अनुबंध बंधनाचे.....🍁( भाग ४६ )आरव : वैष्णवी....! आज एवढा वेळ तु आमच्यासोबत घालवला आहेस, कसा वाटला तुला आमचा ग्रुप...?वैष्णवी : खरं सांगायचं तर, तुम्ही सर्वजण खुप छान आहात, आणि मी तुम्हा सर्वांना आधीपासुन ओळखते. फक्त भेट आत्ता झाली. कारण ऑफिस मधे प्रेम कडून मी तुमच्या ग्रुपच्या प्रत्येकजनाबद्दल ऐकुन आहे. तुमचे खुप सारे किस्से मी ऐकले आहेत. आणि मला पण तुम्हा सर्वांना भेटायची खुप इच्छा होती. फायनली त्याच्या बर्थडे च्या निमित्ताने तरी आपली भेट झाली. आणि तुम्ही सर्वजण खुपच चांगले आहात. खरच प्रेम खुप लकी आहे. कारण त्याच्याजवळ एवढा छान मित्रपरिवार आहे. आणि तुम्ही सर्व खुप भारी आहात....!😊आरव : आणि प्रेम....?वैष्णवी : म्हणजे....?🤔आरव : अरे म्हणजे....! तु आम्हा सर्वांचे एवढे मनापासून कौतुक केलेस. पण प्रेम बद्दल काही बोलली नाहीस. तो कसा वाटतो तुला...? * आरव च्या या प्रश्नाने वैष्णवी थोडा वेळ शांत झाली होती. पण सर्वजण ती काय बोलते याची वाट पहात होते, सर्वांना असं पाहून ती पुन्हा बोलायला लागते...वैष्णवी : त्याच्याबद्दल काय बोलायचं...! एक मित्र म्हणुन तो खुपच चांगला आहे. खुप केअर करतो तो सर्वांची. थोडा हळव्या मनाचा आहे. पण छान आहे.आरव : तुला एक विचारू....! फक्त राग मानू नकोस, कारण प्रेम ने या बद्दल तुझ्याशी काही बोलायचं नाही, अशी धमकीच दिली आहे, तरीही तो आमचा मित्र आहे, आणि आमचा सर्वांचाच त्याच्यावर खुप जीव आहे. आणि त्याच्याबाबतीत सर्व काही चांगलं व्हावं अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. वैष्णवी : म्हणजे नक्की काय बोलायचं आहे तुला...?आरव : मला माहितीये की तुझ्या लक्षात आलच असेल मला काय बोलायचं आहे ते, तरीही विचारतो आम्हाला हे समजेल का... तु प्रेमला नकार का दिला ते...! तुला नाही आवडत का तो....? मी जबरदस्ती नाही करत, तुझी इच्छा असेल तर बोल, नाहीतर आम्ही कोणीच याबद्दल बोलणार नाही. प्रॉमिस....! * वैष्णवी आता पुरती गोंधळुन गेली होती. आता पुढे काय बोलावं ते तिला सुचत नव्हतं. पण हे लोकं सर्व जाणुन घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे तिला कळले होते. त्यामुळे ती जास्त वेळ न घेता बोलू लागते...वैष्णवी : अरे असं काही नाही, खरं तर तो खुप छान आहे आणि कोणत्याही मुलीला आवडेल तो, फक्त प्रॉब्लेम माझा होता...! म्हणुन मी त्याला नाही बोलले.मम्मी : हे बघ बाळा...! मी प्रेमची तारीफ करत नाही, पण मनापासून सांगते, मला जसा हितेश आणि ताई आहेत, तसेच या ग्रुप मधील सर्वजण माझीच मुलं आहेत, असच मी समजते. आणि एवढे दिवस मी त्याला ओळखत आहे. तो यांच्यात सर्वात मोठा आहे, आणि खरच तो अगदी मोठ्या भावाप्रमाणे सर्वांची काळजी घेतो. आजपर्यंत त्याच्यासोबत मी कोणत्याही मुलीला पाहिलं नाही, पण मघाशी तुम्ही दोघे समोरून असे चालत येत होते तेव्हा एक आई म्हणुन मनात एकच गोष्ट आली, असं वाटलं की, काय छान लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसत आहे. मी तर असं समजुनच गेले होते की, तुमचं जमलं असेल, आणि प्रेम आम्हाला सरप्राइज देईल म्हणून... * मधेच ताई तिला बोलते...ताई : तु आम्हाला तरी सांगु शकते ना, काय प्रॉब्लेम तो, जर प्रेम तुला आवडत नसेल तर तसं सांग, किंवा अजुन कोणी आहे तुझ्या आयुष्यात. जे काही असेल ते बोल, आणि आम्ही कोणीच ही गोष्ट प्रेमला बोलणार नाही. प्रॉमिस...वैष्णवी : असं काही नाही...! मी कसं बोलू तेच मला कळत नाही. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे.आरव : बरं ठिक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगु. जे काही असेल ते... पण एक गोष्ट मी तुला सांगतो. इथे सर्वांना माहिती आहे. प्रेम किती चांगला मुलगा आहे ते, आम्ही त्याचे मित्र आहोत म्हणुन हे बोलत नाही. पण हे अगदी खरं आहे की, तु पहिली मुलगी आहेस जिला त्याने डायरेक्ट लग्नासाठी विचारलं आहे. याचा अर्थ त्याने एवढ्या दिवसात तुझ्यामधे काहीतरी चांगलं पाहिलं असेल. आता तो तुला त्याची लाईफ पार्टनर म्हणून बघतोय. तुझा प्रॉब्लेम जो काही असेल.... पण आमची सर्वांची तुला रिक्वेस्ट आहे की, खरच जर तो प्रॉब्लेम एवढा मोठा नसेल तर.... तु पुन्हा एकदा प्रेम बद्दल विचार करावा. बस् एवढच सांगायचं होतं. आणि प्लिज आम्ही तुला फोर्स वैगरे करत नाही. हा निर्णय तुझा आहे, आणि तो तुलाच घ्यायचा आहे. * आरवचे बोलुन झाल्यावर एक एक करून सर्वजण तिला प्रेमला होकार देण्यासाठी मनवत होते, ती आता पुरती गोंधळुन गेली होती. थोडा वेळ ती शांतपणे सर्वांचे ऐकुन घेते आणि त्यांचे बोलुन झाल्यावर ती बोलू लागते...वैष्णवी : तुम्ही सर्वजण बोलताय ते मलाही पटतंय, मी असं कधीच म्हणत नाही की, प्रेम मधे काही कमी आहे. तो खुप चांगला मुलगा आहे. पण प्लिज तुम्ही माझा प्रॉब्लेम समजुन घ्या. मला नाही जमणार हे सर्व... उगाच त्याला यामधे अडकवायला नको.आरव : वैष्णवी....! असा कोणता प्रॉब्लेम आहे की, जो तु आमच्याशी शेअर करू शकत नाहीस. तु जर बोललीच नाहीस तर आम्हाला कसे कळणार. तु बोल तरी मग आपण त्यातुन काहीतरी मार्ग काढू.वैष्णवी : खरं तर मला हा विषय इथे बोलायचा नव्हता, पण आता सांगतेच... माझं एकदा लग्न मोडलं आहे. आणि पुन्हा मला तसं काही करायचं नाही. आणि आता मला माझ्या मर्जीने लग्न करता येणार नाही. त्यामुळे मी प्रेमला नकार दिला होता. आरव : हे बघ...! जे झालं ते झालं...! मला फक्त तुला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुला प्रेम आवडतो का...?वैष्णवी : अरे...! कसं सांगु मी.... मलाच कळत नाही, मी जरी हो बोलले तरी माझा भाऊ तयार होणार नाही. तुम्हाला माहित नाही पण राघव माझ्याच एरिया मधे राहतो, कदाचित त्याला माहीत असेल माझा भाऊ कोण आहे ते....?राघव : कोण आहे...! नाव तरी सांग....?वैष्णवी : सुधाकर सुर्वे....! त्याची बहीण आहे मी.राघव : अरे बाप रे....! हे कधी सांगणार तु....!आरव : नाव ऐकल्यासारखे वाटतेय...!राघव : हो....! खुप मोठं नाव आहे हे, आणि तेवढीच दहशत पण आहे त्यांची, आमच्या एरिया मधील भाई म्हणून प्रसिद्ध आहेत. आरव : ठिक आहे ना...! आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे. तशी वेळ आली तर आम्ही पण काही कमी नाही आहोत. आपल्या शहरात आमच्या नगराचे नाव पण तेवढच प्रसिद्ध आहे. पण आपल्याला तशी वेळ येऊन द्यायची नाही. आपण लग्नासाठी रितसर मागणी घालु. मग बघु पुढे काय होईल ते.....वैष्णवी : आरव...! ऐक ना....! आपल्याला असं काहीच करायचं नाही आहे, आणि मला माहित आहे याचं पुढे काही नाही होणार आहे, त्यामुळे उगाच या विषयावर जास्त बोलुन काही फायदा नाही. आता प्रेम येईल त्याच्यासमोर हा विषय नको बोलायला. आज त्याचा वाढदिवस आहे. उगाच त्याचा मुड ऑफ नको व्हायला. आरव : पण आमची इच्छा होती की त्याला या वाढदिवसाला सरप्राइज गिफ्ट देता येईल पण काय करणार. जाऊ दे आता....वैष्णवी : आरव....! प्लिज मला समजुन घ्या. 🙏🏻आरव : बरं ठिक आहे, आत्ता पुरता हा विषय इथेच थांबवु, पण फक्त आत्तापुरता....! तु माझा नंबर घे, आपण या विषयावर नंतर बोलू. * या लोकांच्या गप्पा चालु असतात तेवढ्यात रमेश आणि प्रेम तिथे येतात. प्रेम : सॉरी... ! वैष्णवी...! तुला या लोकांनी खुप त्रास दिला असेल..., मला माहित होतं ते, पण काय करणार याने अख्खा मार्केट फिरवला, एका टी शर्ट साठी. * त्याच्या अशा बोलण्याने सर्वजण हसायला लागतात. पुढे डिनर करत खुप गप्पा गोष्टी होतात. वैष्णवी आता सर्वांशी मनमोकळे बोलत होती. डिनर झाल्यावर सर्वजण हॉटेल बाहेर पडतात. प्रेम हॉटेल चे बिल पेड करतो. तिथेच जवळ असलेल्या आइस्क्रीम पार्लर मधे येतात. सर्वजण आपापल्या आवडीच्या फ्लेवर चे आईस्किम घेतात. पुन्हा तिथेही गप्पा चालु होत्याच....वैष्णवीला लवकर घरी जायचं होतं पण तरीही ती सर्वांसोबत खुप एंजॉय करत वेळ घालवत होती. अखेरीस ती प्रेमला आणि बाकी सर्वांना बाय बोलुन जायला निघते. राघव तिच्याच एरिया मधे रहात होता म्हणून तो तिला बाईकवरून तिच्या घरापासून थोड्या अंतरावर सोडतो.दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघेही ऑफिसमधे बोलत असतात...वैष्णवी : प्रेम...! तुझे मित्र खरच खूप छान आहेत. प्रेम : हो...! ना...! आहेतच...! पण मी बाहेर गेलो होतो तेव्हा हे लोक काही बोलले नाहीत ना...?वैष्णवी : कशाबद्दल...? 🤔प्रेम : अरे... म्हणजे, माझ्याबद्दल काहीतरी बोलले असतीलच.वैष्णवी : अच्छा...! हो तर...! खुप तारीफ होत होती तुझी...😊प्रेम : नक्की ना...! वैष्णवी : अरे खरच बोलतेय मी, सर्वांचा खुप जीव आहे तुझ्यावर... मम्मी, ताई, आणि सर्वच तुझ्याबद्दल खूप काही सांगत होते.प्रेम : अच्छा....! पण मला थोडं टेन्शन आलं होतं, कारण तु पहिल्यांदा आमच्या ग्रुप मधे आली होतीस. वैष्णवी : कसलं टेन्शन...?🤔प्रेम : काही नाही...! ते जावू दे, तु एंजॉय केला ना, मग बस् झालं.वैष्णवी : हो... रे...! मी पण असं खुप दिवसांनी बाहेर पडली होती.प्रेम : का बरं...! तुझे मित्र मैत्रिणी असतील ना...? मग त्यांच्यासोबत तु जात नाहीस का बाहेर कुठे...?वैष्णवी : आहेत तसे मोजकेच...! पण असं बाहेर कुठे नाही जात मी.प्रेम : का....? वैष्णवी : घरातुन परमिशन नाही भेटत, माझा भाऊ नाही पाठवत कुठे.प्रेम : मग काल कशी आलीस...?वैष्णवी : तो गावी गेला आहे म्हणुन मला येता आलं, तो असता तर मी नसते आले.प्रेम : अच्छा...! एवढा स्ट्रिक्ट आहे का...?वैष्णवी : हो...! त्याला नाही आवडत हे सर्व.प्रेम : पण मित्रांसोबत बाहेर थोडा एंजॉय केला तर काय हरकत आहे. वैष्णवी : ते जावू दे....! तुला गिफ्ट आवडलं का...?प्रेम : हो...! खुप छान बाप्पाची मूर्ती आहे, ताईने देवाऱ्यात ठेवली आहे.वैष्णवी : 😊 * अशाच गप्पा मारत त्यांचे काम चालू होते.काही दिवस असेच निघुन जातात. प्रेम ने पुन्हा हा विषय तिच्यासमोर कधी काढला नाही पण ती त्या दिवसांपासून त्याचा विचार नक्कीच करत होती. आणि त्याच्या रोजच्या सहवासामुळे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे ती त्याच्यात गुंतत चालली होती.प्रेमला याची कल्पना आली होती पण पुन्हा तीच चुक त्याला करायची नव्हती. वैष्णवी मात्र त्याच विचारात होती, ती स्वतःहून त्याला बोलू शकत नव्हती. जेव्हा कधी तिच्या मनात हा विचार यायचा, तेव्हा समोर तिचा भाऊ दिसायचा. त्या भीतीने तिनेही तिच्या मनातील गोष्ट त्याला बोलुन दाखवली नाही. एक दिवस अचानक आरव प्रेमला भेटायला त्याच्या कंपनीत येतो. त्याला पाहून वैष्णवी पण बाहेर येते. तिघेजण काही वेळ थोड्या गप्पा मारतात. तो निघताना वैष्णवीला इशाऱ्यानेच कॉल कर असे सांगतो. ती पण समजून जाते.एका रविवारी वैष्णवी आरव चा नंबर घेऊन त्याला पिसीओ वरून कॉल करते....आरव कॉल रिसिव्ह करतो....वैष्णवी : हाय...! आरव...! मी वैष्णवी बोलतेय.आरव : अरे हा...! बोल....! कशी आहेस तु...?वैष्णवी : मी ठिक आहे, तुम्ही सर्व कसे आहात...?आरव : आम्ही सर्व पण मजेत...😊वैष्णवी : अच्छा...! तु कॉल करायला सांगितला होतास, पण मी विसरून गेले. सॉरी....!आरव : ठिक आहे ना....! आज केलास ना....!😊वैष्णवी : बरं बोल...! काय बोलायचं होतं...?आरव : हे बघ मी त्या दिवशी जास्त काही बोलू शकलो नाही. पण माझी मनापासून इच्छा आहे की तु प्रेम बद्दल पुन्हा एकदा विचार करावा, तो खरच खूप चांगला मुलगा आहे. आणि हे मी त्याचा मित्र आहे म्हणून बोलत नाही. विश्वास ठेव माझ्यावर. आणि बाकी तुझा जो काही प्रॉब्लेम असेल तो मला सांग. आपण त्यातुन काहीतरी मार्ग काढू.वैष्णवी : अरे...! आता कसं सांगु तुला...!आरव : हे बघ...! काहीच संकोच करू नको. हि गोष्ट मी कोणालाही बोलणार नाही अगदी प्रेमला सुद्धा नाही. मग तर झालं...!वैष्णवी : अरे...! तसं काही नाही, पण मी जरी या गोष्टीला तयार झाले तरी माझ्या घरातुन याला विरोधच असणार. हे मला माहीत आहे. मग मी उगाच कशाला त्याला आशेवर ठेऊ. तुच सांग...आरव : पण तु आधीच का हे सर्व ठरवते की, घरातले तयार होणार नाहीत म्हणून...?🤔वैष्णवी : कारणच तसं आहे.....!आरव : काय कारण आहे...?वैष्णवी : तु एवढं बोलतोय तर सांगते, पण खरच कोणाला, म्हणजे प्रेमला पण बोलू नको हे...आरव : सांग तु....! मी नाही कोणाला बोलणार. प्रॉमिस.वैष्णवी : माझं एक लग्न मोडले आहे, माझ्यामुळे...!आरव : म्हणजे नक्की काय झालं होतं...?वैष्णवी : माझं एका मुलावर प्रेम होतं, माझ्या हट्टापायी आमचं लग्न पण ठरलं होतं. पण लग्नाच्या काही दिवस आधी माझं आणि त्याचं काही कारणावरून भांडण झालं. त्यामुळे त्याने त्या रागाच्या भरात लग्नाला नकार दिला. या सर्व गोष्टीचा त्रास घरातील लोकांना झाला. माझ्यामुळे सर्वजण त्यांना बोलत होते. मला पण वाईट वाटत होतं. पण काय करणार जे व्हायचं होतं ते झालं. तेव्हापासुन मी हा विचार डोक्यातून काढून टाकला आहे. आता घरातले ठरवतील तसं....! माझ्याकडे आता त्यांच्यासमोर बोलायला काहीच जागा शिल्लक राहिलेली नाही. म्हणूनच मला हे सर्व नाही करायचं आहे. आरव : सॉरी...! जे काही झालं ते खुप वाईट झालं पण, एक गोष्ट सांगशील मला...! असं काय कारण होतं की, ऐन वेळी लग्न मोडलं तुमचं...? * वैष्णवीला आता रडायला आलं होतं. ती डोळे पुसत असतानाच हातातील एक एक रुपयांचे कॉइन खाली पडतात. ती खाली वाकून ते सर्व कॉइन जमा करते. आणि पुन्हा आरवशी बोलू लागते.वैष्णवी : आरव...! ते जाऊ दे ना...! मला आता तो विषय काढायचा नाही.आरव : बरं ठिक आहे...! आपण नको बोलायला त्या विषयावर...! पण आता माझं थोडं ऐकशील.वैष्णवी : हो....! बोल...!आरव : हे बघ जे झालं ते झालं...! तो एक भुतकाळ होता. ते सर्व तु विसरून जा. पण यातुन बाहेर पडावं लागेलच ना. म्हणुन मी बोलतोय की, झालेलं सर्व विसरून तु पुन्हा तुझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करावी. आणि त्यासाठी प्रेम तुझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे असं मला वाटतं. वैष्णवी : तु बोलतोय ते सर्व मला पटतंय रे...! पण कसं सांगु तुला...! माझा भाऊ नाही तयार होणार यासाठी. मागे जे काही झालं आहे, तेव्हाच तो बोलुन गेला आहे, इथून पुढे जर असं काही कानावर आलं तर मी दोघांनाही मारून टाकेन. आणि तुम्हाला नाही माहित तो कसा आहे तो...! त्यामुळे मला आता पुन्हा असं काही करायचं नाही. आरव : बरं...! मला आता फक्त एक गोष्ट सांग...! तु पुढे जाऊन कोणाशी तरी लग्न करशीलच ना...? मग तो मुलगा प्रेम असेल तर तुला चालणार नाही का...?वैष्णवी : हे शक्य नाही रे...!आरव : का शक्य नाही...? तु मला सांग...! तुला खरच प्रेम बद्दल काहीच वाटत नाही. म्हणजे तुझ्या मनात त्याच्याबद्दल मैत्रीच्या पुढे असं काहीच नाही.वैष्णवी : असं जरी असेल तरी त्याचा काही फायदा नाही. मग मी हा विचार का करू, तुच सांग...!आरव : म्हणजे...! काहीतरी आहे...! बरं आता स्पष्टच विचारतो. तुला त्याच्यासोबत पुढचं आयुष्य घालवायला आवडेल...?वैष्णवी : खरं तर... होय...! तो खरच खुप चांगला आहे. पण माझं नशीब फुटकं आहे त्याला काय करणार....!😔आरव : हे बघ....! आपण आता जरा पॉझिटिव्ह विचार करूया. तुझा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की, तुझ्या भावाला तु प्रेम प्रकरण केलेलं चालणार नाही. बस् एवढच ना....!वैष्णवी : हो....! आरव : ओके....! मग एक काम करू, मी त्याच्या घरी सांगतो सर्व. आणि ताई समजून घेईल याची मला खात्री आहे. आम्ही रितसर तुला लग्नाची मागणी घालायला येऊ. मग बघु काय होतं ते. वैष्णवी : पण माझ्या घरी हे तर कळणारच ना, की आम्ही दोघे एकत्र काम करतोय ते. मग त्यांना वाटणार की यांचे आधीपासून काहीतरी होतं.आरव : मग एक काम कर....! जर तुझी खरच इच्छा असेल की, प्रेम तुला तुझ्या आयुष्यात हवा आहे, तर मग तु काहीतरी कारण सांगुन हा जॉब सोड. वैष्णवी : त्याने काय होणार आहे, आणि मी काय कारण सांगु. माझे मामा आमच्या साहेबांना चांगले ओळखतात. त्यांनीच मला तिथे जॉबला लावले होते.आरव : तु असं काहीतरी कारण सांग जे घरातील लोकांना पटेल, किंवा आपण दुसरा जॉब शोधु तुझ्यासाठी जवळच कुठेतरी, मग तर झालं...वैष्णवी : बरं....! बघते मी....!आरव : बघते नाही....! लगेच काय तो निर्णय घे, तुला दुसरा जॉब मी दोन दिवसात बघतो.वैष्णवी : ठिक आहे...! त्या जॉब चे नक्की झाले की सांग, मग मी घरी तसं सांगेन....!आरव : वेरी गुड....! वैष्णवी : आरव.....! पण हे सर्व तु प्रेमला नको सांगु लगेच. प्लिज....!आरव : ठिक आहे...! नाही सांगणार...! पण एका अटीवर...! तुझा दुसरा जॉब लागल्यावर तु स्वतः त्याला सांगशील सर्व.वैष्णवी : ते बघू नंतर....!आरव : अजुन किती दिवस त्याला वाट पहायला लावणार आहेस. आता तर फक्त जे मनात आहे तेच तर बोलायचं आहे. का मी सांगु...! वैष्णवी तयार झाली म्हणून....!😊वैष्णवी : ये....! नको...! मी बोलेन नंतर त्याला. 😊आरव : गुड....! चला आता....! एक मोठं टेन्शन कमी झालं माझं....!वैष्णवी : आरव...! थॅन्क्स....! तुझ्यासारखा समजूतदार मुलगा माझ्या भावाच्या जागी असता तर किती बरं झालं असतं. कदाचीत ही वेळ आली नसती.आरव : अरे...! ठिक आहे ना...! असं समज मीच तुझा भाऊ आहे...! मग तर झालं...!वैष्णवी : काय बोलू मी....! खरच खुप छान वाटलं तुझ्याशी बोलुन. आरव : हे बघ आता तुझ्याजवळ माझा नंबर आहे. तु मला कधीही कॉल करू शकते. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तु माझ्याशी बोलू शकते.वैष्णवी : हो....! नक्की करेन मी कॉल....! वेळ मिळेल तेव्हा.आरव : बरं...! चल आता...! तु पण जा घरी, खुप वेळ झाला आपण बोलतोय. नाहीतर शोधत येतील कुठे गेली म्हणुन....!😊वैष्णवी : एवढं काही नाही रे....! पण तु प्रेमला वगैरे सांगु नकोस हे, आपलं बोलणं झालेलं.आरव : हो...! नाही सांगणार....! ओके.वैष्णवी : आरव... पुन्हा एकदा थॅन्क्स...! आज जरा मन हलकं झालं असं वाटलं.आरव : छान....! करत जा कॉल...आणि काळजी घे.वैष्णवी : हो...! बाय...!आरव : बाय...! * आज आरव सोबत बोलुन तिला खुप मन हलकं झाल्यासारखे वाटत होते. घरातून निघून खुप वेळ झाला होता म्हणुन ती तिथून घाईतच घरी निघुन जाते.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️