Arya - 3 in Marathi Women Focused by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | आर्या... ( भाग ३ )

Featured Books
  • জঙ্গলের প্রহরী - 5

    জঙ্গলের প্রহরীপর্ব - ৫- "এটা একটা গল্প মিঃ রায়। মিথ বলতে পা...

  • Forced Marriage - 1

    শ্বেতার মনে হয়, পৃথিবীর সব থেকে বিষাক্ত বিষের থেকেও তার বসের...

  • অন্তর্হিত ছায়া

    কলমে :- সূর্য্যোদয় রায়   পর্ব১:  নিরুদ্দেশের নোটবুক কলকাতা...

  • ঝরাপাতা - 2

    ঝরাপাতাপর্ব - ২পিউর বুদ্ধিতে গোপার সঙ্গে কথা বলতে যাওয়ার আগ...

  • THE TALE OF LOVE - 13

    Catagory-(Romantic+Thriller️+Psycho+Toxic+Crime‍️+Foreign pl...

Categories
Share

आर्या... ( भाग ३ )

          एक सुंदर परी घरी आली होती. तिचे ते बोलके निळे डोळे, छोटस नाक, लाल ओठ हे पाहून सगळे च एकदम खुश आणि आनंदी होते . श्वेता आणि अनुराग यांचा ही आई बाबा म्हणून एक नवीन जन्म झाला होता . ते खूप जास्त आनंदी होते . त्यांच्या मनातील सगळं ओझं आणि भिती कमी झाली होती . दोघांचे ही आई वडील खूप आनंदी होते . घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत त्यांनी एकदम जोशामध्ये येऊन केले . श्वेता ला हॉस्पिटल मधून एक आठवड्यानंतर सोडलं . ती आपल्या परी ला घेऊन येणार या आनंदाने दोन्ही आजी आजोबांनी घराला खूप छान सजवल होत . श्वेता च पाय घरामध्ये पडताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर येताना दिसत होते ! तिने आपल्या परीला अनुराग कडे दिले आणि आईला मिठी मारून ती रडत होती ! खरं तर तिच्या आईला आणि सगळ्यांना च त्याची कल्पना होती ती नक्की का रडत होती ! नकळत सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी भरलेलं दिसत होत . आई ने तिला शांत केलं आणि म्हणाली , '  वेडा बाई ! आता तुम्ही आई आहात ! आणि आई म्हणजे एक कठोर व्यक्तिमत्व  अस रडायचं नसतं ! आणि हो ! आता नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे , यासाठी तुला धीर , स्थैर्य , चिकाटी या बऱ्याच गोष्टींची गरज आहे !' हे सगळ ऐकून श्वेता हसू लागली. त्यानंतर तिने अनुराग च्या आई ला ही मिठी मारून नकळत आभार व्यक्त केले .त्यांनी ही तिला तितकंच काळजी आणि प्रेमाने समजून घेतलं होत !

सगळेच परी मध्ये मग्न झाले होते . काही दिवसांनी श्वेता चे आई बाबा घरी गेले . अनुराग च्या आई बाबांनी श्वेताच्या मदतीला आणि  परी सोबत खेळण्यासाठी,  तिचे लाड करण्यासाठी थांबायची इच्छा व्यक्त केली , आणि ते ऐकून तर अनुराग चिडला आणि त्यांना म्हणाला , ' हे घर तुमचंच आहे ! इथे थांबण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कारणाची किंवा इच्छेची गरज नाही ! '

खरं तर त्यांना हे इथे करमत नव्हतं ! गाव सोडून इकडे राहायची इच्छा नाही व्हायची कधी ! पण आता परी ला बघून त्यांचा पाय निघेना ! काही दिवसांनी त्यांनी परीचा नाव ठेवण्याचा कार्यक्रम करायचं ठरवलं ! प्रत्येक जण नाव शोधण्यात मग्न झाले !

घरातील प्रत्येक जण नाव शोधण्यात मग्न तर होतेच पण उत्साहित जास्त होते ! अनुराग आणि श्वेताला त्यांच्या परीच नाव अर्थ बघून ठेवायचं होत . प्रत्येक नावाला एक अर्थ असतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर नावाच्या अर्थाला काही अर्थ असेल तरच आपण ते परी साठी ठेवण्याचा विचार करू. दोघे मिळून बऱ्याच नावांची लिस्ट काढतात . पण त्यातील अर्थानुसार घरातील सगळ्यांना आणि अनुराग , श्वेता ला त्यांच्या परीसाठी आवडलेला नाव त्यांनी गुपित ठेवलं होत . त्यांनी नामकरण करण्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता . काही जवळचे नातेवाईक आणि आजूबाजूची लहान मुले यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होत .

परीला कोणत्या ही प्रकारचा कार्यक्रम च त्रास व्हायला नको याची काळजी घेऊन त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता .  कार्यक्रमाला सुरुवात झाली . खूप छान सजावट केली होती . लहान मुले तर जास्त आनंदी होते सजावट बघून ! ते रंगी बेरंगी फुगे आणि कार्टून ची चित्रे यांनी ते जास्त खुश होते ! आणि मोठ्यांना तर नावाची उत्सुकता होती ! थोड्याच वेळात अनुराग आणि श्वेता ते स्टिकर लावून ठेवलेलं नाव सगळ्यांसमोर जाहीर करणार होते !

सर्वात आधी लाइट्स बंद केल्या आणि फक्त स्टिकर दिसत होता !  स्टिकर वर एक लाईट पडला आणि नाव सगळ्यांसमोर चमकत राहिले ! ते नाव होते आर्या !!!

सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आर्याच्या नावाचे कौतुक केले . तितक्यात अनुराग ने नावाचा अर्थ सांगण्यासाठी लाइट्स ऑन केल्या  . पुढे बोलू लागला , " मी आणि श्वेता ने बऱ्याच ना हे नाव का निवडले कारण या नावाच्या अर्थाप्रमाने आम्हाला आमच्या मुलीला  स्वातंत्र्यप्रेमी आणि ध्येयाभिमुख, तळमळ, धाडसी आणि मुक्त विचार करणारी बनवायची आहे ! आणि हे नाव म्हणजे धाडसी स्त्री व्यक्तिमत्व !!! 

हे ऐकल्यानंतर पुन्हा आर्या नावाच्या या एक नवीन धाडसी व्यक्तिमत्त्वाचा या नवीन जगात सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले !!!


continue ....