सकाळी सावली लवकर उठली आणि हवे असलेले कापड आणि साहित्य घेऊन ती घराचा बाहेर पडली. त्यानंतर ती थेट ऑफिसला जाऊन पोहोचली तर तीला तसे बघून सगळे विचारू लागले. तेव्हा सावलीने कुणालाही उत्तर दिले नाही आणि तीने एक अर्ज तयार केला आणि बॉसकडे ती घेऊन गेली. बॉसने लगेच संबंधित अधिकाऱ्याला सावलीला क्वार्टर देण्याचा आदेश दिला आणि सावलीला त्याच दिवशी एक क्वार्टर मिळाले. सावली ऑफिस संपल्यावर थेट त्या क्वार्टर वर रहायला गेली होती. आता सावली आपल्या योजनेला अमलात आणू शकत होती. ती आता विचार करू लागली होती तेव्हाच तीचा फोन वाजला आणि सावलीने तो फोन उचलला. समोरून आवाज आला, “ हेलो सावली मी सावंत बोलतोय, वरिष्ठ पोलीस अधिकारी.” तेव्हा सावली उत्तरली, “ हो बोला साहेब, कशाबद्दल फोन केला तुम्ही, काही विशेष आहे काय.” तेव्हा सावंत साहेब म्हणाले, “ सावली मला तुझ्याशी काही वार्तालाप करायचा आहे. म्हणून तू पोलीस स्टेशनला येऊ शकते काय आता.” तेव्हा सावली म्हणाली, “ सर मी नक्कीच येते आता फक्त अर्ध्या तासाने.” असे म्हणून सावलीने फोन ठेवला. परंतु तीचा मनात आता प्रश्नांचे द्वंद सुरु झाले होते. तीला जो संशय होता तो आता पूर्ण झालेला होता. ती म्हणाली, “ मला अंदाज होताच कि मला चौकशीसाठी फोन येईल म्हणून मी बिचाऱ्या पीयूषचा घरी जाण्याचा बेत रद्द केला आणि ते बरे झाले. नाही तर विनाकारण तो बिच्चारा यात अडकला असता.” असे म्हणून ती सावंत साहेबांना भेटण्यास निघाली.
सावली पोलीस स्टेशनला पोहोचून थेट सावंत साहेबांचा कॅबीन मध्ये गेली. साहेबांनी तीला बसण्यास सांगीतले आणि मग ते तीचाशी बोलू लागले. ते म्हणाले, “ सावली तुला कल्पना आहे काय मी तुला का बर बोलावले आहे.” तेव्हा सावली म्हणाली, “ हो सर मला वाटत होते कि माझा प्रकरणाबद्द्ल तुम्ही मला चौकशी करण्यासाठी बोलावले असेल. म्हणून मी तुम्हाला तात्काळ भेटण्यास आले.” तेव्हा साहेब म्हणाले, “ हो हे बरोबर आहे परंतु हे एक नवीन प्रकरण आहे. मुख्य गोष्ट म्हणजे यात तुझे नाव येत आहे म्हणून मी तुला बोलावले.” तेव्हा सावली अनभिग्यपणे बोलली, “ कसले नवीन प्रकरण साहेब, आणि माझे नाव कसे आणि कुणी घेतले.” तेव्हा साहेबांनी तीला सांगीतले, “ सावली आम्हाला एका फ्लॅट मध्ये एका इसमाचा मृत देह सापडलेला आहे. त्याची तपासणी करत असतांना त्याचा फोन कॉल मध्ये तुझा नंबर आम्हाला भेटला. शिवाय मागचा एक महिन्याचा काळात त्याचा फोनवरून तुझा फोनवर अनेको कॉल आलेले आम्हाला आढळले. त्याकरिता चौकशी करण्यासाठी मी तुला बोलावले आहे.” आता अंतर सावलीने विचार केला आणि साहेबांना तीने उत्तर दिले. ती म्हणाली, “ साहेब मी तुम्हाला सांगते कि मागील एक महिन्यापासून एक व्यक्ती फोनकरून मला खंडणीसाठी त्रास देत आहे. त्याचे म्हणणे आहे कि मी निरपराध असल्याचे पुरावे त्याचाकडे आहे. त्यासाठी तो मला पैशांची मागणी करत आहे. त्याचबरोबर त्याला पैशे न दिल्यास तो ते पुरावे नष्ट करण्यची धमकी मला देत आहे. ”
सावली पुढे सांगू लागली, “म्हणून सत्य जाणून घेण्यासाठी काल त्याने मला एका पत्त्यावर बोलावले होते. मी त्याला भेटण्यासाठी तेथे पोहोचले तर मी बघीतले कि तेथे आधीच चार ते पाच जन उभे होते. त्यांना बघून मी तशीच त्याला न भेटता घरी परत आले.” असे म्हणून सावलीने तो सेव केलेला पत्ता साहेबांना दाखवला. साहेबांनी तो पत्ता बघीतला आणि ते म्हणाले, “ अरेच्चा हाच तो पत्ता आहे जेथे आम्हाला त्या इसमाचा मृत देह सापडला आहे. म्हणजे तो अनोळखा व्यक्ती हाच होता ज्याचा खून झालेला आहे.” तेव्हा सावली अचंभित होऊन म्हणाली, “ काय त्याचा मृत्यू झाला, बरे झाले मी त्या फ्लॅटवर गेले नाही अन्यथा पुन्हा नवीन प्रकरण माझ्या मागे लागले असते.” मग साहेब म्हणाले, “ तर सावली तू खरच तेथे गेली नाहीस?” सावली उत्तरली, “ हो साहेब मी आईची शप्पथ घेऊन सांगते मी तेथ पर्यंत गेली परंतु त्या फ्लॅटचा आत काय त्याचा आजूबाजूला हि नाही गेले. मी फक्त त्या फ्लॅटचा कुंपणाचा बाहेरूनच परत आले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मझा फोनचे लोकेशन ट्रेस करू शकता.” मग साहेब म्हणाले, “ तुझ्याच नाही तर त्या इसमाचा फोनमधील प्रत्येक नंबरची लोकेशन त्या वेळेस कुठे होती ती आम्ही ट्रेस करणार आहे. मला तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी तुला परस्पर बोलावून विचारले. आता तू घरी जा आणि पुन्हा जेव्हा मी तुला बोलावील तेव्हा तुला येथे यावे लागेल.” मग सावली म्हणाली, “ हो नक्कीच सर मी तुमचा एका शब्दावर जेथेही असेल तेथून येथे परत येईल.” असे म्हणून सावली तेथून नीघाली. आता सावली विचार करू लागली कि एका प्रकरणाला तीने भलतेच वळण दिले आहे. यानंतर साहेबांनी जर तीला पुन्हा विचारपूस करण्यास बोलावले तर तीला आपल्या कथनावर ठाम रहायचे आहे. यावेळेस ती फारच थोड्याने बचावली म्हणून मी मान वर करून जे आहे ते सत्य बोलू शकते आणि मला कुठेही लपायची, कुठेही जायची आवश्यकता नाही आहे. मग अचानक सावलीचा डोक्यात विचार आला “ अखेर तो कोण आहे जो तेथे मरण पावला आणि ज्याने मला भेटण्यास बोलावले होते याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे.”
शेष पुढील भागात.....