Quotes by Vaishnavi Kale in Bitesapp read free

Vaishnavi Kale

Vaishnavi Kale

@drvaishnavikale


थांब जरा...

लाटांना आसवांच्या
चांदवा तुझ्या नजरेतला
स्पर्शू दे जरा...
विरहाच्या सरींना
हास्याच्या तुषारांनी
भिजवू दे जरा...

थांब जरा...

पोळलेल्या या कायेला
गारवा तुझ्या सावलीचा
जाणवू दे जरा...
हृदयांत दडलेल्या
शब्दांच्या राशी
ओठांवर येऊ दे जरा...

थांब जरा...

प्रश्नांनी श्रमलेल्या मनाला
विश्वासाच्या कवेत तुझ्या
निजवू दे जरा...
आतुर दृष्टीला माझ्या
स्वप्नांचा उंबरा
ओलांडू दे जरा...

थांब जरा...

एकल्या रात्रीनंतर घराला
चैतन्याची पहाट माझ्या
पाहू दे जरा...
पानी हृदयाच्या हा चेहरा
नेत्रांच्या कुंचल्याने
रंगवू दे जरा...

थांब जरा...

काळजीची ही शिदोरी बांधताना
प्रेमाचा घास तुला
भरवू दे जरा...
सोडवून घेताना हातांना
अंतर हृदयांतले आपुल्या
संपवू दे जरा...

थांब जरा...

पावलांना माझ्या
तुझ्या ठशांवर चालताना
थांबवू दे जरा...
अन् पाहताना तुला पाठमोरे
गाठताना तुझ्या क्षितीजांना
या क्षणभर विसाव्याच्या
आठवणींची,
माळ गुंफु दे जरा...

थांब जरा...


                                                                               - वैष्णवी....

Read More

नमस्कार, मी डॉ. वैष्णवी काळे..
प्रेम...
कधी वाणीत, कधी दृष्टीत...
कधी सहवासात, कधी विरहात...
कधी काळजीत, कधी रूसव्यात...
कधी सखा तर कधी पत्नीच्या मुखात...
या, व अशा असंख्य अबोल आणि बोलक्या 'प्रेमाच्या परिभाषा' मी घेऊन येत आहे आपल्यासाठी...आपल्या अव्यक्त प्रेमाला शब्दरूप देण्यासाठी...हृदयाने हृदयाशी केलेली हितगुज सांगण्यासाठी...
माझ्या सार्या प्रेमळ वाचकांना व माझ्या 'हृदयस्था'ला समर्पित..
❤❤
- Vaishnavi Kale

Read More