



क्रमशः 




                                      प्रिया लिखित ✍️ 

कशी वाटली कहाणी मला नक्की कळवा....😊मला फॉलो करायला विसरू नका..... कॉमेंट्स आणि रेटिंग द्यायला विसरू नका हं......

©. Priyaa pujari 
           #_KiYa _