College Romance in Marathi Love Stories by shwet sawali books and stories PDF | College Romance

Featured Books
  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

  • उड़ान (1)

    तीस साल की दिव्या, श्वेत साड़ी में लिपटी एक ऐसी लड़की, जिसके क...

Categories
Share

College Romance

श्रेयस हायस्कूल मध्ये पहिला आलेला मुलगा . आपला मुलगा खूप शिकावा अशी त्याच्या बाबांची इच्छा आणि त्यात मुंबईच्या एका नामांकित विद्यापीठात प्रवेश घ्यायचे असे त्याच्या बाबांचे स्वप्न . दिसायला थोडा देखणा डोळे चमकदार सावळ्या रंग कोकणचा असलेला शेतीत राबणाऱ्या बापाचा मुलगा . शेतीत काम करत करत शारीरिक दृष्ट्या मजबूत असा तो . सहजा कोणाशी न बोलणारा पण बोलायला लागला की मन मोकळं करणारा .
                 कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्या कामात स्वतःकडून जेवढं होईल तेवढी मेहनत करणारा . घरची परिस्थिती ठीक ठाक . लहानपणीच आई सोडून गेली . मोठ्या बहिणीने च आईचे प्रेम दिले .
                 बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी . मुंबईमध्ये हॉस्टेलमध्ये जेव्हा तो प्रवेश घ्यायला जातो . प्रवेश मान्य झालेला असल्याकारणाने होस्टेलच्या एका रूम मध्ये राहण्याचा त्याचा निर्णय असतो . त्याचा रूम पार्टनर म्हणून रितेश नावाचा एक मस्तीखोर मुलगा असतो . त्यांच्यामध्ये फक्त नावापुरतीच ओळख होते श्रेयस आणि रितेश एकमेकांशी जास्त ओळख काढत नाहीत . रात्र झाली असल्याकारणाने आणि दोघेही प्रवास करून आल्यामुळे ते दोघेही झोपतात .
                     कॉलेजचा पहिला दिवस दोघंही एकत्र कॉलेजला जाण्याचे ठरवतात. दोघे एवढं मोठं कॉलेज बघून खूप खुश असतात . एकमेकांशी ते ओळख करायला सुरुवात करतात .
रितेश श्रेयसला विचारतो ‌‌, “गाव कोणतं तुझं ?”
 श्रेयस उत्तर देतो , “ कोकण !”
रितेश त्याला पुन्हा विचारतो , “ मग घरी कोण कोण आहे तुझ्या ? ”
श्रेयस उत्तर देतो , “ बाबा बहीण आणि मी ! आणि तुझ्या ? ”
रितेश त्याला म्हणतो , “ आई बाबा आजी आणि मी ”
श्रेयस म्हणतो “ वा रे ! एकटा आहेस मज्जा असेल मग तुझी ! ”
यावर रितेश म्हणतो “ कसली मजा !! सगळी कामं एकट्याने करायला लागतात !”
 आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसतात…
दोघांची एकमेकांशी थोडी ओळख होते.
              रितेशाचा वर्ग वेगळा असल्याने तो त्याच्या वर्गात जातो . तर श्रेयसचे लेक्चर नसल्याकारणाने तो ग्रंथालयात जातो . ग्रंथालयात खूप पुस्तके असतात सहजच तो एक पुस्तक उचलतो आणि वाचायला घेतो . वाचता वाचता कधी त्याचे दोन तास जातात त्याला समजत नाही . त्याला ते पुस्तक खूप आवडतं . त्याच पहिल्याच लेक्चरला ते पुस्तक वाचत बसल्या कारणाने दांडी होते की काय अस त्याला वाटतं आणि तो लेक्चरला जायला निघतो . एका तासाचा लेक्चर आणि तो शेवटची 15 मिनिटं वर्गात पोहोचतो .
सर त्याला म्हणतात , “ कॉलेजच्या पहिल्याच लेक्चरला एवढा उशीर !! आता काही कॉलेजच्या लेक्चरला तुम्ही वेळेवर बसाल असं वाटत नाही. ”
असं बोलून त्याला टोमणा मारतात आणि डोळे मोठे करून सर त्याच्याकडे बघतात .
श्रेयस “ माफ करा सर पुन्हा असं नाही होणार !”
                हायस्कूलमध्ये असताना कोणतेच त्याला असं बोलले नव्हते . त्याला त्या सरांचं बोलणं एकूण खूप वाईट वाटतं . किती असलेली सर्व मुलं त्याच्याकडे बघून गालातच हसत असतात काहीतर मोठ्याने हसतात .
             सलग तीन लेक्चर झाल्यानंतर तो पुन्हा ग्रंथालयात जातो आणि अर्धवट राहिलेला ते पुस्तक पुन्हा वाचतो हे पुस्तक त्याला अतिशय आवडतं . गावाकडे ग्रंथालय होतं पण तिथे सगळी पुस्तके वाचायला मिळत नव्हती . आणि उठा मोठं ग्रंथालय बघून तो आनंदी होतो . त्याला असं वाटतं की हे पुस्तक आपल्याकडे असाव . त्यातले शब्द त्यातल्या भावना त्याला आपल्याशा वाटतात . एखादं चांगलं पुस्तक वाचल्यावर जसं एखाद्याला वाटेल की त्या लेखकाशी आपण भेटावं तसंच काहीतरी श्रेयसला वाटत होतं .
              पण पुस्तकाचा कोणीतरी अज्ञात होता . त्या लेखकाच्या नावाच्या इथे स्वप्नांची दुनिया असं लिहिलं होतं . श्रेयस पुस्तक घेऊन ग्रंथालया बाहेर पडतो .
               होस्टेलला रितेश स्वतःच्या वेळेवर झोपलेला असतो तो श्रेयसला म्हणतो,
“ श्रेयस तू खूप बिझी असतोस एवढा कुठे बिझी असतोस की तुला ओरडा पडावा ?? ”
श्रेयस त्याला हसून म्हणतो “असं काही नाही रे !!”
रितेश म्हणतो त्याला , “होय होय भावा सगळे आधी असंच म्हणतात असं काही नाही रे ! असं काही नाही रे ! आणि मग समजत की आपला भाव तर कुठच्यातरी मुलीच्या मागे आहे !”
असं बोलून रितेश हसायला लागतो .
श्रेयस मनातच स्वतःला म्हणतो , “आता याला मी काय सांगू की मी पुस्तकाच्या मागे लागलोय ” आणि गालातच हसतो.
                   रितेश लॅपटॉप वरती स्वतःचा काम करत असतो . श्रेयस स्वतःची काम उरकून रात्री instagram facebook वापरतो . नाही त्याच्या मनात काय येतं आणि तो त्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल आणि त्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा विचार करतो .
                    त्याला एक अकाउंट मिळतं ज्या त्या पुस्तकाच्या निगडित काही माहिती असते पण त्याला त्या लेखकाची माहिती मिळत नाही . काही वेळ तू अकाउंट स्क्रोल करतो आणि त्याला त्या लेखकास संबंधित अजून काही पुस्तके मिळतात . आणि तो त्याच विचारात झोपतो .
                  दुसऱ्या दिवशी सकाळी रितेश श्रेयस ला विचारतो ,“ येतोस काय रे माझ्यासोबत चल सोबत जाऊ ”
श्रेयस ,“ थांब आलोच ”
सगळं आवरून रितेश आणि श्रेयस कॉलेजला जातात . रितेश स्वतःच्या लेक्चरला जातो . श्रेयस ग्रंथालयात जातो . आणि पुन्हा ग्रंथालयात तो त्याच लेखकाचा दुसरा पुस्तक वाचतो . आणि मग पुन्हा लेक्चरला उशीर होतो .
सर आज पुन्हा त्याला बोलतात ,“ वा ! आजही उशीर ?”
 काही दिवस हे असंच चालतं.
                 काही दिवस होऊन जातात मग त्याला एक गोष्ट जाणवते की त्या पुस्तकातला एकूण एक शब्द हा आपल्या मनात घर करून बसतोय त्याची त्या लेखकाशी भेटण्याचे उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालले या पुस्तकांमधला त्याला प्रत्येक शब्द जवळचा वाटायला लागलाय .
            ‌ एक दिवस कॉलेजला जात असताना एक मुलगी कॉलेजमध्ये एका मुलाला छेडताना दिसते त्याला ते पाहून चीड येते . श्रेयस अर्धवट पाहून लगेच आपल्या मनात असा विचार आणतो किती मुलगी त्या मुलाशी चुकीचा वागत आहे त्याला त्याचा आधीचा प्रसंग माहीतच नसतो . त्या मुलीचं वागणं त्याला अतिशय टोचतं ती दिसायला सुंदर देखणी मॉडर्न कपडे आणि बोलायला विलास त्याला तिची एवढी चीट येते की तो जाऊन प्राचार्यांकडे तिची तक्रार करतो . आणि तिथून बाहेर येतो .
              प्राचार्य तिला बोलावून घेतात आणि तिला विचारतात की नक्की काय झालं आहे . ती मुलगी सर्व प्रकार प्राचार्यांना सांगते . प्राचार्य योग्य ती पडताळणी करून त्या मुलीला जायला सांगतात .
              श्रेयस बाहेरच थांबलेला असतो . ती बाहेर येते आणि श्रेयस कडे रागात बघते आणि तिथून निघून जाते तिला माहित नसतं की श्रेयस ने नाव सांगितले प्राचार्यांकडे . पण ती ओळखून जाते श्रेयस च्या नजरेवरून ती श्रेयसनेच तिचं नाव प्राचार्यांकडे सांगितलं . तिची नजर श्रेयसला थोडी बेचैन करते .
             एवढ्या दिवसात श्रेयस सोबत पहिल्यांदा असं घडतं ते इकडून तिकडून तिचं नाव शोधून काढतो मग त्याला समजतं की तिचं नाव स्वराली . सुद्धा स्वरालीच नाव होतं . तिचं नाव ऐकताच त्याला तिच्या बहिणीच्या आठवण येते पण तिच्यात आणि त्याच्यात बहिणीच्या खूप फरक होता . त्याची बहिण साधी राहणारी . आणि स्वराली ती स्कर्ट आणि टॉप वापरणारी मुलगी होती . काही क्षणासाठी श्रेयसला यावर हसू येत .
            मग तो ग्रंथालयातून एक पुस्तक वाचायला घ्यायला जातो . पण ग्रंथालयात गेल्यावर त्याला समजतं की आपण ज्या लेखकाची पुस्तक वाचतो त्याचा एक नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे मग तो याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तो इंस्टाग्राम पेज बघतो . त्याला त्या पुस्तकाचा काही भाग इंस्टाग्राम पेजवर दिसतो त्याला तो खूप आवडतो.
                 पुढच्या दिवशी तो कॅन्टीनला जेव्हा बसलेला असतो . तेव्हा त्या टेबलावरती एक वही सापडते . त्या वहीवर ना कोणाचं नाव ना काही माहिती ; ती वही तो स्वतःजवळ ठेवतो आणि लेक्चरला जातो लेक्चर संपल्यावर ग्रंथाला जातो . थोडा वेळ एक पुस्तक वाचतो आणि नंतर त्याला ती वही आठवते . जी त्याच्या बॅगेतच असते . ती वही तो बॅगेतून बाहेर काढतो आणि वाचायला लागतो . तो एकाच दिवशी पूर्ण वही वाचून काढतो आणि मग ती वही बॅगेत भरून ठेवतो . मग हॉस्टेलला परत येतो .
                 सगळं आवरून जेव्हा तो झोपायला जातो तेव्हा तो वही बद्दल विचार करायला लागतो . त्याला ती वही वाचून त्या इंस्टाग्राम पेज ची आठवण येते यावर नवीन पुस्तकाचा संदर्भ होता . तेच लिखाण , तीच भाषा , आणि जे काही त्या इंस्टाग्राम फ्रीजवर लिहिलेलं होतं ते सगळं या वहीत होतं . त्याला काही क्षण काही समजलं नाही . थोडा वेळ विचार केल्या वर त्याला वाटतं की ; ‘स्वप्नांची दुनिया त्या पुस्तकाचा लेखक आपल्या कॉलेजमधला कोणता शिक्षक तर नाही !!’ थोडा वेळ तो भ्रमात राहतो . त्याची उत्सुकता वाढते . तू विचार करायला लागतो त्या लेखकाची लाईफ कशी असेल ? तू दिसायला कसा असेल ? आणि महत्त्वाचं म्हणजे , मी जसं त्याच्या पुस्तकातून त्या लेखकाबद्दल विचार करतोय अगदी तसाच तो लेखक असेल का ? आणि कॅन्टीन मध्ये विसरली ती वही तो लेखक शोधत तर नसेल ना ? अनेक प्रश्न त्याला सतावत होते . त्याचं लागलेलं त्या पुस्तकांबद्दल च वेड आणि लेखकाशी भेटण्याची इच्छा जरा वेगळीच होती .
                    त्याच दिवशी पुस्तक प्रकाशित होतं . तू पूर्ण पुस्तक एका दिवसात वाचून काढतो . आणि काय आश्चर्य वहीत लिहिलेला प्रत्येक शब्द त्या पुस्तकात तसाच होता . श्रेयस यावर खूप विचार करतो . त्याच्या मनातले जे प्रश्न होते ते अजून ठळक होतात त्याच्या मनात असलेला घोळ त्याला स्वतःच्याच कानात ऐकायला येतो .
                  तो मनात विचार करतो या पुस्तकाचा लेखक आहे असं मी समजतो पण ती लेखिका असली तर ?? मला तर त्याला बघावसं वाटतंय !! असे विचार करून पुढच्या दिवशी पुन्हा कॅन्टीनला जायचंय असं तो ठरवतो .
              दुसऱ्या दिवशी तो कॅन्टीनला जातो . आणि त्याच टेबलावरती बसतो जिथे त्याला ती वही मिळते . थोडा वेळ वाट बघतो . पण तिथे कोणी येत नाही . थोड्यावेळाने किती स्वराली येते . रागात एकदा श्रेयस कडे बघते . तिला अजूनच राग येतो .
              श्रेयस ला तिच्याकडे बघून त्या दिवशीचा सगळा प्रकार आठवला आणि श्रेयस च्या मनात नसतानाही तो तिच्याकडे बघून हसला . हे पाहून स्वराला जरा रागच आला आणि रागात श्रेयस जवळ येऊन त्याला विचारते ,
“त्यादिवशी त्याने प्राचार्यांकडे अशी का तक्रार केली ?”
 श्रेयस म्हणाला “ त्या दिवशी तू त्या मुलाची छेड काढत होतीस मग मी काय चुकीचं केलं !”
“ हो तू कुठे रे काही चुकीचं करशील ” स्वराली त्याला म्हणाली .
श्रेयस तिला टोमणा मारत म्हणाला “ हो मी काही नाही करत चुकीचं तुझ्यासारख !” पण श्रेयस ला कुठे माहीत होतं की हा टोमणा त्यालाच भारी पडणार आहे .
ती म्हणाली त्याला “ तू त्या दिवशी काय एवढं बघितलं जे तू जाऊन प्राचार्यांकडे सांगितलं त्या मुलाने माझ्या ड्रेस वरती मुद्दामून पेनाची शाई मारली मग मी अजून काय केलं पाहिजे होतं . तू ते लांबून बघितलस म्हणून तुला ते चुकीचं वाटलं . आणि जर माझ्या जागी तू असतास तर तुही हेच केलं असतस….”
 शेवटी मग श्रेयस चा टोमणा श्रेयस वरतीच भारी पडला असं स्वरालीला नाही त्याला स्वतःला वाटलं .
श्रेयस म्हणाला तिला “ माफ कर जरा मला जरा चुकीचा वागलो ! ”
स्वराली म्हणाली , “तुला मी जरा माफ करू माझ्या मनात तर तुझा खून करायची इच्छा आहे ?” करू का ?
एवढा बोलून स्वराली गालातच हसायला लागली . “ठीक आहे माहित आहे मला की तू चुकून केलंस पण जेणेकरून एखाद्याने पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही काम करू नये स्वराली त्याला म्हणाली .
श्रेयसला तरच लाज वाटायला लागली . स्वराली तिथून गेली दुसऱ्या टेबलावर बसली . पण श्रेयस लाजेने तिच्याकडे वळून वळून पाहत होता .
श्रेयस मनातच स्वतःला दोष देत होता . आणि कपाळावर हात मारत स्वतःलाच म्हटला ,“ वेडाच आहे मी नाही नाही या पुस्तकाने मला वेड बनवलय .”
                  श्रेयस ने अजून काही वेळ वाट बघितली पण ती वही घ्यायला कोणी काही तिथे आले नाही . श्रेयस्ने याबद्दल मस्ती मजेत आपल्या मित्रांकडे ही विचारपूस केली पण तरीही त्याला त्याच्याबद्दल काहीच समजले नाही . त्यांनी शिक्षकांकडेही विचारपूस केली तिथेही त्याला काही माहिती मिळाली नाही .
               काही दिवसांनी त्याबद्दल त्या पुस्तकाच्या लेखकाला समजतं की आपल्याबद्दल कोणीतरी विचारपूस करत आहे . लेखक घरी जाऊन इंस्टाग्राम वरती आपले डीएम तपासतात . त्यात त्यांना श्रेयस चे खूप सारे मेसेज दिसतात.
‘ ज्यामध्ये त्याने लिहिलं असतं की तुमची वही जी तुम्ही कॅन्टीनला विसरलेला ती माझ्याकडे आहे आणि मी तुमच्या पुस्तकांसाठी खूप वेडा आहे वेड लागला आहे मला तुमच्या पुस्तकांच ! ’
डीएम मध्ये श्रेयस ला उत्तर मिळते की ‘ मी लेखक नाही लेखिका आहे . मला छान वाटलं की तुम्हाला माझी पुस्तके आवडतात पण कोणीही इतकं ही वेड लावून घेऊ नये . ’
श्रेयसला यावर काय उत्तर द्यावे समजलं नाही तो काहीच उत्तर देत नाही आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय ती एखादी मुलगी आहे हे ऐकल्यावर कदाचित तो गोंधळलेला असावा . त्याच्या हेही ध्यानात येत नाही की आपण विचारवं की मी तुमची वही तुम्हाला कशी परत करू ? तो काहीच बोलत नाही .
              लेखिकेला काहीच उत्तर मिळत नाही . आणि मग ती पुन्हा स्वतःच्या कामाला लागते .
             पुढच्या दिवशी श्रेयस पुन्हा कॉलेजच्या काहीतरी मध्ये बसलेला असतो . त्याला स्वरालीची माफी मागायची असते . पण तिथे काही स्वराली येत नाही . कंटाळून तो लेक्चरला जातो . लेक्चरला स्वराली बसलेली असते . ते पाहून श्रेयसच्या मनात असा विचार येतो , आणि मी वाट बघत होतो . सरांकडून चार शब्द रोज ऐकायचे याची श्रेयसला जणू काही सवयच लागले . नेहमी ओरडा खात असतो . आणि तेच त्याच्याकडे पाहून सर्व हसतात . पण श्रेयसला काही फरक नाही पडत . पण आज तिथे स्वराली होती आणि ते पाहून श्रेयसला आज थोडी लाज वाटली . कदाचित श्रेयसने कधी नोटीस केला नसावं की स्वराली त्याच्या वर्गात आहे .
              लेक्चर झाल्यावर सर जातात . श्रेयस स्वरालीला थांबवतो आणि तिची माफी मागतो . स्वराली त्याला माफ करते आणि म्हणते ,
 “ होतं रे असं कॉलेजला तर आहोत पण मला हे समजत नाही तू इतका कुठे बिझी असतोस की तू पहिले लेक्चर अटेंड करू शकत नाहीस . कुठे जॉबला वगैरे जातोस का ? की कोणत्या मुलीचा विषय आहे ? नक्की विषय काय आहे ? की मित्रांसोबत उनाडकया करत असतोस ?” एकाच श्वासात स्वराली त्याला एवढे प्रश्न विचारते . आणि गालातच हसते . कोणीतरी मुलगी आपल्यावर हसत आहे हे पाहून त्याला कसंतरी वाटतं .आणि ते कसं तरी म्हणजे वाईट असंही नाही .
               श्रेयस आणि स्वराली यांची थोडी ओळख होते . श्रेयस स्वतःबद्दल तिला सगळं काही सांगतो आणि जेव्हा स्वरालीला सांगण्याची वेळ येते तोपर्यंत ते होस्टेलच्या बाहेर आलेले असतात मग ते दोघे स्वतः स्वतःच्या होस्टेलला जातात . दोघांचाही हॉस्टेल जरा जवळच होतं . जात असताना एकमेकांना ते बाय करतात . चेहऱ्यावरती थोड हसू दोघांच्या .
               पुढील भाग काही दिवसातच......