Ek anavrut patra in Marathi Magazine by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | एक अनावृत्त पत्र

Featured Books
  • Fatty to Transfer Thin in Time Travel - 13

    Hello guys God bless you  Let's start it...कार्तिक ने रश...

  • Chai ki Pyali - 1

    Part: 1अर्णव शर्मा, एक आम सा सीधा सादा लड़का, एक ऑफिस मे काम...

  • हालात का सहारा

    भूमिका कहते हैं कि इंसान अपनी किस्मत खुद बनाता है, लेकिन अगर...

  • Dastane - ishq - 4

    उन सबको देखकर लड़के ने पूछा की क्या वो सब अब तैयार है तो उन...

  • हर कदम एक नई जंग है - 1

    टाइटल: हर कदम एक नई जंग है अर्थ: यह टाइटल जीवन की उन कठिनाइय...

Categories
Share

एक अनावृत्त पत्र

एक अनावृत्त पत्र

ती कै काकाना सा नमस्कार

आता पर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण अनेक पत्रे एकमेकांना लिहिली

पण हे पहिलेच पत्र मी लिहिते आहे जे तुम्हाला पाठवू शकत नाही

कीती लांब गेलाय तुम्ही मला सोडून ..

आता असे वाटतेय हे पत्र तुमच्या कडे स्वताच घेवून यावे पण बघा ना तेही हातात नाहीये माझ्या

लहान पणां पासून तुम्हाला सोडून कधी राहिलेच नाही ..

तुम्ही वडील होता तारी तुम्हाला काकाच म्हणायचे मी लहान पणा पासून

तुमची लाडाची एकुलती एक आणी पहिली लेक होते मी !!!

पहिली बेटी धनाची पेटी असे म्हणायचा मला तुम्ही .

माझ्या आगमना मुळे तुमचे आयुष्य भरभराटीला आले असे वाटायचे तुम्हाला त्यामुळे खूप खूप कौतुक व्हायचे माझे ..

जी वस्तू मागेन ती देण्या कडे कटाक्ष असायचा तुमचा ..तुमच्या तुटपुंज्या कमाईत नेहेमी आधी माझेच हट्ट पुरवले जायचे

आई तर लटक्या रागाने नेहेमी म्हणत असे ..तुमच्या लाडाने वेडी होईल हं ती....

मला मात्र आपल्या परिस्थिती ची जाणीव त्या वेळी पण होती ..

त्यामुळे मी वेडी झाले पण ते वेड होते चांगल्या अक्षराचे, बहुश्रुत पणाचे,गाण्यांचे , कवितांचे ,..आणी अभ्यासू पणाचे, सुद्धा !!!

रोज माझा अभ्यास घ्यायचा तुम्ही सकाळी

तुमची दाढी करणे ..त्याचवेळी रेडिओ सिलोन ची गाणी ऐकणे आणी मला शुद्ध लेखन घालणे

ही सारी कामे एकाच वेळी करीत होता तुम्ही

.. तुमचे अक्षर म्हणजे नुसते “मोती “च होते .दोन्ही हातानी लिहू शकत होता तुम्ही !!

या रोजच्या सरावाने माझे पण इंग्रजी व मराठी दोन्ही अक्षरे “सुबक “झाली खूप बक्षिसे पण मिळवली मी ..पुढील आयुष्यात॥

पैसे खर्चून छान छान खाणे .चांगले पिक्चर पाहणे हा तुम्हाला खूप शौक होता !!!

आणखी एक तुमचा शौक म्हणजे रोज आई साठी एखादा गजरा किंवा फुल आणणे

पण त्याच वेळी जिथे शक्य होते तिथे पैसे वाचवणे ही तुमची “खुबी “होती

तुमचे एक वाक्य फेमस असे “ताई (मला ताई च म्हणायचा तुम्ही) मनी सेवड इज मनी अर्नड”!!!

खूप कविता, सुभाषिते, नाटकातील वाक्ये, ..आणी हो सिनेमातील गाणी पण तुमच्या मुळे अगदी तोंड पाठ झाली होती मला

राजेंद्र कुमार तुमचा अगदी आवडता “हिरो ..त्याचे सारे पिक्चर आपण एकत्र पाहिले आपण !!!

तुमच्या बरोबर डबल सीट सायकल वरून जाणारी मी .. तुमच्या कडून च सायकल शिकले ..

इतर वेळेस् मला एवढेसे लागले तरी ..हळहळणारे तुम्ही ..सायकल शिकताना पडले तर हसत असत

मी रडू लागले तर “ताई पडल्या शिवाय येईल का सायकल ? असे म्हणत ..

शाळेतील माझा नाटक ,कविता .वक्तृत्व ,अभ्यास हस्ताक्षर यातील सहभाग आणि यश याचे खूप कौतुक होते तुम्हाला .

अकरावी ला मला इंग्रजी मराठी आणि सायन्स यात अव्वल गुण मिळाले हे पाहून खूप आनंदी होता तुम्ही

अक्षरशः हाताला येतील तितके पेढे तुम्ही वाटले होते आपल्या आर्थिक परिस्थिति ची पर्वा न करता ..!!!

मी मागेन ते देत होता तुम्ही मला..की कोणत्याही गोष्टीत मला काही कमी पडू नये

यथावकाश मी पदवीधर आणी द्वीपदवीधर पण झाले माझ्या प्रत्येक यशाला तुम्ही जास्तीत जास्त आनंदी होत होता .

पुण्यातल्या नातेवाईकांना पत्रे घालून सारे कळवत .होता लेकीच कौतुक !!

हुशारी सोबत मला स्वयपाकाची पण खूप आवड होती

आईचा आणि आजीचा सुगरणपणा होता माझ्या पण अंगात !

पण तरीही तुम्ही माझ्या वरच्या कौतुकाने आईला म्हणत तुला ताई सारखा स्वयंपाक नाही येत करता ..!

तेव्हा माझे मन भरून येत असे आणि आईला खूप हसू येत असे ....

आनंद आणी अभिमान असे तुम्हाला माझा

मला बँकेत नोकरी लागल्या वर ..माझ्या पेक्षा ताईचा पगार जास्त आहे असे मित्रांना आवर्जून सांगत तुम्ही !!!

माझे लग्न झाले तेव्हा नवरा कोल्हापुरातला मिळाला याचे तुम्हाला खूप “हायसे “वाटे......

कारण तुम्ही कधी स्पष्ट नाही बोलला ..पण मला सोडून राहणे तुम्हाला अशक्य वाटत असावे....

मला उत्तम शिकलेला, आणी समजूतदार, माझ्या वर प्रेम करणारा, नवरा मिळाला तेव्हा “

“ताईने नशीब काढले बर का आमच्या “..असे साऱ्यांना सांगताना तुम्ही “थकत नव्हता !!

लग्ना नंतर पण मला फक्त पाहण्या साठी तुम्ही रोज बँकेत येत होता.. सोबत एखादा गजरा किंवा एखादी खाण्याची वस्तू असेच !!

.. लग्ना नंतर मी सुखी आहे असे पाहून तुमचा चेहेरा अगदी “प्रसन्न होत असे

मला पहिला मुलगा झाला तेव्हा मला भाऊ झाला तेव्हा सुद्धा जितका आनंद झाला नसेल ..त्यापेक्षा जास्त आनंद झाला तुम्हाला !

भरभरून पेढे वाटले तुम्ही बारशाला !!!

नंतर मग खूप वर्षे सारे छान चालले होते ..

अनेक अडचणी तुन सुद्धा माझा संसार यशस्वी चालला होता

माझा मुलगा बोर्डात आला तेव्हा तर तुमच्या आनंदाला “पारावार ..च नव्हता !!

आणी मग एके वर्षी तुम्हाला डायबिटीस आहे हे निदान झाले.......

औषध पाणी सुरु झाले ..प्रथम सारे ठीक होते पण नंतर खाण्याचे पथ्य तुम्हाला मानवेना झाले ..

मग सुरु झाले तुमचे कोणाचे ही न ऐकता आपल्या मना प्रमाणे वागणे

इतर वेळी आईच्या सल्ल्या प्रमाणे वागणारे तुम्ही आता तीला पण जुमानेसे झालात ….

याचा परिणाम तर दिसतच होता .. शुगर वाढल्याने तुमचा एक पाय काढावा लागला...

त्या प्रसंगाला मी साक्षीदार होते!

ते ऑपरेशन झाल्यावर तुम्ही फक्त माझ्या गळ्यात पडून खूप रडला होतात !

तो प्रसंग मी कधीच नाही विसरणार ,,..

याआधी तुमची आई म्हणजे माझी आज्जी गेली तेव्हा फक्त तुम्ही इतके रडले होतात ..

पाय काढल्याने परावलंबी झाला तुम्ही

यानंतर आईचे हाल सुरु झाले

कारण तुमचे सारे तीलाच करावे लागे त्यात घरचे.. बाहेरचे व्यवहार पाहणे आणी ..तुमची चीडचीड ..!

आता तर तीलाही बिपी आणी शुगर ने गाठले होते !!

पण बिचारी सारे हसत मुखाने करीत असे

अशीच काही वर्षे गेली ..तुम्हीं आहे त्या स्थितीत पण आनंदी होतात

उत्साह नेहेमीचा होताच

तुम्हाला फिरायची खूपच आवड होती ,,

पण पायामुळे स्वत कुठे जावे असे जमत नव्हते

यानंतर मात्र एकदम सारेच बिघडले ..

आईला डोळ्याच्या ऑपरेशन साठी दवाखान्यात नेले

खरे तर अगदी साधे ओपेरेशन होते ते ,,

पण त्या दरम्यान अचानक तिची शुगर लो होवून तीचे निधन झाले....

हा धक्का आपणा साऱ्या साठी अनपेक्षित होता ..

आम्ही दोघे भावंडे तर पार च “कोलमडून “गेलो .

मला वाटले या वेळी ..तुमची अवस्था अगदीच वाईट होईल॥ पण कसे काय कोण जाणे तुम्ही अगदीच धीराने घेतले सारे ..!

आईच्या माघारी काही दिवस ठीक गेले

पण नंतर नंतर मात्र तुम्ही स्वताला सगळ्यातून अलिप्त करून घेतले

रोजचा पेपर, ..टीवी, ..गप्पा, भावाच्या मुलीशी खेळणे, या पैकी कशातच तुमचे मन रमेना …..

आणी मग तुम्हाला अल्झायमर ने गाठले ..

हे दुखणे फारच वाईट होते ..तुम्हाला काहीच आठवेना .. जेवण पण जेवलेले तुमच्या लक्षात राहीना ..

आणी मग मला एके दिवशी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट गोष्टीला सामोरे जावे लागले.............

अजून आठवतो तो दिवस मला ...

तुम्ही माझी खूप आठवण काढत आहात असा भावाने निरोप दिला होता .

ताई लवकर या बाई अगदी तुमचा ध्यास घेतलाय बघा काकांनी असे वहिनी पण म्हणाली

म्हणून... तुम्हाला कवठ आवडते त्याची चटणी घेवून मी तुम्हाला भेटायला आले होते...

नेहेमी चवीने खाणारे तुम्ही ..त्या दिवशी कसेतरी सांडत मांडत खात होता

खाल्लेले अर्धे तोंडातून बाहेर .. !

त्याची चव पण बहुधा तुम्हाला समजत नव्हती... आणी अचानक तुम्ही मला म्हणालात ..

“कोण तुम्ही हो ?..नाव काय तुमचे ? मला तुम्ही अजिबात ओळखले नव्हते .

माझ्या डोळ्यातून पाणी आले ..

पण तुमचे लक्ष कुठेच नव्हते तुम्हीं मला म्हणाला .

“.आमची ताई कुठे भेटली तर तीला मी बोलावले आहे म्हणून सांगा बर का..

त्याही परिस्थितीत तुम्हाला मला भेटायचे होते आणी मी समोर असून पण माझी ओळख तुम्हाला पटत नव्हती!!!

कीती भयंकर अवस्था ..होती ती ..

काय ही दैवाची खेळी म्हणायची ??

माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले त्यावेळी ..!

अजून ही तो वाईट दिवस मी विसरू शकत नव्हते ..

आणी मग काही दिवसांनी तुमचे “रीतसर निधन झाले “…………….

“निधन “वार्ता “ या सदरात तुमचा फोटो पण छापला गेला .

. माझ्या दृष्टीने तर तुम्ही “त्या “दिवशीच गेला होतात ..

असा हा तुमच्या आयुष्याचा “प्रवास “तुमच्या पुढेच वाचणे माझ्या नशिबी आले

आणी हे सारे आता ही तुम्हाला समजत नाहीच ..!!

माझ्या बरोबर अजूनही तुमच्या चांगल्या “आठवणी “आहेत आणी राहतील ..

आज “फादर्स डे”..निमित्त हा तुमच्या आठवणीना “उजाळा आहे....

आणखी लिहिले तर डोळ्यातल्या पाण्याने हे पत्र धुवून जाईल कदाचित …

म्हणून इथेच थांबते ..

आणी आकाशातल्या एका तेजस्वी तार्या कडे पाहून तुमचा निरोप घेते ...

.तुमची लाडकी

| “ताई . ------------