Quotes by Mandar Milind Kulkarni in Bitesapp read free

Mandar Milind Kulkarni

Mandar Milind Kulkarni

@mandarkulkarni

Book review: शंभू बावनी
_______________________
छत्रपती संभाजी महाराजांवर मराठी भाषेत लिहिल्या गेलेलं काव्य तसं पाहिलं तर कमी प्रमाणात आहे. मात्र ओंकार पांडव यांनी हे कार्य उत्तमरित्या पेललं आहे. ह्या पुस्तकाचे नाव सार्थ ठरवत हे पुस्तक आपल्यासमोर श्री शंभूराजांची शौर्य गाथा काव्य रूपात मांडते. लेखकांनी ही रचना करताना शिवकालीन कवी भूषण ह्यांच्या छंदांची शैली वापरली आहे. त्यामुळे आपल्याला शिवकालीन काव्याचा भास होतो. अनेक श्लोक हे मराठीसह हिंदी भाषेत आहेत.

शंभूराजांचे पराक्रम, मुघल सत्तेला वाटणारी त्यांची भीती हे अत्यंत गीतमय पद्धतीने इथे मांडलेले आहे. ह्यातील वीररसाचा उत्तम वापर ही आणखी एक जमेची बाजू. ही शंभूगीते जर नव्या पिढीने आत्मसात केलीत तर शंभूराजांची कीर्ती आणखी दूर पसरेल ह्यात शंका नाही. शिवकालीन भाषा समजणे सामान्य लोकांना अवघड जाऊ शकते हे लक्षात घेऊन प्रत्येक श्लोकाचा मराठी अर्थ आणि भाव-विशेष मांडलेले आहेत. त्यामुळे पुस्तक अधिक वाचनीय होते.

पुस्तकातील भोसले कुल-वर्णन काव्य, छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेले “शिवराज अष्टक” अश्या इतर रचनांमुळे हे पुस्तक परिपूर्ण झालेले आहे. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे गुण-दर्शन करणारे हे पुस्तक नक्की वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे.

लेखक: बाजी (ओंकार) पांडव
Insta: @baaji.pandav_writes
प्रकाशक: मुलुखगिरी प्रकाशन

Read More

आज येथे प्रस्तुत करत आहे एक कथा. जी चार कवितांच्या रूपात लिहिली आहे. हा संवाद आहे दोन प्रेमी जीवांचा...तशी ही एक विरहकथा...पण दोघांच्याही नजरेतून पाहिलेली...या संवादात रुसवे आहेच पण जसा घटनांचा क्रम समोर येतो तसा तो दुरावाही कमी होतो.
_______________________________
ही आहे पहिली कविता : विरह संपला
कवितेच्या नायकाला अनपेक्षितपणे ती दिसते व त्याच्या मनात कल्लोळ माजतो. काय असेल त्याच्या मनात?
_________________
विरह संपला
_________________
अतूट त्या साखळ्या निखळल्या अंतरी
खूण ही पटली मनाला ती तूच आहे खरी
पळालो, थांबलो तुला मी का दिसेना
भांबावलो,थकलो परी मन काही भरेना।

मी गुंतलो, गुरफटलो कशाचे हे धागे
तुटता तुटेना, सुटता सुटेना कोडे हे माझे
भावनांचे बंध हे बांधती माझ्या मना
अश्रूंचे तलम तंतू अडविती वेदना।

विरह हा संपला तरी वसंत का फुलेना
हास्य उमटले जरी का न उमटती भावना
दूर मी होतो तरी किंतु हा नसावा
का तुझ्या डोळयांत मला अनोळखीपणा दिसावा?

(क्रमशः)
©2026, मंदार कुळकर्णी
First published on Instagram @maziya_angani

Read More

मी शोधत बसतो.

माझ्या मनातल्या एका हरवलेल्या पाखराला
ज्याला खूप उंच उडायचं होतं,गरुडापेक्षाही वर..
करायच्या होत्या त्याला ढगांशी गुजगोष्टी आणि वाऱ्याशी स्पर्धा..
पण प्रयत्नच केला नाही त्याने कधी घरट्यातून बाहेर पडून उडण्याचा…(१)

बळ होते त्या वाघाच्या पंजात पण,
त्याने कधी एका पावलापुढे उडी मारलीच नाही..
एकाच झडपेत ध्येय मिळवायचे होते त्याला,
तरीही तो छोट्या शिकारींवरच समाधान मानत राहिला..
शेवटी त्याची डरकाळी विरून गेली…(२)

अजूनही तोच उत्साह त्याच्या मनात आहे..
त्या मोराला आपला पिसारा जगाला फुलवून दाखवायचा आहे पण,
आकाशात श्यामवर्णी मेघ दाटून येण्याची वाट बघत
तो नुसताच उभा आहे…(३)

©2026, मंदार कुळकर्णी
First published @ thewavesofwords.wordpress.com

Read More