ऑपरेशन सिंदूरच्या निमित्याने
कुंकूसाठी बुद्ध नाही, युद्धच हवं होतं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण तो उपक्रमच तसा होता. म्हणतात की भारतीय स्वातंत्र्य हे शांती व अहिंसेच्या मार्गानं मिळालय. हे जरी सगळं बरोबर असलं तरी दहशतवाद थांबवणं हे काही शांतीचं काम नाही. ते क्रांतीचं काम आहे. तसं पाहिल्यास भारतीय स्वातंत्र्य देखील शांतीनं मिळालेलं नाही. ते मिळालय क्रांतीच्याच मार्गानं.
स्वातंत्र्याबद्दल सांगायचं झाल्यास आपल्याला १९४२ चा काळ आठवावा लागेल. ज्यावेळेस चलेजावचं आंदोलन पुकारलं गेलं होतं. ज्यात महात्मा गांधींनी स्वतः म्हटलं होतं की येदील प्रत्येक व्यक्ती हा नेता आहे व नेता समजूनच त्यांनी कार्य करावं. कदाचीत आम्हाला म्हणजेच नेत्यांना इंग्रज पकडून तुरुंगातही टाकतील. तेव्हा इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी आपल्याला स्वतः नेते बनावं लागेल.
ते महात्मा गांधीचं बोलणं. ते हिंसेला बळ देणारं नसलं तरी त्यातून बोध घेवून लोकांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या. पोलीस ठाणे जाळले. काही उठाव केले. त्यातच काही इंग्रज अधिकारी वर्गाची हत्या केली. हा हिंसाचारच होता की ज्या गोष्टीनं इंग्रज घायाळ झाले होते. त्यांना वाटत होतं की आता ही वेळ या देशात राहण्याची नाही तर या देशातील लोकांना त्यांचा देश परत देण्याची आहे. नाहीतर ही जनता आपल्याला सोडणार नाही. त्यातच दुसरं महायुद्ध झालं होतं व त्यातून इंग्लड हताशही झाला होता. कदाचीत दुसरं महायुद्ध झालं नसतं तर इंग्रज सक्षम राहिले असते व त्यांनी आपल्याला कधीच स्वातंत्र्य दिलं नसतं.
भारत शांतीनं नाही तर क्रांतीनंच स्वतंत्र झाला. याला आणखी एक कारण असं होतं, ते म्हणजे आझाद हिंद फौज. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली होती व त्या माध्यमातूनही आपल्या देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मागून घेता आलं. चलेजावचा उठाव, दुसरं महायुद्ध, आझाद हिंद फौज या तिन्ही गोष्टींचा परिणाम की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. यात तिन्ही घटना क्रांतीकारीच होत्या. कोणि मानो अगर न मानो. फरक एवढाच की क्रांतीच्या मार्गाने जातांना निष्पाप जीव जातात. ज्यांचा दोष नसतो, त्यांचाही जीव जात असतो. परंतु कुणी साध्या बोलण्यानं ऐकत नसेल तर काय करावे? त्यासाठी क्रांतीच बरी की नाही?
आपल्याला माहितच आहे कलिंग युद्ध. त्यात जो रक्तपात झाला. त्यानंतर सम्राट अशोकांनी शस्र टाकली व ते बुद्धमय बनले. त्यानंतर त्यांनी धर्मप्रसाराचं काम केलं. ज्यात त्यांची मुलगी संघमित्रा व महेंद्र श्रीलंका, म्यानमार, थायंलंड, चीन, कंबोडिया, लाओस व कित्येक देशात पोहोचले. त्यांनी धर्मप्रसार केला. परंतु पुढं जेव्हा त्यांची सत्ता गेली. तेव्हा काय झालं. त्यावेळेस कित्येक बौद्ध भिख्खूंना कापून काढलं गेलं. जर त्यावेळेसच बौद्ध भिख्खू प्रसंगी युद्धाला मानणारे असते तर आज बौद्ध धम्म हा पहिल्याच क्रमांकावर असता. हे विसरता येत नाही. तसेच भारत स्वतंत्र झाल्यावर जी परिस्थिती उद्भवली. त्याही परिस्थितीचा आढावा घेतला असता असं आढळून येतं की ती परिस्थिती युद्धाशिवाय निवळणं शक्य नव्हती. त्यातच युद्ध केलं गेलं. आपल्याला माहितच असेल की हैद्राबाद, जुनागढ व काश्मीरमधील काही भाग हा युद्धानंच मिळालेला आहे. तेथील प्रश्न हा युद्धानंच सोडवल्या गेला आहे. तेही सरदार वल्लभभाईच्या नेतृत्वात. आज जो पाकव्याप्त काश्मीर दिसतो ना. तोही आपण युद्धानं जिंकला होता. त्याचवेळेस शांततेनं तो सोडला नसता तर आज पाकव्याप्त काश्मीर आतंकवाद्याच्या लपायचा अड्डा झाला नसता, ना तिथे कुंकू प्रकरण घडलं असतं ना आज ऑपरेशन सिंदूर झालं असतं. तसाच सन १९७१ मध्ये पाणीवाटपावरुन शांतेतेचा शिमला करार झाला नसता तर पाकला एवढी मस्ती चढलीच नसती. आज पाकिस्ताननं आतंकवाद्यांच्या पडद्याआड लपून जी कुंकू पुसण्यासारखी कृती केली ना. तिही पाकिस्तानला करता आली नसती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं आतंकवाद्यांची आतंकवादी स्थळं उध्वस्त केली. हा क्रांतीचा एक नमूनाच आहे. जर याही ठिकाणी आपण थी कृती शांततेच्या मार्गानंच पाहात बसलो असतो पूर्वीप्रमाणेच, तर थो दिवस दूर नव्हता की पाकिस्तान आपल्या देशावर हावी झाला असता. त्यानं विचार केला असता की हा काय भारत, आपलं काय वाकडे करु शकतो. आजपर्यंत आफण याच प्रश्नावर गप्प राहिलो. म्हणूनच पाकिस्तानची हिंमत वाढत गेली. ज्यातून कित्येक वेळेस आपल्या भारतीय सैन्याचे व नागरिकांचे कित्येक बळी गेले. म्हणूनच जरब जर बसवायची असेल तर युद्ध धा क्रांती हाच महत्वपुर्ण पर्याय आहे. जिथं शांतीनं काहीच निष्पन्न होत नाही. तिथं क्रांती हवीच असते ही सत्य बाब आहे. तेच आज आपण केलेले आहे ऑपरेशन सिंदूर करुन.
आपल्याला माहितच असेल आणि त्याला इतिहास साक्षीला आहे. आपण भारतीय सहिषाणू असून आपला सहसा हिंसा हातात घेत नाही. तशीच आपल्यात कुणालाही अगदी सहज माफ करण्याची शक्ती आहे आणि आपण माफही करतो. कारण आपल्या देशातील मातीच अशी आहे की त्या मातीत सहनशीलतेचं तत्व आहे. परंतु इतर देशातील लोकं आपल्याला सहजासहजी माफ करीत नाहीत. कारण त्यांची बनावटच तशा स्वरुपाची आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास राजा दाहारचं देवू. आपला देश ज्यावेळेस अखंड हिंदुस्थान होता, त्यावेळेस काश्मीरच्या भागात राजा दाहिर राज्य करीत होता. त्यावेळेस मोहम्मद बिन कासीम नावाच्या अरबी व्यक्तीनं राजा दाहिरवर बारा ते चौदा वेळेस आक्रमण केले. त्या प्रत्येक वेळेस राछा दाहिर युद्धात जिंकल. परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस मोहम्मद बिन कासीमला माफ करुन सोडून दिलं. परंतु जेव्हा एका लढाईत राजा दाहिरचा पराभव झाला. तेव्हा तह झाला नाही वा मोहम्मद बिन कासीमनं एवढे वेळेस युद्धात जिंकूनही माफ करणाऱ्या आपल्या राजाला माफ केलं नाही. त्यांची हत्या केली. तेच घडलं पृथ्वीराज चव्हाणच्या काळात. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस दिल्लीच्या तख्तावर राजे म्हणून बसले. तेव्हा मोहम्मद घोरीनं भारतावर सतरा वेळेस स्वाऱ्या केल्या. परंतु आपल्या देशातील याच वीरपुत्रानं त्याला माफ केलं. परंतु जेव्हा एका लढाईत पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला. तेव्हा जिंकूनसी सतरा वेळेस माफ करणाऱ्या राजाला मोहम्मद घोरी आपल्या देशात घेवून गेला. त्यांना नजरकैदेत टाकलं. त्यानंतर त्यांचे डोळे फोडले. त्यांच्यावर अत्याचार केले व त्यांची हत्याही करुन टाकली.
पहलगामची घटना काहीशी अशीच. याही घटनेत एक पाऊल मागं टाकून संघर्षविराम झाला. आपण भारतीय सहनशील स्वभावाचे असल्याने आपण आपल्या नेहमीच्याच सवयीप्रमाणे याही वेळेस पाकिस्तानला त्यांच्या कृतीवर उदार मनानं पांघरुण घालून माफही केलं. परंतु यदाकदाचित उद्या पाकिस्तानचे चांगले दिवस आले आणि त्यांनी केलेल्या लढाईत आपण यदाकदाचित हारलोच. तर पाकिस्तानही आपल्याला माफ करेल काय की राजा दाहिर व पृथ्वीराज चव्हाणची जी हत्या झाली. तशीच हत्या आपल्या संबंध भारतीयांची होवू शकेल. एवढंच ऑपरेशन सिंदूरप्रसंगी सांगणं आहे. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०