Jyotish Shastra in Marathi Magazine by Sudhakar Katekar books and stories PDF | ज्योतिष शास्त्र

Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

ज्योतिष शास्त्र

राशींची माहिती: एकंदर बारा राशी आहेंत.
(१) मेेश (२) वृशभ ((३) मिथून (४)कर्क (५)सिंह (6) कन्या (७)तूळ (८) वृश्चिक (९) धनु (१०) मकर (११) कुंभ (१२) मीन
नक्षत्र:-(१)अश्विनी (२)भरणी (३)कृत्तिका (४)रोहिणी (५) मृग (६)आर्द्रा (७)पुनर्वसु
(८)पुष्य (९)आश्लेषा (१०) मघा (११) पूर्वा
(१2)उत्तरा (१३) हस्त (१४) चित्रा (1५) स्वाती
(१६) विशाखा (१७) अनुराधा (१८) ज्येष्ठा
(१९) मूळ (२०)पूर्वाषाढा (२१) उत्तराषाढा (२२) श्रवण (२३) धनिष्ठा (२४)शततारका
(२५)पूर्वा भाद्रपदा (२६)उत्तरभाद्रपदा
(२७), रेवती
ग्रह व त्यांच्या राशी उच नीच
रवी सिंह मेष तूळ
चंद्र कर्क वृषभ वृश्चिक
मंगळ मेष, वृश्चिक मकर कर्क
बुध मिथुन,कन्या कन्या मीन
गुरू धनु, मिन कर्क मकर
शुक्र वृषभ,तूळ मीन कन्या
शनी मकर,कुंभ तूळ मेष
नक्षत्र न.स्वामी
१) अश्विनी (१०) मघा (१९) मूळ केतू
२)भरणी (११)पूर्वा (२०) पूर्वाषाढा शुक्र
३)कृत्तिका (१२) उत्तरा(२१)उताराषाढा रवी
४)रोहिणी (१३)हस्त (२२) श्रावण चंद्र
५)मृग (१४)चित्रा (२३) धनिष्ठा मंगल
६)आर्द्रा (१५)स्वाती (२४) शततारका राहू
७) पुनर्वसु (१६)विशाखा (२५)पु.भाद्रपदा
गुरू
८)पुष्य (१७)अनुराधा(२६)उ.,भाद्रपद शनी
९) आश्लेषा (१८) ज्येष्ठ (२७) रेवती बुध
कृष्णमूर्ती पद्धतीत नक्षत्र व नक्षत्र स्वामीला महत्व आहे. कोणताही प्रश्न पाहतांना कार्येश ग्रह काढणे महत्वाचे आहे.
कार्येश ग्रह कसे काढावे
१)भावात जो ग्रह आहे,त्या ग्रहांच्या नक्षत्रातील ग्रह.समजा मिथुन लग्न आहे व धनस्थानी रवी आहे. रवीचे नक्षत कृत्तिका,उत्तरा,उत्तराषाढा(३,१२,२१) हे आहेत.या नक्षत्रात असणारे ग्रह धन स्थानचे कार्येश होतील.
२) व्दितीय स्थानी रवी आहे म्हणून रवी.
३) भावेश चंद्र आहे. म्हणून चंद्राच्या नक्षत्रातील ग्रह.
४) भावेश चंद्र म्हणून चंद्र.
५) युतीने किंवा दृष्टीने संबंध असणारे ग्रह.
राहू केतू ज्या ग्राहबरोबर यासतील त्या प्रमाणे फळ देतात.
समाज एखाद्याने प्रश्न विचारला विवाह कधी होईल.त्या करिता फक्त 2,7,11 या स्थानाचा
विचार करावा'जन्म कुंडलीत मिथुन लग्न आहे.द्वितीय स्थानी कर्क रास येईल.सप्तम स्थानी धनु रास येईल.व अकरावे स्थानी मेष रास येईल. द्वितीयस्थानी मंगळ आहे.मंगळाचे
नक्षत्र मृग चित्रा व धनिष्ठा आहेत या नक्षत्रात असनाते ग्रह द्वितीय स्थानाचे कार्येश होतील.
व्दितीय स्थान म्हणजे कर्क रास.कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.हस्त चित्रा,श्रावण ही चंद्राची
नक्षत्र आहेत.या नक्षत्रात असणारे ग्रह द्वितीय
स्थानाचे कार्येश होतील.
सप्तमात बुध असेल तर बुधाची जी नक्षत्र
आश्लेषा,ज्येष्ठा, रेवती ,व सप्तमेश गुरू म्हणजे गुरू च्या नक्षत्रातातील ग्रह सप्तम स्थानाचे कार्येश होतील. एकादश स्थानी मेष
रास येते.मेष राशीचा स्वामी मंगल म्हणून मंगळाचे नक्षत्रात असणारे ग्रह या स्थानाचे कार्येश होतील."कृष्ण मूर्ती पद्धतीत उप नक्षत्र स्वामी महत्वाचा आहे.सप्तम स्थानाचा उप नक्षत्र स्वामी जर 2,7,11 य भवांचा कार्येश असेल तरच विवाह होतो अन्यथा नाही.त्या नंतर दशा, महादशा व अंतर्दशा पहाव्या.यांचाही या स्थानाशी संबंध पाहिजे.
त्या कालावधीत विवाह होतो.
तात्कालिक ग्रह अर्थात (रुलिंग प्लॅनेट)याचा उपयोग विवाहाचा कालावधी काढण्या साठी
उपयोग करतात.,तात्कालीक ग्रह म्हणजे
ज्या क्षणाला प्रश्न पाहतो त्यावेळेस उदित असणारे लग्न.त्याचा स्वामी,लग्न नक्षत्र स्वामी, चंद्र ज्या राशीत असेल ती रास,चंद्र नक्षत्र स्वामी,व वाराचा स्वामी. समजा आज दुपारी 3 वाजता आपण प्रश्न पाहतो.व लग्न
मेष आहे.मंगळ, नक्षत्र स्वामी शुक्र,चंद्र वृषभ राशीत आहे म्हणून शुक्र,तो कृत्तिका नक्षत्रात आहे म्हणून रवी व आज सोमवार आहे म्हणून
चंद्र' म्हणून मंगळ, शुक्र,शुक्र,रवी व चंद्र हे
तात्कालीक कार्येश ग्रह झाले. हे ग्रह 2,7,11 भावांचे कार्येश आहेत.ज्या वेळेस एखादा ग्रह
दोनदा येतो त्यावेळेस घटना लवकर घडते.या ठिकाणी शुक्र दोनदा आलेला आहे म्हणजे
विवाह योग लवकर आहे या करिता रवीचे भ्रमण पहावे. कार्येष ग्रहात शुक्र आहे.रवीचे भ्रमण वृषभ राशीतून,म्हणजे शुक्राचे राशीतून,
चंद्राचे नक्षत्रा तुन, रवीचे सब मधून जाईल
तेव्हा विवाह होईल.रवी १३ मे १४जून वृषभ
राशीत असतो या प्रमाणे कालावधी काढता येतो. ज्या वेळेस पंचमेश हा सप्तमात असतो आशा वेळी प्रेम विवाह होतो.सप्तमेश जर केंद्रात असेल तर स्थळ जवळचे अथवा गावातील असते. त्याचा तृतीय स्थानाशी संबंध असेल तर स्थळ नात्यातील असते.

सु.गो.काटेकोर
VISHARAD
Astrological Research Institute,Chennai.