Quotes by prit tembhe in Bitesapp read free

prit tembhe

prit tembhe

@mywrites


कोण आहेस तू...?
जरा विचार तुझ्या प्रेमाला...
नजरेत बघ थोडं,
दिसेल च कुठेतरी तुझ्या श्वासाला.....
हृदयाची धडधड नि जीवाची आस आहेस तू .....
रखरखत्या उन्हात छायेचा ध्यास आहेस तू......
कवितेचा शेवट काय, सुरवातीला ही आहेस तू....
जशी सकाळी ही आणि सूर्याच्या मावळतीला ही आहेस तू.....
या धडधडत्या हृदयाची आस आहेस तू....
मंद मंद धावणारा श्वासातला श्वास आहेस तू....
समुद्राच्या लाटापरी उसळते हृदय....
किनाऱ्यावर येऊन मिळणारी वाट आहेस तू.....!
सुगंधपरी दरवळणारा आनंद आहेस तू.....
कधी न संपणारा छंद आहेस तू.....
गाण्याचे ते फक्त निमित्त...
ओठांवर गुणगुणणारे गीत आहेस तू......

Read More

हो गया......!

ऊनसावली.....

काट्यांचे वार सोसताना,
नसली पानांची ढाल जरी…
करीत अतुट संघर्ष माझा,
उभा आहे मी आजही…

ना नशिबावर आरोप केला,
ना झिजण्याची खंत मनाशी…
काळोखाने जरी पाहिली वाट,
ज्योत माझी विझण्याची…

पाय रोखून उभा राहीन मी,
कणखर त्या वटवृक्षापरी…
सोसेलच एक दिवस नक्की,
निसर्गाची ऊन-सावली खरी…!

Read More

प्रेमाची मी बघावी वाट,
मनात साठवावी तुझ्याच पावलांची साथ.....
न बोलता कळावे स्पर्श तुझ्या भावना,
तुझ होताना मला तुझ्याविना राहवंना.....
असली दूर जरी हृदयात माझ्या राहतेस,
श्वासागणिक नेहमी माझीच होऊन जातेस......
नशीब,श्वास, वेळ सगळं थांबतं क्षणी,
नशिबी तूच रहावं एवढाच ध्यास हा मनी........
म्हणून प्रेमाची मी बघावी वाट,
मनात साठवावी तुझ्याच पावलांची साथ...........!

Read More

सखे,राहतो मी तुझ्याच अंतरी, नको शोधूस वाट माझी....
नसलो जरी जवळी तुझ्या, पण आस मात्र नेहमी तुला भेटायची.......
पाहताना दुरून तुला, मन माझं फुलून येतं....
जसा एकदा पुन्हा नव्याने बहरला श्रावण मासं.....
सौंदर्य तुझे जरा ठेव आटोक्यातं,
कारण रूपाने तुझ्या, प्रेमाची वाट बहरते माझ्या मनातं.....
कसा आवरू ग सखे,माझ्या हृदयाला मी,
समोर येताच तुझे स्वप्न याला दिसतं....
म्हणून लागली जरी सवय भेटायची,
पण वाट मात्र हा विसरतं......

Read More