अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४७ )
* आज आरवशी बोलुन वैष्णवीला खरच खुप बरं वाटत होतं. त्या दोघांनी मिळुन ठरवलेल्या प्लान प्रमाणे आरव तिला स्टेशन जवळच एका ऑफिस मधे जॉब बघतो. वैष्णवीचा कॉल आल्यावर तो तिला त्याबद्दल बोलतो. ती पण त्या ऑफिस मधे जाऊन इंटरव्ह्यूव देते. तिला लगेच दुसऱ्या दिवसापासूनच जॉइन करायला सांगितले होते.
आता आधीच्या ऑफिसमध्ये म्हणजे प्रेमच्या कंपनीत रिजाईन द्यावी लागणार होती. या गोष्टीचे तिला थोडं टेन्शन आले होते. कारण प्रेमला हे कळल्यावर तो काय विचार करेल. पण सांगावं तर लागणारच होतं.
अखेरीस ती दुसऱ्या दिवशी ऑफिस मधे त्यांच्या बॉसला रिजाईन लेटर देते. आणि त्यांना सांगते, मी उद्यापासून ऑफिस मधे नाही येणार आहे. बॉस तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती.
हि गोष्ट प्रेमपर्यंत पोचते. लंच टाईम मधे प्रेम तिला विचारतो...
प्रेम : असा अचानक का निर्णय घेतलास, जॉब सोडण्याचा, काही प्रॉब्लेम आहे का....? का माझ्यामुळे सोडतेय जॉब...! तसं असेल तर तु नको सोडुन जाऊ, मी दुसरा जॉब बघेन.
वैष्णवी : काहीतरी काय बोलतोय...! अरे मला दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळाला आहे. म्हणुन मी हा जॉब सोडतेय. बाकी काही नाही.
प्रेम : अच्छा...! असं अचानक...! आणि मला पण सांगाव असं वाटलं नाही तुला...?
वैष्णवी : अरे मी सांगणारच होती तुला,...!
प्रेम : कधी....! निघुन गेल्यावर...?
वैष्णवी : अरे....! एवढा काय चिडतोय. खरच मी सांगणार होते तुला. आणि खरं तर मलाच काल माझा भाऊ बोलला. "एवढ्या लांब बस ने वैगेरे जायची गरज नाही, हा जॉब स्टेशन जवळच आहे. आणि घरापासून जवळ आहे म्हणुन." मग काय करणार.
प्रेम : नाही करायचा... असं पण बोलू शकत होती ना...?
वैष्णवी : नाही बोलू शकत...! तुला माहीत नाही तो कसा आहे तो...!
प्रेम : ठिक आहे....! म्हणजे यापेक्षा चांगला जॉब असेल तो, चांगली लोकं असतील तिथे....!
वैष्णवी : अरे... असं काही नाही, मी बोलले ना तुला. तु उगाच याचा वेगळा अर्थ काढू नकोस. आणि मी करेन ना कॉल तुला कधीतरी.
प्रेम : अच्छा....!
वैष्णवी : का....! नको करू का....?
प्रेम : तुझी मर्जी....! मी काय बोलणार....!
वैष्णवी : हे बघ, नाराज होऊ नको, मी खरच कॉल करेन, आपण मित्र आहोत ना अजुन....!
प्रेम : ठिक आहे....! बघु किती कॉल करते ते...!
* एवढं बोलुन प्रेम तिथून आपल्या कामासाठी निघुन जातो.
संध्याकाळी घरी जाताना ती त्याला जाते म्हणुन निघत होती. प्रेम थोडा रागातच तिच्याकडे पहात होता.
ती निघून पुढे जाते, प्रेमला वाटते, कदाचित ती पुन्हा भेटेल ना भेटेल, आता थोडा वेळ तरी बोलू तिच्याशी. असा विचार करून तो पटकन आवरून कंपनीतून निघतो आणि त्या बस स्टॉप वर येतो. वैष्णवी तिथे बसची वाट बघत उभी होती.
तो तिच्याजवळ जाऊन तिला बोलतो....
प्रेम : सॉरी....! आणि बेस्ट ऑफ लक, तुझ्या नवीन जॉब साठी.
वैष्णवी : थॅन्क्स....! म्हणजे तुझा राग गेला ना...!
प्रेम : कसला राग....?
वैष्णवी : जो मघाशी मी निघताना तुझ्या नाकावर दिसत होता तो...!
प्रेम : हा....! खरं तर आला होता थोडा, पण म्हटलं जाऊ दे, पुढे काय होणार आहे हे कोणाला माहीत.
वैष्णवी : अच्छा...! म्हणुन एवढ्या घाईत आलास, मला सोडायला. मी काय कायमची हे शहर सोडून नाही चाललीय. 🙂
प्रेम : हो....! पण गेलीस तर, पुन्हा कधी भेटशील, आणि भेटशील की नाही हे ही माहित नाही, म्हणुन आलो.
वैष्णवी : असं का बोलतोय...! भेटू ना आपण, असच कधीतरी....!
प्रेम : पुढे कधी भेट होईल, आणि होणार नाही, ते माहित नाही. आज थोडा वेळ असेल तुझ्याजवळ तर आपण चहा कॉफी काहीतरी घेऊया...?
वैष्णवी : बरं चल...! कुठे जायचं....?
प्रेम : इथेच पुढे एक हॉटेल आहे, तिथे जाऊ...
वैष्णवी : बरं ठिक आहे... चल...!
प्रेम : तुला उशीर तर नाही होत ना...?
वैष्णवी : मुद्दाम बोलतोय ना....!🙂
प्रेम : नाही....! असच विचारलं...!
वैष्णवी : अच्छा...! नाही होणार उशीर, फक्त चहाच घ्यायचा आहे ना आपल्याला, मग असा किती वेळ लागणार आहे.
* प्रेम थोडा हसून तिच्याकडे बघत पुढे चालत असतो. ते दोघे जवळच असलेल्या एका हॉटेल मधे येतात. प्रेम तिला विचारून तिच्यासाठी कॉफी आणि स्वतःसाठी चहा मागवतो. चहा आणि कॉफी घेत दोघे गप्पा मारत बसलेले असतात.
मग थोड्या वेळाने वैष्णवी जायला निघते. प्रेम तिच्यासोबत बस स्टॉप पर्यंत येतो. थोड्या वेळात तिची बस येते. ती बस मधे चढते आणि तिथून त्याला बाय करते, तशी बस पुढे जाते. आणि तो त्या बस कडे पहात खुप वेळ उभा असतो.
कदाचित हि तिची आणि माझी शेवटची भेट असेल. तिच्यासोबत लग्न करून संसार थाटण्याचं स्वप्नही आता पूर्णपणे भंगले. असे त्याला वाटू लागले होते.
ती बस आता ट्रॅफिक मधून पुढे जाऊन दिसेनाशी होते. प्रेम तिथून घरी निघुन येतो.
रात्री जेवण वैगेरे झाल्यावर तो आरवकडे जातो. मैदानात ते दोघे गप्पा मारत बसलेले असतात.
प्रेम त्याला आज घडलेलं सर्व काही सांगतो. आरव त्याच्याकडे पाहून हसायला लागतो... त्याला असं हसताना पाहून प्रेम थोडा चिडून त्याला बोलतो.
प्रेम : इथे माझा सर्व प्लॅन फेल गेलाय आणि तुला हसायला येतंय....!🤔
आरव : अरे...! मी त्यासाठी हसत नाही...!
प्रेम : मग काय झालं हसायला...?🤨
आरव : बघ ना एक वेळ अशी होती, की मुली तुझ्या मागे लागायच्या आणि तु लांब पळायचा, आणि आज....! 😊
प्रेम : हास तु.... ! मजा घेतोय ना माझी...!
आरव : नाही रे....! पण तु एवढ्या लवकर हार कशी मानलीस...! ते कळलं नाही....!
प्रेम : म्हणजे....! काय बोलायचं आहे तुला...! काय करायला हवं होतं मी आता...? पुन्हा तिला विचारायला हवं होतं का...? आणि पुन्हा तेच ऐकुन घ्यायचं....! माझा भाऊ असा, माझा भाऊ तसा...!
आरव : अरे ते सर्व ठिक आहे, पण तु एवढ्या लवकर कशी काय हार मानलीस....?
प्रेम : म्हणजे....?
आरव : अरे म्हणजे...! ती काय कायमची इथुन गेलेली नाही ना....!
प्रेम : मग....!
आरव : मग काय....! तु तुझे प्रयत्न चालु ठेव, कधी ना कधी ती हा बोलेलच ना...!
प्रेम : आता काय फायदा आहे...! कसं कॉन्टॅक्ट करणार तिला...? तिच्याकडे थोडीच मोबाईल वगैरे आहे...?
आरव : अरे पण तुझ्याकडे तर आहे ना...!
प्रेम : पण तिने कॉल तर केला पाहिजे ना...!
आरव : करेल कॉल ती...! नको एवढं टेन्शन घेऊ. 😊
प्रेम : तुला एवढा कॉन्फिडन्स कसा रे....?🤔
आरव : ते माहित नाही...! पण तिचा कॉल येणार तुला हे नक्की....!
प्रेम : कशावरून बोलतोय तु हे सर्व....! फक्त एकदाच भेटलात तुम्ही....!
आरव : एकदा नाही दोनदा....!😊
प्रेम : दुसऱ्यांदा कधी....?🤔
आरव : अरे...! विसरलास का...? कंपनीत एकदा भेटलो होतो.
प्रेम : अच्छा तेव्हा...! पण तरीही मला नाही वाटत की, ती कॉल करेल.
आरव : चल लावतो पैज मग...! कॉल आला तर काय देशील....?
प्रेम : तसा येईल रे एकदा दोनदा...! नंतर विसरून जाईल.
आरव : अरे मग बस् ना....! एकदा आला तरी खुप आहे. त्यानंतर तुझ्यावर आहे, तिला पुन्हा कॉल करायला भाग पाडलं पाहिजेस.
प्रेम : अच्छा...! पण तिच्याशी या विषयावर बोलायचं म्हणजे टेन्शन येतं. ती पुढे काय बोलणार हे माहीत आहे मला.
आरव : एक गोष्ट सांगु....!
प्रेम : बोल....!
आरव : मला तर असं वाटतं की, ती तयार होईल, जर तु नीट प्रयत्न केलेस तर...!
प्रेम : म्हणजे मी काय करायला हवं, असं तुला वाटतं.?
आरव : ते पण आता मीच सांगु...!
प्रेम : तुच सांग मग आता....! तुला जर एवढं वाटतंय तर....!
आरव : हे बघ....! तुला तिच्याशी काय आणि कसं बोलायचं हे तुच ठरवणार आहेस. फक्त तिला तुझ्यावर विश्वास निर्माण झाला पाहिजे. तिच्या मनात जी घरातल्या लोकांविषयी भीती आहे, ती तू दूर केली पाहिजेस. तर पुढे काहीतरी होईल.
प्रेम : तु जे बोलतोय ते मला कळतंय पण, खरच ती हो बोलेल का रे लग्नासाठी.
आरव : ते सर्व तुझ्यावर आहे. तु तिला कसं विश्वासात घेतोय त्यावर पुढे काय होणार ते अवलंबून आहे. खुप चांगली मुलगी आहे. अशी हातातून जाऊन देऊ नको. फक्त तिला तु तयार कर. बाकी तिच्या भावाचे टेन्शन तु नको घेऊ, इथे तुझा भाऊ पण खंबीर आहे. उचलुन आणू तशी वेळ आली तर.
* आरवच्या अशा बोलण्याने प्रेम थोडा भाऊक होतो आणि त्याला मिठी मारत बोलतो...
प्रेम : थॅन्क्स भावा...! माहित नाही पण नक्की मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य असेल, म्हणूनच तुम्ही मला भेटलात. 😔
आरव : अरे हो....! आता काय रडवतो का...?😊
प्रेम : नाही रे...! पण हे खरं आहे.
आरव : बरं ओके...! आणि हो आता असं तोंड पाडून बसू नको, उद्यापासून तयारीला लागा, आणि मला खात्री आहे, सर्व काही तुझ्या मनासारखं होईल.
* दोघे थोडा वेळ गप्पा मारून आपापल्या घरी झोपायला जातात. प्रेमला आरवाच्या बोलण्याने खुप छान वाटत होते. त्या रात्री त्याला छान झोप लागते.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो ऑफिसला पोचतो. वैष्णवी तिथे नसणार हे त्याला माहीत होते. पण तशी मनाची तयारी करूनच तो कामाला लागतो.
इकडे वैष्णवीने पण नवीन ऑफिस जाईन केले होते. तिचा ऑफिसमधील पहिला दिवस काम समजुन घेण्यातच जातो. दुपारी लंच मधे दोघेही एकमेकांना मिस करत होते.
संध्याकाळी ऑफिसमधुन सुटल्यावर वैष्णवी प्रेमला कॉल करते. प्रेम पण घरी जायला निघालेला होता. मोबाईल ची रिंग होताच तो पटकन कॉल रिसिव्ह करतो, समोरून वैष्णवी बोलते...
वैष्णवी : हाय...! कसा आहेस...?
प्रेम : मी ठिक आहे...! तु कशी आहेस...? आणि कसा गेला आजचा पहिला दिवस, नवीन ऑफिस मधला...?
वैष्णवी : ठिक होता...! थोडं नवीन काम आहे, त्यामुळे ते समजुन घेण्यातच दिवस गेला.
प्रेम : अच्छा...! बाकी कसे आहेत तिथले लोक...?
वैष्णवी : छान आहेत...! जास्त मुलीच आहेत. दोन मुले आहेत फक्त. आणि बॉस...!
प्रेम : अच्छा...! कुठे आहे तुमचे ऑफिस...?
वैष्णवी : स्टेशन जवळच आहे, बस स्टॉप आहे तिथेच.
प्रेम : छान...! मग आता लवकर घरी पोचत असशील ना...!
वैष्णवी : हो...! पंधरा वीस मिनिटात पोचते घरी.
प्रेम : छान...! मग सुट्टी कधी असते...?
वैष्णवी : रविवारी....!
प्रेम : छान....! बरं जा मग घरी आता.
वैष्णवी : का...! बोल ना...! अजुन कॉइन आहेत शिल्लक....!😊
प्रेम : अच्छा.....!
* पुढे थोडा वेळ ते दोघे कॉलवर गप्पा मारतात.
आता हळू हळू हे रोजचेच झाले होते. वैष्णवी रोज न चुकता प्रेमला कॉल करत होती. दोघे खुप बोलत होते पण त्यांची प्रत्यक्षात भेट होत नव्हती.
एक दिवस आरव सोबत बोलता बोलता तो हि गोष्ट त्याला बोलतो. आरव त्यांच्या भेटीसाठी एक प्लॅन करतो. एका रविवारी ग्रुप मधील सर्वजण मिळुन जीवदानी देवीला जायचं ठरवतात. यावेळी वैष्णवीला पण प्रेम घेऊन येतो. तिची पण इच्छा होती म्हणुन ती लगेच यायला तयार होते.
सर्वजण ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी आठ वाजता स्टेशनला भेटतात. वैष्णवी पण घरी सांगुन आलेली असते. देवीला जातेय असं सांगितल्यामुळे तिला घरून परमिशन मिळाली होती.
प्रेमला आणि सर्वांना भेटुन तिला पण आनंद झाला होता. ट्रेन चे तिकीट काढून ते सर्वजण दादरला पोचतात. तिथून विरार... असा ट्रेन चा प्रवास करत विरारला पोचतात. या प्रवासात ते सर्वजण खुप धमाल मजा मस्ती करत होते. मधेच कोणीतरी प्रेम आणि वैष्णवीला नकळत चिडवत होते.
वैष्णवी आता सर्वांशी मनमोकळे बोलत होती त्यामुळे ती पण एंजॉय करत होती.
देवीच्या पायऱ्या चढताना सर्वांची दमछाक झाली होती. थोडा थोडा ब्रेक घेत सर्वजण वरती देवीच्या मंदिरात पोचतात आणि दर्शनाच्या लाइन मधे उभे राहतात. त्या वेळेत पण ते खुप मजा मस्ती करतात.
अखेरीस देवीचे दर्शन घेऊन सर्वजण पायऱ्या उतरून खाली येतात. तिथे एका हॉटेलमधे पोटभर खाऊन घेतात. मग निघताना सर्वजण बस ने जायचं ठरवतात. तिथून ते बस स्टँड वर येऊन थांबतात.
थोड्याच वेळात त्यांची बस येते. सर्वजण पटापट बसमधे जाऊन आपापली सीट पकडतात.
वैष्णवी प्रेमच्या बाजुलाच बसते. पुढील एकदिड तासाच्या प्रवासात त्यांच्यात खुप गप्पा होतात.
अखेरीस बस शेवटच्या स्टॉप वर येऊन थांबते. सर्वजण एक एक करून खाली उतरतात.
एकमेकांचा निरोप घेऊन आपल्याला घरी जायला निघतात. प्रेम वैष्णवीला आणि इतर सर्वांना बाय बोलुन रमेश आणि आरव सोबत रिक्षामधून घरी जायला निघतो. वैष्णवी राघवसोबत चालतच घरी जायला निघते. बाकीचे सर्व पण आपापल्या घरी निघुन जातात.
पुढे काही दिवस असेच निघुन जातात. वैष्णवी मात्र न चुकता रोज ऑफिस मधुन सुटल्यावर प्रेमला कॉल करत होती. त्यांना आता एकमेकांची सवय झाली होती. पण प्रेम त्या विषयावर कधीच तिच्याशी बोलत नव्हता. खरं तर वैष्णवीला मनातुन वाटत होतं की, पुन्हा त्याने तिला प्रपोज करावा आणि तिने त्याला होकार द्यावा. पण ती वेळ येत नव्हती.
काही दिवसांनी ते दोघे असेच भेटतात. खरं तर त्या दिवशी वैष्णवीच त्याला भेटायला बोलवते.
दोघे त्याच तलावाच्या गार्डन मधे भेटतात. तलावाभोवती असलेल्या कट्ट्यावर ते दोघे बोलत बसलेले असतात. प्रेम तिच्या बाजुलाच पण थोडं अंतर ठेवून बसलेला होता.
संध्याकाळची वेळ होती. आजुबाजूला काही अंतरावर खुप सारे कपल बसलेले होते.
तो इकडे तिकडे नजर फिरवत तिला बोलतो...
प्रेम : आज असं अचानक का भेटायला बोलवलं...?
वैष्णवी : का...! नाही बोलवू शकत का...?
प्रेम : असं काही नाही...! पण असं अचानक आणि या ठिकाणी बोलावलं, म्हणुन म्हटलं....!
वैष्णवी : इथे म्हणजे...! इथे फक्त कपलच भेटू शकतात का...? मित्र मैत्रीण नाही भेटू शकत का...?
प्रेम : असं काही नाही, पब्लिक प्रॉपर्टी आहे ही, कोणीही येऊ शकतं इथे. 😊
वैष्णवी : मग...! आणि मला नाही सुचलं कुठे बोलवू ते, म्हणुन इथे ये बोलले.
प्रेम : बरं...! बोल आता....! काय काम होतं...?
वैष्णवी : काहीच काम नव्हते. आज ऑफिसमधून लवकर निघाले म्हणुन म्हटलं तुला भेटावं.
प्रेम : अच्छा...! एवढच...!
वैष्णवी : हो....! एवढच....!😊
प्रेम : बाकी...! कसा चालला आहे जॉब....?
वैष्णवी : छान....! तुझं कसं चाललंय...! ऑफिस मधे नवीन मुलगी ठेवली असेल ना...?
प्रेम : हो....! आलीय एक मुलगी तुझ्या जागी...!
वैष्णवी : अच्छा...! मग फ्रेंडशिप वैगरे झाली की नाही....?
प्रेम : फ्रेंडशिप असं काही नाही अजुन, नवीन आहे ना अजुन....!
वैष्णवी : अच्छा....! मग बाकी कसं चाललंय सर्व...?
प्रेम : ठिकच चाललय तसं...! पण असं का विचारलं...? 🤔
वैष्णवी : अरे...! असच विचारलं...! आणि तुझ्या ग्रुप मधले सर्व कसे आहेत...? मम्मी, ताई वगैरे...?
प्रेम : सर्व छान आहेत...! 😊
वैष्णवी : मग भेटता की नाही....?
प्रेम : हो तर....! महिन्यातून एकतरी शनिवार ची फुल नाइट मम्मीकडेच असते आमची...! आधी पासूनच....!
वैष्णवी : मस्त ना...! खुप मज्जा येत असेल ना...?
प्रेम : हो... खुप....! मस्त मम्मीच्या हातची बिर्याणी असते. आणि एका मोठ्या ताटात आम्ही सर्वजण एकत्र मिळुन खातो. मग रात्री उशिरापर्यंत एंजॉय. कारण दुसऱ्या दिवशी रविवार असतो. मग आरामात उठायचं.
वैष्णवी : छान...! खरच खुप छान मित्र परिवार भेटला आहे तुला.
प्रेम : हा...! ते तर आहेच....! तु पण आता त्याचा एक भाग झाली ना...!
वैष्णवी : हा...! पण... मी आत्ता आलीय ना...!
प्रेम : ठिक आहे ना, पुढेही असशीलच ना...!
वैष्णवी : म्हणजे...?
प्रेम : म्हणजे...! कुठे बाहेर फिरायला वगैरे गेलो, त्या दिवशी सारखे, तर येशीलच ना तु आता....!
वैष्णवी : माहित नाही....!
प्रेम : का...! नाही आवडलं का तुला आमच्यासोबत...?
वैष्णवी : अरे...! तसं नाही, मला येता येईल की नाही ते माहित नाही.
प्रेम : एक दिवस पण काढू शकत नाहीस तु स्वतःसाठी....!
वैष्णवी : मला आवडतं रे...! पण घरी नाही चालत, माझं असं बाहेर फिरणं. तेही अनोळखी लोकांसोबत.
प्रेम : आम्ही अनोळखी आहोत का....?
वैष्णवी : अरे....! त्यांच्यासाठी....!
प्रेम : अच्छा....! असं आहे का...!
वैष्णवी : जाऊदे ते...! तु बोल...! बाकी काय...!
प्रेम : माझं तर बाकी सगळं ठिक आहे. तु बोल...
वैष्णवी : माझं पण ठिकच चाललं आहे...!
* पुढे काही वेळ ते दोघे अशाच गप्पा मारत बसतात. आणि नंतर ती घरी जायला निघते.
असेच काही दिवस निघुन जातात. त्यांचे कॉल चालुच होते. त्या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी आरवचे प्रयत्न चालुच होते. तो एक वन डे पिकनिक प्लॅन करतो. वैष्णवीला विचारल्यावर ती नाही बोलते. कारण तिला घरातून परमिशन मिळत नव्हती. त्यासाठी एक दिवस आरव राघवला तिच्या ऑफिस मधील मानलेला भाऊ या नात्याने तिच्या घरी पाठवतो. राघव तिच्या भावाला रिक्वेष्ट करतो. राघव त्यांच्याच एरिया मधे रहात असल्यामुळे तिचा भाऊ तिला पिकनिक साठी परमिशन देतो. अशा प्रकारे तिचा पिकनिकला जाण्याचा मार्ग मोकळा होतो.
पुढेही अशाच प्रकारे राघवचा वापर केला जात होता.
त्या निमित्ताने दोघांच्या भेटी होत होत्या. ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत होते. आता दोघांनाही या गोष्टीची जाणीव झाली होती की, आपण एकमेकांशिवाय राहु शकत नाही. पण हे बोलायचे कोणी हा प्रश्न होता....!
दोघेही हाच विचार करत होते की, कुणीतरी हा विषय काढावा. पण मागे घडलेल्या प्रकारामुळे प्रेम ती रिस्क घेत नव्हता. आणि वैष्णवी आपण स्वतःहून कसं बोलायचं कारण तिने एकदा त्याला नकार दिला होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये हा विषय निघतच नव्हता.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️