Gava gavachi asha part 2 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | गावा गावाची आशा - भाग २

Featured Books
  • خواہش

    محبت کی چادر جوان کلیاں محبت کی چادر میں لپٹی ہوئی نکلی ہیں۔...

  • Akhir Kun

                  Hello dear readers please follow me on Instagr...

  • وقت

    وقت برف کا گھنا بادل جلد ہی منتشر ہو جائے گا۔ سورج یہاں نہیں...

  • افسوس باب 1

    افسوسپیش لفظ:زندگی کے سفر میں بعض لمحے ایسے آتے ہیں جو ایک پ...

  • کیا آپ جھانک رہے ہیں؟

    مجھے نہیں معلوم کیوں   پتہ نہیں ان دنوں حکومت کیوں پریش...

Categories
Share

गावा गावाची आशा - भाग २

पूजा घाईघाईने कामावर निघाली. तिच्या मुख्यालयाच्या गावी आल्यावर हळूहळू चालत पूजा गावातून फिरत होती. ती गावांमध्ये करोना रोगाबाबत जनजागृती करत होती. तिच्या जोडीला अंगणवाडी मदतनीस होती.अंगण सेविका त्यांच्यासोबत आली नव्हती. अंगणवाडी सेविकेने सकाळीच त्यांच्या ग्रुपवर ' शुभ सकाळ ' संदेश टाकला होता. त्या सोबती तीने निरोप दिला होता. माझं आज एक काम आहे. तुम्ही दोघी गावात फिरा. मी काही येत नाही. पूजाआशाने सुद्धा तयार केलेली कविता (चारोळी) त्यांच्या ग्रुपवर शेअर केली होती. तिला अनेकांनी लाईक्स केले होते.

आरोग्य सेवकांने मोबाईल फोनवर टाकलेली करोना पेशंटची नावे बघून ती करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी आली होती. घरातून निघताना तिने नाका तोंडाला मास्क लावला होता. अंगणवाडी मदतनीसने सुद्धा तीच्या नाका तोंडाला मास लावला होता. दोघींनी हातावर सॅनिटायझर फवारले. त्याआधी दोघींनी हातामध्ये हॅन्ड ग्लोज घातले. केसांना आरोग्य सेविकेने दिलेली युज अँड थ्रो असलेली हेअर कॅप घातली होती. अंगणवाडी मदतनीस आणि पूजा आशाने पेशंट पासुन योग्य अंतर राखून त्याची माहिती घेतली. करोना पेशंटला आणि घरातील लोकांना आरोग्य शिक्षण दिले.

होय आशाताई .तुम्ही सांगितलेली माहिती मी नक्की उपयोगात आणील... करोना पॉझिटिव पेशंट बोलला.

घरातील माणसांनी सुद्धा तिला तसेच सांगितले.

त्यांनी तसे म्हणताच अंगणवाडी मदतनीस अंकिता आणि पूजा आशाला खूप बरे वाटले. त्या दोघींना मनापासून समाधान वाटले. त्या दोघींनी पेशंटचे आभार मानले.
पेशंटने सुद्धा त्या दोघींचे आभार मानले.

चहा पिता का तुम्ही.. पेशंटच्या घरातील लोकांनी त्यांना विचारले.
प्यायलो असतो. परंतु तुमच्या घरात करोना पॉझिटिव पेशंट आहे . त्यामुळे नको. परंतु चहाबद्दल आम्हाला विचारल्याबद्दल धन्यवाद.
ठीक आहे येतो आम्ही. असे म्हणून त्या दोघी तेथून निघाल्या. तिथून निघताना अचानक पूजा आशाचा तोल गेला. लगेचच अंगणवाडी मदतनीस अंकिताने तिला आधार दिला. तेव्हा हसून पूजाने अंकिताचे आभार मानले.
राहू दे ग .आभार कसले मानतेस .आपण दोघी मैत्रिणी आहोत. अंकिता म्हणाली.
बरं तू म्हणतेस तर राहू दे... यावर दोघी हसल्या.
बरं एका पेशंटची माहिती तर मिळाली. पण दुसऱ्या पेंशटकडे जाऊया .कोण आहे दुसरा पेशंट. पूजाने अंकिताला विचारले. कारण अंकिता तिच्या मोबाईल मध्ये दुस-य पेशंटचे नाव बघत होती.
अग ती एक महिला आहे. आपल्याच गावातली आहे. 32 वय आहे. तिच्या घरात फक्त चार माणसे आहेत. तिकडून येताना मी तिची माहिती घेऊन आलेले आहे. अंकिता बोलली...

हे तू अगदी उत्तम केलस. पूजा म्हणाली. आपला थोडा त्रास वाचला. मग चल आपण अंगणवाडीत जाऊया.
तिथे थोडावेळ बसुन मग ती माहिती आरोग्य सेविका मीनल ताई आणि आरोग्य सेवक शेखर भाऊंना पाठवून देऊ.
ठीक आहे. तसं करू. पण मी काय म्हणते आता आपलं
काम झालंच आहे तर मग अंगणवाडीत कशाला जाऊ या ना...पूजा आशा बोलली.
नाही थोडं काम आहे तिकडे अंगणवाडीत. मदतनीस बोलली..
मग चल जाऊया.
पूजा मला तुझी बॅग दे. मी घेते अंकिता बोलली.
कशाला तू माझी बॅग घेतेस .ती काय जड आहे. मी घेईन.

तसं नाही ग मघाशी तू धडपडलीस ना... म्हटलं तुला चालायला त्रास होत असेल, तर मला दे तुझी बॅग. अंकिता बोलली.

काही नाही त्रास होत. चल... पूजा तिला म्हणाली.
दोघी चालत अंगणवाडीत आल्या. अंकिताने अंगणवाडीचा दरवाजा उघडला. टेबला जवळ खुर्चीत बसलीत. पूजाने मोबाईल फोनवरून ती माहिती तिच्या बीएफ ला पाठवली. सोबत आरोग्य सेविका व आरोग्य सेवकाला सुद्धा पाठवली... त्या दोघांनी फोनवरून त्यांना धन्यवाद पाठवले.

इतक्यात आरोग्य सेवकाचा पूजा आशाला व्हाट्सअपवर निरोप आला.
मी तिकडेच येतो आहे... लगेच आलो...

पूजाने फोन बंद केला.
कोणाचा मेसेज आला होता. अंकिताने विचारले.
आरोग्य सेवक डॉक्टरांचा आला होता.....
काय म्हणाले ते...
आरोग्य सेवक डॉक्टर येतायेत इकडेच लगेच.
ते आता आणखीन कशाला इकडे येत आहेत. आपण केलं ना काम झालं ना त्याचं काम...

तसं नाही ग... आरोग्य सेवकांना त्या घराला भेट देणे आवश्यक असतं आणि ते येऊन दे जरा. माझे सुद्धा त्यांच्याकडे काम आहे .पूजाआशा अंकिताला बोलली.

काय काम आहे त्यांच्याकडे .अंकिताने विचारले.
अगं काही नाही .काल मी रक्त नमुने घेतले होते. गावात ताप आलेल्या एका व्यक्तीचे. कोणताही ताप हिवताप आहे समजून. आश वर्करला सुद्धा घ्यावे लागतात. महिन्याला चारपाच रक्तनमुने. हिवतापाचे. ते द्यायचे बाकी आहेत.

बरं मग ठीक आहे देऊन टाक.. मला सुद्धा आरोग्य सेवकांकडून गोळ्या घ्यायच्या आहेत तापाच्या आणि संडास प्रतिबंधक गोळ्या, ओ आर एस.... अंकिताने पूजाला म्हटले.

बघ माझ्या मुळे तुझेही काम होतंय. आरोग्यसेवक डॉक्टर कडून. ते आपल्याकडे येत आहेत. आपल्या दोघीचींही कामे होत आहेत. पूजाने तिला म्हटले
.
हो ना... हो ग... अंकिता म्हणाली.

त्यांचे बोलणे पूर्ण होते न होते तोच आरोग्य सेवक शेखर भाऊ आले. त्यांना बघून दोघींनी त्यांचे स्वागत केले.

पूजा कडे वळून शेखर भाऊ म्हणाले .पूजा तू कशाला एवढी कामे करतेस तुझी तब्येत....

शेखर भाऊ माझी तब्येत उत्तम आहे. मला कामे करायला आवडतात. त्यामुळे कितीही संकटे आली तरी मी कामे करणारच. पूजा आशाने शेखर आरोग्य सेवकाकडे बघत म्हटले.

बरं तुमचे रक्त नमुने द्या मला .पूजाकडे त्याने रक्त नमुने मागितले.
पूजाने आरोग्य सेवक शेखर भाऊंना फॉर्ममध्ये गुंडाळलेले रक्तनमुने दिले. ते बॅगमध्ये व्यवस्थित ठेवले. त्याने बॅगेतुन तापाच्या गोळ्या पॅरासिटामोल आणि संडास प्रतिबंधक गोळ्या फ्युराझोलीडीन काढल्या. सोबत ओ. आर. एस . ची दहादहा पाकीटे काढून त्या दोघींना दिली. ते बघून दोघींना आनंद झाला...

तुम्ही जा दोघी.. मी जातो. त्या दोन्ही पेंशटना भेट देतो. त्यांचा फॉलोअप घेतो . मग जातो घरी...
आम्ही येऊ कां दोघीही तिकडे .अंकिता म्हणाली.
नको तुम्ही दोघी जा. पूजाला त्रास होईल. पुजाच्या पायाकडे बघत शेखर आरोग्यसेवक म्हणाला .
बरं बरं . ठीक आहे. आम्ही जातो. अंकिता बोलली.

शेखर भाऊ मी फिरू शकते कितीही .तुम्ही माझ्या पायाकडे जाऊ नका. मला काही त्रास होत नाही.

तसं नाही पूजाआशा ताई. तू अशी असून सुद्धा किती फिरतेस, किती काम करतेस, हे बघून आम्हाला तुझे खूप अप्रूप वाटते. शेखर भाऊ तिला बोलला.

हो ना... किती काम करते .अंकिताने शेखर आरोग्य सेवकांच्या सुरात सूर मिसळला.

तुम्ही दोघांनी मला कमी समजू नका .तुमच्यापेक्षा मी जास्त काम करून दाखवू शकते .यावर तिघेही मनमुराद हसले. हसत हसत शेखर आरोग्य सेवक करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी फोलोअप घ्यायला निघून गेले. त्या दोघी सुद्धा आपापल्या घरी गेल्या.

आरोग्य सेवक शेखर पॉझिटिव रुग्णाच्या घरी गेला. त्याने करोना पॉझिटिव रुग्णाची विचारपूस केली. त्यांना काही त्रास होतो कां विचारले. काही मदत हवी कां हे सुद्धा सांगितले. घरीच कॉरंन्टाईन रहा. बाहेर फिरू नको. शेखर भाऊ आरोग्य सेवक त्याला म्हणाले
ठीक आहे सर तुम्ही सांगाल तसे करतो. पेशंट म्हणाला

काही त्रास वगैरे होत नाही ना तुम्हाला. आरोग्यसेवक बोलले.

तसा मी बरा आहे.पूजा आशाताई आणि अंगणवाडी मदतनीस मघाशी येऊन गेलेत. त्यांना सांगितले. मी माझी माहिती.

हो माहित आहे मला .वाटेत मला दोघी भेटल्या. तुमची माहितीसुद्धा त्यांनी मला दिली.तरी शेखर आरोग्य सेवक बोलले.

आरोग्य सेवकांना बघून पेशंटला बरे वाटले. आपली चौकशी येऊन कोणीतरी करत आहे. यात त्याला खूपच समाधान वाटले.

ऐका ना...लवकरच करोनाची लस येणार आहे. लस बद्दल माहिती आरोग्य सेवकाने त्यांना दिली .ते ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. तुमच्या घरातील लोकांनी वयोगटात प्रमाणे करोना प्रतिबंधक लस घ्यावी.

होय आम्ही अवश्य घेऊ .रुग्णाच्या घरचे लोक म्हणाले.

आरोग्य सेवक शेखर भाऊंने त्यांना माहिती दिली. होय आम्ही करूना प्रतिबंधक लस अवश्य घेणार.. रुग्ण म्हणाला. त्यानंतर शेखर आरोग्य सेवक स्वतःच्या घरी निघाले.

पूजाआशा घरी आली नसेल तोच तिला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य सहाय्यक सी जी साहेबांचा फोन आला.

हॅलो पूजा मी सीजी बोलतोय.
बोला सीजी साहेब .... मी पूजा बोलतेय.
ते समजलं मला . मी तुझ्या मोबाईल नंबरवर फोन केला आहे. मग तू बोलणार ना.....
मी पण तेच तुम्हाला सांगतेय... तुमच्या मोबाईल नंबर मला फोन आला. यामुळे मला कळलं की तुम्ही साहेब बोलताय .... यावर आपआपल्या फोनवरून दोघेही हसले...
बर आता गंमत राहू दे .मी काय म्हणतो की उद्याचे लसीकरण आहे ना . त्या लसीकरणाला तू जाणार आहेस ना.
सीजी साहेब मी आणि अंगणवाडी मदतनीस अंकिता जाणार आहे.
आरोग्यसेविका जाधव येणार आहे तिकडे आणि आरोग्य सेवक सुद्धा तिकडे येणार आहे .त्यांची मदत तुम्हाला होईलच.
बरोबर साहेब. बाकी काय दुसरं.

बाकी काही नाही ठेवतो फोन चल.

ठीक आहे सीजीसाहेब एवढे बोलून पूजाने तिचा फोनकॉल स्विच ऑफ केला... तेवढ्यात तिच्या आईने तिला हाक मारली.
पूजा अग जरा इकडे ये.पूजा आईने हाक मारली त्या दिशेला गेली. तिच्या आईने तिला जेवायला वाढले होते. पूजा जेवायला बसली.
बाबा जेवले? तिने विचारले.

हो ते मघाशीच जेवले. तिची आई म्हणाली.
तू पण जेवून घे ना. पूजा बोलली.
मला बाई भूकच लागत नाही. आई बोलली
कां नाही लागत तुला भूक...
एकदा तुझं लग्न झालं ना की मग मी रोज चांगली जेवले असते.
आई तु जेव गुमान . नाहीतर मी पण नाही जेवणार .माझं लग्न होईल याची काळजी नको तुला. जे होईल तेव्हा होईल..
तीच्या आईने निमूटपणे जेवणाचे ताट घेतले आणि ती स्वतःला जेवायला वाढू लागली. पूजा सोबत ती सुद्धा जेवू लागली...