Tujhya vina ure na arth jivna - 4 in Marathi Love Stories by Sadiya Mulla books and stories PDF | तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 4

Featured Books
  • અસવાર - ભાગ 3

    ભાગ ૩: પીંજરામાં પૂરો સિંહસમય: મે, ૨૦૦૦ (અકસ્માતના એક વર્ષ પ...

  • NICE TO MEET YOU - 6

    NICE TO MEET YOU                                 પ્રકરણ - 6 ...

  • ગદરો

    અંતરની ઓથથી...​ગામડું એટલે માત્ર ધૂળિયા રસ્તા, લીલાં ખેતર કે...

  • અલખની ડાયરીનું રહસ્ય - ભાગ 16

    અલખની ડાયરીનું રહસ્ય-રાકેશ ઠક્કરપ્રકરણ ૧૬          માયાવતીના...

  • લાગણીનો સેતુ - 5

    રાત્રે ઘરે આવીને, તે ફરી તેના મૌન ફ્લેટમાં એકલો હતો. જૂની યા...

Categories
Share

तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 4

भाग - 4
मागच्या भागात आपण अमेय ची कहाणी त्याच्या तोंडून ऐकली. त्याची कहाणी ऐकून अनु त्याला मदत करायला तयार होते. आणि ती या स्थळा ला नकार देते. पण त्यानंतर ती एक फोन नंबर डायल करते जो व्यस्त आहे असे आपल्याला कळते. हा नंबर कोणाचा होता. ही कोण व्यक्ती आहे जिने कॉल नाही उचलला म्हणून अनु च्या डोळ्यात आसवे येतात.

आता पुढे -

आनंद - अनु बेटू... झोपली का ग तू?
अस म्हणत बाबा अनु च्या रूम मधे येतात. आणि ते येताच अनु डोळे पुसते.
" हे काय बाळा, तू रडत होतीस.. काय झालं... तुला हे स्थळ मान्य नाही तर खरच आम्ही जबरदस्ती नाही करणार बाळा.. तू फक्त रडू नकोस.. तुला जस हवं तसचं होईल."

अनु - मग बाबा... अंजु ला घरी आण ना..मला तिची खूप आठवण येत आहे. सहा महिने होत आले ती माझे कॉल उचलत नाही.. मेसेज च रिप्लाय नाही. मला आता काही ही करून तिला भेटायला हवं .. प्लिज तिला इथे आण.. नाहीतर मी आजीकडे जाते..

बाबा - अग मला पण वाटत तिला भेटाव.. माझी च मुलगी आहे ती पण.. पण चूक तिची होती की नाही बाळा. तिला स्वतः ला ही गोष्ट समजेल .. आणि ती येईल पुन्हा.. पण तोपर्यंत आपल्याला संयम ठेवला हवा. तू सुद्धा तिला कॉल नको करु. तिला तिची चूक कळाली की ती स्वतः करेल. आत्ता तिला तिच्या हाल वर सोडून दे.

अनु - 😔😔 ठीक आहे.
बाबा मी या स्थळाला नकार दिला तर आई आणि तू नाराज नाही होणार ना माझ्यावर ?

बाबा - नाही ग परी... Do whatever what you want to do.. I am always with you.

अनु - thank you बाबा.

बाबा - बेटा उद्या तुझा पहिला दिवस आहे कॉलेज चा. तयारी झाली का?

अनु - काय बाबा तू पण. आत्ताच आई सुद्धा तेच विचारून गेली. माझा पहिला दिवस तर नाही आहे मी लास्ट year la आहे. फक्त 1 वर्ष ऑनलाइन नंतर आज खूप दिवसांनी जात आहे. आणि तयारी काय करायची आहे. Books तर आहेतच. कपडे आईने प्रेस करून आणले. बस..

बाबा - अच्छा. पण मी खूप खूष आहे की तू उद्या पासून कॉलेज जॉईन केलं ऑफलाईन. आता तुला ही थोड फ्रेश वाटेल बाहेर गेल्यावर.. आणि मला आणि निर्मला ला काही काळजी करायची गरज नाही कारण तुझी सावली शालू आहेच तुझ्या सोबत..😁

अनु - हो अगदी बरोबर. अरे हो मला तिला मेसेज करून सांगायला हवं उद्या किती वाजता जायचं आहे ते.

बाबा - ओके चल आता मी ही जातो झोपतो. तू सुद्धा लवकर झोप उद्या लवकर जायचं आहे.
असे बोलून बाबा निघून जातात आणि इथे अनु शालू ल मेसेज करून उद्या च टाईम फिक्स करते.

पुढच्या दिवशी,

निर्मला - ही मुलगी ना रोज उठायला एवढं वेळ लावते ना पाहा ८ वाजत आले. शालू येतच असेल.

आनंद - अहो ठीक आहे पहिला दिवस आहे होतो उशीर.

अनु - हो बाबा पाहा ना अजून आई ने माझ्या साठी टिफीन पण नाही बनवला. पण ठीक आहे पहिलाच दिवस आहे होतो उशीर 😂😂
बाबा ही अनु च्या जोक वर हसून आई ची मस्करी करतात.
निर्मला - 😯अय्या आज दिवस कुठे उगवला.. पश्चिमेला वाटत!
चला बर झाल लवकर आवरलं. 9 वाजता निघायचं आहे ना चल पटकन नाश्ता करून घे.

शालू - नाही काकू आज लवकर जायचं आहे. आत्ता निघालो की कुठे पहिल्या लेक्चर ला पोहचू.

अनु - शालू आलीस तू चल लवकर निघू.. आई बाबा जाते मी.. आम्ही बाहेर खाऊ काहीतरी..

निर्मला - अग पण थोड खाऊन जा.

आनंद - जाऊ दे खातील बाहेर मुली.. बाळा तुला Paytm केले आहे. पण आठवणी ने खा . ओके
बाबांना ओके म्हणून
अनु आणि शालू घाईत च जातात.


कॉलेज मध्ये,

अनु - आज खूप दिवसांनी ऑफलाईन लेक्चर अटेंड करून खूप छान वाटल.
शालू - मला नेहमी प्रमणे झोप येत होती. किती बोअर करतात हिस्टरी च्या मॅडम 😏
अनु - तू पण ना😂
शालू - भूक लागली यार.. काय खायचं तुला..
अनु - नेहमीप्रमाणे समोसा and चहा
शालू - ओके बॉस..लगेच आणते बस इथेच.
अनु - लवकर पुढचं लेक्चर १५ मिनिट मधे आहे...
आणि शालू कॅन्टीन च्या काउंटर वर जाऊन दोन समोसा ची ऑर्डर देऊन पुन्हा येते.

शालू - मस्त गरमागरम भेटेल २ मिनिटात... असं तो म्हणाला.
अनु - मॅडम ने आज जी assignment दिली आहे त्याबद्दल काय विचार केलास. तुला हिस्टरी मधला कोणता incident सर्वात जास्त आवडतो. म्हंजे वाचायला इंटरेस्टिंग वाटतो?

शालू - मला तर सगळ च बोरिंग वाटत यार. हो पण मध्ययुगीन इतिहास ज्यामधे महाराज आहेत तो आवडतो.

अनु - राईट मग तुझी assignment इथेचं पुर्ण झाली.. बस त्याबद्दल लिहायचं आहे तुला.

दोघांची चर्चा चालूच होती इतक्यात,

"ही आमची जागा आहे "
एक मध्यम हाईट असलेला हातामधे सिगारेट घेऊन धूर उडवणारा मुलगा या दोघांच्या टेबला कडे येऊन बोलतो.

अनु आणि शालू त्याकडे पाहतात आणि न पाहिल्यासरखं करुन पुन्हा आपल्या बोलण्यात बिझी होतात.

तो मुलगा - ( सोबत असणाऱ्या दोन मुलांकडे पाहून बोलतो) अच्छा यांना माहित नाही मयंक बद्दल.

न राहवून अनु ला खूप राग येतो ती म्हणते
अनु - तू मयंक आहेस की कोणी. तुझं नाव लिहिलं आहे या टेबल वर.
मयंक च नाव ऐकून शालू अनु ला शांत बसायला सांगते.
अनु जाऊदे आपण दुसरी कडे बसुया. कशाला उगीचच तमाशा...

अनु - नाही मी या टेबल वरून नाही उठणार. ते पण या मयंक च्या बोलण्या ला घाबरून.

शालू - अग पण हा मयंक नाही त्याचा मित्र आहे.

अनु - (हळूच शालू शी बोलते )तुला काय माहिती... आणि तू अस तर खूप बोलत असतेस आज का शांत आहेस.

मयंक - हो हा माझा मित्र आहे.. आणि ही जागा म्हणजेच ज्या टेबल वर तुम्ही बसला आहात ती आमची आहे.
अनु -( रागात) अच्छा कुठे लिहिलं आहे तुझं नाव? मला तर दिसत नाही!!!
मयंक -( मिश्किल पाने हसत तो काउंटर कडे बोट दाखवतो.) तिथे लिहिलं आहे नाव...

त्या वर बिराजदार हे नाव होत.
अनु - बिराजदार... हे ...
शालू - हे कॅन्टीन त्यांच्या वडिलांचं आहे. हेच नाही तर त्याचे बाबा आपल्या कॉलेज चे ट्रस्टी आहेत.
मयंक - ठीक आहे सॉरी बोलायची गरज नाही.. मी सुंदर मुलींना तसं ही माफ करतो.😀😉
मयंक व त्याचे मित्र हसायला लागतात.
अनु थोडी नाराज होते पहिल्याच दिवशी तिचा सर्वांसमोर झालेल्या पान उताऱ्या मुळे ती थोडी खजील होते.
अनु - चल शालू , पुढचं लेक्चर चालू होईल इतक्यात.

आणि काहीही न खाता त्या दोघेही जायला निघतात. ते पाहून ती मुले आणि मयंक आणखी जोरात हसायला लागतात.

अनु तिची वॉकिंग स्टिक म्हणजेच crutches घेऊन उठते. आणि चालू लागते. अचानक येणाऱ्या त्या स्टिक च आवाज ऐकून मयंक मागे वळून पाहतो तर अनु ला स्टिक च्या मदतीने चालताना पाहून त्याला वाईट वाटते. आणि तो बाकी मित्रांना शांत बसायला सांगतो.

क्लास मधे आल्यावर
शालू - it's ok अनु आता त्या गोष्टी वर इतका विचार नको करुस.
अनु - नाही मी त्या गोष्टी बद्दल विचार नाही करत आहे. I m thinking about अमेय
शालू - अमेय बद्दल म्हंजे
अनु.- तुला माहित आहे मी त्याला नकार का दिला..
( आणि अनु सगळी हकीकत तिला सांगते)
शालू - ohh अस आहे तर...
अनु - hmm.. बघ ना किती वेगळा आहे तो बाकी मुलांपेक्षा.. नाहीतर हा मयंक त्याने माझी किती खिल्ली उडवली.
शालू - मला वाटलच तू अजूनही त्याबद्दल विचार करत असशील.

एवढ्यात मयंक क्लास मधे येतो. मयंक ल क्लास मधे पाहून सगळेच अवाक होतात.. खास करून त्यांचे teacher.. कारण कॉलेज स्टार्ट होऊन 3 महिने झाले होते पण मयंक ने एक ही लेक्चर अटेंड केलं नव्हत.. आज अचानक त्याला पाहून teacher देखील आश्र्चर्य चकीत होतात.

मयंक बॅग घेऊन अनु आणि शालू च्या मागच्या बेंच वर जाऊन बसतो. खरे पाहता त्याला अनु ची माफी मागायची होती. कारण अनु ल असे पाहता त्याला स्वतः चीच लाज वाटली.

दुसरा लेक्चर संपल्या नंतर,

मयंक - ( अनु कड पाहत) हॅलो मिस अनन्या. Actually मला तुम्हाला सांगायचं होत की....

अनु - excuse me. मिस्टर मयंक बिराजदार. भले तुमचे बाबा या कॉलेज चे ट्रस्ट मेंबर असतील. पण मी या कॉलेज मध्ये पैसे देऊन एडमिशन घेतल आहे सो प्लिज आम्हाला या बेंच वरून तुम्ही उठवू नाही शकत.

मयंक - नाही तू चुकीचे समजत आहेस. मला actually सॉरी म्हणायचं होतं मला वाटल तुम्ही फ्रेशर्स आहात म्हणून थोडी शी मस्करी केली.. पण त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी.

अनु त्याचे बदलेला रूप पाहून जास्तच सरप्राइज होते. आणि ती इट्स ओके म्हणून जायला निघते.

बट तिला थांबवत तो त्यांच्या बेंच समोर येतो.
मयंक - मग फ्रेण्ड्स?? आणि हात पुढे करतो.
पण त्याला एक ही शब्द न बोलता ती पुढे निघून जाते सोबत शालू ही मागोमाग येते.

पण तरीही इथे मयंक थांबणार नव्हता. त्याला अनु कडून friendship हवी च होती. लेट्स सी आता तो अनु ला फ्रेंड बनवू शकतो की नाही आणि अनु त्याची friendship स्वीकारेल की नाही.

क्रमशः