स्वप्न - माझा विचार निद्रा किंवा झोप ही तीन प्रकारची असते. निद्रा ,योगनिद्रा व चिरनिद्रा. निद्रा किंवा झोप ही शरीरासाठी आवश्यक आहे.
योगनिद्रा ही एक चांगली झोप लागण्यासाठी केलेली एक ध्यान प्रक्रिया आहे. आणि चिरनिद्रा म्हणजे मृत्यू.पण आजचा विषय झोप नसून झोपल्यावर पडणारी स्वप्ने हा आहे.
मला लहानपणापासून विविध प्रकारची स्वप्ने पडत असत. मी एक बातमी वाचली की खूप स्वप्ने पडत असलेने एका महिलेने आत्महत्या केली. मी यावर वाचन केले आणि सर्व माहिती एकत्रीत करून हा लेख लिहीला आहे.लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वाना स्वप्ने पडतात.स्वप्ने पडणे हे नॉर्मल आहे.
माणसाला स्वप्नांबद्दल कुतुहुल असते की स्वप्ने का पडतात? स्वप्नांना काही अर्थ असतो का?.आपण रोज रात्री घेत असलेल्या निद्रेमध्ये स्वप्ने पडतात.स्वप्न म्हणजे घडलेल्या घटना, विचार यांचा जो संग्रह मेंदूमध्ये झालेला असतो तो दृश्य रुपात दिसणे. उपनिषदाप्रमाणे स्वप्न हे मनात दडून राहिलेल्या इच्छांचे प्रगटीकरण आहे.
जीवन म्हणजे एका झोपेतुन दुसऱ्या झोपेमधील स्वप्न.
याचा अर्थ असा की जीवन व स्वप्न दोनही तात्पुरते आहेत. हा आणि एक वेगळा विषय आहे.
स्वप्नांचे प्रकार१. आपण त्या दिवशी केलेल्या कृती , वाचन, पाहीलेला सिनेमा किंवा सिरीयल. लहानपणी विशेषकरून भीतीदायक स्वप्ने पडण्याचे हे कारण असते. किंवा एखादे नर्मदा परिक्रमेचे पुस्तक वाचले किंवा आध्यात्मिक पुस्तक वाचले तर तशी दृश्ये किंवा वाचलेले उतारे पण स्वप्नात दिसू शकतात.
२. पूर्णपणे वेगळी स्वप्ने पडणे म्हणजे त्यादिवशीच्या घडामोडी किंवा झोपण्यापूर्वीचा विचार याच्याशी काही संबंध नसतो. म्हणजे आपण कोणत्यातरी वेगळ्याच रुपात उदाहरणार्थ पूर्वीच्या काळातील सरदार म्हणून काम करताना दिसणे.
३. जुन्या आठवणी, आपण काम करीत असलेल्या ऑफीस मधील किंवा माणसे तीच पण संदर्भ वेगळे, किंवा वेगळीच माणसे असू शकतात. आपण ज्या गावात पूर्वी राहत होतो त्या गावातील घटनांशी संबंधीत.पेपरमध्ये एका महिलेने अत्याधिक स्वप्ने पडतात या कारणाने आत्महत्या केल्याची बातमी आली होती. त्यामुळे जरी बरेच लोक स्वप्नाना गंभीरतेने घेत नसले तरी मानसशास्त्राच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे . त्यावर आयुर्वेदात औषधे आहेत. ॲलोपथी, होमिओपाथी च्या मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेऊ शकतो. भयपट पाहील्यावर तसे स्वप्न पडणे नॉर्मल आणि सतत भीतीदायक स्वप्ने पडणे हे नॉर्मल नाही. भीतीदायक स्वप्नांचे पण निरनिराळे पॅटर्न असतात.त्यात एखाद्या खोलीत गेलो आणि अचानक सर्व गायब होणे. कोणीतरी आपल्या अंगावर बसलेय असे वाटणे किंवा अचानक काहीतरी वाटून भीतीची शीरशीरी येणे असे प्रकार असतात.परंतू स्वप्ने कशी पडतील याचे काही एक असे कारण असतेच असे नाही. तुमच्या दिवसभरातील घटनाशी किंवा विचाराशी विसंगत अशी स्वप्ने पडू शकतात. स्वप्नदोष असे मानली जाणारी कामुक स्वप्ने असतात.याचे प्रमाण जास्त असेल तर वैद्यकीय उपचाराची गरज असते.स्वप्नांचे अर्थ सांगणारे कितीतरी लेख गुगल सर्चमध्ये मिळतात, युट्युब वर व्हिडिओ उपलब्ध आहेत.पण बरीच स्वप्ने अर्थ नसलेली पण असतात किंवा त्याचा अर्थ शोधल्यास तो अर्थ बरोबरचं असेल असे नाही. वाईट स्वप्नांचा परीणाम होऊ नये यासाठी काही मंत्र आहेत. एखाद्या वाहन चालवणाऱ्या किंवा वाहन न चालवणाऱ्या व्यक्तीला आपण वाहन चालवत आहोत व ते पेटले किंवा धडकले असे दिसले तर त्याने आपल्याला अपघात होईल याची सावधगीरी बाळगावी. तरी प्रत्यक्षात नजीकच्या कालावधीत तशी घटना घडतेच असे नाही.काही वेळा हा काळ सहा महिन्यांचा पण असतो किंवा ती मागील जन्मातील आठवण असू शकते.आपण स्वताला वेगळ्याच भुमिकेत बघतो त्याचा संबंध मागील जन्माशी असू शकतो.स्वप्नात शुभ अशुभ घटनांची चाहूल लागते असे म्हणतात.तशी काही स्वप्ने मी पुढे देणार आहे .पण ते अर्थ पण अचूक नसतात असे अनुभव आहेत त्यामुळे अर्थ बघून तो वाईट असेल तर तसे मनात धरले तर आपल्या मानसिकतेमुळे तसे घडते.तसेच वाईट स्वप्नं पडू नयेत म्हणून उपायाचे व्हीडीओ उपलब्ध आहेत . मी असे काही मंत्र पुढे देणार आहे .
काहीवेळा आपल्याला मनातून काहीतरी विचित्र घडणार अशी जाणिव होत असते आणि तसे घडतेही. त्याला इंग्रजीत premonition म्हणतात.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्ने कशी तयार होतात याबद्दल अजुनही नीट शोध लागलेला नाही. स्वप्न हे अवचेतन मनाशी संबंधीत असते. प्रत्येक नव्वद मिनीटानी माणूस स्वप्न बघू शकतो. स्वप्नामध्ये घटना वेगात घडतात.अनेक जन्मापासूनचे संस्कार मनात साठलेले असल्याने काही वेगळे अनुभव पण येत असतात.वात, पित्त,कफ दोषाने पडणारी स्वप्ने भीतीदायक, तसेच कुठेतरी भरकटलोय अशा प्रकारची असतात. स्वप्ने ही विचारक्षमतेचा परीणाम नाहीत.
स्वप्ने न पडणे पण मानसिक असंतुलन निर्माण करु शकते.काही सायंटिस्टना स्वप्नातून शोध लागले आहेत.रामरक्षा स्वप्नात सांगीतली आहे असा उल्लेख आहे.नर्मदा परिक्रमा मार्गातील एक संत पण त्यानी केलेले लिखाण स्वप्नात दिसते त्याप्रमाणे लिहिलेय असे सांगतात.आईन्स्टाइनना वाटत असे की गणित व विज्ञानाने हे जग एक स्वप्न आहे असे सिद्ध करता येइल.स्वप्न म्हणजे इंद्रीयांद्वारे जो संग्रह मेंदूमध्ये झाला आहे त्यातील घटना कल्पनेद्वारा दृश्य स्वरुपात येणे. उपनिषदा प्रमाणे जागृत अवस्थेतील अपूर्ण ईच्छा मन ग्रहण करते त्याचे प्रगटीकरण म्हणजे स्वप्न.वेद,पुराण, उपनिषदे,आयुर्वेद यामध्ये विपुल लेख सापडतात. रामायणात पण रावणानी सीतेचे अपहरण करून तीला लंकेत नेल्यावर त्रिजटा नावाच्या राक्षसीला रावणाच्या पराभवाचे स्वप्न पडले असा उल्लेख आहे. स्वप्नात पुढील घटनांची तसेच प्रवृतीची जाणीव होते. द्रष्टा म्हणजे बघितलेले दिसणे, श्रुत म्हणजे ऐकलेले ,अनुभव घेतलेले दिसणे.स्वप्ने सुस्वप्न व दुःस्वप्न अशी दोन प्रकारची म्हणजेच शुभ व अशुभ असतात.वातदोषात आकाशात उडणे, पर्वतारोहण, उंट, घोडे वाहना संबंधी स्वप्ने पडतात.पित्त दोषात सोने, फुले, अशी स्वप्ने पडतात तर कफ दोषात तळे, ढग , पक्षी अशी स्वप्ने पडतात.या जगात अनेक गोष्टींवर अभ्यास शोध चालू असतात.एका शोध मोहिमेत काही मृत देह पुन्हा जिवंत करता येइल असा शोध लागला तर त्यासाठी जपून ठेवले आहेत.परलोक रहस्य, भूतप्रेत, अतर्क्य अशी शिल्पकला याप्रमाणेच स्वप्नांबद्दल चे रहस्य कायम आहे व यावर अभ्यास जरुरी आहे. तसेच अत्याधिक स्वप्ने पडत असतील तर वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे.आता काही स्वप्नांचे पुस्तकात दिलेले अर्थ व काही मंत्र देऊन हा लेख पूर्ण करतो. हे अर्थ बघून तसे घडेल असे मानून चालू नये पण त्याप्रमाणे सावध राहून आचरण ठेवावे.तसेच मंत्रांचा उपयोग होतो असा माझा अनुभव आहे पण दावा नाही.
मांसाहार करताना पाहणे - हे आजारपण येणेचे द्योतक आहे. मला असे स्वप्न पडले त्यानंतर पाच सहा दिवसानी मला पाठ,कंबरदुखीचा त्रास झाला. मी अशुभ स्वप्नाचा प्रभाव कमी करणारा मंत्र खाली दिला आहे.
दरवाजाला धडकणे- करत असलेले काम सफल होइल.
दंगल होताना किंवा भाग घेताना दिसणे- शुभ
डॉक्टर दिसणे - निराशा किंवा आळस वाटणे.
तेल तुप गळताना दिसणे अशुभ तर दुध पाणी धार दिसणे शुभ. असे अर्थ गुगल सर्च तसेच स्वप्नांवरील पुस्तकात मिळतात.
दुःस्वप्न पडू नयेत म्हणून ओम हं हनुमते नमः किंवा रामस्कंदम हनुमंतम वैनतेय वृकोदरम शयनयः स्मरेनित्यम दुःस्वप्नम तस्य नश्यंती हे मंत्र झोपण्याआधी म्हणावे.
तसेच स्वप्नाचा वाईट परीणाम कमी होणेसाठी
वाराणस्या दक्षिणे तु कुक्कुटो नाम वै द्विजःतस्य स्मरेणमात्रेण दुःस्वप्नो सुखदो भवेत.समाप्त.