विद्यार्थी विकास ; शिक्षकांनी मेहनत गरजेची?
मुल्य म्हणजे किंमत. आपल्यात जर मुल्य असेल तर आपल्याला आपोआपच किंमत प्राप्त होत असते. मुल्य दोन प्रकारचे असू शकतात. मुल्य म्हणजे चांगले गुण व मुल्य म्हणजे वाईट गुण. मुल्य हे कोणत्याही प्रकारचे का असेना, त्याचे मोजमाप केले जाते. समजा एखादा वाईट गुण तपासायचा असेल, तर तो वाईट गुणही तपासला जावू शकतो. वाईट गुण तपासणारी माणसं वाईट असतात व चांगले गुण तपासणारी माणसं चांगलीच असतात.
शिक्षकाला चांगले गुण तपासायचे असतात. त्यासाठी तळमळ सुरु असते त्यांची. ते गुण तपासणे म्हणजेच मुल्यमापन होय. आपल्याला माहितच असेल, शोले चित्रपट. या चित्रपटात एक संवाद आहे की जो संवाद कौशल्यावर आधारीत आहे. संवाद असा की ओ सांबा, कितने आदमी थे, हा संवाद व ती सांबा विचारण्याची परिक्षा इमानदारीवर आधारीत होती. आपणही एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची परिक्षा घेतो. कशासाठी घेतो? आपण शिकविलेला भाग विद्यार्थ्यांना कितपत समजला हे पाहण्यासाठी आपण परिक्षा घेतो. त्यात आपण केवळ त्यानं लेखी चाचणीत सोडविलेले गुण पाहात नाही. गुण पाहतो, त्यानं वर्षभर केलेल्या गोष्टी. ज्याला आकारिक म्हणतात. याच मुल्यमापनाच्या दोन पद्धती. एक आकारिक मुल्यमापन व दुसरं संकलित मूल्यमापन. पुर्वी एकच मूल्यमापन पद्धती होती. संकलित मूल्यमापन. परंतु आज त्यात एक आणखी पद्धत आली, आकारिक मूल्यमापन. ज्याचा अर्थ वर्षभर मुल काय शिकलं असा होतो. एकंदरीत सांगायचं झाल्यास आकारिक परिक्षेचं मूल्यमापन का आलं? याचा विचार केल्यास मुलात जे सुप्त गुण असतात. त्यात एकाच दिवशी हवा तसा बदल होत नाही. ते गुण मुर्त स्वरुपात दिसतात. त्यात काळानुसार थोडा थोडा बदल होतो. वाढही होते. तो बदल त्या त्या वेळेला तपासणे, त्याची त्यावेळेसच नोंद घेणे. याला आकारिक मूल्यमापन म्हणता येईल. ज्यात वाढ होते.
आकारिक मुल्यमापनाची आवश्यकता काय? असा प्रश्न आपल्याला शिकवीत असतांना नेहमी पडू शकतो. तर त्याचं उत्तर आहे, मूल्यमापनातून मुलांमध्ये होत असलेला बदल आपल्याला तपासता येतो व त्याला आकार देण्याची गरज असते. म्हणूनच त्याला आकारिक मूल्यमापन म्हटलं आहे. वेळेवरच हे गुण आपल्या लक्षात आले नाही व त्याची आपण योग्य नोंद घेतली नाही, त्या परिस्थितीत योग्य मार्गदर्शन त्याला प्राप्त झाले नाही तर त्यावेळेस विद्यार्थ्यात संभ्रम निर्माण होतो आणि जेव्हा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा तेच मूल अशा मार्गाकडे वळतं. जो मार्ग विनाशाकडे नेणारा असतो. त्यामुळे अशा अवस्थेत मुलाला कोणते आणि कशाप्रकारचे मार्गदर्शन करायचे? यावर प्रकाश टाकण्यासाठी आकारिक मूल्यमापन असतं. आकारिक मूल्यमापनात आपण वेळीच नोंद घेवून त्या नोंदीनुसार ते सुप्त गुण वाढविण्यास मदत करतो. ते वाझविण्यासाठी प्रयत्न करतो आणि यदाकदाचित आपल्या हातून तसे प्रयत्न झाले नाहीत तर आपल्यानंतर ते मूल ज्याच्याकडे जात असेल, तो त्या नोंदी गृहित धरुन त्यावर योग्य ते प्रयत्न करु शकतो. ज्यातून मुलात आदर्शपणा तयार होवू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या मुलात जर पाण्यात बेडकांना अचूक दगड मारण्याचा गुण असेल आणि त्यावर त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर पुढे चालून तो पाण्यातील सर्व जीवजंतूंना मारुन टाकेल. ज्यानं पाप घडेल. अशावेळेस त्याला म्हणता येईल की पाण्यात दगड मारु नकोस. त्यानं पाण्यातील जीवजंतूंना त्रास होईल. आपल्याला कोणी दगड मारल्यास आपल्याला त्रास होतो की नाही. असं म्हणातच त्याला ते समजेल व तो दगड मारणार नाही. परंतु शिक्षणाच्या भाषेत असं म्हटल्यास त्याची अडवणूक झाल्यासारखी वाटेल व तो आपला अचूक नेम धरण्याचा म्हणजेच दगड मारण्याचा सुप्त गुण विसरेल. ज्याचा त्याला पुढे भविष्यात उपयोग होणार नाही. परंतु तोच सुप्त गुण आपल्या वळवावा लागेल. म्हणावे लागेल की असा पाण्यात दगड मारण्याऐवजी तू पाण्यातून वीज निर्माण कशी करतात. यावर प्रयत्न कर. त्यासाठी विचार कर किंवा या दगडाचा उपयोग आपण कशाकशासाठी करु शकतो. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित कर. अचूक नेम धरण्याचे कौशल्य शिक. मुलाला ते नक्कीच पटेल. बाई म्हणते ना. मग सगळंच बरोबर. मी असाच करेल. त्यानंतर मुलात जो आवश्यक बदल होईल. तो पाहण्यासारखा असेल.
आपल्याला माहीत आहे व एक दंतकथा प्रसिद्ध आहे, आपण हनूमानाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. म्हणतात की त्याच्यात उडण्याची शक्ती होती. तो त्याच्या अंगी असलेला सुप्त गुणच. एकदा त्यानं सुर्य बघितला व तो एक खाण्याचा पदार्थ आहे हे समजून तो उडायला लागला. त्यानं उड्डाण भरलं व तो सुर्याला गिळण्यासाठी सरसावला. त्यावेळेस ते लक्षात येताच इंद्रानं वज्रास्र त्याच्या दिशेनं फेकलं. ही शक्ती म्हणजेच सुप्त गुण. त्यावर इंद्रानं तात्पुरतं वजास्र फेकून त्या शक्तीला खंडीत केलं. परंतु ती शक्ती तो विसरला नाही. ते बालपण होतं व त्याच शक्तीचा गैरवापर करीत हनुमानानं एकदा दुर्वास ऋषींना त्रास दिला. जे शिघ्रकोपी स्वभावाचे होते. त्यांनी हनुमानाला शाप दिला. म्हटलं की तू आपली शक्ती विसरशील. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही की त्या बालपणात त्या शक्तीचा अपक्षय झाला व हनुमान आपली शक्ती विसरला. त्यावर दुर्वास ऋषीकडून शापवाणी निघाली नसती. दुर्वास ऋषी प्रेरणादायक शब्द बोलले असते तर कदाचीत हनूमानात अपेक्षित बऱ्याच प्रकारचे चांगल्या प्रकारचे वर्तनबदल घडले असते. हे झालं चांगलं मार्गदर्शन. जर त्याच हनुमानाच्या शक्तीवर दुर्वास ऋषींकडून शापवाणी उच्चारली गेली नसती तर त्यांच्या हातून विनाशकही कामं झाली असती. जशी सुर्याला गिळणं. परंतु त्यांच्या सुप्त गुणात दुर्वास ऋषींकडून अडथडा निर्माण झाला व पुढे जावून कालांतरानं हनुमान ती शक्ती विसरला. अर्थात चांगला गुण विसरला. पुढे हाच गुण सीतेचा शोध लावतांना कामात आला. समुद्र होता व तो समुद्र टार करणे कोणाला जमेनासे होते. पूलही बनवायचा झाल्यास सीता लंकेत असेल का? हा प्रश्न होता. समजा ती लंकेत नसती तर. पूल बांधण्याचे प्रयत्न विफल झाले असते. शेवटी सीतेचा शोध लावायचा होता. त्यासाठी जांबवंतला आठवलं की बालपणात हनुमानात उडण्याची शक्ती होती. ज्या आधारे हनुमंत सुर्याला गिळायला गेला होता. ती शक्ती माहीत असलेला जांबवत सीतेचा शोध घेतेवेळी ती शक्ती आठवून म्हणाला, "हे हनुमंता तू आपली शक्ती आठव. आठव की तू भूतकाळात सुर्याला गिळायला गेला होता. आता तूच तशी उड्डाण भरुन हा समुद्र पार करुन जा. तूला सीतेचा शोध घेता येईल. हनुमंताला ती शक्ती आठवली व तो समुद्र पार करुन गेला. ज्यातून सीतेचा शोध लागला.
पर्यायानं सांगायचं झाल्यास आपल्या विद्यार्थ्यातही असेच सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणांवर कोणत्याच दुर्वास नावाच्या शिक्षकानं शाप देण्याची गरज नाही की आपल्या विद्यार्थ्यातील हनुमंत ती शक्ती विसरेल. ज्याला सीतेचा शोध लावता येणार नाही. या ठिकाणी सीतेचा शोध म्हणजे एखाअःआ नाविन्यपूर्ण शोध असा आहे. तो शोध आहे की ज्यातून वस्तूनिर्मिती होईल व ती वस्तुनिर्मिती देशाला महासत्ता बनविण्याच्या कामी येईल. या दृष्टीनं आपल्यासाठी नाही तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी आकारिक मूल्यमापनाची गरज आहे.
बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २९ तसेच २० ऑगस्ट २०१० च्या शासननिर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाचे सर्वच पैलूःचे सातत्याने व विविध अंगाने मूल्यमापन करणे. हेच आकारिक मूल्यमापन होय. अन् त्यासाठी वापरावयाची कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय. यात आकारिक मूल्यमापन पद्धतीत दैनिक निरीक्षण, तोंडीकाम, प्रयोग, प्रात्यक्षिक, उपक्रम, कृती, प्रकल्प, चाचणी, स्वाध्याय, वर्गकार्य, प्रश्नावली. या सर्वांचा समावेश होतो. ज्यातून आपल्याला सुप्तगुण पाहायला मिळू शकतात व ते सुप्तगुण वाढविण्यास वाव मिळू शकतो. सुप्तगुण हे सर्वच विद्यार्थ्यात असतात. सुप्तगुण म्हणजू वाचन व लेखन येणे नाही. तर चांगले बोलता येणे, ज्यातून वक्ता तयार होवू शकतो. गाणे म्हणता येणे. ज्यातून संगीतकला वाढीस लागते. वाद्य वाजवता येणे, ज्यातून वादनकला वाढीस लागते. कोणाला भांडे बनवता येणे, ज्यातून कल्पकता वाढीस लागते, शोधक वृत्ती वाढीस लागते व शोध लावता येवू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, चित्र काढता येणे व लिहिता येणे. ज्यातून चित्रकार व लेखक बनवता येवू शकतं.
संकलित मूल्यमापन पद्धतीपेक्षा आकारिक मूल्यमापन पद्धती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण याच पद्धतीतून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडवता येतं. आकारिक मूल्यमापन ही एक साचेबंद पद्धती नाही. ती पद्धती मुक्त पद्धती आहे. ज्यातून विद्यार्थ्याचं व्यक्तीमत्व घडवता येतं. त्यात बदलाव करता येतो आणि तो बदलाव दररोजच करता येतो. तो दैनिक निरीक्षणातून करता येतो. परंतु आतापर्यंत आपण संकलित मूल्यमापन करत आलोय. ज्यातून वर्षभरात किंवा दर सहामाहीला मूल्यमापन होत होतं. ज्यातून विद्यार्थ्यात असलेले सुप्तगुण दिसत नव्हते. ते वाढविताही येत नव्हते. फक्त एक आढावा पाहायला मिळत होता. ज्यातून दिशाही व्यवस्थित स्पष्ट होत नव्हती. मात्र आज आकारिक मूल्यमापन आलं असलं तरी डरेचसे शिक्षक आकारिक मूल्यमापन बरोबर करीत नाहीत. नोंदीही बरोबर घेतल्या जात नाहीत. नोंदी घ्यायच्या असेल तर विचार येतो. विचार येतो की कोण्या प्रकारच्या नोंदी घ्याव्यात. मग शिक्षक नोंदींच्या पुस्तका पाहतात. त्याच नोंदी घेतात. ज्या आपल्या विद्यार्थ्यांच्या नसतात. ज्या इतरांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांओअया घेतलेल्या असतात. ज्यातून आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतील चुकीच्या नोंदी घेतल्या जातात. ज्या नोंदींतून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्तगुण वाढीस लागत नाहीत.
महत्वपूर्ण बाब ही की जर आपल्याला वाटत असेल की आपलाही विद्यार्थी घडावा. त्याच्या घडण्यातून शास्रज्ञ तयार व्हावा. त्यानंही एखादा शोध लावावा. त्याचाही हातभार भारताच्या महासत्ता बनण्यात व्हावा तर त्याच्या सुप्तगुणांच्या नोंदी या सत्य व व्यवस्थित व्हायलाच हव्यात. जेणेकरुन त्याच नोंदींच्या अनुषंगातून देशाचा भावी नागरिक हा परिपूर्ण स्वरुपाचा तयार होईल. जेणेकरुन देशाचा विकास होवू शकेल व देशाला महासत्ताही नक्कीच बनवता येवू शकेल. त्यासाठी शिक्षकांना खरी मेहनत घेणं गरजेचं आहे. हे तेवढंच खरं. ज्यात काही अपवादात्मक शिक्षक सोडले तर बरेचसे शिक्षक मेहनत घेत असतात यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०