Memories of B.Ed. Physical Course - 4 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | बी.एड्. फिजीकल - 4

Featured Books
  • فطرت

    خزاں   خزاں میں مرجھائے ہوئے پھولوں کے کھلنے کی توقع نہ...

  • زندگی ایک کھلونا ہے

    زندگی ایک کھلونا ہے ایک لمحے میں ہنس کر روؤں گا نیکی کی راہ...

  • سدا بہار جشن

    میرے اپنے لوگ میرے وجود کی نشانی مانگتے ہیں۔ مجھ سے میری پرا...

  • دکھوں کی سرگوشیاں

        دکھوں کی سرگوشیاںتحریر  شے امین فون کے الارم کی کرخت اور...

  • نیا راگ

    والدین کا سایہ ہمیشہ بچوں کے ساتھ رہتا ہے۔ اس کی برکت سے زند...

Categories
Share

बी.एड्. फिजीकल - 4

                बी. एड्. फिजीकल  भाग 4   सुरू     

 आज कुर्मा पुरी, बासुंदी स्पेशल बेत होता. प्राचार्यांसह सर्व  स्टाफ आणि कमिटी मेंबर्स गेस्ट रूम मध्येलंच घेवून ऑफिसकडे गेले.  साडे अकराला लेक्चर्स सुरू झाली. 

     साडेतीनला कमिटी मेंबर्स विजीट पूर्ण करून निघून गेले.प्राचार्य लेक्चर हॉलमध्येआले.कमिटी व्हिजिट मुळे इव्हिनिंग असेंब्ली रद्द केलेली होती. दोन दिवसानी सराव पाठ सुरूव्हायचे होते. दहा ऑक्टोबरला लेसन्सचे सेशन असे पर्यंत दुपारची लेक्चर्स बंद होती त्या ऐवजी  रोज रात्री आठ ते अकरा  या वेळेत चार लेक्चर्स होणार असा बदलेला कार्यक्रम त्यांनी संगितला. क्लास सुटला नी आम्ही आनंदात  रूमवर निघालो. शिंदे मास्तरची खबर अद्याप आलेली नव्हती. संध्याकाळी आम्ही दामुनगर परिसरात अगदी टोकाला  वसाहत संपते तिथ पर्यंत फेरफटका मारून आलो. आम्ही रूमवर गेलो तेंव्हा शिंदे मास्तर आला असे कळले म्हणून त्याला भेटायला गेलो.  पामेल हॉर्सवर सिझर मारताना दोन्ही हाताचे तळवे टॉपवर टेकवून त्यावर शरीर तोलून दोन्ही पाय दोन बाजुला ताणून स्प्रिंग घेऊन हात उचलायचे नीपलिकडे जंप करायची असते. हे करताना टॉपवरच्या रेक्झिनवर  शिंदे मास्तरच्या हाताच तळवा घसरला. ग्रीप चुकलीनी पलिकडे पडताना डाव्या ढोपराला साईडच्या फळीचा जबर मार बसला. फ्रॅक्चर नव्हते  पण डिसलोकेट झालेली गुढग्याचीवाटी पूर्ववत् होणे कठिण होते. आठवडाभरात शिंदे मास्तर बरा झाला पण ढोपराच्या फ्री मुव्हमेंट करता येत नव्हत्या. हयातभर पाय ओढीत चालणे त्याच्यानशिबाला आले.      

        कांदिवली स्टेशनवर उतरून पूर्वेला  दहा बारा मिनीटांच्या  अंतरावर अहमदाबाद हायवे लागतो. त्याच्या वरच्या अंगाला टेकडी दिसते. तो जवळ जवळ  ५० एकरचा प्लॉट  शासनाच्या मालकीचा आहे. संपूर्ण प्लॉटला  काटेरी तारेचं कंपौण्ड  होतं. पूर्वी  तिथे मिलिट्री ट्रेनिंग कॅम्प होता. पुढे सांताक्रूझ कलिना येथे मिलिट्री कॅम्प झाल्यावर १९३८ साली ट्रेनिंग इन्स्टिट्युट फ़ॉर फिजिकल एज्युकेशन(T.I.P.E.Kandivali)या नावाने पदव्युत्तर शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू केले. आरंभ काळी प्राचार्य आणिबरेचसे प्राध्यापक ब्रिटिश असायचे.ही संस्था प्राथमिक माध्यामिक शिक्षकांसाठी  शारिरीक शिक्षणाचे  सेवांतर्गत शॉर्ट  टर्म प्रशिक्षण वर्गही चालवीत असे.  स्वातंत्र्यप्राप्ती नंतर या संस्थेचे पूर्वीचे नाव बदलून ग्व्हर्नमेण्ट कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, कांदिवली (G.C.P.E.Kandivali) असे करण्यात  आले. येथे डिप्लोमाइन फिजीकल एज्युकेशन (D.P.Ed.) हा पदव्युत्तर कोर्स  सुरू होता.

            पुढे हा डिप्लोमा कोर्स असल्यामुळे  बी.एड. समकक्ष संदर्भात प्रवाद निर्माण झाला. डिपीएड् पदवी धारकाना मुख्याध्यापक पदासाठी पात्र ठरविण्याबाबत प्रवाद निर्माण झाल्यावर तत्कालीन  मॅनेजमेण्टने डि.पी.एड. ऐवजी बी.एड्. (फिजीकल) हाबी.एड्. समकक्ष डिग्री कोर्स मुंबई विद्यापीठाची खास मान्यता घेवून सुरू केला. बी.एड.ला दोन अध्यापन पद्धती असतात. त्यातली एकशारिरीक शिक्षण व दुसरी अन्य भाषा, विज्ञान, गणित, स.शास्त्र वगैरे अ‍कॅडेमिक असायची.तसेच  अभ्यासक्रमातील तात्विक भागात शारिरीक शिक्षणाचे तात्विक  अधिष्ठान आणि शारिरीक शिक्षणाचा इतिहास हे दोन पेपर  समाविष्ट केलेले  होते. महाविद्यालयाच्या परिसरात  ४०० मीटरचा ट्रॅक  बसेल एवढे प्रशस्त क्रीडांगण  होते. तसेच  १५×१२ चौ. फूट मापाच्या३० खोल्या असलेली तीन हॉस्टेल्स होती. महाविद्यालय शासकीय असल्यामुळे  निशुल्क शिक्षणाची  सुविधा होती.  

         सकाळच्या असेंब्ली पूर्वी  चहा घ्यायला कॉलेजच्या मेन गेट बाहेर पंडितजीच्या ठेल्यापर्यंत जायला चार पाच मिनिटं  लागत  इतक लांब अंतर होतं. एकेकदा  जरा लेट झाला तरी  चहा  घेणं  टाळावं लागे. मी त्यावर नामी युक्ती शोधली. मी मावशीकडून छोटा स्टीलचा ग्लास आणला. चहा घ्यायला जाताना मी तो सोबत घेवून जाई. त्यात चहा ओतूनघेवून चहा पिता पिता  परत यायला निघे. त्यामुळेलेट होण्याची धास्ती राहिली नाही. असेंब्लिला जाताना मेसच्या कॉर्नर जवळ  बेसिन होतं तिथे तो धूवून उपडा घाली, माझी ही आयडिया खूप जणाना आवडली. मुलींचं होस्टेल  तर आमच्या होस्टेल पासून आठ दहा मिनिटं  दूर होतं त्यामुळे मुली बिचाऱ्या असेंब्लिपूर्वी चहा घेतच नसत. माझी ग्लासची आयडिया बघितल्यावर मात्र  पंचवीस तीस मुलीनी  आपली ग्लासं आणून कुणा कुणा कडे देवून ठेवली. तेलोक आपण चहा घेतल्यावर मुलीनी दिलेल्या ग्लासात चहा घेवून येत. तो पर्यंत संबंधित मुलीआलेल्या असत त्या चहा घेवून आरामात ग्राउंडवर जात. सगळ्या जणी रोज चहा पिताना आवर्जून मला दुवा देत.

        मेससाठी भटार खाना, स्टोअर रूम, नोकरांना निवासासाठी  दोन रूम आणि ४०×५० फूट  एवढा प्रशस्त डायनिंग हॉल होता.  मेसचे संचालन प्रशिक्षणार्थी करीत असत आणि मासिकबील आकारून खर्च चालवीत असत. मेससाठी भाजी शिधा आणणं, रोज जेवण रांधण्या आधी  दोन्ही वेळा वस्तू खरेदी करून आणणं आणि रोजचा शिधामोजून मापून देणं या साठी दरमहाआळीपाळीने साताठ लोकांची कमिटी  निवडली जायची. यातली लोकंसुद्धा आटा, भाजी अन्य किराणा सामानाची बिलं  वाढवून लावीत. त्यावेळीचांगल्या मेसमध्ये महिना ७५ ते ८० रुपये दर होता . पण आमचं मेसबील कधिच ११० ते १२०रुपयाच्या आत येत नसे. आठवड्यातून एकदा रविवारी फिस्ट असे. मांसाहारींसाठी मटण  नी शाकाहारींसाठी  एक वाटी बासुंदी नाहीतर श्रीखंड देत. गोवेकर, प्रभु,राऊळ, चौधरी हे  मांसाहारी पण मेसमधल्या  रांधपाची तऱ्हा पाहता ते मांसाहार  करीत नसत. आबा चौधरी  त्याच्या वसईतल्या घरून नी प्रभु आपल्या पार्ल्यातल्या भावाकडून  महिन्यातून एक दोनदा पाचसहा जणाना पुरेस मटण किंवा  मच्छी कडी आणीत नी तेंव्हा हा ग्रूप प्रभुच्या नाहीतर  आबाच्या रूमवर मेसमधून भात-पोळ्या नेवून तिथे जेवीत.

      आमच्या ग्रूप मध्ये कुरूंदवाडचा फ़डणिस हा सर्वात प्रौढ.   पण तो खूप अ‍ॅक्टिव्ह होता. तो लाकडी  खांबाचा मल्लखांब आणि वेत्र मल्लखांब यात निपूण होता. मला त्मेयनेच मलखांब शिकवला. सचे हिशोब त्याच्याकडे होते . रोज रात्री अर्धातास त्याला हिशोबासाठी मोडावालागे. प्राचार्यांसह सगळे प्राध्यापक त्याला रिस्पेक्ट देत. तसे  वैद्य हा प्रभूचा पार्टनर नी आणखीनही  ४-५ विवाहीत लोक होते. व6ड्य कायम चार मिनार सिगारेटी ओढायचा नी ती राख कॉटभोवती तशीच पडलेली असायची. यापैकी चावरेकर ने मात्र ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलेली होती. प्ण जानेवारीत त्याचं बिंग फुटलं. इंग्रजीतून पत्ता लिहीलेलं  त्याचं पत्र पोस्टमनने  चुकून चौधरी पैलवानला दिलं. त्याने ते फोडलं . मग़तो आमच्या रूम्वर आला आणि, “चावरेकर मास्तर तुज्या बायकोचं लव्ह लेटार आलंया.बग पोस्टमनने त्ये चौधरी समजून मला देलं की......”

           जुलै मध्ये पहिल्या आठवड्यात बहुधा तो गुरुवार असावा. संध्याकाळची  असेंब्ली सुरूअसताना  सव्वापाचला  सुपरिटेण्डण्ट सुपेकर ग्राऊण्डवर आले. आमचा लेझिमचा सराव सुरू होता. इंस्ट्रक्टर शिंदे मला बोलवायला आले नी म्हणाले,“तुम्ही सुपेकर सरांबरोबरजा. तुमचे कुणी रिलेटिव्ह एक्स्पायर झालेत. तुम्ही निघा.”  मला काही उलगडाच  होईना. सुपेकरना भेटल्यावर मला कळलं. माझा मावसभाऊ गिरगावला  सेन्ट्रल सिनेमा जवळ त्याच्या काकाकाकूं सोबत रहायचा. मी अ‍डमिशन झाल्यावर  मुंबईत  आलो तेव्हा पहिल्याने त्याच्याकडेच गेलो होतो. तेंव्हा काकू खुप आजारी   होती. तीच्या प्रेत यात्रेला निळूभाऊ जाणार होते. त्यानीच सुपेकरना फोन करून त्यांच्यासोबत मला घेवून यायला त्याना फोन करून सांगितलं होतं. सुपेकर बेलवलकर  कॉलनीत निळूभाऊंच्या शेजारी रहात, माझी अ‍ॕडमिशन त्यानीच केलेली. स्टेशनवर गेल्यावर ते  तिकीट बारीवर माझं तिकिट  काढायला निघाले. पण मी दोन दिवसापूर्वीच बोरीवली ते चर्चगेट २८ रुपयाचा तिमाही पास काढलेला होता. निळूभाऊंकडे गेल्यावर आम्ही लगेच बाहेर पडलो.

           रात्री नऊ वाजता गेट पास मिळाल्यावर भेळवाल्याची गाडी असते  तशा  गाडीवर प्रेत ठेवून  सगळे  चालत निघाले. अर्ध्या तासात  आम्ही  वैकुंठ भूमीत पोहोचलो. आम्ही गेलो नी  स्मशानविधी पुरा करून नंबर लागेतो मध्यरात्र उलटून गेलेली होती. आम्ही एक वाजल्या नंतर   परतीला लागलो. ट्रेन बंद झालेल्या होत्या त्यांचा कराजा नावाचा चुलतभाऊ म्हणाला की,“अरे निळू,मी गडबडीत  पैसे घ्यायलाच विसरलो माझ्या खिशात फक्त दहा रुपये आहेत. तेव्हा आपण टॅक्सी करून बॉम्बे सेण्ट्रलला  माझ्या  रुमवर जावूया. तुम्ही तिथे आराम करा नी  सकाळी गोरेगावला जा.”       ( क्रमश: )