Quotes by Priyaa in Bitesapp read free

Priyaa

Priyaa

@authorpriyaa316
(582)

सोप्प असत ... मला फरक पडत नाही बोलायचं
सोप्प असत ... मला फरक पडत नाही बोलायचं,
अवघड असत ती समोर आल्यावर काळजाला सांभाळायचं ......
सोप्प असत तिच्या शिवाय राहायचं
सोप्प असत तिच्या शिवाय राहायचं,
खरी परीक्षा असते तिच्याविना एक सेकंद जगायचं .......
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More

अदृश्य..... तो 🥺


जेव्हा स्वतः बाहेर पडलेय चार पैसे कमवायला
जेव्हा स्वतः बाहेर पडलेय चार पैसे कमवायला
दुनिया नोकरी म्हणते ज्याला

आता कळतेय मला त्याची निःशब्द धडपड
आता कळतेय मला त्याची निःशब्द धडपड
सुट्टी असूनही कामावर जाण्याची घाई
अन् रात्री उशिरा येण्याची वेळ
त्याला सुट्टी नावाचा पर्याय च नसतो
आपण ज्याला त्याचा कुटुंबा प्रती निष्काळजीपणा म्हणतो
खरं तर
जग त्याला कर्त्या पुरुषाची जबाबदारी म्हणतं.....
@शब्दप्रिया_ती लिहिते ✍️

Read More

आता पुढे जायचं ठरवलं आहे
स्वतःला एक नवी संधी द्यायची ठरवली च आहे
मागे वळून पहायचं नाही हेही मनाला ठामपणे बजावलं होतं
मग ही हुरहूर का????
नवीन दिवसाची सुरुवात
मग........
कालच्या आठवणीने का???
पाणावल्या डोळ्यांनी मग हृदयाने उत्तर दिलं
पाहिलं असो वा दुसरं......!
खरं प्रेम विसरण कुणाला शक्य झालं 🥺
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More

एकदा का आत्म्याने मृत्यूला स्वीकारलं की
मनाला मरणाची भीती वाटत नाही अन्
मरणाची भीती मनातून गेली की
गमवायला दुसरं काही हातात उरत नाही
जिवंतपणी जगून कोणीही दाखवेल
हिंमत तर मेलेल्या माणसाला जगायला लागते.......
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More