Nirpeksh Prem - 4 in Marathi Love Stories by manasvi Manu books and stories PDF | निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 4

Featured Books
Categories
Share

निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 4

भाग ४ 

आपण बघितलं :-  शुभ्रा .. हे नाव त्याच्या कानावर पडताच तो त्या मुलीचं सगळं ऐकून घ्यायला तयार झाला ...

आता पुढे :- अर्णव घरी येतो. त्याच्या कानात फक्त एकच नाव फिरत होतं ...शुभ्रा..... त्याचे जीव की प्राण होतं हे नाव , त्याच्या जीवनाचा आधार होत हे नाव , हे नाव ऐकताच त्याच्या डोळ्यासमोर तो निरागस सुंदर चेहरा येतो , जो चेहरा त्याने आपल्या मनात बसवून ठेवला आहे . घरी आल्यावर तो तडक त्या खोलीत जातो , जिथे तिचा फोटो लागलेला आणि त्याच्यासमोर त्यातने जिंकलेली अवॉर्ड्स . 

" तू का गेलीस मला सोडून.... सगळं मान्य केलं होते ना तुझं... मग ...हे बरोबर वाटतं का तुला... ? " अर्णव .

" अर्णव ...!! बाळा काय.. झालं आज लवकर घरी आलास..?? " . आई वर येत बोलते . 

" काही नाही ग ...सहज ..आज थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून लवकर आलो .आई ...जरा कॉफी देना ...मी येतोय खाली." अर्णव आई ला सांगतो . 

" बर ठीक आहे... तू ये खाली ...मी कॉफी करते. " आई  इतकं बोलून खाली निघून जाते. 

अर्णव थोड्यावेळ वेळ तिथेच त्या फोटोकडे बघत उभा राहतो मग खोलीचे दार बंद करून बाहेर निघून जातो . आई कॉफी तयार करून घेऊन येते , तितक्यात अर्णव सुद्धा खाली येतो . 

अर्णव कॉफीचा मग हातात घेतो आणि आईला बोलतो...

" आई उद्यापासून  एक मुलगी घरी येणार आहे. तिला माझ्यावर पुस्तक लिहायचे आहे. तर ती रोज सकाळी येत जाईल .माझं म्हणणं हे होतं की..." अर्णव कचरत बोलतो . 

" कळलं !! मी त्या वेळेला कुठे जाणार नाही .पण मला प्रश्न हा पडला आहे ...की तू तयार कसा काय झाला या सगळ्या गोष्टींसाठी..." आई अर्णव कडे बघत बोलते .

" अगं ...असं काही नाही ...ती बोलली म्हणून मी तयार झालो .." अर्णव. 

" आतापर्यंत काय कमी लोकांनी तुला विचारलं का .,.पण तू कायम नकार देत आलास. आज असं काय झालं , सांगशील का..."  आईने अर्णवच्या डोळ्यात बघत विचारलं.

" अगं असं काहीच विशेष नाही सहज ..." अर्णव डोळे चोरत खाली मान घालून बोलला.

" बरं !!!  ति जी  मुलगी येणार आहे नाव काय सांगितलं तिचं..?? नाही म्हणजे तसं माधव काकानां सुद्धा सांगून ठेवता येईल ना म्हणून .." आई अर्णव च्या चेहर्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत बोलली . 

" ती जी मुलगी येणार आहे तिचं नाव ..शुभ्रा ...आहे " अर्णव

" अर्णव !! हे काय.... काय करतोय तु... कधीपर्यंत तिच्या आठवणीत अडकून राहशील .आता पाच वर्षे झाले तिला जाऊन ,आता तरी तिच्या आठवणीतून बाहेर ये, लग्नाचा विचार कर ,कितीतरी मुलींचे स्थळ आणले पण तू ....." आई थोडा आवाज चढवून बोलते . 

" आई !!! नको ना तो विषय .कशाला सारखं सारखं तोच विषय काढते. मी तिच्यासोबत खूप खुश आहे. ती आणि मी आम्ही एकत्र आहोत हेच खूप आहे माझ्यासाठी." अर्णव

" अरे ...पण कुठे आहे ती सोबत ...??? अशी कशी तुझी सोबत जी फक्त तुलाच दिसते जाणवते आम्हाला कोणालाच कळत नाही .." आई थोडं रागवूनच बोलते .

" कारण तुम्ही फक्त, तिला ओळखता, मी तिला जगतो ,
तुम्ही फक्त तिचा विचार करता ,मी तिच्यावर प्रेम करतो तुम्ही फक्त तिला माझ्या डोळ्यात बघितलं आहे ,माझ्या नजरेतून बघता ,मी तिला माझ्या हृदयाच्या नजरेने बघतो माझ्या मनात मी तिला साठवून ठेवलेलं आहे ,माझं प्रेम तिच्यावर आहे तिच्या असण्या किंवा नसण्यावर नाही . तुमच्यासाठी ती अस्तित्वात नाही, पण ती माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात आहे .माझ्या श्वासा श्वासात आहे .माझं जगण्याचं कारण फक्त आणि फक्त ती आहे तिचं स्वप्न आहे. आणि तुला एक रिक्वेस्ट करू का प्लीज या विषयावर नको बोलत जाऊस मला नाही आवडत. " अर्णव

" बर बाबा !! कर तुला काय करायचं ते,  मी नाही बोलणार आता या विषयावर शक्यतोवर. बरं कधी येणार ती मुलगी.." आई हतबल होऊन बोलते . 

" उद्या सकाळी.." अर्णव. 

" बरं ठीके , चल मी ताटं घेते जेवायला चल .." आई .

" हो ...आलोच ... तू हो पुढे मी लगेच येतो . " अर्णव 

" लवकर ये ..." इतकं बोलून आई तिथून निघून जाते . मिहिर आपल्या laptop मधे काहीतरी लिहिण्यात व्यस्त होऊन जातो.

ह्या फुलांच्या सुगंधात आहेस तू,
मंद अशा वाऱ्यातही आहेस तू.
सागराच्या लाटांतही आहेस तू,
पक्ष्यांच्या किलबिलाटातही तूच तू.

त्या इंद्रधनुष्याच्या रंगांत आहेस तू,
हिरव्यागार या निसर्गात आहेस तू.
जिथे बघते माझी नजर, साजणी,
नजरेच्या प्रत्येक टप्प्यात आहेस तू.

कधी, कशी, काय ही किमया घडली?
तू जीवनात आली आणि माझी झाली.
हे भाग्यच माझे थोर, तू मला सापडली;
तुझ्या असण्याने जीवनकळी खुलली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव लवकर उठतो आणि आपलं सगळं आवरून तो खाली येऊन बसतो. त्याची नजर सारखी घडी आणि दारावरच असते.

" आई ...मी स्टडी रूम मध्ये आहे ती आली की मला कळव..."  अर्णव. 

" हो चालेल... मी पाठवते ती आल्यावर..."  आई.‌

अर्णव चा छोटा भाऊ आरव सारखा त्याच्याकडे बघत होता.

" आई ...आज दादाला काय झालं आहे, सारखा दाराकडे बघतोय ,कोणी खास येणार आहे का..?? "  आरव.

" अरे !! एक कोणी मुलगी येणार आहे त्याला भेटायला .." आई आरव ला सांगते . 

" काय sssssss...मुलगीsssss आणि दादाला भेटायलाssss.. शक्यच नाही ...तू काही चुकीचा ऐकलं असणार... " आरव मोठ्याने ओरडतो.

" आरव !! अरे काय हे ...किती मोठ्याने ओरडतो .काही चुकीचं नाही ऐकलं मी ,जे आहे तेच सांगते ना. " आई काना वर हात ठेवत बोलते .

" अगं पण कसं शक्य आहे ...??? या पाच वर्षात मी दादाला कुठल्याही मुलीकडे बघताना सुद्धा बघितलं नाही , आणि तू म्हणते... एक मुलगी चक्क त्याला भेटायला येणार आहे .....मला विश्वासच बसत नाहीये .तुला नक्कीच गैरसमज झाला असेल ." आरव. 

" गप रे ...मला कसलाच गैरसमज झालेला नाही. त्या मुलीला अर्णव वर पुस्तक लिहायचे आहे .म्हणून त्याच्याबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी तिथे येत आहे . कळलं  ....??? " आई. 

" ओह !!! असं आहे तर ....पण दादा स्वतःबद्दल सगळं सांगेल का ....?? " आरव . 

" काय माहित... काय आणि किती सांगतो ..बघूया कमीत कमी या कारणाने तरी त्याच्या मनातलं सगळं निघून जायला हवं. " आई. 

इतक्यात दारावर बेल वाजते .माधव काका दार उघडतात आरव सुद्धा त्यांच्या मागे दाराजवळ येऊन उभा राहतो. दारात एक 25 26 वर्षाची मुलगी उभी असते .गोल गोरा चेहरा ,सुंदर डोळे, धरधरीत नाक ,उत्तम बांधा . जीन्स आणि टी-शर्ट मध्ये खूप मोहक दिसत होती .आरव तिला बघतो आणि बघतच राहतो . 

" हॅलो !!!  अर्णव सर आहेत का ...?? " ती . 

" हो.... हो... या आत या माधव काका इतक बोलून अर्णवला सांगायला आत निघून जातात .आरव तिला बघत दारातच उभा असतो . 

" Hello !!  excuse me.... अर्णव सर आत आहेत ना..??  मी येऊ का आत ..?? " शुभ्रा. 

" Oh !!! I am so sorry... please come... please ...myself Aarav Kulkarni ..मी अर्णव दादाचा धाकटा भाऊ ...nice to meet you... your good name please . " आरव 

" myself..  Shubhra Joshi " शुभ्रा

" ओह ...अच्छा तर हे कारण आहे ..." आरव तोंडातल्या तोंडात पुटपुटतो.

" हां !!! काही बोललात का..?? " शुभ्रा

" नाही ..नाही काही नाही ..या ना आत या  प्लीज ..आईsss बसा ना .."  आरव.

तेवढ्यात आई बाहेर येते, आईला बघून शुभ्रा नमस्कार करते आणि बोलते..

" नमस्कार!! मी शुभ्रा ...शुभ्रा जोशी ...सरांनी बोलावलं होतं..."  शुभ्रा.

आई सुद्धा हे नाव ऐकून चकित होते. आरव आई जवळ जाऊन उभा राहतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो . आई भानावर येते आणि..

" हो ...हो... सांगितलं होतं अर्णव नी  मला तू येणार म्हणून... बस ना ...मी बोलवते त्याला .." आई.

" आई !! तू बस यांच्या जवळ मी सांगतो दादाला.."  आरव. 

" बरं ठीके !! सांग त्याला ... शुभ्रा आली आहे ." आई.

आरव ,अर्णवला बोलवायला त्याच्या स्टडी मध्ये जातो. थोड्या वेळाने दोघे सोबत बाहेर येतात . अर्णव ला आलेलं बघून शुभ्रा उठून उभी राहते. 

" अरे!!  It's okay...बस ..बस तू... नितीन ने व्यवस्थित आणला ना , काही त्रास नाही झाला ना .." अर्णव काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो. 

" म्हणजे काय !!! मला तू काय गैरजबाबदार समजून ठेवल आहेस का ...?? काही त्रास होऊ दिला नाही मी त्यांना , आणि अगदी सुखरूप घेऊन आलो .." नितीन जो महत्त्वाच्या फोन आल्यामुळे बाहेरच थांबला होता ,आत येत बोलतो त्याच्या बोलण्यावर सगळे हसायला लागतात.

" बरं !! ..मला सांग तू काय घेणार ..चहा, कॉफी की सरबत."  आई शुभ्रा ला विचारते . 

" नाही .. मला काही नको ." शुभ्रा

" No formalities... be comfortable.." अर्णव.

" बरं ...मग मला कॉफी चालेल .." शुभ्र हसून उत्तर देते.

" बरं ...मी कॉफी पाठवते तुम्ही बसा बोलत ." आई इतकं म्हणून निघून जाते. 

" मला सुद्धा थोडं काम आहे ... nice to meet u भेटू परत ..." आरव सुद्धा सगळ्यांना संबोधून निघून जातो.

" बर मला सांग... तुला हरकत नसेल तर स्टडी मध्ये बसुयात का जाऊन . " अर्णव.

" मला काही हरकत नाही सर.. जाऊया की आपण स्टडी मध्ये .." शुभ्रा.

" बरं चल ...माधव काका sss कॉफी स्टडी मध्ये आहे ना please." अर्णव इतकं बोलून शुभ्रा ला घेऊन स्टडी रूम कडे निघून जातो. 

क्रमशः