Quotes by Pooja in Bitesapp read free

Pooja

Pooja

@poojashona
(8)

“आयुष्याचे काही पानं”

आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे,
मंजिल नाही… तर प्रत्येक वळणावरची एक नवी कहाणी आहे.
कधी आनंदाची सर येते,
तर कधी डोळ्यांत नकळत अश्रू दाटतात.

मोठ्या आनंदाच्या शोधात आपण अनेकदा,
छोट्या छोट्या क्षणांना विसरून जातो.
पण हेच छोटे क्षण असतात,
जे पुढे आयुष्यभराच्या सुंदर आठवणी बनतात.

वेळ कधी कोणासाठी थांबत नाही,
पण प्रत्येकाला काहीतरी शिकवून जातो.
आज जे दुःख देऊन जाते,
तेच उद्या आपल्याला मजबूत बनवते.

काही नाती सोबत चालण्यासाठी असतात,
आणि काही फक्त आठवणीत राहण्यासाठी.
प्रत्येक भेटणारी व्यक्ती आपली नसते,
पण प्रत्येक जण काहीतरी शिकवून नक्की जातो.

स्वतःला हरवून कोणाला मिळवू नका,
कारण स्वतःची ओळख सर्वात महत्त्वाची असते.
ज्याच्या मनात आशा जिवंत असते,
त्याचं आयुष्य नेहमी सुंदर असतं.

उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही,
म्हणून आजचा प्रत्येक क्षण मनापासून जगा.
कारण आयुष्य ही निसर्गाने दिलेली सुंदर भेट आहे,
ती प्रत्येक क्षणी अनुभवत राहा.

— शब्दिका ✍️

Read More

“ज़िंदगी के कुछ पन्ने”

ज़िंदगी एक सफ़र है, मंज़िल नहीं,
हर मोड़ पर एक नई कहानी मिलती है।
कभी खुशियों की बारिश होती है,
तो कभी आँखों में नमी मिलती है।

हम अक्सर बड़ी खुशियों की तलाश में,
छोटे-छोटे लम्हों को भूल जाते हैं।
जबकि वही छोटे पल होते हैं,
जो बाद में सबसे खूबसूरत याद बन जाते हैं।

वक्त किसी के लिए रुकता नहीं,
पर हर किसी को कुछ सिखा जाता है।
जो आज दर्द देता है,
वही कल हमें मजबूत बना जाता है।

कुछ रिश्ते साथ चलने के लिए होते हैं,
और कुछ सिर्फ़ याद बन जाने के लिए।
हर मिलने वाला अपना नहीं होता,
पर हर कोई कुछ सिखाकर ज़रूर जाता है।

खुद को खोकर किसी को मत पाना,
क्योंकि अपनी पहचान सबसे ज़रूरी है।
ज़िंदगी उसी की खूबसूरत होती है,
जिसके दिल में उम्मीद अभी ज़िंदा है।

कल क्या होगा, ये किसने देखा है,
आज को मुस्कुराकर जी लेना।
क्योंकि ज़िंदगी एक खूबसूरत तोहफ़ा है,
इसे हर पल महसूस कर लेना।

— शब्दिका ✍️

Read More

“तुझ्या असण्याची जाणीव”

माझ्या प्रत्येक सकाळच्या पहिल्या हसण्याचं कारण आहेस तू,
माझ्या प्रत्येक रात्रीच्या शेवटच्या विचारात आहेस तू.
गर्दीतही मनाला शांतता देणारा,
माझ्या न बोललेल्या भावनांचा आवाज आहेस तू.

कधी वाटलंच नव्हतं,
की कोणीतरी इतकं आपलं वाटू शकतं…
की तुझ्या छोट्याशा आनंदातही
माझं मन नकळत हसू शकतं.

तुझा एक छोटासा शब्द
माझा पूर्ण दिवस सुंदर करून जातो,
आणि तुझं शांत राहणंही
मनाशी खूप काही बोलून जातं.

तुझी भेट कदाचित नशिबाची सुंदर गोष्ट होती,
पण तुला मनापासून जपणं ही माझ्या हृदयाची भावना आहे.
तू दूर असलास तरी जवळच वाटतोस,
कारण माझ्या प्रत्येक धडधडीत तुझंच अस्तित्व आहे.

नको कोणतं वचन, नको कोणतं बंधन,
फक्त प्रत्येक जन्मात तुझी साथ हवी आहे.
माझ्या आयुष्याच्या सुंदर कथेत,
सगळ्यात खास पान फक्त तुझं आणि माझं नातं आहे.

कधी काळ बदलला,
कधी वाटा वेगळ्या झाल्या,
तरी माझ्या प्रत्येक प्रार्थनेत
तुझं नाव कायम राहील.

कारण प्रेम म्हणजे फक्त जवळ असणं नाही,
तर कोणाला अंतर असूनही
मनात कायम जपून ठेवणं असतं…

“शब्द माझे… भावना तुझ्या…
✍️ शब्दिका”

Read More

“तुम्हारे होने का एहसास”

मेरी हर सुबह की पहली मुस्कान हो तुम,
मेरी हर रात का आख़िरी ख्याल हो तुम।
भीड़ में भी जो दिल को सुकून दे जाए,
मेरी उस ख़ामोशी की आवाज़ हो तुम।

कभी सोचा नहीं था कोई इतना अपना लगेगा,
कि उसकी छोटी-सी खुशी में भी दिल मुस्कुराएगा।
तुम्हारी एक बात दिन बना देती है,
और तुम्हारी चुप्पी भी बहुत कुछ कह जाती है।

तुमसे मिलना शायद किस्मत की कहानी थी,
पर तुम्हें चाहना दिल की ज़ुबानी है।
तुम दूर रहो तो भी करीब लगते हो,
क्योंकि मेरी हर धड़कन में तुम रहते हो।

न कोई वादा चाहिए, न कोई दावा चाहिए,
बस हर जन्म में तुम्हारा साथ चाहिए।
अगर मेरी कहानी का कोई खूबसूरत हिस्सा है,
तो वो सिर्फ़ तुम्हारा मेरा रिश्ता है।

कभी वक्त बदल जाए, रास्ते बदल जाएँ,
पर मेरी दुआओं में तुम्हारा नाम हमेशा रहेगा।
क्योंकि प्यार सिर्फ़ पास रहने का नाम नहीं,
किसी को दिल में हमेशा रखने का नाम है।

“अल्फ़ाज़ मेरे, एहसास तुम्हारे…
✍️शब्दिका”

Read More