दोन कुटुंबं होती. दोन्ही मध्यमवर्गीय.
पहिलं कुटुंब: जाधव कुटुंब. या कुटुंबात दोन मुलं — प्रणव आणि प्रेमा. पण प्रणव हा प्रत्यक्षात प्रेमा चा भाऊ नव्हता. तो तिच्या मामाचा मुलगा होता. त्याचे आई-बाबा लहानपणीच गेल्यामुळे तो लहानपणापासून प्रेमा च्या घरी वाढला. त्यांचं आडनाव पवार.
दुसरं कुटुंब: पाटील कुटुंब. यामध्येही दोन मुलं — प्रज्वल आणि प्रितम.
प्रज्वल आणि प्रणव हे एकाच वर्गात. एकदम घट्ट मित्र — एक जीव, दोन शरीरं.
प्रेमा आणि प्रितम हेही एकाच वर्गात होते. लहानपणापासून यांचं नातं बहिण-भावाचं.
प्रेमा आणि प्रितम हे आता MBBS च्या पहिल्या वर्षात होते, तर प्रज्वल आणि प्रणव BA च्या शेवटच्या वर्षात होते. प्रज्वल आणि प्रणव शिक्षणात फारसे हुशार नव्हते, पण त्यांचं एकच स्वप्न — पोलिस भरती.
एक दिवस, प्रेमा आणि प्रितम कॉलेजला निघाले होते. रिक्षा मिळत नव्हती. प्रेमा एका रिक्षावाल्याला थांबवते, पण तो तिला अवमानास्पद बोलतो, "काय बायम्या! तू येऊ नको, हिला घेऊन जातो!"
हे ऐकून प्रेमा चिडते आणि त्याला कानाखाली देते. प्रितम घाबरतो, विचारतो, "कशाला मारलंस त्याला?"
ती फक्त म्हणते, "माझं डोकं आधीच फिरलंय..."
त्यांचा दिवस सरतो, पण तो रिक्षावाला कॉलेज गेटबाहेर उभा असतो. प्रितम त्याच्याकडे परत पाहतो, पण खाली मान घालून जातो.
तेवढ्यात, तिथं आधीच प्रणव आलेला असतो.
रिक्षावाला आणि प्रणवमध्ये झटापट होते. रिक्षावाल्याच्या सोबत आणखी एकजण असतो. तो जोरात प्रणवच्या डोक्यात मारतो. अजून एक मारणार इतक्यात प्रज्वल येतो आणि त्या गुंडांवर तुटून पडतो.
सर्वजण घाबरतात. प्रेमा खाली येते. सगळ्यांचं लक्ष प्रणवकडे असतं, पण ती प्रज्वलकडे पाहते आणि म्हणते, "लागलं तर नाही ना...?"
थोड्या वेळाने प्रितम खाली येतो. तो म्हणतो, "जर तुम्ही दोघं आले नसते, तर मीच जाणार होतो!" सगळे हसतात आणि घरी परततात.
घरी गेल्यावर वडील दोघांना सुनावतात: "काय मूर्खपणा केलात! ज्यांना मारलात ते सरपंचाचे माणसं आहेत. सरपंच कोण हे माहित आहे ना तुम्हाला?"
'अबा' — गावचा सध्याचा सरपंच — एक खतरनाक माणूस. आधीच्या सरपंचाचा खून करून तो सत्तेवर आला होता.
वडील म्हणतात, "तुम्हाला पोलिस व्हायचंय ना? मग हे काय? गुंडगिरी कराल?"
प्रेमा पुढे येते आणि म्हणते, "मी दोघांना समजावते..."
कॉलेजबाहेर प्रज्वल आणि प्रणव बसलेले असतात. प्रेमा येते.
ती विचारते, "का मारलात? का असं केलंत?"
प्रणव संतापात म्हणतो, "का? कारण त्याने तुमच्यावर अपमानास्पद बोललं ना!" आणि रागात निघून जातो.
प्रज्वल कडे पाहून ती म्हणते, "ए माकडा … मारताना त्या मुलीकडे का पाहत होतास रे?"
प्रज्वल गोंधळतो, "अगं मी नाही पाहिलं… शप्पथ!"
ती रागाने म्हणते, "जाऊ दे. नको मला काही सांगू…"
प्रज्वल, प्रणवकडे बघून म्हणतो, "का असं बोलली रे?"
प्रणव हसून म्हणतो, "मंडादा, जेव्हा मुलीला मुलगा आवडतो, तेव्हा ती अशीच बोलते..."
दोघं पोलिस भरतीची तयारी करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मैदानात जायचं होतं.
प्रज्वल वेळेवर पोचतो… पण प्रणव येत नाही.
प्रज्वल खूप संतापतो. "याला काही गांभीर्यच नाही...!"
दिवसभर जातो.
संध्याकाळी प्रज्वल घरी परततो... आणि काय पाहतो?
घरात सगळे रडत आहेत.
प्रणव गेला होता... कायमचा.
त्याच्यावर अंत्यविधी होतो. सर्वत्र शांतता. पण प्रज्वलचं मन बेचैन.
प्रेमा त्याला म्हणते, "त्याने तर नेहमीच असं म्हटलं होतं – मी पोलीस नाही झालो तरी चालेल, पण माझा मित्र प्रज्वल नक्की होईल…"
ती रडत त्याला प्रणवची शपथ देते आणि म्हणते, "आता फक्त पोलिस हो, दुसरं काही नको!"
प्रज्वल आता फक्त एक ध्येय डोळ्यासमोर ठेवतो — पोलिस भरती. तो PSI होतो.
ट्रेनिंग संपवून घरी परततो.
पण प्रेमा कुठेच दिसत नाही...
तो पुन्हा संतापतो. आता कोणत्याही गुंडाला तो सोडत नाही.
एके दिवशी, त्याला तोच रिक्षावाला दिसतो. तो त्याच्या मागे धावतो. पकडून मारतो.
तो म्हणतो, "सांगतो, सगळं सांगतो!"
इतक्यात कोणीतरी त्याला गोळी मारून जातो.
प्रज्वलला आता शंका येते — सर्वात मोठा गुन्हेगार कोण? सरपंच?
तो सरपंचाला भेटायला जातो.
सरपंच म्हणतो, "मी नाही मारला. मी जर ठरवलं, तर समोरून मारतो, मागून नाही."
प्रज्वल पूर्णपणे गोंधळात पडतो.
प्रज्वल प्रेमा कुठे आहे हे शोधतो. तिच्या घरी विचारतो.
आई म्हणते, "तिची एक फ्रेंड होती, तिच्याच घरी गेली असावी…"
बाबा म्हणतात, "मीही कामावर होतो…"
प्रज्वल विचारात गुंततो. प्रीतम म्हणतो काय रे दादा काय झाला, प्रज्वल त्याला सांगायला लागतो एरर तिचे आई वडील असे असे सांगत होते, मला काय सूचना... प्रीतम म्हणतो जाऊदे ना कोण तरी असेल मुलगा तिच्या सोबत.
आन दोघे जेवायला जातात, पण प्रज्वलच्या डोक्यात तेच सुरु असता, त्याला अचानक डोक्यात येता मी तर प्रीतम ला कोणत्या मुलं बद्दल काय बोललोच नाही पण... मग याला कसा माहित मुलगा होता ते...
त्याला प्रीतम वर थोडा सौंशय येतोय, म्हणून तोह त्याला बोलावतो अन विचारतो.
प्रज्वल विचारतो, "तुला कस माहित तिला कोणी बोलवलं होतं...?"
प्रितम गोंधळतो. "तूच तर म्हणालास ना…?"प्रज्वल म्हणतो मी तर कोणत्या मुलाचा नाव न्हवता घेतला, मग तू कसा काय बोलला... तो टाळाटाळ करतो आन म्हणतो मला झोप आली मी झोपतो दादा...
पण प्रज्वल आता त्याच्या वर पूर्ण लक्ष्य द्यायला लागतो, त्याला असा वाटतं हा काय तरी लपवतोय आपल्या पासून..
प्रज्वल दुसऱ्या दिवशी प्रीतम चा पाठलाग करत असतो, तोह कॉलेज च्या मागच्या जंगलात जातो जिथं कोणीच नाही जातं..
तो ही मागे मागे जातो... आन त्याला खिडकीतून प्रेमा दिसते... खुडची ला बांधलेली...
तोह तिथूनच उडी मारतो अन.
प्रीतम त्याला बगताच घाबरतो, तोह वेड्या सारखा बोलायला लागतो दादा जा इथून नाय तर तुला ही मारेल, नाही नाही मी हिला मारेल... ही जर माझी नाही ना झाली तर कोणाची नाही होऊ देणार.प्रितम म्हणतो, "मला ती लहानपणापासून आवडायची. पण ती फक्त तुझ्या भावाकडे पाहायची...
प्रेमा घाबरते प्रेमा रडायला लागते, प्रेमा म्हणते अरे...
"प्रितमा! तू माझ्या भावासारखा होतास…!"
प्रितम हसतो, "भावासारखा? मी तुला कधीच माझी बहीण नाही मानल…"
प्रज्वल रडत म्हणतो, "बाळा… मी काय कमी केलं तुझ्यासाठी?"
प्रितम ओरडतो, "तू? तू आणि प्रणव — माझं कायम हसत होतात… मला कमी लेखत होतात! आणि आता हीही…
आता दोघांनाही संपवलं पाहिजे…!"
तो बंदूक उचलतो…
पण प्रज्वल त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो…
गोळी सुटते…प्रज्वल ती गोळी चुकवतो अन प्रेमा कशी बशी सुट्टे अन्न त्याला मागून लाकूड मारते, प्रीतम खाली आदलतो, ती बंदूक प्रज्वल हाती घेतो अन त्याला छातीत गोळी झाडतो...
प्रज्वल आणि प्रेमा त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर येतात… डोळ्यांत अश्रू…
पण एका जीवाला गमावल्याशिवाय हे सत्य उघड होत नाही.
"दोन जीव... एक स्वप्न... पण मध्ये आला विश्वासघात."