Quotes by Dasharath krushna Chavan in Bitesapp read free

Dasharath krushna Chavan

Dasharath krushna Chavan

@dasharath123


।। शोध ।।
शोध घेता विचारांचा,मन निघाले प्रवासाला,
प्रवासाचा मार्ग नात्यात गुंतला,नात्याचा हा प्रवास अनंतात मुरला.
नकोत ते आचार, नकोत ते विचार,मनाला हवेत केवळ वडिलांचेच संस्कार.
आनंदाच्या क्षणात ही माया गुंतली,प्रवासाच्या शोधात मग भविष्याची पहाट उमलली.
— कवी: दशरथ कृष्णा चव्हाण [1]

Read More

स्वरचित काव्य :- श्री. दशरथ कृष्णा चव्हाण इगतपुरी, जिल्हा:- नाशिक

करुणा
आईची माया, पाठीवर वडिलांची छाया,बहिणीची किमया, अन् बायको सोबत करतो संसार,या संतांच्या आदर्शाची लाभली आम्हा छत्रछाया.
नाते हे प्रेमाचे, रेशमी संबंध हृदयाचे,चिंतन अखंड देवाचे, नामस्मरण अंतःकरणाचे,नशिबाची लाभली साथ, शिरावर आशीर्वाद खंडोबाचे.
अधर्म जगी वाढला, तेव्हा कृष्णाने धर्म स्थापिला,नारायणाने अवतार घेऊन, तोच पांडुरंग झाला.वारकऱ्यांचा विठ्ठल बनून, तो महाराष्ट्रात अवतरला,भक्तासाठी पंढरपुरी तो, अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिला.
— कवि:- दशरथ कृष्णा चव्हाण

Read More