शेतकऱ्यांनीही समाधानी असावं?
*शेतकरी वर्गानं आनंदी व समाधानी असावं. त्यानं शिव्याशाप देवू नये. कारण शिव्याशाप हेही देवाला ऐकायला जातं व तो आपल्या शेतात सोनं पिकू देत नाही. आता कोणी म्हणतील की देव हा तर दगडाचा आहे. त्याला जीव नाही. मग तो ऐकत असेल काय? याबाबतीत सांगायचं झाल्यास देव जरी दगडाचा असला तरी त्याला सगळं कळतं. हे आपल्याला पूर, भूकंप, खगोलीय घटनेवरुन लक्षात येत असतं. तसंच आपल्याला मृत्यू येतो हा वेगवेगळ्या कारणानं. परंतु ते जरी खरं असलं तरी आजच्या विज्ञानयुगात एवढ्या सोईसुविधा असतांना मृत्यू का येतो? हे कोणालाही न उलगडलेलं कोडंच आहे. पूर, भूकंप, वादळ, भुस्खलन या सर्व गोष्टी निसर्गातील आनुषंगिक घटनांनी होत असल्या तरी त्यात परमेश्वराचाच हात असतो. जो आपल्याला जाणवत नाही. परमेश्वर आपल्यातील चांगल्या वाईट गुणांचे परीक्षण करुन आपल्यातील गुणांची घोळाबेरीज करतो व आपल्याला आपल्या कर्मानुसार चांगल्या व वाईट प्रकारच्या शिक्षा देतो यात शंका नाही. म्हणूनच कोणीही परमेश्वर रुपी या तत्वांना शिव्याशाप देवू नये. शेतकरी वर्गानं तर अजिबात शिव्या देवू नये.*
आजच्या काळात शेतकरी वर्ग सुखी नाही असे दिसून येत आहे. त्याच अनुषंगानं आजचा शेतकरी आत्महत्याही करु लागला आहे. कारण आहे, पीक न होणं.
पीक...... पीक पिकतं. परंतु ते पीक पिकत असतांना जे संकटं येतात. त्या संकटानं पीक पार कोलमडून जातं. जसे पीक पेरले की ताबडतोब पाऊस येणे. ज्यात बी ही जमीनीत दाबली जाते. कुजते व अंकूर फुटत नाही. याचाच अर्थ असा की मोडीत होते. दुसरी गोष्ट म्हणजे ते पीक जेव्हा हिरवं होते, तेव्हा त्यावर बोंडअळी पडते व ती पाने खावून मोकळी होते. ज्यातून पिकांना श्वास घेता येत नाही. ते गुदणरतं व मरतं. अर्थात पिकात जी पानाद्वारे प्रकाशसंश्लेषण क्रिया होते, ज्यातून अन्न निर्मिती होते. ती क्रिया होत नाही. त्यातच वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करु शकत नाही. ज्यातून वनस्पतीला अन्न मिळत नसल्यानं झाड कोमावतं. तिसरी महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पुर्ण पीक हातात येणार असतं. त्यावेळेसही अचानक पाऊस येतो. जो पाऊस उभ्या पिकातील धान्य नष्ट करतो. अर्थात त्या धान्याला पावसानं अंकूर फुटतात व पीक नष्ट होतं.
शेतकऱ्यांना पीक होत नाही. याचं कारण आहे शेतकऱ्यांचं समाधानी नसणं. शेतकरी वर्ग हा कितीही पिकलं तरी समाधानी नाही. कमी पिकलं वा पिकलंच नाही तर तो समाधानी नाहीच. अन् हे बरोबरच आहे. कारण पिकलंच नाही तर शेतकरी वर्गाला राग येणारच. तो शिव्या देणारच. तसंच जास्त जरी पिकलं तरी मला अमूक अमूक एवढं हवं होतं. तेवढं झालंच नाही. असंच शेतकरी राजा म्हणतो. त्यावरही त्याला राग येतो व तो शिव्या देतोच. अन् अशा शिव्या देत असतांना तो विशेषतः देवांना शिव्या देतो. म्हणजे पीक होवो, अगर न होवो, तो देवांना वा निसर्गशक्तीला शिव्या देतो. याच गोष्टीनं निसर्गशक्तीला राग येतो व ती निसर्गशक्ती वा देव त्याचा बदला म्हणून शेतकरी वर्गाच्या शेतात दुष्काळ आणत असते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. जास्त पिकलं तरी देवाला शिव्या व कमी पिकलं तरी शिव्या. समाधान नाहीच. हेच पाप घडत असतं शेतकरी वर्गाकडून. ज्याची शिक्षा शेतकरी वर्गाला मिळत असते. ज्यातून दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. तसं पाहिल्यास कधीकधी शेतकरी वर्गाला जास्त पिकतं, तेव्हा त्याच्या मालालाच भाव नसतो आणि जेव्हा पिकत नाही. तेव्हा थोडासा भाव असतो. म्हणजेच पिकलं तरीही शेतकरी णरतो आणि नाही पिकलं तरी शेतकरी मरतो. हे झालं शेतकरी वर्गाचं. आज साधारण नोकरी करणारेही व एसीच्या हवेत खुर्चीत बसणारेही घटकही समाधानी नाहीत. असेही घटक, त्यांच्याजवळ कितीही असलं तरी त्यांना कमीच असतं. तेही पापच करीत असतात. ज्या शेतकरी वर्गाला पिकत नाही. पिकलं तरी भाव कमी केल्यानं त्यानं जी राशी शेतात लावली, तिही रक्कम निघत नाही. मग शेतकरी वर्गाला नुकसान होतं. अशावेळेस त्याची नुकसान भरपाई शेतकरी वर्गाला मिळत असते. परंतु त्यासाठी काही सरकारी कागदपत्र हवी असतात. जी कागदपत्र सरकारी कार्यालयातून मिळत असतात. ज्या सरकारी कार्यालयात सरकारी माणसांना गलेलठ्ठ पगार असतो. परंतु ही माणसं असे सरकारी कागदपत्र शेतकरी वर्गाला देत असतांना पैशाची मागणी करतातह याचाच अर्थ असा की त्या सरकारी माणसांना पन्नास हजार रुपये वेतन असेल, तरी ही सरकारी माणसं पाचशे रुपये लाच घेत असतात. मगच शेतकऱ्यांना कागदपत्र देतात.
महत्वाचं सांगायचं झाल्यास शेतकरी वर्ग संकटांवर संकटं झेलत असतो. आपला जीव धोक्यात घालून तो शेतीची मशागत करीत असतो. कधी शेतात काम करीत असतांना हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यातून त्याचा जीव जात असतो तर कधी त्याला साप, विंचूसारखे प्राणी चावतात. ज्यातून जीव जातो. शिवाय शेतकरी आत्महत्या ह्या तर जगजाहिरच आहेत. शेतात दुष्काळ पडला किंवा पिकांचं नुकसान झालं की शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडतं व शेतकरी आत्महत्या करुन मरतो. कधी त्याची मुलं आत्महत्या करुन मरतात. ही अवस्था पाहिली की असं वाटतं की शेतकरी आंबा कमवतो व ते आंबे तो बाजारात विकतो. ज्या आंब्याची कोयपण शेतकऱ्यांना मिळत नाही आणि ते दलाल आंब्याची कोयफण फेकत नाहीत. ती कोयफण विकून पैसे कमवितात. अशी आजच्या शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे.
विशेष सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांवरच संकट का? कार्यालयात खुर्ची तोडत बसणाऱ्या अधिकाऱ्यांवर संकट का नाहीत. ते तर लाच म्हणून पैसा घेतात. जरी त्यांना पन्नास हजार रुपये वेतन मिळत असतं तरी. हा शेतकरी वर्गाचा प्रश्न. त्याला उत्तर म्हणजे शेतकरी वर्ग हा त्याला जास्त पीक झालं तरी परमेश्वराला शिव्या देतो आणि कमीही पिकलं तरी परमेश्वराला शिव्या देतो. तशा शिव्याशाप शेतकऱ्यांच्या काबाडकष्टावर जगणारी मंडळी देत नाहीत. म्हणूनच ते सुखी असतात. शेतकरी सुखी नसतोच. कारण परमेश्वर हा प्रत्यक्ष आत्मा अर्थात देव आहे. ती सगळं ऐकणारी एक जीवंत मुर्त रुपातील कल्पना आहे. ज्या कल्पनेला चांगलं वाईट कळतं. मग ती संकल्पना देव का असेना. त्यालाही शिव्याशाप कळतं. ज्याची शिक्षा तो शेतकरी वर्गाला शेतात दुष्काळ देवून देतो. अर्थातच शेतकऱ्यांना देवच नेस्तनाबूत करतो. म्हणूनच शेतकऱ्यांनीही समाधानी राहाणं शिकावं. परमेश्वराला शिव्याशाप करु नये. जरी आपल्याला पीक जास्त झालं नाही तरीही. असं समजावं की जास्त पीक होणं हे आपल्या प्रारब्धातच नव्हतं.
महत्वपूर्ण बाब ही की शेतकऱ्यांनीही चांगल्या गोष्टी शिकाव्यात. जेणेकरुन त्या चांगल्या गोष्टीतून शेतकरी वर्गालाही चांगलं पिकेल. शेतमालाला चांगला भाव मिळेल. अन् चांगला भाव मिळाला की शेतकरी वर्गही आनंदी राहिल. हे तेवढंच खरं. जर त्यानं कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहून शिव्याशाप न दिल्या तर...... कारण चांगल्या केलेल्या प्रार्थना जशा देवाला ऐकायला जातात. तशाच शिव्या देखील देवाला ऐकायला जातातच. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०