Aarya - 10 in Marathi Women Focused by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | आर्या... ( भाग १० )

Featured Books
Categories
Share

आर्या... ( भाग १० )

   अनुराग प्रिन्सी बद्दल जे घडलं आहे हे अगदी थोडक्यात ऐकूनच  भारावून गेला होता . तो उठून त्याच्या बेडरूम मध्ये निघून जातो . तिथे आर्या झोपली असते . तिच्या जवळ जाऊन तो तिच्या पायांची पप्पी घेतो . त्याच्या डोक्यामध्ये विचारांचा गुंता चालू असतो . तितक्यात तो आर्या जवळ जाऊन तिच्या बाजूला पडतो . लाइट्स ही बंद करून घेतो . श्वेता थोड्या वेळातच बेडरूम मध्ये येते. लाइट्स बंद आहेत हे बघितल्यानंतर ती विचार करते अनुराग इतक्या लवकर कसा झोपला ? नंतर स्वतःच म्हणते, '' ठीके आज थकला असेल ! "श्वेता झोपण्यासाठी पुढे जाते तितक्यात तिला अनुराग हालचाल करताना दिसतो . ती आवाज देते , " अनुराग ....! "  तो अस्वस्थ स्वरात म्हणतो , हम्म्म .. बोल ना !' ती म्हणते , झोपला नाहीस! तो म्हणतो, झोप नाही येत ! ती विचारते, काही झालं आहे का ! कसला विचार करत आहेस ? तो काही म्हणत नाही ! ती म्हणते , .... तू प्रिन्सी चा विचार करत आहेस का ???

अनुराग अगदी लगेच उठून बसला जस काही तो श्वेता ने त्याला हाच प्रश्न विचारावं यासाठी तो वाट पाहत होता. पुढे म्हणाला , हो !  मी प्रिन्सी चा विचार करत होतो !  श्वेता म्हणाली , मला खात्री होतीच होती , तू ज्या प्रकारे रूम मध्ये निघून आला त्यावरूनच ! ती पुढे म्हणाली , नक्की काय चाललं आहे तुझ्या डोक्यामध्ये ! काय नक्की प्रिन्सी बद्दल विचार करत आहेस ! पुढे अनुराग म्हणाला , मला खूप वाईट वाटलं तिच्या बद्दल ऐकून ! आपण उद्या तिच्या आजी आजोबांना भेटण्यासाठी जाऊया अस विचार मी करत आहे , पण जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर ... 

   श्वेता च्या चेहऱ्यावर हास्य होत . तुला तिच्याबद्दल वाईट वाटलं हे खरं आहे कदाचित मी थोडा कमी विचार केला असेल तिचा .. पण मला काही प्रॉब्लेम नाही . आपण उद्या सकाळीच जाऊया प्रिन्सिकडे ! 

 आता अनुराग ला खर बरं वाटलं होत ! तो शांतपणे झोपणार होता  !

थोड्या वेळातच दोघे ही शांत झोपले . सकाळी उठल्यावर श्वेता ला अगदी आश्चर्याचा धक्काच बसला! ती पाहते तर अनुराग त्याच्या जागेवर नव्हता . ती घाईमध्ये बेडवरून उठली . कारण आजपर्यंत तिने उठवल्याशिवाय अनुराग कधीच उठला नव्हता ! तिला शोधू लागली ... आवाज देऊ लागली . ..पूर्ण घर डोक्यावर घेऊन आवाज देऊ लागली . तितक्यात बाथरूम मधून आवाज आला ..." ये .. अगं! का ओरडत आहेस ? काय झालं ?" 

  श्वेताला त्याचा आवाज ऐकून एकदम बरं वाटलं होत . ती म्हणाली ," तु आधी लवकर बाहेर ये ! काय झालं आहे तुला ! बरं तर नाही ना !"  असं एकटीच बाथरूम बाहेर बोलत उभी राहिली होती ! 

  थोड्याच वेळात घाई घाईने आवरून अनुराग बाहेर आला . " ये बाई ! काय झालं तुला ! " ( हसत हसत म्हणाला )  त्याच हसू पाहून श्वेता ने त्याच्या पाठीवर एक फटका लावून दिला ..म्हणाली , काय झालं काय ? आणि मला काय विचारत आहेस ? तू सांग नक्की झालं काय आहे ? 

अनुराग म्हणतो , अग रिलॅक्स ! माझी मीटिंग आहे म्हणून .. श्वेता नकारार्थी मान हलवत म्हणाली .. नाही ... खरं!  पुढे म्हणतो आणि हा !!! आपल्याला प्रिन्सिकडे ही जायचं आहे ना ! श्वेता हसत म्हणाली ,व हा ! आता खरं बोलला आहेस ! पण अनुराग तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ? काय विचार आहे ? तू इतका उत्साहित का आहेस काल पासून ? मी या पूर्वी तुला कधीच असं बघितलं नाही !

अनुराग चेहरा लपवत , म्हणतो "काही नाही ग! किती गोड मुलगी होती ती ! अगदी आपल्या आर्यासारखी ! मला तिला भेटण्याची उत्सुकता खूप वाढली आहे ! इतकंच !"

श्वेता म्हणाली , बरं चांगलं आहे ! निदान कधी तरी लवकर उठलास! कदाचित प्रिन्सी साठी तरी ...! अस म्हणतं श्वेता तिथून निघून जाते . आर्या ही उठते तितक्यात ! अनुराग आर्या सोबत खेळत बसतो आणि श्वेता ला नाश्ता बनवण्यासाठी पाठवतो . अगदी लवकरात लवकर नाश्ता बनव ... मला लवकर जायचं आहे आणि लवकर यायचं आहे ! अस ओरडून ओरडून बोलतो !!! किचन मधून आवाज येतो , " स्वारी आज जास्तच खुश दिसते ! श्वेता ही घाई घाईने नाश्ता तयार करून घेऊन येते . अनुराग आर्या सोबत खेळत गप्पा करत करत नाश्ता ही करतो .. दहा मिनिटमध्ये नाश्ता संपवून लगेचच तो ऑफिस साठी निघतो .. आर्या आणि श्वेता दोघींची पप्पी घेऊन त्यांना बाय बाय ! म्हणत तो घाई घाई मध्ये निघून जातो ...त्यानंतर आर्या आणि श्वेता आपलं दिनक्रम चालू करतात . श्वेता आर्या ला तयार करू लागते . तिच्या सोबत तिच्याच भाषेमध्ये गप्पा गोष्टी करत ती रमून जात असे . आर्या ही आता थोडफार समजू लागली होती . ते दोघे आता आर्या ला एक शिक्षक ही बघणार होते . जो आतापासूनच तिला अगदी सर्वच छोट्या छोट्या गोष्टी शिकवणार ! ती सुरुवात ते दोघेही हळूहळू करतच होते  !

     काही वेळातच तिला अनुराग चा फोन येतो . ऑफिस ची मीटिंग झाली आहे  आणि तो काही वेळातच घरी पोहचणार आहे असं! तो श्वेताला तीच आणि आर्याच आवरून तयार राहायला सांगतो . त्याच फोन येऊन गेल्यानंतर ती विचार करू लागते , अनुराग असा का वागत आहे ? हा नक्की तिकडे जाऊन काय बोलणार आहे ? काय करणार आहे ? असे अनेक विचार करत बसली होती . तितक्यात आर्या तिचा हात पकडून तिला खुणावत असते , आपण कधी निघायचं आहे ? श्वेता तिला थोड्याच वेळात निघू असं म्हणते ...

    त्यांनी थोडा वेळ वाट बघितल्यानंतर अनुराग चा आवाज येतो . तो आर्याला आवाज देत ..आर्या ...आर्या माझी परी काय करतेय... अस ओरडत ओरडत आतमध्ये येतो. आर्या खूप छान तयार होऊन बेडवर बसलेली असते . एकदम बाहुली सारखी तयार झाली होती ती . श्वेता ही तिचं सगळं आवरून बसली होती . अनुराग दोघींनाही तयार झालेला बघून खूप खुश होतो थोड्याच वेळात आपण निघूया अस म्हणून तो बेडरूम मध्ये जातो.  ऑफिसमध्ये घालून गेलेले कपडे चेंज करून,  तो दुसरे कपडे घालून तयार होतो.  आणि लगेचच तिघेही निघतात .

प्रिन्सी इतक्या दूर काही राहत नव्हती .. अगदी बाजूलाच राहत होते पण तरीही अनुराग आणि श्वेता व्यवस्थित तयार होऊन भेटण्यासाठी चालले होते . अनुरागने आर्याला उचलून घेतले होते आणि श्वेता त्यांच्या सोबत चालत होती. 

  पाच मिनिट चालल्यानंतर लगेचच प्रिन्सीचे घर आले . श्वेता दाराची बेल वाजवते . प्रिन्सीची आजी दार उघडते . या तिघांना दारात बघून त्या एकदम आनंदी झाल्या ! अरे! तुम्ही तिघे ही ! या.. या...! आतमध्ये या ! असं म्हणतं अगदी खुप ओळखीचे असलेल्या पाहुंण्यासारखे आनंदाने या तिघांचे स्वागत झाले . अनुराग आणि श्वेता ला खूप बरं वाटलं . अनुराग विचारतो , बाबा कुठे दिसत नाही  ? आजी म्हणतात , (हसत) प्रिन्सी त्यांना सोडेल तेव्हाच ते खाली येऊ शकतात ना ! श्वेता म्हणाली , का बरं? काय चाललं आहे असं ? , दोघा आजोबा आणि नातीच ! 

आजी म्हणाल्या , चला बरं तुम्हीच बघा ! असं म्हणत , आजी अनुराग , श्वेता आणि आर्या या तिघांना वरती रूम मध्ये घेऊन जातात. वरती जाताच समोर आजोबा आणि प्रिन्सी  घोडा घोडा खेळताना दिसतात. आजोबांचे तसे वय ही झाले होते पण ते प्रिन्सी च्या आनंदासाठी जे हवं ते करत असे . ते पाहताच अनुराग पुढे गेला आणि म्हणाला , आता प्रिन्सी आणि आर्या दोघी खेळणार आपण गप्पा करूया चला !

प्रिन्सी आर्या ला पाहून खूप आनंदी होते . लगेच स्वतःहून पुढे होऊन आर्या चा हात पकडते आणि तिला तिची खेळणी दाखवण्यासाठी घेऊन जाते . श्वेता अनुराग कडे पाहून म्हणते असं वाटतच नाही की प्रिन्सि आणि आर्याची एकदाच भेट झालेली आहे म्हणून ...असं वाटतं या दोघी खूप आधीपासून एकमेकींना ओळखतात.... अनुराग हसून होकारार्थी मान हलवतो . आजी म्हणते तुम्ही गप्पा करा मी आपल्यासाठी चहा बनवते ! श्वेता पुढे गेली आणि म्हणाली आजी तुम्ही बसा मी चहा बनवते मलाही छान चहा बनवता येतो बरं! आजी नाही नाही म्हणत होत्या पण श्वेता च्या हट्टापुढे त्याचं काही चालल नाही .

अनुराग बाबांसोबत बोलण्यास सुरुवात करतो . तुम्ही इथे कधीपासून आलात इथून त्याची सुरुवात होते.. श्वेता त्यांचं बोलणं ऐकत ऐकतच चहा बनवत असते.  थोड्याच वेळा चहा तयार होतो आणि श्वेता चहा घेऊन सगळ्यांमध्ये येऊन  बसते.  बोलता बोलता अनुराग प्रिन्सी च्या मम्मी पप्पा बद्दल विचारू लागतो . श्वेताला हे विचारून आई बाबांना त्रास होईल असं वाटतं होतं..

म्हणून ती अनुरागला इशाऱ्याने खूणावत होती . तू नको विषय काढू पण अनुरागला सर्व व्यवस्थितपणे जाणून घेण्याची घाई होती.  म्हणून तो तो विषय काढणारच होता आणि त्यासाठीच तो तिथे आला होता. तो आजोबांना विचारू लागला. पुढे असं ही म्हणाला , ''जर तुम्ही सांगू इच्छित असाल तर बाबा नाहीतर ठीक आहे ! त्याच काय आहे ना .. प्रिन्सी काल आर्या ला भेटण्यासाठी आली तेव्हाच तिच्यासोबत ओळख झाली . आम्ही जेव्हा घरी जाऊन आई बाबांना विचारलं तेव्हा आम्हाला तुमच्याबद्दल समजलं आणि प्रिन्सी च्या मम्मी पप्पा विषयी ही !

आणि तेच जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत ! हे ऐकून प्रिन्सी ची आजी आजोबा एकदम आश्चर्यचकित झाले .  ते एकमेकांकडे बघत होते .

आणि काहीतरी चुकी केलेल्या नजरेने श्वेता अनुराग कडे !