Education is necessary for everyone. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | शिक्षण सर्वांना आवश्यक

Featured Books
Categories
Share

शिक्षण सर्वांना आवश्यक

शिक्षण सर्वांसाठी उपयोगाचं?

         शिक्षण ही गोष्ट सर्वांसाठी उपयोगाचं आहे. जर शिक्षण नसेल यर त्या व्यक्तीची अवस्था ही एखाद्या प्राण्यागत असते. प्राण्यांना बोलता येतं. चालता येतं. काबाडकष्टाची कामं करता येतात. सांगकाम्या प्रकाराची स्थिती त्यांची होवून जाते. अन् एवढं सगळं करुन देखील पळसाला पानं तीनच असल्यागत त्यांची अवस्था होवून बसते. माणूस नावाचा हा प्राणी इतर प्राण्यांवरच अत्याचार करीत असतात. त्यांना गुलामासारखं वागवत असतात. त्यांच्याकडून कष्टाची कामं करुन घेतात. बदल्यात साधं पोटभर अन्नही मिळत नाहीत. परंतु तरीही ते कामाच्या बाबतीत इमानदार असतात. कारण त्यांना शिक्षण नसल्यानं ते गुलाम असतात. ते आपल्यावर होणाऱ्या अत्याचारावर दादही मागू शकत नाहीत. ती दाद त्यांना मागण्याची उजागिरीही नसते. ते गुलाम असल्यानं माणूसं त्यांना मारतही असतात. परंतु त्यावर ते प्राणी त्यांना कमालीची ताकद असूनही ते माणूस नावाच्या प्राण्याला क्षतीही पोहचवू शकत नाही. 
         माणसाच्याही जीवनात असंच आहे. जो व्यक्ती शिकत नाही. त्याची अवस्था ही गुलामासारखीच असते. जणू त्या प्राण्यांसारखी. त्यांना नीट निर्णय घेता येत नाही. शिकलेला वर्ग त्याचेवर सतत अत्याचारच करीत असतात. त्याच्याकडून काबाडकष्टाची कामं करवून घेत असतात. बदल्यात काहीही देत नाहीत. अर्थात मोबदलाही कमी देत असतात. जास्त काम करुनही. जसा शेती करणारा वर्ग.
          शेती करणारा वर्ग हा कमी शिकलेला आहे. ज्याला जास्त शिक्षण नसेल, तोही शेतीच करीत असतो. तो काबाडकष्ट करुन अन्न पिकवतो. ज्यातून आपल्याला अन्न मिळतं. परंतु ते जरी काबाडकष्ट करुन अन्न आपल्याला देत असले तरी आपल्याला त्यांच्या काबाडकष्टाची कीव येत नाही. तशी कीव जर आपल्याला आली असती तर आपण त्यांच्या मालाला भाव दिला असता. तो जरी अंगमेहनतीनं आपल्याला अन्नधान्य पुरवीत असला तरी आपल्याला त्याचं काहीही देणंघेणं नाही. आपण त्यांच्या मालाला कमी भाव देवून त्यांच्यावर जणू अत्याचारच करीत असतो आणि तोही अनाडी असल्यानं व मजबूर असल्यानं त्यावर काहीच बोलत नाही. ते अत्याचार त्याच्या लक्षात येत असतात. तरीही तो चूप बसतो. कारण त्याला ज्ञान नसतं. याऊलट त्यांचा माल विकत घेणाऱ्या शिक्षीत लोकांचं आहे. त्यांचा माल विकत घेणारा शिक्षीत वर्ग हा त्याच मालावर थोडीशी प्रक्रिया करतो व तोच माल दुगण्या भावात विकतो आणि पैसे कमवतो. त्या घटकाला असे कसे करता येते. त्याचं कारण आहे, शिक्षण. तो घटक शिकलेला असल्यानं त्याला हे सर्व करता येतात. 
           पुर्वीही शेतकरी हा सुखी नव्हता. कारण तो अशिक्षीतच होता व त्याला लुटणारा सावकार हा शिक्षीत घटक असल्यानं त्यानं आपली चतुराई लावून कित्येक शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमीनी विकत घेतल्यात. 
          शिक्षण क्षेत्रात अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया घडत असतांना शिक्षक नावाचा घटक हा जास्त मेहनत करीत असतो. तो शिकलेला असतो. परंतु त्याचं शिक्षण हे कमी झालेलं असतं. त्यातच त्याचेवर लक्ष ठेवून असलेला घटक अर्थात अधिकारी वर्ग हा जास्त शिकलेला असतो. त्यानंतर साहजीकच शिक्षकांवर अत्याचार होणारच. जोही अधिकारी येईल वा मंत्री येईल. तो सर्वांनाच आपलं शहाणपण साःगून जातोच. अशी शिक्षकांची अवस्था. शिक्षण हा गुलामच आहे या सर्व प्रक्रियेतील. त्याचेवर अत्याचार होत असला तरी तो काहीही बोलत नाही. प्रसंगी आत्महत्या करतो एक चिठ्ठी लिहून. परंतु परिस्थिती विरोधात तो कुठेही दाद मागू शकत नाही. मात्र त्याचेवर जरी अत्याचार होत असेल, तरी तो आपल्या कर्तव्याप्रती इमानदार असतो. तो आपल्या विद्यार्थ्यांना आपलं मुल मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करीत असतो. अन् तसे करीत असतांना तो नाविन्यपूर्ण मार्ग वापरुन आपल्या विद्यार्थ्यांना सकस ज्ञान देत असतो. यालाच नवोपक्रम म्हणता येईल. शिक्षक असाच आपल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नवीन असा उपक्रम हाती घेतो. ज्यातून विद्यार्थ्यात थोड्याफार प्रमाणात का होईना, बदलाव करता येतो.