Ashirwad in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | आशीर्वाद

Featured Books
  • فطرت

    خزاں   خزاں میں مرجھائے ہوئے پھولوں کے کھلنے کی توقع نہ...

  • زندگی ایک کھلونا ہے

    زندگی ایک کھلونا ہے ایک لمحے میں ہنس کر روؤں گا نیکی کی راہ...

  • سدا بہار جشن

    میرے اپنے لوگ میرے وجود کی نشانی مانگتے ہیں۔ مجھ سے میری پرا...

  • دکھوں کی سرگوشیاں

        دکھوں کی سرگوشیاںتحریر  شے امین فون کے الارم کی کرخت اور...

  • نیا راگ

    والدین کا سایہ ہمیشہ بچوں کے ساتھ رہتا ہے۔ اس کی برکت سے زند...

Categories
Share

आशीर्वाद

सकाळची आठ ची ती वेळ आदल्या दिवशी च्या पाऊसाने बरीच पडझड केली होती.अंगण भर पाला पाचोळा पडला होता तो काढण्यात बाई म्हणजे माधवी केसरकर व्यस्त होत्या त्याचे यजमान पूर्वीचे शिक्षक त्यामुळे त्याचा सौ ना गावकऱ्यांकडून बाई हि उपाधी मिळाली लहान थोर सगळेच त्यांना बाई म्हणत

 

अश्या ह्या बाई पाला पाचोळा काढत असताना त्याचा लक्षात येते 

 

"अरे देवा हे कुठे राहिले केवडा उशीर झाला देवळातून यायला फक्त २० मिनिटे पुरे "

 

एव्हड्यात त्यांना त्याचे यजमान येताना दिसले 

 

"काय हो केवढा उशीर कुठे होतात तुम्ही "?

 

 "अगं  पाउसा मुळे गावात बरेच नुकसान झाले "

 

"तुम्ही काय गाव पाहणी ला गेला होतात ''

 

' नाही ग शाळे कडे गेलो होतो कालच्या पाऊसाने शाळेची भिंत एकाबाजूनी कोसळली "

 

"काय"

 

'हो  पाहून जीव कासावीस झाला तडक सरपंचाच्या घरी गेलो त्याच्या कानावर हि गोष्ट पडली होती तरी हि मुदाम मी सांगितली तर म्हणतो कसा "गुरुजी शाळा तर बंद झालेली मग पडली काय आणि राहिली काय "ह्यांना मी तेव्हाच सांगत होतो जेव्हा शाळेत मुलाची संख्या कमी होऊ लागली काहीतरी पाऊले उचला शाळा बंद पडता कामा नये तेव्हा" गुरुजी गावातल्या शाळेत कोण जात सगळी मूल  शहरातल्या शाळेत जातात पाहूया जे होईल ते होईल "असे सांगितले त्याचे हे बोलणे ऐकून मस्तकात सणक गेली अरे ज्या शाळेत तुम्ही शिकलात त्या शाळे साठी तुमचा जीव कसा तुटतं नाही "

 

"तुम्ही शांत व्हा "

 

"कसा शांत होऊ ज्या शाळे मुळे आपल्या पोटाची भूक भागवली त्या शाळेला असं कसं वाऱ्यावर सोडून देऊ"?

 

"पण तुम्ही काय करू शकता आणि तसं हि पाहता आता गावच्या शाळेत कोणीच नाही जात सगळे चालले शहरातल्या शाळेत"

 

"मान्य आहे शहरातल्या शाळेत जातात म्हूणन ह्या शाळेला विसरून जायचं एकेकाळची गावातली शान म्हणजे हि शाळा कित्येक विद्यार्थी ह्या शाळेने घडवले जे आज मोठ्या पदावर विराजमान आहे मी कित्येकाना शाळा बंद होईल आपण काहीतरी करायला हवं असं सांगितलं होत पण विद्यार्थी नाही तर  शाळा बंदच होणार मग आणि काय करायचं अशी त्याची उडवाउडवी ची उत्तरे "

 

"तुम्ही चला चहा ह्या आणि गोळ्या पण घ्याचा आहेत तुम्हला '

 

गुरुजी म्हणजे माधव केसरकर चहा घेत होते पण लक्ष कुठे दुसरी  कडे एवढ्यात त्याना कोणी हाक मारली त्यानी दरवाजा कडे पहिले 

 

"गुरुजी आता येऊ "

 

"कोण रे बाबा "

 

"गुरुजी मी आदित्य देसाईंचा "

 

"अरे कधी आलास मुंबई हुन "

 

"झाले आठ दिवस इथे तिथे फिरत काल येणार होतो पण पाऊस त्यामुळे तुम्हला आज भेटायला आलो "

 

"बरं "

 

"कसे आहात गुरुजी ?"

 

"मी बरा आहे आणि तू "

 

"मी पण मस्त गावी आल्या नंतर एक नवीन ऊर्जा येते बरं गुरुजी कालच्या पाऊसाने शाळेची भिंत कोसळली माहित आहे का तुम्हला "?

 

"हो पाहून आलो मी "

 

"मी हि गेलो होतो फोटो हि काढले "

 

"फोटो ते कशाला"?

 

"अहो गुरुजी आम्ही माजी विद्यार्थ्यांचा व्हत्सप्प उप वर ग्रुप आहे जिथे आम्ही दुर असून सुद्धा एकमेकांशी बोलू शकतो आठवणी शेयर करू शकतो मग त्याना पण कळायला हवं ना आणि जसा मी फोटो उपलोड केला खूप जणानी दुःख व्यक्त केलं '

 

"आता करू काय फायदा जेव्हा शाळा बंद पडायला होती तेव्हा का नाही तुम्ही काय ते वाह्त्सप्प केलं "

 

"गुरुजी आता कोण गावातल्या शाळेत जात पहिली साधन सुविधा नव्हती म्हणून कोण शहरात जात नसत पण आता सगळी सोय आहे आणि स्मार्ट होण्यासाठी शहरातल्या शाळेत जावंच लागत "

 

गुरुजी त्याला रोखून पाहता म्हणाले 

 

"स्मार्ट म्हणजे काय रे गावातल्या शाळेत शिकलेले स्मार्ट नसतात कि त्याना तिथे शिकल्यावर दुसरा मेंदू येतो असं आहे का ?आणि तू ह्याच शाळेत शिकलास ना रे पण उच्च पदावर नोकरीला आहेस ना "

 

"हो गुरुजी मी शिकलो "

 

"मग जेव्हा शाळा बंद पडायला आली तेव्हा माजी विद्यार्थी म्हणून तुम्ही कोणीच कसा पुढकार घेतला नाही ती फक्त चार भीती आणि कौलची नव्हती तुम्हाला सज्ञान बनवायचं काम केलं तिने माझ्या सारख्या शिक्षकाची पोट्पुजी बनली आणि तीची गरज संपता आपण मात्र तिच्याकडे पाठ फिरवली माझी पेन्शन येते त्यात आम्ही घर सांभाळतो माझ्या मुलाला हि मी सागितलेले तो हि शहर निवासी तो हि तुच्या सारखा बोला मग काय आणि सांगायचे कोणालाच कळकळ नाही शाळेसाठी हे मात्र दुर्देव "

 

आदित्यला ते गुरुजींचे बोलणे असहाय झाले त्याने गुरूजी चा  निरोप घेतला 

 

असेच दिवस जात होते गुरुजी मात्र मनाने दुखी झाले होते एका संध्याकाळी आभाळ काळ्या ढगांनी  दाटून आला होत वाऱ्याने हि जोर घेतला होता वीज हि कडाडत होती गुरुजी दरवाजावर उभे राहून निसर्गाची किमया पाहत होते पण मनात मात्र त्याच्या धाकधूक चालू होती 

 

"काय हो असे दरवाजावर का उभे आहात आत बसा "

 

आणि एवढ्यात मोठ्या मेघगर्जने सह पाऊस पडू लागला पाऊसाचे थेंब गुरुजींवर बरसले तसे गुरुजी आत आले 

 

"भिजलात ना सांगत होते "

 

"माधवी एव्हडा पाऊस जोरात पडतो शाळेच काय होईल एक बाजू तर गेलीच दुसरी तरी शाबूत राहावी "

 

"एवढ्या मोठ्या पाऊसात काय होईल सांगता येत नाही '

 

रात्र भर पाऊस पडत होता वाराही जोरात वहात होता गुरुजींची बेचैनी बरीच वाढली होती कधी एकदा सकाळ होते आणि शाळेकडे फिरकतो असे त्याना झाले होते 

 

पाऊस थांबला होता सकाळ उजाडली तसे गुरुजी बाहेर निघाले 

 

"अहो सकाळी सकाळी कुठे जाता "?

 

"येतो गं म्हणत ते चालू लागले "

 

शाळेकडे पोहोचताच त्याना लोकांची गर्दी दिसली त्या गर्दीतून वाट काढत  गुरुजी पुढे आले आणि जे त्यांनी पहिले ते पाहून त्याच्या डोळयांतून अश्रू वाहू लागले शाळा जमीन दोस्त झाली होती गुरुजी पुढे सरकवले तसे कोणी तरी गुरुजींना 

 

"गुरुजी आत नका जाऊ माती चिकट आहे /"

 

गुरुजी आपल्या दुनियेत होते ते त्या डिग्र्यात शिरले चिकट माती आपल्या हातात घेऊन शर्ट च्या खिशात कोंबली सगळेजण गुरुजींना पाहत राहिले त्या बघ्यांना पाहून ते 

 

"आता गर्दी केली खरी गरज तेव्हा होती "

 

वाट काढत आणि डोळे पुसत त्यांनी घरची वाट धरली 

 

बाई दरवाजावर उभ्या होत्या त्याच्या तो रडवलेला चेहेरा त्यांनी ओळखला 

 

"माधवी शाळा गेली "

 

असे म्हणत ते आत गेले प्लास्टिक पिशवी घेऊन ते देव घरात गेले त्याच्या मागोमाग बाई हि गेल्या आपल्या शर्ट मध्ये कोंबलेली ती चिकट माती त्यानी त्या पिशवीत घालती 

 

"हि कसली माती शर्ट मध्ये ठेवली तुम्ही "?

 

गुरुजींनी त्याना उत्तर न देता ती पिशवीला गाठ मारून देवा जवळ  ठेवत असताना 

 

'अहो काय करतात तुम्ही माती कसली देवघरात ठेवतात "?

 

"हि माती नाही आशीर्वाद आहे "

 

"आशीर्वाद कोणाचा "?

 

"शाळेचा जिची  एव्हडी वर्ष पूजा केली मी शाळेला माझा नोकरीचा भाग म्हूणन कधी पहिले नाही एका मंदिरात जसा एक भक्त तल्लीन होतो तसा मी त्या विद्देच्या मंदिरात शिकवताना होत असे तिच्या आशीर्वाद मुळेच तर आपण आपले आणि आपल्या मुलाचे भविष्य साकारू शकलो आणि ह्या उतार वयात तिच्याच पोटपूजीं मुळे आपण सुखात दिवस घालवतो गणेश विसर्जन करताना बापाच्या जाण्याने कसे दुःख वाटते पण एक आशा  परत पुढच्या वर्षी येण्याची असते पण आता परत शाळा उभी राहिली कि नाही काय माहित म्हणून मी हा आशीर्वाद आणि आठवणींचा ठेवा सदैव जपणार आहे "

 

त्याच्या अश्या भावुक बोलण्याने बाई हि भावुक झाल्या तो दिवस ओसरला 

 

दुसऱ्या दिवशी गुरुजी पेपर वाचत होते गावच्या शाळेची बातमी पेपर मध्ये आली होती आणि सरपंचाचे मनोगत 

 

"मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी आज जी घटना घडली ती पाहून जीव कासावीस झाला शाळा बंद न पडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही शाळेच्या आठवणी नेहमी माझ्या मनात आहे खूप दुःख झालं आहे शब्दात ना

ही सांगू शकत "

 

मनोगत वाचून गुरुजी चिडून म्हणाले 

 

"हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे म्हणे शब्दात नाही सांगू शकत "