Prerak Vichar - 4 in Marathi Motivational Stories by Arun V Deshpande books and stories PDF | प्रेरक- विचार - भाग - ४ था

Featured Books
  • خواہش

    محبت کی چادر جوان کلیاں محبت کی چادر میں لپٹی ہوئی نکلی ہیں۔...

  • Akhir Kun

                  Hello dear readers please follow me on Instagr...

  • وقت

    وقت برف کا گھنا بادل جلد ہی منتشر ہو جائے گا۔ سورج یہاں نہیں...

  • افسوس باب 1

    افسوسپیش لفظ:زندگی کے سفر میں بعض لمحے ایسے آتے ہیں جو ایک پ...

  • کیا آپ جھانک رہے ہیں؟

    مجھے نہیں معلوم کیوں   پتہ نہیں ان دنوں حکومت کیوں پریش...

Categories
Share

प्रेरक- विचार - भाग - ४ था

प्रेरक-विचार - भाग-४ था

----------------------------------

लेख-

मनापासून

-------------------------------------------------

मन करुणेचा डोह ,

मन मायेचा सागर

मन सरिता प्रवाही ,

मनात भरती प्रेमाची ...||

अशी अवस्था मोठी आनंद देणारी आहे.

"मनापासून " या शब्दातूंच आपल्याला उत्स्फूर्त-भावनेचा स्पर्श होत असतो .आता हेच बघा की , मी काय, तुम्ही काय ,अगदी कुणी असो, आपण जे कार्य आपल्या हातात घेतो ते पूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण अगदी मनापासून करीत असतो ,

-तन-मन-धन " अर्पण करून स्वतःला कार्यात झोकून देतो .अशी अवस्था कधी असते ? याचे उत्तर आहे" जेंव्हा आपण काम मनापासून करीत असतो." आपले काम पाहून बघणारे म्हणतात ..क्या बात है..इसको बोलते काम. !.अगदी मनापसून काम केलाय "जाणवले बरं का .

ज्या कामात आपले मन नाही, आणि त्याची आवड पण नाही ? या उपर ही .काम करावे लागले ..तर त्या कामाला काहीच अर्थ रहात नाही, "पाट्या टाकूनही काम. होतातच की , गम्मत म्हणजे .हे काम पाहून तुम्हालाच ते "निर्जीव ", बेजान काम वाटेल , कारण "मनापसून -अगदी जीव ओतून .जे काम आपण पूर्ण करतो ..त्याचे तेज" काही वेगळेच असते ..जे लगेच मनाला भावते आणि डोळ्यांना दिसते .

आपण व्यावहारिक आयुष्यात वावरतांना .मनाला फार वेगळे करू शकत नाही..हे लक्षात ठेवायला हवे ..अनेकजण असे आहेत की जे म्हणतात ."आम्ही भावना आणि व्यवहार यांची गल्लत करीत नाही . दोन्ही दोन बाजूला "ठेवूनच व्यवहार करतो , तुमच्या सारखे भावनिक गोंधळ आम्ही घालीत नाहीत ,काही मर्यादेत हे बरोबर असेलही ,

पण, सगळेच कारभार आणि व्यवहार असे .रुक्षपणे आणि पैशांच्याभाषेत नाही होऊ शकत .आणि सगळेच लोक काही अशा कोरड्या मनाचे लोक नसतात ".वरवर आणि तोंडदेखले व्यवहार भावनेच्या जगात कधीच चालत नाहीत ..

कारण -- या जगात आपण नेहमीच आपल्या माणसांसाठी जे -जे काही करतो ते आपलेपणाने आणि मनापसून करतो " हे गृहीत धरलेले असते , असे जर नाही झाले तर ,आपलीच माणसे बोलून दाखवतील की - बघा ..परक्या सारखं वागला माझ्याशी , मनापसून केलं असता तर किती बरं झालं असत. "..! ,

"मन जिथे नाही ..तिथे काही नाही..!

मन सदा रिते रिते, काय मिळे कुणा तिथे ?

असे असता कामा नये , ....!

.म्हणतात ना "जीव भावाचा भुकेला असतो..प्रेमाचा भुकेला असतो ..तुम्हीच एक दृश्य द्लोया समोर आणून पहा. "आपण ज्यावेळी आपल्या एखाद्या मित्राकडे , पर्रीचीताकडे , नातेवैकाकडे जातो .तिथे गेल्यावार त्यांच्या .घराचे दार उघडल्यावर तुम्हाला जाणवते " माझे स्वागत या घरतल्या माणसांनी अगदी मनापसून आणि आनंदाने केले आहे ", ,मग, नंतरची भेट आणि बोलणे .आपण आपल्या आठवणीत साठवून ठेवतो. आणि याच्या विपरीत अनुभव खूप वाईट वाटायला लावणारा असतो..पुन्हा अशा घरी जावे ? असे मनापसून वाटेल का ? याचे उत्तर तुम्हीच द्या.

आपल्याला करावयाचे एखादे काम असो , विद्यार्थी म्हणून शाळा -कॉलेजचा अभ्यास असो, परीक्षेची तयारी असो ..कलेची साधना असो, साहित्याचे लेखन असो ,वा साहित्याचे वाचन असो या सगळ्या गोष्टी ."मनापासून करायच्या असतात .तरच त्याचा काही उपयोग ."वरवर कितीही करा..काही साध्य होत नाही ".तसे पाहिले तर अगदी कलत्या वयापासून ते अगदी मोठे झालो तरी .कुणी न कुणी आपल्याला सांगणारा असतो,आणि तसा भेटत असतो.. जो म्हणतो .."बाबा रे .जे करायचे ते व्यवस्थित कर,अगदी मनापसून कर , मग, काही काळजी करू नको.सगळं काही नीट होईल ", या सांगण्यात किती आश्वासकता आहे , हे सकारत्मक सांगणे मनाला मोठे क्रियाशील होण्याचे बळ देणारे आहे.."असे कुणी नेहमीच भेटावे ..जो तो मनापसून काम करू लागेल ".

आपल्या मनाच्या इतकी प्रचंड शक्ती असते की .." या उर्जेचा वापर मनापसून ज्याला करता आलायं त्यांच्या हातून चमत्कार वाटावेत अशी कार्य सफल-पूर्ण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत . पद्धत एकच -विचार एकच ..

"जे करावे ते मनापसून , जे करायचे तेही मनापसून .

"भक्ती, श्रद्धा , या दोन्ही भावना ..देखील "मनापासूनच्या असल्या तर श्रद्धेला फल आहे , भक्ती आणि श्रद्धायुक्त मनाने .मनापसून जो भगवंत -स्मरण करतो " त्याचे रसाळ फल तो अनुभवत असतो . या उलट ,ज्याचे असे मन नाही ..करायचे म्हणून जो करतो .त्याला काहीच मिळणार नाही .

कार्य कठीण व सोपे ..हे कधीच महत्वाचे नसते , महत्वाचे असते ते .या कामात आपण मनापासून असणे

या संदर्भात माझ्या चार ओळी --मनापसून आपल्याला सप्रेम सादर ..

कार्य पूर्ण करण्या

जिद्द असावी मनाची

जिद्दी सोबत असावी

तयारी मनापासूनची ...||

शुभेच्छा.

----------------------------------

लेख-२

क्रोध आणि राग ..!

-----------------------------------------------------

क्रोध आणि राग या दोन्ही वर कंट्रोल करायचा ? ...बाप रे ! किती अवगढ काम आहे न हे ? कारण आपल्या बहुतेकांना चटकन राग येतो , या रागाचा पारा देखील कमालीच्या वेगात चढतो ..अशा रागावर कसा ताबा मिळवायचा ? ,लोक म्हणतात "आलेला राग गिळून टाकायचा असतो ", आणि शांतपणे काम करायचे असते ". असे करता येत असते का कुठे ? ,थोडक्यात .."रागाने बिथरलेल्या मनासा पासून सारेजण दूर दूर असणेच पसंद करतात .

या माथे भडकावून टाकणाऱ्या रागाच्या भडक्यात चांगल्या चांगल्या गोष्टी बेचिराख होऊन जातात .म्हणूनच रागाला " क्रोधाग्नी " असे म्हणतात ते उगाचच नाही क्रोधाच्या या अग्नीला वेळीच शांत करावे नसता या क्रोधाचे वडवानल म्हणजे- अग्निप्रलय समजावा .

जाणती माणसे नेहमीच म्हणतात की बाबा रे.. रागावणे सगळ्यात सोपे असते पण आलेल्या रागावर शांतपणे नियंत्रण ठेवणे आणि वागणे ज्याला जमते ..तो खरा संयम बाळगणारा माणूस समजावा.

या सांगण्यात नक्कीच खूप तथ्य आहे..जरा नजरे समोर रागीट माणसं आणून पहा ..त्यांच्या रुद्रावतार " पाहूनच आजूबाजूचे सारेजण " त्राही माम " असा देवाचा धावा करतात . कारण रागाच्या भरात असलेला माणूस काय करेल ?

याचा भरवसा नसतो ..रागाच्या भरात माणसाचा "तोल आणि ताल " दोन्ही बिघडलेले असतात , ज्यामुळे , आपल्या रागाचे परिणाम काय होतील ? हा विचार देखील क्रोधीत व्यक्ती करू शकत नाही ..इतकी त्याची अवस्था ..बेभान -बेफाम होऊन गेलेली असते ..

घरातील मोठी व्यक्ती - जसे वडील , आजोबा , किंवा ज्याच्या हातात घराचा सगळा कारभार आहे, या पैकी कोणतीही व्यक्ती ..लहरी आणि चिडक्या स्वभावाची असेल, संशयी स्वभावाची असेल, "हलक्या कानाची असेल - म्हणजे.कुणी काही सांगितले की- याचे मत लगेच त्याप्रमाणे बदलते असणार " त्यातच भर म्हणजे यांच्या स्वभावाला किनार असते ती अधीर आणि अशांत अशा मनाची .. अशा व्यक्तींच्या थोडेसुद्धा मना-प्रमाणे झाले नाही तर ..यांचा राग अनावर होतो .आणि " मग त्या रागाच्या तडाख्यात घरातली माणसे विनाकरण होरपळून जातात" .

माझ्या अनुभवावरून एक मत निरीक्षणातून मांडू इच्छितो की..गेल्या पिढीत आणि आताच्या पिढीतल्या जेष्ठ मंडळींनी "अशा रागीट माणसांचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे ".

मनाच्या आततायीपणामुळे-येणाऱ्या रागाचे परिणाम तत्कालीन कमी आणि दूरगामी जास्त असतात .कारण ..ज्या व्यक्तीवर "राग काढला जातो ..ती तर नेहमीसाठी खूप दुखावली जाते ", केवळ .त्याने त्याला आलेला राग " कंट्रोल मध्ये ठेवला म्हणून होणारा अनर्थ टाळला गेला ".

काही वेळा नंतर मन शांत होऊन जाते आणि आलेला राग ओसरून जातो ..त्यावेळी ..राग राग केलेलेया व्यक्तीने कितीही क्षमा याचना केली तरी .दुखरा मनाच्या वेदना शमल्या जात नसतात " आणि नेमकी हीच गोष्ट "रागीट माणसं -लक्षात ठेवत नाहीत..

मन प्रसन्न असले म्हणजे .सर्व गोष्टी आनंदाने सिध्द होत असतात " हे माहिती असून सुद्धा ..अनेक वेळा आपले मन आतून कोणत्या न कोणत्या कारणाने जर धुमसत असेल तर..आपल्या हातून होणार्या गोष्टीला आपल्या मनातल्या रागाचा -त्या कटू भावनेचा स्पर्श नक्कीच होतो .मग निर्जीव आणि कळाहीन कामाला काय अर्थ येणार.

याचे एक सर्वपरिचित उदाहरण दिले जाते - " गृहिणी जर रागात असेल, तिच्या मनात धुसफूस चालू असेल तर त्या दिवशी तिच्या स्वयंपाकाला सुद्धा चव येत नसते ".,

असे म्हणतात की "राग आला की ..मनातल्या मनात - १ ते १०० आकडे मोजावेत " .असे कसे होईल ? कारण "राग -ही अशी भावना आहे की ती लगेच आपल्या मनाचा ताबा घेते आणि सगळी चक्र जणू उलटी फिरू लागतात ", मग कशाचा आलाय सारासार विचार ?

माझ्यामते रागीट माणसांचा स्वतःच्या कार्यक्षमतेवर पक्का विस्वास नसतो -त्यातच त्याच्या वाट्याला अपयश येते ,पदरी अपमान पडतो , त्याच्या मनात सतत आपण एक अन्याय -ग्रस्त आहोत अशी भावना असते , त्याला कुठे तरी याची जाणीव होत असते ,अशावेळी , समोरच्या माणसाने केलेले काम , त्याचे यश , त्याचे कौतुक हे सहन होणारे रहात नाही. परिणामी आतली खदखद साचून रागाच्या रुपात बाहेर पडते ...आणि मग,हा आलेला राग " सोयीस्करपणे आपल्याच माणसावर काढणे त्याला सर्वात सोयीचे असते तेही बाहेरच्या नाही ,तर घरातल्या -परिवारातील कुणाही हक्काच्या आपल्या माणसावर .

पण म्हणतात न - रागीट माणसाला शांत करणारी कुणीतरी एक व्यक्ती नक्कीच आजू बाजूला असते.अशा व्यक्तीच्या जवळ असणारी समजुतीच्या शब्दांची मलमपट्टी चांगलीच गुणकारी ठरत असते , हे काम करणारी व्यक्ती वयाने आणि अनुभवाने अर्थातच मोठी असते ..कारण अनुभवाच्या आधारे त्याला माहिती असते की "याचा राग कसा शांत करायचा .

आता पर्यंत आपण राग आणि रागीट माणसा बद्दलच बोलतो आहोत , पण त्याला कंट्रोल करू शकणारी ही शांत माणसे म्हणजे नेमकी कशी असतात ? हे पण आपल्याला माहित करून घ्यावे लागेल .कारण कधी न कधी आपल्याला सुद्धा एखाद्याचा राग शांत करण्याची जोखीमभरे काम करावे लागू शकते...

शांत माणसे - कधी ही मन तोडून टाकणारी प्रतिक्रिया देत नाहीत ,की तसे शब्द वापरत नाहीत समोरच्या माणसाचे ऐकून घेण्याची त्यांच्या मनाची जबरदस्त तयारी असते . शांतपणा "स्वभावातील हा गुण मेहनतीने आणि अनुभवातून कमवावा लागतो , समोरचा कितीही रागात बोलो , गोंधळ घालो ..ही शांत माणसे आपल्या भावना काबूत ठेवून रागाने बेभान झालेल्या माणसाचा धिंगाणा चालू देतात ..

आपण जर म्हणालो .अहो .असे इतके शांत राहून पाहू कसे शकता तुम्ही ?

द्या ना त्याच्या मुस्काडीत .येईल जाग्यावर .

आपल्या या सूचनेला शांतपणे ऐकून घेत ते म्हणतील .

.त्याने काही होणार नाही , रागा ने राग वाढेल ,शब्दाने शब्द वाढेल ", त्यापेक्षा .आपण .शांत राहावे.. याने एक होईल ..राग राग करून, गोंधळ करून ..हाच माणूस थकून जाईल ,आणि शांत होईल..सो, आपण वाट पहायची ..!

आहे की नाही ग्रेट क्वालिटी ..!

म्हणून आपण आलेला राग आवरून शांत कसे होता येईल याचा विचार तरी करावा ,आणि तसे केले तर त्यात आपलेच भले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------

प्रेरक- विचार - भाग - ४ था .

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२