Ruthless Love - 4 in Marathi Love Stories by My imaginary world books and stories PDF | Ruthless Love - 4

Featured Books
Categories
Share

Ruthless Love - 4




दोघेही आपली आपली तहान भागेपर्यंत एकमेकांचा उपभोग घेत होते,.. त्यांनी तिला प्रेमाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले होते,  असाच बराच वेळ दोघांचा एकमेकांना उपभोगण्यात गेला त्यानंतर ती शेवटची घटका आली ज्यात तो तिच्यात विलीन झाला....


आणि काही मिनिटातच दोघेही निद्रा अवस्थेत गेले.
..

*****

पुढे....

दोघांचीही रात्रं एकमेकांच्या मिठीत गेली, रात्रं सरत होती आणि उजेड बाहेर येऊ पाहत होता,.

तो तर अजूनही निद्रा अवस्थेतच होता, पण पहाटेला तिला जाग आली, आणि पाहते तर ती एका खोलीत असल्याचे जाणवले, तिच्या अंगाचा थरकाप तर उडतच होता सोबत रात्री जे काही झालं, त्याने तिचं अंग खुप दुखतं होतं, ओटीपोटात असंख्य अश्या मुंग्या चावल्या सारखं तिला वाटत होतं.


पण तिचं इथेही राहणं श्यक्य नव्हतं, त्यामुळे ती बाहुला पडलेलं त्यांच व्हाईट शर्ट, आपल्या फाटलेल्या ड्रेस वर घालून त्याच्याकडे न पाहता रूम च्या बाहेर निघाली,.


बाहेर तिला त्रास द्यायला तो तयारच होता, ज्याच्यामुळे ती पूर्ण भिजली, होय तोच तो पाऊस,...

बाहेर रिमझिम पाऊस असल्यामुळे तिला ओल होतं स्वतः साठी आसरा शोधावा लागला,.

अंगात घातलेले ते जीर्ण कपडे तर कधीच भिजले होते,.

ती इकडे तिकडे पाहत असताना तिचं लक्ष त्या मेंटल असायलम मधल्या लोकांकडे गेलं जे रात्री पासून तिला शोधत होते,.

ती तिथून पळून दुसरी कडे जाणार एवढ्यात एकाच लक्ष तिच्याकडे गेलं,. थोडंफार अजूनही अंधारच होता आणि वरून पाऊस असल्यामुळे तिथे गर्दी ही कमीच होती, सकाळी काय ते मॉर्निंग वॉक वाले, आणि ठेलेवाले, होते,.


सर्वजन आपल्या कामात असल्यामुळे कोणालाही तिच्याकडे लक्ष देता आले नाहीं किंवा पावसामुळे सगळेच आपल्यात गुंग होते त्यामुळे ते लोकं तिच्याशी काय करत आहे याकडे कुणाचं लक्ष गेलं नाहीं,..


एकाने दुसऱ्याला आवाज दिला आणि तिघा चौघाणी तिला करकचून पकडलं आणि गाडी जवळ ओढत आनलं,.


तिने खूप प्रयत्न केला परंतु प्रत्येक प्रयत्न तिचा असफल ठरला, त्या चौघानसमोर कुठे त्या एकट्या दुबळ्या मुलीचा निभाव लागणार होता,..


आणि वरून कोसळणारा थुई थुई पाऊस, शेवटी ती हतबल झाली,. त्यांनी तिला ओढतच गाडी मध्ये टाकलं आणि घेऊन गेले,. पुन्हा तिथेच जिथे तिने तीन वर्ष कसे काढले तिचं तिला माहिती.


तिच्या नशिबाने तिला बाहेर त्या जागेतून बाहेर काढलं होतं परंतु पुन्हा तिचं नशीब आज पावसात तिला तिथेच घेऊन जातं होतं,.


काय माहिती असं काय नातं होतं तिचं पावसाशी जो पाऊस कुणाला आनंद देऊन जातो, तस तिला मात्र प्रत्येक वेळी दुःख च देऊन जातो,.


त्यांनी पुन्हा तिला त्या बंदिस्त चार भिंतीमध्ये आणून टाकलं होतं.


*****

हॉटेल...


त्याला सकाळी जाग आली तेव्हा त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता, कालच्या त्या ड्रग मुळे त्याच्या सोबत काय झालं हे त्याला आठवायला थोडा वेळ लागला, 




           तो डोकं पकडूनच बेड वर ब्लॅंकेट गुंडाळून बसला, जरा डोक्यावर जोर दिल्या नंतर त्याला मागच्या रात्री काय झालं ते आठवलं,.


आणि तो शॉक झाला,.. पण आता त्याला स्तब्ध होऊन चालणार नव्हतं तर तो काहीतरी ठरवून मोकळा झाला,.



त्याने वॉशरूम मध्ये जाऊन स्वतःला क्लीन करायला सुरुवात केली.

त्याने अंगावरचे ब्लॅंकेट काढून फेकले आणि शॉवर खाली उभा झाला,.


त्याच्या अंगावरचे तिच्या नखाचे ओरखाडे सांगत होते की दोघांनीही किती पॅशिनेट नाईट स्पेंड केली होती,...


पण दोघेही या पासून अलिप्त होते,...


नां त्याने तिला ड्रग्स च्या नशेत बरोबर पाहिलं होतं न, तिने त्याला त्या अंधारात पाहिलं,..


माहिती पडेल का की कोण होती त्याच्यासोबत काल रात्री?


किंवा....

तिने कोणासोबत आपली वार्जीनीटी घालवली हे आठवेल का तिला??


दोघेही कोड्यातच...



आणि त्याच्या असिस्टंट ला म्हणजेच आशिषला कॉल करून बोलावून घेतलं,.



तर तो त्या रूम मध्ये दुसरा तिसरा कोणी नसून आर्यन होता,.


The Aryan Thakur 😈...


आणि ती.... ती...... होती जिच्या नशिबाने तिला पुन्हा अनावधानाने त्याच्या जवळ आणून सोडलं होतं,...


सानवी.,


**********
क्रमशः 


कथेला लाईक कमेंट आणि लेखिकेला फॉलो करायला विसरू नका 🙏🥰❤️