Barsuni Aale Rang Pritiche - 31 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 31

The Author
Featured Books
  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

  • उड़ान (1)

    तीस साल की दिव्या, श्वेत साड़ी में लिपटी एक ऐसी लड़की, जिसके क...

Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 31

दहा बारा दिवस असेच निघून गेले... प्रणिती आणि वेद पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते... कृतीतून जाणवत होत पण ओठावर कोणीच आणलं नव्हतं ... 
ऋग्वेद तिला propose करायची तयारी करत होता पण कामाच्या व्यापात तो इतका गुरफटला होता कि स्वतःवरच लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नव्हता... प्रणिती त्याला पूर्ण समजून घेत होती.... 


पण तिला सुद्धा वाटायचंच कि बाकीच्यांसारखं त्याने पण तिला वेळ द्यावा पण सांध्याची परिस्थिती बघता ते शक्य च होत नव्हतं... मॉम सगळं बघत होत्या... प्रणिती रात्री अकरा अवेपर्यंत उपाशी त्याच्यासाठी जागी राहायची अर्थात तो सुद्धा काही मुद्दाम करत नव्हता किव्हा कुठे फिरायला जात नव्हता .... प्रोजेक्ट च एवढं मोठे होते कि त्याच्यासमोर दुसरा पर्याय च नव्हता... 



आज सुद्धा तो रात्री सडे दहा च्या दरम्यान आला ... प्रणिती बेडरूम मध्ये काहीतरी करत होती ते बघून मॉम ने त्याला रूम मध्ये बोलावून घेतलं.... 

"मॉम..?..... काही झाली का...?.."ऋग्वेद 


"वेद ... तुला माहितीय ना तुझा लग्न झाली..."मॉम 

"ह ...हो मॉम .." त्याला समजेना मॉम मधेच असा परष का विचारतेय.... डोक्यावर आठ्या पडल्या.... 


"प्रणिती ची जबाबदारी आहे तुझ्यावर आणि तू असा रात्री अपरात्री कधीही येतोय .... बाळा मला समजतंय काम आहे तुझ्याकडे पण बायको सुद्धा महत्वाची आहे ना आयुष्यात ...?..."मॉम 

"हो मॉम.."ऋग्वेद 

"मग...?.. बाळा फमिली सगळ्यात आधी येते आणि नंतर काम.. प्रणिती ला तिच्या हक्काचा वेळ मिळालाच पाहिजे..." मॉम 


"समजतंय मला मॉम dont worry ... ह्यापुढे असं काही नाही होणार.."ऋग्वेद 

"बाळा मी चिंधात नाहीय तुझ्यावर तुझी पण मनस्थिती समजतेय मला .... पण अशामुळे नात्यात दरी पडायला वेळ नाही लागत .... लक्ष्यत घे..."मॉम 


"मॉम तू नको काळजी करू ... ह्यापुढे मी नीती ल तिचा वेळ नक्कीच देईल.... infact आता हातात घेतलेला प्रोजेक्ट उद्या संपणार च आहे..."ऋग्वेद 


"हो का..?.. मगग तुम्ही फिरायला का जात नाही ,..?... तस हि लग्न झाल्यावर तुम्ही कुठेही गेला नाहीयेत..."मॉम 

"मॉम तुला काही त्रास झाला तर..."ऋग्वेद 


"मी लहान आहे का वेद ...?... आणि घरात किती जण आहेत.. तशी म्ही पण काही दिवसासाठी गावी जाणार आहोत..."मॉम 

"गावी...?... तिथे अचानक ?."ऋग्वेद 

"असच ... आम्हाला आता शहरातली हवा सूट होत नाही... सृष्टी ला आणि सुद्धा काही फिरवस सुट्ट्या आहेत तर म्हटलं जरा फिरून यावं ... त्यामुळे तुम्ही तुम्ही निश्चित होऊन जावा..."मॉम 

"okay मॉम... आता झोप तू good night ..."ऋग्वेद ने त्याना मिठी मारली आणि तुंमध्ये आला रूममध्ये प्रणिती दिसली नाही .... तस blazer काढून टाकत त्याने बॅग पण बेड वर भिरकावली ... आणि गॅल्लरी मध्ये आला.... 

त्याच्या आवाजाने पुस्तक वाच बसलेली प्रणिती भानावर आली .. 


"अहो ... आलात तुम्ही ... फ्रेश व्हा.. मी डिनर गरम करते..."ती उठायला गेली कि रूफवेद ने तीला पुन्हा खाली बसवलं... नि तिच्या मांडीवर डोकं ठेवत सोफ्यावर आडवा पडला.... 


एक क्षण तिला काही समजलंच नाही.... पण त्याने हात हातात घेतला तस ती भानावर आली.... 

"नीती... i am सॉरी .."ऋग्वेद ने तिच्या हातावर ओठ टेकवले आणि तसाच तो स्वतःच्या छातीकडे घट्ट पकडला 


"काय झालंय.. का..?... सॉरी कशाला ..?..."प्रणिती 


"गेले काही दिवस कामात एवढा गुंतलो किट उल वेळच दह्याला मिळाला नई मला..."ऋग्वेद 



"असू देत.. मला माहितीय तुम्ही काही मुद्दाम केलं नाही ऑफिस मध्ये कामच तेवढं आहे..."प्रणिती 


"तू दरवेळी मला समजून घेतेस नीती... but dont worry ... उद्या माझा एक प्रोजेक्त संपणार आहे... मग आपण फिरायला जाणार आहोत.."ऋग्वेद 


"फिरायला ..?कुठे..?.."प्रणिती चे डोळे चमकले .... 

"अम्म ... ते तर surprise आहे.... तुला गेल्यावरच समजेल.."ऋग्वेद मुद्दाम आठ्वणायची acting करत बोलला... 

"असं कास..? ... मला आताच सांगा .. नाहीतर मी येणारच नाही..."प्रणिती ने गाळ फुगवले.... 

"नीती माझ्यासोबत राहून राहून ना तू सुद्धा हत्ती होत चालली ... पण मी तुझ्झ्यापुढचा आहे... आणि हनिमून ला तू नाही येणार तर दुसऱ्या मुलीला शोधू नेऊ का...? ऋग्वेद 

"ह .. हनिमून..?डोळे किलकिले करत ती त्याच्याकडे बघतच राहिली ... शब्दानेच पोटात गुदगुदल्या व्हायला लागल्या....  

"my dear wifey .... कुठे हरवली...?..." त्याने तिच्या पोटावर येणारा पदर बाजूला केला .... आणि बोटानी नक्षी बनवू लागला .... तस तिने पॉट आकसून घेतलं... 

"जे...जेवण ..."प्रणिती

"अहं .."त्याने थोडी मान वर केली आणि तिच्या बेबी वर ओठ टेकवले ... तिच्या अंगातून शिरशिरी गेली ... हात त्याच्या केसात गेले.... त्याला थांबवावं वाटत होत पण शरीर तसा साथ देत नव्हतं.... त्याचे ओठ पूर्ण पोटावरून फिरायला लागले ... ती फक्त डोळे बंद करून त्याला अनुभवत होती.... अचानक त्याचे पोटावर जाणवणारे गरम श्वास बंद झाले... असं तिने डोळे उघडले .. तर तो उभा राहून हसत तिच्याकडे बघत होता.... 


प्रणिती ने लाजून चेहरा फिरवला... 

"भूक लागलेली ना नीती..?.."ऋग्वेद 


"ह...हो...हो....मी वाढते जेवण.."ती पटकन उठली आणि पाळली... जेवून झाल्यावर तिने बेडरूम आवरली .... आणि झोपायला जात होतीच कि ऋग्वेद ने मागून मिठी मारली... 

"आज बायको वर जरा जास्तच लाड येतायत नाही का...?.." प्रणिती ने त्याच्या हातावर हात टेकवला ... 
"हा मग..?.. माझी बायको आहेच लाडाची..." त्याने तिच्या खांद्यावर ओठ टेकवले... 

"अहो... मला झोप आलीय ..."प्रणिती 


"हो माहितीय ... हे घे..."त्याने तिच्या हातात प्लॅटिनम कार्ट दिल... 

"हे कशाला..?.."तिच्या डोक्यावर आठ्या पडल्या... 


"तुला खरेदी करायची असणार ना..?..त्यासाठी..... "ऋग्वेद 


"माझ्याकडे आहेत पैसे ...हे..हे नको.."प्रणिती 



"नीती..." ऋग्वेद ने तिला स्वतःकडे वळवलं .... 

"मी कोणासाठी पैसे कमावतो एवढे ..?... मला माहितीय तुझ्याकडे पैसे आहेत पण तू माझी सुद्धा responsibility आहेस ... आणि हे कोना दुसऱ्याचे पैसे नाहीयत तुझ्या नवऱ्याचेच आहेत...."ऋग्वेद ने तिच्या कार्ड तिच्या हातात दिल... तस प्रणिती ने फक्त डोळे मिचकवले आणि ते नीट purse मध्ये ठेऊन दिल... 


"तू काहीतरी विसरतोय का..?.." बेड वर पडल्या त्याने तिला कुशीत घेतलं... 


"नाही सगळी काम झाली .."प्रणिती 

"आहि माझं किस..?..."ऋग्वेद 



"ते तर ..ह ..?.. काय बोललात..?.."तिने डोळे मोठे करत त्याच्याकडे बघितलं.. 


"माझं किस..?.."ओठाचा चंबू करत तो तिच्याकडे बघत होता.... 

"हे...हे... असलं काही मी देत नाही.... good night .."तिने कूस पालटली आणि वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्याचा प्रयत्न करायला लागली ... 


"तिथे गेल्यावर मी एक मिनिट पण सोडणार नाहीय तुला.. सगळ्याचा बदल घेणार बघ तू..."त्याने तिला तसेच ओढून कुशीत घेतलं... गालात हसत ती झोपी गेली .. 


दुसऱ्यादिवशी सकाळीच ती ऑफिसमध्ये गेली ... आणि half day घेऊन ती काव्या मॉल मध्ये आल्या... सृष्टी ला फोन करून पण प्रणितीने तिथेच बोलावलं होत... त्या दोघी मिळून तीच डोकं खराब करत होत्या... असले असले कपडे शोधात होत्या कि ते बघून च प्रणितीच्या अंगावर काटा यायचा.... 

शेवटी खूप फिरल्यावर त्यांनी बरीचशी शॉपिंग केली.... प्रणिती ने ऋग्वेद साठी पण खरेदी केली..... दमल्यावर खाण्यासाठी म्हणून त्या फूड काउंटर वर आल्या .. ऑर्डर द्यायला प्रणिती गेली तिला चालताना बघून कोपऱ्यात उभ्या असलेल्या प्रिया ने कोणाला तरी इशारा केला तस ती हातात गरम कॉफी चा काप घेऊन प्रणिती   

च्या दिशेने निघाली .... पण नेमकी प्रणिती ला आपटणार त्या आधीच प्रणिती बाजूला झाली आणि ती मुलगी त्या कॉफी कप सोबत तोल जाऊन खाली पडली.. ती गरम गरम कॉफी तिच्याच अंगावर पडली ... 



प्रिया ने हे बघून डोळे फिरवले ... रागाने ती लाल झाली होती.... सकाळीच ऋग्वेद ने तिला सांगितलं होत... तो प्रणिती सोबत काही दिवस बाहेर जात आहे त्यामुळे कंपनी ची जबरदारी तिच्याकडे येणार ,.. तेव्हा पासून ती त्यांना जाण्यापासून कास थांबवायचं ह्याच्या विचार करत होती.... ते दोघे एकत्र येणार हा विचार करूनच तिची आग होत होती..... 


"ओह्ह हॅलो .. मिसेस सूर्यवंशी .."मागून आवाज आला तस... ह्या तिघीच्या मन वळल्या... 


"जॅबी सर ..?.."प्रणिती 

"हे अमेरिकन माकड इथे कशाला आली..?.."काव्या ने नाक मुरडले... 


"if you dont mind mind can i join you ..?.."जॅबी .... 


"sure plese come .."पप्रणिती हसली.... एवढ्या दिवसात ऑफिस मध्ये तिची थोडीफार ओळख झालीच होतीच त्याच्याशी ... आणि तो खूप मस्तीखोर आहे हे पण तिने बघितलं होत .... 



"मी इथे एका मिटिंग साठी आलेलो .... but ती कॅन्सल झाली..."जॅबी 


"अच्छा .."प्रणिती 


"हा कोण आहे..?..." सृष्टी काव्याच्या कानात खुसपुसली 

"client आहे नवीन .... अमेरिकेतून आली..."काव्या 


"wow ... किती hot आहे.." सृष्टी 


"hot नाही मूर्ख आहे तो.."काव्या ने नाक मुरडल... परिणीती ने डोळे मोठे करत दोघांना शान्त केलं... 

"ह्या कोण...?.."जॅबी 


"हि वेद ची बहीण सृष्टी .."प्रणिती ने ओळख करून दिली... 

"ओह्ह hi .."जॅबी  



"hello .."सृष्टी 


"आणि हि.."पार्णीती काव्य ची ओळख सांगायला जाताच होती.... 

"ह्यांना कोण आहि ओळखत मिस lizard ..."जॅबी 



"lizard कोणाला म्हणतो बे.. पांढरा माकड..."काव्या 

"सुरवात तू केलेली remember ..?जॅबी

"मी..?...मी सुरवात केलेली ..?... तुझ्या अंगात जास्त वेडी आहेत.. मी माकड उगीच नाही म्हणत नाही.."काव्या 



त्या दोघंच भांडण बघून प्रणिती ने डोक्याला हात लावला .. आधीच ऑफिस मध्ये दोन वेळा त्याची भांडण सोडवता तिच्या नाकी नऊ आले होते.... सृष्टी ने तर कानावर हात ठेवले ... तिच्या बालमनावर परिणाम नको ..... 

काव्याला समजावत ती ओढतच बाहेर घेऊन आली.. त्याच्या मागोमाग गार्ड हातभरून पिशव्या घेऊन आले... प्रिया कोपऱ्यातून सगळं बघत होती... ऐकायला पण येत होत... तिने स्वतः बघितलेलं जॅबी ला मॉल मध्ये एंटर होताना तो कोणत्याही मिटिंग साठी आला नव्हता... मग कशाला आला होता...?प्रणितीसाठी...?.. 



तीच डोकं आता पाळायला लागलं... ऑफिस मध्ये पण तिने जॅबी ला चोरून प्रणितील बघताना बघितले ल असत पण जास्त लक्ष दिल नव्हतं ... आता ते आठवत तिच्या चेहऱ्यावर एक smile आली... पुढे काय करायचा चांगलाच प्लॅन तिने बनवला....... 




************************



"नीती... आपण तिथे कायम साठी राहायला जात नाहीयत ..." तिच्या एवढ्या सगळ्या बॅग बघून ऋग्वेद ने डोक्याला हात लावला.... 

"तुम्ही मला सांगितलंच नाही कुठे जातोय ते... म्हणून मी सगळं घेतलं.."प्रणिती ने खांदे उडवले.... 

"ohh god .."ऋग्वेद ने डोळे फिरवले ... आणि तिच्या बॅग मधलं बरचस सामान कमी केलं... घरच्यांच्या पाय पडून दोघेही बाहेर पडले.... 




"सर .... ते दोघे कुठेतरी बाहेर जातायत .... बॅग्स होत्या हातात... आणि chopper ने गेलेत.."


"ठीक आहे... त्यांना डिस्टर्ब् नको करू पण लक्ष कायम असूदेत ... तो कालच इंडिया मधी आलाय प्ल्याला आता जास्त सावध राहावं लागणार आहे.... त्यांना सुगावा लागलाय राजकुमारी जिवन्त आहे .. तरी बरच झालं ते दोघे लॅब गेले आपल्याला इकडे जस्ट वेळ मिळेल त्याला पकडायला ...."विशेष 


"हो सर.... मी त्याच्यामागे दुसऱ्या माणसांना पाठवतो .... आणि येतो हैद्राबाद ला.."


"okey .."विशेष ने फोन ठेवला... 


"डोळे उघड नीती.... बाहेर बघ काही नाही होणार... ऋग्वेद ने तिचा हात घट्ट पकडला होता.... घाबरत पटनितीने अर्धे डोळे उघडले आणि हळूच लक्ष खिडकीतून बाहेर टाकलं ... 


ते उंच आकाशात होते... भीती कमी झाली ... तस तिने पूर्ण डोळे उघडले... आणि बाहेरच्या नजारा एन्जॉय करत बसली.... 

"आता तरी सांगा ना आपण कुठे जातोय...?.."तिला राहवत नव्हतं... 


"थोडा wait कर ना.... आपोआप समजेल...."ऋग्वेद तिने डॉफ फिरवलं आणि पुन्हा बेहेडा बघत बसली.... 


"तीन तासांनी chopper एका मोठ्या bunglow च्या टॉप वर उतरवलं .... तिने अजूनही समजलं नव्हतं ते कुठे आलेत कारण वरून तर सगळं सारखं च दिसत होत... ऋग्वेद खाली उतरला आणि तिने अजिबात हात पुढे केला नाही... 


"मला जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही आपण कुठे आहोत तोपर्यंत मी खाली पाय पण ठेवणार नाही..."प्रणिती 


"नीती ... you are too musch ... okey fine ... आपण अंदमान ला आहोत..." ऋग्वेद 



"what ..?.. really ...?.."तिने ऋग्वेद च्या अंगावर उडीच मारली ... तो मागे पडता पडता वाचला... 



"thank you ... thank you so much ... तुम्हाला माहितीय माझी खूप इच्छा होती अशी बेटावर जायची ..... wow .."प्रणिती त्याच्या मिठीतुन खाली उतरली... 


"ते समजतंय मला.. पण आता अराम कर.. आपण संद्याकाळी जाऊ ... हा bunglow आपलाच आहे..."ऋग्वेद तिला घेऊन bunglow मध्ये आला... तो सूर्यवंशी mantion एवढा मोठा नव्हता... पण खूप छोटा पण नव्हता.... तिथे देखरेख करायला एक जोडपं होत... 


प्रणिती आणि वेद ला बघून ते पुढे आले... ऋग्वेद ने त्याची विचारपूस वगैरे केली... आणि दुपारच्या जेवणासाठी काय हवं ते सांगून दोघे वर बेडरूम मध्ये आले... 

प्रणितीने रूम उघडली तर एक वेगळाच सुवास नाकात गेला... तिने आजूबाजूला नजर फिरवली तर फुल वैगरे नव्हती.... 

"हा ... हा कुठला आहे..?"प्रणिती 


"कॉम.."ऋग्वेद तिला घेऊन बाल्कनी मध्ये आला ... तिथे खालीच मोठं गार्डन होत नि त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावलेली जास्त करून अंदमान मध्ये आढळणारी दुर्मिळ प्रजाती ची ... ते रंगीबेरंगी दृश्य बघून दोघांच्याही मनाला आनंद झाला...
तिथून चारही बाजूना समुद्र दिसत होता... प्रणिती खूप खुश झाली.. तिला हे पूर्ण बेत एक्स्प्लोर करायचं होत... 

"happy ..?.. "ऋग्वेद ने तिया मागून घट्ट मिठीत घेतलं.... 

"खूप जास्त..."प्रणिती ने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं... 

"मग आता मला काय मिळणार ..?.." ऋग्वेद 


"तुम्हाला..?तुम्हाला कशाला काय हवं...?"प्रणिती 

"तू नाही दिलासा तरी माझं मी घेणार ...."ऋग्वेद ने तिला गर्रकन स्वतःकडे वळवलं ... प्रणिती मागच्या ग्रील ला तेली ... तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता... ती इंटेन्सिटी बघूनच तिने पापण्या झुकावल्या .....

"ह्ह .... तर दोन दिवस मला किस मिळालं नाहीय.. आणि आजचा सुद्धा ... म्हणजे किती पेंडिंग आहे बघ .." त्याने अलगद तिच्या गालावर गाळ घासला... लाजून प्रणिती चे गाल दुखायला लागले.... होते... 


ओठाच्या कडेवर जीभ फिरवत तो तिचे ओठ ताब्यात घेणारच होता... 


"कॉकरोच .."प्रणिती जोरात ओरडली... 



"कॉकरोच ..?.."ऋग्वेद ने पटकन मागे बघितलं ... तोपर्यंत प्रणिती हसत त्याच्या मिठीतुन पळाली .... 



"तुम्हाला ठेंगा मिळणार मिस्टर सूर्यनवंशी..."हसतच ती खाली पाळली... तिच्या हसण्याने पूर्ण bunglow भरून गेला.... 


"फिरून फिरून तुला माझ्याच मिठीत यायचं आहे मिसेस सूर्यनवंशी ..."ऋग्वेद वरून ओरडला... पण तोपर्यंत ती तिथून गायब होती... हसतच तो फ्रेश व्हायला गेला.... 

दुपारी जेवायला ती त्याच्या बाजूला ना बसता समोरच्या खुर्ची वर जाऊन बसली .... ऋग्वेद बारीक डोळे करून तिला बघत होता... तिने गालात हसत स्वतःच्या खाण्याकडे लक्ष दिल .... 



अचानक पायाला काहीतरी गार लागलं... तिने खाली बघितलं तर ऋग्वेद चा पाय तिच्या पावलावर फिरत होता... पटकन तिने स्वतःचा पाय मागे घेतला ... समोर काकी असल्याने तो काही करू शकत नव्हता .. आणि ह्याचा चांगलाच फायदा प्रणिती घेत होती.... 


जेवून झाल्यावर त्याच्या तावडीत सापडण्याआधीच ती काकींसोबत गार्डन मध्ये गेली... त्या तिला सगळ्या प्रकारच्या फुलाची माहिती देत होत्या ... ती मस्त हात फिरवत फुलाचा सुगन्ध घेत होती... खूप वेळ झाला तरी काकीचा आवाज येत नाही म्हणून तिने मागे बघितलं तर ऋग्वेद हाताची घडी घालून भुवया उडवत तिच्याकडेच बघत होता..... 

त्याला बघताच पहिला तिच्या मानाने कोल दिला.... "पळ प्रणिती.."पण तिचे पाय जागीच गोठले.... कारण तिला पालनायचा चान्स च त्याने दिला नव्हता ... सरळ ओढून घेतलं कि ती त्याच्या छातीवर जाऊन आपटली.... 


तो तिच्याकडे बघून मिस्कील हसत होता... 


"आता कुठे जाशील...?.."ऋग्वेद 


"हे..हे..बघा.."प्रणिती 



"बघतोच आहे..."ऋग्वेद 


"तू..तुम्ही असं करू शकत नाही .... आपण बाहेर आहोत ..."प्रणिती 



"मग जाऊया रूममध्ये ...?.."त्याने डोळा मारला... 

"तुम्ही .."तिला पुढे काही बोलायला न देताच त्याने ओठ ताब्यात घेतले.... समुद्राकडून येणारा गार वारा अंगार झेलत दोघेही स्वतःच्या दुनियेत विराजमान झाले.... 




ती पन टाचा उंचावत त्याला प्रतिसाद द्यायला लागली... तिच्या नाजूक कंबरेत हात रोवत त्याने अजूनच जवळ ओढलं ... गोल फिरवलं त्याने तिचे पाय स्वतःच्या कंबरेभोवती गुंडाळले आणि तिला तसेच भिंतीला टेकवलं ... 


त्याच्या गळयाभोवती हात घालत प्रणिती त्याला अजून जवळ ओढत होती..... तसा त्याने हसत ओठ थोडे बाजूला एल.... "मागापासून कोण तरी लांब पळत होत..."त्याने तिच्या नाकावर नाक घासलं .... प्रणिती ने लाजून त्याला मिठी मारली 




क्रमशः