सिंदूरचं ऑपरेशन सिंदूर
महिला.... एक घरातील लक्ष्मी. खरं तर हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांना घरितील लक्ष्मी मानलं जातं. मग ती कोणत्याही जातीतील वा धर्मातील स्री का असेना. हाच सन्मान जोपासला आहे भारतात. जो टुर्वी अखंड हिंदुस्थान होता. पुर्वीच्या महिला पुर्वी हिंदुस्थानात असतांना युद्धात पती मरण पावताच जोहार करीत होत्या. परंतु परकिय मुस्लीम सत्तेच्या नादात लागत नव्हत्या वा त्यांच्या अत्याचाराच्या शिकार होत नव्हत्या. पहलगाम मधील घटना अशीच होती. पहलगाम घटनेत महिलांचे कुंकू मिटविण्यात आले होते. सोबतच म्हणण्यात आलं की तुम्हाला तुमचे कुंकू का मिटवले गेले. असं जर मोदींनी विचारलं तर सांगा की खुशाल सांगा की हे आंतकवाद्यांनीच केलंय. पहलगाम घटना. ज्या घटनेत पर्यटक पर्यटनाला आलेले होते. ज्यात हिंदू होते. काही मुस्लीम होते. त्यामध्ये काही आतंकवाद्यांनी या सर्व पर्यटकांना घेरलं. म्हटलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम. ज्यांनी हिंदू आहोत असं अभिमानानं सांगीतलं. त्यांना जागीच उडवलं आणि ज्यांनी मुस्लीम सांगीतलं, त्यांना कलमा वाचायला लावल्या अर्थात म्हणायला लावल्या. यात जे हिंदूच होते, परंतु आपला जीव वाचविण्यासाठी जे खोटे बोलले होते व मुस्लीम सांगीतलं होतं. त्यांना मुस्लीम कोणत्या कलमा पठन करतात. हे माहीत नसल्यानं ते कलमा पठन करु शकले नाहीत. ज्यातून शंका निर्माण होवून त्यांचाही त्यांच्या पत्नीच्या डोळ्यासमोर अंत करण्यात आला व एका हिंदू प्रजातीला दाखविण्यात आलं की या विधवा झालेल्या महिलांना कोणी स्विकार करीत नसतील तर आम्ही त्यांचा स्विकार करु. जसे आमचे पुर्वज असलेले बादशाहा करीत होते. परंतु त्यांना भारताची ताकद माहीत नव्हती असंच वाटतं व ही आंतकवादी घटना एक ठिणगी छरली ऑपरेशन सिंदूर घडविण्यासाठी. आम्ही भारत देशात राहतो व आमचा भारत देश सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे ज्याप्रमाणे हिंदूंचा आदर आहे, त्याप्रमाणेच मुस्लिमांचाही आदर आहे. हा भारत देश हिंदूंना जसे संरक्षण देतो. त्यांचा जसा सन्मान करतो. तेवढाच सन्मान हा मुस्लिमांचाही करतो. तसाच तेवढाच सन्मान सर्व धर्मियांचाही करतो. भारतात पुर्वीपासूनच हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, पारशी असे वेगवेगळ्या धर्माची मंडळी राहात असतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास हे सर्व धर्मीय अतिशय आनंदानं व गुण्यागोविंदानं राहात असतात. असे असतांना पहलगाम घटना या देशात होणे म्हणजेच देशातील हिंदू मुस्लीम एकतेवर प्रश्नचिन्हं निर्माण होणे होय. तसं पहलगाम घटनेनंतर घडलंही. हे एका फेसबुकवरील व्हिडीओ वरुन दिसून आलं. फेसबुक....... ज्या फेसबुकला जगातील लाखो लोकं मानतात. त्यावर असाच पहलगाम घटनेनंतर एक व्हिडीओ गाजला. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी भारतीय झेंडे जमीनीवर ठेवून त्या झेंड्यांना पायदळी तुडवलं. त्यातील काही झेंडे जाळले. हा अपमान होता. तो अपमान केवळ तिरंगी झेंड्यांचा नाही तर तो अपमान भारताचाच होता. त्या बदल्यात भारतीयांनी पाकिस्तानचे झेंडे जमीनीवर चिकटवले व त्याला पायदळी तुडविण्याचा तमाम भारतीयांनी प्रयत्न केला. परंतु तो पाकिस्तानचा अपमान नाही तर आपला अपमान आहे असं वाटून काही स्वतःला भारतीय न मानणाऱ्या मुस्लिमांनी ते झेंडे हातानं ओरबाडून काढले. यावरुन विचार येतो की जी मुस्लीम मंडळी भारतात राहतात व पाकिस्तानचे झेंडे ओरबाडून काढतात. पाकिस्तानी झेंड्यांचा अपमान होतो म्हणून नव्हे तर पाकिस्तानचा अपमान होत आहे म्हणून. खरं तर हा भारत देश ज्या आपल्या देशात राहणाऱ्या तमाम मुस्लीम धर्मीय लोकांना पोषतो. त्यांच्या जेवनाची, कपड्यालत्याची व्यवस्था करतो. त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करतो. त्यांना राशन दुकानातून अन्नधान्य पुरवतो. त्या मुस्लीम समुदायांनी पाकिस्तानचे गोडवे का गावेत? हा प्रश्न भारतातील सर्व लोकांसमोर पडतो. अन् मग विचार येतो की आपण पाकिस्तानचे लाड का पुरवावेत. पहलगाम घटनेमध्ये जे आतंकवादी आले. ते आलेच कसे? कदाचीत भारतातीलच काही फुटीरवादी लोकांनी त्यांना भारतात आणले असावे. ज्यातून पहलगाम घटना झाली व तमाम सव्वीस महिलांच्या पतींची हत्या केल्या गेली. ऑपरेशन सिंदूर. हे मोदी साहेबांनी नाही तर तमाम भारतीयांनी घडवून आणलेली घटना. ही घटना व्हायलाच हवी होती. कारण जबाव द्यायलाच हवा होता. त्याशिवाय पाकिस्तान दबला नसता. कारण नियम आहे. आपण शत्रूला घाबरत राहिलो तर तोच शत्रू एक ना एक दिवस आपल्याला गिळंकृत करणारच. परंतु त्याला जर आपली ताकद दाखवली तर तो आपल्या वाट्यालाही जात नाही. हेच ऑपरेशन सिंदूरवरुन दिसून आलं व त्या त्या तमाम पाकिस्तानच्या बाजूने वागणाऱ्या व भारतातच राहणाऱ्या लोकांनाही एक चपराक मिळाली आहे की आता आपण भारतविरोधी जास्त बोलू नये. भारताच्या विरोधी वागू नये. आपण भारतातच राहतो आणि भारताचीच मालमत्ता खातो. मग भारताकडूनच बोलायरा हवं आणि भारताला ज्या घटना शोभतील. त्याच घटना करायला हव्यात. उगाचंच पाकिस्तानच्या अनैतिक कृत्याचं समर्थन करुन पाकिस्तानचा जयजयकार करु नये. नाहीतर काल पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर केलं. तोच भारत उद्या आपलंही ऑपरेशन करेल व त्याला नवीन वेगळंच नाव देईल. ऑपरेशन स्पीक किंवा कृत्य. विशेष सांगायचं झाल्यास ऑपरेशन सिंदूर होणं गरजेचं होतं. कारण ते तमाम भारतीयच होते की ज्यांचं कुंकू पुसलं गेलं. त्यांचा कचणताच गुन्हा नव्हता. गुन्हा एवढाच होता की ते फिरायला गेले. गुन्हा एवढाच होता की त्यांना कलमा पठन करता आल्या नाहीत. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नव्हे तर हत्या. जर ऑपरेशन सिंदूर झालं नसतं तर पाकिस्ताननं एक नवी डकार दिली असती व म्हणत सुटला असता की जो भारत स्वतःला सक्षम समजतो. त्या भारतानं आमचं केलं तरी काय? महत्वपुर्ण बाब ही आमचा भारत हा सक्षम आहे व तो सहिष्णू आणि शांत आहे. याचा अर्थ तो प्रत्येक वेळेस चूप बसतो असू नाही. तोही वीटचं उत्तर दगडानं द्यायचं जाणतोच. ऑपरेशन सिंदूर ही अशीच बदल्याची घटना. वीटचं उत्तर दगडांनी देणारी घटना. ज्यात भारताचा विजय झाला. या घटनेनं केवळ पाकिस्तानलाच चपराक मिळाली असे नाही तर या घटनेनं भारतातच राहणाऱ्या तमाम पाकिस्तानाचे समर्थन करणाऱ्या लोकांनाही चपराक मिळाली. जर भारतात राहायचे असेल तर भारताचे बनून राहा. अन्यथा पाकिस्तानात जावून राहा. महत्वपुर्ण बाब ही की भारतात जर राहायचं असेल तर भारताचं बनून राहायला हवं. भारताचेच गोडवे गायला हवे. भारताकडे वाकडी नजर टाकू नये. जर वाकडी नजर टाकाल तर आम्ही ऑपरेशन सिंदूर नक्कीच करु. सिंदूरचा बदला ऑपरेशन सिंदूरनंच करु. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०